Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुकोबांचे निवडक अभंग

प
प्रसाद गोडबोले
Fri, 06/12/2020 - 15:53
💬 97 प्रतिसाद
|| पांडुरंग पांडुरंग || तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात ! ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता ! संपुर्ण तुकाराम गाथा विकिसोर्स वर ज्याने उपलब्ध करुन दिलीये त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत ! संपुर्ण श्रीतुकाराम गाथा : https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE आता जसे आठवत जातील तसे अभंग खालील प्रतिसादात लिहुन ठेवता येतील ! ---- आपल्याला थोडाजरी नीरक्षीरविवेक असेल ना कि मग ते वाईटातुनही चांगलं सापडत जातं आपोआप. मिपावरील काही प्रतिसाद पाहताना संत तुकाराम चित्रपटात (म्हणजे आपल्या विष्णुपंत पागनीसबुवांच्या सात्विक चित्रपटात हं), वापरलेला अभंग अचानक मनात डोकवुन गेला - अहं म्हणे ब्रह्म | नेणे भक्तीचे ते वर्म | तुका म्हणे क्षण | नको तयाचे दर्शन || मग थोडीशी शोधाशोध केल्यावर संपुर्ण अभंग सापडला , अन त्यासारखाच अजुन एक अभंगही सापडला ! 2114 विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हें बोलता ॥1॥ मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥ हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥2॥ सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा॥3॥ अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥4॥ तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्शन ॥5॥ 2117 वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥1॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिनी ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥2॥ जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥3॥ हरिभक्तिविण । त्याचें जळो शाहाणपण ॥4॥ तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥5॥ अवांतर : १. विकिसोर्स वरील गाथेत अनेक प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत विशेष करुन जोडाक्षरे बहुतांश ठिकाणी गंडली आहेत , पण आपल्याला त्याने काय फरक पडतो , आपल्याला अर्थाशी घेणेदेणे आहे ! २. इथे कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाहीये की समजाऊन सांगायचे नाहीये. अभंग स्वतःच्याच रेफरन्स साठी काढुन ठेवलेले आहेत ! हे सारं स्वान्तःसुखाय आहे :) || पांडुरंग पांडुरंग||

प्रतिक्रिया द्या
132819 वाचन

💬 प्रतिसाद (97)
क
कंजूस Fri, 06/12/2020 - 17:47 नवीन
निवडकावर काही भाष्य? ----------------------- http://tukaram.com/
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/13/2020 - 06:30 नवीन
तुकोबाच्या गाथेच्या वह्या जरी नदीत बुडवल्या गेल्या असल्या तरी गाथा लोकांच्या मनामनात राहून तरली गेली असावी. काही पटकन आठवलेले अभंग... (गुगल बाबाच्या कृपेमुळे काही शब्द माहित असले तरी सगळा अभंग मिळवणे सोपे जाते...) तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। कां रे सिणलासी वाउगा । न भजता पांडुरंगा ।। मानदंभासाठी । केली अक्षराची आटी ।। तर करुनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ।। वाटिले ते धन । केली अहंता जतन ।। तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।। अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥ अर्थ इतकाचि साधिला । वेद अनंत बोलिला॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावे ॥ सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥ अठरा पुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥ मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।पुनरपी संसारा येणे नाही ॥ मन हे शेवंती देऊ भगवंती । पुनरपी संसृती येणे नाही ॥ मन हे तुळशी देऊ हृषिकेशि । पुनरपी जन्मा येणे नाही ॥ तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥ सोनियाचे ताट क्षीरीने भरिलें । भक्षावया दिले श्वानालागी ।। मुक्ताफळहार खरासी घातला । कस्तुरी सुकराला चोचविली ।। वेदपारायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खूण काय जाणे ।। तुका म्हणे ज्याचे तोचि एक जाणे । भक्तीचे महिमान साधु जाणे || अजूनही आहेत ते पण जरा शोधुन लिहितो.. पैजारबुवा
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/15/2020 - 07:27 नवीन
वैकुंठ स्मशानभूमीत पण तुकोबांचे अभंग लिहिलेले आहेत. आता ते पुसटचे आठवतात.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 06/15/2020 - 08:15 नवीन
मला तरी सद्या एवढंच आठवतंय. जाला प्रेतरूप भाव | लक्षियेला ठाव स्मशानींचा || रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया | म्हणती हाय हाय यमधर्म || वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा | ज्ञानाग्नि लागला ब्रह्मत्वेसी || फिरविला घट फोडिला चरणी | महावाक्यध्वनी बोंब झाली || दिली तिलाजुळी कुळनामरूपासी | शरीर ज्याचें त्यासी समर्पीले || तुका म्हणे रक्षा जाली आपोआप | उजळला दीप गुरूकृपा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शाम भागवत Mon, 06/15/2020 - 08:17 नवीन
सुरवात अशी पाहिजे. जाला प्रेतरूप शरीराचा भाव |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मूकवाचक Mon, 06/15/2020 - 08:32 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/15/2020 - 08:34 नवीन
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥1॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥2॥ फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥3॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥ तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥5॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रचेतस Mon, 06/15/2020 - 08:26 नवीन
हो हो, हेच. अप्रतिम लिहिलंय तुकोबांनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/15/2020 - 08:43 नवीन
बाकी आजकालच्या नव ईतिहासकारांनी फॅशन आणली आहे की तुकोबा विद्रोही होते असे म्हणायची ! अगदी हुशार सुषिक्षित लोकंही ह्या अपप्रचाराला बळी पडत आहेत हे पाहुन वाईट वाटते ! आपण मुळ ग्रंथावरुन स्वतःची मते केव्हा बनवायला शिकणार ? तुकोबांनी धर्मातील वाईट प्रथांवर जरुर आसूड ओढले आहेत पण मुळ वेदोक्त धर्माला कोठेही धक्का लावल्याचे दिसत नाही , उलट वेदेक्त धर्माचे समर्थनच दिसते काही काही अभंगात >>> 1340 मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥1॥ वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥ अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥2॥ तुका ह्मणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥3॥ 1467 वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥3॥ तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥ ११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 06/15/2020 - 08:53 नवीन
बाकी आजकालच्या नव ईतिहासकारांनी फॅशन आणली आहे की तुकोबा विद्रोही होते असे म्हणायची !
असं चालू आहे हे खरंय. पण आता तर तुकाराम महाराजांचा खून झाला असंही म्हणायला सुरवात झालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/15/2020 - 11:39 नवीन
एखाद्या विषिष्ठ जातीविरुध्द विषाची शेती करायची म्हणलावर ती कशीही करता येते , त्यात तुकोबांच्यासारख्या सज्जन माणासाला वापरले जाते हे पाहुन वाईट वाटते ! पण असो. तुकोबांनी वेद विरुध्द , धर्म उच्छेदक असे लिहिलेले मला तरी अजुन काहीच सापडले नाहीये , आपण शोधत राहु :) ! ११८ अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/15/2020 - 12:01 नवीन
आणि एक म्हणजे ते " तुकोबांनी व्यवस्थेविरुध्द बंड वगैरे केले." असे जे म्हणातात त्यालाही काहीही आधार सापडत नाही . ब्रह्मवृंदांनी कवित्व इंद्रायणीत बुडावावे असे सांगितल्यावर तुकोबांनी त्रागा केल्याचे किंव्वा " नाही बुडवत जा गेलास खड्ड्यात " अशा आषयाचे अभंग मला तरी सापडले नाहीयेत. उलट तुकोबांनी तो आदेश शिरसावंद्य मानुन वह्या इंद्रायणीत बुडवल्या ही वस्तुस्थिती आहे. वह्या परत मिळाल्यावर तुकोबांनी केला अभंग पुरेसा आहे : 2231 थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥1॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥2॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥3॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/15/2020 - 09:20 नवीन
विद्रोही तुकाराम माझा आवडता संत कवी. एखाद्या शुद्राने ब्राह्मणांच्या अधिकाराविरुद्ध बंड करायची गोष्ट सतराव्या शतकात कोणी ऐकली नसेल. तुकारामाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगण्याचा अधिकार आहे काय यावर धर्ममार्तण्डाकडून योग्य निर्णय तेव्हाच्या ब्रम्हवृंदाना हवा होता अखेरीस गावच्या पाटलाकडून तुकारामाविरुद्ध दावा चालवावा लागला हेतु एकच की तुकारामांचे अभंग बंदी व्हावी. तुकाराम विद्रोही का वाटतात त्यासाठी तो काळ तेव्हाचे अधिकार आणि तुकारामाची अभंगरचना समजून घ्यावी लागते, तेव्हा विद्रोही तुकारामाची ओळख होते. ''बरा देवा कुणबी केलो नाही तरि दंभेची असतो मेलो'' ''वेदाचा तो अर्थ आम्हासिच ठावा येरांनी वाहावा भार माथा खादल्याची गोड, देखिल्यास नाही. भार धन वाही मजुरीच .... ..... तुका म्हणे आम्हा सापडले मुळ आपण चि फळ आले हाता.'' संत तुकाराम माझा आवडता कवी म्हणून या धाग्यात हजेरी. ''सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहूमता तुका म्हणे होय मनाशी संवाद|आपुलाची वाद आपनाशी''. -दिलीप बिरुटे (विद्रोही तुकारामाचा फ्यान)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 06/15/2020 - 10:01 नवीन
ही सर्व संत मंडळी संसारी लोकांना नक्की काय सांगतात?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/15/2020 - 10:55 नवीन
''जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा'' वारकरी संप्रदायातील संतांच्या बहुसंख्य अभंगातून विठ्ठल आणि विठ्ठलभक्ती, नामस्मरण,संत, लक्षणे, नितितत्वांचा उपदेश असेच विषय आढळतात. चातुर्वण्य व्यवस्थेतले हे सर्व सामाजिक विषमतेने पोळलेले घटक, अठराविश्वे दारिद्र्य प्रस्थापित व्यवस्थेने हद्दपार केलेले महार, माळी, सोनार, शिंपी, स्त्रीशुद्र असे सर्व आणि हे सर्व परमेश्वरी इच्छेने म्हणून वाटेला आलेलं म्हणून स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही असे. संत तुकाराम मात्र अपवाद. वरील विषय होतेच पण, अंधश्रद्धा, कर्मकांड, कर्मठजीवनपद्धती, दांभिकता यावर हल्ला चढवतात. व्यक्तीचं स्वत:चं आचरण चांगलं असलं पाहिजे यावर त्यांचा फ़ोकस होता. ’पुन्हा तुकाराम’ या दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांच्या पुस्तकात तुकारामांची ही सर्व रुपे आहेत. कवी, माणूस, भक्त, ज्ञानी असणे, अशी अतिशय सुंदर. संत तुकाराम आपल्यासारखा संसारातला फ़्रेंडली माणूस वाटतो. ”संसार तापे तापले मी देवा करितो सेवा या कुटुंबाची म्हणून येवो आठवले तुझे पाय येवो माझे माय पांडुरंगे” ( शब्द मागे पुढे चुभू देघे) आणि हे सर्व मांडायचं शब्दांच्या माध्यमातून ”आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु” तुकारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रचेतस Mon, 06/15/2020 - 10:58 नवीन
तुकारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी.
लिहा ना भो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
महासंग्राम Wed, 07/01/2020 - 13:39 नवीन
कारामांवर एक स्वतंत्र चांगला लेख लिहायचा असा खुप दिवसांपासून संकल्प आहे, राहून जातो. फ़िर कभी.
लिहाच एक लेख वाट पाहतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गॉडजिला Mon, 08/16/2021 - 08:00 नवीन
जे सांगायचे ते सांगुदेत त्यांना... वस्तुस्थिती ही आहे मनाची निर्व्याजता, निष्कामता, चित्ताचा सात्विकपणा, निव्वळ सद्गुणांचा अट्टहास हे सर्व मृत्युची वाट पहायचे डोहाळे आहेत. आपण वरील गोश्टीचा मनापासुन पुरस्कार करणार्‍या कोणत्याही सामान्य व्यक्तीस भेटा आतुन तो काहीसा जगाला त्रासलेला अन मुक्तिस (मृत्युस) आसुसलेला प्राणिच दिसेल. जो मृत्युस आसुसलेला नाही तो वरील बाबींचा अनाठायी अट्टहास करणारा कधीच दिसणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/16/2021 - 09:12 नवीन
२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Mon, 08/16/2021 - 09:42 नवीन
फार छोट प्रतिसाद असल्याने समजला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कंजूस Mon, 06/15/2020 - 11:06 नवीन
सानेगुरुजींनी पंढरपूर मोकळे केले. तोपर्यंत सर्वांना प्रवेश नव्हता. काठी हाणल्याशिवाय समाज सुधरत नाही.
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Mon, 06/15/2020 - 18:18 नवीन
तुम्ही लिहिता, "आपल्याला अर्थाशी घेणे आहे" तर ह्या अभंगांचा अर्थ कुठे मिळेल तेही लिहा बुवा. मला २११४ व २११७, दोहोंचाही अर्थ पूर्ण कळला नाही. मी फार वर्षे ऐकत आलोय ज्ञानेश्वरी आणि गाथेची महती. पहिली तर ह्या आयुष्यात तरी समजेल असे वाटत नाही. तुकाराम तुलनेने सोपा म्हणतात तो तरी समजावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Mon, 06/15/2020 - 21:28 नवीन
माझे आवडते काही प्रचलित अभंग हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥ न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥ तुका ह्मणे गर्भवासी । सुखें घालावें आह्मांसी ॥४॥ आम्ही वैकुंठवासी | आलो याची कारणासी || बोलिले जे ऋषी | साच भावे वर्तावया || सध्या वारीचा काळ आहे त्यासाठी खेळ मांडीयेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाईं रे | होतो जयजयकार गर्जत अंबर मातले हे वैष्णव वीर रे | तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे ||
  • Log in or register to post comments
आ
आदेश007 Tue, 06/16/2020 - 16:31 नवीन
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु || मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ || भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ || मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ || अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ || तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ ||
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 07/01/2020 - 11:16 नवीन
भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ ||
हा अगदी ओरिजनल अभंग दिलाय तुम्ही, नाहीतर सध्या बऱ्याच ठिकाणी बरेच बदललेले शब्द घातलेले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदेश007
स
स्वधर्म Wed, 06/17/2020 - 09:19 नवीन
तीर्थी धोंडा पाणी , देव रोकडा सज्जनी भगवतगीता, ज्ञानेश्वरी, वेद यातून देव सापडेलही कदाचित, पण ते सर्व पुढल्या तारखेचे धनादेश आहेत. कधी वटतील सांगता येत नाही. तुकाराम संत सज्जन हाच रोकडा देव असल्याचे सांगतात. ही मला तुकारामांची सर्वात आवडलेली ओळ. तीर्थी धोंडा पाणी म्हणणारे तुकाराम, त्यावरच ज्यांचा धंदा आहे, त्यांना कसे आवडणार? त्यांनी प्रचलित अध्यात्म, देवाची संकल्पना याविरुध्द बंड केले, म्हणून ते विद्रोही असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 06/17/2020 - 10:55 नवीन
वाह सुंदर ! हा अभंग क्रमांक ११४ आहे : ११४ तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥ मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥ तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥ तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
तीर्थी धोंडा पाणी म्हणणारे तुकाराम, त्यावरच ज्यांचा धंदा आहे, त्यांना कसे आवडणार? त्यांनी प्रचलित अध्यात्म, देवाची संकल्पना याविरुध्द बंड केले, म्हणून ते विद्रोही
बाकी आपण ११३ वा अभंग जरुर वाचुन पहा नक्की आणि आपले काही मत बदलल्यास कळवा! तळटीपः मला कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाही की वादविवाद करयची इछा नाहीये (नाहीतर तसे ११४ सोबत ११३ कॉपीपेस्ट करुन इथे टाकणे अवघड नव्हते). तुकोबा आभाळायेवढे मोठ्ठे आहेत, ज्याला जितके जसे भावतील त्याने तितके तसे घ्यावेत ! पांडुरंग पांडुरंग _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Wed, 06/17/2020 - 14:49 नवीन
वाचला. खरे तर त्यात पंढरीचा महिमा सांगितला आहे. तसाच आणखी एक म्हणजे, जयाचिये घरी | पंढरीची वारी. किंवा आावा चालली पंढरपुरा हा एक दुसरा. मला वाद घालण्यात काही रस नाही, पण अनेक गाथा, ग्रंथ यात, परस्परविरोधी वचने संदेश असतातच. सॅम हॅरीस यांनी असा बायबलमधील परस्परविरोधी वचनांचा अभ्यास केला आहे, आणि आक्षेपही घेतले आहेत. आपल्याकडेही राजीव साने यांनी गीतेमधील अशा वचनांची उदाहरणे दिली आहेत. यू ट्यूबवर त्यांची गीतेबाबतची मालिका आहे. असो. माझ्या दृष्टीने तुकाराम हे अलौकिक प्रतिभावंत आणि कमालीचे प्रामाणिक संत आहेत. त्यांचा भक्तीमार्ग मात्र मला भावत नाही. ११३ वा अभंग सर्वांसाठी पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥ आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥ तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 06/17/2020 - 16:33 नवीन
:) ११३ आणि ११४ एकत्रित वाचल्यावर "पंढरीपुढे अन्यतीर्थे काहीही कामाची नाहीत " असा अर्थ लागतो , म्हणजे किमान मला तरी. हे तुकोबांच्या अनन्य भक्तीचे लक्षण वाटते , कोणत्याही प्रकारचे बंड किंव्वा विद्रोह मला तरी दिसत नाही ह्यात! बाकी वाद विवाद करण्यात आता मलाही रस उरला नाहीये कोठेच, ज्याला जे भावते ते त्याने घ्यावे . :) तुम्ही ११३ वा अभंग दिल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद _/\_ 3414 नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥1॥ आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥ येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥2॥ मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी॥3॥ सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकन ॥4॥ पडों नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥5॥ पांडुरंग पांडुरंग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
प
प्रसाद गोडबोले Fri, 06/26/2020 - 12:46 नवीन
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥1॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥2॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्निचिया सृष्टी चेविल्या जेवीं ॥2॥ तुका ह्मणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥4॥ पांडुरंग पांडुरंग
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 06/26/2020 - 13:44 नवीन
माझाही हा आवडता अभंग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
त
तेजस आठवले Fri, 06/26/2020 - 16:57 नवीन
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे दोनही जणू अप्रतिम तेजाने तळपणारा रत्नेच आहेत. माझा आवडणारा अभंग म्हणजे भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥ पौर्णिमेचा चन्द्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥ दिवाळीच्या मुळा लेकि आसावली, पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥२॥ भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाहे परी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥ तसंच आम्ही जातो आमुच्या गावा हे ही पद अत्यंत आवडीचे. अजूनही बरेच अभन्ग आवडतात इतिहासातल्या प्रत्येक गोष्टीत जातीभेद आणून बघा "ह्यांनी" कसा तुमच्यावर अन्याय केला हे क्षणोक्षणी ओरडून सांगणे हाच बऱ्याच जणांचा धंदा आहे. आणि "ते" विशिष्ट् लोक वरणभात, गूळतूप पोळी खाणारे असले की त्यान्च्याकडून शारीरिक तर दूरच, पण शाब्दिक प्रतिक्रिया पण येणार नाही हे अशा अजेन्डाधारकांच्या पथ्यावरच पडते. हेच लोकं देवळे फोडणाऱ्या आणि सर्व जातींतील हिंदूंना बाटवणाऱ्या आणि त्यातच आपला धर्म बघणार्यांशी पडद्यामागे संधान बांधून असतात. तीनशे वर्षांपूर्वी काय घडले ह्याचा कुठलाही पुरावा नसताना आताच्या काळात काही विशिष्ट जातींना लक्ष करणे आणि धाकटपशा दाखवण्यासाठी रिकामटेकड्यांची फौज कामी लावणे ह्यात काही लोक माहीर आहेत. आपल्या मिपावर पण संत रामदासांना आदिलशाहाचे हेर आणि स्वराज्याचे शत्रू म्हणणारे दिवटे होतेच की. आता काही संघटनांचा हा उघड उघड अजेन्डा आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने ही चर्चा पुढे जाऊ नये. अशांसाठी कदाचित खालील अभंग लागू पडावा काय? जाळे घातले सागरी । बिंदु न राहे भीतरी ॥१॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ गाढव गंगेसी न्हाणिले । जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ प्रीती पोसिले काउळे । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥ तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृ॥ माझ्या वाचनाप्रमाणे, मोरे घराण्याचा पिढीजात सावकारीचा धंदा होता आणि सर्व पिढ्यानी तो उत्तम चालवला. तुकारामांनीही तो उत्तम प्रकारे चालवला. पण पुढे दुष्काळात येणेकर्यांनी पाठ फिरवली आणि देणेकर्यांचे देणे द्यावे लागले तसेच दुष्काळातले लोकांचे हाल पाहून तुकारामांनी धान्याची कोठारे खुली केली. एकूणच विषण्णता आणि आत्यंतिक निराशेचा तो काळ. त्यातच पहिली पत्नी आणि अपत्याचा मृत्यू ह्यामुळे झालेले दुःख पाहता तुकारामांना किती सोसावे लागले ह्याची कल्पना करून पाहावी. ह्या अशा प्रतिकूल परिस्थितीतूनच उदारमतवादी विचारांचा श्लोकांवाटे सुंदर विसर्ग झाला असावा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/01/2020 - 09:05 नवीन
१५ आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 08/15/2021 - 20:41 नवीन
माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥1॥ आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥ वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥2॥ तुका ह्मणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥3॥
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 08/16/2021 - 07:33 नवीन
नमन. उगाच काही गोड शब्दांत सांगणे वगैरे नाही.. बुवांचे अभंग म्हणजे.. अगदी सरळसोट भाषा आहे! सटासट थोतरीत बसतात. मनाला असं अगदी गदगदा हलवून जागं करण्याचा अनुभव येतो! खूप खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 08/16/2021 - 10:11 नवीन
वेळ आल्यास देवालाही ठणकावायला मागे पुढे न बघणारे तुकोबा आपले आवडते आहेत. सरळसाधा संसारी माणुस ठरवले तर परमार्थात कशी प्रगती करु शकतो याचे रोकडे उदाहरण म्हणजे तुकोबा. येउद्या अजुन अभंग
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 08/16/2021 - 15:41 नवीन
सहमत... केवळ भौतिक कौशल्यधारीत लाभ मिळवायला विशेष उपयोग होत नाही अन अध्यात्मिक लाभासाठी हाच एक पर्याय असेही नाही म्हणुनच मी नाईलाजाने अभंग वाचन बंद केले... अन्यथा एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात... पण आजही जेंव्हा कोणाच्या तोंडून अथवा लेखणीतून मी महाराजांचे अभंग बघतो, मला माझ्या अनुभूतीला पोरके झाल्याचा फिल येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
र
राघव Mon, 08/16/2021 - 17:53 नवीन
एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात...
अतीव सुंदर! _/\_
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 08/16/2021 - 18:26 नवीन
मी वरील प्रतिसाद काल्पनिक लिहला आहे, थाप मारली आहे. मला असे काही होत नाही, प्रतिसाद फक्त हे सिध्द करायला लिहला की माझे बुड स्वांत सुखात लोळत आहे अशी बतावणी मी आत्ता पासून पुढील वीस हजार वर्ष पिढ्यान पिढ्या चालू ठेवू शकतो... आणि लोकांच्या भक्तिभावनेला साद घालून त्यांची, माझी, देवाची अन सर्वांची अशी फसवणूक, प्रसंगी पिळवणूकही सहजी करु शकतो. आणि तरीही चार चौघात माझे बुड स्वांत सुखात गेली वीस हजार वर्षे पिढ्यान् पिढ्या लोळत आहे असे निर्लज्ज्जपणे मिरवूही शकतो आणि इतरेजन माझ्या या थापांना सहजी बळी पडू शकतात, माझे विवेचन सत्य मानू शकतात प्रसंगी जगण्याचे ते प्रमाणही बनू शकते... मी स्वतःला एक नंबर घोषित करु शकतो . पण वस्तूता ही सर्व माझी बोलबच्चन आहे, स्वतःची व इतरांची फसवणुक, पिळवणूक अथवा इतर काही हेतू साध्य करायला लीहलेली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Tue, 08/17/2021 - 12:10 नवीन
ठीक आहे. थाप असो किंवा नसो. पण जर हा अनुभव कुणाचा खरा असला तर? त्याच्यासाठी ही थाप ठरत नाही. :-) आणि शेवटी कशातून काय घ्यायचे हे ज्याचे त्याने स्वतः ठरवायचे असते. कुणी सांगून विशेष फरक पडत नसतो. मला तुकोबांच्या अभंगांतून तळमळ जाणवते, जी अक्षरशः काळजाला भिडते. स्तिमित करते. त्यांना आलेले अनुभव आपल्यालाही मिळावेत हा अट्टाहास कशासाठी असणार? जास्तीत जास्त असे वाटू शकते की आपल्या साध्यासाठी [ मग ते कोणतेही असो! ] तशी तळमळ आपल्या चित्तवृत्तीत उतरावी. बाकी जो प्रदेश माहीतच नाही त्याबद्दल आणिक काय बोलणार? इत्यलम्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 08/17/2021 - 14:32 नवीन
तूर्त इतकंच. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
श
शाम भागवत Tue, 08/17/2021 - 15:51 नवीन
अन्यथा एक एक ओळ, त्यातून सूचित होणारा अर्थ, तो वाचून मनात उठणारे ज्ञानाचे काहूर अन डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती तरळल्याने आपसूक जोडल्या जाणाऱ्या हाताची न थांबणारी थरथर, आजही नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच येतात... डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळ वाहायला सुरुवात होते, मग मनाने माझा मी रहात नाही अन् विठ्ठलाचा मी होत नाही, अशा त्या शब्दात व्यक्त न करतां येण्या जोग्या अवस्था आयुष्यात फार मोठी अनुभूती देऊन जातात...
खरोखरच अतिसुंदर अवस्था असते ती. तृप्तता इतकी काठोकाठ भरलेली असते की बस्स्. सगळीकडे मांगल्य भरलेले असते. त्यावेळेस मी फक्त आणि फक्त विठ्ठलाचा असतो. त्याच्याशिवाय मला दुसरं काहीहि नको असतं. कारण दुसरं काही हवंस वाटायला अतृप्तिच शिल्लक राहिलेली नसते. असो. 🙏
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/17/2021 - 18:53 नवीन
शाम जी , राघवा , मला तुमचं मनापासुन कौतुक वाटतं ! गॉडजिला ह्यांनी जाणीवपुर्वक थाप मारली आहे , तुमचा श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले आहे हे त्यांनी कबुल करुनही तुम्ही त्या लेखनात चांगले तेच शोधता ! हे असं वाईटातुन चांगलं शोधता आलं पाहिजे , हा असा नीरक्षीरविवेक असायला हवा ! सादर दंडवत स्वीकारा आमचा ! बाकी सगळ्यांनाच अनुभव येईल असे नाही , रादर साधनेच्या पहिल्या पायर्‍यांवर अनुभव नसतो तेव्हा चिकाटीने गुरुनिष्ठेने साधना करत रहाणे हाच एक उपाय आहे ! ह्या बाबतीतही तुकोबांचा खुप सुंदर अभंग आहे >>> अनुभव तो नाहीं अमुचिया दरषणें । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । ह्मणतां मांडे पुरी काय होतें ॥1॥ नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ध्रु.॥ पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येइल मानूं । अंतरीं सबाह्यी कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्त्ततसां॥2॥ आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडतयास काय द्यावें । तुका ह्मणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुह्मी कोठें॥3॥ बाकी ह्या भक्तीमार्गाचे एक उत्तम आहे , इथे खोटे बोलुन , थाप मारत जरी देवाची आठवण काढली तरीही सद्गतीच लाभते !! आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरि स्मरला नाहीं तुज ॥1॥ प्राण जातेवेळे ह्मणे नारायण । त्यासाटीं विमान पाठविलें ॥ध्रु.॥ बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥2॥ तुका ह्मणे भक्तकाज तूं कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥3॥ पांडुरंग पांडुरंग ______________________/\_______________________________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ग
गॉडजिला Tue, 08/17/2021 - 19:04 नवीन
तुम्ही तर माझ्या मनातले विचारच लिहुन काढले. तुम्ही जो प्रतिसाद लिहलात नेम्का तसाच विचार करायला लोक बांधलेले असतील, नाही तसे घडले तर कोणितरी येउन त्यांना उपदेशांम्रुत पाजुन त्यांना बांधुन जाइल व माझ्या थापा त्यांच्या अंतकरणाचा अविभाज्य भाग बनतीलच हे उमजुनच माझे थाप मारायचे मन झाले आणी महत्वाचे म्हणजे मी थाप मारली हे उघड बोलायचे धाडसही झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/17/2021 - 19:14 नवीन
चला , येथील लोकांचा सात्विक भाव पाहुन तुमचेही मन परिवर्तन होत आहे पाहुन खुप आनंद झाला . २ कडुन १ कडे प्रवास सुरु झालेला पाहुन खरेच धाग्याचे सार्थक झाल्याचे वाटले ! नाहीतर काहीकाही लोकं असे असतात की त्यांना कितीही सांगितलं तरी कळत नाही अन वळतही नाही ! अशा लोकांविषयी तुकोबा म्हणतात : किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥1॥ शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥ नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥2॥ तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥3॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 08/17/2021 - 19:19 नवीन
आम्हाला कोणी काय समजावे हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबुन असल्याने आमच्या थापा तुम्हाला आनंद देतात व पुढिल विस हजार वर्षे आनंद देतच राहतील यात तुम्हीही सामाविश्ट होणार हे हे माहित असल्याने... गड्या आम्ही पर्फेक्ट दोनच बरे रे बाबा... १ वाल्यांच भामटेपणा जास्त झेपणार नाही म्हणुन लगेच सत्यही बोलुन मोकळा झालो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॉडजिला Tue, 08/17/2021 - 19:27 नवीन
एखादा प्रभावी वाटु लागला भलेही विरोधक भासला तरी त्याला लगेच आपल्यातलाच म्हणुन जाहीर करतात... आमचीच री ओढतोय कोकलत सुटतात, वस्तुतः भामटे फक्त भामटे असतात... त्यांचा परमार्थ स्वार्थाशी जोडलेला असतो आणी म्हणुन जे जे खरे संत होउन गेले, दिव्य पुरुष होउन गेले त्यांना ते सर्वात आधी जवळ करतात सामान्य सद्गुणी श्रध्दाळु लोकांचा बुध्दीभ्रम करण्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
श
शाम भागवत Wed, 08/18/2021 - 04:14 नवीन
हे असं वाईटातुन चांगलं शोधता आलं पाहिजे
मला वाटते माझ्या अनुभवाच्या विरोधात जाणारा भाग मला जाणवला तो मी स्पष्ट केला. फक्त त्या अगोदर माझ्या अनुभवाला दुजोरा देणारा भागाशी सहमती दाखवली. श्रध्देच्या जोरावर किंवा तर्काच्या जोरावर अध्यात्माचा अभ्यास करताना श्रध्दा दुखावणे हा प्रकार असू शकतो. राग येऊ शकतो. जोरदार प्रतिवाद करावासा वाटतो. पण अनुभवाच्या आधारे व तीही सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल चालू असताना हे सगळे प्रकार अगदी हलक्या हाताने बाजूला करून वाटचाल चालू ठेवता येते. हे सगळे बाजूला करताना त्या हातालाही काही चिकटत नाही तर मनाला काय होणारेय? त्यामुळे काळजीच नसते. स्वान्त सुखाय असंही काही नसतं. फक्त वाटचाल असते. कोणीतरी वाट कशी आहे या बाबत बोललेले असते त्यात काही वेगळं वाटलं तर, फक्त त्याबद्दल दोन शब्द उच्चारून थांबायचं इतकच. ज्याला कळायचं त्याला कळतं. असो. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 04:47 नवीन
तयारी झाली की सदगुरु आपणास लवकरच जे जसं आहे तसंच स्विकारायची दिक्षा देतिल तोवर धिर धरावा. अन्यथा थोरामोठ्यांच्या रचना आपल्या बुध्दिच्या कक्षेत सोडवायच्या मोहजालात असे फसाल की गुरु एक दीवस मलाच आपल्या समोर उभे करतील. _/\_ अर्थात कोणी काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही, मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Wed, 08/18/2021 - 04:48 नवीन
माझा पास. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा