Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

!जय श्री राम! - अखेर श्री. मोदींनी करुन दाखवलं

प
प्रमोद देर्देकर
Wed, 08/05/2020 - 06:03
💬 136 प्रतिसाद
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर. जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं. सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे. पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत. मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं. या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्‍या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक. मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक. मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्‍या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो. मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात. आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे. जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती. हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती. !जय श्री राम!

प्रतिक्रिया द्या
43705 वाचन

💬 प्रतिसाद (136)
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 06:25 नवीन
काळाची गती अगाध असते. ज्यापायी इतर लोकांनी अनन्वित कष्ट केले, त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/05/2020 - 06:48 नवीन
अलगद ? श्री रामजन्मभुमी आंदोलनात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा सक्रिय सहभाग होता. आदरणीय लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या जी रथयात्रा काढली होती त्याचे सारथ्य व नियोजन श्री मोदींनी केले होते. सुप्रिम कोर्टात राम मंदिर सुनावणी दररोज व्हावी म्हणून मोदींनी व योगी आदित्यनाथ यांनी सातत्याने प्रयत्न केले. या शिवाय राम मंदिर भुमीपुजनासाठी केंद्रात भाजपा सरकार यावे लागले नाहीतर या केसची सुनावणी पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस सातत्याने होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 08:22 नवीन
तेव्हा मोदींचा सक्रिय सहभाग असेलही/नसेलही पण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, साध्वी ऋतूंभरा, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि इतरही अनेक करसेवक ह्यांचा खूपच जास्त प्रमाणात सहभाग होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/05/2020 - 09:11 नवीन
अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, साध्वी ऋतूंभरा, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि इतरही अनेक कारसेवकांचा सहभाग कुणी नाकारल्याचे वाचण्यात/ऐकण्यात आजवर तरी आले नाही. -- तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 09:19 नवीन
ह्यापैकी हयात असलेली कोणीच मंडळी आज अयोध्येत नाहीत किंवा भूमिपूजन समारंभाचे त्यांस आमंत्रणही नाही. इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
M
mrcoolguynice Wed, 08/05/2020 - 10:25 नवीन
सोने की थाली में जोना परोसा अरे खाए गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे... अरे लौंगा इलायची का बीड़ा लगाया चाबे गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे ... अरे बेला चमेली का सेज बिछाया हाँ बेला चमेली का सेज बिछाया सोए गोरी का यार, बलम तरसे रंग बरसे ... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/05/2020 - 10:36 नवीन
तुम्ही उल्लेख केलेल्या व हयात असणार्‍या मंडळीना या समारंभासाठी बोलावले असते तर मोदी विरोधी म्हटले असते की जे हयात नाहीत त्यांना का नाही बोलावले. आता अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे वय पाहाता त्यांना आमंत्रण नसेल दिले. शिवाय भुमीपुजन मोदींच्या हस्ते होऊ नये असे ज्यांना वाटते ते काहीही तर्क लावू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
M
mrcoolguynice Wed, 08/05/2020 - 11:08 नवीन
या सोहळ्याला सुमारे १७६ निमंत्रित व्यक्ती यांचे सरासरी वय सुमारे ७५ वर्षे असावे. त्यामुळे वयोमानानुसार आमंत्रण, हा दावा मोदी भक्तांचा बिनडोकपणा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
च
चौकस२१२ Wed, 08/05/2020 - 11:33 नवीन
'....भूमिपूजन समारंभाचे त्यांस आमंत्रणही नाही' काही करून येन केन प्रकाराने खुसपट काढायचं ते हेच... तुम्हाला कधी पासून अडवाणींचा कळवळा ? हे म्हणजे कसं माहिती का... वाजपेयी वारले तेव्हा हीच कोलेकुई चालू झाली होती तसेच त्यावेळी काय काय तारे तोडले ... ... "आम्हाला ( बिगर भाजपावाले) वाजपेईई कसे वंदनीय होते ( खरा अर्थ हा कि या मोंदींपेक्षा वाजपेयी चंगले वैगरे..) कोण लक्ष देतो तुमचयकडे ...बसा ठणाणा करत... खुलासा( मंदिर हे केवळ एक प्रतीक आहे ,,,मुख्य हे आहे कि हिमतीने देशाच्या आणि बहुसंख्यांच्या अपेक्षांकडे वर्षनुवर्षे काँग्रेस ने जे मुद्दामून दुर्लक्ष केले ते बाजूला सारून काही खंबीर निर्णय घेणारे सरकार मिळाले म्हणून माझ्यासारखा निधर्मी पण या विचारांना साथ देतो )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
M
mrcoolguynice Wed, 08/05/2020 - 11:41 नवीन
ज्याप्रमाणे मॅच चालू असताना अर्धनग्न चिअरगर्ल्स नाचत असतात. त्यांचा मॅचशी संबंध फक्त टणाटण उद्या मारणे याकडेच असतो, कोण आउट झाला कोण चौके मारतो याचे त्यांना घेणंदेणं नसतं... त्याचप्रमाणे, परदेशात राहून , भारतीयांना शहाणपण शिकवणाऱ्या वैचारिक अर्धनग्न चिअरगर्ल्स टनाटना नाचू लागल्यात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Wed, 08/05/2020 - 12:49 नवीन
"थंड" डोक्याचं माणसा अरे काय ते एक ठरव तुझ्या म्हण्याप्रमाणे मी दोन्ही एकाच वेळी करणे अवघड आहे रे बाबा .."परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून वर्षानुवर्षे एकाहाताने टिशशू पेपर रगडत बसू आणि अर्धनग्न नर्तकी सारखे पण नाचू" असो एकूण तुझी एकूण सटकलेली दिसते.. तुझ्यआ सारखे "नग्न " प्रतिसाद तशाच भाषेत देता येतील मला पण ( परदेशात असून सुद्धा) पण त्या पातळीवर जाण्याची इच्छाच नाही.. तू मात्र सावर रे रे बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice Wed, 08/05/2020 - 13:09 नवीन
दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियेतील गोष्टी एकत्र करण्याचा चौकसपणा करू नका. आणि वर्ष्यानुवर्षं त्याचं त्याचं घासून गुळगुळीत झालेल्या चिपळ्या आता तरी वाजवत बसू नका. आवरा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 11:42 नवीन
आलात व्यक्तिगत प्रतिसादावर. उत्तम. तुमच्याकडून दुसरी अपेक्षाही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
प
प्रमोद देर्देकर Wed, 08/05/2020 - 11:47 नवीन
ते येणारच प्रचेतस भावु त्यांचा तोच तर अजेंडा तोच आहे आणि तोच राहणार. हे तेच ते दमामी, फिलॉसॉफर, वगैरे वगैरे अणि अगणित आयडी बॅन होवुन सुध्दा परत परत फिरुन नव्याने कुठल्याही कारणाने का होईना फुकाचे खुसपट काढाणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
M
mrcoolguynice Wed, 08/05/2020 - 11:48 नवीन
कृपया प्रतिसादाचा थ्रेड नीट पाहून घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
अ
अनुप ढेरे Wed, 08/05/2020 - 10:13 नवीन
अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंग, साध्वी ऋतूंभरा, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि इतरही अनेक करसेवक ह्यांचा खूपच जास्त प्रमाणात सहभाग होता.
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/05/2020 - 07:06 नवीन
आणि सहमत आहे. लॉटरी म्हणतात, लागली. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 07:52 नवीन
ज्यापायी इतर लोकांनी अनन्वित कष्ट केले, त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले. असंच कलम ३७०, तीन तलाक, उडी आणि बालाकोट बद्दल पण म्हणून टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 08:20 नवीन
कुठून कुठं नेताय तुम्ही प्रकरण? माझ्या प्रतिसादात मोदींवर टीका केल्याचा एकतरी शब्द आहे का? ज्या धाग्याशी संबंधित प्रतिसाद आहे त्याविषयीच बोला. तुमच्या प्रतिसादाचा अर्थ काढल्यास राममंदिरापायी इतर लोकांनी केलेल्या कष्टांचे, त्यांच्या बलिदानाचे मोल तुमच्या लेखी काहीच नाही ते दिसते. तुम्हाला राममंदिर होतेय म्हणून नव्हे तर तर मोदींच्या हातून त्याचे भूमिपूजन होतेय याचाच आनंद होतोय असे एकूण तुमच्या प्रतिसादावरून दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/05/2020 - 06:48 नवीन
जय श्री राम !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 06:50 नवीन
त्यांचं फळ मोदींच्या हाती अलगद पडले. लोकांचे कष्ट असतातच पण श्री मोदींच काहीच कर्तृत्व नाही? १९९३ सालापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली केस सुनावणीसाठी येते तेथे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणीसाठी घेते मग पाच न्यायाधीशांचे पूर्णपीठ हाच खटला सुनावणीसाठी घेतो. यामागे असलेली कायदेशीर प्रक्रिया समजावून घेतली असती तर असे

सवंग विधान केले नसते

  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 08:24 नवीन
सवंग विधान, हाहाहा. कायदेशीर प्रक्रिया तुम्ही समजावून सांगाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कपिलमुनी Wed, 08/05/2020 - 11:25 नवीन
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी प्रक्रियेत सरकार किंवा नेत्यांचा हस्तक्षेप असतो असे तुमचे म्हणणे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 16:29 नवीन
सुनावणी प्रकरणात नव्हे तर कोणती केस बोर्डावर येईल. कोणत्या खंडपीठापुढे येईल, कोणता न्यायाधीश आपल्या "बाजूचा" आहे कुणाचा नंबर रांगेत परत परत मागे जातो. इ इ असे बरेच किस्से आहेत. त्याची चर्चा करण्याचा हा धागा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 08/05/2020 - 16:55 नवीन
अरे देवा ! आणि मी भलत्याच भ्रमात होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/06/2020 - 05:50 नवीन
तीन तलाक प्रकरणात हा (bias) पूर्वग्रह येऊ नये म्हणून पाच न्यायाधीशांचे पूर्णपीठ होते. त्यात एक हिंदू, एक शीख, एक पारशी, एक ख्रिश्चन आणि एक मुसलमान न्यायाधीश होते न्यायालयात सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व असावे म्हणून काही वेळेस लायक नसलेल्या न्यायाधीशांना पण "चढवले" जाते. न्या सीरियाक जोसेफ नावाच्या न्यायाधीशांनी दिल्ली उच्च न्यायालयात १०५ खटले सुनावणीकरून निकाल महिनोन्महिने राखून ठेवला आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयात चढवले गेले तेंव्हा हे सर्व खटले पुन्हा सुरुवातीपासून दुसऱ्या पिठापुढे सुनावणीस घ्यावे लागले. सर्वोच्च न्यायालयात साडे तीन वर्षे काम केलेल्या या महाशयांनी फक्त ७ निवाडे लिहिले होते आणि आपल्या आयुष्यभराच्या कारकिर्दीत त्यांनी १०० सुद्धा निकाल लिहिले नाहीत. केवळ ख्रिश्चन म्हणून त्यांना बढती मिळत गेली. https://thewire.in/law/he-gave-only-7-judgments-in-3-years-so-how-did-cyriac-joseph-make-it-to-the-nhrc न्यायालयात निकाल मिळतो. न्याय मिळेलच असे नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डँबिस००७ Sat, 08/08/2020 - 12:41 नवीन
बर आहे ! येऊ नका बाहेर त्या भ्रमातुन !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रमोद देर्देकर Wed, 08/05/2020 - 07:27 नवीन
तुम्ही म्हणाल असे असेल तर मग तसे सगळ्या पं.प्र. च्या बाबतीत बोलता येईल की कारण ते ५ वर्षे सत्तेवर येण्या आधी कोणीतरी खुप अनन्वित कष्ट केलेलेच असतात. पण जो पं.प्र. सत्तेवर असतो त्याच्या नावे तर इतिहास लिहला जातो. आता बोलायचं झालं तर चला तर मग पं. नेहरुं पासुन सुरुवात करु.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 08:26 नवीन
अर्थातच. एकटा माणूस हे करूच शकत नाही पण मंदिर निर्माण होण्यामागे श्री मोदीच आहेत असा जो सार्वत्रिक समज करून दिला जातोय तो चुकीचा आहे हे फक्त सांगू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
स
सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 09:02 नवीन

फळ अलगद हातात पडलं

याचा साध्या मराठीत अर्थ असा निघतो कि काहीही कष्ट न करता त्याचे फळ मिळालं. दुसरा अर्थ असेल तर मला समजावून सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 09:22 नवीन
तुम्हीच सांगा फळ मिळाले की नाही? बाकी तुम्हाला हवा तो अर्थ घ्या. आमचे काही म्हणणे नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 09:25 नवीन
फळ अलगद हातात पडलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 09:26 नवीन
अक्षरे बोल्ड करून काही उपयोग होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 09:27 नवीन
ती अपेक्षा नाहीच. पूर्व ग्रह इतका सहज हटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 09:29 नवीन
पूर्वग्रह आहे हे कशावरून हे सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 09:26 नवीन
न्यायालयीन प्रक्रिया पण एकदा समजावून घ्या आणि तिला चालना देण्यात मोदींचा सहभाग काय तेही समजून घ्या. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 09:28 नवीन
न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगा त्याविषयी सांगितलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 08/05/2020 - 16:31 नवीन
शोधा कि जालावर. भरपूर साहित्य सापडेल. श्री मोदींनी झक्कू लावला नसता तर या केसेस अजून १५-२० वर्षे सुनावणीसाठी आल्या नसत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 16:40 नवीन
मला जालावर शोध घेण्यात वेळ नाही आणि स्वारस्य तर अजिबात नाही तेव्हा तुम्हाला समजावून सांगता येत असेल तर सांगा नाहीतर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/06/2020 - 05:51 नवीन
आपला पूर्वग्रह दूर करावा यासाठी वेळ खर्च करण्याची माझी तयारी नाही. तसा मला वेळ भरपूर असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 08/06/2020 - 06:17 नवीन
पूर्वग्रह आहे हे सिद्ध करा, मग पुढचं बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/06/2020 - 07:07 नवीन
फळ अलगद हातात पडलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 08/06/2020 - 07:13 नवीन
ते तर पडलंच आहे आणि त्यावर मी ठाम आहे. पण ह्यात मोदींविषयीचा आकस कुठून दिसतोय हे दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/06/2020 - 07:16 नवीन
समोरूनच दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कांदा लिंबू गुरुवार, 08/06/2020 - 07:27 नवीन
समोरूनच दिसतोय
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकस२१२ Wed, 08/05/2020 - 12:02 नवीन
"पण मंदिर निर्माण होण्यामागे श्री मोदीच आहेत" असं कोणी म्हणत नाहीये... आणि संघाला तर हे पटणार पण नाही मोदी आणि योगिनीं कदाचित त्याचा पाठपुरावा जोर धरून केला एवढेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रमोद देर्देकर Wed, 08/05/2020 - 07:29 नवीन
वरिल प्रतिसाद श्री वल्ली साहेबांना आणि प्रो. बिरुटे सरांना होता.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/05/2020 - 07:54 नवीन
जवळपास ५०० वर्षांच्या दमनातुन / वनवासातुन हिंदूंची आज खर्‍या अर्थाने मुक्तता झाली असे मला वाटते ! या गोष्टीसाठी ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सहभागी झाले त्या सर्व लोकांना नमन ! बोलो सियावर रामचंद्र की जय। पवनसुत हनुमान की जय। धर्म की विजय हो, अधर्म का नाश हो। Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan LIVE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ॥ राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 08/05/2020 - 08:00 नवीन
अगदी .. पिढ्या पिढ्या ज्या रामनामाने समृद्ध झाल्या त्या रामाला जन्मभूमीपासून इतके दिवस तिष्ठत राहावे लागले.जय श्रीराम!! कल्याण करी रामराया हो देवराया!!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/05/2020 - 08:09 नवीन
आजचा दिवस साजरा करू उद्या यावर लिहितो
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा