Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/10/2020 - 05:54
💬 352 प्रतिसाद
प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित. अशा अंनिसच्या हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख अंनिस वार्तापत्राच्या त्यावेळच्या संपादक मंडळाने नाकारला. असे समजले की त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होत होते म्हणून नाकारला गेला. नंतर मी तो लेख मनोगत या जालीय दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. तसेच तो माझ्या ब्लॉगवर ही आहे. शिवाय तो अन्य संकेतस्थळांवर पण टाकला आहे. मिपावर मात्र टाकायचा राहिला असे लक्षात आल्याने तो आत्ता टाकतो आहे. अनेकांनी तो लेख आवडल्याचे आवर्जून कळवले होते. अंनिस वार्तापत्रात नंतर व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होणारे असंख्य लेख येउन गेले. असो. कदाचित त्यामुळेच त्यानंतर रिसबूडांविषयी असलेला आदर अनेक ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मी सोडली नाही. 2005 मधे मला वार्तापत्र लेखक पुरस्कार मिळाला. तो घ्यायला आयुष्यात एकदाच सांगलीला गेलो होतो. तेव्हा एक त्यांची आठवण झाली कारण त्या पुरस्काराचे खर्‍या अर्थाने असलेले मानकरी हे माधव रिसबुड हेच आहेत. त्यांची आठवण येत नाही असा दिवस जात नाही. माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'. किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला. डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले. "राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे." फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला. रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले. नाडी भविष्य आणि रिसबूड त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत. शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे? श्रद्धेचा दुसरा भाग श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला. पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक. शेवटचा लेख फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो. ( पुर्वप्रकाशित मनोगत दिवाळी २००७)

प्रतिक्रिया द्या
121025 वाचन

💬 प्रतिसाद (352)
क
कोहंसोहं१० Mon, 09/14/2020 - 23:26 नवीन
मुद्दा अध्यात्मिक नाहीच आहे. मी आधीच सांगितलंय, अध्यात्माच्या त्या उंचीवरून काळ काय सरसकट प्रकृतीच भास आहे. अगदी विज्ञान सुद्धा कारण विज्ञान हे केवळ प्रकृतीबद्दल आहे. परंतु इथे चर्चा अध्यात्माची नाहीच आहे. जोपर्यंत तुम्ही प्रकृतीमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही प्रकृतीच्या नियमांशी बांधील आहात आणि त्यात काळ, ज्योतिष, भविष्यकालीन घटनांचा वेध हे सर्व वैध आहे आणि चर्चा ही त्या अंगाने सुरु आहे. याआधीही सांगितलंय की तुमचे सोयीस्कर अध्यात्म इथे आणू नका. सत्य केवळ एकच आहे आणि तिथे विज्ञान चालत नाही कारण निर्गुण, निराकार, अचल सत्याला काय विज्ञान लावणार? हिम्मत असेल तर हेच अध्यात्म सर्व विज्ञानाच्या धाग्यावर पण जाऊन ओका. आणि ती हिम्मत नसेल तर इथेही त्या सत्याचा दाखला देत ज्योतिष खोटे म्हणत बसू नका. सोयिस्करपणा बास झाला तुमचा. आता मी वरच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे स्थितीबदल/घटना बदल झाला की आपोआप सापेक्ष काळ येतोच. आणि योग्य नियम लावून पुढील स्थितीबदलाचे प्रेडिक्शन पण करता येते. उदा २ स्थानांमधील अंतर १०० किमी असेल आणि गाडीचा वेग ५० किमी/तास असेल तर गाडी एका स्थानातून दुसऱ्या स्थानी २ तासाने पोहोचेल असे प्रेडिक्ट करता येते. हे प्रेडिक्शन स्थितीबदलाचे आहे. अखंड चालणाऱ्या काळाचे नाही. हेच ज्योतिषशास्त्राच्या बाबतीतही लागू आहे. तसेही बदल होत असेल आणि तो जाणवत असेल तर सामान्य जाणिवेच्या पातळीवर काळ अखंड आहे म्हणून काही उपयोग नाही. भूक लागली की खाण्यातच शहाणपणा असतो तेंव्हा शरीर भ्रम आहे असले फालतू वक्तव्य तिथे करून चालत नाही. अगदी तसेच जे प्रकृतीशी बांधील आहेत त्यांना मार्गदर्शन म्हणून ज्योतिषाचा उपयोग नक्की होईल. बाकी एकंदर तुमचा मिथ्या अहंकार, वाक्यातील परस्परविरोध, चुका न स्वीकारण्याची वृत्ती, शब्दबंबाळपणा पाहता तुम्ही सत्यापासून प्रचंड दूर आहात आणि प्रकृतीशी बांधील आहात हे चटकन कोणीही सांगू शकेल. पुस्तकी ज्ञानातून शब्दांच्या गोल गोल जिलब्या पडून सत्य गवसत नाही. अध्यात्मातील सर्वात मोठा अडसर-अहंकार दूर करण्याचा प्रांजळ सल्ला मी याआधीही तुम्हाला दिलेला...पुन्हा देईन. करा जमले तर प्रयत्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 09/15/2020 - 11:41 नवीन
१.
परंतु इथे चर्चा अध्यात्माची नाहीच आहे.
गहन अज्ञान ! सनातन वर्तमान हा अध्यात्माचा विषय आहे आणि कालविभाजन हा ज्योतिषाचा. एकतर अध्यात्म खरं आहे किंवा मग थोतांड ज्योतिष. तुम्हाला एक धड ठरवता येत नाही. २.
जोपर्यंत तुम्ही प्रकृतीमध्ये आहात तोपर्यंत तुम्ही प्रकृतीच्या नियमांशी बांधील आहात आणि त्यात काळ, ज्योतिष, भविष्यकालीन घटनांचा वेध हे सर्व वैध आहे आणि चर्चा ही त्या अंगाने सुरु आहे
पुन्हा अज्ञान ! अध्यात्म आणि ज्योतिष हे जगण्याचे दोन मार्ग आहेत. अध्यात्म प्रकृती नाकारतं हे कुठल्या पुस्तकात वाचलं ? ३.
याआधीही सांगितलंय की तुमचे सोयीस्कर अध्यात्म इथे आणू नका. सत्य केवळ एकच आहे आणि तिथे विज्ञान चालत नाही कारण निर्गुण, निराकार, अचल सत्याला काय विज्ञान लावणार? हिम्मत असेल तर हेच अध्यात्म सर्व विज्ञानाच्या धाग्यावर पण जाऊन ओका. आणि ती हिम्मत नसेल तर इथेही त्या सत्याचा दाखला देत ज्योतिष खोटे म्हणत बसू नका.
अत्यंत भंपक विधान ! सत्यातच सर्व प्राकृतिक नियमानुसार घडतंय (ज्या प्राकृतिक नियमांचा उलगडा झाला आहे त्यातून विज्ञान निर्माण झालं आहे) ; तुमच्या ज्योतिषाच्या फेकंफाकी नुसार नाही. न तुम्हाला सत्य काय याची माहिती, न ज्योतिषाच्या फालतूगिरीची. ४.
उदा २ स्थानांमधील अंतर १०० किमी असेल आणि गाडीचा वेग ५० किमी/तास असेल तर गाडी एका स्थानातून दुसऱ्या स्थानी २ तासाने पोहोचेल असे प्रेडिक्ट करता येते.
हे फिजिक्समधे येतं, ज्योतिषात नाही. फारच फंडामेंटल घोळ आहेत ! ५.
भूक लागली की खाण्यातच शहाणपणा असतो तेंव्हा शरीर भ्रम आहे असले फालतू वक्तव्य तिथे करून चालत नाही.
हे तुमचे भंपक संत शिकवतात ! सूज्ञ माणूस जेवतो. ६.
बाकी एकंदर तुमचा मिथ्या अहंकार, वाक्यातील परस्परविरोध, चुका न स्वीकारण्याची वृत्ती, शब्दबंबाळपणा पाहता तुम्ही सत्यापासून प्रचंड दूर आहात आणि प्रकृतीशी बांधील आहात हे चटकन कोणीही सांगू शकेल. पुस्तकी ज्ञानातून शब्दांच्या गोल गोल जिलब्या पडून सत्य गवसत नाही. अध्यात्मातील सर्वात मोठा अडसर-अहंकार दूर करण्याचा प्रांजळ सल्ला मी याआधीही तुम्हाला दिलेला...पुन्हा देईन.करा जमले तर प्रयत्न.
वरच्या प्रतिसादात तुमच्या आकलनाचं पूर्ण पितळ उघडं पाडलंय ! आता तुमच्याकडे काहीही मुद्दा नाही म्हणून व्यक्तिगत पातळीवर निर्बुद्धपणा रेटतांय. शिवाय ते काय कमी होतं तर तुम्हाला ही अवदसा आठवली : लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील ? आता करा सूंबाल्या या धाग्यावरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
ग
गामा पैलवान Mon, 09/14/2020 - 20:39 नवीन
संजय क्षीरसागर, १.
समग्र अभ्यास म्हणजे एखादा शब्द कुठे तरी फिट करण्याचा प्रयास नव्हे.
माझा मार्ग मुंगीचा आहे. मला याच मार्गाने जावं लागणार. माझ्याकडे पंख नाहीत. २,
तुम्ही त्या अवस्था कालाधारित पद्धतीनं बघता त्यामुळे तसा दृष्टीविभ्रम होतो.
सगळंच जर वर्तमान आहे तर बदल कशात होतोय? किंवा मग सगळाच जर भ्रम आहे तर, सगळ्यांना एकाच प्रकारचा भ्रम कसा होतो? उदा. : चालकासकट सगळ्यांना लाल सिग्नल दिसणे, आणि त्याचा सगळ्यांना एकाच प्रकारचा अर्थबोध होणे. सांगायचा मुद्दा असा की याच्या मुळाशी जाणून घ्यायची इच्छाशक्ती आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 09/15/2020 - 11:57 नवीन
१.
सगळंच जर वर्तमान आहे तर बदल कशात होतोय ?
बदल वस्तू (म्हणजे आकारातच) होतो; पण तो प्रकृती नियमानुसार (किंवा मानवी कृत्यानुसार, उदा. युद्ध) होतो; बदलाचा आणि कालाचा काहीएक संबंध नाही. २.
किंवा मग सगळाच जर भ्रम आहे तर, सगळ्यांना एकाच प्रकारचा भ्रम कसा होतो? उदा. : चालकासकट सगळ्यांना लाल सिग्नल दिसणे, आणि त्याचा सगळ्यांना एकाच प्रकारचा अर्थबोध होणे.
सगळंच भ्रम आहे असा घोषा इथल्या एका निर्बुद्ध आयडीनं लावला आहे. माझं विधान इतकंच आहे की काल हा भास आहे कारण अस्तित्वात दिवस-रात्र असा प्रकारच नाही. आणि त्या अनुषंगानं ज्योतिष हा कालाधारित फेकाफेकीचा सर्वत्र चाललेला प्रोग्राम बोगस आहे. विचार करु शकणार्‍या सुशिक्षित लोकात विज्ञाननिष्ठ आणि तर्कपूर्ण दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून मी लिहितो आहे. ३.
चालकासकट सगळ्यांना लाल सिग्नल दिसणे, आणि त्याचा सगळ्यांना एकाच प्रकारचा अर्थबोध होणे
ही वर्तमानात घडणारी वस्तुस्थिती आहे, भ्रम नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चौकस२१२ Tue, 09/15/2020 - 04:16 नवीन
हे तर सगळं आपल्या डोक्यावरून जाणारं आहे.. कारण सकाळची कामे दुपारची आणि रात्रीची कामे हे करून एक दिवस मरायचं ... हे स्पष्ट आहे मग हे सगळं कशाला... तरी पण एक प्रतिक्रीय द्यावीशी वटते कोणीतरी या धाग्यात आधी म्हणाले कि " काळ हा भ्रम आहे आणि तो मनमानी सोयीसाठी निर्माण केलं आहे" मानवाने जरी त्याची व्याख्या केली असेल तरी तो भ्रम कसा? आज दुपारी संद्याकाळी कधी तरी मला तहान भूक लागणार हे सत्य नाही का ( म्हणजे असा गृहीत धरू ) ? अस्तित्व नाही का? उगवणे /जन्मने आणि मरणे हे तर सगळीकडे आणि त्यातील अंतर तोच काळ ना आता दुपार याची वयख्या पाहिजे तर कोणी नवीन करू शकेल पण त्यात मग भ्रम कसला... सर्वसामान्यांना समजेल अससी कोणी सांगणार असेल तर सांगा नाहीतर उगाच डोकेफोड नको
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 09/15/2020 - 04:17 नवीन
मनमानी सोयीसाठी ? नाही तर मानवाने असे वाचावे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 09/15/2020 - 04:23 नवीन
आत्ता सापडलं .. "वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !" इति संक्षी.... माझी प्रतिक्रिया त्यावर बेतलेली होती ( यातील ज्योतिष याबद्दल च्या संक्षींच्या प्रतिक्रियेवर आपण ९९% सहमत पण ते "वेळ हाच भ्रम आहे" हे काय बुवा !
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Tue, 09/15/2020 - 04:59 नवीन
वेळ किंवा काळ हा भ्रम त्यांच्यासाठी जे प्रकृतीच्या किंवा मायेच्या नियमांपलीकडे गेलेले आहेत आणि ज्यांना निखळ सत्य एकमेव अस्तित्व यांचा बोध झाला आहे. त्यांच्यासाठी जोतिष काय, निखळ अस्तित्व सोडून सर्वच भ्रम. याला आदी शंकराचार्यांनी आध्यात्मिक सत्य म्हणले आहे जे अंतिम सत्य आहे. पण मुळातच ज्योतिष हे त्या लोकांसाठी आहे जे प्रकृतीने मायेने बांधले गेले आहेत आणि त्यामुळेच सृष्टीच्या नियमांना बांधील आहेत (जसे की पृथीवरचे जवळपास सर्वच लोक). त्या सर्वांसाठी काळ, वेळ, स्थान सर्व सत्य कारण आपण मितीमध्ये बांधलो गेलेलो आहोत. त्यातून जोपर्यंत सुटून जात नाही तोपर्यंत मायेच्या नियमांना बांधील म्हणजे जन्म, मृत्यू, तहान, भूक, आनंद, दुःख, भय, निद्रा, स्थितीबदल इत्यादी इत्यादी. यालाच आदी शंकराचार्यांनी व्यावहारिक सत्य म्हणले आहे. ज्योतिष याच व्यावहारिक सत्याचा एक भाग आहे. दुर्दैवाने संक्षींना ज्योतिषशास्त्रविषयी फारशी माहिती नाही किंवा त्यांनी त्याचा अनुभवही घेतलेला नाही. परंतु स्वतःला सर्वज्ञ घोषित केल्यामुळे स्वतःचे ज्योतिषशास्त्राबद्दलचे अज्ञान झाकण्यासाठी ते सोयीस्करपणे आध्यात्मिक सत्याचा वापर करत ज्योतिष भ्रम हा मुद्दा रेटत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
क
कोहंसोहं१० Tue, 09/15/2020 - 05:10 नवीन
कोणत्याही चर्चेत व्यावहारिक सत्यामधील एखाद्या गोष्टीची अव्यवहार्यता दर्शवण्यासाठी व्यावहारिक सत्यामधील गोष्टींचाच वापर करावा आणि चर्चा उच्च अध्यात्मिक पातळीची असेल तर आध्यात्मिक आणि व्यावहारिक अश्या दोन्ही सत्याचा वापर करावा हा एक साधा प्रघात त्या (आदी शंकराचार्यांच्या) काळी रूढ होता जो आजही तितकाच व्हॅलिड आणि अप्लिकेबल आहे. पण सर्वज्ञ आणि अध्यात्मातील उच्च ज्ञानी असा (गैर)समज असणाऱ्यांना एवढी साधी गोष्ट माहित नाही याचेच आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
स
संजय क्षीरसागर Tue, 09/15/2020 - 11:10 नवीन
हे नेमकं आव्हान स्वीकारा : लवकर रिटायरमेंट साठी किती पैसे लागतील ? नाही तर तुमच्या कुडबुड्या ज्योतिषाला इतक्या वास्तविक आणि व्यावहारिक प्रश्णाचं उत्तर सांगता येत नाही हे कबूल करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Tue, 09/15/2020 - 22:57 नवीन
हा प्रश्न ज्योतिशास्त्राचा नसून गणिततज्ञांचा आहे हे न समजण्याइतकी निर्बुद्धता आणि अज्ञानता दाखवण्यापेक्षा आधी ज्योतिष काय आहे त्याचा अभ्यास करा मग बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 09/16/2020 - 11:23 नवीन
धनलाभ आणि आर्थिक समृद्धी हा ज्योतिषाचा विषय नाही असं फक्त मूर्खच म्हणेल. जे अंबानी किंवा अडानी नाहीत त्यांची मुख्य विवंचना अर्थप्राप्तीच आहे. निर्बुद्ध जातक कुडबुड्याला विचारतो तसा प्रष्ण विचारा : माझ्या जीवनात धनसंपन्न निवृतीचा योग कधी आहे ? आणि आता कुडबुड्या काय सांगतो ते सकारण इथे लिहा (म्हणजे सगळी पोल खुलेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Wed, 09/16/2020 - 22:19 नवीन
निर्बुद्ध जातक कुडबुड्याला विचारतो तसा प्रष्ण विचारा : माझ्या जीवनात धनसंपन्न निवृतीचा योग कधी आहे ? आणि आता कुडबुड्या काय सांगतो ते सकारण इथे लिहा >>>>>>>>>>> हा प्रश्न विचारायला सांगून तुम्ही खरे निर्बुद्ध आहात हेच सिद्ध केले. कारण रिटायरमेंट हि संकल्पनाच खूपच सापेक्ष आहे. प्रश्न कसा/कोणता/किती तारतम्य ठेऊन विचारावा हाही खुबीचा भाग आहे. म्हणून म्हणालो होतो तुम्ही एकतर अभ्यास करा किंवा स्वतः अनुभव घ्या मग बोला. त्याऐवजी केलेली सगळी बडबड फक्त तुमचे अज्ञान दर्शवते. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 10:21 नवीन
याची तुम्हाला खात्री आहे का ? असल्यास ती कशामुळे आणि कुणी दिली ? ज्योतिषाच्या भरवश्यावर तुमचा श्वास चालू आहे का ? ज्या ग्रह-तार्‍यांच्या जोरावर हे भंपक शास्त्र तुम्ही रेटतांय, ते ज्योतिष शास्त्र ग्रह-तारे चालवतं का ? कशाच्या जोरावर तुमचे बिनडोक ज्योतिषी भविष्याची ठोकाठोकी करतात ? काय आधार आहे त्या शास्त्राला ? काय भरवसा आहे तुम्हाला पुढच्या क्षणाचा ? ज्या जातकाला उल्लू बनवायचं काम चाललंय त्याच्या पुढच्या श्वासाची गॅरेंटी नाही. जातक येड्यासारखा मनोभावे ऐकतोयं आणि ज्योतिषी ठोकतोयं यापलिकडे त्या शास्त्राला काहीएक अर्थ नाही. एकसोएक निर्बुद्ध प्रतिसाद देऊन ज्ञानाची व्यर्थ भाषा कशाला करता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Wed, 09/16/2020 - 23:24 नवीन
आणि राहिला प्रश्न पोल खोलण्याचा तर मी वर एका ब्लॉग ची लिंक दिलेली (पुन्हा देतो- https://www.mblog.suhasgokhale.com/ ) तिथे जाऊन लोकांच्या केस स्टडीज वाचा. त्यातून कोणत्या प्रकारचे प्रश्न कसे सोडवले आणि कोणत्या पातळीपर्यंत अचूक उत्तरे मिळाली, जातकाचे प्रतिसाद काय होते हे सर्व काही दिले आहे. अगदी वाटलेच तर ब्लॉगर ना फोन करून खात्री करून घ्या सगळ्याची. आपल्या प्रकाश सरांच्या ओळखीचे आहेत ते. अगदीच वाटले तर गेलाबाजार सरळ अनुभव घेऊन पहा...हा का ना का. याव्यतिरिक्त ही बरेच काही मिळेल आंतरजालावर. पण तुमच्यासाठी वरचे पुरे. फक्त एक करा - वाचताना मात्र तुमचा पूर्वग्रहदूषितपणा बाजूला काढून ठेवा. एका वेगळ्या ज्ञानाची कवाडे खुलतील तुमच्यासाठी. आपोआप कळून येईल कोणाची पोल खोलली जाते. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- आजची स्वाक्षरी: अभ्यासोनि (अन अनुभवानि) प्रकटावे, ना तरी झाकोनि असावे| प्रकटोनि नासावे, हे बरे नोहे || ~समर्थ रामदास (थोडेसे बदलून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
च
चौकस२१२ Tue, 09/15/2020 - 14:07 नवीन
ज्योतिष याच व्यावहारिक सत्याचा एक भाग आहे.! जगातील कोट्यवधी लोकांचं खिजगणतीत हि ते नाही आणि ती लोक "ज्योतिष मानणाऱ्या" लोकांएवढेच सुख आणि दुःख भोगत आहेत अगतिक आणि अशक्य झाल्यावर लवकर मरण यावं हीच इच्छा .. त्यावेळी असल्या गोष्टीवर अवलंबून राहायची काडीभर हि इच्छा नाही आणि ती इच्छा पाळली जाईल अशी आशा करत जगणारा एक सर्वसामान्य म्हणून म्हणून हे दोन शब्द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
श
शा वि कु Tue, 09/15/2020 - 11:50 नवीन
परंतु केवळ एका घटनेवरून संपूर्ण प्रश्नशास्त्र निरुपयोगी आहे असे म्हणता येणार नाही. आपल्याकडे प्रॉब्लेम ज्योतिषशास्त्रचा नाही तर त्याला अर्धवट ज्ञानाने बाजारू बनवणाऱ्या ज्योतिषांचा आहे. ज्योतिष शास्त्र एवढे प्रचंड आहे की अर्धे जीवनही खर्ची घालून पूर्ण ज्ञान होणे असंभव. पण कुडमुडे ज्योतिषी काही महिन्यांच्या अभ्यासावर भविष्य कथन सुरु करतात.
संपूर्ण आभ्यास केलेले ज्योतिषी तुमच्या पाहण्यात आले आहेत का ? जर नसेल तर या मुद्द्यावरून कोणतेही अंधविश्वास पुढे रेटणे सहजशक्य आहे. व्हूडू,चेटूक,रेकी इत्यादी इत्यादी. इतकेच काय, ज्योतिष ही काही अशी एकमेव शाखा नाही. अश्या इतरही गूढ आणि सुप्त शाखा आहेत, ज्यांचे पुरेपूर ज्ञान कोणालाच नाही (कारण मुळात अशी गरजच कुणाला वाटली नाही.) उदा- रसायनशास्त्रामध्ये परिवर्तित होण्याआधी अल्केमी चा आभ्यास होई. आजच्या रसायनशास्त्र आभ्यासपद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न पद्धत होती ती. त्यात परीस बनवण्याचा आभ्यास केला जाई. न्यूटन सुद्धा यात खेळत असे. आज त्या शाखेचा पूर्ण आभ्यास असलेला व्यक्ती नाही. तरी अल्केमीमधले असे घटक ज्यांचा रसायनशास्त्रात उल्लेखच नाही, त्यांमध्ये काही तथ्य होते असे मानावे काय ? दुसरा प्रश्न. जर कुण्या एके काळी ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण आभ्यास असलेले महारथी अस्तित्वात होते, आणि शास्त्राच्या संपूर्ण ज्ञानामुळे त्यांनी केलेली भाकिते खरी होतं, तर हे असे अत्यंत उपयोगी शास्त्र आज का बरे इतके दुर्लक्षित झाले ? इतके प्रचंड उपयुक्त शास्त्र आज कोणी जाणत नाहीत हे कसे ? (धर्माधारीत शास्त्रांचे अभ्यासक अजूनही असतातच, तर असे ज्योतिषी आज का नाहीत ?)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/15/2020 - 16:47 नवीन
इतकेच काय, ज्योतिष ही काही अशी एकमेव शाखा नाही. अश्या इतरही गूढ आणि सुप्त शाखा आहेत, ज्यांचे पुरेपूर ज्ञान कोणालाच नाही>>>> अगदी बरोबर! शिवाय भविष्यकाळातील घटना जाणण्याचे फलज्योतिषाव्यतिरिक्त अन्यही पारंपारिक शाखा आहे जसे हस्त सामुद्रिक फेस रिडिंग शकुन अंकशास्त्र वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
क
कोहंसोहं१० Tue, 09/15/2020 - 23:40 नवीन
१. कोणत्याही विषयाचा पुरेपूर अभ्यास असणारी व्यक्ती सापडणे कठीण आहे (मिपावरचा एक सर्वज्ञानी आयडी सोडल्यास ज्यांना अभ्यासाची गरजही नाही). परंतु एवढे सांगू शकतो की माझ्या माहितीत असे ज्योतिषी आहेत ज्यांच्या सल्ल्याचा मला उपयोग झाला. मला ते अभ्यासक देखील वाटले (बाकीच्या कुडमुड्या ज्योतिषांऐवजी तरी). तसेही ज्योतिष विषयांवरचे मराठी ब्लॉग/साईट तश्या कमीच आहेत परंतु काही वाचायचेच असल्यास (खास करून लोकांचे अनुभव/केस स्टडीज) मला हा ब्लॉग विशेष आवडला आणि लेखक सुद्धा अभ्यासक वाटले. त्यावरून मी एकदा सल्ला घेतला होता त्यांचा ज्याचा फायदा झाला. याशिवाय आणखी ज्योतिषी आहेत जे मला ठाऊक आहेत आणि त्यांच्या सल्ल्याचा उपयोगदेखील झाला होता. लिंक वर एका प्रतिसादात दिली होती पुन्हा देतो- लिंक: https://www.mblog.suhasgokhale.com/ वेळ मिळाल्यास केस स्टडीज वाचा. भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. थोडाफार अंदाज येईल की कोणत्या प्रकारच्या प्रश्नाचे कितपत अचूक उत्तर मिळू शकते ते. 'अश्या इतरही गूढ आणि सुप्त शाखा आहेत, ज्यांचे पुरेपूर ज्ञान कोणालाच नाही >>>>> खरे आहे. कालौघात बर्याचश्या विद्या नष्ट पावल्या. ज्योतिषविद्या कदाचित उपयुक्ततेमुळे पुढे सुरु राहिली. परंतु आता त्यात अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. मी एका प्रतिसाद म्हणल्याप्रमाणे ५०-६० वर्षांपूर्वी कृष्णमूर्तींनी संशोधन करून एक पद्धत विकसित केली ज्यावर आधारित प्रेडीक्शन्स मध्ये अनेकांना अचूक रिजल्ट मिळाले आणि ती पद्धत केपी पद्धत म्हणून प्रचलित झाली. २. 'अत्यंत उपयोगी शास्त्र आज का बरे इतके दुर्लक्षित झाले ? इतके प्रचंड उपयुक्त शास्त्र आज कोणी जाणत नाहीत हे कसे ?'>>>> काळाचा महिमा म्हणू शकतो. परकीय आक्रमणात सुद्धा आपण बरेचसे ज्ञान गमावले. जेवढे उरले त्याचे बाजारीकरण होत गेले. त्यात अनुभव आणि अभ्यास दोहोंच्या अभावात जुन्या ज्ञानाकडे तुच्छतेने पाहून त्याला नावं ठेवली की आम्ही आधुनिक विचारसरणीचे पुरोगामी ही मानसिकता रूढ झाली आणि अजूनही आहे (इथेही पाहताच आहात की). बाकी अभ्यास आणि अनुभव नसताना फडतूस लॉजिक वर स्वतःचे मत रेटणाऱ्या निर्बुद्ध आयडींपेक्षा तुमच्यासारखी जिज्ञासूवृत्ती केंव्हाही चांगलीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
ग
गामा पैलवान Tue, 09/15/2020 - 22:24 नवीन
संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगेन म्हणतो. १.
बदलाचा आणि कालाचा काहीएक संबंध नाही.
माझ्या मते आहे. बदल होतो कारण काल अस्तित्वात आहे. एव्हढंच नव्हे तर तो बदल टिपणारं मनही अस्तित्वात आहे. तुम्ही वर म्हणंत होतात ना की मी मन कुठे तरी फिट करत होतो आणि आता काल, त्यामागचं कारण असं की काल आणि मन परस्परांवर अवलंबून आहेत. तुम्ही ज्या दोन गोष्टी नाकारता आहात, त्या परस्परांशी संबंधित आहेत. हे माझ्या बाबतीतही होऊ शकतं. उदा. : माझ्या दृष्टीने साम्यवाद व समाजवाद या टाकाऊ विचारसरण्या आहेत. मात्र त्या एकमेकींशी घनिष्ट रीतीने संबंधित असू शकतात. २.
काल हा भास आहे कारण अस्तित्वात दिवस-रात्र असा प्रकारच नाही.
अस्तित्व कालातीत असतं, हे मान्य. पण त्यासाठी काळाला नाकारण्याची गरज नाही (माझ्या मते). ३.
ही वर्तमानात घडणारी वस्तुस्थिती आहे, भ्रम नव्हे.
ही वस्तुस्थिती आहे तर ती बदलतेय कशीकाय? ती बदलणारा एजंट कोणतरी असला पाहिजे. तो एजंट म्हणजे काल. आणि ती बदलती वस्तुस्थिती टिपणारा एजंट म्हणजे माझं मन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 09/16/2020 - 10:58 नवीन
ही वस्तुस्थिती आहे तर ती बदलतेय कशीकाय? ती बदलणारा एजंट कोणतरी असला पाहिजे. तो एजंट म्हणजे काल. आणि ती बदलती वस्तुस्थिती टिपणारा एजंट म्हणजे माझं मन.
वस्तुस्थिती बदलत नाही असं कोण म्हणतंय ? वर्तमान बदलत नाही आणि सारे बदल वर्तमानातच होतात असा दावा आहे. वस्तू किंवा आकारातला बदल प्रकृती किंवा मानवी कृत्यान्वये होतो, कालामुळे नाही हे वर सांगितलं आहेच. स्थितीबदल जाणणारा एलिमेंट जाणीव आहे, मन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 09/16/2020 - 23:12 नवीन
संजय क्षीरसागर, चर्चा निष्कारण लांबत असली तरी तत्त्वबोध होऊ शकतो. :-) माझ्या मते जाणीव ही इच्छेसकट सर्वांचं मूळ आहे. तुम्ही ज्याला वर्तमान म्हणता तो जाणीवेचा पट आहे. तुम्ही ज्याला वस्तुस्थिती म्हणता ती माझ्या मते मनाने जाणीवेकडे निवेदन केलेलं ( = रिपोर्ट केलेलं ) आकलन आहे. तुम्ही काल नाही म्हणता ते विधान जाणीवेच्या पटावर यथोचित रीतीने शोभून दिसतं. व्यवहारात काल मानावा लागतोच. काल व मन परस्परपूरक पद्धतीने वापरले तर जाणीवेचा पट समृद्ध करता येतो. काळाचं आकलन करायचं तंत्र याअर्थी ज्योतिषाकडे पाहायला हवं. अर्थात, तशी इच्छा असेल तरंच. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 09:59 नवीन
बाकी कितीही चर्चा करुन काही उपयोग नाही.
१. माझ्या मते जाणीव ही इच्छेसकट सर्वांचं मूळ आहे. तुम्ही ज्याला वर्तमान म्हणता तो जाणीवेचा पट आहे.
वर्तमान ही निर्वस्तू आहे, त्याला जाणीवेची यत्किंचीतही गरज नाही. देहाला जगण्यासाठी आणि जाणण्यासाठी जाणीवेची गरज आहे. जाणीव वर्तमानात होते पण वर्तमान जाणीवेनं बाधित होत नाही. २. तुम्ही ज्याला वस्तुस्थिती म्हणता ती माझ्या मते मनाने जाणीवेकडे निवेदन केलेलं ( = रिपोर्ट केलेलं ) आकलन आहे वस्तुस्थिती हे आपल्याला जाणीवे मार्फत झालेलं आकलन आहे. ३. तुम्ही काल नाही म्हणता ते विधान जाणीवेच्या पटावर यथोचित रीतीने शोभून दिसतं. व्यवहारात काल मानावा लागतोच. काल व मन परस्परपूरक पद्धतीने वापरले तर जाणीवेचा पट समृद्ध करता येतो. काल नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काल या मानवी कल्पनेचा जगण्यासाठी बेहद्द उपयोग आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे. जाणीवेनं जगतांना कालबोध आणि स्मृती आवश्यक आहेत > त्यामुळे जाणीव प्रायमरी आहे; काल आणि मन दुय्यम आहेत. ४. काळाचं आकलन करायचं तंत्र याअर्थी ज्योतिषाकडे पाहायला हवं जे नाहीच त्याचं आकलन करुन घेणं हा व्यर्थ खटाटोप आहे. ___________________________ नाऊ आय एम डन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/17/2020 - 22:07 नवीन
संजय क्षीरसागर, नाऊ यू आर डन ! तर तुमच्या इच्छेचा मान राखून मी ही थांबतो. फक्त आपल्या चर्चेतले असहमतीचे प्रमुख मुद्दे नोंदवतो. १. तुम्ही काल व मन अस्तित्वात नसतं म्हणता, जे मला मान्य नाही. २. तुम्ही निर्वस्तू असते असं म्हणता, ते ही मला मान्य नाही. चर्चेबद्दल धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
उ
उपयोजक Wed, 09/16/2020 - 06:05 नवीन
मिपाकर तुर्रमखान यांनी त्यांना इथला पासवर्ड आठवत नसल्याने प्रतिसाद पेस्टवायला सांगितला आहे.तुर्रमखान यांचा प्रतिसाद हा खूप जुनाच शब्दच्छल आहे. स्ट्रींग थिअरी, क्वांटम फिजिक्स वगैरे पर्यंत जायचं कारण नै. बहुतेकांना समजणार्‍या विज्ञानातल्या अगदी साध्या नियमांपासून सुरवात करू. साधी भाषा, संदर्भ चौकटीची सुस्पष्टता, प्रयोग, निरिक्षण, गणितीय सिद्धता या पैकी फलज्योतिष्यात कशाचाच पत्ता नै आणि बहुतेकांना कळत नै म्हणून एकदम क्वांटम फिजिक्सचं उदाहरण का? हे म्हणजे साध्या आजारांवर औषधे, बर्‍याच रोगांवरच्या लशी, भूल देण्यापासून शल्यकर्म चिकित्से पर्यंत, रक्तगटा पासून इसीजी पर्यंतच्या चाचण्या हे सगळं सोडून तंबूत बसणार्‍या आयुर्वेदाचार्‍याने मॉडर्न मेडिसीनने देखिल हात टेकायला लावणार्‍या एड्स आणि कँन्सरवर उपचार करण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 09/16/2020 - 20:09 नवीन
काही आयडी च्या हट्ट मुळे धागा एकाच ठिकाणी अडकला आहे. बुद्ध धर्माच्या शिकवणीत कुठे तरी फक्त वर्तमान काळ च असतो बाकी काही नसते असे लिहलेले आहे तेच सत्य समजून त्या साठी बिनडोक प्रतिवाद केला जात आहे. ज्योतिष शास्त्र ची समीक्षा आधुनिक युगात कशी केली गेली हुशार लोकांनी ते पण कमेंट मध्ये आले तर नवीन माहीत मिळेल. सर्व बाजू चा विचार नक्कीच केला जावा. फक्त काळ ह्याच भोवती फिरू नये ते पण एक धर्म शिकवणीत त्याचा उल्लेख आहे म्हणून. Practically te 1000 % महाचुक आहे.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Wed, 09/16/2020 - 22:43 नवीन
ज्योतिष शास्त्र ची समीक्षा आधुनिक युगात कशी केली गेली हुशार लोकांनी ते पण कमेंट मध्ये आले तर नवीन माहीत मिळेल >>>>>> मी वर एका प्रतिसादात कृष्णमूर्तीबद्दल लिहिले आहे. नेटवर त्यांच्या संशोधनांची बरीच माहिती मिळेल. दुर्दैवाने आपल्याकडे अनुभव घेणारे आणि जिज्ञासूवृत्तीने संशोधन करणारे कमी आणि स्वतःचे मत रेटणारे महाभाग, तसेच अंधश्रद्धाळू आणि त्यांचा फायदा घेणारे फसवे लोक हेच जास्त सापडतात. म्हणून भारतात म्हणावे तसे संशोधन असे झालेले नाही. याबाबतीत पाश्चात्त्य लोक जास्त चौकस. अभ्यास आणि अनुभवाविना नाकारण्यापेक्षा संशोधन करून त्यांनी खरे खोटे जाणण्याचा प्रयत्न केला आणि बरीचशी प्रगती केली. आपल्याकडे मात्र आयटी इंडस्ट्री प्रमाणे क्लायंट सर्विस वर जास्त भर दिला गेला वैदिक ज्योतिषाचा आधार घेऊन. कृष्णमूर्ती मात्र अपवाद ज्यांनी संशोधन करून नक्षत्रांवर आधारित प्रेडिक्शन देण्याची स्वतःची पद्धत विकसित केली. असे वाचले होते की पूर्वी रामायण (बहुतेक महाभारत सुद्धा) वगैरे काळात नक्षत्रांवर आधारित प्रेडिक्शन द्यायचे. राशींचा प्रवेश नंतर झाला. इथे थोडेसे वाचायला मिळेल: http://www.vedic-astrology-prediction.com/indian-astrology.html#:~:text=Then%20before%20the%20beginning%20of,astrology%20made%20a%20long%20journey.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 11:02 नवीन
जगात फक्त दोनच टाइपचे लोक आहेत, काल नाही हा बोध झालेले आणि तो न झालेले. या दोन्हीच्या सीमारेषेवर एखादा असतो, पण बोध न झालेल्यांचा रेटाच इतका प्रचंड असतो की ते त्याला पार भंजाळवून टाकतात ! बोध न झालेले जन्मभर टाइम-लाईनवर जगतात. जड झालेला भूतकाळ, विषेश काहीही प्रयोजन नसलेला वर्तमान आणि गाढवाच्या डोळ्यांसमोर धरलेल्या गाजरासारखा भविष्य काळ अशी त्यांच्या जीवनाची रुपरेषा असते. वर्तमान हा त्यांच्यासाठी भूतकाळाकडून भविष्यकाळाकडे नेणारा एक अनिवार्य (पण व्यर्थ) पूल असतो. अशा लोकांचं आयुष्य कायम हॉरिझाँटलच राहतं. थोडक्यात, वर्तमान हेच जगण्याचं सर्वस्व आहे हा बोध कादाचित त्यांना शेवटच्या क्षणाला होत असावा. काल नाही हा बोध झालेला संपूर्ण वर्तमानात जगतो, त्याचं जगणं वर्टीकल होतं. त्याला भविष्याची (म्हणजे ज्योतिषाची) फिकीर नसते आणि त्याच्यासाठी भूतकाळ हा संपलेला विषय असतो. आयुष्यात काहीही घडण्यासाठी (किंवा घडवण्यासाठी) वर्तमान हा एकमेव काळच आहे इतकी साधी गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. त्याच्याकडे स्मृती आणि कल्पना यापासून वास्तव वेगळं करण्याची जबरदस्त जागरुकता येते. सतत वर्तमानात असल्यानं तो अस्तित्वाशी समरुप असतो कारण समग्र अस्तित्व कालरहित वर्तमान आहे. मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केला. या पोस्टवर अनाकलानाची इतकी परिसीमा झाली आहे की यापलिकडे मी वेळ घालवू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन गुरुवार, 09/17/2020 - 11:34 नवीन
तुमच्या सारखे मत असलेले सोडून इतर सर्व बिनडोक या निष्कर्षाला पोहोचला ! बरे झाले हो.
मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केला. या पोस्टवर अनाकलानाची इतकी परिसीमा झाली आहे की यापलिकडे मी वेळ घालवू इच्छित नाही.
ऑइन्क ? हे तर तुम्ही कित्येक युगांपासून सांगत आहात... "निर्बुद्धपणाचा कळस, गंडलेलं लॉजिक, आता मात्र हद्द झाली, काय बोलता !"इत्यादी इत्यादी. आज नवीन युरेका युरेका काय झालं वं ? अचानकच अनाकलनाची परिसीमा कश्शी काय ब्रे दिसली ? अगदी मोह आवरला नाही म्हणून जाता जाता :
या पोस्टवर अनाकलानाची इतकी परिसीमा झाली आहे की यापलिकडे मी वेळ घालवू इच्छित नाही.
&#128524
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॅनी ओशन गुरुवार, 09/17/2020 - 11:43 नवीन
काळाचा धसका अजून संपला नाही वाट्टे ! &#128518
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 11:48 नवीन
जीवन कालबद्ध आहे त्यामुळे कशावर किती वेळ घालवावा हे सूज्ञ ठरवतो. पण सर्व घटना (प्रतिसाद देणं, न देणं, थांबवणं ) एकाच कालात घडतात > तो म्हणजे वर्तमान काळ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन
ड
डॅनी ओशन गुरुवार, 09/17/2020 - 11:57 नवीन
ते नियम तोडणं नाही. कालाचा धसका संपवणं आहे !
अहो मी कूट वं काय म्हनलो भूतकाळ आणि वर्तमाणकाळाबद्दल ? मी फक्त म्हनलो कि वर तुम्हीच यका आयडीला म्हणाला की काळाचा धसका संपवायचा हाय. म्हनजीचं काय कि काळ जातो असला भ्रम तेन काय ठिवायचा नाय. मंग तुम्ही बोलला कि या धाग्यावर तुमचा येळ जातुय. म्हणून तुमचंच ज्ञान मी तुम्हाला सांगितले हो, कि तस काय नस्ताय, काळाचा धसका तुमचा अजून गेलेला नाही. तर तुम्ही म्या पामराला मूर्ख म्हणताय &#128534
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 12:04 नवीन
कुठल्या दुनियेत आहात ? प्रयत्न करायचे की थांबवायचे इतकाच प्रष्ण होता. वेळ घालवू इच्छित नाही हा त्या अर्थी केलेला शब्दप्रयोग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन
ड
डॅनी ओशन गुरुवार, 09/17/2020 - 12:09 नवीन
ब्वर साहेब. तुम्हीबी इतरांच्या वेगळ्या अर्थाच्या शब्दप्रयोगांवर लै वाद घालता म्हून मपल्याला वाट्ट की तुमि जे लिव्हता तेच तुमाला म्हणायचे अस्ते. गरीबाकडून व्हतात वं चुका. तुम्हीबी असं सारक सारक त्यांना पकडून नाही धोपटल पायजे. हाय ना ब्रोबर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 12:42 नवीन
समजा एखादा ट्रिग्नॉमेट्री समजू शकत नाही हे त्याचं अनाकलन आहे, ते पार, तो निर्बुद्ध आहे इथपर्यंत खेचण्याची गरज नाही. प्रत्येक सिद्ध वर्तमानात जगा असं सांगतो यासाठी वर्तमान म्हणजे नक्की काय हे समजण्याची गरज आहे. अनाकलन हे वर्तमान समजण्या विषयीचं आहे आणि त्यापुरतं ते मर्यादित आहे. आता तो प्रतिसाद पुन्हा वाचाल तर तुमचा गैरसमज दूर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन
ड
डॅनी ओशन गुरुवार, 09/17/2020 - 12:59 नवीन
ते असलं तरीबी आंतरजालावर कुणालाबी "आकलन झाले न्हाई" आणि "निर्बुद्ध हाय" दोनीबी म्हणलेले आवडत नाय वं.तुम्ही कसा तिरसाटला, तुमचा काळाचा धसका नाय गेला म्हणल्यावर. हाय ना ? तसेच इतरांचे जुने धागे उचकवून त्यातला औट ऑफ कंटेक्सट प्रश्न बी आपला मुद्दा शिद करण्यासाठी वापरू नै. याने लोकांचा तिळपापड हुतो.(ते रिटायरमेंट वाल म्हणतोय मी.) (आणि हे तुम्हास्नी कॉम्प्लिमेंट नव्हे.) असं नै हो वागू. हि दोन यकजाम्पल हायत. बाकी माझ्या मते मिपा सारख्या माध्यमावर काय शिष्ठाचार तेन पाळले पायजेल याची नियमावली असती, तर तुम्ही समदी मोडली असती. (आता हित मी याकटाच दिस्तुय का असलं काय म्हणू नाका.) कसाय ना, नसला पटत मुद्दा तर द्यावं व सोडून. प्रत्येक ठिकाणी काय जाऊन त्येचं त्येचं उकरता? दिला नवं तुम्ही तुमच्या धाग्याचा दुवा, द्या न मं सोडून. काय हितबी येळ अन काळ करत बसलाय. तुम्हाला बी तुमचे जुने औट ऑफ कोंटेक्सट डायलॉग हित टाकल्यावरी राग येतू ना ? मंग ? हां. वादावादी करू नै अस नाय माझं म्हणनं. समोरच्याचा आदर ठिवावा हो. आणि समोरचा नसेल ठिवत तर नै त्याच्या नादी लागू. अस करून तुम्ही इतरांच्या मज्जेवर लई डाग पाडता. बघा. पटतया का. नाह्यतर हायच नेमीचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॅनी ओशन गुरुवार, 09/17/2020 - 13:21 नवीन
आकलन झाले हाय का नाय हाच तर वाद हाय. तुमि हंपायर गत बोट दाखवता "ह्याच आकलन झालं नाय, त्याच आकलन झालं नाय." समोरच्याला तरास नाय का व्हणार ? Image removed.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ब
बोलघेवडा गुरुवार, 09/17/2020 - 11:24 नवीन
मी गेली २ वर्ष कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास करत आहे. अद्भुत प्रकारची नक्षत्र पद्धती प्रो. कृष्णमूर्ती नी तयार केली. ज्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर अभ्यासून पहावी. पारंपरिक / वेदिक पद्धतीचे बेसिक अभ्यास गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 09/17/2020 - 11:29 नवीन
माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक 👆 हा धाग्याचा विषय आहे. तेव्हां त्या विषयावर आता चर्चा सुरू करावी. 🙂
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 11:57 नवीन
👍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 09/17/2020 - 12:48 नवीन
🙂 🙏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संगणकनंद गुरुवार, 09/17/2020 - 12:18 नवीन
पण सर्व घटना (प्रतिसाद देणं, न देणं, थांबवणं ) एकाच कालात घडतात > तो म्हणजे वर्तमान काळ ! मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या. मध्यंतरीचा काळ वर्तमान काळात येतो काय? चहा मारी, स्वतःचं स्वतःला कळेना आपण काय खरडतोय आणि चाललेत जगाला ब्रम्हज्ञान शिकवायला.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 09/17/2020 - 13:32 नवीन
उडी मारावी लागलीच. १) ज्योतिष : मलाही प्रश्न पडला होता, कि ज्योतिष हे शास्त्र का असु शकत नाही ? अस्तित्वातलं सगळं एकमेकावर अवलंबून आहे तर ग्रह का अफेक्ट करु शकत नाहीत ? आणि मी हा प्रश्न इथे संक्षींना उद्देशून समजून घेण्याच्या दृष्टिने विचारणार होतो. पण लिहिता लिहिताच अचानक मला समजलं, कि अस्तित्व ही वन सिंगल कंटिन्युअस प्रोसेस आहे, जिचे स्थळ काळानुसार विभाजन होऊ शकत नाही. त्यामू़ळे ठराविक वेळची किंवा त्या त्या वेळची अशी ग्रहस्थिती अस्तित्वात नाही. ईट इज वन सिंगल युनिटी ! त्यामुळे जन्मवेळ आणि त्यातून "जातक" असा कुठलाही घटक हा वेगळा काढताच येत नाही. या कल्पनेवर बेस्ड शास्त्र हे शास्त्र असू शकत नाही. कारण वेळ, आणि कुठल्यातरी वेळची ग्रहस्थिती असं काही अस्तित्वातच नाही आहे ! २) वेळ आणि काळ : काहीही समजून घेण्याची इच्छा नस्ताना (अपवाद सोडून ) केवळ वेळ आणि काळ या शब्दांवरून संक्षींशी वाद घालतायत त्यांना उद्देशुन एन्लाइट्न्ड वन कॅन आयदर बिकम युर डोअर टू द हेवन, ऑर इफ यु आर आर्ग्युंइंग विथ हीम अननेसेसरिली , बिकम्स अ‍ॅन अनब्रेकेबल वॉल अँड यू कॅन किप ऑन हिटींग युअर हेड अगेन्स्ट इट अँड फायनली ब्रेक युअर ओन हेड, सो बी केअरफुल.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 09/17/2020 - 14:07 नवीन
व्यक्तिशः मला हा मुद्दा अध्यात्मिक विचारांची खऱ्या आयुष्यातील घटनांची किती फारकत असते असे पटवून देणारा वाटला. मला कोणत्या घोड्यावर पैज लावल्यावर/कोणत्या तारखेवर लावल्यावर पैसे मिळतील इतका साधासा प्रॅक्टिकल फायदा असतो ज्योतिषाचा. ज्योतिसाच्या नादी लागू नये हे फक्त ज्योतिष काम करत नाही, त्यातून काही फायदा होत नाही ह्यानेच सिद्ध होते. काळ वेळाचे अस्तित्व केवळ ज्योतिषी या व्यक्तीनेच का अमान्य करावे ? केवळ ज्योतिषशास्त्राच्या धाग्यावर का ? शाळेला वेळेवर जावा असा जर एखाद्या धाग्याने सल्ला दिला तर तिथेही हा प्रतिवाद म्हणून कोणी तरी मान्य करणार आहे काय ? किंवा अमुक तमुक महिन्यात जन्मलेल्या बाळाला अमुक तमुक शैक्षणिक वर्षात शाळेत घाला, हा अत्यंत व्यावहारिक सल्ला आहे. तिथेही काळ एकसंध असतो म्हणून चालेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 09/17/2020 - 16:16 नवीन
>>केवळ ज्योतिषशास्त्राच्या धाग्यावर का ? फलज्योतीष चिकित्सा (चिकित्सक) असा आहे, त्यामुळे ते होणारच. >> कोणत्या घोड्यावर पैज लावल्यावर/कोणत्या तारखेवर लावल्यावर पैसे मिळतील -- इन्पुट काय आहे बघा पत्रिकेसाठी जातकाचा जन्मदिनांक आणि जन्मवेळ आणि त्यावर बेस्ड प्रेडिक्शन आहे. ज्योतिष प्रेडिक्ट करेल का कि कोणता घोडा जिंकणार ते. >> शाळेला वेळेवर जावा असा जर एखाद्या धाग्याने सल्ला दिला तर तिथेही हा प्रतिवाद म्हणून कोणी तरी मान्य करणार आहे काय -- शाळेला , कामाला ठरलेल्या वेळेवर जाणे हा त्या त्या प्रक्रियेचाच भाग आहे, त्यामुळे वेळ तयार होत नाही, तो सोयीचा भाग आहे. मी वरती लिहिल्याप्रमाणे मलाही प्रश्न होता पण एकदा वेळ नाही असं कळले ना, कि पुढचं सगळं क्रिस्टल क्लिअर होतं, असे प्रश्नच उरत नाहीत मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
स
संगणकनंद गुरुवार, 09/17/2020 - 15:24 नवीन
एन्लाइट्न्ड वन कॅन आयदर बिकम युर डोअर टू द हेवन, ऑर इफ यु आर आर्ग्युंइंग विथ हीम अननेसेसरिली , बिकम्स अ‍ॅन अनब्रेकेबल वॉल अँड यू कॅन किप ऑन हिटींग युअर हेड अगेन्स्ट इट अँड फायनली ब्रेक युअर ओन हेड, सो बी केअरफुल.
"एन्लाइट्न्ड वन"ची लक्षणे: १. "एन्लाइट्न्ड वन" सतत इतरांना मूर्ख म्हणतो, त्यांचा पाणउतारा करतो. २. "एन्लाइट्न्ड वन" सतत तिरकस शेरे मारतो. ३. "एन्लाइट्न्ड वन" समोरच्याने अरे केले तर त्याला उत्तर म्हणून दोन वेळा का रे करतो. ४. "एन्लाइट्न्ड वन" समोरचा ज्या पातळीवर असेल त्याहीपेक्षा अधिक खालच्या पातळीवर जातो ५. "एन्लाइट्न्ड वन" मला सर्व विषयातले सर्व कळते असा अहंकार मिरवतो ६. "एन्लाइट्न्ड वन" डॉक्टर लोकांना औषधोपचार शिकवतो, मानसोपचारतज्ञांना मन नाही हे सांगतो ७. "एन्लाइट्न्ड वन" नोबेल पारितोषिक विजेता आला चर्चेला तरी त्याला हरवेन असा अहंकार मिरवतो ८. "एन्लाइट्न्ड वन" संगणक क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्यांना तसेच त्या क्षेत्रात काम करणार्‍यांना संगणक कसा चालतो हे शिकवतो ९. "एन्लाइट्न्ड वन" स्मृती स्ट्रींग सारखी धादांत अशास्त्रीय पूडी सोडून स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो १०. "एन्लाइट्न्ड वन" चर्चा सुरु करुन प्रश्नांची उत्तरे देता आली नाही की त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 09/17/2020 - 15:40 नवीन
ते तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत निरोपात किंवा तुमच्या खरडवहीत येऊन त्याचू म्हणाले , कि तुम्हीच मी त्याचू नाही म्हणत त्यांच्या मागे लागलात तेवढं सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संगणकनंद
क
कोहंसोहं१० गुरुवार, 09/17/2020 - 22:17 नवीन
ईट इज वन सिंगल युनिटी ! त्यामुळे जन्मवेळ आणि त्यातून "जातक" असा कुठलाही घटक हा वेगळा काढताच येत नाही. या कल्पनेवर बेस्ड शास्त्र हे शास्त्र असू शकत नाही. कारण वेळ, आणि कुठल्यातरी वेळची ग्रहस्थिती असं काही अस्तित्वातच नाही आहे ! >>>>>>> अस्तित्वाच्या एका टप्प्याला ग्रहांची एक स्थिती होती आणि दुसऱ्या टप्प्याला दुसरी. जेंव्हा स्थितीबद्दल होती तेंव्हा पूर्वीची स्थिती दर्शवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्याला काळ म्हणतात. वास्तविकपणे काळ हा स्थितीबद्दलचा निर्देशक आहे. त्यामुळे कुठल्याही वेळची ग्रहस्थिती जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा त्या ग्रहाच्या स्पेसिफिक स्थितीबद्दल आपण निर्देश करत असतो. जर एखाद्या विशिष्ट गोष्टीची स्थिती कधीच बदलत नसेल तर रूढार्थाने ती कालातीत आहे कारण जिथे स्थितीबदलच नाही तिथे काळ दर्शवून काय होणार. पण या दुनियेत जे जे काही आहे त्यात स्थितीबदल येतोच. पण जी गोष्ट बदलते तिथे तुम्ही तो बदल दर्शवण्यासाठी काळ वापरू शकता. आणि ज्या नियमांच्या द्वारे काही होऊ घातलेल्या बदलांचे प्रेडिक्शन केले जाऊ शकते. ते सिंगल युनिटी, घटक वेगळे काढणे वगैरे त्यालाच लागू होते ज्यात कधीच बदल होत नाही. पण तो तर्क बदलणाऱ्या गोष्टींसाठी लावले चुकीचे आहे. तो कुतर्क झाला. एवढे सिम्पल लॉजिक समजले की झाले (हे आधी सांगितले आहे पण तुम्ही ते वाचले की नाही माहित नाही म्हणून लिहिले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
क
कोहंसोहं१० गुरुवार, 09/17/2020 - 22:46 नवीन
"एन्लाइट्न्ड वन कॅन आयदर बिकम युर डोअर टू द हेवन, ऑर इफ यु आर आर्ग्युंइंग विथ हीम अननेसेसरिली , बिकम्स अ‍ॅन अनब्रेकेबल वॉल अँड यू कॅन किप ऑन हिटींग युअर हेड अगेन्स्ट इट अँड फायनली ब्रेक युअर ओन हेड, सो बी केअरफुल" >>>> अहो ते म्हणाले आणि तुम्ही मानले? ४ पुस्तके वाचून त्यातील तत्वज्ञान शाब्दिक अतिसाराच्या रूपाने मांडणारे आणि स्वतःच स्वतःला एन्लाइट्न्ड म्हणवून घेणारे अहंकारी लोक जर खरंच एन्लाइट्न्ड असते तर जगात एन्लाइट्न्ड वन ची संख्या करोडोंमध्ये असती. कोरडे शाब्दिक ज्ञान आणि अनुभव यात जमीन अस्मानाचा फरक असतो. स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार संपूर्णपणे नष्ट व्हावा लागतो. तुम्ही ज्याला एन्लाइट्न्ड समजत आहात त्यांच्यात तो ठासून भरला आहे हे केवळ प्रतिसाद वाचून सांगता येते. इतका की मोठे वैज्ञानिक, संत हे चुकीचे आणि मीच एकटा बरोबर असे सांगण्यास ही ते कमी करत नाहीत. बाकी अनेक कारणे देता येतील पण एवढे एक कारण पुरेसे आहे ते मायेच्या चिखलात खोल रुतले आहेत हे सांगण्यासाठी. फॉलो करायचेच असेल तर संतांना आणि त्यांच्या साहित्य-तत्वज्ञानाला करा त्यांच्या टीकाकारांना नाही. थिंक थाउजंड टाइम्स बिफोर फॉलोईंग एनीवन एल्स ही/शी विल ड्रॅग यु थाउजंड स्टेप्स बॅक विदाउट यु रिअलाइनजिंग इट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 09/18/2020 - 15:46 नवीन
आणि मी मानले ते जरा स्पष्ट करा. >>स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार संपूर्णपणे नष्ट व्हावा लागतो -- अहंकार म्हणजे काय आणि तो दूर कसा करायचा ते स्पष्ट करा. तुम्हाला स्वरुपाचे ज्ञान झाले आहे काय ? असल्यास दुसरा कोण काय करतो, शो-ऑफ करतो का वगैरे भिती बाळगायचे कारण नाही. आणि नसल्यास, तुमच्या म्हणण्याला काही एक अर्थ नाही, तुम्हीच हे इथून तिथून ऐकुन नुसते फेकत आहात. >> मायेच्या चिखलात खोल रुतले आहेत -- तुम्ही बाहेर आला आहात ना मायेच्या चिखलातून, तुमचे अभिनंदन. मला तुमच्याशी वाद घालण्यात बिल्कुल इंटरेस्ट नाही. आपल्याला जे झेपत नाही आणि झेपणारही नाही ते दुसर्‍याला सहज जमले आणि तो ते सोपे आहे हे आत्मविश्वासाने सांगतो आहे, आणि दुसरा ही त्याला समजलं म्हणून दाद देतोय हे तुम्हाला बघवत नाही आणि त्यासाठी तुम्ही संत मंडंळींच्या नावाआड लपत आहात एवढं स्पष्ट दिसतंय तुमच्या प्रतिसादावरून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा