Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/10/2020 - 05:54
💬 352 प्रतिसाद
प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित. अशा अंनिसच्या हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख अंनिस वार्तापत्राच्या त्यावेळच्या संपादक मंडळाने नाकारला. असे समजले की त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होत होते म्हणून नाकारला गेला. नंतर मी तो लेख मनोगत या जालीय दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. तसेच तो माझ्या ब्लॉगवर ही आहे. शिवाय तो अन्य संकेतस्थळांवर पण टाकला आहे. मिपावर मात्र टाकायचा राहिला असे लक्षात आल्याने तो आत्ता टाकतो आहे. अनेकांनी तो लेख आवडल्याचे आवर्जून कळवले होते. अंनिस वार्तापत्रात नंतर व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होणारे असंख्य लेख येउन गेले. असो. कदाचित त्यामुळेच त्यानंतर रिसबूडांविषयी असलेला आदर अनेक ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मी सोडली नाही. 2005 मधे मला वार्तापत्र लेखक पुरस्कार मिळाला. तो घ्यायला आयुष्यात एकदाच सांगलीला गेलो होतो. तेव्हा एक त्यांची आठवण झाली कारण त्या पुरस्काराचे खर्‍या अर्थाने असलेले मानकरी हे माधव रिसबुड हेच आहेत. त्यांची आठवण येत नाही असा दिवस जात नाही. माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'. किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला. डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले. "राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे." फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला. रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले. नाडी भविष्य आणि रिसबूड त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत. शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे? श्रद्धेचा दुसरा भाग श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला. पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक. शेवटचा लेख फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो. ( पुर्वप्रकाशित मनोगत दिवाळी २००७)

प्रतिक्रिया द्या
121025 वाचन

💬 प्रतिसाद (352)
ऋ
ऋतुराज चित्रे Sun, 09/20/2020 - 10:45 नवीन
हया दोघींचे भविष्य सारखेच असेल का ? जन्म वेळ व स्थान एकच आहे दोघींचे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 09/25/2020 - 07:33 नवीन
https://www.misalpav.com/comment/1080887#comment-1080887 अगदी आयडेंटीकल ट्वीन वर विज्ञानात संशोधन झाले आहे. चालूही आहे. असे संशोधन फलज्योतिष चिकीत्सकांनी केले आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/25/2020 - 13:59 नवीन
१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का? सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांच्या जन्मवेळेमध्ये १५-२० मिनिटांचे अंतर असते. काही केसेस मध्ये ते काही तासांपर्यंत जाते. १५-२० मिनिटांच्या फरकामुळे ठोकळाकुंडलीतल्या ग्रहांची स्थाने व राशींचे आकडे यात सहसा काही फरक पडत नाही. वर सांगितल्या प्रमाणे बॉर्डर वेळेचा जन्म असेल तर उपरोक्त उदाहरणात जसे तीनचे चार झाले तसा प्रथम स्थानातल्या राशीच्या आकड्यात एका आकड्याचा फरक पडू शकतो, आणि त्याचबरोबर नक्षत्रही बदलू शकते. या बाबत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व ज्योतिषसमर्थक कै. डॉ.भा.नि. पुरंदरे यांनी एक किस्सा पुण्यातील ज्योतिष संमेलनात सांगितला होता. तो असा:- त्यांच्या कडे प्रसूती साठी आलेल्या एका केसमध्ये पंधरावीस मिनिटांच्या अंतराने जुळ्या मुली जन्माला आल्या. त्या एकाच वारेवरच्या होत्या. परंतु एक काळसर होती व एक उजळ होती. त्यांनी जेव्हा मुलींच्या पत्रिका केल्या तेव्हा त्यांना असे आढळून आले की त्या पंधरावीस मिनीटांमध्ये एकीचे जन्म-नक्षत्र बदलले होते. त्या मुळे एक मुलगी सावळी व एक उजळ असा त्यांच्या वर्णात फरक पडला असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की दोन्ही मुली या एकाच फलित गर्भपेशीचे विभाजन होउन झालेल्या जुळ्या मुली ( युनिओव्ह्यूलर ) होत्या कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या एका वारेवरच्या होत्या. परंतु, तरीही त्यांच्या वर्णात फरक पडला तो केवळ १५ मिनिटात एकीचे नक्षत्र बदलल्यामुळे पडला. आम्हाला त्यांच्या या विधानाच्या सत्यतेबद्दलच शंका वाटते. ती शंका अशी:- असा वर्णातला फरक फक्त माता-पित्यांच्या जनुकांच्या जोडणीत होणाऱ्या फरकामुळे पडू शकतो असे जनुक-शास्त्र सांगते. युनिओव्ह्यूलर केस मध्ये असा फरक पडणे शक्य नाही. कारण तशा केसमध्ये जनुकांच्या जोडणीत फरक पडलेला नसतो. पण जर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ नक्षत्र-बदलामुळे हा फरक पडला असेल तर ती गोष्ट या शास्त्रात मूलभूत क्रांति घडवणारी ठरेल. ती केस वास्तविक एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेचीच ठरेल. ती काही एखाद्या ज्योतिष-संमेलनात सांगून सोडून देण्यासारखी किरकोळ गोष्ट नव्हे! आता प्रश्न असा आहे की हे त्यांचे संशोधन एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होउन त्याला मान्यता मिळाली आहे का ? एवढया मोठया तज्ज्ञ डॉक्टराने सांगितले ते खरे असलेच पाहिजे असे सामान्य माणूस मानणारच. दुसऱ्या तज्ज्ञांची मते या बाबतीत काय आहेत हे पहाण्याच्या भानगडीत तो पडत नाही. यावरून एवढे मात्र दिसते की जेव्हा एखादा मोठा डॉक्टर स्वत:च ज्योतिषी बनतो तेव्हा तो त्या शास्त्राच्या समर्थनासाठी दिशाभूल करणारी विधाने करू शकतो. पुढे २४ व्या प्रश्नाच्या उत्तरात आम्ही हेच दाखवून दिले आहे. या ठिकाणी हस्तरेषातज्ज्ञ पुढे येतात. ते म्हणतात, ''जुळया मुलांची कुंडली एकवेळ सारखी असेल पण हस्तरेषा मात्र वेगळया असतात. अहो, हा निसर्गाचा आरसा आहे! तुमची जन्मवेळ चुकू शकते. पण हा आरसा काही बदलत नाही. तुम्ही आमच्याकडे या.``
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/25/2020 - 14:01 नवीन
इथे अजुन पुर्वसंचित,प्राक्तन हे घटक येतात. त्याचे आकलन ज्योतिषी व्यक्तीच्या उपासना अध्यात्मिक सामर्थ्य यावर अवलंबून असतात. म्हणजे फॅक्टर्स वाढले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ऋ
ऋतुराज चित्रे Fri, 09/25/2020 - 14:39 नवीन
जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का? सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांच्या जन्मवेळेमध्ये १५-२० मिनिटांचे अंतर असते. काही केसेस मध्ये ते काही तासांपर्यंत जाते एकत्रित जुळे एकमेकांना चिकटून असल्याने त्यांची जन्मवेळ सारखीच असते परंतू त्यांचे भविष्य सारखे नसते, खासकरून जेव्हा ते एकमेकांना अंशत: जोडलेले असतात ,मुख्य अवयव मेंदू , हृदय , फुप्फुस , यकृत, किडनी सामायीक नसतात. जन्म वेळ आणि स्थानात फरक नसतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/25/2020 - 14:58 नवीन
ही केस विशेष व अपवादात्मक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
ऋ
ऋतुराज चित्रे Sun, 09/20/2020 - 10:48 नवीन
स्त्रीने व पुरुष यांचा संयोग घडवून मूल निर्माण केले तर त्याच्या पत्रिकेत मंगळ कुठे असेल ... ? पत्रिकेत मंगळाची जागा पृथ्वी घेईल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 09/20/2020 - 14:18 नवीन
म्हणजे जसजसे नव्या ग्रहान्चे शोध लागतील त्याप्रमाणे या शास्त्रातील गृहितकेच बदलावी लागणार ! असे ज्योतिष शास्त्री करतील असे खात्रीने वाटते का.... ? प्रुथ्वी तामसी, दयाळू की कशी हे मंगळावरचे ज्योतिषी कोणत्या आधारावर ठरवतील ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
स
सतिश गावडे Sun, 09/20/2020 - 15:21 नवीन
कृष्ण विवरांचे कुंडलीतील स्थान आणि त्यांचा जातकाच्या आयुष्यावर होणारे परिणाम यावर आइन्स्टाइन वेग स्थळ काल तज्ज्ञांचे काय मत आहे?
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 09/20/2020 - 16:32 नवीन
ज्ञात असलेली कृष्णविवरे आहेत का? म्हणजे जसे ग्रहांना नावे आहेत तसे कृष्णविवरांना पण नावे असायला हवीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
श
शा वि कु Sun, 09/20/2020 - 16:53 नवीन
विकिपीडिया यादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
स
सतिश गावडे Sun, 09/20/2020 - 16:56 नवीन
हो, ज्ञात असलेल्या कृष्णविवरांची भली मोठी यादी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
R
Rajesh188 Sun, 09/20/2020 - 18:41 नवीन
आकाशातील ग्रह गोल ( आपल्या सूर्य माले मधील पृथ्वी वरच्या प्रतेक वस्तू परिणाम करतात. विविध प्रकारची बल विश्वात कार्यान्वित आहेत. त्या मधील काही थोडकी च बल आपल्याला माहीत असतील अजुन बाकी बल आपल्याला अजुन माहीतच नसतील हे पण शक्य आहे. शेवटी सजीव सृष्टी ही विश्व चाच भाग मानवी मानवी शरीर सुद्धा काही वेगळे नाही. त्या मुळे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट ग्रह गोलांची स्थिती असेल तर मानवी मनावर त्याचा परिणाम होतो हे अनुभव नी माहीत पडल्या वर त्या आधारित ज्योतिष शास्त्र विकसित केले गेले असेल. चेतना म्हणजे काय हे अजुन स्पष्ट झालेला नाही. चेतना ही ब्रह्मांड तून च निर्माण होते असे पण काही लोकांचे मत आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 09/21/2020 - 07:57 नवीन
गुरू जर माझ्यावर परिणाम करीत असेल तर मी ही काहीतरी परिणाम गुरुवर करत असेनच की नाही ? प्रश्न आहे तो की त्या परिणामाची व्याप्ती काय ? त्याच्यात व माझ्यात अंतर किती ( सोशल डिस्टन्सिंग ) . त्याता ही महत्वाचे असे की माझ्यातील अत्यन्त गुन्तागुन्तीच्या मानसिक प्रक्रियांवर गुरूच्या चलनाचा परिणाम कितीसा ..? व माझ्या मानसिकतेचा गुरूवर परिणाम किती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
श
शा वि कु Mon, 09/21/2020 - 08:13 नवीन
योग्य प्रश्न. परिणाम तर त्या लॉजिकने दगड, माती, शेण यांचा पण होतो. कुंडलीत त्यांचा का विचार होत नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
R
Rajesh188 Mon, 09/21/2020 - 08:41 नवीन
बरेच जुने ज्ञान हे अनुभवातून मांडलेल्या सुत्रा वर अवलंबून आहे. जसे मुंग्या निघायला लागल्या ,अन्न जमवायला लागल्या की समजायचे आता पावूस सुरु होणार. आकाशात लांबवर काळ्या ढगांची भिंत दिसायला लागली की समजायचे काहीच वेळात वळीव पावूस येणार . वळीव पावसाचे ढग खूप वेगात प्रवास करतात लांब दिसणारा पावूस काही मिनिटात पोचतो. हे सर्व अनुभव वर आहे. ह्याची शास्त्रीय कारणे आज सुद्धा माहीत नसतील.. तसेच ज्योतिष हे सुद्धा अनेक प्रयोगातून आलेल्या अनुभव वर अवलंबून आहे. शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करता येणार नाही
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 09/21/2020 - 10:20 नवीन
संजय क्षीरसागर, हाच निरिक्षकांचा स्थानभेद आहे ! त्यामुळे तुमचं पहिलं (आणि निष्कारण ठामपणे केलेलं) विधान : "आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहे." चुकीचं आहे. हा स्थानभेद ब्रह्मांडात सर्वत्र आढळून येतो. भौतिकशास्त्राचं एक गृहीतक आहे की कोणत्याही दोन विभिन्न वस्तू एकाच वेळी एकाच स्थानी अस्तित्वात नसतात. तस्मात आईनस्टाईनचं बूड व जातकाचं बूड नेहमी विभिन्न स्थानं व्यापणार आहे. या चिरंतन सत्याचा आईनस्टाईनच्या सापेक्षतेशी अणुमात्र संबंध नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 09/21/2020 - 10:28 नवीन
जी मत व्यक्त होत आहेत. जे दुर्मिळ विज्ञान इथे सांगितले जात आहे. ते जागतिक स्तरावर च्या कोणत्याच संशोधकांच्या पण बुध्दी च्या बाहेरच आहे. एवढे ज्ञान त्यांना पण नाही तर महान संशोधकांना तुमच्या चर्चेत घेवू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
शा वि कु Mon, 09/21/2020 - 11:10 नवीन
बुडभिन्नत्व शब्द भारी आहे. खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Mon, 09/21/2020 - 11:16 नवीन
पहिल्यासरखाच चुकीचा निष्कर्श काढलात ! १.
दोन विभिन्न वस्तू एकाच वेळी एकाच स्थानी अस्तित्वात नसतात.
करेक्ट ! आइन्स्टाईन ट्रेनमधे आहे आणि दुसरी व्यक्ती बाहेर आहे हा स्थानभेद आहे आणि त्यामुळेच त्यांचं वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष आहे २.
या चिरंतन सत्याचा आईनस्टाईनच्या सापेक्षतेशी अणुमात्र संबंध नाही
जर आइन्स्टाईन आणि दुसरी व्यक्ती ट्रेनमधेच असतील तर सापेक्षता वादाला अर्थच उरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मराठी कथालेखक Mon, 09/21/2020 - 14:17 नवीन
स्थान हा काल्पनिक बिंदू आहे म्हणून स्थान निरर्थक असे मानले. म्हणजे दोन स्थानांतले अंतर हे सुद्धा निरर्थक जर अंतर निरर्थक तर लांबी सुद्धा निरर्थक जर लांबी निरर्थक तर शिंपी दोन मीटर कापड कसे मोजणार ? म्हणजे शर्ट नाही ...आणि उघड्याने रहाणे आले.. [कृपया एक गमतीदार उहापोह म्हणून या प्रश्नाकडे बघावे. नव्या वादाची सुरुवात होवू नये]
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 09/21/2020 - 20:30 नवीन
संजय क्षीरसागर,
आइन्स्टाईन ट्रेनमधे आहे आणि दुसरी व्यक्ती बाहेर आहे हा स्थानभेद आहे आणि त्यामुळेच त्यांचं वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष आहे
असहमत. गाडी स्थानकातून वेगाने सरकते आहे. गाडीचा चालक आणि आईन्स्टाईन या दोघांतही स्थानभेद आहे. पण (आईनस्टाईनच्या सापेक्षतावादानुसार) त्यांचं वस्तुस्थितीचं आकलन समान आहे. कारण की दोघांचा सापेक्ष वेग ० आहे. याउलट जातक स्थानकात स्थिर असल्याने आईनस्टाईन व जातक यांच्यात default स्थानभेदासोबत वेगभेदही आहे. म्हणून (आईनस्टाईनच्या सापेक्षतावादानुसार) त्यांच्या वस्तुस्थितीच्या आकलनांत फरक आहे. वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष असण्यामागील कारण स्थानभेद नसून वेगभेद आहे. असं आईनस्टाईन म्हणतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 09/21/2020 - 21:25 नवीन
ज्योतिष विषयाशी या चर्चेचा कसा संबंध जुळतो ते अजिबात कळलेलं नाही. पण केवळ वेगभेद इतकाच फरकाचा मुद्दा नसून गुरुत्वाकर्षण क्षेत्राचे बल हाही भाग आहे. हे ट्रेन आणि फलाट यांबाबत लागू होणार नाही... पण ढोबळ उदा घेऊन सोपे करायचे तर .. (हे मी ज्यांना नेमका अंदाज नसेल अशांसाठी लिहितोय. अधिक चांगल्या शब्दात कोणी भौतिकशास्त्र विद्यार्थ्याने सांगितलं तर उत्तमच) पुरेसे जास्त गुरुत्वीय बल असणार्या वस्तूमुळे (उदा. प्रचंड तारा) त्याच्या आसपास स्पेसटाईम हा घटक (निरीक्षकांना जाणवण्याइतपत) ताणला अथवा खेचला गेल्यासारखी स्थिती बनते आणि तिथून प्रकाशाला पार व्हायला अधिक "वेळ" लागतोय किंवा कोणतीही घटना तिथे तुलनेत हळू घडतेय असं त्या क्षेत्राबाहेर दूर असलेल्या निरिक्षकाला "भासतं". समजा "अ" हा पृथ्वीवर आहे. आणि "ब" एका अति अवजड तार्यानजीक (कशाला मरायला ) पोचला आहे.. तर तुलनेत खूप कमी गुरुत्वीय बल असलेल्या क्षेत्रातून बघणार्या व्यक्तीला (उदा पृथ्वीवरील आपला "अ") ती उच्च गुरुत्वीय क्षेत्रातील व्यक्ती "ब" स्लो झाल्याचे (इथून) भासेल. वास्तवातही ती "ब" व्यक्ती पुन्हा पृथ्वीवर आल्यास तिच्या जड तारा भ्रमंतीतील आभासी कालगणनेपेक्षा पृथ्वीवरचा आभासी काल फास्ट पुढे गेल्याचे तिला "जाणवेल". पण पण पण अ किंवा ब या दोघांनाही आपापला काळ एकाच आभासी वेगाने सरकत असल्याचे या पूर्ण घटनाक्रमात जाणवेल. अ आणि ब नसतीलच तर हा काळाच्या जाणिवेतला फरक अस्तित्वात येणार नाही. कारण.. पुन्हा एकदा. काळ ही काल्पनिक सोयीस्कर कल्पना आहे. तिला भौतिक अस्तित्व नाही. पण पुन्हा एकदा.. या सर्वामुळे ज्योतिष अथवा कोणतीही भौतिक जगातली कल्पना निराधार कशी ठरते हे कळत नाहीये. व्यवहारात आभास तर आभास, त्याला मानूनच सर्व करावे लागणार. हमको भी मालूम है "काळ" की हकीकत लेकिन दिल के ख़ुश रखने के लिये ए जालिम .. -(भौतिकशास्त्र पदवीधर) गवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Mon, 09/21/2020 - 22:01 नवीन
ज्योतिषाचा काल आणि स्थल (जातकाचे जन्मस्थान) यावर उभारला गेला आहे. घाटपांडे म्हणाले, संक्षींनी काल हा भास आहे हे सिद्ध केल्यानं एक कणा मोडला. आता दिक्काल या संकल्पनेची वाट लावली की ज्योतिष हे सर्वस्वी थोतांड आहे हे सिद्ध होईल. त्यावर माझं म्हणणं आहे की अवकाश अखंड आहे त्यात भेद होऊ शकत नाही त्यामुळे स्थल हा काल्पनिक बिंदू आहे. तिथे चर्चा संपन्न झाली होती. पण प्रतिसादात मी म्हटलं की आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादात निरिक्षकाच्या स्थानामुळेच आकलनात फरक पडतो. खरं तर तो पासिंग रिमार्क होता, पण त्यावर गामा हट्टाला पेटले आणि सुरुवात झाली. __________________________________________ आता वरच्या प्रतिसादात हे क्लिअर झालं आहे
समजा "अ" हा पृथ्वीवर आहे. आणि "ब" एका अति अवजड तार्‍यानजीक पोचला आहे......अ आणि ब नसतीलच तर हा काळाच्या जाणिवेतला फरक अस्तित्वात येणार नाही.
अशाप्रकारे, सापेक्षतावादात निरिक्षकाच्या स्थानामुळेच आकलनात फरक पडतो हा माझा मुद्दा सिद्ध झाला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संजय क्षीरसागर Mon, 09/21/2020 - 22:05 नवीन
ज्योतिषाचा डोलारा काल आणि स्थल (जातकाचे जन्मस्थान) यावर उभारला गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गवि Mon, 09/21/2020 - 22:19 नवीन
हो. स्थान महत्वाचे आहेच. पण तुम्ही ही थियरी ज्योतिष विषयाच्या खंडनासाठी वापरुन उगीचच ज्योतिष विषयाच्या मूळ गृहितकांना फार गांभीर्याने घेताय. ज्योतिष हे ग्रह काल स्थळ यांच्याशी निगडीत आहे हे गृहीतक मोडून दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. पण ज्योतिष, भविष्य हा विषय (भौतिक)शास्त्राचा नाहीच मुळी. तो अनिश्चितता असलेल्या जगण्यात लोकांना लागणार्या मानसिक आधारासाठी असलेला एक व्यावहारिक प्रकार आहे. यातील ग्रहस्थिती, जन्मस्थळ, वेळ वगैरे मुद्दे हे त्यात काहीतरी अगदीच रैंडमनेस नसून ते एक अभ्यास आणि तर्काधारित शास्त्र आहे असा विश्वास आणण्यापुरते आहेत. त्यावर "अधिक अभ्यास" केवळ स्टैटिस्टिक्सच्या अंगाने होऊ शकतो. Causal relation दाखवणे "भौतिकशास्त्राच्या" आधारे तरी शक्य नाही. शक्य असतं तर एव्हाना तो कार्यकारण भाव establish झाला असता. तेव्हा त्याच्या खंडनासाठीहि भौतिकशास्त्र invoke करण्यात मतलब दिसत नाही. पण प्रत्यक्ष त्यावर (भविश्यावर) विश्वास असलेले लोक त्यात आधार शोधतात. तो सोपा आणि हवासा आधार असतो. तुम्ही किंवा मी जी क्लिष्ट (आणि या व्यावहारिक बाबतीत थेट संबंधही नसणारी) भौतिकशास्त्र बेस्ड थियरी सांगतोय ती जाणून त्यातून तो आधार मिळणं बहुतांश लोकांना शक्य नाही. त्यामुळे ते ज्योतिष असू दे. तुम्ही पत्ते खेळणे या प्रकारात मी नेहमी जिंकतो किंवा अमुक एकजण नेहमी हरतो वगैरे कोणी बोलत असल्यास किंवा त्यावर पैसे लावून खेळून त्यात कमावण्याचं एक शास्त्र आहे अशी चर्चा कोणी केल्यास त्याचा इतका शास्त्रीय किंवा गणिती प्रतिवाद कराल का? भविश्याच्या नादी लागून सर्वांचे प्रचंड नुकसानच होतं आहे किंवा त्यापासून त्यांना भौतिकशास्त्रीय थियरीने दूर करता येईल या दोन्ही गोष्टी पटत नाहीत. तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे हे दिसतं,पण... उर्जा व्यर्थ जातेय. वेगळ्या विचारांचे तत्वचिंतन तुम्ही उत्कृष्टरित्या मांडता. पूर्वी गेस्टाल्ट, फिश बाऊल, हॉकिंग वगैरे विषय किंवा हजार चिन्तानी डोके खाजवतो कविता या अनुषंगाने प्रभावी विचार मांडलेले आठवतात. हेच सर्व तत्वज्ञान कोणाचेही खंडन न करता मांडत राहिल्यास ते अनुसरले जाण्याची अतएव त्याचा लाभ जास्त लोकांना होण्याची शक्यता वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 09/22/2020 - 08:16 नवीन
१.
पूर्वी गेस्टाल्ट, फिश बाऊल, हॉकिंग वगैरे विषय किंवा हजार चिन्तानी डोके खाजवतो कविता या अनुषंगाने प्रभावी विचार मांडलेले आठवतात.
माझ्या ललित लेखनाचा उद्देश मौज असतो आणि बाकी सर्व लेख किंवा प्रतिसाद लोकांच्या चुकीच्या धारणा निस्सरित करण्यासाठी असतात. अशा धारणा संपल्या की व्यक्ती निर्भ्रांत होते, विचारात कमालीची क्लॅरिटी येते आणि परिणामी सहजपणे वर्तमानात येऊन आपण स्वतःशी कनेक्ट होते. हे स्वतःशी कनेक्ट होणं स्वास्थ्य आहे. जीवनातल्या सर्व अस्वास्थ्याचं एकमेव कारण हा डिसकनेक्ट आहे. २.
हेच सर्व तत्वज्ञान कोणाचेही खंडन न करता मांडत राहिल्यास ते अनुसरले जाण्याची अतएव त्याचा लाभ जास्त लोकांना होण्याची शक्यता वाढेल.
लोकांना त्यांच्या धारणा प्राणाहून प्रिय असतात आणि त्यांना धक्का लगतोयं म्हंटल्यावर ते कृतज्ञ होण्याऐवजी उफाळून उठतात. प्रतिवाद संपला किंवा संपतोयं असं वाटायला लागलं की ते व्यक्तीगत होतात आणि मग मूळ विषय भरकटतो. उदा. देवाचं नांव कुणी ठेवलं ? इतका साधा सरळ लेख, कोणतंही खंडन न करता मांडलेली वस्तुस्थिती. पण पब्लिकनी आपल्या धारणा कशा ज्याम पकडून ठेवल्या आहेत ते खास बघण्यासारखं आहे. ३.
तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे हे दिसतं,पण...उर्जा व्यर्थ जातेय
दिलसे धन्यवाद ! आपल्याला जे समजलंय ते दुसर्‍याला सांगण्यात एक खुमारी आहे. चौफेर व्यासंगाचा या निमित्तानं एक दस्तैवज तयार होतो. माझं लेखन जगभरात वाचलं जातं याचा प्रत्यय मध्यंतरी आला. लंडनमधल्या एकानं पुण्यातल्या त्याच्या भावाला फोन करुन माझा शोध घ्यायला सांगितला. तो भाऊ नेमका माझा मित्र निघाला. ते गृहस्थ इथे आल्यावर त्यांनी शाही पार्टी अरेंज केली, दिलखुलास गप्पा झाल्या. पुण्यातल्या (निगडी) एका दांपत्याची, एकुलती एक डॉक्टर मुलगी ऐन तारुण्यात अ‍ॅक्सीडेंटमधे गेली. नेटसर्फिंग करतांना त्यांच्या पत्नीनं माझे मनोगतवरचे लेख एखाद्या पुस्तकासारखे मन लावून वाचले आणि ती कमालीची शांत होऊन त्या परिस्थितीतून बाहेर आली. माझा एक टेबलटेनीस ग्रुपमधला मित्र म्हणाला त्यांना तुला भेटायचंय, त्या वेळी ही हकिकत कळली.... अजून काय हवं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/22/2020 - 13:29 नवीन
यातील ग्रहस्थिती, जन्मस्थळ, वेळ वगैरे मुद्दे हे त्यात काहीतरी अगदीच रैंडमनेस नसून ते एक अभ्यास आणि तर्काधारित शास्त्र आहे असा विश्वास आणण्यापुरते आहेत. त्यावर "अधिक अभ्यास" केवळ स्टैटिस्टिक्सच्या अंगाने होऊ शकतो. Causal relation दाखवणे "भौतिकशास्त्राच्या" आधारे तरी शक्य नाही. शक्य असतं तर एव्हाना तो कार्यकारण भाव establish झाला असता. तेव्हा त्याच्या खंडनासाठीहि भौतिकशास्त्र invoke करण्यात मतलब दिसत नाही.>>>>>>> भविश्याच्या नादी लागून सर्वांचे प्रचंड नुकसानच होतं आहे किंवा त्यापासून त्यांना भौतिकशास्त्रीय थियरीने दूर करता येईल या दोन्ही गोष्टी पटत नाहीत.>>>> गवि या मुद्द्याशी अगदीच सहमत आहे. मी सर्वसामान्य तार्किक पातळीवर यात चिकित्सा कशी करता येईल याबाबत देखील मुद्दा मांडला होता. पण तत्वज्ञानाच्या गदारोळात तो तसाच राहिला. http://www.misalpav.com/comment/1080099#comment-1080099
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गामा पैलवान Tue, 09/22/2020 - 15:03 नवीन
संजय क्षीरसागर,
पण त्यावर गामा हट्टाला पेटले आणि
मी हट्टाला पेटून प्रमाणाबाहेर वाद घालंत बसलो हे खरंय. त्यामागे तुमच्या विधानात अचूकता असावी इतकाच आग्रह होता. किरकोळ शेरा ( = पासिंग रिमार्क ) असला तरी वाचकाचा प्रचंड गोंधळ उडू शकतो. तो तसा उडू नये इतकीच अपेक्षा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 09/22/2020 - 19:59 नवीन
किरकोळ शेरा ( = पासिंग रिमार्क ) असला तरी वाचकाचा प्रचंड गोंधळ उडू शकतो. तो तसा उडू नये इतकीच अपेक्षा आहे.
गोंधळ तुमचा उडाला होता हे लक्षात आलं असेल (गविचे दोन्ही प्रतिसाद पुन्हा बघा). मी मुद्दा सिद्ध केला आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला क्लॅरिटी आली असावी. अर्थात, तुमच्याशी झालेल्या सर्व चर्चा, या संकेतस्थळासाठी पारस्पारिक सभ्यतेचा वस्तूपाठ आहेत आणि त्यात मला कायम मजा आलेली आहे. 👌 ____________________________________ इथे मात्र ज्या सदस्यांना सापेक्षता वादाची शून्य माहिती आहे त्यांनी (नेहेमी प्रमाणे) केलेली निर्बुद्ध व्यक्तीगत शेरेबाजी; ज्यांचा खरडफळ्या पलिकडे वकूब नाही आणि आपल्या प्रछन्न गलिच्छतेचं सोशल फोरमवर प्रदर्शन करायची काहीही लाज वाटत नाही अशांनी मारलेल्या कमेंटस. संकेतस्थळावर केवळ पिंका टाकण्यापलिकडे काहीही अक्कल नसलेली त्याचू मंडळी आणि विषयाचा आवाका बघून स्वतःच्या छपरीपणाची जाणीव झाल्यावर, मला व्यनितून लिहा सांगणारे महाभाग यांना सणसणीत थोतरीत बसली आहे. इथून पुढे ते धडा घेतील अशी आशा करु. 👍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 09/22/2020 - 22:06 नवीन
संजय क्षीरसागर,
गोंधळ तुमचा उडाला होता हे लक्षात आलं असेल
माझा आजिबात गोंधळ उडाला नाही. कारण की मी आईनस्टाईनचा विशिष्ट सापेक्षतेचा सिद्धांत वाचून व समजून घेतला होता. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 09/22/2020 - 22:17 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचा :
आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहे. ट्रेनमधे असलेला आईन्स्टाइन आणि बाहेर असलेली व्यक्ती यांचे वेग भिन्न आहेत. आईनस्टाईनच्या सापेक्षतेत दोन निरीक्षकांच्या सापेक्ष वेगाला महत्त्व आहे. त्यांच्या आपसांतल्या स्थानाला नाही.
हा तुमचा गोंधळ होता. अजून ही उलगडा झाला नसेल तर गविंचे दोन्ही प्रतिसाद वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 09/23/2020 - 13:16 नवीन
संजय क्षीरसागर, हा माझा गोंधळ नव्हे. गरज नसतांना आईनस्टाईनचं नाव घेतल्यामुळे तुमचा गोंधळ उडाला होता. तो मी दूर केला. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 09/23/2020 - 15:39 नवीन
माझा पहिला प्रतिसाद वाचा आणि तुमचा गोंधळ कुठे आहे ते (माझ्या वरच्या प्रतिसादात) बघा. मी अजूनही (आणि कायम) माझ्या पहिल्या प्रतिसादावर ठाम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 09/23/2020 - 22:44 नवीन
संजय क्षीरसागर, तुमच्या या प्रतिसादात आईनस्टाईनचं नाव नको.
थोडक्यात, स्थान हा कायम व्यक्ती किंवा वस्तू सापेक्ष बिंदू आहे -हाच आइन्स्टाइअनच्या थिअरी ऑफ रिलेटिवीटीचा आधार आहे.
बस इतकंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/24/2020 - 12:38 नवीन
एक जण पृथ्वीवर आहे आणि दुसरा तार्‍यावर म्हणून त्यांच्या निरिक्षणात फरक आहे. ज्योतिषात ही एकावेळी जन्मलेल्या दोन जातकांच्या जन्मस्थानावरुन फेकंफाक बदलते. असा त्या विधानाचा अर्थ आहे. आता तुम्हाला मुद्दा कळला असावा. आणि रिलेटिवीटीची तर बातच सोडा, मला अबसल्यूट काय आहे ते माहिती आहे, त्यामुळे चूक असंभव आहे. आता चर्चा अबसल्यूटकडे वळवू नका ! 😄 😄
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे गुरुवार, 09/24/2020 - 16:22 नवीन
मला अबसल्यूट काय आहे ते माहिती आहे, त्यामुळे चूक असंभव आहे. गा पै हे समजलंय ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कोहंसोहं१० Tue, 09/22/2020 - 23:59 नवीन
प्रकाश सर, तुमचे प्रतिसाद मला थोडे गोंधळात टाकणारे वाटतात. असे वाटते आहे की तुम्ही दोन्ही दगडांवर पाय ठेऊन आहात. असो. ज्योतिष खरे का खोटे यावर तार्किक वादविवाद करण्याऐवजी केवळ दोन प्रश्नाची उत्तरे हवीत: १. ज्योतिष खोटेच असे ठासून सांगणाऱ्यांनी कधीतरी चांगल्या ज्योतिषाची योग्य प्रश्नानुरूप (ज्याचे प्रेडिक्शन ज्योतिषाच्या माध्यमातून दिले जाऊ शकते) शहानिशा करायचा प्रयत्न केला आहे का? असेल तर अनुभव वाचायला आवडेल २. ज्योतिष संपूर्णच खोटे असेल फसवणूक असेल तर आत्तापर्यंत ते संपूर्णपणे लयाला जायला हवे. पण लोकांना अनुभव तर येतात. ते कसे?ज्योतिष हा फक्त अंदाजे फेकलेल्या प्रोबॅबिलिटीचा खेळ असेल तर काही उत्तम ज्योतिषांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आणि अचूक कशी (काही प्रश्नांमध्ये मिळणारी उत्तरे अगदी मिनिटामध्ये बरोबर आली आहेत)? मागे एका प्रतिसादात मी लिंक शेयर केली होती केस स्टडीज साठी जिथे एका ज्योतिषाने बऱ्याच केसेस, रिजल्ट, जातकाचे प्रतिसाद सर्व काही शेयर केले आहे. बरेचसे जातक प्रतिसाद योग्य शिक्षण घेतलेले आहेत म्हणजे उगाच सहज मूर्ख बनवता येईल असे नाहीत. बरे आवर्जून प्रतिसाद देतात आणि नमूद करतात म्हणजे निर्णय दिल्याप्रमाणे घडलेले देखील असावे. काही केस स्टडीज तर फारच अचूक प्रेडिक्शन चे आहेत (अगदी मिनिटामध्ये). उत्तम प्रेडीक्शन्स देणारे अनेक ज्योतिष देशामध्ये असतील ज्यांचे बरेच प्रेडीक्शन्स बरोबर आले असावेत ज्योतिष हा फक्त अंदाजे फेकलेल्या प्रोबॅबिलिटीचा खेळ असेल तर काही उत्तम ज्योतिषांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आणि अचूक कशी (वर नमूद केल्याप्रमाणे काही प्रश्नांमध्ये मिळणारी उत्तरे अगदी मिनिटामध्ये बरोबर आली आहेत)? कितीही फेकंफाक केली तरी इतके अचूक तेही बऱ्याचदा येणे जवळपास अशक्य आहे. मग ते कसे होत असावे? माझ्या मते उगाच शुष्क तार्किक वादविवाद करण्यापेक्षा एकतर अनुभव (हवं तर परीक्षा) घेऊन पहा मग ठरवा.
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Wed, 09/23/2020 - 00:27 नवीन
सहजच उदाहरण म्हणून हे २ घेऊयात. अशी अनेक सापडतील पण सध्या हे एक पुरे. https://www.mblog.suhasgokhale.com/%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a4%b2-%e0%a4%a7%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be/ https://www.mblog.suhasgokhale.com/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be/ जाता जाता थोडेसे जास्त अचूक प्रेडिक्शन (विचारलेला प्रश्न गहन नाही पण मुद्दा अचूकतेचा आहे त्यादृष्टीने पाहिल्यास चांगले उदाहरण वाटते) चे एक उदाहरण: https://blog.suhasjyotish.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/ वरील उदाहरणात नमूद केलेला टेक्निकल भाग सोडला तर कोणीही असे प्रेडिक्शन अंदाजपंचे करून बरोबर उत्तर देऊ शकेल का? तेही प्रोफेशनल पद्धतीने रीतसर पैसे घेऊन? कारण उत्तरांच्या प्रोबॅबिलिटीज जवळपास असंख्य आहेत. ज्योतिषशास्त्राला निराधार, फेक म्हणणाऱ्यांनी याचाही विचार करून पटेल असे उत्तर शोधावे (उगाच अहंकार जपण्यासाठी स्वतःचा मांडलेला मुद्दा रेटायच्या हेतूने नको)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
प
प्रकाश घाटपांडे Wed, 09/23/2020 - 10:12 नवीन
आपण मी उपक्रमावरील दिलेली लिंक व त्यावरील चर्चा व्यवस्थित वाचली आहे का या बद्दल मला शंका वाटते. सध्या तरी आपण या लिंकवरील प्रश्न वाचावेत http://mr.upakram.org/node/854 माणसाच्या स्वभावाची एक गंमत आहे. देव नवसाला पावला तर ती देवाची कृपा, नाही पावला तर आपलेच नशीब वाईट, असे स्वत:चे समाधान माणूस सहज करून घेतो. ज्योतिषाचे तसेच असते. एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर आलं ही मानसिकता ज्योतिषांनीच रूजविली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
R
Rajesh188 Wed, 09/23/2020 - 10:29 नवीन
जीवन अस्थिर झालेले आहे .लोकांना पुढे चांगले दिवस येतील अशी तीव्र इच्छा आहे. आणि असा आशावाद ज्योतिष दाखवते. ते पूर्ण चुकीचे आहे असे आपण म्हणू शकत नाही. भविष्य सांगण्याची पद्धत ही किती तरी वर्ष असलेल्या अनुभवावर अवलंबून आहेत . भविष्य कसे सांगितले जाते ते सुद्धा करा असे म्हणता येणार नाही . मुळात हे पारंपरिक ज्ञान आहे हळदी चा वापर,कडू निंबाचा वापर,शिकेकाई च वापर हा अनेक वर्ष चालू आहे फक्त अनुभव वर च ते ज्ञान आहे. त्याची शास्त्रीय कारणे लोकांना माहीत नव्हती फक्त प्रयोग आणि अनुभव ह्या वरच पारंपरिक ज्ञान अवलंबून आहे . हळदी मध्ये कोणते घटक असतात,कडू निंबत कोणते घडक असतात ते कसे परिणाम करतात हे सांगता येत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चौकस२१२ Wed, 09/23/2020 - 12:52 नवीन
हळदी चा वापर,कडू निंबाचा वापर,शिकेकाई च वापर हा अनेक वर्ष चालू आहे हो बरोबर पण मग आधुनिक रसायन शास्त्र उपलब्ध असताना त्यातील घटक का / ते का होते आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवावे / त्याचे उत्पादन कसे करावे - त्यात मात्रा चुकली तर औषध पेक्षा मारक असे होऊ शकते का/ वैगरे सगळे पडताळता येत आहे तर मग त्याला विरोध का? का कारण एकतर कष्ट घ्यायला नकोत किंवा आत्ता पर्यंत केलेले दावे जर खोटे निघाले तर? आपले दुकान बंद होईल म्हणून .. पण हे मान्य कोणी करणार नाही/// "आमच्या परंपरेला' प्रश्न कसे विचारता असे उर बडवणे ( आणि त्यातून प्रश्न विचारणारा जर भारताबाहेरील असेल तर काय त्याच्या प्रशांत धुडकावून देणे सोप्पे) साधी हळद घ्या तिने रक्तस्त्राव थांबतो ( भौतिक गुण) आणि जखमेततीळ जंतू मरतात ( रासायनिक गुण ) याची प्रयोगशाळेत चाचणी करणे अवघड आहे का ? तसेच ज्योतिषाचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
स
संजय क्षीरसागर Wed, 09/23/2020 - 12:42 नवीन
१.
एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर आलं ही मानसिकता ज्योतिषांनीच रूजविली आहे
हीच ती उल्लू बनवण्याची नामी ट्रीक ! असे पपलू जातक मग वेडगळासारखे त्या ज्योतिषाची भारंभार जाहिरात करतात. परिणामी त्याचा धंदा फोफवतो. पूर्वी १० मधला १ मटका बसत असेल तर आता हजारातले १०० मटके बसायला लागतात. जेवढा सॅम्पल साइज मोठा तेवढे न्यूमरिकल उल्लू वाढतात. ते अगदी जागृत देवस्थान निर्माण करण्यासारखं आहे. त्याचू मंडळी आधी हूल उठवून देतात आणि महात्याचू मग रांगा लावायला लागतात ! संकेतस्थळावर आता चाललेला प्रकार म्हणजे वरील रिअ‍ॅलिटी शोचा ऑनलाईन नमुना आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे मुळात किती बावळट असतात ते बघा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
क
कोहंसोहं१० गुरुवार, 09/24/2020 - 19:32 नवीन
एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते >>>>>>>> आणि एखाद्याची बरीचशी भाकिते बरोबर येत असतील तर? तुम्ही वर सांगितले की तुम्ही २ चांगल्या ज्योतिषांना ओळखता तर तुम्हाला त्यांची अचूकता कदाचित ठाऊक असेलही. इतरही ज्योतिषी तुम्हास ठाऊक असतीलही जे बरेचसे निष्णात आहेत. माझे एवढेच म्हणणे आहे अशी अनेक भाकिते जी उगाच फेकून बरोबर येऊ शकत नाहीत ती कशामुळे बरोबर येतात याचा विचार व्हायला पाहिजे. उगाच १० मूर्ख ज्योतिषांची भाकिते चुकली म्हणून ज्योतिषशास्त्रालाच खोटे म्हणणे ही अज्ञानता झाली. शिकलेसवरलेले लोकही पुरेश्या खोलात न जात पुरोगामी झेंडा हातात घेऊन काहीही माहिती नसताना अनुभव घेतला नसताना हे खोटे ते खोटे म्हणत फिरतात तेंव्हा ते झाले पढतमूर्ख. जगात पढतमूर्खांची कमी नाही. संशोधक वृत्तीची मात्र अत्यंत कमी आहे. पण विरोधाभास म्हणजे हेच पढतमूर्ख संशोधक वृत्ती अंगी बाळगण्याऐवजी विज्ञानाचे सर्वात महत्वाचे अंग - 'तपासून पाहणे' हे सोयीस्कररीत्या विसरून न पटणाऱ्या गोष्टी नाकारत स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणत फिरत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चौकस२१२ Fri, 09/25/2020 - 03:53 नवीन
शिकलेसवरलेले लोकही पुरेश्या खोलात न जात पुरोगामी झेंडा हातात घेऊन काहीही माहिती नसताना अनुभव घेतला नसताना हे खोटे ते खोटे म्हणत फिरतात तेंव्हा ते झाले पढतमूर्ख. "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर" अश्या प्रकारची आव्हाने "ज्योतिष बिझिनेस " वाल्यांना अनेकदा दिली गेली आहेत ( अनिस एक उदाहरण) दुसरा मुद्दा अगदी साधी वस्तुस्थिती जगात कोट्यवधी लोक "ज्योसिथ" वैगरे चाय भानगडीत पडत नाही त्या कडे चुकून सुधाच त्यापाकडे पाहत नाहीत... काय झालाय त्यांचा? जे सगळ्यांचा होता तेच ना चांगला / वाईट हा प्रश्न पूर्व आणि पश्चिम यातील विचारसरणीच्या दृष्टीने उलगडता येईल पूर्व: आधी विश्वास ठेव मग अनुभव पश्चिम : आधी सिद्ध कर मग विश्वास ठेवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
च
चौकस२१२ Wed, 09/23/2020 - 13:56 नवीन
एक अनुभव सांगतो... हा ज्योतिषाचे भाकीत खरे निघले किंवा नाही याबद्दल नसून तर त्याच्या "नीति /जबाबदारी " बद्दल आहे - आयुष्यात काही वयक्तिक कठीण अडचणीतून जात होतो ( सन्यान असताना ) .. घरच्यांना काळजी होती आणि मला या "ज्योतिष / गुरु या वाटेला अजिबात जायचे नाही " हे माहित असून सुद्धा काळजी पोटी नात्यातील दोघांनी सुचवले कि मी अमुक व्यक्तीला भेटावे ... मी तयार नवहतो पण दोन अटींवर तयार झालो १) मी येत आहे हे केवळ तुम्हाला माझ्याबद्दल जे प्रेम आहे त्याचा मान म्हणून हे लक्षात घ्या २) मी मला पाहिजे ते प्रश्न त्या ज्योतिषाला विचारणार चालले का? नातेवाईक तयार झाले आम्ही गेलो... डॉक्टर कडे असावे तशी रचना होती ... आमचा "नंबर" लागला... हो ज्योतिषी सभ्य आणि शिकलेलं होता वरकरणी तरी पैसे नको होते त्याला ( आतून रचना अशी होती कि "कन्सल्ट" झाल्यावर अतलया खोलीत त्यांचं गुरुन्नआ एकदा नमस्कार करा सांगायचे.. मग आपसूक आत गेलेले लोक पैसे ठेवणार.. पण त्यापेक्षा कोण्ही व्यासायिक जसा मोबदला घेतो तसा घ्या ना? आणि जे अगदी गरीब आहेत त्यांना फुकट सेवा द्या पाहिजे तर" असो हा मुद्दा बाजूल ठेवू " केस पेपर ( पत्रिका वगैरे ) होती त्यानं पाहिजे त्या "फॉरमॅट" मध्ये - त्यांनी जे काही सांगतेल त्यात मला काही फार अर्थ वाटलं नाही पण मी त्यांना २ प्रश्न विचारले तो संवाद असा मी: आधीच सांगतो मला यावर विश्वास नाही आणि मला काही आधी प्रश्न विचारायचे आहेत चेले का ते: विचार मी: या "कन्सल्ट" नंतर चे आपले उत्तरदायित्व ( जबाबदारी) काय? ते: म्हणजे? तुम्हाला काय काही ग्यारंटी अपेक्षित आहे का? मी: नाही हो अहो डॉक्टर सुद्धा अशी ग्वाही देत नाही आणि मी/ बहुतेक त्यानाच असे विचारीत नाही मग तुम्हाला कशी विचारेन अशी ग्वाही ?.. जबाबदारी या अर्थाने कि - तुम्ही सांगितलेल्या "उपाया" mule जर "अपाय" झाला/ त्याचं उपायात हलगर्जी पणा दिसला तर एक ग्राहक म्हणून जसे मी डॉक्टर किंवा घर बांधणाऱ्या स्थापत्य तांत्रिकाला जाब विचारून न्यायालयात नेऊ शकतो तसे या " वयसाय - शास्त्राचा प्रचार आणि आणि उपलब्ध करून देणार्यांविरिध" अशी काहीच सोया नाही ! आता आठवत नाही नक्की पण त्यांनी अशीच काही तरी वेळ मारून देणारे उत्तर दिले ( हुशार होते ) शेवटी विश्वास वैगरे ( म्हणजे परत तेच पुंगी वाजली तर ज्योतिष भारी नाही वाजली तर तुमचा विश्वास नाही वैग्रे.. म्हणजे "अमुक बाबा सांगतात ते करा प्रश्न विचारू नका असेच" तेवहा त्या गावाचा रास्ता ना विचारलेलाच बरा मुन्नाभाई munnabhai mbbs ज्योतिष बटुक आणि मुन्ना यांचाच प्रसंग तुनळीवर बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० गुरुवार, 09/24/2020 - 19:11 नवीन
अजुनही माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. "ज्योतिष हा फक्त अंदाजे फेकलेल्या प्रोबॅबिलिटीचा खेळ असेल तर काही उत्तम ज्योतिषांची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आणि अचूक कशी (वर नमूद केल्याप्रमाणे काही प्रश्नांमध्ये मिळणारी उत्तरे अगदी मिनिटामध्ये बरोबर आली आहेत)? कितीही फेकंफाक केली तरी इतके अचूक तेही बऱ्याचदा येणे जवळपास अशक्य आहे. मग ते कसे होत असावे?" काहीतरी तथ्य असलेच पाहिजे. काहीही फेकून अशी उत्तरे बरोबर देता येत नाहीत (वर प्रतिसादात काही उदाहराखाल लिंक दिल्या आहेत). फक्त ते कसे काम करते याची डिटेल माहिती आपल्याला ठाऊक नाही एवढेच. राहिला प्रश्न ज्योतिषांच्या चुकीच्या भाकितांचा तर त्यासाठी ज्योतिषशास्त्राला जबाबदार धरून किंवा खोटे म्हणून चालणार नाही. निष्णात ज्योतिषी अतिशय कमी आहेत आणि त्यांची अनेक भाकिते बरोबर येतात आणि तेवढी अचूकता फेकून मिळणे शक्य नाही. अभावाने चांगले ज्योतिषी असणे आणि तो सापडणे दुर्मिळ, पण फसवाफसवी वाले जास्त म्हणून अनुभव न घेता शास्त्राविषयी जाण नसताना आणि संशोधन न करताच ज्योतिषशास्त्राला फेक म्हणणारे पढतमूर्खच.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे गुरुवार, 09/24/2020 - 19:29 नवीन
अनिसचे अचूक भविष्य वर्तविन्याचे २१ लाखाचे बक्षिस घ्यायला जगातील एकहीजण अद्याप पूढे आलेला नाही ह्यातच सर्व काही आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Fri, 09/25/2020 - 04:59 नवीन
आव्हान घेतले नाही म्हणून शास्त्र खोटे कसे ठरेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे
च
चौकस२१२ Fri, 09/25/2020 - 06:51 नवीन
आव्हान घेतले नाही म्हणून शास्त्र खोटे कसे ठरेल? हा सगळा शब्दांचा खेळ खेळताय ... मग घ्या ना आव्हान? उद्या जर मी म्हणलं कि माझ्य नवीन शास्त्रा प्रमाणे " गुरुत्वाकर्षण नाहीच" तर मला ते सिद्ध करावे लागेल वेगवेगळ्या कसोट्यातून जावे लागेल तेव्हा कुठे माझे हे नवीन म्हणणं शास्त्र म्हणून संमत होईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा