Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

OTT वरील पाहण्याजोग्या सिरीज /चित्रपट

म
महासंग्राम
Mon, 10/19/2020 - 08:29
💬 66 प्रतिसाद
लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल. SCAM 1992: The Harshad Mehta Story - SONY LIV : हर्षद मेहता हे नाव माहिती नाही असं होवूच शकत नाही. भारतात उदारीकरण सुरु होण्याच्या काळात झालेल्या त्याकाळातल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयीची हि सिरीज. दहा भागांच्या या सिरीज मध्ये शेयर बाजारातल्या अनेक किचकट गोष्टी यात सोप्या पद्धतीने सांगितल्या आहे. प्रतीक गांधी ने हर्षद मेहताची भूमिका मस्त केलीये. सर्वात भारी बोनस म्हणजे रजत कपूर, त्याची भूमिका अगदी थोडी असली तरी त्याचं काम अगदी कडक झालाय. Modern Love - अमेझॉन प्राईम : न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मॉडर्न लव नावाचा एक कॉलम यायचा त्यात लोकांना आलेले प्रेमाचे वेगवेगळे अनुभव व्यक्त केलेले असायचे. प्राईमने त्याच कॉलम वर आधारित सिरीज बनवली मॉडर्न लव. प्रेमात आलेले अपयश, चाळीशी पार केलेल्या कपल मधले वादविवाद. चुकलेली डेट, डेटिंग ऍप द्वारे भेटलेलं प्रेम, निशब्द साथ करणारी मैत्री, गे पालकत्व अश्या वेगगेगळ्या विषयांवरच्या ८ स्टोरीज यात सामावलेल्या आहेत. टेलिव्हिजन सिरीज असली तरी यात अने/एना हॅथवे, मॉरीयार्टी वाला अँड्रयू स्कॉट, आपला घरचा देव पटेल सारखे बरेच चांगले कलाकार यात आहेत. अगदी हलकीफुलकी असलेली सिरीज तुमचा मूड एकदम फ्रेश करते. Eat. Race. Win. -अमेझॉन प्राईम : खाणं आणि खिलवण हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग ते साधं घरच जेवण असो कि टूर डी फ्रांस सारख्या रेस मधल्या स्पर्धकांसाठी बनवलेलं असो ते सारख्याच निगुतीने बनवावं लागतं. इट रेस विन हि Orica-Scott या ऑस्ट्रेलियन प्रो सायकलिंग टिम च्या टूर डि फ्रान्स रेस मधल्या स्पर्धकांसाठी कसं जेवण बनवलं जाते, स्पर्धकांचा परफॉर्मन्स वाढावा यासाठी जेवण बनवतांनाची प्रोसेस यात खूप सुंदरपणे दाखवली आहे. Putham Pudhu Kaalai अमेझॉन प्राईम : लॉकडाऊन सर्वांसाठीच त्रासदायक होता, त्याचा आपल्या सर्वांच्या मनावर नकळतपणे का होईना पण परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच काळानंतर कुटुंब एकत्र आली असं म्हणता येईल. प्राईम वर या लॉकडाऊन आणि मानवी नातेसंबंध यावर आधारित वेगवेगळ्या कथा असणारी तामिळ फिल्म रिलीज झाली. विशेष म्हणजे स्व. एस पी बालसुब्रमण्यम यांचं योगदान असलेला हा शेवटचा चित्रपट. The Crown नेटफ्लिक्स : इंग्लंडची राणी एलिझाबेथ उर्फ आज्जीबाई कोणाला माहिती नाही मी जर चुकीचा नसेल तर सर्वात जास्त काळ इंग्लंडवर राज्य करणारी एलिझाबेथ हिची हि गोष्ट गोष्ट. खरंतर बारकाव्यांसहित एखाद्या राजघराण्याबद्दल ०३ सिझन मध्ये मांडायचं जरा कठीणच काम पण या सिरीज मध्ये अगदी जबदस्त दाखवलं आहे. राजघराण्याच्या प्रथा, डामडौल, लॉर्ड माऊंटबॅटन, विन्स्टन चर्चिल पाहतांना आपण नकळत त्याकाळात जातो. Rise of Empires: Ottoman नेटफ्लिक्स : कॉन्टॅन्टिनोपलचा पाडाव इतिहासातली महत्वाची घटना. या घटनेवर आधारित नेटफ्लिक्स ची हि मिनी सिरीज आपल्याला श्वास रोखून ठेवायला भाग पाडते. सिरीज फक्त ६ भागांची जरी असली तरी निर्मितीमुल्यांत कुठेही तडजोड केली नाहीये. विशेष म्हणजे याची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तुम्हांला इतिहास आवडत असेल तर नक्की पहा आणि आवडत नसेल तरी पहा कारण त्यातली गुंतागुंत अगदी सरळ करून सांगितली आहे.

प्रतिक्रिया द्या
33382 वाचन

💬 प्रतिसाद (66)
प
प्रचेतस Tue, 10/20/2020 - 05:39 नवीन
नुकतीच नेटफ्लिक्सवर नार्कोस पाहून संपवली. जबरदस्त आहे. पहिले दोन सीजन पाब्लो एस्कोबार आणि त्याच्या मेंडेलिन कार्टेलवर आधारीत आहेत. तर शेवटचा सीजन काली कार्टेलवर बेतलेला आहे. तुफान आहे सिरिज. आता नार्कोस मेक्सिको सुरु करेन. काल डेयरडेव्हिल सुरु केली. पहिला भाग बघून झाला. जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 10/20/2020 - 07:50 नवीन
आरॉन (मराठी ) : prime v. शशांक केतकर, नेहा जोशी छान कथानक. कोकण ते Paris व्याप्ती. आई-मुलगा-काका व काकू यांतील भावनिक बंध छान.
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Tue, 10/20/2020 - 11:09 नवीन
१. द हेड (हॉटस्टार) - अन्टार्टिका मध्ये घडलेल्या शास्त्रज्ञांच्या हत्याकांडाबद्दल ६ भागांची मालिका २. द अमेरिकन्स (हॉटस्टार) - शीत युद्ध काळात सोव्हिएत युनियन चे गुप्तहेर १७-१८ वर्षांपासुन अमेरिकेत आहेत, त्यांच्या घरासमोर एक एफ.बी.आय. एजंट रहायला येतो. ८० च्या दशकातला प्लॉट आहे ३. होमलँड (हॉटस्टार) - एका अतिहुशार पण ईमोशनल सी.आय.ए. एजंटची कहाणी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/20/2020 - 11:20 नवीन
होमलँड मस्त आहे एकदम. रियलास्टिक आहे एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु
म
महासंग्राम Tue, 10/20/2020 - 11:35 नवीन
वाह वाह आजच डाऊनलोडतो बाकी शी आय ए एजन्ट वर बर्लिन स्टेशन म्हणून ०३ सिझनची सिरीज पण भारी आहे आपल्याइकडे प्रदर्शित झाली नाही मला टेग्रा वर सापडली होती. ती पण रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु
प
प्रदीप Mon, 12/21/2020 - 08:11 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे ओटीटी स्ट्रीम डाऊनलोडता येत नाही. चूक असेल तर तसे सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Mon, 12/21/2020 - 09:07 नवीन
इन ऍप डाउनलोड करून ठेवता येतं, नंतर ऑफलाईन ला पाहता येतं पण ते आपल्या मोबाईलवर, संगणकावर काही प्रयत्न केला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Mon, 12/21/2020 - 11:30 नवीन
ह्या अ‍ॅपविषयी जरा सविस्तर माहिती द्याल का? "पण ते आपल्या मोबाईलवर, संगणकावर काही प्रयत्न केला नाही.." हे समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
M
mayu4u Tue, 10/20/2020 - 12:01 नवीन
द स्पाय चेर्नोबिल अनबिलिवेबल द एक्स्पान्स मॅन इन हाय कॅसल बॉडीगार्ड एलिमेन्ट्री
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 10/20/2020 - 14:38 नवीन
नेटफ्लिक्स- बोजॅक होर्समन- (६ सिझन) वाईल्ड वाईल्ड कंट्री-(ओशोच्या ओरेगॉन आश्रमाची डॉक्युमेंटरी) ब्लॅक मिरर - सायन्स फिक्शन, प्रत्येक एपिसोड वेगळी कथा (५ सिझन, पहिले ४ उत्तम.) लव, डेथ अँड रोबोट्स- सायन्स फिक्शन, प्रत्येक एपिसोड वेगळी कथा, वेगळ्या प्रकारच्या ऍनिमेशनमध्ये. डार्क- टाईम ट्रॅव्हल. (३ सिझन, पहिला सिझन पाहिलाय, आवडला.) द किंग - हेन्री पाचवा, ब्रिटनच्या राजाची गोष्ट. कासल्व्हानिया- ऍनिमे सिरीज. adult swim- रिक अँड मॉर्टी - विक्षिप्त शास्त्रज्ञ रिक सांचेझ आणि त्याचा नातू मॉर्टी स्मिथ यांचे भन्नाट किस्से. (ऍनिमेटेड) इतर- वेस्टवर्ल्ड (भविष्यातल्या अम्युसमेंट पार्कमधली कथा.) चर्नोबिल - दोन्ही एचबिओ एएमसीचे ब्रेकिंग बॅड- कॅन्सरग्रस्त प्रोफेसर एका विद्यार्थ्याला घेऊन मेथेंफेटामाइन बनवू लागतो.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 10/21/2020 - 17:17 नवीन
Modern Love The Crown Scam1992 The Head The American The Homeland यांची नोंद घेतली आहे. पहिले तीन कुठे डाऊनलोड मिळाले तर बरं. कदाचित telegram var असतील. हॉट स्टार मार्च मध्ये घेऊन ठेवलंय. अजुन तानाजी सोडून काही बघितलं नाही. उगाच वायला चाललंय. हेड, अमेरिकन अन होमलँड बघतो आता. आज अल्ट बालाजी वर देव DD सुरुवात केली, पण दुसरा एपिसोड बघताना पैसे मागितले. कदाचित फुकटात दिवसाला एकच बघता येत असेल. उद्या दुसरा भाग दिसला तर ठीक. नाहीतर तीन महिन्याचे १०० द्यायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 10/22/2020 - 08:13 नवीन
Modern Love The Crown Scam199२ आहेत टेग्रा वर, crown तर कैच्याकै जब्राट आहे अजून एक नवीन सिरीज आली आहे एमिली इन पॅरिस कालच डाऊनलोडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Mon, 11/02/2020 - 03:25 नवीन
मागच्या आठवड्यात पाहिली. रोज एकच तास पाहता येतं, बसमध्ये. उत्तम सिरीज आहे. खिळवून ठेवते. आपल्याला फक्त हर्षद मेहता ने शेअर बाजारात घोटाळा केला एवढंच माहिती असतं. पण त्याच्या आधी, त्याच्या पार्श्वभूमी वर कायकाय घडलं याचे बऱ्यापैकी डिटेल्स पाहायला मिळतात. काही पात्रांसाठी अभिनेत्यांची निवड इतकी झकास आहे की लगेच कळतं की हे कोण पात्र आहे. आजकाल वेबसिरिज चं व्यवच्छेदक लक्षण असलेले सेक्स, हिंसा वा शिव्यांची लाखोली असलेले संवाद यात येत नाहीत, ही जमेची बाजू. (अपवाद पात्राची गरज म्हणून सतीश कौशिक च्या तोंडी असलेल्या चार सहा शिव्या).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
च
चौथा कोनाडा Tue, 11/03/2020 - 08:12 नवीन

+१

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
व
वीणा३ Wed, 10/21/2020 - 18:31 नवीन
नेटफ्लिक्स वरच्या आवडलेल्या मालिका : १. अम्ब्रेला अकॅडमी - जब्बरदस्त मालिका, टाइम ट्रॅव्हल आणि सुपरहिरो आणि झकास पार्श्वसंगीत. २ सीझन्स आहेत, दोन्ही उत्तम. २. हाऊस ऑफ कार्ड्स - अमेरिकन राजकारणावर आधारित फिकशन (सत्यकथा नाहीये बहुतेक). मस्त अभिनय आणि संवाद. ३. ऍनिमल प्लॅनेट, डाँसिन्ग विथ बर्डस, द युनिव्हर्स - मस्त चित्रीकरण आणि निवेदन ४. सेक्रेड गेम्स - नवाज आणि अनुराग कश्यप ची मालिका. भरपूर शिव्या, पण पहिला भाग आवडला, धक्कातंत्र छान होत. दुसऱ्या भागात कंटाळा आला. ५. आउटलँडर - नायिका १९ व्य शतकातून १७व्य शतकात जाते. ह्याचा पण पहिला भाग आवडला, दुसऱ्यात कंटाळा आला.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 10/22/2020 - 08:18 नवीन
हाऊस ऑफ कार्ड्स मला पण आवडली होती, पण शेवटचा सिझन गंडला होता केविन स्पेसी नसल्याने. बहुदा अमेरिकेत तशी पद्धतच असावी. HOC तोडीस तोड म्हणजे डेसिग्नेटेड सर्व्हायवर ती पण अमेरिकन राजकारणावर आहे. YOU चे सिझन पण भारी आहेत विक्षिप्त प्रेमिकाची कथा डॉक्युमेंट्री मध्ये सोशल डिलेमा /डायलेमा पण सध्या चर्चेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
स
साबु गुरुवार, 10/22/2020 - 11:35 नवीन
GOT - HBO Dexter Person of interest - HBO White collar - Netflix Prison break - Netflix Sherlock - Netflix Luther - Netflix Good detective - HBO Walking dead - Dr house - Prime Black Orphan - Netflix Lock and Key - Netflix Black List - Netflix Outlander - Netflix Stranger Things - Netflix Money Heist - Netflix Homeland - Netflix Good wife - Prime Good Fight - Prime Black Mirror - Netflix Wanted - Netflix
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन गुरुवार, 10/22/2020 - 12:00 नवीन
पुढचा भाग इतुय म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साबु
अ
अमर विश्वास गुरुवार, 10/22/2020 - 12:35 नवीन
Netflix House of Cards Designated Survival Ozark 13 Reasons why Line of Duty Marcella
  • Log in or register to post comments
U
Ujjwal गुरुवार, 10/22/2020 - 20:06 नवीन
स्कॅम 1992 (Sony Liv) हर्षद मेहता
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 10/23/2020 - 07:55 नवीन
काल रात्री मिर्झापूर २पाहून संपवली ओके ओके टाईप आहे. ठरलेल्या वेळेच्या ०३ तास आधी रिलीज केली प्राईम ने सिरीज बहुदा टेलिग्राम वर लीक झाली असावी
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 10/23/2020 - 08:36 नवीन
सेम हिअर. मी ही कालच पाहुन संपविली. पहिल्या सिझन इतकी पकड घेणारी नाही वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Fri, 10/23/2020 - 10:56 नवीन
पण शेवटात माती खाल्ली नाही हे बरं केलं. नाहीतर हॉलिवूड वाल्यांचा कित्ता गिरवत GOT आणि HOC सारखा बकवास शेवट केला नाही हे बरं झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
म
महासंग्राम Sat, 10/31/2020 - 05:39 नवीन
काल कोजगरी च्या मुहूर्तावर एमिली इन द पॅरिस हि नेटफ्लिक्स ची मिनी सिरीज संपवली. शिकागो मध्ये वाढलेल्या पूर्णपणे अमेरिकन असलेल्या फ्रेंच भाषेचा गंध हि नसणाऱ्या एमिलीला शेवटच्या क्षणी पॅरिसला जाऊन एका मार्केटिंग कंपनीचं सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येते. तिथे वर्षभराच्या कालखंडात एमिलीच्या आयुष्यात येणार चढउतार सिरीज मध्ये दाखवले आहेत. फ्रेंच लोक इंग्रजी भाषेचा किती दुस्वास करतात हे जगजाहीरच आहे. त्या पार्श्ववभूमीवर सिरीज मध्ये वेळोवेळी इंग्रजीला कमी लेखून टोमणे मारले आहेत. व्हॉट हॅपन्ड इन पॅरिस स्टेज इन पॅरिस या म्हणीला जागणारी हि शॉर्ट आणि स्वीट सिरीज नक्कीच पाहणेबल आहे.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 11/23/2020 - 05:53 नवीन
क्राऊन चा नवीन सिझन भन्नाट केलाय. या वेळेस ८० च्या दशकातल्या मार्गारेट थॅचर, प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना, कॅमीला पार्कर आणि अर्थात थेरड्या आजीबाई यांचा कालखंड आहे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 11/23/2020 - 13:59 नवीन
Netflix var आहे अनुराग बसू दिग्दर्शित. अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख. चार समांतर कथा. ब्लॅक कॉमेडी. IMDB 7.6
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 11/24/2020 - 07:41 नवीन
ल्युडो जबरदस्त केलाय. अभिषेक बच्चन खास आवडलाय त्यातला. युवा मधल्या लल्लन ची आठवण करून देतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
स
सोत्रि Tue, 11/24/2020 - 11:00 नवीन
हेच म्हणतो! -(युवामधला अभिषेक आवडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
र
रंगीला रतन Tue, 11/24/2020 - 07:48 नवीन
मिर्झापूर २ चे दोन भाग बघितले. नंतरचे बघायला वेळ नाही मिळाला :(
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/11/2020 - 12:14 नवीन
वेब सिरीजचा मी काही असा चाहता नाही...पण ’ SCAM 1992’ वेड लागल्यासारखी सलग दोन-अडीच दिवसात संपवली, गुंतवून ठेवणारं कथानक असल्यामुळे आणि कलाकारांच्या सहज अभिनयांनी ’हर्षद मेहता’ उलगडत गेला. एखाद्या खलनायकाबद्दल सहानुभूती वाटावी असे वाटून गेले. व्यवस्थेला कसे खपवता येते त्याचं उत्तम कथानक. मस्त मजा आली. धन्स. असेच खिळवून ठेवणारे काही आले तर धाग्यात डकवावे ही नम्र विनंती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 12/11/2020 - 12:23 नवीन
>>>’हर्षद मेहता’ उलगडत गेला>>> आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे इकोनॉमिक्सचे सर आम्हाला हर्षद मेहता बद्दल आवर्जून सांगायचे. जुनाट किडक्या यंत्रणेतील लूप होल्स शोधून या माणसाने कसा घोटाळा केला ती कहाणी अजून आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह
हेमंतकुमार Fri, 12/11/2020 - 13:40 नवीन
Sound of Metal हा प्राईमवरचा आवडला. बहिरेपणा आलेला ड्रमर कलाकार हा नायक. बहिऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन, शिक्षण छान दाखवले आहे. त्या सहजीवनातून ‘आपल्यात काही न्यून आहे” ही भावना विसरते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 12/11/2020 - 15:26 नवीन
गेल्या आठवड्यात पाहिली. मस्त आहे. अल्ट बालाजी वर आहे. (मी टेलिग्रामवर पाहिली). दिव्येंदू शर्मा चा नायक एकदम मस्त. इन्स्पेक्टर निकुंज तिवारी झालेला झिशन काद्री कौतुकास्पद. स्टोरी वेडी वाकडी, कधी अपेक्षित कधी अनपेक्षित वळणे घेत जाणारी. 18-२० मिनिटांचे नऊ भाग. उल्लेखनीय वाराणसी चं चित्रीकरण आणि तिथली संस्कृत प्रचुर गोड हिंदी.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 12/16/2020 - 18:11 नवीन
द मॅण्डलोरियन सुरू केली. स्टार वॉर्स फ्रँचाईझीमधील आहे. जबरी आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/17/2020 - 11:29 नवीन
काही मिपाकरांमुळे She सीरीज चे दोन भाग पाहिले. माझ्या पिढीने सिनेमातलं चुंबन म्हणजे, दोन फुलांना एकमेकांना चिकटलेले पाहणे अशी तोंडओळख असलेल्यांनी 'शी' सारखे एवढे 'बोल्ड' सीन पाहणे म्हणजे लैच कठीण काम होतं. अशा मालिकांमधील स्त्रीया असेही काम करतात असे वाटून गेले. मालिकांमधील संवाद, काही शिव्या तर इअरबड्स मधूनही बाहेर पडणार नाही ना याची भिती वाटत होती. आता तिसरा भाग बघायला 'कथानक' पाहता काही हिंमत होत नाही. पेंडींग ठेवतो. आपले मिपाकर काहीही बघायला शिफारस करतात. (कुठे फेडाल रे हे सर्व ) बाकी, अ‍ॅक्शन, थरार, पकडले, सुटले, अशा टाइप्सचे काही असेल तर सुचवा. स्कॅम १९९२ सारखं असल्यास प्राधान्य... आता त्या मिपाकर मित्रांनी प्रिझन ब्रेक, डेक्स्टर असे सुचवले आहे, आता माझ्यासमोर अजून काय वाढवून ठेवले असेल काय माहिती. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 12/17/2020 - 12:19 नवीन
प्रा डॉ साहेब, लुडो आणि बिच्छु का खेल बघा. तुम्हाला नक्की आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/17/2020 - 12:33 नवीन
लुडो आणि बिच्छु का खेल बघा. तुम्हाला नक्की आवडतील.
ओके...बघतो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/03/2021 - 07:04 नवीन
बीच्छु का खेल पण मस्त. शेवट अजून हटके पाहिजे होता असे वाटत होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
महासंग्राम Mon, 12/21/2020 - 07:43 नवीन
पंचायत बघा तुमची पंचाईत नक्की होणार नाही याची खात्री एकदम फुल्ल फॅमिली सिरीज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/23/2020 - 13:17 नवीन
पंचायतचा पहिला भाग पाहिला, नितांत सुदंर छायाचित्रण आणि विषय ही स्वदेश टाइप असावा असे वाटले. पहिला भाग आवडला. धन्स....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/23/2020 - 17:42 नवीन
वाह ! छोटीशी गोष्ट अतिशय सुंदर चितारली आहे, यावर एक स्वतंत्र लेखन करावे असे वाटले. मजा आली. पंचायत सुचवणा-या मित्रांचे तहेदिलसे शुक्रिया...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कपिलमुनी Mon, 12/21/2020 - 18:50 नवीन
पंचायत बघाच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
महासंग्राम Mon, 12/21/2020 - 07:45 नवीन
कोल्डवॉर आणि स्पाय आवडत असेल तर नेटफ्लिक्स वरचा द कोल्डेस्ट गेम पहा. वन टाईम वॉच आहे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 12/23/2020 - 12:05 नवीन
क्रिमिनल जस्टीसचा दुसरा भाग येतोय, तो बघणार ! पहिला भाग थोडा बोर (विशेषतः तुरुंगातील वर्चस्व तपशिल) झाला. १० एपिसोड भागाचे ७ किंवा ८ भाग केले असते तरी चालले असते. पंकज त्रिपाठीचा अतिकॅज्युअलपणा काही वेळा वैताग देतो. जॅकी श्रॉफचा घुमणारा खर्ज आवाज या मुळे काही वेळा संवाद समजून येत नाहीत. अभिनय आणि इतर अंगे उत्तमच !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/03/2021 - 07:01 नवीन
हल्लीच पाहिलेल्या वेब सिरिज / चित्रपट इथे देतो ! आश्रम [ सिझन १ आणि २ ] [ बोलो काशीपुरवाले बाबा की जय , गरीबो वाले बाबा की जय, नसीबों वाले बाबा की जय हो ] याच्यात बबीता [ त्रिधा चौधरी ] हीने अगदी तन-मन लावुन काम केलेलं आहे ! :))) दरबान :- रायचरण या व्यक्तिरेखेचे चे काम पाहण्या सारखे आहे. Criminal Justice Behind Closed Doors :- या वेब सिरीज चे ४ भाग बघुन झालेत, बाकीचे पहायचे आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 01/03/2021 - 09:04 नवीन
सध्या सुपरनॅचरल सुरू केलीय. टीपी आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/03/2021 - 09:29 नवीन
मिर्च छान आहे. पंचतंत्रातील कथेवर आधारित चार कथांचा एकत्र समूह छान कलाकार वगैरे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/26/2021 - 06:06 नवीन
ओटीटी पर्यायांपैकी माझ्याकडे फक्त प्राईम व्हिडिओ गेली तीन वर्षे आहे. पहिले दोन वर्ष मी समाधानी होतो. आता अलीकडे त्यांनी वार्षिक वर्गण मध्ये जे बघायला मिळते त्याच्यावर नियंत्रण आणले आहे आणि बऱ्याच अतिरिक्त पैसे देऊन बघायच्या गोष्टींची ते जाहिरात करीत आहेत. या डिसेंबर पासून ते वार्षिक वर्गणी पाचशे रुपयांनी वाढवत आहेत. माझ्या मनात एक असा विचार आला आहे, की प्राईम बंद करून यूट्यूब प्रीमियम घेऊन बघावे का ? अनुभवी व्यक्तींनी सल्ला द्यावा. मला अद्याप त्याचा अनुभव नाही
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 11/26/2021 - 15:54 नवीन
प्राईम वरिल मल्याळम चित्रपट पाहून झाले असतील तर नेटफ्लिक्स घ्या. यु ट्यूब प्रिमिअम चा अनुभव नाही. https://pi-hole.net/ कुणी ऍड-ब्लॉक करण्यासाठी वापरले आहे का ? मला यु ट्यूब आणि हुलू वरील ऍड-ब्लॉक करण्यासाठी सुचवले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/26/2021 - 16:56 नवीन
नेटफ्लिक्स डेबिट पद्धतीने पैसे घेत नसल्याने मला रस नाही. यु ट्यूब प्रिमिअमच्या कोणाच्या अनुभवाची वाट पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा