Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

OTT वरील पाहण्याजोग्या सिरीज /चित्रपट

म
महासंग्राम
Mon, 10/19/2020 - 08:29
💬 66 प्रतिसाद
लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल. SCAM 1992: The Harshad Mehta Story - SONY LIV : हर्षद मेहता हे नाव माहिती नाही असं होवूच शकत नाही. भारतात उदारीकरण सुरु होण्याच्या काळात झालेल्या त्याकाळातल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयीची हि सिरीज. दहा भागांच्या या सिरीज मध्ये शेयर बाजारातल्या अनेक किचकट गोष्टी यात सोप्या पद्धतीने सांगितल्या आहे. प्रतीक गांधी ने हर्षद मेहताची भूमिका मस्त केलीये. सर्वात भारी बोनस म्हणजे रजत कपूर, त्याची भूमिका अगदी थोडी असली तरी त्याचं काम अगदी कडक झालाय. Modern Love - अमेझॉन प्राईम : न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मॉडर्न लव नावाचा एक कॉलम यायचा त्यात लोकांना आलेले प्रेमाचे वेगवेगळे अनुभव व्यक्त केलेले असायचे. प्राईमने त्याच कॉलम वर आधारित सिरीज बनवली मॉडर्न लव. प्रेमात आलेले अपयश, चाळीशी पार केलेल्या कपल मधले वादविवाद. चुकलेली डेट, डेटिंग ऍप द्वारे भेटलेलं प्रेम, निशब्द साथ करणारी मैत्री, गे पालकत्व अश्या वेगगेगळ्या विषयांवरच्या ८ स्टोरीज यात सामावलेल्या आहेत. टेलिव्हिजन सिरीज असली तरी यात अने/एना हॅथवे, मॉरीयार्टी वाला अँड्रयू स्कॉट, आपला घरचा देव पटेल सारखे बरेच चांगले कलाकार यात आहेत. अगदी हलकीफुलकी असलेली सिरीज तुमचा मूड एकदम फ्रेश करते. Eat. Race. Win. -अमेझॉन प्राईम : खाणं आणि खिलवण हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग ते साधं घरच जेवण असो कि टूर डी फ्रांस सारख्या रेस मधल्या स्पर्धकांसाठी बनवलेलं असो ते सारख्याच निगुतीने बनवावं लागतं. इट रेस विन हि Orica-Scott या ऑस्ट्रेलियन प्रो सायकलिंग टिम च्या टूर डि फ्रान्स रेस मधल्या स्पर्धकांसाठी कसं जेवण बनवलं जाते, स्पर्धकांचा परफॉर्मन्स वाढावा यासाठी जेवण बनवतांनाची प्रोसेस यात खूप सुंदरपणे दाखवली आहे. Putham Pudhu Kaalai अमेझॉन प्राईम : लॉकडाऊन सर्वांसाठीच त्रासदायक होता, त्याचा आपल्या सर्वांच्या मनावर नकळतपणे का होईना पण परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच काळानंतर कुटुंब एकत्र आली असं म्हणता येईल. प्राईम वर या लॉकडाऊन आणि मानवी नातेसंबंध यावर आधारित वेगवेगळ्या कथा असणारी तामिळ फिल्म रिलीज झाली. विशेष म्हणजे स्व. एस पी बालसुब्रमण्यम यांचं योगदान असलेला हा शेवटचा चित्रपट. The Crown नेटफ्लिक्स : इंग्लंडची राणी एलिझाबेथ उर्फ आज्जीबाई कोणाला माहिती नाही मी जर चुकीचा नसेल तर सर्वात जास्त काळ इंग्लंडवर राज्य करणारी एलिझाबेथ हिची हि गोष्ट गोष्ट. खरंतर बारकाव्यांसहित एखाद्या राजघराण्याबद्दल ०३ सिझन मध्ये मांडायचं जरा कठीणच काम पण या सिरीज मध्ये अगदी जबदस्त दाखवलं आहे. राजघराण्याच्या प्रथा, डामडौल, लॉर्ड माऊंटबॅटन, विन्स्टन चर्चिल पाहतांना आपण नकळत त्याकाळात जातो. Rise of Empires: Ottoman नेटफ्लिक्स : कॉन्टॅन्टिनोपलचा पाडाव इतिहासातली महत्वाची घटना. या घटनेवर आधारित नेटफ्लिक्स ची हि मिनी सिरीज आपल्याला श्वास रोखून ठेवायला भाग पाडते. सिरीज फक्त ६ भागांची जरी असली तरी निर्मितीमुल्यांत कुठेही तडजोड केली नाहीये. विशेष म्हणजे याची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. तुम्हांला इतिहास आवडत असेल तर नक्की पहा आणि आवडत नसेल तरी पहा कारण त्यातली गुंतागुंत अगदी सरळ करून सांगितली आहे.

प्रतिक्रिया द्या
33382 वाचन

💬 प्रतिसाद (66)
ज
जेपी Fri, 11/26/2021 - 18:46 नवीन
माझ्या कडे आहे. विना जाहिरात पाहत येते इतकाच फायदा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sat, 11/27/2021 - 04:12 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेम्स वांड Fri, 11/26/2021 - 16:16 नवीन
ती भयानक आवडली होती, नाव आहे द युनिट, डेनिस हेसबर्ट मुख्य कलाकार (सार्जंट मेजर जोनास ब्लेन) ओळखीचा चेहरा मॅक्स मार्टिनी (सार्जंट मॅक्स गेरहार्ड) द युनिट म्हणजे ५ लोकांची अतिशय जास्त स्कील्ड अन स्पेशलाईज्ड टीम असते डेल्टा फोर्स ऑपरेटर्सची, त्यांचा कमांडिंग ऑफिसर असतो कर्नल थॉमस रायन स्क्वाड लीडर असतो जोनास, जगभरात हाय रिस्क ऑपरेशन करतात, प्रसंगी सीआयएची पण वाजवतात, युनिटवर आलेली संकटे मिळून परतवून लावतात, युनिट इतके सिक्रेट असते की त्यांचे कव्हर असते लॉजीस्टिकल युनिटचे, त्यांची पर्सनल आयुष्य, नवरे जगाच्या एका कोपऱ्यात घर, पोरं अन नवऱ्याचे सिक्रेट जॉब्ज सांभाळत जगणाऱ्या त्यांच्या अमेरिकन गृहिणी बायका, अतिशय आवडली मला तरी, चार सिझनमध्ये गुंडाळली आहे सिरीज, पण जितकी बनवली तुफान बनवली आहे. Image removed. त्यांचं हे थीम म्युझिक खऱ्या कुठल्यातरी मिलिटरी पलटणीचे मार्चिंग सॉंग आहे म्हणतात बुआ, खरेखोटे देवजाणे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 11/26/2021 - 19:22 नवीन
दृष्यम २ तेलुगू पाहिला. मल्याळम आणि हा दोन्ही छान. आता हिंदी कधी येतो ते पहायचे.
  • Log in or register to post comments
D
diggi12 Fri, 07/22/2022 - 08:43 नवीन
In to the night मस्त आहे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/22/2022 - 12:15 नवीन
जपनाम जपनाम !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 07/22/2022 - 12:37 नवीन
इस्रायली वेबसिरीज फौदा (हिब्रू/ अरबी अर्थ केओस) बघण्यात आली. इस्राएल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) अंतर्गत चालणारी मिस्तारविम (मिस्त' अरवीम - अरबांत मिसळून राहणारी, ह्याचेच अरबी भाषेतील स्वरूप मुस्तारबीन) ह्या नावावरूनच लक्षात येईल अशा अंडरकव्हर युनिटची ही गोष्ट. ३ सिझन, ३६ भागात (प्रत्यल भाग ३३ मिनिटं ते ५० मिनिटं) अरब इस्राएल प्रॉब्लेम, पॅलेस्टाईन मध्ये राहणाऱ्या अरबांचे आयुष्य, कधी स्वतःहून तर कधी जुलमाने त्यांचे हमास किंवा आयडीएफला साथ देणे, हमास अन आयसिसचे आपापसातील हेवेदावे, इस्रायली मिस्तारविम युनिट्सची कार्यशैली, त्याला उत्तर देणारी हमास अन पॅलेस्टाईन ऑथोरिटीच्या चाली, मिशन्स मधली कॉम्प्लेक्सिटी दोन्ही बाजूंनी प्रसंगी जपली जाणारी माणुसकी, ज्यू लोकांबद्दल असलेली अरबांच्या मनातली अढी, अरबांबद्दल ज्युईश लोकांच्या मनात असलेले भय अन त्यातून उदभवणारी अग्रेसिव्ह डिफेन्स पॉलिसी, युनिट अंतर्गत घडामोडी, युनिट मेंबर्सची आपापसात असलेली मैत्री, त्यांचे कुटुंबीय अन त्यांना असणाऱ्या रिस्क अन त्यातून उद्भवणारा "फौदा" ह्यांचे अतिशय उत्तम अन प्रॅक्टिकल चित्रण ह्या सिरीजमध्ये पाहायला मिळेल. उपलब्धता नेटफ्लिक्स किंवा टेलिग्राम जिंदाबाद, मी आपली पैसा भरून नेटफ्लिक्सवर बघितली पोस्टर खालील प्रमाणे. Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 07/25/2022 - 16:25 नवीन
मी नेटफ्लिक्सचे सभासदत्व घेतल्यावर सर्वप्रथम हिच मालिका पाहिली होती. आवडली होती. मालिकेचे पार्श्वसंगीत अगदी हृदयाचे ठोके वाढविणारे आहे. मात्र नेटफ्लिक्स म्हणा किंवा अजून कोणताही ओटीटी मंच असो, नंतर तोच तोच पणा येतो. सध्या lionsgateplay चे एक महिन्याचे सभासदत्व घेऊन ९९ रुपयात गंमत चालू आहे. चित्रपट चांगले आहेत. मालिकांच्या वाटेला अजून गेलेलो नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
त
तर्कवादी Mon, 07/25/2022 - 13:27 नवीन
प्राईमवर DNA नावाचा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट आहे. कथानक सगळ्यांना आवडेलच असे नाही पण अतिशय नैसर्गिक अभिनय, सहज साधे संवाद आणि कुठेही भडकपणा नसलेला हा चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. नवोदित कलाकारांचा अभिनय अगदी उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 08/19/2022 - 21:45 नवीन
प्राईमवर क्रॅश कोर्स - भानू उदय नावाचा कलाकार अठरा वर्षांपूर्वी स्पेशल स्क्वाड नावाच्या मालिकेत पाहिला होता आजही अगदी तसाच्या तसाच दिसतो. मधल्या काळात मछली जल की रानी है आणि ल्यूडो या चित्रपटांध्ये देखील दिसला होता. सलग इतका काळ एकसारखं दिसत राहण्याबद्दल संतूर साबणाने याला सदिच्छादूत नेमायला हवे. असो. वेब सिरीज छान आहे. सिद्धार्थ काक वगळता इतर सर्व पात्रांना नकारात्मक छटा आहेत पण त्याला अभिनय येत नसल्याने मुख्य सकारात्मक पात्र असूनही त्याची लांबी कमी ठेवण्यात आली आहे. अन्नू कपूर आणि भानू उदय पूर्णतः डार्क शेड कॅरेक्टर्स किंवा खल भूमिकेत आहेत असे म्हणता येईल. या दोघांनी कमालीचा अभिनय केला आहे. त्यातही अन्नू कपूर जास्त उजवा म्हणता येईल. काही काळापूर्वीच होम या वेब सिरीज मध्ये त्याने न्यूनगंडाने पछाडलेलं अपयशी पात्र उभं केलं होतं आणि आता क्रॅश कोर्समध्ये चक्क अहंगडांने पछाडलेलं अतिमहत्त्वाकांक्षी अतियशस्वी आणि अहंमन्य पात्र देखील तितक्याच ताकदीने उभं केलं आहे. कोटा शहरातील कोचिंग क्लासचालक आणि विद्द्यार्थ्यांचे हे कथानक आहे. प्रचंड स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थ्यांना नैराश्य येताना दिसतं आणि त्यांच्यापैकीच कोणी आता आत्महत्त्या करु शकेल अशी लक्षणे प्रत्येक वेळी दिसत असतात (पहिल्या भागाची सुरुवातच फाशीच्या दोरीपासून होते) पण अचानकच एक दिवस असा येतो की अगदी अनपेक्षित रीत्या ज्याची कल्पनाही कोणी करु शकणार नाही असं एक पात्र आत्महत्त्या करतं आणि मालिकेला एक वेगळंच निर्णायक वळण मिळतं. फक्त २४ तासांत एखाद्या व्यक्तिचं आयुष्य इतकं बदलू शकतं? कितीही अविश्वसनीय वाटत असलं तरी वेब सिरीजमध्ये ते पटेल असं दाखविण्यात आलं आहे. स्पष्ट उल्लेख नसला तरी बहुदा मालिकेतील विद्यार्थ्यांचं वय १७ असावं. ते स्वयंचलित दुचाकी न चालविता सायकली चालविताना दाखविले आहेत त्यामुळे या शक्यतेला अजुनच पुष्टी मिळते. मात्र हे विद्यार्थी स्वयंचलित वाहन चालवित नसले तरी पडद्यावर हिंसा आणि शरीरसंबंध यांचे प्रदर्शन व मादक पदार्थांचे सेवन करताना दिसत असल्याने मालिकेची वर्गवारी प्रौढांसाठी (ए रेटिंग) झाली आहे. एवढा विरोधाभास सोडला तर बाकी मालिका उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 08/26/2022 - 09:23 नवीन
कालच बघून संपवली. सुरुवातीला बघून कोटा फॅक्टरीची आठवण आली पण नंतर सिरिज रंगतदार झाली. परिक्षण एकदम मस्त लिहिले आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 08/26/2022 - 10:55 नवीन
जमल्यास आणि अन्नू कपूरचा अभिनय आवडत असेल तर होम देखील पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ध
धर्मराजमुटके Wed, 08/24/2022 - 18:13 नवीन
भारत चीनी अ‍ॅपवर बहिष्कार का घालत आहे ? ही एक चित्रफीत पाहण्यात आली. मुद्दे रोचक वाटले.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 08/26/2022 - 08:47 नवीन
माझ्या अंदाजानुसार गॅट करारानुसार भारताचे जे नुकसान झाले व चीन आपल्याला शह देत राहिला, त्यावरची ही उपाययोजना आहे. गॅट करारातून बाहेर तर पडायचं नाही, पण गॅट कराराचे फायदे चीनला मिळवू द्यायचे नाहीत अशी ती खेळी असावी. ट्रंम्प यांनी ती सुरू केली. भारत आता त्याचे लाभ घेतोय. जोपर्यंत चीनची अर्थव्यवस्था बंदिस्त आहे तोपर्यंत तरी चीनला गॅट कराराचे फायदे मिळवू द्यायचे नाहीत हे धोरण भारताच्या दृष्टिने महत्वाचे आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 08/30/2022 - 18:16 नवीन
https://www.youtube.com/watch?v=D3W8h4dBIII साध्या सोज्ज्वळ मनमिळाऊ स्वभावाच्या नायिकेचा होणारा खून, एकमेकांवर कूरघोडी करणारी बिलंदर पात्रं, आणि ही मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करणारा नायिकेचा मानलेला भाऊ हे एकमेव सकारात्मक पात्र. एकदा तरी पाह्यला हवा असा चित्रपट.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 08/30/2022 - 21:09 नवीन
सध्या मी हिंदी भाषेत डब केलेली वेबसिरीज व्हर्जिन रिव्हर चे चौथे पर्व बघतोय. अर्थातच आधीचे तीन पर्वही पाहिलेले आहेत. ही एक भावूक अमेरिकन ड्रामा वेबसिरीज आहे.. तुमच्याकडे विलक्षण संयम आणि चिकाटी असल्यास तुम्ही या वेबसिरीजचा नक्कीच आनंद घेवू शकता :) (सौजन्यः नेटफ्लिक्स) Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा