Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता

स
संजय क्षीरसागर
Mon, 11/16/2020 - 18:50
💬 255 प्रतिसाद
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्‍या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट ! १. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे. इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्‍यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल. २. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत. मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे. दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्‍याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्‍याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच ! ३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा. आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते ! आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन ! ४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल. तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही ! हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे. ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल ! _________________________________________ हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्‍या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला. इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही. काही भाग संपादित - मिपा व्यवस्थापन

प्रतिक्रिया द्या
73220 वाचन

💬 प्रतिसाद (255)
स
संजय क्षीरसागर Wed, 11/18/2020 - 16:03 नवीन
माझ्या ध्यानपद्धतीची प्रचिती आल्याची ग्वाही इथे किमान चौघांनी दिलीये, ज्यांची माझ्याशी काहीही व्यक्तिगत ओळख नाही. सो आय एम डन ! तुम्हाला तुमचा मार्ग योग्य वाटत असेल तर चालू ठेवा. मला प्रश्न विचारतायं याचे दोनच अर्थ आहेत : १. तुम्हाला स्वतःच्या मार्गावर विश्वास नाही, किंवा २. तुम्ही निर्विचार होऊनही तुम्हाला ती इतकी सोपी गोष्ट होती हे मंजूर होत नाही !
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि Wed, 11/18/2020 - 16:26 नवीन
प्रश्न कोणाला प्रचिती आली किंवा नाही ह्याबद्दल अजिबात नव्हता. प्रश्न साधा सरळ आणि सोपा होता ज्याचे उत्तर फक्त हो किंवा नाही होते ते दिलेलेच नाहीयेय. असो, मला माझे उत्तर मिळाले कारण उत्तर येणार नाहीच ह्याची १००% खात्री होती, त्याती प्रचिती मात्र आली. - (अभ्यासू) सोकाजी
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रसाद गोडबोले Wed, 11/18/2020 - 07:55 नवीन
तुम्ही नामनुसंधान करा, नादानुसंधान करा, सोहम साधना करा.. अनेक श्रेष्ठ मार्ग आहेत.
छ्यॅ , काही तरीच तुमचं =)))) संक्षींना इतर मार्ग मान्यच नाहीत हो, इतर सगळे मार्ग म्हणजे भ्रांती आहेत . इतर सगळे साधु संत सज्जन अन त्यांन्नी सांगितलेले साधना मार्ग हे सर्व व्यर्थ वायफळ आहे असे संक्षींचे मत आहे. इव्हन ज्या गोष्टींचा त्यांना अनुभव नाही त्याही गोष्टी निरर्थक आहेत असे त्यांचे मत आहे. तुम्ही त्यांचे इतर लेखन काढुन वाचा म्हणजे तुम्हाला अजुन मजा येईल . =)))))
↩ प्रतिसाद: आनन्दा
ग
गामा पैलवान गुरुवार, 11/19/2020 - 18:19 नवीन
आनन्दा, माहितीबद्दल आभार. तुम्ही नाथांचे भक्त दिसता. चौरंगीनाथांची कथा माहीत होती. पण डोक्यावरच्या टांगत्या शिळेस तोलून धरण्यास अनुसंधान म्हणतात हे नव्यानं लक्षांत आलं. असो. अधिकार नसतांना दावा करणे चूक आहे. पण वर्णनात्मक भाष्य करावयास अधिकार नसला तरी चालतो. तुमचं कथन दुसऱ्या प्रकारातलं आहे. तरीही तुम्ही क्षमा मागताहात हा तुमचा विनय आहे. विद्या विनयेन शोभते. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
संजय क्षीरसागर Fri, 11/20/2020 - 04:42 नवीन
डोक्यावरच्या टांगत्या शिळेस तोलून धरण्यास अनुसंधान म्हणतात हे नव्यानं लक्षांत आलं.
याप्रकारच्या साधना सांगणारे आणि करायला लावणारे नाहक जीव धोक्यात घालतात, त्याचा शून्य उपयोग आहे. जैन धर्मातही असले भंपक प्रयोग चालतात आणि साधक देहाची वाट लावून घेतात. डोक्यावरची टांगती शिळा पडली तर कोण जवाबदार ? म्हणजे सत्याचा उलगडा राहिला बाजूल आणि ज्या बुद्धीनं विषय समजावून घ्यायचा तिच्यावर शिळा कोसळणार ! देहात कुणीही नाही हा अल्टीमेट उलगडा आहे तो तुम्हाला मृत्यूच्या भयापासून आणि व्यक्तिमत्त्वातून एकाचवेळी मुक्त करतो. म्हणजे तुम्ही मुक्त होताच पण आपण देहात आहोत आणि व्यक्ती आहोत या भ्रमांमुळे तो होत नव्हता. असल्या भंपक साधनांनी आध्यात्माची वाट लागली आहे, त्यामुळे लोक एकतर आध्यात्माकडे पाठ फिरवतात किंवा मग त्यांना प्रचंड इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स येतो. इक्झॅक्टली हाच मुद्दा माझ्या दुसर्‍या लेखात मांडला आहे, बघा!
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Wed, 11/18/2020 - 10:09 नवीन
मुख्य उद्देश आपल्याला देह नसून, देहाची जाणीव आहे हा उलगडा होणं आहे. त्यासाठी संपूर्ण देहाची एकसंध जाणीव होणं गरजेचं आहे. त्याला हॉवरींग द बॉडी असं म्हटलंय. इतर मुद्रांनी तो उद्देश साध्य होत नाही. शिवाय हात (म्हणजे कोपरांपासून ते बोटांपर्यंतचा सर्व भाग) समोर मांडीवर असलेल्या कुशनवर टेकवले आहेत आणि पाठ भींतीला टेकलेली आहे त्यामुळे इतकी सुखकर साधना आजमितीला जगात कोणतीही नाही.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Wed, 11/18/2020 - 11:03 नवीन
संपूर्ण देहाच्या जाणीवेप्रत नेऊ शकत नाही. त्या साधनेत, साधनाकालात एकसंध विचार (युनीडायरेक्शनल थिंकी़ग) ही होऊ शकणार नाही. करुन पाहा.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
च
चित्रगुप्त Wed, 11/18/2020 - 04:06 नवीन
@संक्षि: आज दुपारी मोकळ्यात फिरताना हा प्रयोग करून बघितला. माझी बोटे जरा जाड असल्याने तर्जनीने कुठेही न टेकता गुंफणे जमत नाही, पण मध्यमेने जमले. डोळे मिटल्यावर शरीर अगदी हलके होऊन वर वर जात असल्याचा भास झाला. नंतर घरी शांतपणे करून बघितल्यावर पुन्हा लिहेन. काहीतरी नवेच करून बघायला मी नेहमीच तयार असतो. आता हे एक नवीन. अनेक आभार.
स
संजय क्षीरसागर Wed, 11/18/2020 - 11:54 नवीन
हे अस्तित्वच एका अथांग पोकळीत तरंगाईत आहे ! ज्या पृथ्वीवर देहाचा वावर आहे ती स्वतःच तरंगते आहे त्यामुळे देहही आपसूकपणे तरंगतो आहे. देह तरंगाईत आहे हे जाणणं हा खरा नृत्यकलेचा उद्देश आहे ! आपल्याकडे अज्ञानाचा इतका अथांग पसारा आहे की ती कला संपूर्णपणे व्याकरणात जखडून टाकली आहे आणि (सो कॉल्ड दिग्गज आणि) रसिकही इतके बधीर आहेत की नृत्यात ते व्याकरण जमतंय की नाही हेच बघतात. जगात अजून कुणीही नृत्याकडे या अँगलनं पाहिलेलं नाही. ____________________ मध्यमा आणि अंगठ्याच्या गोलकात इतर तीन बोटं एकसंध नसल्यानं फार वेळ सरळ राहू शकत नाहीत, शिवाय ती एकमेकांना टेकायला लागतात त्यामुळे दीर्घकाल निर्विचार स्थितीचा अनुभव येणार नाही. ____________________________________ पोस्ट तुमच्या पेंटींग्जसारखी रंगतदार व्हायला लागली आहे, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार्स !
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ट
टर्मीनेटर Wed, 11/18/2020 - 05:04 नवीन
धाग्याच्या सुरुवातीचे वाक्य प्रचंड खटकले! एका चांगल्या धाग्याला टीकेचे धनी करण्याची क्षमता त्या वाक्यात (आणि एकंदरीत मांडणीत) नक्कीच आहे. असो, खरंतर सदर धागा विषयात मला गती/रस अजिबात नाही, परंतु तुम्ही सांगितलेली सोपी मुद्रा सहज कुतूहल म्हणून करून बघितली, आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर १००% नसली तरी बऱ्याच अंशी निर्विचार स्थितीची अनुभूती नक्कीच आली 🙏 धाग्यातील काही आक्षेपार्ह वाक्ये वगळता दिवाळी निमित्त तुम्ही सर्वांना दिलेली 'अनमोल भेट' आवडली 👍 शा वि कु आणि गवि साहेबांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत आणि वाद/चर्चेत सहभागी होण्यात Jayant Naik साहेबांनी म्हंटल्या प्रमाणे मलाही शून्य रस असला तरी प्रतिसादातून मिपाकरांनी लिहिलेले त्यांचे अनुभव वाचण्यासाठी हा धागा फॉलो करण्यात येईल. धन्यवाद.
उ
उपयोजक Wed, 11/18/2020 - 06:55 नवीन
प्रतिसादाशी १००% सहमत! लेख चांगलाच आहे पण त्या एका वाक्याने डाग लागला!
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
स
संजय क्षीरसागर Wed, 11/18/2020 - 10:48 नवीन
स्वतःची पोस्ट नेमकी त्याच वेळी टाकत असतांना, ते काम बाजूला ठेवून, तुम्ही अत्यंत आपुलकीनं फोटोचा डायरेक्ट पेस्ट कोड दिलात याचं फार कौतुक आहे. इमेज मनाजोगत्या साइजची झाली नसती तर पोस्टचा इंपॅक्ट हुकत होता ! मृत्यू हा अत्यंत भेदक पण तितकाच मोहक विषय आहे त्यावरचं लेखन तितकंच भिडणारं व्हायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातून वाचकांच्या दृष्टीकोनात बदल होऊन त्यांच्या जगण्याला एक दिशा मिळायला हवी. इथे सदस्य, विषयातलं काहीही गम्य नसतांना, केवळ टाईप करता येतं म्हणून पिंका टाकतात आणि त्यांचा रोख व्यक्तिगत असतो, तसा उद्देश सोत्रींच्या लेखाबद्दल नव्हता. रोख पोस्टच्या कंटेंटकडे होता, लेखकाशी त्याचा सुतराम संबंध नाही आणि मी हा लेख लिहून त्या विषयाचा समग्र आवका दाखवून दिला, सदस्यांसाठी आनंदाचं एक नवं दालन खुलं केलं. सोत्री एक व्यक्ती म्हणून रसिक माणूस आहे आणि त्यांच्या रंगीन पोस्टसना मी वेळोवेळी दाद दिली आहे. तुम्हाला खटकलेल्या काही वाक्यांची मला ही कल्पना आहे. तारीख उलटण्यापूर्वी लेख पोस्ट करायचा होता त्यामुळे इंपॅक्ट हा एकमेव उद्देश ठेवून मी अक्षरशः एका सिटींगमधे लेख लिहिला, त्यात इमेज लेखापेक्षा मोठी होत होती तो एक ताप होताच. शिवाय माझी पोस्ट आली की इथे लगेच रणधुमाळी चालू होते, त्यामुळे पोस्ट प्रोटेक्ट करणं हा सर्वात महत्तम भाग असतो. तो वेळच्यावेळी निस्तरला नाही तर इतर त्याचू तिथे येऊन नृत्यसमारोह करायला अधीर असतातच ! तस्मात, वेळ मिळाला की सासंतर्फे नक्की मॉडरेशन करीन. १.
तुम्ही सांगितलेली सोपी मुद्रा सहज कुतूहल म्हणून करून बघितली, आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर १००% नसली तरी बऱ्याच अंशी निर्विचार स्थितीची अनुभूती नक्कीच आली
२.
दिवाळी निमित्त तुम्ही सर्वांना दिलेली 'अनमोल भेट' आवडली शा वि कु आणि गवि साहेबांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत
या प्रशंसेबद्दल अगदी मनापासून आभार्स ! ______________________________________ अध्यात्मात रस नसणारी व्यक्ती या जगात नाही, कारण प्रत्येक जण आहे त्या परिस्थितीत फक्त एकच गोष्ट शोधतोयं, ती म्हणजे आनंद ! अनाहूतपणे प्रत्येक जण स्वतःलाच शोधतोयं कारण तुम्ही स्वयेच आनंद आहात ! चित्र काढतांना आनंद होतो असं सकृद्दर्शनी जरी वाटलं तरी तो स्वतः- स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे झालेला असतो. चित्र ही त्या आनंदाची अभिव्यक्ती असते. अध्यात्मात रस नसणार्‍या लोकांच्या बाबतीत दोन गोष्टी असतात, एक म्हणजे आपणच आनंद असू याची त्यांना कल्पना नसते आणि दुसरं म्हणजे आजपर्यंत जगातल्या सिद्धांनी अध्यात्म इतकं क्लिष्ट करुन ठेवलं आहे की त्या भानगडीत न पडलो तर बरं असं वाटतं ! माझ्या अध्यात्माचा रंग वेगळा आहे. तुम्ही सांगितलेलं ध्यान करुन पाहा, तुम्हाला नक्की प्रचिती येईल.
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
स
संजय क्षीरसागर Wed, 11/18/2020 - 17:56 नवीन
सासंनी काढून टाकलं ! दुसरी खटकणारी गोष्ट, त्या पुढे वस्तुस्थिती निदर्शक स्पष्टीकरण लिहून, मान्य होईल असं करायची विनंती केली आहे.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संगणकनंद Wed, 11/18/2020 - 18:24 नवीन
स्वतःच्या लेखांची/प्रतिसादांची/मतांची स्वतःच वाहवा करताना इतरांच्या लेखांना/प्रतिसादांना/मतांना हीण लेखण्याची घाण सवय आहे तुम्हाला. तेच तुम्ही या ही लेखाच्या पहील्याच वाक्यात केलेत. हा दुसर्‍याच्या मोठ्या रेषेबद्दल ईर्षा निर्माण होऊन तिला कमी लेखून छोटी करण्याचा हीन प्रयत्न होता सासंनी उडवलेला भाग अस्थानी आणि इथल्या एका सन्माननिय सदस्याच्या उत्तम लेखनावर शेरेबाजी करणारा होता. या शेरेबाजीबद्दल माफी मागणार का आता?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कांदा लिंबू Wed, 11/18/2020 - 18:42 नवीन
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला (जवळजवळ निरुपयोगी) लेख वाचून;...
...
या शेरेबाजीबद्दल माफी मागणार का आता?
ते कसले माफी मागतात! प्यूबिक रिंगपासून ते मेमरी स्ट्रिंग्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी गाडीला पाय लावून पळ काढला आहे. वर सोत्री यांनी देखील एक साधा binary प्रश्न विचारला आहे, पण हे सदगृहस्थ झुडपाच्या आजूबाजूला झोडपत आहेत.
↩ प्रतिसाद: संगणकनंद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/21/2020 - 08:17 नवीन
अगदी असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
श
शाम भागवत गुरुवार, 11/19/2020 - 03:45 नवीन
@सोत्री, आपण संकुचित न बनता व्यापक बनण्यासाठी सगळं करायचं असतं हे मुख्य तत्व असलं पाहिजे. हे येथे चांगले समजावून सांगितले आहे.<\a> अर्थात तुम्हाला हे सगळं माहितीय. फक्त तुमचे निमित्त करून इतरांसाठी लिंक दिलीय. 😀
आ
आनन्दा गुरुवार, 11/19/2020 - 05:49 नवीन
भागवत सर, खरे आहे, खरे तर याच मुद्द्यावरती मला ओशो पटायचे बंद झाले.. स्व ची जाणीव वैश्विक पातळीवर गेली की तुम्ही सिद्ध झालात. गीतेमध्ये तेराव्या अध्यायात एक श्लोक आहे - समं पश्यन हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम न हिनस्ति आत्मना आत्मानं ततो याति परा गतिम
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 11/20/2020 - 06:55 नवीन
तर्जनी आणि अंगठ्याचा गोल करून दोन्ही हात एकमेकांत गुंफायचे म्हणजे नेमके कसे? असे -? Image removed.
स
संजय क्षीरसागर Fri, 11/20/2020 - 12:02 नवीन
Image removed. १. मांडी घालून बसले असाल तर हात मांडीवर ठेवलेल्या कुशनवर टेकवा २. खुर्चीवर बसला असाल तर कोपरं खुर्चीच्या आर्मसवर रेस्ट करा ३. दोन्ही हाताची तीनही बोटं सहज सरळ राहातील असं बघा, आणि ४. गोलक एकमेकांना स्पर्शू देऊ नका.
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
म
मराठी_माणूस Fri, 11/20/2020 - 13:38 नवीन
४. गोलक एकमेकांना स्पर्शू देऊ नका.
म्हणजे तर्जनी आणि अंगठ्यात काही मिलिमिटरचे अंतर ठेवायचे असेच ना ?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 11/20/2020 - 13:56 नवीन
दोन्ही हातांच्या अंगठा आणि तर्जनी एकमेकांना स्पर्श करायलाच हव्यात (पहिला फोटो पाहा), पण त्यांनी तयार झालेले गोलक एकमेकांपासून अस्पर्शित राहायला हवेत. या मागची थीम अशी आहे की या मुद्रेतून निर्विचारता आल्यानं सजगता वाढत जाते. गोलक एकमेकांना टेकले तर पुन्हा विचार सुरु होतील आणि इतर तीनही बोटं सरळ राहिली नाहीत तर झोप यायला लागेल.
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Sat, 11/21/2020 - 08:04 नवीन
(पहिला फोटो पाहा) पाहीला , पण त्यात एकच हात दाखवला आहे. दोन्ही हातांचे गोलक कसे असावेत ते डोळ्यासमोर आणता येत नाहीय्ये
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 11/21/2020 - 08:12 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Sat, 11/21/2020 - 08:34 नवीन
हो , आत्ता तिकडे लक्ष गेले , पण तिथे चित्र दिसत नाही, तुम्ही सांगीतल्या प्रमाणे दुसर्‍या डीव्हाइस वर म्हणजे मोब. वर पाहीले तिथेही चित्र दिसत नाही.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 11/20/2020 - 13:49 नवीन
३. दोन्ही हाताची तीनही बोटं सहज सरळ राहातील असं बघा, आणि हे कळालं. पण सरळ राहतील म्हणजे कशी आणि कोणाला सरळ? पोटाला सरळ समांतर, तळवा आकाशाकडे --- की --- पोटाला तिरकी आणि हाताचे तळवे एकमेकांना क्रॉस करून छेदताहेत-तळवे आकाशाकडे असे? गोलक एकमेकांना दोन पद्धतीने स्पर्ष करू शकतात - एक म्हणजे एकमेकांना ग्रहणासारखे समांतर आणि एक म्हण्जे एकमेकांची टोके एकमेकांना स्पर्श करू शकतात. वरचे स्केच वरून पाहताना काढले आहे आणि हाताची तीनहीबोटे सरळ आहेत व एक तळवा दुसर्या तळव्यावर ठेवलेला आहे.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 11/20/2020 - 14:00 नवीन
आणि मराठी माणूस यांना दिलेलं उत्तर वाचा.
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 11/20/2020 - 14:15 नवीन
मला फक्त एक टिंब दिसत आहे. कोणतीही इमेज दिसत नाही.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 11/20/2020 - 14:20 नवीन
दुसर्‍या डिवाइसवरुन पोस्ट उघडून पाहा, दिसेल.
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
स
सुचिता१ Fri, 11/27/2020 - 04:16 नवीन
फोटो दिसत नाहीत. मोबाईल वर पण दिसत नाहीत.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गामा पैलवान Fri, 11/20/2020 - 16:09 नवीन
संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. तुम्ही पूर्ण माहिती न घेता भाष्य केलंय. तर ती नसलेली माहिती मी देतो. पहिली गोष्ट म्हणजे शिळा पडायची आजिबात काळजी नको. ती मच्छिंद्रनाथांनी स्वत:च्या योगसामर्थ्याने तोलून धरलेली होती. त्यांनी चौरंगीस तिच्याखाली बसवलं ते अनुसंधान पक्कं करायला. ही साधना स्वत:हून करता येण्याजोगी नाही. आपल्या आस्थेबद्दल आभार. आ.न., -गा.पै.
स
संजय क्षीरसागर Fri, 11/20/2020 - 18:08 नवीन
याचे किती उघड अर्थ निघतात ते पाहा : १. मच्छिंद्रनाथांनी डायरेक्ट न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतालाच धोबीपछाड मारला आहे. २. सत्य चराचर व्यापून असून देखिल सिद्धत्त्वासाठी तुम्हाला असा अफाट मॅन भेटत नाही तोपर्यंत तुम्ही सत्य नाही. परिणामी या जन्मी तरी तुमचा चान्स हुकला आहे आता पुढच्या जन्मांची वाट पाहात राहा ! ३. कुठल्याही जन्मात असा सुपरमॅन तुम्हाला भेटला, तरी चौरंगीनाथांसारखं डेरींग करुन तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत नाही तोपर्यंत तुम्ही या जन्म-मृत्यूच्या चक्रातच फिरत राहणार. तस्मात, आजपासूनच डेरींग वाढवायला सुरुवात करा. थोडक्यात, सध्याचं तुमचं डेरींग पाहता या जन्मी तरी तुम्ही एकदम छपरी आहात. ४. या अद्भूत चमत्काराची तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्ही अज्ञानी आहात. तुमचं ज्ञान चरचौघात प्रकट करायचं असेल तर अत्यंत विनयानं ही स्टोरी पुढच्यांना सांगा कारण विद्या विनयेन शोभते ! _________________________________________ गामाश्री, या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार ! श्रद्धेचा बागुलबुवा दाखवून सुशिक्षितांना सुद्धा किती हातोहात फसवता येतं याचं उत्तम प्रदर्शन तुम्ही यानिमित्तानं घडवून आणलंत. या आणि अशा अनेक उदाहरणंनी, ज्यांना पूर्वापार ग्रेट मानलं गेलंय त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी, त्यांच्या पश्चात आध्यात्माची कशी वाट लावून ठेवली आहे आणि जनसामान्यांत नाहक, किती पराकोटीचा इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स निर्माण केलाय हे सांगणारा, या लेखमालेतला दुसरा भाग सादर करतांना मला झालेला आनंद किती रास्त होता याची कल्पना करा !
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
आ
आनन्दा Sat, 11/21/2020 - 06:31 नवीन
गापै, अतींद्रिय शक्तींचा गंध देखील ज्या माणसाला नाही त्याला अध्यात्म शिकवण्याचा व्यर्थ खटाटोप करू नका. या माणसाला अध्यात्म कशाशी खातात याची सुतराम कल्पना नाही, अतींद्रिय शक्तींचा काडीमात्र अनुभव नाही, अश्या माणसाशी बोलणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी हे लक्ष्यात ठेवा. फक्त संक्षीना जाता जाता एक अनाहूत सल्ला देऊन जातो. जर स्वतःशी प्रामाणिक असाल तर, आत्म परीक्षण करा, तुम्हाला जे गवसलय हे नक्कीच अध्यात्मातली विशेषतः हठयोगातली एक पायरी आहे, पण जे गवसलं आहे ते अंतिम सत्य नाहीये, कारण अंतिम सत्य मिळालेल्या लोकांच्या ठिकाणी दिसणारे एकही लक्षण तुमच्या ठिकाणी दिसून येत नाही. पण तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, तेव्हा प्रयत्न सुरू ठेवा, केव्हाना केव्हा तरी तुम्हाला सत्य गवसेल अशी शुभेच्छा देतो. यापुढे मी तुमच्या धाग्यावर प्रबोधन करायला म्हणून देखील येणार नाही.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/21/2020 - 08:11 नवीन
बाय द वे, आपले अतिद्रिंय शक्तीचे अनुभव असतील तर वाचक म्हणून वाचायला आवडतील. नक्की लिहा. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sat, 11/21/2020 - 09:51 नवीन
बिरुटे सर, मी यापूर्वी देखील काही अनुभव इथे लिहिले आहेत, त्यावर मला इतके छान प्रोत्साहन मिळाले आहे की आता मी या बाबतीत विरक्त झालो आहे. मला कोणालाही काही पटवून देण्यात रस नाही. कोणाला काही सांगावेसे वाटले तर सांगतो, पटणे न पटणे त्याच्या हातात. आता उपरोक्त सदस्याबद्दल बघा, ते स्वतःला लॉजिक चा बादशहा म्हणवतात, पण त्यांच्या लॉजिक मधल्या चुका काढून उघडे पडले की धागा वाचनमात्र होतो.. माणसाने आपल्या लॉगिकमध्ये चूक झाली तर ती खुल्या दिलाने मान्य करावी इतकीच अपेक्षा असते. ती स्वतःला पूर्ण करता येत नाही, इतरांची अक्कल काढायला मात्र हे सर्वत्र मोकळे.. इतके प्रोत्साहन असल्यावर आम्हाला काय कमी पडणार? तरी नशिबाने मी आडून आडून बोलत नाही, जे असेल ते थेट आणि संसदीय भाषेत मांडतो, तरीही इथल्या कोणाच्या चुका दळवल्या की दोष आमच्यावरच येतो, त्यामुळे आता इथे लिहायचे नाही असे ठरवलेले आहे.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
N
nanaba Sat, 11/21/2020 - 16:41 नवीन
Tumache anubhav vachayala awadatil sir.
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 11/22/2020 - 06:32 नवीन
या बाबतीतले माझे अनुभव आणि मते इथे मांडलेली आहेत. आणि मला याबाबत चर्चा करण्यात रस का नाही हे देखील मी तिथेच स्पष्ट केले आहे. कोठेतरी अतिच गैरसमज आले तर मगच मी लिहितो https://misalpav.com/comment/770627#comment-770627
↩ प्रतिसाद: nanaba
N
nanaba Sun, 11/22/2020 - 17:42 नवीन
Thanks for sharing!
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
संजय क्षीरसागर Sun, 11/22/2020 - 08:07 नवीन
आपले अतिद्रिंय शक्तीचे अनुभव असतील तर वाचक म्हणून वाचायला आवडतील ?
हा बघा तुमचाच अत्यंत मार्मिक प्रतिसाद ! (तो वाचून सकाळची सुरुवात प्रसन्न झाली आणि इतरांनाही मजा यावी म्हणून इथे देतो) : मंत्र म्हटल्याने एटीएममधील पैसे कार्ड न टाकता पीन कोड न टाकता काढून दाखवता येतील का ? दोन हजार सोळा उजाडले तरी अशा गोष्टी वाचल्या की वाईट वाटते हो बाकी काही नाही
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संजय क्षीरसागर Sat, 11/21/2020 - 08:04 नवीन
त्यांनी पूर्वी माझ्याबाबतीत, नाहक इतका हैदोस घातला आहे की त्यांच्यासाठी माझी दारं कायमची बंद झाली आहेत. थोडा फार का होईना तार्किक विचार असणारे इथे जे सदस्य आहेत त्यात तुम्ही एक आहात असं (तुमच्याशी आजपर्यंत झालेल्या संवादामुळे) मी मानतो. डोक्यावर शिळा तरंगवता येणं या भंपक मान्यतेला अतींद्रिय शक्ती की आणखी काय वाट्टेल ते म्हणा, तो फक्त मानणार्‍याचा त्याचूपणा आहे. शिळा तरंगवता येते तर बोईंग उडवता यायला काय हरकत आहे ? कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन ? ऑइल क्रायसिसचा जागतिक प्रश्न एका झटक्यात संपेल ! अडाणी पण कावेबाज भक्तांनी स्वतःची दुकानं सुरु रहावीत म्हणून लावलेल्या या स्टोर्‍या आहेत इतकी साधी गोष्ट सुशिक्षितांना समजत नसेल तर अशिक्षितांचे हाल तर विचारायलाच नको. त्यामुळे दुसर्‍या लेखावरच्या प्रतिसादात मी म्हटलंय की इतक्या निर्बुद्ध मानसिकतेच्या खोलवर रुजलेल्या धारणांना माझ्या लेखनाचा शून्य उपयोग आहे. त्यांनी शिळा तरंगवणार्‍याची वाट पहावी आणि तरंगती शिळा डोक्यावर घेऊन अनुसंधान साधावं !
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/21/2020 - 08:14 नवीन
तर्जन्याची आयडीया भारी होती, मनातले विचार क्षणभर पॉज झाले खरे... बाकी चालू ठेवा. -दिलीप बिरुटे
स
संगणकनंद Sat, 11/21/2020 - 08:55 नवीन
समस्त मिपाकरांना कळवण्यात येते की त्यांनी सिद्ध महाराजांना डीवचू अन्यथा त्यांच्यासाठी सिद्ध महाराजांची दारं कायमची बंद होतील आणि मग त्या पामरांचा (सिद्ध महाराजांच्या अमृतवाणीत सांगायचे तर त्याचू आणि छपरी लोकांचा) उद्धार होणार नाही.
स
सुबोध खरे Sat, 11/21/2020 - 09:46 नवीन
इथे सिद्ध महाराजांची दारं उघडायला कोणाला उचकी लागली आहे? आपणच हुशार आणि बाकी सगळे (सिद्ध पुरुष, संत, महंत, बुद्ध इत्यादी इत्यादी) महा मूर्ख असा आव आणणारा भंपक माणूस काय कुणाचा उद्धार करणार आहे?
N
nanaba Sat, 11/21/2020 - 16:39 नवीन
Sorry for English. I couldn't resist sharing and my mobile is not allowing marathi typing. I will try to retype in marathi from my laptop later. Experience: I didnt feel much with this except momentary feeling of trance. I asked my family to try this out without telling them what to expect. Asked just to observe. Husband said he didn't feel anything. Mom said "hallak pana ala".. She meant sort of nothingness. My 7 year old told : " she felt as if she was flying without feeling d body". This was totally unexpected. And i found this damn interesting so sharing here. Thanks to Sanjay Kshirsagar for sharing this. I will try to see if i can feel what my 7 year old felt. :)
स
संजय क्षीरसागर Sat, 11/21/2020 - 18:16 नवीन
मजा म्हणून इंग्रजीतून लिहितो : The Meditation is absolutely Scientific. It is the Essence of My Understanding of Human Psychology. It is an Ultimate combination of Spirituality & Human Psychology. It Will work Instantly for Anyone, Anytime, Anywhere.
1. I didn't feel much with this except momentary feeling of trance.
That Exactly is Thoughtlessness !
2. I asked my family to try this out without telling them what to expect. Asked just to observe.
That is the Way to Test Any Method Scientifically, Great !
3. Husband said he didn't feel anything.
This Has Made me curious ! Please Make the Mudra exactly as shown in the Photos and Ask Him To Look Straight. If the Neck Tilts (of course to the left) the Thought Process continues.
4. Mom said "hallak pana ala".. She meant sort of nothingness.
That is Exactly What Buddha Means By Shunyata : Emptiness !
6. My 7 year old told : " she felt as if she was flying without feeling d body". This was totally unexpected.
Yes, Because the Entire Existence is Floating in an Infinite Emptiness. Now, Make Her a Dancer ! She Will Make Havoc ! She Will be a Dancer which the World Has Never Seen Before !
7. And i found this damn interesting so sharing here
I am Thrilled. You Stunned & Silenced Everyone Here.
↩ प्रतिसाद: nanaba
अ
अर्धवटराव Mon, 11/23/2020 - 08:52 नवीन
माझं इंग्रजी फार कच्चं आहे. त्यामुळे प्रतिसाद मराठीत देतोय (दुसरा पर्याय नाहि ;) ) शरीराची एक विशिष्ट रचना करुन त्याचा अनुभव घेणे, तो शेअर करणे, चर्चा करणे वगैरे गोष्टी चालत राहातात. मोठी माणसं त्यातलं कभि खुषी कभि गम बघत असतात, ते ही ठीक. तुम्ही तुमच्या चिमुकलीचा अनुभव सांगीतलात म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. शरीराच्या काहि रचना करुन त्यातलं सुख अनुभव करण्यात काहि हरकत नाहि. काहि वेळेस त्यात थ्रील वाटणं, त्याची मजा घेणं हे देखील ठीक. पण शारीरात मॅनिप्युलेश करुन, मग ते साधं मांडी घालुन बसणं असो किंवा एखाद्या स्प्रींग प्रमाणे शरीराला पिळणे असो, त्यातले येणारे अनुभव हे शरीर जन्य आणि शरीर कन्स्युम्ड असतात याचं भान ठेवणं आवष्यक असतं. इथे चर्चीला जाणार्‍या प्रोसेसच उदाहरण घेऊया. कुठल्याही भौतीक वस्तुला बेलेन्समधे ठेवण्यात त्या वस्तुच्या सेन्ण्टर ऑफ ग्रॅविटीचे फार मोठे योगदान असते. ढोबळ मानाने बघितल्यास आपल्या शरीरात अस्थि आणि मसल वापरुन हि यंत्रणा राबवली जाते. शरीर उभं असताना, बसलं असताना, झोपल्या अवस्थेत किंवा इतर कुठल्याही अवस्थेत, आपली हाडं ट्रस प्रमाणे काम करुन ( ट्रस ... इंजीनियरींजच्या विद्यार्त्यांचा 'आवडीचा' विषय ;) ) वजन विभाजन करतात. मसल्स त्या अवस्थेला आवषयक ते बळ पुरवतात. शरीराची ठेवण आणि अवस्था या नुसार मेंदु हे सगळं कंट्रोल करत असतं. आपल्या डोक्याचं आकारमान जरि तुलनेने कमि असलं तरी त्याचं वजन बरच असतं. शरीराचा तोल सांभाळण्याच्या दृष्टीने मानेच्या वरच्या भागाचं केल्क्युलेशन त्यानुसार होतं. या सगळ्या झांगडगुत्याला जर काहि स्टिम्युलस मिळालं तर वेगवेगेळे अनुभव सुरु होतात. एखादी ध्यानमुद्रा साधणे, स्वतःभोवती गोल फिरणे, आकाशपाळण्यात बसणे, या सगळ्यांमधे अल्टीमेटली शरीराच्या गुरुत्वीय केंद्राची चलबिचल सांभाळण्यात मेदु गुंतला असतो, त्याचेच अनुभव येत असतात. काहि अनुभव फार प्लेसंट असतात, काहि थ्रिलींग वाटतात, कहि एकदम नकोसे असतात. व्हर्टीगोचा प्रोब्लेम असो, किंवा अगदी नशापाणि केल्याने येणारी झिंग असो. या सर्व गोष्टी शारीरीक आहेत, त्यात अशरीरी असं काहि नाहि. हि सर्व बडबड या साठी, कि शरीराची मजा घेताना त्यामागची वस्तुस्थीती लक्शात न घेता त्याला भलतेचं लेबलं लावुन आपल्या मुलीच्या मनात चुकीच्या कन्सेप्टची पेरणी करु म्हणुन हा सावधतेचा इशारा. तसं बघितलं तर हे सगळं वयापरत्वे तिला कळेलच. पण प्रश्न एका कोवळ्या मनात चुकीच्या धारणांचं बिजारोपण होण्याचा दिसला म्हणुन टंकलं. बाकि आपण सुज्ञ आहात.
↩ प्रतिसाद: nanaba
आ
आनन्दा Mon, 11/23/2020 - 11:25 नवीन
नेमक्या शब्दात आणि नेटके मांडले आहात.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
N
nanaba Mon, 11/23/2020 - 17:51 नवीन
तुम्ही लिहिलेलं अत्यंत योग्य आहे. तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही. इन फॅक्ट ते सारखं सारखं करत बसायची जरुरी नाही हे ही सांगितलय. आणि त्यानंतर तिच्या इतर उचापतीत तिला आठवणही झालेली नाही. पण तुम्ही लिहिलेलं अगदीच योग्य आहे, पटलेलं आ हे. ती इतरांबरोबर असल्याने तिने ऐकले आणि ट्राय केले इतकेच. मला स्वतः करताही - ह्याबाबतीत वेगळं असं वाटतं की संक्षि म्हणतात ते खरे असेल तरी आपली मनाची, शरीराची तयारी नसताना केवळ हॅक सापडला म्हणून एखादी गोष्ट करत राहू नये. त्याचे काय दुष्परिणाम असू शकेल ते आपल्याला माहित नाहिये. हॅक च्या मागे जाण्यापेक्षा उपासना करून ती गोष्ट मिळवावी. आणि वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ती फायनल स्टेज असेल असेही माहित नाही आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ती अगदीच शारीर क्रियाही असू शकते. मला इथल्या वादात पडायचे नसल्याने मी आधी हे सगळे लिहिले नव्हते. पण मला तिलाही न सांगता तोच अनुभव आला ह्याची मजा नक्कीच वाटली आहे.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
N
nanaba Mon, 11/23/2020 - 17:54 नवीन
तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही म्हणजे तिला इथली कारण मिमांसा, चर्चा वगैरे माहित नाहियेत. ते अंतराळ, शून्य वगैरे काहीच माहित नाही.
↩ प्रतिसाद: nanaba
अ
अर्धवटराव Mon, 11/23/2020 - 18:12 नवीन
सबके पिल्लु ठिक तो अप्पुन भी खुष :)
↩ प्रतिसाद: nanaba
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा