१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट !
१. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे.
इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल.
२. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत.
मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे.
दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच !
३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन

असं काहीही होत नाही.
इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे. जे होतं ते फक्त तुमचा मन विचलित झाल्यामुळे मनात चालू असलेले विचार हे सबकॉन्शस होतात (जाणिवेच्या पातळीपर्यंत पोचत नाहीत.) तुम्ही त्याकडे पाहणे सोडले कि विचार परत जाणिवेच्या पातळीवर येतातच. यामुळेच या साधनेचा सुरुवातीला ज्यांना फायदा होतो असे जाणवते त्यांना हा फायदा काही दिवसांनी अजिबात होत नाही असे लक्षात येईल. मनात विचार न येणे आणि मन विचलित झाल्याने विचाराची जाणीव न होणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि हि गोष्ट लक्षात न घेता संक्षी यांनी एवढा मोठा जडजंबाल शब्दांचा डोलारा रचुन ठेवला आहे. बाकी त्यांच्या इतके हुशार साधक या दुनियेत कोणीही नाही. बाकी सगळे संत महंत ओशो वगैरे भंपक आहेतअसे त्यांचे मत आहे.
मेंटल अॅक्टीविटी थांबणं
हे आपणच ठरवलेले कुभांड आहे. त्याचा आपल्याकडे काही तरी पुरावा आहे का? f MRI हे एक आधुनिक तंत्र आहे जे मेंदूची (मनाची) सक्रियता दाखवते. सिद्ध लोक जेंव्हा समाधी अवस्थेत जातात तेंव्हा त्यांच्या मेंदूची अवस्था काय असते ते या तंत्राने दिसू शकते. असलं काहीही न करता मेंटल ऍक्टिव्हिटी थांबवली असण्याच्या फुकटच्या थापा मारू नका