मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (चर्चा क्र. २)
💬 प्रतिसाद
(84)
क
कवटी
गुरुवार, 11/27/2008 - 10:32
नवीन
काल पासून आज पर्यंत यानी कितीवेळा कडक इस्त्री चा सफारी बदलला हो?
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 11/27/2008 - 07:11
नवीन
चतुरंग
- Log in or register to post comments
स
सागर
गुरुवार, 11/27/2008 - 07:17
नवीन
काल पासून मी सर्व वृत्त वाहिन्यांवर पहात आहे. जे पाहिले ते सगळे सुन्न करुन टाकणारे आहे
अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे
अनेक प्रश्न उपस्थित राहतात
१.
आलेले अतिरेकी सगळे गुजरात मधून मुंबईला थेट गेट वे ऑफ इंडिया मधून आले आणि सगळीकडे पसरले अशी बातमी आहे न्यूज चॅनल्स ची.
सागरी सीमा सुरक्षा दले काय झोपा काढत होती का? की पैसे खाऊन बोटी चेक न करण्याच्या विलासी शौक पायी कर्तव्याचा विसर पडला ?
२.
मुंबई पोलिस चा एक हवालदार गोळी लागलेला चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहिले. काय करावे त्याने? बिचार्याच्या हातात काठी होती
काठीने लढावे की काय त्याने एके-४७ बरोबर? हा सरकारचा नाकर्तेपणा आहे की पोलिस स्वतःच्या कर्मचार्यांनाच सुरक्षा देऊ शकत नाही तर सामान्य जनतेला काय कप्पाळ देणार?
मुंबईत राहणार्या आपल्या बांधवांचे आयुष्य एवढे स्वस्त आहे?
सरकारने याचा जाब दिला तर पाहिजेच. पण एवढी वर्षे झोपा काढत होते की काय सरकार?
ना सागरी सीमेवर लक्ष, ना भूसीमेकडे लक्ष
सगळे लक्ष आपले मतांच्या लाचारीकडे..... बांगला देशी लाखोंच्या संख्येने राजरोस भारतात सगळीकडे रोज पसरत आहेत आणि सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे.
ज्यांची निष्ठा सीमेपार वाहिलेली आहे अशांना आपल्या देशाचे नागरिकत्व? अरे कुठे फेडतील हे पाप काँग्रेसवाले... नरकातही यांना जागा मिळणार नाही. त्यांच्यासाठी यमालाही खास नरक तयार करावा लागेल.
राष्ट्रहित हे सगळ्या राजकारणापेक्षा पहिले आहे हे काँग्रेसच्या लक्षात का नाही येत?
घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध आणि मुंबईकरांचे अभिनंदन की अशा आतंकी कारवायांमधेही पळून न जाता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जखमींना मदत केली. आणि इंग्लंड टीमचाही जाहीर निषेध की असल्या अतिरेकी हल्ल्याचे कारण काढून मोठ्या पराभवाची मानहानी टाळून मैदानातून पळ काढला...
(देशभक्त) सागर
- Log in or register to post comments
स
सत्यवादी
गुरुवार, 11/27/2008 - 07:18
नवीन
11:09 AM: Latest reports say that the Navy and Army have taken control at Oberoi. Meanwhile, a child of foreign nationality and an Indian maid have been seen coming out of Nariman House in South Mumbai. Reports also say that US intelligence officials are among the foreigners killed at Taj Hotel.
-- सत्यवादी
- Log in or register to post comments
स
सुक्या
गुरुवार, 11/27/2008 - 07:27
नवीन
भारतात सरकार फक्त मृत व्यक्तींची यादी बनवण्यापुरते आणि ती यादी संपर्क माध्यमांना पुरवण्यापुरते शिल्लक आहे असे स्पष्ट जाणवले.
शिवराज पाटीलांसारखे ग्रुहमंत्री , मनमोहनासारखे पंतप्रधान अन लल्लु , अमरसिंह सारखे नेते या भारतात असतील तर आणखी काय व्हायचे शिल्लक आहे. सरदार पटेलांसारखा ग्रुहमंत्री पाहीलेल्या भारताला असले नेभळाट मंत्री पहायला मिळावेत ही खरी शोकांतीका आहे. या अतीरेक्यांची बाजु घेणारे महाभाग डोके वर काढु नयेत म्हणजे मिळवली. तसे हे तथाकथीत कैवारी या बाबतीत निषेध नोंदवण्याऐवजी मुग गिळुन गप्प राहतील असेच मला वाटते आहे. बघुया.
सर्व म्रुतांच्या आत्म्यास शांती लाभो. जखमींना लवकर आराम मिळो. म्रुतांचा आकडा न वाढो हीच ईश्वर्चरणी प्रार्थना.
सुक्या (बोंबील)
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
गुरुवार, 11/27/2008 - 07:48
नवीन
सर्वात महत्त्वाची गरज : आपला देश एक "सॉफ्ट टार्गेट" आहे ही प्रतिमा काहीही करून पुसली जायला हवी. जी हिम्मत त्यांना इस्रायल विरुद्ध होत नाही ती आपल्या विरुद्ध होता कामा नये. एकदा हे ध्येय निश्चित केले तर सरकार कुणाचेही येवो , ते कुणीही असोत : लालू, शिवराज , डॉ. सिंग, मायावती, अडवाणी ...कुणीही. सुरक्षा यंत्रणा ही तितकीच परिणामकारक असायला हवी. बस्स. एव्हढेच हवे आहे.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 11/27/2008 - 07:55
नवीन
खरे आहे तुमचे म्हणणे परंतु जोपर्यंत काहि विशिष्ट समाजाला खुश करण्याचा एककलमी कार्यक्रम बंद होत नाही तो पर्यंत असेच घडत रहाणार आहे. तुमच्यामाझ्यासारखा याविरोधात उभा राहिला तर संपुर्ण यंत्रणा केवळ आपल्याच विरुद्ध वापरली जाईल पण ज्यांचा बंदोबस्त करायचा ते राजरोसपणे गेट वे ऑफ इंडिया तुन प्रवेश करत रहाणार.
गेट वे चा गेट अवे होणे गरजेचे आहे. त्याकरता करावा लागणारा स्वार्थत्याग करण्याची हिंमत जनतेने अन जनतेच्या नेत्यांनी दाखवला पाहिजे. पण असे होणे फार अशक्य आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
गुरुवार, 11/27/2008 - 07:55
नवीन
आपल्या सरकार ला केव्हा समजणार काय माहिती... :(
स्वप्निल
- Log in or register to post comments
व
विसुनाना
गुरुवार, 11/27/2008 - 08:10
नवीन
सॉफ्ट टार्गेट तर आपण आहोतच! अनेक कारणे आहेत. विचार करायला लागले तर डोके भंजाळून जाते.
मागे मोठा इतिहास आहे.
कोणे एके काळी नंग्या तलवारी घेऊन लोक कत्ले-आम करत फिरत. आज एके-४७/५६, हँडग्रेनेडस घेऊन करत फिरत आहेत.
पाकिस्तान नावाची फॅक्टरी आहे. बांग्लादेश नावाची ऍंन्क्सिलरी आहे. आय एस आय नावाची आर अँड डी आहे. दिशाहीन तरुण नावाचे रॉ मटेरियल आहे. भारत नावाचे ओपन मार्केट आहे. मग दहशतवादाचे प्रॉडक्ट स्वस्तात तयार होऊन भरपूर खपायला काय प्रतिबंध आहे?
हे प्रकार आता इतक्या थराला गेले आहेत की (वर कुणी म्हटल्याप्रमाणे) दहशतवादी भारताला प्रॅक्टिस ग्राऊंड समजतात असे वाटू लागलेले आहे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? या चालीवर सरकारला कधीतरी डोके होते काय? असे म्हणावेसे वाटते. पायाखाली काय जळते आहे याची कल्पना करवत नाही. पण सामान्य भारतीय माणूस अजूनही समंजस आहे. त्याचे सामंजस्य 'मूर्खपणा' ठरू नये ही मनापासून इच्छा!
- Log in or register to post comments
प
पांथस्थ
गुरुवार, 11/27/2008 - 10:18
नवीन
नाना,
खेळ एकदम सोपा करुन सांगीतला हो.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
- Log in or register to post comments
अ
अनामिका
गुरुवार, 11/27/2008 - 07:53
नवीन
आबा प्रतिक्रिया देताना कापत होते. घाम फुटला होता त्यांना .#:S
काल रात्री हा हल्ला सुरु असताना रस्त्यावर उतरणार्यांमधे फक्त मला विनोद तावडे आणि रामदास कदम हेच दिसले.
बाकी स्वत:ला महाराजांचे वंशज म्हणवणारे शुरविर काँग्रेसचे कावळे मात्र शेपुट घालुन आपापल्या बंगल्यात कुठल्यातरी कोपर्यात अंग चोरुन बसले असावेत.
विलासराव केरळला कुठल्यातरी सुनामी संबंधातील उद्घाटनाला गेले होते आणि इथे मुंबईत अतिरेक्यांची सुनामी आली.
छातीचा कोट करुन उत्तरभारतियांचे रक्षण करु अशी गर्जना करणारे शरदराव देखिल कुठे गायब झालेत त्यांनाच ठावुक?
"अनामिका"
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 11/27/2008 - 13:45
नवीन
विनोद तावडे आणि रामदास कदम रस्त्यावर उतरले म्हणजे नक्की त्यांनी काय केले? ते देखील या कारवाईत सहभागी झाले होते का? असेच माहितीसाठी विचारत आहे.
- Log in or register to post comments
म
मैत्र
गुरुवार, 11/27/2008 - 07:59
नवीन
तीस वर्षापूर्वी शत्रू राष्ट्रात घुसून हजारो मैल रातोरात काटून एका अधिकार्याच्या मोबदल्यात २५० लोकांना परत आणणारे इस्रायल (पहा - एन्टेबी : http://en.wikipedia.org/wiki/Operation_Entebbe) आणि काही प्रमाणात मदत मिळत असताना अत्यंत कडवे अतिरेकी परत देणासाठी जाणारे गृहमंत्री.
प्रचंड फरक आहे दोन्ही मध्ये.
दुसरा मुद्दा : सुरक्षा फक्त अनेक कमांडोज आणि सैन्याने होत नाही. इस्रायल प्रत्येक नागरिकाची, अभ्यागताची जितकी माहिती ठेवली जाते त्या प्रमाणात भारतात १०% पण नसेल. काय ट्रॅक करणार ? इथे साधी मतदार यादी साठ वर्षात नीट करता आली नाही. लोकांवर लक्ष काय ठेवणार? सरकार दरबारी नागरिकांची किती माहिती सरकारला पाहिजे म्हणून ठेवली आणी ट्रॅक केली जाते? कदाचित काहीही नाही.
- Log in or register to post comments
अ
अनामिका
गुरुवार, 11/27/2008 - 08:04
नवीन
मैत्र तुमचा मुद्दा मान्य
अहो पण जिथे राज्यकर्त्यांनाच आपल्या घरातली लोकसंख्या नियंत्रित करता येत नाही. तिथे देशाच्या वाढत असलेल्या लोकसंख्येला आळा कधी घालणार्?आणि मग इतक्या मोठया प्रंमाणावर लोकसंख्या असलेल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचि माहिती कशी उपलब्ध असु शकणार नाही का?
आपल्याला अहिंसेचे डोस पोलिओ डोस प्रमाणे बालपणापासुन पाजले गेले आहेत तेंव्हा इस्रायल आणि आपली तुलना कुठल्याच बाबतीत होवु शकत नाही.
"अनामिका"
- Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/27/2008 - 08:05
नवीन
आतंकवादीचा ईमेल आला आला आहे एका चॅनेला !!!
वाचा येथे
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/27/2008 - 08:11
नवीन
सामना काय म्हणतो आहे ते पहा.
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/27/2008 - 08:11
नवीन
सामना काय म्हणतो आहे ते पहा.
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 11/27/2008 - 08:20
नवीन
अरेच्या..अबू आझमी साहेब कोठे आहेत...? हिम्मत आहे का बाहेर येउन अतिरेक्यांच्या समोर जायची....?
बरेचसे नेते घरीच आहेत...(आणि घरीच बरे..नाहीतर त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस धावायचे..)
खादाडमाऊ
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 11/27/2008 - 08:37
नवीन
काल बीबीसी वर एकदम हिंदी अक्षरे दिसायला लागली म्हणून कुतुहलाने पाहिले तर बातमी ताज,ओबेरॉयवरच्या हल्ल्यासंदर्भातच होती, क्षणभर समजलेच नाही.हल्ल्याचे स्वरुप समजले आणि संताप झाला.. मुंबईकर मिपाकर सुखरुप आहेत ना? असा विचारही लगेचच मनात आला पण जी हानी तेथे निरपराध लोकांना आणि पोलिस अधिकार्यांना मृत्यूचे द्यावे लागलेले मोल पाहून सुन्न व्हायला
झाले.
स्वाती
- Log in or register to post comments
अ
अप्पासाहेब
गुरुवार, 11/27/2008 - 09:56
नवीन
अफज्ल गुरु च्या फाशी बद्द्ल फार बोलले जाते, प्रत्यक्षात परिस्थीती जरा वेगळी आणि जोखमीची आहे. फाशी काय आत्ता ह्या क्षणी देता येइल , पण एका फार मोठ्या आंतर राष्ट्रीय दबावा मुळे हे करता येत नाही, अफज्ल गुरु च्या फाशीने काही फार मोठे गंभिर प्रश्न निर्माण होतील ह्याची बहुतेकांना कल्पना नाही.
अन्यथा माजी राष्ट्र्पती कलाम आणि आत्ताच्या प्रतिभाताइ अश्या व्यक्ती तोंडात मिठाची गुळणी धरुन बसणार नाहीत. त्यांना गप्प बसावे लागत आहे.
नेताजी सुभाष हयात असुन, त्यांचे वास्तव्य कोठे आहे हे नेहरु , शास्त्री , इंदिरा , मोरारजी यांना माहीत होतेच पण ते जाहीर करणे म्हणजे नेताजींना फाशीच्या तख्तावर चढवणे होते, त्याच्या मागचे कारण नेताजींनी केलेली हिट्लर व जपान्यांशी केलेली हात मिळ्वणी त्यांना युध्द गुन्हेगार ठरवते व स्वातंत्र्या साठी ब्रिटीशांशी केलेल्या करारा नुसार असा गुन्हेगार ब्रिटन कडे सोपवणे भाग पड्ले असते.
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
- Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/27/2008 - 10:13
नवीन
अफज्ल गुरु च्या फाशीने काही फार मोठे गंभिर प्रश्न निर्माण होतील ह्याची बहुतेकांना कल्पना नाही.
=))
फालतु विधाने नका करु !
जर योग्य पध्दतीने मुद्दा मांडा !!!
काय परिणाम होतील त्या **डेच्याला फाशी दिली तर ?
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 11/27/2008 - 10:22
नवीन
पण निदान एन्काऊंटर तरी करा साल्याचं! सांगा, पळुन जात होता, घातल्या गोळ्या!
तेही नसेल जमत तर दुसर्या एखाद्या कैद्याला फितवून (पैसे/शिक्षेत सवलत इ.इ.) त्याच्याकरवि मारा त्याला...सांगा कैद्यांच्या अंतर्गत हाणामारीत अकस्मात मृत्यू!
काय च्यायला, कसले बोडक्याचे प्रश्न निर्माण होतील हो?
उभ्या जगात....उभ्या जगात एकतरी देश असा दाखवा की जो स्वतःवर असा हल्ला झालानंतरही आपल्यासारखं दुसर्याच्या दारचं कुत्रं भुंकेल म्हणुन आपलीच गळचेपी करुन घेतो!
मालक, मतांचं राजकारण आहे सगळं. अफजलला फाशी दिली तर तेच फिस्कटेल हो.
एक पक्ष 'अफजल अल्पसंख्याक आहे त्याला आम्ही समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय, शक्य ती मदत करु' म्हणत मतांचा जोगवा मागतो तर दुसरा पक्ष 'अजुन अफजल जिवंत का?' असं विचारुन भडकलेल्या भावना मतांमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतोय.
तिसरे म्हणजे काश्मिरातले स्वयंघोषित राजकारणी आणि मानवाधिकारवाले! त्यांनाही अफजलमुळे स्थानिक लोकभावनांचा मलिदा मिळतोय ना!
गंगेचं गटार झालंय हेच खरं!
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 11/27/2008 - 13:11
नवीन
पण एका फार मोठ्या आंतर राष्ट्रीय दबावा मुळे हे करता येत नाही, अफज्ल गुरु च्या फाशीने काही फार मोठे गंभिर प्रश्न निर्माण होतील ह्याची बहुतेकांना कल्पना नाही.
काय सांगता काय राव. आईशप्पथ आम्हाला काहिच माहित नव्हतं.शिवराज पाटिल आणि तुम्ही एका गावचे काय?
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
तो बरा करण्याचं देशी जबरा औशीद हाय आपल्याकडं
वेताळ
- Log in or register to post comments
A
ANIMANI
गुरुवार, 11/27/2008 - 10:21
नवीन
Appsaheb,
there is no comparison between a terrorist and our national heroes.
you r insulting our history by comparing them.
I am fully agreed with Jainache Kart.
- Log in or register to post comments
व
विकि
गुरुवार, 11/27/2008 - 10:29
नवीन
शासनाच्या नाकर्तेपणामुळे व गुप्तचर विभागाच्या अपयशामुळे झालेल्या या हल्ल्यानिमित्त तातडीने राज्यसरकारने राजीनामा द्यायला हवा.राज्यात राष्ट्रपती लागवट त्वरीत लागू करायला हवी.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 11/27/2008 - 11:00
नवीन
रे हिंदबांधवा, थांब या स्थळी, दोन अश्रू ढाळी..
आपल्या शहीद पोलिस अधिकार्यांना अभिवादन म्हणून एक मेणबत्ती पेटवाल?
http://features.ibnlive.in.com/packages/mumbai-attack-light-a-candle.php
- Log in or register to post comments
श
शंकरराव
गुरुवार, 11/27/2008 - 11:02
नवीन
नेताजी सुभाष हयात असुन, त्यांचे वास्तव्य कोठे आहे हे नेहरु , शास्त्री , इंदिरा , मोरारजी यांना माहीत होतेच पण ते ....
अप्पासाहेबांनी चांजलाच जावईशोध लावला बॉ
अन्यथा माजी राष्ट्र्पती कलाम आणि आत्ताच्या प्रतिभाताइ अश्या व्यक्ती तोंडात मिठाची गुळणी धरुन बसणार नाहीत. त्यांना गप्प बसावे लागत आहे...
आता आप्पासाहेबानी तोंडात मिठाची गुळणी न धरता त्या एका फार मोठ्या आंतर राष्ट्रीय दबावा बद्द्ल लिहवे.
जैनाचं कार्ट यांच्याशी सहमत
अतिरेकी हे मनोरुग्न असतात
मनोरुग्नांना व्याधि अनेक
शंकरराव
- Log in or register to post comments
व
वल्लरी
गुरुवार, 11/27/2008 - 12:11
नवीन
अगदी बधीर व्हायला झाले आहे...
काय लिहावे ते पण सुचत नाही आहे..काल पासुन न्युज बघते आहे अगदी सुन्न होऊन..
परमेश्वर करो नी सगळे सुरळीत होवो...
- Log in or register to post comments
व
वल्लरी
गुरुवार, 11/27/2008 - 12:11
नवीन
अगदी बधीर व्हायला झाले आहे...
काय लिहावे ते पण सुचत नाही आहे..काल पासुन न्युज बघते आहे अगदी सुन्न होऊन..
परमेश्वर करो नी सगळे सुरळीत होवो...
- Log in or register to post comments
अ
अनामिका
गुरुवार, 11/27/2008 - 12:49
नवीन
मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा खरच जर श्रद्धांजली द्यायची मनापासुन इच्छा असेल तर आपली मन आणि मनगटे पेटवा.
उगिच फालतु अमेरिकन नाटक इथे नको.
मेणबत्त्या पेटवण्याचा फायदा एकच .त्या मेणबत्तीचे उत्पादन करणार्यांचा धंदा तेजीत येतो.
"अनामिका"
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 11/27/2008 - 12:57
नवीन
अनामिका, तुमच्या भावना कळतात, पण म्हणून इतरांच्या भावनांना अमेरिकन नाटक म्हणून कृपया हिणवू नका. :(
- Log in or register to post comments
अ
अनामिका
गुरुवार, 11/27/2008 - 13:31
नवीन
यशोधरा इथे कुणाच्या भावना दुखावण्याचा अथवा कुणालाही हिणवण्याचा प्रश्न नाही .
श्रद्धांजलीच द्यायची ना तर ती देवापुढे हात जोडुन निर्मळ मनाने देखिल देता येतेच की त्यासाठी मेणबत्त्याच कशाला हव्यात पेटवायला?
आयबीएन आल्यापासुन हा तमाशा जास्तच वाढू लागलाय.आज मेणबत्त्या पेटवायच्या आणि उद्या याच शहिदांची नाव आठवण्याचे कष्ट घ्यायचे.आपण सर्वसामान्य फक्त हृदयातुन विचार करतो पण या माध्यमांना आपला टिआरपी वाढवण्याशी मतलब असतो.
तुम्ही दुखावला गेला असाल तर क्षमा करा.
"अनामिका"
- Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/27/2008 - 13:34
नवीन
सहमत अनामिका !
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 11/27/2008 - 13:40
नवीन
तुम्ही तुमच्या घरावर काळा झेंडा लावा निषेध म्हणुन. ते योग्य आहे.
वेताळ
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2