Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

करोनाची लस : एक थोतांड

ग
गामा पैलवान
Sun, 02/28/2021 - 23:13
💬 255 प्रतिसाद
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली तर राज ठाकऱ्यांनी तिच्यासंबंधी भीडमुर्वत बाळगली नाही. डॉक्टर सुझन हम्फ्रीज या अमेरिकेतल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे मेडिकल डॉक्टर असून पेशाने मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांनी लशींकरणाविषयी प्रचंड शोधाशोध करून माहिती मिळवून २०१३ साली एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव : Dissolving Illusions - Disease, Vaccines, and The Forgotten History (2013) by Suzanne Humphries MD. हे पुस्तक येथे उपलब्ध आहे : १. https://www.amazon.in/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten/dp/1480216895 २. https://www.amazon.co.uk/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten/dp/1480216895 हे पुस्तक लिहितांना डॉक्टरबाईंनी रोमन बिस्त्रियांक या विदातत्ज्ञाची मदत घेतली आहे. सदर लेख या पुस्तकाची तोंडओळख करवून देण्यासाठी लिहिणार होतो. पण थोडं लिहिल्यावर कळलं की पुस्तकपरिचय हा आपला प्रांत नव्हे. मग म्हंटलं की सरळ सारांशच लिहून टाकूया. माझ्यासारख्या आळश्याला तेव्हढंच जमण्यासारखं आहे. तर आता मुद्द्याकडे वळूया. प्रकरण १ : गेले ते दिन गेले ( एकदाचे ) .... हे प्रकरण १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) जुन्या जमान्यातील सामान्य माणसाच्या आरोग्य अवस्थेचं किंवा अनावस्थेचं वर्णन करतं. गरीब माणसाचं सरासरी आयुर्मान १५ ते १६ वर्षं होतं. ते इतकं कमी असण्याचं कारण साथीचे रोग हे होतं. इंग्लंडमध्ये रोगांच्या साथी नेमेची येत असंत. भरीस भर म्हणून दाटलेली वस्ती व अंधारी घरं अशा रोगट वातावरणात रोग फोफावायला उत्तेजन देत. शिवाय अन्नपाण्याची ददात होतीच. पोषक अन्न केवळ उच्चभ्रू लोकांच्या मुलांनाच मिळे. पाणीही अशुद्धच प्यावं लागंत असे. संडास व पिण्याचं पाणी एकत्र होणं सर्वसामान्य बाब असे. घोड्याची लीद, डुकराचं प्रेत व खाण्याची टपरी लंडनच्या रस्त्यावर सुखेनैव एकत्र नांदत. वा न्यूयॉर्कमध्ये रोगट डुकरांचं मांस गरीब लोकांना बिनधास्तपणे विकलं जाई. प्रकरण २ : बालकांची हलाखी .... या प्रकरणांत १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) गरीब कुटुंबातल्या बालकांची हलाखीची स्थिती वर्णिलेली आहे. त्यांना दिवसाचे बाराबारा तास मजुरी करावी लागे व पगार जेमतेम खाण्यापूरता मिळे. अगदी मुलीसुद्धा खाणीसारख्या प्राणघातक जागेत बिनदिक्कीतपणे कामाला जुंपल्या जात. तिसाव्या वर्षापर्यंत कोणी जगली तर ती अपवादात्मक घटना असे. पारा, शिसे, आर्सेनिक वगैरे विषारी पदार्थांशी बालकांचा संपर्क येणे ही एक किरकोळ बाब असे. जखमा व दुखापती नित्याच्याच असंत. जगातल्या सर्वात श्रीमंत राष्ट्र असलेल्या अमेरिकेत दरवर्षी २,५०,००० बालकांचा कुपोषणाने मृत्यू होई. बालकामगार ठिकठिकाणी असले तरी बालकामगार हा शब्द मात्र आजून अस्तित्वात यायचा होता. अतीव व जीवघेण्या श्रमांतनं सुटायचा मार्ग नव्हता. मग कष्टांचा विसर पाडण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जाई. त्यामुळे तब्ब्येत अधिकंच खराब होई. ऐन वाढीच्या वयांत व्यसनं केली की प्रजनन व आयुर्मान यांवर विपरीत परिणाम होई. प्रकरण ३ : रोग हा नियम तर निरामय जीवन हा अपवाद रोग हा आयुष्याचा अविभाज्य घटक कसा होता, ते या प्रकरणांत सांगितलं आहे. औद्योगिक क्रांतीमुळे गावं ओस पडून शहरांत अनियोजित व प्रचंड गर्दी झाली होती. शहरी जागामालकांनी नफ्यावर डोळा ठेवून श्रमिकांसाठी अतिशय दाटीवाटीने निवासालये बांधली. तिथे राहायची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ असे. हे रोगांना आमंत्रण असे. रोगांच्या साथीत माणसं आषाढी माश्यांसारखी टपाटप ( की पटापट ? ) मरून पडायची. मलनि:सारण यंत्रणा नामक प्रकार अस्तित्वात नसल्याने विषमज्वर ( = टायफस ), पटकी ( = कॉलरा ), हगवण वगैरेंची सतत मांदियाळी असे. रोग्यांना हाताळण्याच्या आधी डॉक्टर व परिचारिका यांनी स्वत: निर्जंतुक होणं १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालं. वैद्यकीय क्षेत्राची काय अवस्था होती ते कळलं ना ? पुढे अनेक रोगांनी उडवलेल्या हाहाकाराच्या कहाण्या दिल्या आहेत. किमान स्वच्छता पाळल्याने लागणीचं प्रमाण कसं झपाट्याने घसरू लागलं ते ही दिलं आहे. लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. प्रकरण ४ : देवीचा रोग व पहिली लस देवीच्या लशीने माणसं कशी मेली, ते या प्रकरणात सांगितलं आहे. रोगापेक्षा औषध भयंकर. कारण की लस तयार करतांना लागण झलेला विषाणूत फेरफार ( = म्युटेशन ) होत असे. हा फेरफार हाताळायचा निश्चित मार्ग कोणाकडेही नव्हता. सब घोडे बारा टक्के या हिशोबाने एकंच लस सरसकट सर्वांना दिली जाई. परिणामी एकाच आजाराचे वेगवेगळे विषाणू निर्माण झाले. वेल डन. इ.स. १७५० च्या सुमारास ज्या लशी विकसित झाल्या त्या गोऱ्यांपेक्षा काळू लोकांना जास्त हानीकारक होत्या. हा मुद्दाही चर्चेत घेतला पाहिजे. १९०८ च्या सुमारास लशींमुळे मिळणारं संरक्षण तात्पुरतं असतं हे लक्षांत आलं. लान्सेट जर्नलने डॉक्टर जेन्नरच्या देवीच्या लशीवर रोचक टिपणी केली आहे. त्यानुसार ही लस गाईच्या सडांपासून विकसित केलेली नसून घोड्याच्या पुळीपासनं मिळवलेली होती. ही लस नंतर गाय, माणूस व इतर पशूंतून फिरवण्यात आली. आजच्या घडीला देवीची लस म्हणून जे काही आहे ते नैसर्गिक नसून कृत्रिम एजंट आहे. तरीही जेन्नरला देविच्या लशीचा संशोधक म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. तत्कालीन डॉक्टरांनी लगेच दाखवून दिलं की गाईच्या सडांपासून लस मिळालेल्या अनेकांना नंतर देवी आल्या होत्या. या परिस्थितीत दयाळू इंग्रज सरकारने इंग्लंडात जबरदस्तीने लशी टोचवल्या. परिणामी लशींच्या या कृत्रिम हस्तक्षेपामुळे देवी रोगाची साथ अधिक तीव्र झाली. १८४४ ला लंडन च्या देवीच्या रुग्णालयात १७८१ पेक्षा जास्त रोगी दाखल झाले. रोगापेक्षा लस भयंकर ठरली. बोस्टन (इंग्लंड) मध्ये सुमारे ४० वर्षं नाहीसा झालेला देवीचा रोग लशी टोचल्यावर परत उफाळून आला. पुढे लशीकरणामुळे निर्माण झालेल्या नवीन रोगांची व मृत्यूंची महिती दिलेली आहे. प्रकरण ५ : दूषित लशी रोगजंतूंमुले रोग होतात हे मत स्वीकारलं जाण्यापूर्वी दूषितत्वाचं मोजमाप केलं गेलं नव्हतं. त्यामुळे जंतुसिद्धांतावर ( = Germ Theory वर ) प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नंतर खूर असलेल्या जनावरांना होणारा मुखपादरोग दूषित लशींमुळे माणसांना कसा होऊ लागला याची सुरस व चमत्कारिक कहाणी वर्णिलेली आहे. प्रकरण ६ : भली थोरली निदर्शने एका बापाचं पहिलं मूल लशीमुळे मेलं होतं. साहजिकंच त्याने दुसऱ्या मुलाच्या लशीकरणाला विरोध केला. त्याबद्दल बापाला तुरुंगात पाठवलं गेलं. कित्ती सुंदर न्याय ! या प्रकरणात इंग्लंडमधल्या लेस्टर ( = Leicester ) नगरात लोकांनी लशीकरणाच्या थोतांडाविरुद्ध कसा लढा दिला ते सांगितलंय. लोकांना लशीकरण नको होतं कारण लहान बालकांचे भयानक हाल व्हायचे. कोण आई आपल्या तान्ह्या मुलाला सरकारी कसायांच्या तावडीत सोपवेल ? आर्थर वॉर्ड गरीब मजूर होता. त्याची पहिली दोन मुलं लशीमुले जखमी झाली होती. त्याने तिसऱ्यास लस टोचायला नकार दिला. त्यामुळे सरकारी कसाई त्याच्या घरी पोहोचले. तो घरी नव्हता तर त्याच्या पोटुशा बायकोला धमक्या देऊन दंड भरायला लावला. तिच्याकडे पैसे नव्हते व घरातली चीजवस्तू दंडमूल्याची भरपाई इतकी नव्हती. तिला कसाई खेचडत तुरुंगात घेऊन गेले. त्यामुळे तिच्या मुदतपूर्व प्रसूतीतून मृत बालक जन्मलं. आवडली तुम्हाला कथा ? लेस्टरचे लोकं देवीच्या लशीचा जनक डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांस बालहत्यारी म्हणायचे. प्रकरण ७ : चाकोरीबाह्य प्रयोग देवीच्या रोगाविरुद्ध लेस्टर नगरात उदयाला आलेली अलगीकरणाची पद्धत ( = quarantine ) कशी होती ते या प्रकरणात वर्णिलेलं आहे. देवीची लस टोचण्याऐवजी अलगीकरण हा उपाय बराच प्रभावशाली होता. डॉक्टर मिलर्ड यांनी १९१० साली निष्कर्ष काढला की अर्भकांना दिलेल्या देवीच्या लशीमुळे रोगफैलाव कमी झाला नाही. सक्तीची लसटोचणी आजिबात समर्थनीय नाही. पण सरकारी कसायांनी घबराट माजवली की कधीतरी मोठ्ठी साथ येणार. तशी साथ कधीच आली नाही. उलट लेस्टर मधली देवीच्या रोग्यांची संख्या लशीकृत झालेल्या उर्वरित इंग्लंडच्या मानाने काबूत राहिली होती. लस म्हणजे जणू अमृत आहे असा अपप्रचार धूमधडाक्याने केला जातो. प्रत्यक्षात लस हे एक थोतांड आहे. लेस्टर पद्धत नंतर युगोस्लाव्हियात १९७२ साली वापरण्यात आली. प्रकरण ८ : सरकारी दडपशाही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रज सरकारने इंग्लंडमध्ये लसटोचणीच्या सक्तीच्या मोहिमा राबवल्या. भले बालकं मरोत अथवा जायबंदी होवोत. पर्यायी वैद्यकीय दृष्टीकोनास अर्थातंच केराची टोपली दाखवण्यात आली. या मोहिमांना न्यायालयाचाही पाठींबा मिळे. जो नागरिक या सक्तीस विरोध करेल त्यास दंड, जप्ती, इत्यादिस सामोरे जावे लागे. अमेरिकेतही अशी प्रकरणे घडली. त्या वेळेस युजेनिक्स नामक दुर्बलोच्छेदक शास्त्र जाम प्रचलित होतं. लस घेतलेल्यावर त्रास होणारे लोकं जगण्यास नालायक आहेत असा युजेनिक्सचा सिद्धांत असल्याचं लोकांनी मनावर घेतलं. मानसिक दृष्ट्या अस्थिर लोकांचं निर्बीजीकरण करण्यात येत असे. त्याच धर्तीवर लस न घेतलेल्यांचे निर्बीजीकरण करण्यात येईल अशी भीती व्यक्त होत असे. युजेनिक्स ( = दुर्बलोच्छेदन ) आणि सक्तीची लसटोचणी यांचा घनिष्ट संबंध आहे. नाझी राजवटीत युजेनिक्स ला राजमान्यत्व लाभलं होतं. प्रकरण ९ : आर्थर स्मिथ या बालकाची यातनामय कहाणी या यातना आर्थर स्मिथ नामे ११ वर्षीय बालकाला झालेल्या आहेत. ही लशीच्या दुष्परिणामांची कहाणी आहे. तो कसाबसा वाचला खरा, पण अंगावर डाग पडले ते कायमचे. काही बालकं इतकी सुदैवी नव्हती. त्यांच्याही कहाण्या या प्रकरणांत आहेत. प्रकरण १० : आरोग्यक्रांती गटाराचं पातळलेलं पाणी हे प्रमुख पेय नसेल तर आरोग्य सुधारणार नाही काय ? या प्रकरणात वैयक्तिक व खासकरून सार्वजनिक स्वच्छतेमुळे आरोग्य कसं सुधारलं ते वर्णिलेलं आहे. गलिच्छपणामुळे रोग होतात हे १९ व्या शतकाच्या मध्यात युरोप-अमेरिकेच्या जणू गावीच नव्हतं. धारणा बदलल्याने हळूहळू आरोग्यात वाढ होत गेली. अर्थात, झोपडपट्टीदादांनी स्वच्छतेच्या सुधारणांना विरोध केलाच. कारण झोपडपट्ट्यांपासनं त्यांचा फायदा होत होता. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लंडनमध्ये हळूहळू मलनि:सारण सुविधा उभारण्यात आल्या. जलकक्ष म्हणजे water closet म्हणजे WC ही संज्ञा उदयास आली. त्याआधी मानवी विष्ठा कुठेही टाकली जायची. २० व्या शतकाच्या पहिल्या दशकांत ( म्हणजे १९०० सालच्या आसपास ) हे जलकक्ष लंडन पालिकेच्या गटारांना जोडले जाऊ लागले. आज आपण युरोप-अमेरिका-भारत इत्यादी देशांच्या शहरांत जी गटारव्यवस्था पाहतो ती केवळ शंभर सव्वाशे वर्षंच जुनी आहे. दुधाचं पाश्चरीकरण सुरु झालं. त्यमुळे बालमृत्यू प्रचंड प्रमाणावर उणावले. याखेरीज इतर सामाजिक सुधारणाही राबवल्या जाऊ लगल्या. उदा. : किमान वेतन, नोकरीच्या जागी सुरक्षितता नियम, बालकांची पिळवणुकीविरुद्ध कायदा, इत्यादि. त्यामुळे जीवनमान ( life standard) उंचावलं. या सर्व सुधारणांत लशीचं योगदान नगण्य होतं. पण हवा अशी केली गेली की लशीमुळे म्हणे रोग नाहीसे होतात. प्रकरण ११ : साथीच्या रोगांत आश्चर्यजनक घट अमेरिकेत देवी ५ पैकी १ ठार मारीत. हे प्रमाण घटून ५० पैकी १ वर आलं व नंतर ३८० पैकी १ वर घसरलं. १८९७ च्या अखेरीस अमेरिकेत तीव्र देवी जवळजवळ नामशेष झाला. १९५० पर्यंत इंग्लंड व अमेरिकेतनं देवीच्या साथी नामशेष झाल्या होत्या. पूर्ण लशीकरण न करताही हे साध्य झालं. स्कार्लेट ताप ( स्कार्लेट फीव्हर ) तर कुठल्याही लशीशिवाय नाहीसा झाला. अशाच अनेक रोगांची घट ( विषमज्वर, डांग्या खोकला, डिप्थेरिया, क्षय, हगवण ) आलेखांसह दर्शवली आहे. रुग्णालये ही अस्वच्छ व दाटीग्रस्त असल्याने लागणकेंद्रे होती. ती हळूहळू सुधारू लागली होती. एकंदरीत आहार, पोषण, स्वच्छता, इत्यादि आरोग्यविषयक जाणिवांत सुधारणा होत गेल्या. यांत लशीचा सहभाग जराही नव्हता. प्रकरण १२ : पोलियो परतून आलाय पोलियोची लस पहिल्यांदा शोधणाऱ्या जोनास साल्कने ( डॅरल साल्क सह ) म्हंटलंय की ही दुर्बळ विषाणूयुक्त लस कधीकधी पोलियोस रोखण्याऐवजी रोगाचा प्रादुर्भाव घडवून आणू शकते. दुसरी लस डॉक्टर साबिनने शोधलेली मौखिक लस आहे. तिच्यानेही आज पोलियो होऊ शकतो. पोलियोचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बुल्बर पोलियो हा सर्वात गंभीर प्रकार आहे. तो मेंदूच्या लंबमज्जेस ( = ब्रेनस्टेम ) हानी पोहोचवतो. त्यातून पुढे पक्षाघात होतो. पण हा पक्षाघाती पोलियो फार कमी प्रमाणावर आढळतो. नैसर्गिक पोलियोचा विषाणू अनेक शतकांपासून मानवी आतड्यांत सुखेनैव नांदंत आला आहे. मग विसाव्या शतकात नेमकं काय घडलं की, ज्यामुळे त्याच्यापायी पक्षाघात होऊ लागले ? मौखिक लशीचे जनक डॉक्टर अल्बर्ट साबिन यांनी नेमका प्रश्न विचारलाय. अमेरिकी नेटिव्हांत पोलियोरुद्ध आपसूक प्रतिकारशक्ती उत्पन्न झाली होती. मात्र प्रगत व स्वच्छतेबाबत दक्ष असलेल्या अमेरिकी वसाहतींत पोलियोची लागण का होतेय ? हा पोलियो विसाव्या शतकांतच का उदयाला आला ? विषाणू तर हजारो वर्षांपासून माणसाच्या आतड्यांत रहात आलाय. तर पोलियोचं कारण आहे कृत्रिम आहार. साखर, मैदा, दारू, तंबाखू, इत्यादी सवयी तसेच डीडीटी, अर्सेनिक, विविध लशी, प्रतिजैविके यांच्यामुळे माणसाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाली. म्हणून पोलियोसारख्या रोगांमुळे पक्षाघात होऊ लागले. पोलियोच्या छत्राखाली अनेक रोग समाविष्ट केले गेले. तसेच इतर कारणामुळे पक्षाघात झाला तरी त्यावर पोलियो म्हणून छाप मारण्यात यायचे. आज जसं काही झालं की लगेच करोनाचा छाप मारला जातो, अगदी तसंच पूर्वीही झालंय. पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याख्येविषयी प्रश्न उपस्थित केलेत. वाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोलियोच्या उपचारांत बाधित स्नायूस जखडून टाकीत असंत. जखडल्यामुळे स्नायूची अधिकंच हानी होई. उलट स्नायू मोकळे केले व ठराविक व्यायाम केले तर तो बरा ( = रीकव्हर ) व्हायचं प्रमाण वाढे. याबाबत सिस्टर केनी हिचे व्यायामोपचार प्रसिद्ध झाले. पण ऐकणार कोण. लशीचे मार्केटिंग करायला जखडलेली बालकं अधिक उपयुक्त ठरतात, मोकळेपणे बागडणारी नव्हे. पोलियो पूर्णपणे गेलेला नाहीये. त्याला ट्रान्सव्हर्स मायलिटीस असं नवीन नाव मिळालंय. माझ्या अंदाजाप्रमाणे मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील पोलियोचाच एक प्रकार असावा. ट्रान्सव्हर्स मायलिटीस होण्याच्या संभाव्य कारणांमध्ये लस हे ही एक कारण आहे. पुढे लेखिकेने डीडीटी मुळे पोलियोसारखं एक लक्षण बळावतं, त्याचा सांगोपांग उहापोह केला आहे. भारतातल्या डीडीटी चा सुळसुळाट असल्याने त्यावरही भाष्य केलं आहे. नंतर लेखिकेने अर्सेनिक विषबाधेवर चर्चा केली आहे. या विशाबाधेतून पोलियो सदृश लक्षणं उत्पन्न होतात. अर्सेनिक हे औषध म्हणून सुरक्षित मानलं जाई. साहजिकंच अर्सेनिकच्या विषबाधेचे रोगी पोलियोचे म्हणून गणले जात. यानंतर लेखिकेने सिफिलीसच्या पोलियोसदृश काही लक्षणांचा विचार केला आहे. पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याधीमूल्याचा ( = मॉर्बिडिटी चा ) विचार केला आहे. कालानुक्रमे व्याधीमूल्य कसकसं बदलंत गेलं हे मांडलं आहे. बालकांच्या टॉन्सिल ग्रंथी उचकटून काढल्याने पोलीयोत कशी वाढ झाली ते चर्चिलेलं आहे. क जीवनसत्वामुळे पोलियो कशा बरा झाला याच्या अभ्यासकथा ( = केस स्टडीज ) वर्णिलेल्या आहेत. यापुढे प्रयोगशाळेतल्या लशीमुळे रोगाची साथ कशी आली व बळावली ते लिहिलं आहे. यापुढे पोलियोचा विषाणू कृत्रिम पद्धतीने निर्माण करता येतो, हे लिहिलेलं आहे. ही पद्धत रासायनिक असून अजैविक आहे. यापुढे साल्कच्या लशीमुळे उत्पन्न झालेली कटर नामे कुप्रसिद्ध रोगाची साथ वर्णिलेली आहे. यांत लशीतल्या जिवंत विषाणूमुळे अनेक बालकं व नजीकचे लोकं विनाकारण मेले, तर काहीजण जन्मभरासाठी लुळेपांगळे झाले. सक्तीच्या लस टोचणीचा समर्थक पॉल ऑफिट याने मान्य केलंय की कटर रोग हा कृत्रिम असून नैसर्गिक पोलियोपेक्षा कैक पटीने जास्त हानिकारक आहे. कटर व वायथ या दोन आस्थापनांच्या लशी वैज्ञानिक चाचणीप्रक्रिया पार न पडताच बाजारात येऊ दिल्या गेल्या.... यासाठी सुरक्षा निकष धाब्यावर बसवण्यात आले.... बाकी सगळं मी सांगंत बसंत नाही. यानंतर माकडाच्या उतींतून निर्मिलेल्या लशीत कर्करोगजन्य पदार्थ सापडल्याचं लिहिलंय. या दूषित लशीमुळे कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं. आता या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतातील पल्स पोलियोच्या लशीचा गोंधळ वर्णिलेला आहे. प्रयोगशील लस असल्याने रोगाचं उच्चाटन तर झालं नाहीच, वर अतिरिक्त रोग बळावले. नैसर्गिक पोलियोपेक्षा कृत्रिम पोलियो जास्त प्राणघातक ठरला. भारतात नैसर्गिक पोलियोची जागा कृत्रिम पोलियोने घेतली आहे. वेल डन ! ५ वर्षाच्या बालकाला ३२ डोस दिले गेलेत. फार छान !! निष्कर्ष : मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक पोलियो नाहीसा होत चाललाय. आता फक्त कृत्रिम पोलियो उरेल आणि नवजात बालकाला जन्मत:च मिळणारी पोलियोची रोगप्रतिकारक शक्ती निरुपयोगी ठरेल. आता बसा बोंबलंत. प्रकरण १३ : डांग्या खोकला (Pertusis) या रोगाने अमेरिकेत १९११ साली सुमारे १ लाख लोकांचा बळी घेतला. तर १९६० साली याने त्यामानाने नगण्य बळी घेतले. १९४० च्या दशकांत डांग्या खोकल्याची लस वापरांत पसरली, पण त्यापूर्वीच रोगाचा मृत्यूदर ९२ % ने खालावला होता. इंग्लंड व वेल्स मधले निकाल याहून ठाशीव आहेत. त्यांनुसार लशीकरणापूर्वी मृत्यूदर ९९ % ने खालावला होता. तसेच १९८४ साली उघडकीस आलं की डांग्या खोकल्याची लसटोचणी बंद केल्यावर त्याचे रोगी कमी झाले. शिवाय लस टोचल्याने रोग बळावण्याची नेहमीची रड आहेच. क्यालीफोर्नियातल्या सान रफायेल येथल्या रुग्णालयात २०१२ सालच्या अभ्यासानुसार डांग्या खोकला झालेल्या बालकांपैकी बहुसंख्य बालकांना लस टोचली होती. याचा अर्थ ही लस आजीव सुरक्षा देण्यास पूर्णपणे असमर्थ ( की अपयशी ? ) ठरली होती. मग द्यायचीच कशाला ? झक मारायला ? यापुढे लेखिकेने प्रतिपिंड आद्यपराध अर्थात Original Antigenic Sin ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर लस टोचल्याने प्रतिकार यंत्रणा पंगू होते किंवा वेडीवाकडी वागू लागते. त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती क्षीण होते. परिणामी ज्या रोगाची लस टोचली आहे, नेमक्या त्याच रोगाला माणूस बळी पडतो. लशीद्वारे दुर्बळ विषाणू सोडल्याने प्रतिकारयंत्रणेची फसवणूक होते. ही फसवणूक सुधारता येत नाही. मग टोचून घेत बसा आयुष्यभर लशी एकापाठोपाठ एक. यापायी डांग्या खोकला आता बालकांना न होता प्रौढांना होतोय. कोणीही लशीकरण तत्ज्ञ प्रतिपिंड आद्यपराधाविषयी काहीही बोलंत नाही. लशीसंबंधी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात ना ! बोलायला तोंड आहे कुठे ! प्रकरण १४ : गोवर १९ व्या शतकात ( १८०० चं शतक ) इंग्लंड व अमेरिकेत दर दोनेक वर्षांनी गोवराची साथ यायची. दाखल मुलांपैकी २० % परलोकवासी व्हायची. पण हे प्रमाण १९६० पर्यंत प्रचंड घसरलं. ही घसरण लशीकरणाच्या अगोदर झालेली आहे. स्वच्छता, आहार व पोषण यांत सुधारणा झाल्याने हा फरक पडला आहे. गोवराच्या मृत विषाणूंच्या लशीमुळे अधिक तीव्र रोगाची लागण होई. हा नेमका उलट परिणाम आहे. रोगप्रतिकारक यंत्रणेत लशीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याने झालेला प्रतिपिंड आद्यपराध हे मूळ कारण आहे. तसंच जिवंत लशीमुळेही गोवर होई. या गोवरामुळे ताप येऊन पुरळ उठे. हा परिणाम टाळण्यासाठी गोवराची प्रतिपिंडे टोचली जात. त्यांच्यामुळे रोगप्रकरण अधिक गुंतागुंतीचं होई. यानंतर अमेरिकेतल्या गोवर लशीकरण प्रकल्पाचं अपयश वर्णिलेलं आहे. अनावश्यक लशीकरणामुळे गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला. परत डांग्या खोकल्यासारखीच परिस्थिती उद्भवली. गोवराच्या लागणी व्हायच्या. मात्र अमेरिकेत सगळं खापर लस न घेतलेल्यांवर फोडण्यात आलं. खरा प्रकार असा होता की लशीमुले नैसर्गिक प्रतिकारक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला होता. २००० साली अमरिकेतनं गोवर संपल्याचं जाहीर करण्यात आलं, परंतु हे जाहीर विधान २०१२ साली मागे घेतलं गेलं. एकदा का लस घेतली की आयुष्यभर परत परत घ्यावी लागते. करोनाचं असंच होणारे. याविषयी शंका नको. यानंतर प्रतिपिंडांविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रतिपिंडे ही खरोखरंच रोगजंतूंना ठार मारतात की ती केवळ अंगुलीनिर्देशक लेबल असतात ? प्रतिपिंडांची कमतरता ( agamma-globulinemia ) असतांनाही गोवर बरा झाल्याची काही प्रकरणं घडलीत. यावरून लस व तिची उपयुक्तता यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह चिकटतं. यानंतर प्रतिपिंड प्रोत्साहन प्रक्रिया वर्णिली आहे. कधीकधी प्रतिपिंडांमुळे विषाणूस यजमान पेशीस ओळखणं सोपं पडतं. यांस antibody dependent enhancement म्हणतात. याचा अर्थ लस टोचल्याने तिच्या परिणामामुळे लागण व्हायची शक्यता वाढते. हा नेमका विपरीत परिणाम आहे. काही लशींमुळे पुरळ न उठता गोवर होतो. गोवराच्या विषाणूमुळे पुरळ येत नसून शरीराने विषाणूंवर हल्ला केल्याने उठतं. जर लस टोचली तर प्रतिकारक्षमता बिघडल्याने पुरळ उठंत नाही, तरीपण रोग होतोच. असा बिनलक्षणी गोवरही झाल्याची प्रकरणं उजेडांत आलेलीआहेत. मग लस घेतलेल्यांना कळणार कसं की लस अपयशी ठरली आहे ते ? बसा बोंबलंत. यानंतर गोवराची लागण कमी होण्याविषयी संभाव्य कारणांचा विचार केला आहे. यानंतर लशीमुळे अर्भकाच्या मातृदत्त प्रतिकारशक्तीचा कसा ऱ्हास होतो ते वर्णिलेलं आहे. गोवरावर आईचं दूध व लस यापैकी आईचं दूध अधिक परिणामकारक आहे. यानंतर जीवनसत्वांचा योग्य पुरवठा प्रतिकारशक्ती कशी वाढवतो ते सांगितलं आहे. प्रकरण १५ : उपासमार, स्कर्व्ही व क जीवनसत्व शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते. स्कर्व्ही म्हणजे धातुविदरण या व्याधीचं लक्षण हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतं. मात्र ही पूर्ण शरीराची व्याधी आहे. हिच्यात शरीरास धरून ठेवणारी कोलाजेन ( collagen ) नामे ऊती विदीर्ण पावते. त्यामुळे शरीर अक्षरश: खिळखिळे होते. आहारातनं क जीवनसत्व न मिळाल्याने ही व्याधी होते. हिचा परिणाम हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतो. त्या हुळहुळ्या होऊन जराशा धक्क्याने रक्त पाझरू लागतं. ही व्याधी बळावल्यावर रोगी थकव्याने वारंवार झोपू लागतो व एके दिवशी कायमचा झोपतो. अमेरिकेत इ.स. १८५० च्या दशकात क्यालिफोर्नियात सोन्यासाठी धडपड अर्थात गोल्ड रश ऐन भरात होती. तेव्हा धातुविदरण व्याधीने पटकी ( = कॉलरा ) पेक्षा जास्त बळी घेतले. अमेरिकी नागरी युद्धात ( इ.स. १८६१ ते १८६५ ) प्रत्यक्ष लढाईत कामी आलेल्या सैनिकांची संख्या अवघी १ % होती. बाकीचे ९९ % रोगराई व इतर कारणांनी मृत्युमुखी पडले होते. यांत धातुविदरण व हगवण आघाडीवर होते. क जीवनसत्वात अस्कॉर्बिक आम्ल असतं. त्यामुळे पेशींचं चयापचय सुधारतं. मुडदूस ही व्याधी ड जीवनसत्वाच्या कमतरतेने होते. मात्र हिच्यातनं बरं होण्यासाठी ड संगे क जीवनसत्वही आवश्यक असतं. क जीवनसत्व एखाद्या प्रतिजैविकासारखं काम करतांनाही आढळून आलंय. कालांतराने आहारात सुधारणा झाल्याने धातुविदरण व्याधी उतरणीस लागली. उदा. : इंग्लंडध्ये धातुविदरण व्याधीची लागण इतर सांसर्गिक आजारांसारखी झपाट्याने खाली आली. क जीवनसत्व केवळ व्याधींवर उपयुक्त नसून सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती देखील बळकट करतं. कुठल्याश्या निरर्थक लशी टोचून घेण्यापेक्षा आहारात सुधारणा केलेली काय वाईट ? क जीवनसत्व जर इतकं गुणी आहे तर मग आपले डॉक्टर हे आपल्याला समजावून का सांगंत नाहीत, असा प्रश्न पडतो. क जीवनसत्वाच्या परिणामाविषयी नियोजित स्वैरचाचण्या ( = randomised controlled trials ) आजवर कोणीही घेतल्या नाहीयेत. इतक्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करून नेमकं काय साध्य होतं ? उत्तर सोप्पंय, औषध आस्थापनांचा फायदा ! प्रकरण १६ : हरवलेले उपचार शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते. आधुनिक वैद्यकातल्या अनेक घातक संकल्पना केवळ अंधविश्वासाच्या आधारे प्रचलित करण्यात आल्या. उदा.: दुर्बलोच्छेद ( = Eugenics ), थालीडोमाईड, डाय-ईथाईल-स्टिल-बेस्ट्रॉल. यांत एक भर म्हणजे केवळ लस टोचल्याने रोग बरा होतो. प्रत्यक्षात लस ही रोगापासून संरक्षण करीत नाही. या प्रकरणात इतर सुलभ, स्वस्त व अधिक परिणामकारक उपायांचा विचार केला आहे. विषय बराच मोठा आहे. या छोट्याशा प्रकरणांत दालचिनी, कांदा, लसूण, एन्चिनेशिया, जिकामा, ताज्या फळांचा रस, सफरचंदाचे सायडर व्हिनेगर, कॉड माशाच्या यकृताचे तेल, रजतभस्म द्राव ( चांदीचे कोलॉयडल सोल्युशन ), इत्यादि पदार्थांच्या जंतुघ्न गुणांचा परामर्श घेतला आहे. काही उदाहरणे : प्रतिजैविकांना दाद न देणारे नफ्फड ब्याक्टेरिया दालचिनीमुळे आटोक्यात येतात. कांदा भरपूर खाणाऱ्या जवळजवळ सर्व ( इटालियन, पोलिश, हंगेरियन, इत्यादि ) लोकांना देवी येत नाहीत. लसणाने क्षय व डांग्या खोकला यांवर उतार पडतो. प्रकरण १७ : भीती व धारणा लोकांची समजूत करवून दिलीये की जग धोकादायक आहे. म्हणून तुम्ही तुमची सुरक्षा सरकार व मोठ्या आस्थापनांच्या हाती सोपवा. ती तशी खरोखरंच सोपवावी का ? उत्तर नकारार्थी आहे. लोकांनी आपला शहाणपणा व सुरक्षा का म्हणून गहाण ठेवायची ? या विषयाचा सदर प्रकरणांत उहापोह केला आहे. या भीतीच्या कचाट्यातनं डॉक्टरांचीही सुटका नाही. खूपदा ते ही स्वतंत्र विचार त्यागून प्रचारतंत्रास बळी पडतात. आज अलोपथीच्या मते मानवी शरीर म्हणजे रसायनांचा समूह असून त्यास शल्यकर्म, रसायने, प्रतिजैविके वगैरेंच्या सहाय्याने कसंबसं नियंत्रणात ठेवायचं असतं. हे नियंत्रण कुठवर, तर जीव जाणार नाही या बेताने. असो. डॉक्टर चार्ल्स क्रेटन ( Dr. Charles Creighton ) याने १९०३ साली देवीच्या लशीचे धोके, परिणामकारकता, पुनर्लशीकरण व कायदेशीर बाबी यांविषयी बरंच लेखन केलं. त्याचा एक अहवाल बनवला व तो एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका मध्ये प्रसिद्धही झाला. पण १९२२ साली हा मजकूर गाळून त्या जागी लसोपचार नामे मजकूर घुसडण्यात आला. त्यात कसलाही पुरावा नसतांना लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मिळते असा धादांत असत्य दावा केला गेला. कोणी केलं हे ? ओळखा पाहू ! ही विलक्षण लस म्हणे एडवर्ड जेन्नरने शोधली. घंटा तिच्यायला संशोधन. यापुढे जेन्नरचा हवाला देऊन 'घातक रोगजंतू व जीवनरक्षक लस' ही बिनबुडाधी धारणा ठासून वारंवार मांडली जाऊ लागली. १९२० च्या दशकांत व नंतर अमेरिकेत अनेक चित्रविचित्र ( bizzare ) लशींचा सुळसुळाट झाला आणि त्यांच्या पोकळ व भरमसाट दाव्यांना ऊत चढला. तो आजवर टिकून आहे. साहजिकंच आजचं अलोपथी वैद्यक हा एक रिलीजन होऊन बसला आहे. दुसरं काय ! लागणप्रवर्तक हे लागणकारक नव्हेत. Infection agents are not cause of infections. या सत्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. उदा. : पेलाग्रा या विकारापायी हगवण, त्वचादाह, निद्रानाश होतो असं मानण्यात येई. आज खरंतर ही व्याधी बी-३ या जीवनसत्वाच्या अभावी होते हे स्पष्ट झालंय. पण एके काळी पेलाग्राचा विषाणू असल्याचा समज प्रचलित होता. आज 'करोनाचा विषाणू' ही अशीच एक थोतांडी संकल्पना प्रचलित आहे. लस अयशस्वी ठरली की मग लस न घेतलेल्या जागरूक लोकांवर साथीच्या रोगांचं दोषारोपण करणं हा वैद्यकीय प्रस्थापितांचा एक आवडता खेळ आहे. हल्ली हे खापर विषाणूचं जनुकीय उत्परिवर्तनावर ( = जेनेटिक म्युटेशन वर ) फोडलं जातं. हे एक उपथोतांड आहे. मग 'नवीन व अधिक प्रभावी' लशी शोधण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. जुन्या लशीचे दोष व अपयश यांवर आपसूक पांघरूण टाकता येतं. मुळांत लस ही रोगनिवारण करणारी नसतेच. पण लक्षांत कोण घेतो. लोकंही भीतीपायी नवीन लशीवर विश्वास ठेवतात. असा एकंदरीत मामला आहे. यानंतर इंग्लंडात लशी टोचण्यापूर्वीच साथींचे रोग कसे आटोक्यात आले होते त्याची आकडेवारी व आलेख दिलेले आहेत. अमेरिकेत स्कार्लेट ताप हा पूर्वी एक जीवघेणा रोग होता जो आता नामशेष झाला आहे. तो लशीशिवाय नाहीसा झाला. अर्थात, लसनिर्मितीचे प्रयोग करण्यांत आलेच. अशीच एक प्रयोगशील लस निरोगी असलेल्या शिकाऊ परिचारिकांना टोचल्यावर सगळ्या एका वर्षभरांत मृत्युमुखी पडल्या. आता कळलं स्कार्लेट तापावर लस का काढली नाही ते ? असो. संपलं एकदाचं पुस्तक. विचार, मनन व चिंतनाचं उपकंत्राट देता येत नाही. या गोष्टी स्वत:च्या स्वत:च कराव्या लागतात. एव्हढं जरी ध्यानी आलं तरी पुस्तक सार्थकी लागलं, म्हणेन मी. ---------------x---------------x--------------- लांबलचक सारांश वाचून कंटाळलात ? आता थोडा इतरत्र फेरफटका मारूया. सांगायचा मुद्दा असा की केवळ प्रपकांडाद्वारे ( = प्रोपोगंडा द्वारे ) लस हे जणू अमृत आहे असा आभास उत्पन्न केला आहे. तर असा गोबेल्सी अपप्रचार पूर्वी कधी झाला होता याचा धांडोळा घेतला. तेव्हा महाभारतात एक उदाहरण सापडलं. पुष्ट, बलवान, नम्र व सतेज पांडव पाहून हस्तिनापुराची लोकं त्यांनाच भावी राजे मानू लागली. त्यामुळे दुर्योधनाचा जळफळाट झाला. पांडवांचा काटा काढण्यासाठी त्यांना दूरदेशी पाठवावं असं त्यानं ठरवलं. तो बापाला म्हणजे धृतराष्ट्राला म्हणाला की एकदा का पांडव दूर गेले की मी राज्यावर बसेन. मग कुंती व ते परत जरी आले तरी काही हरकत नाही. मी त्यांना बघून घेईन. प्रत्यक्षात त्याला पांडवांची हत्या करायची होती. मात्र हा गुप्त हेतू कोणालाही कळू न द्यायची काळजी घेतली. आता, पांडवांना निघून जा असं थेट सांगणं शक्य नव्हतं. तेव्हा दुर्योधन बापाला आपली योजना समजावतांना म्हणाला की भीष्म मी व पांडवांप्रति समानदृष्टी बाळगून आहे. द्रोण व अश्वत्थामा माझे आहेत. कृप या दोघांना सोडणार नाही कारण हे त्याचे मेहुणा व भाचा आहेत. राहता राहिला विदुर, पण तो आपल्या अन्नाचा ओशाळा आहे. यावर धृतराष्ट्र या योजनेस राजी झाला. मग दुर्योधनाने धनमानादि पारितोषिकांद्वारे प्रधानवृंदास आपल्याकडे वळवून घेतलं. या वश झालेल्या मंत्र्यांनी धृतराष्ट्राच्या आज्ञेवरून वारणावत नगरीची प्रशंसा आरंभली. तसंच धृतराष्ट्राच्या भाट व चरणांनी त्या नगरीची वारेमाप स्तुती केली. तिथे शिवपुजेची पर्वणी आल्याची खरीखुरी बातमीही विशेषकरून पसरवली. पांडवांच्या मनात वारणावताविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचं कळताच धृतराष्ट्र त्यांना म्हणाला की जत्रेला जाऊन विपुल दानधर्म करून या. धृतराष्ट्राची इच्छा युधिष्ठिरास कळून आली. पण विदुराचे सहाय्य आहे म्हणून त्यानं ही योजना स्वीकारली. गमनदिनी जेव्हा पांडव हस्तिनापुरातल्या प्रतिष्ठित ब्राह्मणांचा निरोप घ्यायला गेले तेव्हा त्या विप्रांनी धृतराष्ट्रास बराच दोष दिला. पंडू सर्वांना पित्याप्रमाणे वाटंत असे, याउलट धृतराष्ट्रास पांडव डोळ्यासमोर नको झालेत. भीष्माने पांडवांना जाण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. भीष्माची बुद्धी चळली आहे, सबब आपण हस्तिनापुर त्यागून धर्माच्या मागे गेले पाहिजे असं म्हणू लागले. ब्राह्मणांनी आपणहून निर्वासित होणे हा त्याकाळी राज्याचा फार मोठा अपमान मानला जाई. परिस्थिती इथवर फिसकटली होती. तरीपण युधिष्ठिराने धृतराष्ट्राच्या चांगुलपणाचा भरवसा देऊन ब्राह्मणांना तिथेच थांबायची विनंती केली. ती त्यांनी मानली. पुढे मग पांडव वारणावतात गेले, नंतर सुमारे वर्षभराने लाक्षागृह प्रकरण घडलं. त्यातनं ते सुखरूप निसटले खरे, पण त्यांना रानोमाळ भटकावं लागलं. भटकतांना हिडींब व बकासुर वगैरे प्रकरणेही घडली. एकदा युधिष्ठिराच्या मनांत विचार आला की आपण असेच फिरंत राहिलो तर दुर्योधन आपल्यास कुठेतरी गाठून ठार मारेल. काहीतरी उपाय शोधायला हवा. फिरताफिरता पांडव व कुंती काम्पिल्य नगरीपाशी आले. तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. शिवाय तो नेमका पांडवांचा आतेभाऊही निघाला. त्याच्यापाशी युधिष्ठिराने आपली व्यथा बोलून दाखवली. कृष्णाला कळलं की पांडव आपल्या बरेच उपयोगाचे आहेत. आज दुर्योधानामुळे ते रानोमाळ हिंडताहेत. उद्या जरासंधापायी मथुरेकर यादवांवर हीच वेळ येऊ शकते. तेव्हा त्या लबाड माणसाने द्रौपदीस वरण्याचा आपला हेतू बाजूला सारला व आपल्या जागी पांडवांपैकी एकाची मनोमन नियुक्ती केली. वरकरणी मात्र त्याने युधिष्ठिरास एखाद्या प्रबळ राजाचं सहाय्य घ्यायला सुचवलं. पुढे असंही म्हणाला की जरा घाई करा. कारण की काम्पिल्य नगरीचा राजा द्रुपद याची मुलगी उपवर आहे, तेव्हा तुम्ही त्याचीच सोयरिक करून घ्या. आजंच तिचं स्वयंवर आहे. पुढे अर्जुनानं द्रौपदी जिंकली व कुंतीच्या अहैतुक आशीर्वचनामुळे ती इतर चार पांडवांचीही पत्नी झाली. आता पांडवांची ओळख पटली होती. मग हस्तिनापुरास परत कसं जायचं याविषयी विचारविनिमय चालू होता. इतक्यात तिथनंच विदुराकरवी पांडवांना सपत्नीक आगमनाचं आमंत्रण आलं. लोकहो, पहा, आत्ताप्रमाणेच सुमारे दहा पंधरा वर्षांपूर्वी पंडू व माद्रीच्या मृत्यूनंतर कुंती पांडवांना घेऊन हस्तिनापुरास आली होती. तेव्हा तिला लोकांची सहानुभूती तरी होती. भीष्माने तिला बाहेरच्या बाहेर न फुटवता मोठ्या मनाने आश्रय दिला. यावेळेस मात्र भीष्मानेच तिला व पांडवांना हाकून लावलं होतं. मात्र असं असलं तरीही आता द्रौपदीच्या केवळ अस्तित्वाने पांडवांना अपरिमित बळ प्राप्त झालं. इतकं जबर बळ मिळालं की तुरुंग फोडून इतस्तत: भटकणारा युधिष्ठीर कालांतराने चक्क राजसूय यज्ञ करता झाला. द्रौपदी ही काय चीज आहे ते यातनं कळतं. असो. आता आपण परत वर्तमानकाळात येऊया किंवा जाऊया. ---------------x---------------x--------------- आलांत वर्तमानांत ? उत्तम. आता आपल्यासाठी म्हणजे सामान्य माणसासाठी काही प्रश्न हजर आहेत. १. हस्तिनापुरातल्या ब्राह्मणांनी भीष्माची उलटीसुलटी घेतली. त्यांच्याकडे तितकी नैतिक शक्ती होती. करोनाच्या लशीच्या थोतांडाविरुद्ध कोण नैतिक शक्तिशाली ब्राह्मण आपल्यासाठी उभा राहणार आहे ? उत्तर : कोणीच नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. त्यासाठी नैतिक शक्ती म्हणून कर्मसाधना करायला पाहिजेच. २. कोणती द्रौपदी आपल्यासाठी वरमाला घेऊन सज्ज आहे ? उत्तर : कोणीच नाही. आपणंच आपल्याला लशीच्या शोधार्थ रानोमाळ हिंडण्यापासून वाचवायचं आहे. त्यासाठी मजबूत भक्तीसाधना हवीच. ३. कोण विदुर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ? उत्तर : मी आहे ना गामा पैलवान, विदुरासारखा मार्गदर्शन करणारा. मी नीतिमत्तेचा महामेरू असून स्वयंघोषित धर्ममार्तंडही आहे. मी सांगतो की आपण सारे मिळून युधिष्ठिरासारखी धर्मसाधना करूया. सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. ॥ जयजय रघुवीर समर्थ ॥ आपला नम्र, -गामा पैलवान

प्रतिक्रिया द्या
136234 वाचन

💬 प्रतिसाद (255)
आ
आग्या१९९० Fri, 04/30/2021 - 08:23 नवीन
ॲलोपथीची प्रॅक्टीस इतर पॅथीच्या वैद्यांना करण्यास मनाई असावी. ॲन्टीबायोटीक आणि पेनकिलरचा कसलाही अभ्यास नसताना बिनधास्त वापर करताना आढळतात.
ब
बेंगुताई Fri, 04/30/2021 - 09:52 नवीन
यापुढे साल्कच्या लशीमुळे उत्पन्न झालेली कटर नामे कुप्रसिद्ध रोगाची साथ वर्णिलेली आहे. यांत लशीतल्या जिवंत विषाणूमुळे साल्क मध्ये खरचं जिवंत विषाणू असतो का? कृपया माहिती देताना अचूक द्यावी.आपला वाचक वर्ग फार मोठा आहे हो पहिलेच ढ विद्यार्थ्यांची संख्या जास्त!
ग
गामा पैलवान Fri, 04/30/2021 - 14:47 नवीन
बेंगुताई, हम्फ्रीज डॉक्टरबाईंचं मूळ इंग्रजी पुस्तक उघडून बघितलं. त्यात लिहिलंय की जोनास साल्कने चाचणी केल्यापैकी पाच गटांतला विषाणू निष्क्रिय केला होता. मात्र सहाव्या गोटाचा निकाल राखून ठेवला होता. त्यावर डॉक्टर पॉल मे(ई)यर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणतात की सल्लागार समिती नेमण्यात आली खरी, पण सहाव्या गोटाचा विषय चर्चेस आला की मतभेद व्यक्त करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाई. आणि समिती पुनर्गठीत करण्यात येत असे. पॉल ऑफिट हा लशीतून भरगच्च नफा कमावणारा उद्योगपती आहे. त्याने लिहिलेल्या पुस्तकात हा प्रसंग सविस्तरपणे वर्णिलेला आहे. मी ते पुस्तक वाचलेलं नाही. पण त्यातलं एक वाक्य डॉक्टर हम्फ्रीज आपल्या पुस्तकात उद्धृत करतात : …the disease caused by Cutter’s vaccine was worse than the disease caused by natural polio virus. याचा मागोवा घ्यायला The Cutter Incident वर गूगल केलं की बरेच निकाल दिसतात. त्यापैकी एक : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1383764/ विषाणू निष्क्रिय करण्यात गंभीर त्रुटी राहून गेल्या होत्या. त्यामुळे पोलियोच्या विषाणूपासून संरक्षण मिळणं दूरंच राहो, उलट पोलियो रोगाला बालकं बळी पडली. बाकी, 'ढ' विद्यार्थ्यांचं म्हणाल तर मीही या विषयात 'ढ'च आहे. माझ्याकडे कोणतीही खास माहिती नाही व मला या क्षेत्राचा तत्ज्ञ म्हणून कसलाही अनुभव नाही. मात्र रोगी म्हणून बऱ्यापैकी अनुभव आहे. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: बेंगुताई
ग
गामा पैलवान Fri, 04/30/2021 - 23:46 नवीन
चौकस२१२,
पण चक्क थोतांड असे कोणी भिरकावून देणे हे कितपत योग्य आहे? हे पूर्ण बेजाबदार पणाचे आणि खोडसाळ विधान आहे आणि घातक पण
थोतांड आहे म्हणूनंच ते प्राणघातक आहे. प्राणघातक नसतं तर मी आजिबात लक्ष दिलं नसतं. मला हृदयविकार आहे. समजा मी भारतातल्या एखाद्या इस्पितळात दाखल झालो. माझी कोविड चाचणी केली. त्यात करोना सापडला. मग माझ्या हृदयविकारावर उपचार करण्याऐवजी जर कुठली औषधं करोनाच्या नावाखाली टोचीत बसले डॉक्टरलोकं तर मी काय कपाळ बडवून घेऊ ? आणि मेलो की माझ्या मुडद्यावर करोनाचा छाप मारायला सगळे तातडीने धावतील. रोहित सरदाना हे ज्येष्ठ पत्रकार हृदयविकाराच्या धक्क्याने वारले आणि चर्चा कसली चाललीये तर त्यांना करोना असल्याची. कुणाचा पायपोस कुणाच्या पायांत आहे? माझ्यासारखे असंख्य रुग्ण आज भारतात आहेत. त्यांत हृदयविकारीच नाही तर इतर गंभीर व्याधी असलेलेही आहेत. त्यांच्यावर यथोचित उपचार कोण करणार? करोनाचं थोतांड माजवलंय म्हणून त्यांचे जीव धोक्यात आहेत हे दिसंत नाही का डॉक्टरांना? ते थोतांड कोण आवरणार? आ.न., -गा.पै.
ग
गुल्लू दादा Sat, 05/01/2021 - 00:55 नवीन
तुम्ही इतका करोनाचा अभ्यास केलात तरी या विषयात 'ढ' च राहिलात बुवा. आणि 'ढ' विद्यार्थ्यांचं कसं असतं ना त्याला गाढव शिकवलं तरी ते डुक्करच म्हणत त्यामुळे तुमच्या बाबतीत तरी आपला पास. कसयं ना साहेब तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण त्यासाठी तुम्हाला तुमचा मुलगा/मुलगी, नात/नातू किंवा अतिशय विश्वासू व्यक्तीला मेरिटवर शासकीय वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत दाखल करावं लागेल. उगा दूरदेशी राहून, भरपूर वेळ आहे म्हणून 100 वर्ष जुन्या पुस्तकाचे संदर्भ देत आताच्या परिस्थितीचे गूगल बाबाच्या मदतीचे अवलोकन करत बसू नये. सद्य परिस्थिती ही अवघ्या मानवजातीत कधीच अनुभवली नव्हती त्या मुले जुने संदर्भ इथे लागू पडायचे नाहीत. बरंच काही आहे पण कसंयं ना जेव्हा हेक्कड लोक त्यांचे नातेवाईक अंतिम टप्प्यात रुग्णालयात त्यांच्या मर्जी विरुद्ध रुग्णालयात दाखल करतात ना त्यांच्यावर पण आम्ही हसत उपचार करतो. :)
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बेंगुताई Sat, 05/01/2021 - 08:39 नवीन
त्यासाठी तुम्हाला तुमचा मुलगा/मुलगी, नात/नातू किंवा अतिशय विश्वासू व्यक्तीला मेरिटवर शासकीय वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत दाखल करावं लागेल. कदाचित इथंच घोळ दिसतोय. कोणाला तरी govt सीट भेटलीली नाहीये बहुधा. त्यामुळेच डॉक्टरला बदनाम करण्याचा हा प्रपंच. पैलवान क्या जाणे सीट का स्वाद!!!
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा
ब
बेंगुताई Sat, 05/01/2021 - 08:11 नवीन
मग माझ्या हृदयविकारावर उपचार करण्याऐवजी जर कुठली औषधं करोनाच्या नावाखाली टोचीत बसले डॉक्टरलोकं तर मी काय कपाळ बडवून घेऊ ? सायटोकाईन स्टॉर्म का नाम सुने हो कभी जिंदगी मे? हह आला मोठा पैलवान! कधी आलीच अशी परिस्थिती तर घरीच (च) जपनाम करत बसू नका पैलवान साहेब. आणि हो पुढच्या तासाला जरा थोडा अभ्यास करून या. किती दिवस अजून एकाच वर्गात बसणार?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 05/01/2021 - 11:52 नवीन
बेंगुताई, १.
सायटोकाईन स्टॉर्म का नाम सुने हो कभी जिंदगी मे?
नाही. म्हणून सर्च मारला. तर ही संज्ञा ओळखीची निघाली. थोडक्यात सांगायचं तर हे लक्षण म्हणजे शरीराच्या रक्षायंत्रणेत उद्भवलेली यादवी. सोप्या शब्दांत वर्णन करायचं झालं तर रक्षायंत्रणेचा एक भाग दुसऱ्या भागावर हल्ला करतो असं म्हणता येईल. करोनाच्या तथाकथित उपचारांतनं नेमकी हीच यादवी माजंत नसेल हे कशावरनं? २.
आला मोठा पैलवान!
इथे पैलवानकीचा संबंध नाही. कालंच पस्तिशीचा तरुण असलेला जगदीश लाड हा शरीनसौष्ठवकार अचानक वारला. सांगायचा मुद्दा काय की तुम्ही पैलवान जरी असलात तरी करोनाकेंद्रावर आजीबात दाखल व्हायचं नाही. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: बेंगुताई
ब
बेंगुताई Sat, 05/01/2021 - 12:12 नवीन
आपली मतं या विषयावर जुळत नाहीत. निदान आमच्या सारख्या प्रामाणिक काम करणाऱ्या डॉक्टरांना बदनाम करू नका.असो मला नाही वाटत की तुमच्या विचारसरणीत काही बदल घडेल. हे संभाषण पुढे वाढवण्यात काडीचाही रस नाही. आ.न. बेंगुताई
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 05/02/2021 - 19:39 नवीन
बेंगुताई, तुम्ही प्रामाणिक आहात याविषयी मला कसलीही शंका नाही. पण तुम्ही ज्यावर विसंबून औषध देता ती यंत्रणा कितपत विश्वासार्ह आहे? प्रोग्रामिंग मध्ये सुरक्षेत chain of trust अशी एक संकल्पना आहे. संगणक, स्मार्टफोन वा ल्यापटाप चं बूटिंग सुरु होतं त्याच्या आधीपासनं ही विश्वासदर्शक साखळी सुरु होते. ही जर का खंडित झाल्याचा संशय जरी आला तरी बूटिंग थांबवलं जातं आणि एरर मेसेज दाखवून मशीन थंड पडतं. करोनाच्या लशीच्या बाबतीत तर प्राणांशी गाठ आहे. जरा जरी विश्वास डळमळला तर लोकं लस नाकारणार. लसीकरण गेल्या २५०+ वर्षापासून चालंत आलेलं आहे. त्यालाही इतिहास आहे आणि तो काळाकुट्ट आहे. हे लक्षांत कोणी घ्यायचं? कोण्या एका डॉक्टरबाईंनी हा इतिहास जगासमोर मांडला तर ते पुस्तक कोणी वाचायचं? तुमचे एक व्यवसायबंधू आहेत. त्यांना इतरत्र कायप्पा समूहावर मी स्पष्ट शब्दांत विचारलं की तुम्ही हे पुस्तक वाचून खरंखोटं करणार का. तर ते नाही म्हणतात. त्यांच्या मते हे पुस्तक म्हणजे कोण्या सोम्यागोम्याच्या सपाट पृथ्वीच्या समजासारखं आहे. कुण्या लुंग्यासुंग्याने लिहिलेल्या पुस्तकावर मी माझा वेळ कशाला घालवू, असं म्हणाले. अशा वेळेस माझ्यासारख्या अवैद्यकीय माणसालाच ते वाचावं लागणार ना? लशीकरणाची दुसरी बाजू कोणी जगासमोर आणायची? डॉक्टरांनी? की माझ्यासारख्या सामान्य माणसांनी? आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: बेंगुताई
र
रात्रीचे चांदणे Sat, 05/01/2021 - 04:47 नवीन
दुर्दैवाने बरेच लोक गा. पै यांच्या विचारांशी सहमत आहेत. माझ्या गावात करोना झाला तरी हॉस्पिटलमध्ये जाण्याचे टाळले जाते. कारण काय तर डॉक्टर इंजेकशन देऊन मारून टाकतात आणि त्यातून डॉक्टरांना दीड लाख मिळतात. बरेच डॉक्टर रेमडीसीविर जास्त काय कामाचे नाही आसे म्हणत आहेत आणि त्यांनी रेमडीसीविर ला स्वस्त पर्याय ही सांगितला आहे, मग समजत नाही की कोविड चे डॉक्टर रेमडीसीविर च आणण्याचा आग्रह का करत आहेत. माझ्या दूरच्या नात्यातील एक जण करोना झाल्या मुळे कोरोना सेंटर मध्ये होता, तब्बेत अतिशय ठणठणीत होती पण अचानक वारला, डॉक्टर म्हणाले की अचानक हार्ट अटक आला अर्थातच प्रेत मिळले नाही पण मृत्यू मात्र करोना ने मेलेल्यांच्या संख्येतच धरला गेला.
ब
बेंगुताई Sat, 05/01/2021 - 08:28 नवीन
बरेच डॉक्टर रेमडीसीविर जास्त काय कामाचे नाही आसे म्हणत आहेत आणि त्यांनी रेमडीसीविर ला स्वस्त पर्याय ही सांगितला आहे, मग समजत नाही की कोविड चे डॉक्टर रेमडीसीविर च आणण्याचा आग्रह का करत आहेत. रेमडेसीविर ची मागणी ही मुळातच पेशंट कडून वाढत आहे.(जो तो स्वतहाला डॉक्टर समजतो आहे ) आमच्या पेशंट ला ते इंजेक्शन दिलय का? द्या मग लिहून नाहीतर खा मार.(स्वतःच्या अनुभवावरून) remdesivir हे काय जादुई औषध नाही.ते एक antiviral आहे ज्याचा उपयोग फक्त पहिल्या 2-7 दिवसांमध्ये गुणकारी ठरतो viral load कमी करण्यासाठी.जीव वाचवण्यात त्याचा हातभार आहे (पहिल्या काही दिवसात) पण याने जीव वाचतोच हे चुकीचे आहे. त्यामुळेच AIIMS ने पण हे औषध आता नियमवाली मधून काढून टाकले आहे. https://youtu.be/-l-5KhOvRIg हे एकदा बघा.
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
क
कॉमी Sat, 05/01/2021 - 15:45 नवीन
मग फॅबीफ्ल्यू हे रेमिडीसीव्हीर चे अल्टरनेटिव्ह आहे काय ?
↩ प्रतिसाद: बेंगुताई
ग
गामा पैलवान Sat, 05/01/2021 - 11:43 नवीन
रात्रीचे चांदणे, हे दुर्दैव नसून सुदैव आहे. वस्तुस्थिती अशीये की करोनाच्या नावाखाली भलतेच उपचार सुरु आहेत. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती आहे. गावाकडले लोकं शहाणे आहेत. फक्त त्यांना त्यांचा शहाणपणा व्यवस्थित शब्दांत मांडता येत नाही. ठणठणीत तब्ब्येत असेलला माणूस अचानक म्हणे करोनाने अचानक मरतो. यावरनं काय ओळखायचंय ते ओळखा. बाकी काय सांगायचं. आपण सुज्ञ आहात. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
अ
अमर विश्वास Sat, 05/01/2021 - 13:15 नवीन
वस्तुस्थिती अशीये की करोनाच्या नावाखाली भलतेच उपचार सुरु आहेत >>>> हा लेख आणि लेखकाची मते हेच एक थोतांड आहे .
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चित्रगुप्त Sat, 05/01/2021 - 14:49 नवीन
मला आता स्वानुभवावरून या सगळ्या करोना प्रकरणात प्रचंड घपलेबाजी आहे याची खात्री पटत चालली आहे. मला लस घेऊनही पुन्हा बाधा झालेली आहे परंतु मी कोणतेही औषध न घेता नक्की बरा होणार याची खात्री आहे.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
र
रात्रीचे चांदणे Sat, 05/01/2021 - 15:26 नवीन
कोविड ची चाचणी न करताही तुम्हला कोरोना झालेलाच आहे असा निष्कर्ष कसा काय काढला? तसही लस घेतल्या नंतरही कोरोना होऊ शकतो आस भारतात तरी सांगितले आहे.
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Sat, 05/01/2021 - 15:57 नवीन
कोविड असेल किंवा नसेलही पण त्यावर औषध नाहीच तर चाचणी करून तरी काय उपयोग ? शिवाय या चाचण्या सुमारे ६०-७० टक्केच बरोबर येतात म्हणे. हे एक कारण. दुसरे म्हणजे इथे कुठेही बाहेर जायचे म्हणजे सर्वस्वी मुलावर अवलंबून रहावे लागते. त्याला मुद्दाम सुट्टी घेणे वगैरे करावे लागते.
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 02:59 नवीन
शिवाय या चाचण्या सुमारे ६०-७० टक्केच बरोबर येतात म्हणे. हे एक कारण. चित्रगुप्त साहेब पण हे आपण म्हणत ते जर खरे असते तर इथे अनेक ओरामनात रोगबाधा दिसली असती लोकसंख्येच्या मानाने ऑस्ट्रेल्यात चाचण्यांचे प्रमाण खूप वरती आहे बर येथे करा चाचणी आणि काडः पैसे हा प्रकार नाही ( नसावं फारसे ) कारण इंग्लंड सरकेचे राष्ट्रीय मेडिकेर मग जर चाचण्या बेभरंवशाचाच्या असत्या तर येथे पण त्यायून मृत्यू बरेच झाले असते कि हो? आपण आजार मुळे वैतागलेले असाल हे समजते पण एकदम थोडांत आहे च्या "कॉन्स्पिरसी थेअरी पक्षात" बसलात ? जरा आश्चर्य वाटले कृपया काळजी घ्या
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Tue, 05/04/2021 - 03:26 नवीन
खोकला वगैरे कमी होतो आहे. इथे लस घेतली की वरुन पाच डॉलर्स दक्षिणा पण मिळते आहे. तरीपण बरेच लोक - विशेषतः कृष्णवर्णीय- घेत नाहीयेत असे पण समजते. काय कारण ते ठाऊक नाही. आपल्या आपुलकीबद्दल अनेक आभार.
↩ प्रतिसाद: चौकस२१२
क
कॉमी Sun, 05/02/2021 - 04:25 नवीन
गामा पैलवान, कोव्हिड पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, घरीच होते कारण बरं वाटत होत. अचानक रात्री श्वास घेताना त्रास होऊ लागला. रात्रीतून गेले. असे आजच एक उदाहरण (सो टू से) पाहिले आहे. इथे सायटोस्टोर्म चा आडोसा नाही, कारण औषधं नव्हतीच. मग काय झाले असावे ? इथे सिमिंगली निरोगी आणि पन्नाशीचा व्यक्ती.
ग
गामा पैलवान Sun, 05/02/2021 - 19:43 नवीन
कॉमी, प्रत्येक मृत्यूवर ( तेही ऐकीव ) भाष्य करणं मला अशक्य आहे. मयतास कोविड केंद्राचा भरवसा वाटला पाहिजे. केवळ केंद्राचाच नाही तर त्यासोबाज औषधांचा आणि डॉक्टरांचाही. तो वाढवा यासाठी कोणी कसली पावलं उचलली आहेत? आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: कॉमी
म
मराठी_माणूस Mon, 05/03/2021 - 07:16 नवीन
अतिशय महत्वाचा मुद्दा
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 05/03/2021 - 10:32 नवीन
चित्रगुप्त,
मला आता स्वानुभवावरून या सगळ्या करोना प्रकरणात प्रचंड घपलेबाजी आहे याची खात्री पटत चालली आहे.
तुमचा अनुभव विदित केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही लस घेतली तेव्हा तांत्रिकदृष्ट्या तुम्ही एका चाचणीत सहभागी झालेले होतात. मात्र हे तुम्हांस कोणी स्पष्टपणे सांगितलं नाही. ही तुमची फसवणूक आहे. अमेरिकेतल्या तुमच्यासारख्या सुशिक्षितास बेमालूमपणे बनवण्यात येतं. भारतात मोठ्या प्रमाणावर असलेल्या अ(र्ध)साक्षर जनतेचं तर विचारायला नको. आ.न., -गा.पै.
च
चौकस२१२ Tue, 05/04/2021 - 04:18 नवीन
अमेरिकेतल्या तुमच्यासारख्या सुशिक्षितास बेमालूमपणे बनवण्यात येतं नक्की कसा काय गंडवला? "लस" या उपयाचा शोध अनेक वर्षे झाली... ती एफडी एफ दि ए च्या चाचणीतून गेली मग दिली गेली .. चित्रगुप्त काही लसीच्या प्राथमिक चाचणी सहभागी झालेलं नाहीयेत ! लसीकरणाचे त्यातील फायदे तोटे दोन्ही आहेत ... कोण्ही शास्त्रन्या वैद्य फक्त फायदे आहेत असे म्हणत नाही तुम्ही मात्र थोतांड म्हणून ठोकून देता .. बर गेला बाजार त्या क्षेत्रातील मान्यवर असतात तर निदान ऐकले तरी असते .. लसहीचे अर्थ आणि राजकारण यावर भाष्य आणि टीका करा जरूर हवे तर .. पण भारतातात जे घडते त्यावर बेतून अख्या जगातील लोक उल्लू बनले असे भासवणे ... हा एक मंत्रचळे पणा दिसतोय !
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 05/04/2021 - 15:32 नवीन
चौकस२१२, १.
"लस" या उपयाचा शोध अनेक वर्षे झाली... ती एफडी एफ दि ए च्या चाचणीतून गेली मग दिली गेली
लस हा उपाय जुनाच असला तरी करोनाची लस हा प्रकार नवीनंच आहे. इतक्या नवीन ल्शीवर FDA ने खात्रीलायक ठराव्यात अशा नेमक्या कोणत्या चाचण्या केल्या होत्या? २.
चित्रगुप्त काही लसीच्या प्राथमिक चाचणी सहभागी झालेलं नाहीयेत !
ही सुस्थापित लस नाही. ही अजूनही प्रायोगिक अवस्थेतच आहे. कारण की करोना हा नवीन रोगजंतू आहे. ही लस प्रायोगिक अवस्थेत ( experimental phase मध्ये ) आहे याची पूर्ण कल्पना चित्रगुप्त यांना दिलेली होती का? मला वाटतं नसावी. तशी दिली नसेल तर चित्रगुप्त यांना सरळ फसवण्यात आलं आहे. ३.
कोण्ही शास्त्रन्या वैद्य फक्त फायदे आहेत असे म्हणत नाही तुम्ही मात्र थोतांड म्हणून ठोकून देता ..
मग जे तोटे आहेत ते कोणी लोकांसमोर मांडायचे? शास्त्रज्ञ वैद्य मांडताहेत का? नाही ना? मग लशीस थोतांडच मानणार. करण की असं मानणं माझ्यासाठी सुरक्षित आहे. ४.
बर गेला बाजार त्या क्षेत्रातील मान्यवर असतात तर निदान ऐकले तरी असते ..
या क्षेत्रातले काही मान्यवर तर लशीकरणास दुसरी बाजू आहे हे मुळी मानायलाच तयार नाहीत. त्यांच्या शिक्षण व अनुभवाविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात ना. जोवर खुली चर्चा होत नाही तोवर तुम्हांस माझ्यासारखे अवैद्यकीय भाष्यकार सहन करावे लागणार. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Wed, 05/05/2021 - 01:23 नवीन
गा.पै. रोग नवीन आहे, लस नवीन आहे त्यामुळे त्यामुळे लस एफडीए ने लवकर काळजी ना घेता मान्यता दिली असे आपले म्हणणे आहे असे दिसतंय ! कि मुळात लास या प्रकारालाच विरोध आहे? ( कारण कोणतीच लस नको असे विचार करणारे लोक या भूतलावर आहेत ) नक्क्की काय? लसीचे तोटे असणार... जसे कोणत्याही लसीचे असतात आणि "त्याबद्दल गुप्तता पाळली गेली आणि लोकांना गंडवले" असे आपले म्हणणे असेल तर तो फार मोठा दावा ठरेल ! आरौग्य तंज्ञांनी याचा सारासार विचार करूनच "काहीच ना करण्यापेक्षा हि लस देण्याततीळ धोके पत्करणे बरे" असा सल्ला सरकार ला दिला असणार लस म्हणजे थोतांड या आपल्या दाव्याचा हा अर्थ निघतो कि अब्जावधी रुपायनाचा/ युरोंचा व्यवहार सांभाळणारी जगातील सर्वप्रकारची सरकारे आपापल्या "सार्वजनिक आरोग्य" खाते , महाविद्यालयातील संशोधक आणि इतर शास्त्रन्य यांचं सल्ल्यानुसार वागत आहेत ती सर्व गंडली गेली आहेत ! मला आठवतंय ( चूक असू शकेल) त्याप्रमाणे गामा पैलवान आपला हा मूळ दावा होता कि - हा रोगचं थोतांड आहे! आत फक्त लस थोतांड असे म्हणताय का? नक्की काय गोल पोस्ट बदलू नका असो जे काही असेल , आपण अशी आशा करू की कोण्ही नागरिक आपापल्या देशातील मान्यवर वैद्यकीय सालगरांचे ऐकतील ... अश्या स्वैर दाव्यावर वर अवलंबून राहणार नाहीत
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चित्रगुप्त Mon, 05/03/2021 - 18:52 नवीन
घरीच चाचणी करण्यासाठी आवश्यक साधन मुलगा आणणार आहे. ती केल्यावर पुन्हा लिहीन.
ग
गामा पैलवान Tue, 05/04/2021 - 15:35 नवीन
माननीय संपादक, नुकताच खरे डॉक्टर यांचा एक संदेश वाचला. ते म्हणतात की :
गेले काही दिवस माझे दोन तीन प्रतिसाद काढून टाकले गेले आहेत.
हे खरंय का? बहुतेक खरं दिसतंय. माझी विनंती आहे की ते प्रतिसाद सत्वर खुले करावेत. सांगोपांग चर्चेसाठी ते उपयोगी असावेत अशी माझी अटकळ आहे. अर्थात अंतिम निर्णय तुमचाच आहे. आ.न., -गा.पै.
ग
गामा पैलवान Wed, 05/05/2021 - 22:39 नवीन
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो. १.
आपला हा मूळ दावा होता कि - हा रोगचं थोतांड आहे! आत फक्त लस थोतांड असे म्हणताय का? नक्की काय गोल पोस्ट बदलू नका
गोल पोस्ट बदलणं साहजिक आहे. कारण की रोग नामे एका थोतांडातनं लस नामे दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. दुसरं थोतांड पहिल्यापेक्षा अधिक प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे. सर्दीपडशावर कोणी लस काढंत नसतं. म्हणून करोनाचे बेडकी प्रमाणाबाहेर फुगवण्यात आली. पंतप्रधानांच्या मनकी बात मध्ये मोदींशी संवाद साधणारे मुंबईचे डॉक्टर शशांक जोशी उघडपणे म्हणतात की ८० % ते ९० % लोकांना लक्षणंच नसतात. संदर्भ ( इंग्रजी दुवा ) : https://www.hindustantimes.com/india-news/dont-panic-don-t-rush-after-remdesivir-docs-say-during-pm-modi-s-mann-ki-baat-101619330430396.html करोना हा खरंच इतका घातक आहे का? की तसं चित्रं उभं केलं गेलंय? यामागे कारण आहे. ते म्हणजे गलेलठ्ठ औषधास्थापनांची लस पुढे रेटणे. २.
लस म्हणजे थोतांड या आपल्या दाव्याचा हा अर्थ निघतो कि अब्जावधी रुपायनाचा/ युरोंचा व्यवहार सांभाळणारी जगातील सर्वप्रकारची सरकारे आपापल्या "सार्वजनिक आरोग्य" खाते , महाविद्यालयातील संशोधक आणि इतर शास्त्रन्य यांचं सल्ल्यानुसार वागत आहेत ती सर्व गंडली गेली आहेत !
गंडली आहेत म्हणण्यापेक्षा मी भ्रष्टावली आहेत असं म्हणेन. ३.
लसीचे तोटे असणार... जसे कोणत्याही लसीचे असतात आणि "त्याबद्दल गुप्तता पाळली गेली आणि लोकांना गंडवले" असे आपले म्हणणे असेल तर तो फार मोठा दावा ठरेल !
आपल्या अंगात काय घुसतंय ते जाणून घ्यायचा लोकांना हक्क नाही का ? आणि ती गुप्तता कसली ? उलट लशीच्या बाबतीत पारदर्शकता हवीये. तीच नेमकी दिसंत नाही. ४.
कि मुळात लास या प्रकारालाच विरोध आहे? ( कारण कोणतीच लस नको असे विचार करणारे लोक या भूतलावर आहेत ) नक्क्की काय?
माझा लशीस सरसकट विरोध नाही. मी स्वत: दरवर्षी हिवाळ्याच्या आधी फ्ल्यूचे लस घेतो. कारण की मला हृदयविकार आहे. आणि सदर लस अनेक वर्षं सुस्थापित झालेली आहे. फ्ल्यूमुळे हृदयाच्या पिशावीस सूज येते हे सर्वज्ञात आहे. ही सूज हृदयापर्यंत पोहोचली तर हृदयाच्या राक्तावाहीन्यंत अडथला उत्पन्न होऊन हृत्शूल ( = heart attack ) होऊ शकतो. तसंच जर आत विस्फारजाळी टाकलेली असेल तर ती चेमटण्याचाही धोका ( = stenosis ) असतो. ही सर्व माहिती व फ्ल्यूच्या लशीचे संभाव्य दुष्परिणाम ज्ञात आहेत. इंग्लंड मधल्या फ्ल्यूच्या लशीविषयी इथे माहिती सापडेल : https://vk.ovg.ox.ac.uk/vk/inactivated-flu-vaccine असा काही माहिती / विदा करोनाच्या लशीसंबंधी उपलब्ध आहे का ? असल्यास तो का चर्चेत येत नाही ? किंबहुना करोना हा नवा रोग असल्याने विगतवार विदा ( = detailed data ) निर्माण चायला काही दशकं जावी लागतील. मग लशीची इतकी घाई का ? मला गरज आहे म्हणून मी लस घेतो. धडधाकट निरोगी माणसाला लस टोचायची गरजंच काय मुळातून ? आ.न., -गा.पै.
च
चौकस२१२ गुरुवार, 05/06/2021 - 00:48 नवीन
करोना हा खरंच इतका घातक आहे का? की तसं चित्रं उभं केलं गेलंय? यामागे कारण आहे. ते म्हणजे गलेलठ्ठ औषधास्थापनांची लस पुढे रेटणे. भारतातातील जरा बाजूल ठेउयात,,, आपण राहता ते युनाइटेड किंग्डम, कानडा , जर्मनी , ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाची सरकारे पण भ्रष्टावली आहेत? हा दावा पटत नाही काय गरज होती त्यांना सगळे सुरळीत चालू असताना हे करण्याची? "रोग नामे एका थोतांडातनं :.... असे म्हणता म्हणजे मग झालेलं मृत्यू पण थोतांड ? कि मुळात हा रोगच नाही? परत गोल पोस्ट बदललेला दिसतोय असो .. आपले लस ना घेणे वैगरे आपल्याला लखलाभ ... आपली थेअरी लॅन्सेट मध्ये छापून येवो अशी अशा... अरे हो पण ते कशाला छापतीळ नाही का ? बहुतेकांचा आपापल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर अन्य त्यामार्गे सरकार वॉर बऱयापैकी विश्वास आहे आणि बहुतेक आपली या दाव्याला भूल पडून आपले नुकसान करून घेणार नाहीत ... इति
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/06/2021 - 22:16 नवीन
चौकस२१२, १.
आपण राहता ते युनाइटेड किंग्डम, कानडा , जर्मनी , ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाची सरकारे पण भ्रष्टावली आहेत?
हो. चुकीच्या अनावश्यक लशी टोचल्याने रोग वा साथ बळावल्याचे प्रकार यापूर्वीही झालेले आहेत. २.
काय गरज होती त्यांना सगळे सुरळीत चालू असताना हे करण्याची?
माहीत नाही. नेमका हाच प्रश्न जनतेने नेत्यांना विचारायचा आहे. ३.
"रोग नामे एका थोतांडातनं :.... असे म्हणता म्हणजे मग झालेलं मृत्यू पण थोतांड ?
छे छे. मृत्यू थोतांड नाहीत. ते आणि केवळ तेच सत्यांड आहेत. ४.
कि मुळात हा रोगच नाही?
करोना हा सर्दीपडसे यासारखा आजार आहे. फारतर फ्ल्यू सारखा म्हणता येईल. ५.
परत गोल पोस्ट बदललेला दिसतोय
करेक्ट. रोगाची भीती उगीच फुगवून सांगितल्याने जे थोतांड उत्पन्न झालंय त्यातनं लस नावाचं दुसरं थोतांड निर्माण झालंय. एकेक थोतांडाचा समाचार घ्याचा झाला तर गोलपोस्ट इथेतिथे हलणारच ना ! ६.
आपले लस ना घेणे वैगरे आपल्याला लखलाभ ...
धन्यवाद. करोनाच्या लशीचा नेमका फायदा काय हे कोणीही आजवर सांगितलेलं नाही. ७.
आपली थेअरी लॅन्सेट मध्ये छापून येवो अशी अशा
प्रशंसेबद्दल धन्यवाद. मात्र मी माझ्या थियरीची फारशी चिंता करीत नाही. कारण की माझ्यापेक्षा सरस असे अनेक अलोपाथ डॉक्टर पर्यायी दृष्टीकोन बाळगून आहेत. फक्त त्यांचं म्हणणं चर्चेस येत नाही. ते यावं इतकीच माझी इच्छा आहे. ८.
बहुतेकांचा आपापल्या आरोग्य अधिकाऱ्यांवर अन्य त्यामार्गे सरकार वॉर बऱयापैकी विश्वास आहे
असू शकतो. ते लोकांचं लोकांना ठरवू द्यावं. लशीकरणाविषयी मी फक्त तथ्ये मांडली. नेमके प्रश्न काय विचारायचे ते वाचक ठरवतील. माझा लोकांच्या अकलेवर पूर्ण विश्वास आहे. ९.
बहुतेक आपली या दाव्याला भूल पडून आपले नुकसान करून घेणार नाहीत ...
मी कुठलाही दावा करीत नाही. फार काय उपरोक्त पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर एलिझाबेथ हम्फ्रीज या सुद्धा सदर पुस्तकांत कसलाही दावा करीत नाहीत. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: चौकस२१२
म
मराठी_माणूस Fri, 05/07/2021 - 08:06 नवीन
अनेक अलोपाथ डॉक्टर पर्यायी दृष्टीकोन बाळगून आहेत.
ह्यावर अधिक माहीती द्याल का ?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 05/09/2021 - 14:54 नवीन
मराठी_माणूस, पहिल्याप्रथम माझ्याकडनं उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. तीनचार नावं चटकन सापडली. १. डॉक्टर अँड्र्यू काऊफमन ( andrew kaufman ) : यांच्या मते विषाणू अशी काही चीज अस्तित्वात नाही. मला मात्र या दाव्याविषयी शंका आहे. संदर्भ : https://thebigvirushoax.com/dr-andrew-kaufman मात्र करोनाची जागतिक लाट वगैरे काही नाही, हे मत मात्र पटलं. २. शिवा आय्यादुराई ( shiva ayyadurau ) : हे गृहस्थ मेडिकल डॉक्टर नसले तरी यांचा जीवशास्त्राचा दांडगा अभ्यास आहे. यांनी करोनाच्या रुग्णांना अलग करून सुदृढ लोकांना परत कामावर हजर होण्याच्या दृष्टीने भाष्य केलं होतं. संदर्भ : https://www.citizensjournal.us/how-to-fight-coronavirus-without-causing-a-global-depression/ ३. डॉक्टर ज्युडी मिकोवित्स ( judy mikovits ): अमेरिकेचे संसर्गजन्य रोगांचे विभागप्रमुख डॉक्टर फावची यांच्या चमूत सदर बाई कामाला होत्या. डॉक्टर फावची भोंदू ( = फ्रॉड ) असल्याचा दावा या बाईंनी केला आहे. ४. डॉक्टर रशीद बुट्टार ( rashid buttar ) : यांनी करोनालशीच्या विरोधात अमेरिकेत टीव्ही वरून धोक्याचा इशारा दिला आहे. तसंच ते मुखपट्टी वापरण्याच्या विरोधात आहेत. मुखपट्टी विषाणूंना थांबवायला निरुपयोगी असते. कारण की ते पट्टीतल्या भोकांतून सहज आतबाहेर करू शकतात. क्रोनासाठी तोंडावर मुख्पट्टी बंधने हे निर्बुद्धतेचं लक्षण आहे. संदर्भ : https://ambassadorlove.wordpress.com/2020/12/24/evidence-of-genocide-the-mask-psyop/ जमेल तितके डॉक्टर लोकं शोधले आहेत. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Mon, 05/10/2021 - 10:55 नवीन
धन्यवाद
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चौथा कोनाडा Tue, 05/11/2021 - 08:48 नवीन
सौजन्यः गॉडजिला यांचा प्रतिसाद (http://misalpav.com/comment/1107290#comment-1107290) रुग्णांची संमती घेऊन सुमारे पन्नास जणांवर असा उपचार केला. त्यातील दहा रुग्ण गंभीर स्वरूपाचे होते. या रुग्णांवर सरकारी नियमांप्रमाणे उपचार सुरू ठेवलेच त्यासोबत दररोज सकाळी सायंकाळी ३० मिलीलीटर देशी दारू दिली. याचे चांगले परिणाम दिसून आले असून जवळपास सर्व रुग्ण बरे झाले. यासंबंधी तज्ज्ञांना समोर योग्य त्या पुराव्यांनिशी बाजू मांडण्याची आपली तयारी आहे. सतत दारू पिणे आरोग्यासाठी घातक आहे. मात्र, औषध म्हणून ते सात ते दहा दिवस द्यायचे आहे, यातून आपल्याला दारूच्या व्यसानाचे समर्थन करायचे नाही, असेही डॉ. भिसे यांनी म्हटले आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/dr-sanjay-bhise-using-alcohol-for-treat-coronavirus-patients-medical-officer-did-inquiry/articleshow/82542456.cms ही अतिशय दिलासादायक बातमी ! हे चाचणी यशस्वी असेल तर भारत संपुर्ण जगात देशी दारू निर्यात करू शकतो. यातुन इतका पैसा मिळेल की २०३० पर्यंत भारत जगातील महासत्ता बनू शकतो !
ग
गामा पैलवान Tue, 05/11/2021 - 21:58 नवीन
लोकहो, नोव्हेंबर २०२० मध्ये सरकारी मान्यता मिळण्याआधी एप्रिल २०२० मध्ये तब्बल ५ कोटी कोव्हिशील्ड लशी तयार होत्या. मार्च/एप्रिल २०२० मध्ये करोनाचा इतका फैलाव झाला नव्हता. तरीपण लस कशी काय बनवली? हा प्रश्न आहे. मान्यता देण्यात सरकारकडून ढिसाळपणा किंवा धोक्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेलं असू शकतं. या लशी घेतलेले आज मृत्युपंथास तर लागलेले नाहीयेत ? यासंबंधी नुकतंच एक चलचित्र बघितलं : https://www.facebook.com/watch/live/?v=107710248047824&ref=watch_permalink इथे इंग्लंडात एका सरकारी संस्थेने अंदाज व्यक्त केलाय की तिसऱ्या लाटेत मृतांमध्ये व रुग्णालयात दाखल झालेल्यांत ६० % ते ७० % लोकं दोन मात्रा लस घेतलेले असतील. तिसरी लाट ऑगस्ट सप्टेंबर २०२१ मध्ये येईल तोपर्यंत इंग्लंडमध्ये येईल लस न घेतलेल्यांपेक्षा लस घेतलेले जास्त प्रमाणावर बळी पडणार. हे युकेचं अधिकृत शासकीय कथन आहे. हाच प्रकार भारतात कशावरून घडणार नाही ? पान क्रमांक २३ वर आलेख आहे : https://assets.publishing.service.gov.uk/government/uploads/system/uploads/attachment_data/file/975909/S1182_SPI-M-O_Summary_of_modelling_of_easing_roadmap_step_2_restrictions.pdf सांगायचा मुद्दा असा की लशीमुळे करोना बाधितांची संख्या वाढतेय. हे युके सरकार उघडपणे म्हणू शकंत नाही. म्हणून अंदाजाच्या पदराआड दडून सांगितलं जातंय. आ.न., -गा.पै.
स
सुक्या Tue, 05/11/2021 - 23:05 नवीन
ते सारे जौ दे. भारतात सध्याच्या घडीला इतके लोक अचानक कुठल्या आजारने ग्रस्त झाले की आरोग्य व्यवस्थेवर इतका ताण आला आहे. जर करोना हे थोतांड आहे तर जे लोक दगावले ते कुठल्या आजाराने ग्रस्त होते? अगदी ३० - ३२ वर्षे वयाची लोक गेले. भारतात इतके कमी लसिकरण झाले आहे तर करोनाचा फैलाव झालाच कसा? करोना नाही तर मग सद्या कुठला रोग चालु आहे ?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 05/12/2021 - 22:43 नवीन
सुक्या, सर्दीपडशामुळे कोणी कधी दगावल्याचं ऐकिवात नाही. हां, पण सर्दीतनं पुढे न्यूमोनिया होऊन माणूस मरू शकतो. करोनाचंही असंच आहे. फक्त करोना जरा सर्दीपेक्षा जास्त प्रभावशाली आहे. मृताचं कारण करोना म्हणून लिहिणं हा फ्रॉड आहे. माझ्या माहितीप्रमाणे खास करोनावर असा कुठलाही उपचार नाही. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: सुक्या
स
सुक्या Wed, 05/12/2021 - 22:56 नवीन
साप साप म्हणुन भुई धोपटु नका. जर कोरोना नाही तर एवढी लोक अचानक कोणत्या आजाराने मरत आहेत ते सांगा. न्यूमोनिया झालेले सगळेच लोक (किंवा ५०%) लोक मरतातच असे काही नाही. करोना जरा सर्दीपेक्षा जास्त प्रभावशाली आहे तर सर्दीचे लक्क्षणे का नाहीत लोकांमधे? खास करोनावर असा कुठलाही उपचार नसेल तर काहीच उपचार करु नये काय?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बबन ताम्बे गुरुवार, 05/13/2021 - 04:14 नवीन
कोरोना थोतांड आहे तर लोक एव्हढ्या मोठ्या संख्येने कुठल्या आजाराने बाधित होताहेत? कालच आमचा ऑफिसातला एक सहकारी गेला. चाळिशीतला आणि धडधाकट होता. पॉझिटिव्ह निघाला आणि नन्तर क्रीटीकल अवस्थेत गेला. मला नाही वाटत कोरोना हे थोतांड आहे. पण कोरोना विषाणूवर व उपचारांवर अजून खूप संशोधन व्हायला हवे हे नक्की.
↩ प्रतिसाद: सुक्या
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/13/2021 - 14:47 नवीन
सुक्या, मलाही हाच प्रश्न पडलाय. धडधाकट माणूस अचानक गंभीर होतो आणि कशाने मरतो? करोना जर इतका खतरनाक आहे तर अशा केसेस सर्वत्र दिसायला हव्यात. प्लेगच्या साथीत दिसल्या होत्या तशा. त्या आज का दिसंत नाहीत? करोनाचे उपचार हा आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असं तर नाही? असे प्रकार पूर्वी झाले आहेत. उदा. : पेलाग्रा व्याधीचा विषाणू वर लस शोधायचा प्रयत्न झाला होता. पण नंतर लक्षात आलं की ही व्याधी जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होते. करोनाचंही असंच असू शकतं ना? या प्रश्नाचं उत्तर वैद्यकीय तत्ज्ञांनी दिलं पाहिजे. बाकी, तुम्ही म्हणता की : १.
न्यूमोनिया झालेले सगळेच लोक (किंवा ५०%) लोक मरतातच असे काही नाही.
करोनाची मोचनमात्रा ( रिकव्हरी रेट ) ५० % हून बराच जास्त आहे. २.
करोना जरा सर्दीपेक्षा जास्त प्रभावशाली आहे तर सर्दीचे लक्क्षणे का नाहीत लोकांमधे?
एकंच विषाणू भिन्न व्यक्तींत भिन्न लक्षणं उत्पन्न करू शकतो. याउलट एकाच व्यक्तीत भिन्न विषाणूंची समान लक्षणं आढळू शकतात. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: सुक्या
स
सुक्या गुरुवार, 05/13/2021 - 22:45 नवीन
पेलाग्रा व्याधीचा विषाणू वर लस शोधायचा प्रयत्न झाला होता. पण नंतर लक्षात आलं की ही व्याधी जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होते. हे कसे काय झाले हो? म्हणजे वैद्यकीय तत्ज्ञांनी हे शोधले की कुठले बाबा स्वप्नात येउन सांगुन गेले ? वैद्यकीय तज्ञ आपले काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. त्यांच्या सुचनेचे पालन करा. आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते हे ध्यानात ठेवा. जर तुम्हाला जास्त कळत असेल तर जे प्रश्न पडले आहेत तुम्हाला त्यांची उत्तरे शोधा. कोन्स्पिरीसी थेरी वाल्यांचा नादाला लागु नका. त्यांना काय काम नसते काडया करण्याशिवाय. अजुनही काही लोक प्रुथवी सपाट आहे म्हणुन बोंबलत फिरत असतात.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
इ
इरसाल Fri, 05/14/2021 - 06:40 नवीन
हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. चुकीचे असणार्‍यांना "ते चुकीचे आहेत" हे खरे असणार्‍यांना पुराव्यानिशी साबित करायची जबाबदारी असते. त्यांना काय जातय बोंबलायला.
↩ प्रतिसाद: सुक्या
ग
गामा पैलवान Fri, 05/14/2021 - 15:40 नवीन
सुक्या, १.
हे कसे काय झाले हो? म्हणजे वैद्यकीय तत्ज्ञांनी हे शोधले की कुठले बाबा स्वप्नात येउन सांगुन गेले ?
वैद्यकीय तत्ज्ञांनी शोधलं. २.
वैद्यकीय तज्ञ आपले काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. त्यांच्या सुचनेचे पालन करा. आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते हे ध्यानात ठेवा.
नेमकी इथेच तर समस्या आहे. ज्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं ते लशीकरणाची दुसरी बाजू उलगडून दाखवायला तयार नाहीत. म्हणूनंच तर मला माझ्या मर्यादित माहितीच्या आधारे भाष्य करावं लागतं. ३.
जर तुम्हाला जास्त कळत असेल तर जे प्रश्न पडले आहेत तुम्हाला त्यांची उत्तरे शोधा.
मला फार काही समजंत नाही. म्हणूनंच तर प्रश्न पडलेत. तुमच्याकडे उत्तरं आहेत का? असल्यास कृपया द्यावी. लशीकरणास इतिहास आहे, आणि तो काळाकुट्ट आहे. हे कोणी विस्कटून सांगायचं ? या क्षेत्रातल्या तत्ज्ञांनी की माझ्यासारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणाऱ्यानी ? ४.
कोन्स्पिरीसी थेरी वाल्यांचा नादाला लागु नका.
कॉन्स्पिरीसीची थियरी आहे तेच बरंय. कॉन्स्पिरीसी जर का प्रत्यक्षांत उतरू लागली तर पळता भुई थोडी होते. करोनापायी झालीये तश्शीच. कालपरवा नगरचे डॉक्टर भिसे यांनी ३० मिली देशी दारूचे ( = अल्कोहोल चे ) डोस पाजले तर रुग्णांना आराम पडला. हा अनुभव विदित केला तर सरकारने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं. करोनाची साथ जर खरीच असती तर सरकारने या उपायाकडे गांभीर्याने बघितलं असतं. ते सोडून उगीच डॉक्टरच्या मागे लचांड लावलंय ( संदर्भ : https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/dr-sanjay-bhise-using-alcohol-for-treat-coronavirus-patients-medical-officer-did-inquiry/articleshow/82542456.cms ). एकंदरीत सरकारला पेशंट चटकन व कमी पैशांत बरे होण्यात रस नसून त्यांचे आजार लांबवण्यात अधिक रस आहे. मग याला कॉन्स्पिरीसीची का म्हणू नये? ५.
अजुनही काही लोक प्रुथवी सपाट आहे म्हणुन बोंबलत फिरत असतात.
विषयांतर. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: सुक्या
अ
अमर विश्वास गुरुवार, 05/13/2021 - 05:23 नवीन
भारताच्या आधी कोविशील्ड ला UK ने मान्यता दिली होती. आणि भारताची मान्यता ही कोविशील्ड च्या वापरासाठी आहे. कोविशील्ड बनवायला / परदेशात वापरायला मान्यतेची गरज नाही ... उलट हे डोस तयार होते त्यामुळे लसीकरणाला वेग आला तेंव्हा उगाच चुकीच्या अर्धवट माहितीवर आधारीत प्रतिसाद टाकून दिशाभूल करू नका
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अमर विश्वास गुरुवार, 05/13/2021 - 05:29 नवीन
पण मी हे का लिहितोय ? मुळात लस म्हणजे थोतांड अशी विचारसरणी असणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार ? मुळात हा लेख आणि यावरचे लेखकाचे प्रतिसाद हे बौद्धिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण म्ह्णून दाखवायला हरकत नाही पुन्हा एकदा सांगतो ... ही विचारसरणी आणि प्रतिसाद हे एक थोतांड आहे
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/13/2021 - 21:26 नवीन
लोकहो, अँथनी फावची पचकला. म्हणतो कसा की करोना आटोक्यात आणण्यासाठी चीनने केलं तेच भारताने करावं. बातमी : https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-needs-to-immediately-build-makeshift-field-hospitals-like-china-dr-anthony-fauci-scsg-91-2466752/ आ.न., -गा.पै. ---x---x--- ए फावच्या, जरा चड्डीत राहायला शिकशील का? जिथनं करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्या वू-हान प्रयोगशाळेला तूच देणगी दिलेलीस ना? एकीकडे चीनला पैसे द्यायचे व तिथूनच विषाणू बनवून घ्यायचा आणि दुसरीकडे भारतासमोर अक्कल पाजळायची. आम्हांस कळंत नाही का तुझी थेरं ? तू १९८६ सालापासनं अमेरिकेच्या सांसर्गिक रोगांच्या विभागाचा प्रमुख आहेस. नेमकं कसलं संशोधन केलंस रे गेले ३५ वर्षं ? तू एड्सवर औषध शोधणार होतास ना? काय झालं त्याचं ? किती पैसे खाल्लेस इतक्या वर्षांत ? तुझ्यावर विश्वास ठेवायला आम्ही काय आमची अक्कल गहाण ठेवलेलीये होय ? तुझी लायकी कुठे सुरू होते आणि कुठे संपते ते आम्हांस चांगलं ठाऊक आहे. पीसीआर चाचणी ( PCR test ) शोधल्याबद्दल ज्याला १९९३ साली नोबेल मिळालं त्या केरी म्युलीस ने तुझी कशी ## घेतलीये ते आम्हाला माहितीये : https://www.youtube.com/watch?v=W8FYWzkR1ek सांगायचा मुद्दा काये की, तुझा सल्ला आम्ही मानावा इतकी काही आमची परिस्थिती केविलवाणी नाही. तु.न., -गा.पै.
म
मराठी कथालेखक Sun, 05/16/2021 - 15:37 नवीन
तु.न., -गा.पै.
इतक्या शिव्या घातल्या नंतर पुन्हा "तु. न." म्हणणे थोडं विसंगत वाटतंय का ?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 05/19/2021 - 16:06 नवीन
नम्रता दाखवायची म्हणून तर त्यांनी ही भाषा वापरली आहे. अन्यथा नम्रता सोडून वागायचे असेल तर ते पैलवान आहेत एखाद्याचे हातपाय मोडणे त्यांना कठीण आहे का? बाकी स्वतः मास्क न वापरणार्‍या व इतरांचे मास्क देखील उतरवणार्‍या संभाजी भिडेंना कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि दोन लशी घेतलेल्या सर्व नियम पाळणार्‍या आयएमच्या डॉक्टरांचा मात्र कोरोनाने मृत्यू होतो याचे रहस्य काय असावे?
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा