Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते

व
विवेकपटाईत
Mon, 08/02/2021 - 12:28
💬 78 प्रतिसाद
आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः। पितरंच प्रयन्त्स्व:॥ ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य (ऋ. १०/१८९/१) अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते. ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच. गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते. इथे "गौः" शब्दाचा अर्थ पृथ्वीच का? हा प्रश्न मनात येईलच? याचे स्पष्टीकरण: वरील ऋचाची ऋषिका सार्पराज्ञी आहे. पहिली देवता सार्पराज्ञी आहे. आपली आकाशगंगाहि सर्पिल आहे. अंतरिक्षात ती सापासारखी कुंडली मारलेल्या अवस्थेत दिसते. बहुतेक ऋषिकाने आकाशगंगेला सार्पराज्ञी असे संबोधले असावेत. दुसरी देवता सूर्य आहे. भक्त हा आपल्या देवतेची परिक्रमा करतो, हि आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. ऋचेत गमन करणारी वस्तू सूर्याची परिक्रमा करत आहे. दृष्टा ऋषिका आपल्या पृथ्वीवरच राहणारी मानव होती. तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल म्हणून तिचे नावहि सार्पराज्ञी असे पडले असावे. तिला झालेल्या साक्षात्काराचे वर्णन तिने छंदबद्ध भाषेत वरील ऋचेत केले आहे. पृथ्वीसाठी "गौः" हा शब्द वापरला. तिच्यामुळे जगाला प्रथमच कळले कि पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते.

प्रतिक्रिया द्या
25583 वाचन

💬 प्रतिसाद (78)
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 23:56 नवीन
जाऊ दे गामा जी, तुम्हाला न झेपणारी गोष्ट मी तुम्हाला करायला सांगितली याबद्दल मी तुमची क्षमा मागतो... पण तुम्ही देखील आपली रेघ मोठी करण्याच्या नादात दुसऱ्याची रेघ पुसून लहान करायच्या फंदात उगीच पडलात... पहिली गोष्ट निव्वळ वैदिकाता म्हणजे हिंदुत्व न्हवे हे विसरलात अन हिंदुबाबत कोणी काही बोललं नसता हिंदू हा शब्दप्रयोग केला. अन दुसरी गोष्ट म्हणजे तुमची एखादी बाब भाकडकथा आहे असे सांगितल्या बद्दल तुम्हीं ती भाकडकथा नाही यावर विवेचन न करतां इतरही भाकडकथा सांगतात म्हणुन आमच्या भाकडकथना भाकड गणू नये असा अजब जावईशोध आपलासा केलात याबद्दल तुम्हीं मिपाकरांनी जाहीर माफी मागणे लागता तेव्हढे जरी केलें तरी ती स्वागतार्ह बाब असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
क
कॉमी Wed, 08/04/2021 - 18:02 नवीन
कथा- काल्पनिक प्रसंगांची मालिका. भाकडकथा = (कथा) + (कथा म्हणून प्रचलित नसून, सत्य घटना म्हणून प्रचलित असणे) हेमावैम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 08/04/2021 - 16:26 नवीन
कोहंसोहं१०,
अनेक भौतिक गोष्टींबद्दलचे ज्ञान आपल्या पूर्वजांना होते यात दुमत नाही पण त्याहूनही कितीतरी उच्च सत्य जे आपल्या उपनिषदांमध्ये आहे जे कालातीत आहे आणि राहणार आहे हेच नेमके आपण विसरलो आहोत.
अगदी नेमकं बोललात पहा. कुठे काय शोधायचं याचं तारतम्य हवंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 17:21 नवीन
कोणीतरी सामण्य शब्दात सामाण्याना कळेल असे हे निःसंदिग्ध सांगेल का इथे की पृथ्वी गोल असून सूर्यभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही हा शोध जगात भारतीयांनी प्रथम लावला
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 08/04/2021 - 18:32 नवीन
कोण कोणा भोवती फिरत आहे हे आताच्या विज्ञाना तरी माहीत आहे का. आकाश गंगा स्तरावर विचार केला तर सर्व आनंदी आनंद च आहे. फुकाचा गर्व करू नका कोणाच्या तरी अंकित असणाऱ्या आधुनिक संशोधकांचा. सर्व प्रश्नांची उत्तर अती प्राचीन ज्ञान ग्रंथात च मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 19:00 नवीन
कोण कोणा भोवती फिरत आहे हे आताच्या विज्ञाना तरी माहीत आहे का.
ओके विज्ञानाला माहिती नाही पण आपल्यासारख्या विद्वानांना माहीत आहे ना ? मग जो प्रश्न सूर्यमालेच्या स्तराचा आहे त्याला आकाशगंगेचे पालुपद लावायची गरज काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 23:16 नवीन
भारतीय जनतेमध्ये आधुनिक दृष्टिकोन हा दुर्दैवाने बाहेरील लोकांनी आणला त्यामूळे जे काही आधुनिक ते भारताच्या संस्कृती विरोधी असा बोभाटा करायला बुडातील स्वांत सुखाचे बुडबुडे फोडणारे मोकाट झाले अन विरोधाभास म्हणजे स्वांत सुखाचे बुडबुडे मोकाट फोडणारे लोकच आता ज्यांनी आधुनकीक दृष्टीकोन भारताला दिला त्यांची चाकरी करायला भारताबाहेर जायलाही धडपडत आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 08/04/2021 - 23:39 नवीन
हे तिकडे का जातात तर भारतीय संस्कृतीने त्यांच्या जीवनासाठी अधोरेखित केलेली उदिष्टे साध्य करायला न्हवे, तर पाश्च्यात्यांनी जी उद्दिष्टे भारतीय जनते समोर ठेवली त्याचे घनदाट वर्जन जगायला... आणि वरून प्राचीन भारतीय संस्कृती कशी महान याचा जालिय कळवळा दाटून येतो. मग आजच्या भारतात एखादे आधुनिक भविष्यवेद किंवा भविष्यपुराण कसे रचले जाईल जे येणाऱ्या पिढीसाठी दीपस्तंभ म्हणुन काम करेल ? आशा परिस्थितीमध्ये हे आम्ही आधीच हुडकले होते म्हणायचा कोणाला काही अधिकार उरतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
क
कॉमी गुरुवार, 08/05/2021 - 04:16 नवीन
रैट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
B
Bhakti गुरुवार, 08/05/2021 - 12:37 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
R
Rajesh188 गुरुवार, 08/05/2021 - 12:37 नवीन
पण पाश्चिमात्य देशांना आदर्श समजून त्यांच्या पाढी पळण्याचे काही कारण नाही. त्यांच्या मुळेच जगात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आहार लोकांचा त्यांनी बिघडवला आरोग्य साठी घातक अन्न पद्धती त्यांनी निर्माण केली आणि जगात अनेक आजार निर्माण झाले . मधुमेह,blood प्रेशर ,आणि अनेक गंभीर आजार ही त्या पाश्चिमात्य देशांचीच देणं आहे. शहरीकरण एकाच जागेवर खूप प्रचंड लोकांना जमा करून शहर निर्माण करणे आणि बाकी भागाकडे दुर्लक्ष करून विकास थांबवणे ही त्यांचीच देणं आहे. त्याचे घातक दुष्परिणाम आता दिसत आहेत. हायब्रीड बी बियाणे,हायब्रीड जनावरे तयार करणे,विविध रासायनिक खत,कीटक नाशक,पिकांचे हार्मोन्स बदलणे . हे सर्व पाश्चिमात्य देशांनी च केले आणि सकस आहार माणसाला मिळणे मुश्कील झाले. आपण वेड्या सारखे त्यांच्या मागे धावत आहे. विज्ञाना च्या गोंडस नावाखाली सर्व पाप लपवली जात आहेत. पण प्राचीन भारतीय ज्ञान असे विध्वंसक नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
R
Rajesh188 गुरुवार, 08/05/2021 - 12:37 नवीन
पण पाश्चिमात्य देशांना आदर्श समजून त्यांच्या पाढी पळण्याचे काही कारण नाही. त्यांच्या मुळेच जगात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आहार लोकांचा त्यांनी बिघडवला आरोग्य साठी घातक अन्न पद्धती त्यांनी निर्माण केली आणि जगात अनेक आजार निर्माण झाले . मधुमेह,blood प्रेशर ,आणि अनेक गंभीर आजार ही त्या पाश्चिमात्य देशांचीच देणं आहे. शहरीकरण एकाच जागेवर खूप प्रचंड लोकांना जमा करून शहर निर्माण करणे आणि बाकी भागाकडे दुर्लक्ष करून विकास थांबवणे ही त्यांचीच देणं आहे. त्याचे घातक दुष्परिणाम आता दिसत आहेत. हायब्रीड बी बियाणे,हायब्रीड जनावरे तयार करणे,विविध रासायनिक खत,कीटक नाशक,पिकांचे हार्मोन्स बदलणे . हे सर्व पाश्चिमात्य देशांनी च केले आणि सकस आहार माणसाला मिळणे मुश्कील झाले. आपण वेड्या सारखे त्यांच्या मागे धावत आहे. विज्ञाना च्या गोंडस नावाखाली सर्व पाप लपवली जात आहेत. पण प्राचीन भारतीय ज्ञान असे विध्वंसक नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
म
मदनबाण गुरुवार, 08/05/2021 - 06:24 नवीन
The Vedic Sanskrit text Aitareya Brahmana (2.7) (c. 9th–8th century BC) also states: "The Sun never sets nor rises thats right. When people think the sun is setting, it is not so; they are mistaken." This indicates that the Sun is stationary (hence the Earth is moving around it), which is elaborated in a later commentary Vishnu Purana (2.8) (c. 1st century), which states: "The sun is stationed for all time, in the middle of the day. [...] Of the sun, which is always in one and the same place, there is neither setting nor rising." (See Haug, Martin and Basu (1974), Joseph (2000), Kak (2000) in Selin (2000), Teresi (2002) and Blavatsky (1877) for further information.) संदर्भ :- Heliocentrism जाता जाता :- नासा में लगती है 15 दिन की संस्कृत की क्लास भारतात सगळे लोक संस्कृत मध्ये बोलत होते का ? कठीण प्रश्न ! कारण हा जगातला एकमेव खंड आहे जिथे फार मोठ्या प्रमाणात अनेक भाषा एकत्र नांदतात. पण आजही हिंदूस्थानात एक गाव आहे जिथे सगळे लोक केवळ संस्कृत मध्येच बोलतात. यावर बजाज ने एक जाहिरात बनवली होती. मदनबाण..... आजची स्वाक्षरी : - “Astrology is one of the oldest and most accurate tools known to mankind.” :- Chris Flisher
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 08/05/2021 - 14:27 नवीन
जॉन कार्टर मला आवडला नाही व नंतर आपल्या आर्थिक धाग्यावर मी माझे म्हणणे परखडपणे स्पश्ट केल्यानंतर आपण माझ्या कोणत्याही प्रतिसादावर साद दिली नाहीत.... इतका मनाचा शालो इंटरेस्ट चर्चा आणि संबंध दोन्हीसाठी मारक असतो त्यामुळे मी आपल्याशी साधकबाधक चर्चा करण्यात अर्थ नाही. तरीहि या धाग्यावर आपण माझे काही म्हणणे वाचून आज जो प्रतिसाद लिहलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. (मैत्रीत विरोधी मताचा अधिकार मान्य करणारा)- गॉडझिला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 08/05/2021 - 16:54 नवीन
जॉन कार्टर मला आवडला नाही व नंतर आपल्या आर्थिक धाग्यावर मी माझे म्हणणे परखडपणे स्पश्ट केल्यानंतर आपण माझ्या कोणत्याही प्रतिसादावर साद दिली नाहीत. जॉन कार्टर मला आवडला मी तसे सांगितले, तुम्हाला नाही आवडला त्यावर मी काहीही उणे बोललो नाही, प्रत्येकाची आवड वेगळी असते. आर्थिक धाग्यावर ज्याला आपण परखड प्रतिक्रिया म्हणता ती मला तशी वाटली नाही आणि जे मला तुमच्या प्रतिक्रिया वाचुन जाणवले ते तिथेच तसे सांगितले आहे. इतका मनाचा शालो इंटरेस्ट चर्चा आणि संबंध दोन्हीसाठी मारक असतो त्यामुळे मी आपल्याशी साधकबाधक चर्चा करण्यात अर्थ नाही. तुमच्याशी देखील चर्चा करण्यात अर्थ नाही हे मला त्याच धाग्यात कळले होते,त्यामुळे माझा अमूल्य वेळ तुमच्या प्रतिसांदवर खर्च करणे टाळण्यासाठी मी चर्चा तिथेच थांबवली. तरीहि या धाग्यावर आपण माझे काही म्हणणे वाचून आज जो प्रतिसाद लिहलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी एकंदर धागा आणि सगळे प्रतिसाद वाचुन मग व्यक्त झालो, त्यात तुमचा प्रतिसाद देखील आला. फक्त तुमचाच प्रतिसाद वाचुन मी माझा प्रतिसाद दिलेला नाही. मला उद्देशुन हा प्रतिसाद दिला असल्याने मी आता तुम्हाला प्रतिसाद दिला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - “Astrology is one of the oldest and most accurate tools known to mankind.” :- Chris Flisher
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला गुरुवार, 08/05/2021 - 16:58 नवीन
जो तुम्हालाच दिला आहे आता परत टाईप करत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/05/2021 - 19:26 नवीन
आपल्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही
गॉडझिला , आपणही चर्चा करण्यात अर्थ नाही ह्या मताशी आलेला पाहुन आनंद झाला ! मुळातच कोणाशीच काहीच चर्चा करण्यात काही पॉईट नाही , कोणाला काही पटवुन देण्यात किंव्वा कोणाचे काहीही पटवुन घेण्याने आपला काहीही वैयक्तिक फायदा होत नसत्तो . त्यामुळं कशाला उगाच वेळ वाया घायलावयचा ? नुसतं हे सगळं "बामणाचे कसब" आहे इतके म्हणलं अन बामणांची संस्कृती बामणांसाठी सोडुन दिली की विषय संपतो ! बाकी टाईमपास करायचा असल्यास , मिपा , इथल्या गंभीर चर्चा वगैरे सगळं स्वान्तःसुखाय आहेच म्हणा ! ख्यॅ खॅ ख्यॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Fri, 08/06/2021 - 06:53 नवीन
त्यामुळं कशाला उगाच वेळ वाया घायलावयचा ? नुसतं हे सगळं "बामणाचे कसब" आहे इतके म्हणलं अन बामणांची संस्कृती बामणांसाठी सोडुन दिली की विषय संपतो !
मी तुमच्या या प्रवृत्तीशी सहमत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॉडजिला Fri, 08/06/2021 - 07:10 नवीन
असेच प्रतिसाद लिहीत रहा वाचून मनोरंजन होते अर्थपूर्ण वगेरे लिखाणाच्या नादात पडू नका _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/05/2021 - 22:19 नवीन
टवाळ कार्टा,
या सगळ्या भाकडकथा आहेत ते कशाच्या आधाराने लिहिले त्याचा रेफरन्स इथे देता का?
देतो. मी ज्यांना भाकडकथा म्हणतो त्यांचा स्रोत इथे आहे : https://www.misalpav.com/comment/1114837#comment-1114837 १. अणुगर्भाच्या भोवती फिरणारा इलेक्ट्रॉन : केंद्राभोवती गोल गोल फिरणारी वस्तू त्वरणांकित ( = accelerated ) असते. विद्युतभरीत वस्तू जर त्वरणांकित असेल तर तिने प्रारण ( = radiation ) उत्सर्जित करायला हवं. या प्रारणास लारमर प्रारण म्हणतात ( इंग्रजी संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Larmor_formula ). प्रारणाबरोबर ऊर्जा बाहेर पडल्याने सदर वस्तूची ऊर्जा कमीकमी होत जाते. इलेक्ट्रॉन विद्युतभारित आहे हे सर्वमान्य आहे. तो जर अणुगर्भाभोवती गोलगोल फिरला तर प्रारण उत्सर्जित करीत अणुगर्भात पडायला पाहिजे. पण सर्वसाधारण अणूतून असं कोणताही प्रारण बाहेर पडतांना आढळून आलेलं नाही. तसंच इलेक्ट्रॉन कोलमडून अणुगर्भात पडलेला आढळून आला नाही. म्हणजेच इलेक्ट्रॉन अणुगर्भाच्या भोवती फिरंत नसतो. २. ढगांवर ढग घासून वीजनिर्मिती : दीड लाख व्होल्ट उत्पन्न होतात का? घर्षणातनं एव्हढा प्रचंड प्रभार निर्माण व्हायला कुठल्या चक्कीचा आटा खातात हे ढग? घर्षण होण्यासाठी किमान एक पृष्ठभाग घन वा द्रव असावा लागतो. पण इथे तर ढग हा वायुगोळा आहे. तो कुठे सुरू झाला आणि कुठे संपला हेच निश्चित नाही. phase boundary नसतांना एखादी वस्तू घासली कशीकाय जाऊ शकते? शिवाय आकाशातनं वीज नेहमी खालीच का पडते? उलटी हवेत का उडून जात नाही? जर ढगांवर ढग घासले जाऊन विद्युतभार निर्माण होत असेल तर एका ढगावर धन व दुसऱ्यावर ऋण भर निर्माण झाले पाहिजेत. जर ऋणभारामुळे वीज जमिनीवर कोसळंत असेल तर धनभारामुळे विजेचा लोळ जमिनीतून आकाशात झेपावतांना दिसायला हवा. प्रत्यक्षांत वीज नेहमी खालीच कोसळतांना दिसते. काय गौडबंगाल आहे? ढगांवर ढग घासून आकाशात वीज निर्माण होत नसते. ३. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत : याविषयी इथे लिहून झालेलं आहे : http://www.misalpav.com/comment/955679#comment-955679 परत लिहितो. एकपेशीय जिवापासनं माणूस बनला हा तो तथाकथित उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. हा एकपेशीय जीव अमिबासारखा असतो ( इंग्रजी संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Amoeba ). गंमत अशीये की ही पेशी प्रचंड गुंतागुंतीची असते. कारण की जीवनावश्यक कार्ये एकाच पेशीत एकवटलेली असतात. माणसाच्या अंगात अनेक प्रसंस्था आहेत. उदा.: शासन, पचन, पुनरुत्पादन, इत्यादि. या प्रसंस्थांची काम ते ते अवयव करतात. मात्र एकपेशीय जिवात ही सगळी कार्ये व तदनुरूप रचना सर्वकाही एकाच पेशीत सामावलेल्या असतात. साहजिकंच ही पेशी अतिशय हुरहुन्नरी व हुंबदांडगी होते. याउलट मानवी शरीरातली कोणतीही पेशी त्या त्या अवयवाचं कार्य करण्यापुरती सीमित असते. एकपेशीय जिवाचा डीएनए उच्च प्रमाणावर सक्रीय असतो. मात्र मानवी शरीरातल्या कुठल्याही पेशीचा डीएनए फक्त ठराविक काम करण्यापुरताच म्हणजेच अत्यंत मर्यादित प्रमाणावर सक्रीय असतो. एकपेशीय जिवाची आणि मानवी शरीरातल्या कोणत्याही पेशीची फायटिंग लावली तर एकपेशीय जीव मानवी पेशीला क्षणभरात फस्त करेल. मग उत्क्रांती नेमकं कशास म्हणायचं? शरीरातल्या पेशींना स्वतंत्रपणे जगण्यास नालायक बनवणं, हीच का ती उत्क्रांती? उत्क्रांतीच्या नावाखाली बावळटपणा चालू आहे. तो टाळायचा असेल तर उत्क्रांती ही शरीरबाह्य जिवाची होते, असंच मानायला पाहिजे. डार्विनच्या पुस्तकात शरीरबाह्य चैतन्याविषयी एक अवाक्षर तरी आहे का? नाही ना? मग त्याची रवानगी कचऱ्याच्या डब्यात व्हायला हवी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 08/06/2021 - 10:51 नवीन
मी तुम्ही स्वतः लिहिलेल्या प्रतिसादांचा रेफरन्स मागितलेला नव्हता....तुम्ही जे दावे केलेत ते सिध्ध करण्यासाठी काही निरिक्षणे + त्याला आधार देणारे पुरावे + परत परत प्रयोग करुन त्यातून सारखेच निष्कर्ष आलेत याचे पुरावे असे काही आहे का? असतील तर ते जागतिक स्तरावर प्रकाशित करा. तुम्ही जे ३ दावे केलेत ते जर तुम्हाला सिध्ध करता आले तर भारताला ३ नोबेल नक्की मिळतील आणि ३ नोबेल मिळवणारे तुम्ही आजपर्यंतच्या मानवी इतिहासातले पहिलेच असाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/05/2021 - 23:11 नवीन
गॉडझिला, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
जाऊ दे गामा जी, तुम्हाला न झेपणारी गोष्ट मी तुम्हाला करायला सांगितली याबद्दल मी तुमची क्षमा मागतो...
क्षमा केली. २.
पण तुम्ही देखील आपली रेघ मोठी करण्याच्या नादात दुसऱ्याची रेघ पुसून लहान करायच्या फंदात उगीच पडलात...
माझी रेषा लहानंच आहे. ३.
पहिली गोष्ट निव्वळ वैदिकाता म्हणजे हिंदुत्व न्हवे हे विसरलात
येस सर. विसरलो. ४.
अन हिंदुबाबत कोणी काही बोललं नसता हिंदू हा शब्दप्रयोग केला.
भाकडकथा हा शब्द नीळा यांनी हिंदू पुराणांना उद्देशून वापरला होता. म्हणून माझ्या विधानात हिंदू हा शब्द आला. मात्र तो अनावश्यक आहे हे मान्य. सुधारित वाक्य असं पाहिजे :
शेषाच्या मस्तकावर पृथ्वी आहे वगैरेसाठी केवळ हिंदूंच्या पुराणांना दोष देणे नको.
धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 08/06/2021 - 17:20 नवीन
टवाळ कार्टा, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
मी तुम्ही स्वतः लिहिलेल्या प्रतिसादांचा रेफरन्स मागितलेला नव्हता..
मी ज्यांना भाकडकथा म्हणतो त्यांची यादी करायला हवी. ती मीच करणार ना? २.
तुम्ही जे दावे केलेत ते सिध्ध करण्यासाठी काही निरिक्षणे + त्याला आधार देणारे पुरावे + परत परत प्रयोग करुन त्यातून सारखेच निष्कर्ष आलेत याचे पुरावे असे काही आहे का?
मी कुठलाही दावा केलेला नाही. फक्त प्रचलित समजुतीतले विरोधाभास दाखवून दिलेत. मी जी काही निरीक्षणं नोंदवली आहेत ती मी नोंदवली काय वा तुम्ही घेतली काय किंवा इतर कोणी नोंदवली काय, काय फरक पडतो? निरीक्षणं आहेत तशीच राहणार. त्यांना आजून कसले पुरावे जोडायची गरज नाही. ३.
असतील तर ते जागतिक स्तरावर प्रकाशित करा.
www.misalpav.com यामध्ये www आहे. त्याचा अर्थ world-wide-web असा आहे. म्हणजेच मी इथे जे काही लिहितोय ते आपोआपच जागतिक स्तरावर प्रकाशित होते आहे. त्यासाठी वेगळे परिश्रम घ्यायची गरज नाही. ४.
तुम्ही जे ३ दावे केलेत ते जर तुम्हाला सिध्ध करता आले तर भारताला ३ नोबेल नक्की मिळतील आणि ३ नोबेल मिळवणारे तुम्ही आजपर्यंतच्या मानवी इतिहासातले पहिलेच असाल.
उपरोक्त संदेशात मी कुठलाही दावा केलेला नाहीये. दुसरं म्हणजे माझ्या कुठल्याही कामगिरीस जर नोबेल पारितोषिक मिळालं तर ते भारताला मिळणार नाही. बाकी, ३ नोबेल पारितोषिकं मला मिळाली तर मी मानवी इतिहासातला पहिलाच असेन हे तुमचं विधान बरोबर आहे. अर्थात हा इतिहास आत्तापर्यंतचा मानवी इतिहास आहे हे वेगळे सांगणे नलगे. तुमच्या आस्थेबद्दल आभार. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 08/07/2021 - 13:55 नवीन
इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. हा कण म्हणे अणुगर्भाच्या भोवती फिरंत असतो. आकाशात ढगांवर ढग घासून म्हणे वीजनिर्मिती होते. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत या सगळ्या भाकडकथा आहेत
@निलकांत, @प्रशांत आणि मिपा चालवणारे इतर वर लिहिलेले कैच्याकै दावे मिसळपाववर मानाचे प्रतिसाद (Hall of fame) अशी यादी बनवून त्यात जतन करावेत. भविष्यात हेच दावे पाश्चिमात्य देशांतल्या कोणी "पुराव्यासकट" सिध्ध केले तर आपण "हे तर आमच्याकडे पुराणांत मिसळपाववर आधीच लिहिलेले होते" असे म्हणायला मोकळे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 08/07/2021 - 23:50 नवीन
टवाळ कार्टा, मी कुठलाही दावा केलेला नाहीये. केवळ निरीक्षणे मांडलीत. ती सिद्ध वगैरे करायची नसतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 08/07/2021 - 13:56 नवीन
दुसरं म्हणजे माझ्या कुठल्याही कामगिरीस जर नोबेल पारितोषिक मिळालं तर ते भारताला मिळणार नाही.
नक्की का? कारण या हिशोबाने कोणत्याच देशाला आजपर्यंत एकही नोबेल मिळाले नाही असा अर्थ होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 08/07/2021 - 23:49 नवीन
टवाळ कार्टा, करेक्ट! कोणत्याच देशाला आजपर्यंत एकही नोबेल मिळाले नाही. नोबेल मिळतं ते व्यक्तीस. देशास नव्हे. अपवाद शांततेचं नोबेल. पण त्याचा इथे संबंध नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विवेकपटाईत Sat, 08/07/2021 - 09:13 नवीन
गुलामी मानसिकता असलेअल्या सरकारी संस्थेचा चूक अर्थ इथे एका प्रतिसादात दिला आहे. पण ऋचेत वृषभ शब्द नाही गौ हा शब्द आहे. चुकीच्या भाष्यात गौः शब्दाचा अर्थ वृषभ असा केलेला आहे. किमान थोडे स्वत:च्या डोक्याचा वापर पण करावा. ऋग्वेदात पुलिंग बैल शब्दासाठी वृषभ (वादळ) हा शब्द वापरला आहे. याच मंडळातील १०२ वे सुक्त. म्हणजे समकालीनच. नि । अ॒क्र॒न्द॒य॒न् । उ॒प॒ऽयन्तः॑ । ए॒न॒म् । अमे॑हयन् ।वृ॒ष॒भम् । मध्ये॑ । आ॒जेः । तेन॑ । सूभ॑र्वम् । श॒तऽव॑त् । स॒हस्र॑म् । गवा॑म् । मुद्ग॑लः । प्र॒ऽधने॑ । जि॒गा॒य॒ ॥ १०.१०२.५ २. याशिवाय ऋग्वेदातील शाकल शाखा, ब्राम्हण ग्रंथात ऐतरेय (३/४४ ) मध्ये हि स्पष्ट केले आहे सूर्य स वा न कदाचनास्तमेति नोदेति ....इति ३. बाकी भक्त देवतेची परिक्रमा करतात. देवता नाही. शिवाने गणेशाची परिक्रमा केलेली नाही. बाकी मी हा अर्थ वेदांचे गाढे अभ्यासक ब्रम्हमुनी यांच्या भाष्यातून घेतला आहे. स्वामी दयानंद ते अधिकांश भारतीय विद्वानांनी हाच अर्थ काढला आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा