Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

T
Trump
गुरुवार, 09/22/2022 - 18:59
💬 54 प्रतिसाद
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे. :) राणु राणु - तेलगु ------ मनमरासा - तामिळ ------ आ आंटे - तेलगु ------ आपडी पोडे - तामिळ ------ सध्या इंग्रजी कळत असले तरी हे गाणे सुध्दा परकीय भाषेतील म्हणुन आवडते. KEEP AMERICA GREAT (Official Music Video) - Trump 2020 Song by Camille & Haley ------ इंदीला - फ्रेंच ------ ब्राझिल - इंग्रजी ------ I'll Do You Like A Truck - इंग्रजी ================================================== तुमचीही आवडती गाणी इतर भाषेतील ऐकायला मजा वाटेल.

प्रतिक्रिया द्या
16326 वाचन

💬 प्रतिसाद (54)
क
कर्नलतपस्वी Fri, 09/23/2022 - 05:12 नवीन
ट्रम्पभौ धाग्या बद्दल अभिनंदन आणी आभार. माणसाचं मन म्हणजे गारूड्याची पोतडी. धागा वाचून झटकन १९८२-८३ च्या काळात ,चाळीस वर्ष मागे गेले. आयुष्यात काही गोष्टी विसरतच नाहीत. एक आमचा मिझोरमचा मित्र होता,नाव "लियाना" आडनाव कधीच क्ळले नाही. नारायण धारपांच्या गुढ कथे सारखेच व्यक्तीमत्व. फारसा इतरां बरोबर मिसळत नसे. जेवणात फक्त भात,उकडलेली कोबीची पानं किवां चिकन,मटण,अंडे. मसालेदार पदार्थ आजिबात खात नसे. हुषार पण अंतर्मुख, मेहनती पण कुठलेही नॉन्सेन्स खपवून न घेणारा. परिणामाची पर्वा नाही कुठल्याही टोकाला जाऊ शकायचा. दारू कितीही पीली तरी कधीच चढलेली दिसली नाही. माझ्याशी कशी काय पत्रीका जुळली माहीत नाही. बाकी लोकं "यडा" आहे म्हणून नादी लागायची नाही. मला मात्र खुप आवडायचा. मलातर स्थितप्रज्ञ वाटायचा. फावल्या वेळात गिटार घेऊन इंग्रजी गाणी ऐकत बसायचा. संगीत मलापण आवडायचं. तो नेहमी एक गाणं ऐकायचा,त्याचे शब्द खालील प्रमाणे. इंग्रजीतील उच्चार फारसे कळायचे नाहीत पण संगीत मात्र गारूड करून गेले, आजही त्याची लय, आठवण आली की मनात रूंजी घालते. कदाचित तुम्हालाही आवडेल.लिकं खाली दिली आहे. आज अंतरजालावर शोधून वाचल्यावर रचना किती सशक्त आहे याचाही प्रत्यय आला. " Got nine million nine hundred ninety nine thousand nine hundred ninety nine tears to go And then I don't know if I'll be over you The sun didn't shine this morning it's been raining the whole day through Suddenly without warning you found somebody new That's when the first tear came falling from my eyes I'm beginning to feel the pain seeing nothing but cloudy skies Got nine million nine hundred Well I'll be over you You're out tonight with your new love I'm far far from your mind Trying to get over you love could take a whole lifetime I can't believe you could want anybody else so no one could take my place At least that's what I keep telling myself as the tears fall down my face Got nine million nine hundred I'll be over you Got nine million nine hundred Got nine million nine hundred" 9,999,999 Tears" is a 1976 hit single by Dickey Lee. The song was written and originally recorded by American country music artist Razzy Bailey. https://secondhandsongs.com/performance/455905 मित्राने कुठलेही प्रमोशन घेण्यास नकार दिला व लवकरच सेना सोडून निघून गेला.जाताना मी लखनऊ मधेच होतो आवर्जून भेटून गेला. उन्मुक्त पक्षी होत,पिंजऱ्यात किती दिवस राहणार. हम पंछी उन्मुक्त गगन के पिंजरबद्ध न गा पाएँगे, कनक-तीलियों से टकराकर पुलकित पंख टूट जाएंगे। हम बहता जल पीनेवाले मर जाएंगे भूखे-प्यासे, कहीं भली है कटुक निबोरी कनक-कटोरी की मैदा से," हिन्दीचा प्रसिद्ध व माझे आवडते कवी,शिव मंगल सिह,'सुमन' यांची रचना.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 09/23/2022 - 08:02 नवीन
माणसाचं मन म्हणजे गारूड्याची पोतडी. धागा वाचून झटकन १९८२-८३ च्या काळात ,चाळीस वर्ष मागे गेले. आयुष्यात काही गोष्टी विसरतच नाहीत.
हो, अगदी बरोबर. कोणती गोष्ट कधी आणि कशी माणसाला आवडेल ते सांगु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/23/2022 - 05:53 नवीन
त्यात अजुन एका गाण्याची भर घालतो https://youtu.be/s_04SR1nCnA काही जणांना हे गाणे पहाताना डोळ्याला त्रास होईल, अशांनी डोळे बंद करुन ऐकावे. मला अर्थात बघायला आणि ऐकायला दोन्ही आवडते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 09/23/2022 - 08:05 नवीन
धन्यवाद. छायाचित्रण जबराच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
व
वामन देशमुख Fri, 09/23/2022 - 05:57 नवीन
इंडिलाचं Dernière Danse माझंही आवडतं गाणं आहे. त्याशिवाय, शहरातील धकाधकीच्या आयुष्यापासून दूर कुठेतरी जावंसं वाटतं, अश्या भावना व्यक्त करणारं "उरू वेलपोता मामा" हे गाणं इथं देतो. एकदाच ऐकलं तरी पुन्हा-पुन्हा ऐकावसं वाटेल. --- तिसऱ्या व चौथ्या गाण्याचा विडिओ दिसत नाही; शेअरची परवानगी नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 09/23/2022 - 08:03 नवीन
तिसऱ्या व चौथ्या गाण्याचा विडिओ दिसत नाही; शेअरची परवानगी नाही.
धन्यवाद. कोणता विडिओ दिसत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
न
नि३सोलपुरकर Fri, 09/23/2022 - 06:24 नवीन
वाह वा ,वामन राव . काय गाण सजेस्ट केलय .सुपर्रब . चौरस्ता बँड ने कोरोनाव्हायरसवर प्रसारित केलेले गाणे ही खुप छान आहे .
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 09/23/2022 - 07:42 नवीन
भाऊ, दुवा द्या. इतरांनाही आनंद घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३सोलपुरकर
न
नि३सोलपुरकर Mon, 09/26/2022 - 07:38 नवीन
ट्र्म्प भाऊ, नमस्कार ,वरिल गाणे ह्या दुवा द्वारे पाहता आणी ऐकता येईल . https://www.youtube.com/watch?v=v-Qu0S8fje4 .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
ह
हेमंतकुमार Fri, 09/23/2022 - 08:02 नवीन
Bella ciao : https://m.youtube.com/watch?v=Xm-hdblSa9E
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/23/2022 - 08:21 नवीन
हे पण पहा https://www.youtube.com/watch?v=1ozmyl1ZEyY https://www.youtube.com/watch?v=EEW3dCCRTZ8
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 09/23/2022 - 08:52 नवीन
विद्या वोक्स (Vidya Vox) Pallivallu Bhadravalkakam गीता गोविंदम मधली सगळी गाणी येंती.. वचिंनदम अजून (मुद्दाम इंग्लिशमध्ये लिहितेय ,तसे सर्च करता येतात) -Inkum Inkum -Jal Jal Jalpatham -Padi padi leche -Oh may lovely lalana -Ramuloo Ramulaa -Rowdy Baby *अल्लूचे सगळे गाणे.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Fri, 09/23/2022 - 08:53 नवीन
एकदम नेत्र्सुखद म्हणता येईल असा डान्स आणि चित्रिकरण. धनुष आणि साईपल्लवी दोघेही नैसर्गिक अभिनयासोबत उत्तम नृत्यासाठीही ओळखले जातात. हे गाणे अगदी नीट पाहिले तर त्यात बर्‍ञाचशा स्टेप्स सलग आहेत आणि त्या तितक्याच अवघड आहेत पण धनुष सहजतेने नाचतो तर साईपल्लवी प्रचंड आनंद घेत एकदम जोशात परफॉर्म करते. एकदम फ्रेश लुक असलेले हे गाणे माझे फेवरिट आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 09/23/2022 - 08:55 नवीन
:)+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
क
कपिलमुनी Fri, 09/23/2022 - 09:03 नवीन
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 09/23/2022 - 09:06 नवीन
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 09/23/2022 - 10:02 नवीन
पसूरी -वीणा वाद्यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुरिया Fri, 09/23/2022 - 09:20 नवीन
ह्या गणेशोत्सवात हर हर शंभु सतत कानावर पडत होते. अभिलिप्सा पांडा नावाच्या ओरिसाच्या १८ वर्षाच्या मुलीने म्हणलेले हे गाणं यु ट्युबवर प्रचंड हिट झाले. अभिलिप्सा ४ वर्षाची असल्यापासून संगीत शिकतेय. घरात आजि आजोबापासून संगीताचा वारसा असलेल्या ह्या कराटे ब्लॅक बेल्ट होल्डर मुलीचा गायन करतानाचा कॉन्फीडन्स आणि आवाजातले टेक्श्चर खतरनाक आहे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 09/23/2022 - 09:30 नवीन
बरेचसे स्पॅनिश आणि एखादे वाक्य मधेच इंग्लिशमध्ये असलेले हे गाणे एक अक्षरही कळले नाही तरी ऐकायला आवडते.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/23/2022 - 11:22 नवीन
गायिका नॅन्सी अजरेम आणि या गाण्यावर हा त्यांचा लेख अजून एक, याचे शब्द आवडतातच पण ठेका जास्त आवडतो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/23/2022 - 11:28 नवीन
वरच्या यादीत हे गाणे बसत नाही, पण तरी सुध्दा डोक्यात जाम घर करुन बसले आहे. आपल्या महाग्रुंच्या मुंबई अ‍ॅन्थमला पण थोबाडात मारेल असे हे गाणे आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Mon, 09/26/2022 - 17:49 नवीन
अजुन एक दोन अ‍ॅड करतो. डोळे आणि कानातून रक्ताच्या चिळकांड्या उडायची शक्यता असल्याने नवख्या लोकांनी टॉवेल वगैरे बांधून या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा १) सलाम सेठ २) जावेद भाई ३) एम एस जी यांचे सिस्टम हिल गया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मूकवाचक Fri, 09/23/2022 - 11:49 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 09/23/2022 - 12:02 नवीन
समंथा व नागा चैतन्य यांच्या माजिली या सिनेमातील गाणी तसेस समंथाच्या थेरी या सिनेमातील तीच्या लग्नाचे गाणे खूप आवडते. उच्चार लक्षात राहत नाहीत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 09/24/2022 - 17:24 नवीन
रॅटाटुई सिनेमात शेवटी हे गाणे आहे ते प्रचंड आवडते. (फ्रेंच) गॉड मस्ट बी क्रेझी भाग २ मध्ये ह्या गाण्याचा एक स्निपेट ऐकला, तो आवडला म्हणून मूळ गाणे शोधले. हे "शोशालोझा" गाणे खाणी मध्ये काम करणाऱ्या आफ्रिकन पुरुषांचे गाणे आहे. एकाच वेळी आशादायक आणि खिन्न वाटते मला हे गाणे ऐकून. आणि आफ्रिकेबद्दल बोलतोय आहे तर अभूतपूर्व व्होकल्स आणि श्रवण अनुभव असणारे लायनकिंग मधले हे गाणे घ्यायलाच हवे- एक आवडलेले ऍनिमे शीर्ष गीताचे भारतीय गायकाकडून सादरीकरण-
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sat, 09/24/2022 - 17:39 नवीन
'अमे हसीबा' ... काहीसे जुन्या वळणाचे पण गोड उडिया गाणे आहे. शब्दही थोडेफार परिचित वाटतात. खऱ्याखुऱ्या तरुणमंडळींचे गाणे वाटते. https://youtu.be/x__HoVg9Etk
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sat, 09/24/2022 - 17:56 नवीन
चाल लावून एखादं गाणं बसवणं या मल्याळी गाण्यात छान दाखवलंय. https://youtu.be/ZzrR2emvpIE हे एका मल्याळी चित्रपटातल्या विनोदी गाण्यावर बेतलं आहे पण याचे शब्द हे 'डमी' शब्द आहेत, कुठल्याही भाषेतले नाहीत. काही जणांना नक्कीच परिचित असेल. https://youtu.be/ZzrR2emvpIE करुणरसातले हे उडिया गाणे. यातली प्रत्येक चित्रचौकट पहात रहावी अशीच आहे. https://youtu.be/pmPq8SaR4bI जगन्नाथभक्तीचे हे एक प्रसन्न उडिया गाणे https://youtu.be/GhVM7p_jAns
  • Log in or register to post comments
R
ramjya Mon, 09/26/2022 - 16:56 नवीन
neerparvai movie song (para para para....)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 09/27/2022 - 04:43 नवीन
सदासर्वकाळ आवडणारी आणि न समजणार्‍या भाषेतील ही काही गाणी १. नव्वदीच्या दशकात प्रत्येक शाळकरी मुलाचा आवडता पाश्चात्य गायक - २. मद्रदेशी अवचित पाहायला मिळालेल्या सुब्रमणियपुरम चित्रपटातील हे एक सुंदर प्रेमगीत. ३. काही वर्षांपूर्वी जगाला वेड लावलेलं गंगनम स्टाईल! ४. सिद्धार्थ आणि जेनेलिया ही नावे माहिती नसताना कॉलेजच्या नवीन दिवसांत आवडलेली ही दोन गाणी (चॅनल व्ही वर त्यावेळी पहिल्यांदाच अ-हिंदी आणि अ-इंग्रजी गाणी वाजली असतील!) गर्लफ्रेंड - डेटिंग - ५. त्याच सुमारास व्हीजे गौरवच्या चॅनल व्ही वरील एका शोमध्ये हे गाणं आठवड्यातून तीन-चार वेळा तरी आवडीने पाहायचो. हिप-हॉपशी माझी ओळख करून देणारं गाणं : शॉन पॉल - गेट बिझी ६. ब्लफमास्टरच्या बुरे-बुरे गाण्यामुळे अशर आणि त्याचं बोरो-बोरो गाणं माहिती झालं. ७. पुढे अशर आणि अनीला मिर्झा यांचं हे चोरी चोरी गाणं प्रचंड आवडलं : ८. मध्येच एक रोमानियन गाणं आवडलं : Cine e inima mea - Song by Copilu' De Aur and Laura Vass ९. बॉलिवूड वरून प्रभावित असलेलं त्यांचं अजून एक गाणं : https://www.youtube.com/watch?v=KAT5uku3hT4 (व्हिडीओ टाकणार्‍याने एम्बेडींग ब्लॉक केलंय.)
  • Log in or register to post comments
त
तनमयी Tue, 09/27/2022 - 13:51 नवीन
तेरे उअलझे उल्झे बाल रेशम क रुमल ओ तेर क्य कहना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Tue, 09/27/2022 - 04:45 नवीन
लिवाइस जीन्सच्या जाहिरातीमुळे माहिती झालं. माकेबा - जेन
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 09/27/2022 - 04:52 नवीन
वाखूसा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/27/2022 - 05:28 नवीन
डेझर्ट रोज... गाण्याच्या सुरवातीला आणि मधे मधे जे इतर भाषेतले शब्द येतात त्याचा अर्थ समजत नसला तरी त्याची चाल फारच आवडते https://www.youtube.com/watch?v=C3lWwBslWqg आणि हे वेंगाबॉइज चे ब्राझिल https://www.youtube.com/watch?v=UQ6LGrr8iEg पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 09/27/2022 - 08:10 नवीन
मराठी आणि हिंदी सोडून इतर भाषेतलं हे पहिलं गाणं मी एका केरळी मित्राकडून घेऊन मनापासून ऐकलेलं, तेव्हा यूट्यूब इतक प्रचलित नव्हत, वर्ष २०११. या गाण्यातली मेलडी अशी आहे की कितीही वेळ ऐकतच रहाव वाटतं. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 09/27/2022 - 10:19 नवीन
.video-container { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; }

माझीही थोडीशी भर.

खाली दिलेल्या मला आवडणाऱ्या गाण्यांपैकी काही संस्कृत, स्पॅनीश, हिंदी + पंजाबी / काश्मिरी, अरबी, अरबी + फ्रेंच अशा (हिंदी सोडून) मला न समजणाऱ्या भाषांतील असल्याने त्यांचा समावेश केला आहे.

गोविंद दामोदर माधवेति - पंडित जसराज

Govinda Damodar Madheveti - Pandit Jasraj

भाषा: संस्कृत

देवकी - कर्णामृता

Devaki - Karnamrita

भाषा: संस्कृत

डॉन ओमर - डाले डॉन डाले

Don Omar - Dale Don Dale (Audio)

भाषा:स्पॅनीश

भाषा:स्पॅनीश

लास केचप - द केचप सॉंग

Las Ketchup - The Ketchup Song

Khaled - C'est La Vie

भाषा: अरबी + फ्रेंच

सम्मी मेरी वार | उमेर जस्वाल & कुर्तलेन बलोच

Sammi Meri Waar| Umair Jaswal & Quratulain Balouch

भाषा: हिंदी + पंजाबी

मन अमेदियम | गुल पनरा & आतिफ अस्लम

Man Aamadeh Am| Gul Panrra & Atif Aslam

भाषा: हिंदी + काश्मिरी

हेलवा या बॅलदी | डालीडा

Dalida - Helwa Ya Balady

भाषा: अरबी

सलाम वालेकुम | साद

Saad "Salaam Alaikoum"

भाषा: अरबी (हे गाणं इतर वेळेपेक्षा पब/डिस्को मधे ऐकायला जाम मजा येते)

  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 09/27/2022 - 17:17 नवीन
याचं अजून एक आवडतं आणि फेमस गाणं दी दी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ट
टर्मीनेटर Mon, 10/03/2022 - 09:23 नवीन
येस्स... १९९१ मधे आलेल्या दी दी ह्या खालेदच्या गाण्याने धुमाकुळ घातला होता. १९९३ मधे 'श्रीमान आशिक' चित्रपटात ह्या गाण्याची "लडकीयोंसे ना मिलो तुम, लडकीया तो है बलाए" रुपी भ्रष्ट नक्कलही करण्यात आली होती. पुढे २०१६ मधे आलेल्या 'एअर लिफ्ट' चित्रपटातील "दिल चिज तुझे देदी..." ह्या गाण्यासाठीही दी दी प्रेरणादायी ठरले हे विशेष. (दोन्ही गाण्यांचे व्हिडीओ एम्बेड करण्याची परवानगी नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Wed, 09/28/2022 - 04:29 नवीन
पंडीत जसराज यांचं मधुराष्टकम चित्रगुप्त काकांमुळे कळलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
श
श्वेता व्यास Tue, 09/27/2022 - 13:05 नवीन
निवांत क्षणी ही अंगाई ऐकायला आवडते. https://www.youtube.com/watch?v=QiIPbl6WHuQ&ab_channel=RoverN
  • Log in or register to post comments
त
तनमयी Tue, 09/27/2022 - 13:52 नवीन
https://www.youtube.com/watch?v=Omg5ihAMTtI
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 09/28/2022 - 01:21 नवीन
Deep forest. Madazulu.
  • Log in or register to post comments
त
तनमयी Wed, 09/28/2022 - 12:21 नवीन
https://www.youtube.com/watch?v=s0U-WWS3JlQ
  • Log in or register to post comments
त
तनमयी Wed, 09/28/2022 - 12:27 नवीन
https://www.youtube.com/c/soundsofisha
  • Log in or register to post comments
त
तनमयी Wed, 09/28/2022 - 12:45 नवीन
https://youtu.be/xQauklmE3Y8
  • Log in or register to post comments
त
तनमयी Wed, 09/28/2022 - 12:51 नवीन
https://youtu.be/zXWJLEE7LeI
  • Log in or register to post comments
M
Marathi_Mulgi Fri, 09/30/2022 - 09:32 नवीन
अलाईपयुदे मधले 'स्नेहिदने' म्हणजेच साथियां मधल्या 'चुपके से' चे ओरिजिनल https://youtu.be/T8mYfvUPKtA ९६ नामक तामिळ पिक्चरमधील 'इरविंगु तिवाय' https://youtu.be/b3-lyX9O6kY ऍंड्रीआ बोसेली व सारा ब्राईटमनचे 'टाईम टू से गुडबाय' https://youtu.be/4L_yCwFD6Jo निर्मोण (कोंकणी) चित्रपटातले कोंकणी अंगाईगीत, डोळ मोजि बाई, निद मोजि बाई https://youtu.be/qko6xqISGg0 महानंदा चित्रपटातले 'माजे राणी माजे मोगा' https://youtu.be/2YQqSQMTh-U
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 09/30/2022 - 14:08 नवीन
अलाईपयुदे मधले 'स्नेहिदने' म्हणजेच साथियां मधल्या 'चुपके से' चे ओरिजिनल हे माहित नव्हते, पण तेलुगु "सखी"मधले "स्नेहीतुडा स्नेहीतुडा रहस्य स्नेहीतुडा" हे मात्र नेहमीच ऐकतो. https://www.youtube.com/watch?v=EBEbLsCub5w रसिकांसाठी गाण्याच्या पंक्ती - स्नेहीतुडा स्नेहीतुडा रहस्य स्नेहीतुडा चिन्न चिन्न ना कोरीकले अल्लुकुन्ना स्नेहीतुडा इदै सकलम् सर्वम् इदै वलुपु गेलुपु श्वास तुदीवरकु वेलिगे वेदम् वांछलन्नी वरमैन प्राणबंधम् स्नेहीतुडा स्नेहीतुडा रहस्य स्नेहीतुडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Marathi_Mulgi
म
मदनबाण Fri, 09/30/2022 - 14:51 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 10/02/2022 - 18:37 नवीन
धन्यवाद सर्वांचे. सगळ्यांनी स्वतःच्या आवडीची गाणी सामाईक केलीत ते पाहुन आनंद झाला. एकमेकांच्या सोबतीने आज लोकांचा आणि माझा आनंद वाढल्याचे पाहुन अतिशय छान वाटले. ज्यांनी फक्त दुवे किंवा गाण्यांची नावे लिहीली आहेत त्यांनी जर युटुब किंवा तत्सम ठिकाणावरील गाणी जर प्रतिसादामध्येच दृष्यस्वरुपात दिलीत जर इतरांना तो आनंद घेणे सहज सोपे होईल. येथे तांत्रिक माहिती मिळेल. https://www.misalpav.com/comment/1154503#comment-1154503
  • Log in or register to post comments
म
मनोज पुणेकर Mon, 10/03/2022 - 07:08 नवीन
कोक स्टुडिओचे मन अमादेअम हे गाणे त्याच्या प्रेझेंटेंशन, ऑर्केस्ट्रा आणि मुख्य म्हणजे गुल पनारामुळे चांगलेच लक्षात राहिले होते, त्यामुळे युट्युबवर बऱ्याचवेळा बघितले गेले. एक दिवस त्याचे ओरिजनल फारसी गाणे पाहा म्हणून युट्युबने सुचवले. गोगोश या इराणी गायिकेचे हे मूळ गाणे आता जास्त आवडते झाले आहे. https://www.youtube.com/watch?v=HxvUQ1PSqfs कोक स्टुडिओची आवृत्ती https://www.youtube.com/watch?v=U_DSCLqgZCo
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा