दिवाळीतल्या फराळाचा बराच वेळखाऊ प्रकार करंजी! यामध्ये सुके-ओले खोबरे, रवा-पीठ, पंचखाद्य, पिठीसाखर असे अनेक सारण भरता येऊ शकते.
तर करू या रवा आणि खवा सारणाच्या करंज्या. साहित्य पारीसाठी दीड वाटी मैदा एक वाटी रवा दूध मोहनसाठी दोन मोठे चमचे तूप चिमूटभर मीठ करंजीसाठी सारण एक वाटी खवा एक वाटी रवा एक वाटी गूळ एक वाटी पिठीसाखर सुकामेवा पूड तळण्यासाठी तेलकृती करंजीसाठी वरील प्रमाणात मैदा व रवा एकत्र करावा. चिमूटभर मीठ टाकावे. तूप कडकडीत गरम करून मोहन म्हणून घालावे. कोमट दुधात मध्यम सैल पीठ मळावे. अर्धा तास झाकून ठेवावे. सारणासाठी एक वाटी रवा तुपात खमंग भाजावा. बाजूला एक फुलपात्र पाणी उकळावे, त्यात गूळ घालावा. नंतर त्यात रवा टाकावा. भरड भरड रवा होतो. ओलसर नको. खवा लालसर भाजावा. ताटात काढून कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर टाकावी. एकत्र मिश्रण करावे. रवा-गूळ आणि खवा-पिठीसाखर अशी वेगवेगळी सारणे एकत्र करावीत. सुकामेवा पूड टाकावी. पारीसाठी लाट्या बनवण्यासाठी मळलेल्या पिठाची मोठी जाडसर पोळी लाटून त्यात तुपात फेसलेला मैदा यांचे मिश्रण सर्वत्र लावून घ्यावे. गोलाकार रोल करून लाट्या कापून घ्याव्यात. एक एक लाटी लावून सारण भरून फिरकीने करंजीचा आकार द्यावा. गरम तेलामध्ये मंद आचेवर करंज्या तळून घ्याव्यात.
शुभ दीपावली!
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मस्तच
अरे वाह !
भारी..
मस्त. फोटोही छान.
एकदम टेम्प्टिंग झालीय करंजी
तुमच्या पाककृती पारंपारिक व
धन्यवाद.
स्वादिष्ट लेख
छान
तोंपासू
क्या बात है, मस्तच झालेल्या
तोंपासु.
मस्त फोटो
खूप छान
:)
करंजी हा दिवळीच्या फराळातला अत्यंत आवडता प्रकार!