९९ वर्ष्यानंतर
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु'
दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु.
हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते.
'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार)..
तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%)
तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली.
९९ वर्ष्यानंतर
ऍसेट् हिं = ५७० रु
ऍसेट्स मु = १५७ रु
ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील.
बाकी तुमचं चालू द्यात...
National Family Health Survey, India
##http://rchiips.org/nfhs/index.shtml
##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount
💬 प्रतिसाद
(123)
T
Trump
Sat, 06/24/2023 - 19:03
नवीन
धागालेखक नेहमीप्रमाणे तोच विषय काढुन पळुन गेला आहे.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Sun, 06/25/2023 - 01:52
नवीन
आंद्रे वडापाव साहेब, तुमची गृहीतके आणि गणित चुकले आहेत.
STATISTA चा आलेख "live births per woman " देतोय - म्हणजे प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यभरात किती अपत्ये जन्माला घालते ती संख्या. हे % नाही. ही संख्या विविध धर्मांत १.४ ते २. आहे.
UN World Population Prospects चा आलेख दर १००० व्यक्ती (ह्यात जवळपास ५०० स्त्रिया असतील) दर वर्षी किती अपत्ये जन्माला घालतात ती संख्या देतोय. भारतासाठी ही संख्या जवळपास १४ आहे. हे सुद्धा % नाही. ह्या संख्या विविध धर्मांसाठी वेगवेगळ्या दिलेल्या नाहीत.
आता हिंदू आणि मुसलमान ह्यांची तुलना करूया.
आज जन्मलेला एक मुसलमान मुलगा आणि एक मुसलमान मुलगी मिळून २५ वर्षांनी २.४ मुले जन्माला घालतील.मुलग्याला ० मुले होतील. मुलीला २.४ मुले होतील. त्यानंतर २५ वर्षांनी ती २.४ मुले त्यांच्या २.४ जोडीदाराबरोबर प्रत्येक जोडप्यामागे २.४ म्हणजे एकूण ५.७६ मुले जन्माला घालतील. म्हणजे दर २.४ व्यक्तींमागे ५.७६/२ = २. ८८ मुले जन्माला घालतील अशा प्रकारे
जर १०० वर्ष कुणी मेलंच नाही तर
२५ वर्षांनी २ + २.४
५० वर्षांनी २ + २.४ + २. ८८
७५ वर्षांनी २ + २.४ + २. ८८ + २. ८८ x २.४/२
१०० वर्षांनी २ + २.४ + २. ८८ + २. ८८ x २.४/२ + २. ८८ x २.४/२ x २.४ /२ = १४.८८ इतक्या मुसलमान व्यक्ती असतील (आत्ताच्या दर दोन मुसलमान नवजातांमागे ) म्हणजेच १४.८८/२ = ७. ४४ पट
आता हिंदूंचा हिशोब करू
आज जन्मलेला एक हिंदू मुलगा आणि एक हिंदू मुलगी मिळून २५ वर्षांनी १.९ मुले जन्माला घालतील.मुलग्याला ० मुले होतील. मुलीला १.९ मुले होतील.
जर १०० वर्ष कुणी मेलंच नाही तर
२५ वर्षांनी २ + १.९
५० वर्षांनी २ + १.९+ १.८०५
७५ वर्षांनी २ + १.९+ १.८०५ + १.८०५ x १.९ /२
१०० वर्षांनी २ + १.९+ १.८०५ + १.८०५ x १.९ /२ + १.८०५ x १.९/२ x १.९ /२ = ९.०५ इतक्या हिंदू व्यक्ती असतील (आत्ताच्या दर दोन हिंदू नवजातांमागे ) म्हणजेच ९.०५ /२ = ४.५३ पट
आज जर १५ मुसलमान जन्मले तर १०० वर्षांनी त्यांचे १५ x ७. ४४ = १११.६ होतील
आज जर ८० हिंदू जन्मले तर १०० वर्षांनी त्यांचे ८० x ४.५३ = ३६२. ४ होतील
तसेच १०० व्यावर्षी १.८०५ x १.९/२ x १.९ /२ x ८०/२ = ६५.१६ हिंदू मुले जन्मतील आणि २. ८८ x २.४/२ x २.४ /२ x १५/२ = ३१.१ (हिंदूंच्या जवळपास निम्मी) मुसलमान मुले जन्मतील
ह्या गणितात अर्थातच अति सुलभीकरण आहे, काही गृहीतके आहेत. एक पुरुष आणि एक स्त्री मिळून अपत्ये जन्माला घालतात असे गृहीत धरले आहे. मुसलमानांमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीर आहे. जर एक पुरुष आणि दोन बायका असे धरले तर तीन व्यक्ती मिळून ४.८ मुले जन्माला घालतात असा हिशोब होईल . त्या हिशोबाने मुसलमानांची संख्या अधिक वाढलेली दिसेल. आता नैसर्गिकरीत्या पुरुष आणि स्त्रिया सारख्याच प्रमाणात जन्माला येतात. तर दर एका मुसलमान पुरुषामागे दोन स्त्रिया कोठून येतील हे विचारू नका. तो गणिताचा प्रांत नाही. ही प्रतिक्रिया फक्त गणित समजावून सांगण्यासाठी दिली आहे. जर कुणाच्या भावना दुखावत असतील तर हिंदू मुसलमानांच्या जागी वाघ , सिंह, पांडा , शहामृग वगैरे आपापल्या आवडीप्रमाणे वाचावे.
- Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव
Sun, 06/25/2023 - 03:54
नवीन
"NFHS सर्व्हे नुसार पाहता मुसलमान लोकसंख्या वाढणार नाही, अन् तशी भीती निराधार आहे"
(इपित्तर इतिहासकार यांच्या सौजन्याने)
- Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार
Sun, 06/25/2023 - 04:13
नवीन
१०/१०, पाल्हाळ न लावता म्हणणे मांडण्याची कला लवकर आत्मसात केल्या बद्दल. LoL.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Sun, 06/25/2023 - 07:51
नवीन
मग सरळ तेवढंच म्हणायचं. एक बातमी म्हणून त्या सर्वेची माहिती द्यायची. सर्वे विश्वासार्ह की अविश्वासार्ह हे लोक त्या सर्वेबद्दल बघून घेतील.
तुम्ही Data दिला आणि त्याचे चुकीचे interpretation केले. birth rate आणि CAGR ह्यांची गल्लत करून चुकीचा निष्कर्ष काढला म्हणून मी तुमच्या गणिताबद्दल प्रतिक्रिया दिली. तुम्ही दिलेल्या data नुसार गणिताप्रमाणे काय ट्रेंड दिसेल ह्याचे back of the envelope calculation मी दिले आहे .
इथे लोकांची मते बदलणे शक्य नाही. ह्या गणिताचे उत्तर तुम्हाला आवडत नसल्यास इतर कुठलाही सर्वे, गप्पा, रिपोर्ट , भाषण ह्यांचा आधार घेऊन तुमच्या मनातला निष्कर्ष जो आहे त्याला चिकटून राहण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. फक्त चुकीचे गणित करून त्याचे समर्थन करायची गरज नाही.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Sun, 06/25/2023 - 08:11
नवीन
किंवा तुम्ही तुमच्या समजुतीनुसार गणित केले तेही ठीक. स्वतः विचार करून निष्कर्ष काढणे चांगली गोष्ट आहे. फक्त त्यात जर काही चूक/उणीव असेल तर ती जाणून घ्यायची इच्छा आणि मान्य करण्याचा मोकळेपणा बऱ्याच जणांकडे असतो. तुमच्या बाबतीत तुम्ही स्वतंत्र आहात. चर्चा वाचणाऱ्या इतर कुणाला प्रतिक्रियेतल्या गणितात रस वाटला तर आनंद आहे.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sun, 06/25/2023 - 08:01
नवीन
१. Fertility rate मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे गेल्या सर्व्हे नुसार. हिंदू व मुस्लिम रेट मधली दरी कमी होत आहे, सातत्याने, प्रत्येक सर्व्हे मध्ये. जर प्रोजेक्षन करायचे असल्यास ह्या पडणाऱ्या दरीचे पण करा. मनाप्रमाणे ट्रेण्ड निवडून तितकेच प्रोजेक्ट करणे कसे योग्य आहे ?
२. बहूविवाह हिंदू मुस्लिमांचा जवळपास सारख्या प्रमाणात होतो.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Sun, 06/25/2023 - 08:57
नवीन
हे back of the envelope calculation आहे. Fertility rates सध्या आहेत तसेच स्थिर राहिले तर काय होईल हे प्रोजेक्ट केले आहे. बदलणाऱ्या rates ची आकडेमोड जास्त गुंतागुंतीची होईल. त्याही पुढे जाऊन फर्टिलिटी रेट कमी होण्याचा रेट हा ही अंतर्भूत करू शकता येईल. ह्याला एक प्रकारचा bound म्हणून बघता येईल.
बहुपत्नीत्व ह्या बाबतीत हिंदू आणि मुसलमानात कायदेशीर फरक आहे.ह्या बाबतीतला प्रत्यक्ष डेटा मला माहित नाही. त्यामुळे ह्या फॅक्टरमुळे फरक पडू शकतो हे फक्त नमूद केले आहे. पण प्रत्यक्ष आकडेमोडीत बहुपत्नीत्व धरले नाही.
मुळात वडापाव ह्यांनी दिलेला डेटा interpret करण्यातच इतका गोंधळ होता की तो डेटा कसा interpret करून calculation मध्ये वापरता येईल हे दाखवणे हा मुख्य उद्देश होता. ह्यात जितके अधिक parameters घालाल, आणि डेटा जितका अचूक असेल, आणि अधिकाधिक गुंतागुंतीचे calculation कराल तसा अधिक चांगला निष्कर्ष निघेल.
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Sun, 06/25/2023 - 09:32
नवीन
तुम्ही चांगला मुद्दा मांडला आहे म्हणून पुन्हा डेटा पाहिला . शेवटच्या तीन डेटा पॉईंट्स मध्ये मुसलमानांचा फर्टिलिटी रेट ३. ४ वरून २. ४ वर आला आहे म्हणजे २९% घट. हिंदूंचा २. ६ वरून १.९ वर आला आहे म्हणजे २७% घट . त्यात फारसा फरक नाही.
त्याही पुढे जाऊन, शेवटच्या दोन डेटा पॉईंट्स मध्ये मुसलमानांचा फर्टिलिटी रेट २. ६ वरून २. ४ वर आला आहे म्हणजे ८% घट. हिंदूंचा २. १ वरून १.९ वर आला आहे म्हणजे ९.५ % घट . म्हणजे हिंदूंचा रेट किंचित जास्त वेगाने घसरतोय.
म्हणजे मुसलमानांचा फर्टिलिटी रेट हिंदूंच्या तुलनेत बराच वेगाने घसरत आहे किंवा राहील असे निदान हा डेटा तरी दाखवत नाही.
- Log in or register to post comments
ट
टीपीके
Sun, 06/25/2023 - 16:42
नवीन
हा मुद्दा नाही कळला. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की एकाहून अधिक लग्न करण्याचे हिंदू आणि मुसलमानांचे प्रमाण सारखे आहे? असे असेल तर धक्कादायक आहे. मला वाटायचे की हिंदूंसाठी एकाहून अधिक लग्न ही कायद्याविरोधत आहे. तुमचे म्हणणे बरोबर असेल तर कायद्याचा काहीच परिणाम झाला नाही असा अर्थ होतो.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sun, 06/25/2023 - 17:11
नवीन
हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजामध्ये भारतात अत्यंत कमी प्रमाणात बहुविवाह होतात. मुसलमान समाजात हिंदुंपेक्षा किंचित जास्त प्रमाणात बहुविवाह होतात, पण एकूण बहुविवाह अत्यंत विरळ आहे आणि दोन्ही समाजातला फरक खूप कमी आहे. इथे वाचा.
कायद्याचा परिणाम फक्त आत्ता काय परिस्थिती आहे पाहून कसे समजणार ? कायद्याआधी काय होते आणि आता काय आहे हे पाहावे लागेल. आज हिंदू समाजात फक्त १.३% लोक बहुविवाहीत आहेत. इतकी कमी संख्या असताना कायदा अयशस्वी म्हणणे योग्य आहे काय ? त्यासाठी कायद्याआधी किती संख्येत बहुविवाह होते हेच पहावे लागेल.
- Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार
Mon, 06/26/2023 - 07:58
नवीन
इंस्टाग्राम वर हा एक मॅप मिळाला. Polygamy मॅप ऑफ इंडिया... भौगोलिक अँगलने.

- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 06/26/2023 - 08:44
नवीन
The latest NFHS data from 2019-20 shows the prevalence of polygyny was 1.9% among Muslims, 1.3% among Hindus and 1.6% among other religious groups.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 06/26/2023 - 08:47
नवीन
Polygamy in India "down" in 45 yrs: Muslims' from 5.7 to 2.55%, Hindus' 5.8 to 1.77%, "common" in SCs, STs
According to the NFHS-5 data, only about 1.9 per cent of Muslim women said their husbands had more than one wife, compared to 1.3 per cent of Hindu women who admitted to being in a polygynous marriage in 2019-21.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 06/26/2023 - 08:48
नवीन
For instance, Assam — where Chief Minister Himanta Biswa Sarma reportedly said in May last year that a Uniform Civil Code would act as “protection” for “Muslim daughters” — had the widest gap between Hindu and Muslim women who admitted to being in a polygynous relationship in 2019-21. The rate of polygamy among Hindu women in Assam was about 1.8 per cent, according to NFHS-5 data, as against 3.6 per cent among Muslim women.
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
गुरुवार, 05/02/2024 - 10:19
नवीन
प्रकांड बुद्धिमत्ता, अलौकिक तेज, गहन गंभीर विचार, सखोल उदार दृष्टी दर्शवणारा विचार आणि धागा.
नोबेल, बुकर, गेला बाजार मॅगेसेसे यांचे कसे लक्ष गेले नाही अजून या महान विचारवंताकडे... आश्चर्यच आहे !
पण काय करणार कावळ्यांच्या कलकलाटात राजहंसाचे गाणे कोण ऐकतो !!!
कदर नाही लोकांना !!
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 05/02/2024 - 12:46
नवीन
हा लेख म्हणजे टूल किट चा भाग
जगात "खी" आणि "मु" या "फंड मॅनेजर" ना सगळे "मार्केट" काबीज करायाचे ( मर्जर अँड अक्विझिशन )आहे त्या मध्ये भारतातील "हि" , इतर देशातील "बु" हे
लक्ष आहेत
"मु" हे काम आक्रमक पद्धतीने करतात ( होसटाईल टेकओव्हर )
"खी" हे काम कधी सौम्य तर कधी आक्रमक पद्धतीने करतात ( फ्रेंडली फसाड )
आपण षंढ ( रिटेल ट्रेडर ) ९९ वर्षाची वाट पाहत बसणारे
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
गुरुवार, 05/02/2024 - 15:34
नवीन
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
====
सहमत आहे.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 05/02/2024 - 17:25
नवीन
आज काल "ऑ" वैगरे देशात "हि" बसून इतरांना त्यांच्या देशावर राष्ट्रभक्ती कशी करायची ह्याचे सल्ले देतात. बरे हा "ऑ" देश सुद्धा हे ज्या "खी" बद्दल बडबड करतात त्यांनी वसवलेला देश आहे. तिथे राहणे ह्यांना आवडते पण ते कसे दुष्ट हे सतत सांगत राहायचे असे प्रकार काही लोकं हल्ली करतात.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 05/03/2024 - 01:25
नवीन
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 05/03/2024 - 01:25
नवीन
- Log in or register to post comments
क
कॉमी
Fri, 05/03/2024 - 04:18
नवीन
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 05/06/2024 - 10:37
नवीन
मुद्दा नाही सापडला कि लिहणारा कुठे राहतो हे बोलायचे मी कधीही तुम्ही भारतावर राष्ट्रभक्ती कशी करा कि करू नका सांगितलंय ?
उलट बहुतेक करता तसे भारताचे कौतुकच केलय
जागतिक हिंदू म्हणून जेवहा भारत किंवा भारताबाहेर हिंदू आणि इतर हा विषय येतो तेवहा मत मांडले तर का टोचतंय
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3