भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ?
💬 प्रतिसाद
(98)
अ
अवलिया
गुरुवार, 12/25/2008 - 09:41
नवीन
हम्म.
पुन्हा शाकाहारी मांसाहारी जुंपणार...
चालु द्या.
(मिळेल ते खाणारा) अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
S
shweta
गुरुवार, 12/25/2008 - 09:45
नवीन
हो मांसाहारीच असणार.
इतकी वर्षे वनवासात काय शाकाहारी जेवण करुन जगणं शक्य आहे का ?
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 12/25/2008 - 09:51
नवीन
श्रीराम हे क्षत्रिय होते. क्षत्रियांना मांसभक्षण निषिद्ध नव्हते. त्यातून असेही मानण्यास जागा आहे की, वल्कले नेसून, १४ वर्षांचा वनवास भोगण्यास आलेल्या सीतेला अचानक हरणाच्या कातडीची चोळी नेसण्याची इच्छा का व्हावी? बहुधा ती मृगहत्या भोजनासाठीच झाली असण्याची शक्यता आहे!
असो, राम मांसाहारी असो वा नसो, त्यावरून तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचे आहे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 12/25/2008 - 09:56
नवीन
बहुधा ती मृगहत्या भोजनासाठीच झाली असण्याची शक्यता आहे!
सहमत आहे! त्या दिवशी बहुधा बुधवार किंवा रविवार असावा त्यामुळे शितामाईला हरणाचं कालवण करावंसं वाटलं असणार! :)
तात्या.
- Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 01/02/2009 - 17:36
नवीन
अहो पण त्या हरणाचं कालवण करण्यापायी शितामाईचंच हरण झालं त्याचं काय?
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/25/2008 - 09:58
नवीन
>>असो, राम मांसाहारी असो वा नसो, त्यावरून तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचे आहे?
== सिद्ध काहिच करायचे नाहिये, मला फक्त पुरावा म्हणुन देण्यात येणार्या ह्या श्लोकाचा खरा योग्य अर्थ हवा आहे आणी जमल्यास त्याकाळच्या रामाच्या आहाराविषयी काहि उल्लेख रामायणात आहे का ह्याचे मार्गदर्शन हवे आहे.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/25/2008 - 10:01
नवीन
राम सगळ्या प्रकारचे आहार करत असे. अर्थातच पोटाला पचेल, ओठाला रुचेल असेच. श्रावण वगैरे काही पाळत नसत...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 12/25/2008 - 10:16
नवीन
मला फक्त पुरावा म्हणुन देण्यात येणार्या ह्या श्लोकाचा खरा योग्य अर्थ हवा आहे
तो मिपावरील संस्कृतज्ञ देतीलच!
जमल्यास त्याकाळच्या रामाच्या आहाराविषयी काहि उल्लेख रामायणात आहे का ह्याचे मार्गदर्शन हवे आहे.
राम बोरे खात असल्याचा उल्लेख रामायणात आहे, असे वाटते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 12/25/2008 - 10:30
नवीन
राम बोरे खात असल्याचा उल्लेख रामायणात आहे, असे वाटते.
टेस्टेड ऍड प्रोव्हाडेड बाय शबरी...
(चण्या मण्या बोर आवडीने खाणारा)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
- Log in or register to post comments
प
पुष्कर
Sat, 01/03/2009 - 15:52
नवीन
शबरी हे त्याकाळचे "Quality assurance and inspection department" होते असं म्हणायला वाव आहे तर मग!
- Log in or register to post comments
श
शाल्मलि
Sun, 01/04/2009 - 16:28
नवीन
आवडल बुवा तुमच ; मग कधी arrange kartay meeting?
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
गुरुवार, 12/25/2008 - 11:02
नवीन
>> सिद्ध काहिच करायचे नाहिये, मला फक्त पुरावा म्हणुन देण्यात येणार्या ह्या श्लोकाचा खरा योग्य अर्थ हवा आहे आणी जमल्यास त्याकाळच्या रामाच्या आहाराविषयी काहि उल्लेख रामायणात आहे का ह्याचे मार्गदर्शन हवे आहे.
नसता खटाटोप कशाला? श्लोकाचा अर्थ काही असला तरी श्रध्देत फरक पडणार आहे का?
रामाचा आहार काय होता यापेक्षा रामाचा आचार-विचार जाणुन घ्यायची गरज जास्त आहे.
रामायणातुन आहार शोधण्या पलीकडेही रामायणात बरेच काही शोधण्यासारखे आहे. रामाने रावणाचा (अधर्माचा) नाश केला, हे जाणुन घेता आले तरी पुरे आहे.
तरी... त्या काळी, आत्ता : यज्ञात बळी दिल्यानंतर, प्रसाद म्हणुन मांस सेवन केले जाते
शाकाहारी प्राणी (ससा, हरीण, काळवीट व.) आणि अनेक पक्षी यांचे मांस औषधी म्हणुन वापरण्यात येते.
आयुर्वेदात मांसाहार हा त्याज्य नाही, किंबहुना योग्य प्रकारे अग्नि-संस्कार करून केलेला मांसाहार श्रेष्ठ मानण्यात आलेला आहे.
या वरून शंका निरसन झाले असेल असे वाटते......
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/25/2008 - 11:37
नवीन
>>नसता खटाटोप कशाला? श्लोकाचा अर्थ काही असला तरी श्रध्देत फरक पडणार आहे का?
== का करु नये ? आपल्या पुराणात, वेदात नक्की काय दिले आहे आपल्याला माहिती नको ? रामाविषयी आपल्याला पुर्ण माहिती नको ? कोणीतरी अतिशहाणा काहीतरी वाचुन येउन , रामायणातला दाखला म्हणुन काहितरी सांगणार आणी आपण आ वासुन ते ऐकत बसायचे फक्त ? आपल्या शंकेचे समाधान नको करुन घ्यायला ? हान आता रामायण वाचणे किंवा त्यावर चर्चा करणे ह्याला 'अ नाईट इन कॉलसेंटर' किंवा 'व्हाईट टायगर' ह्या वरील चर्चे सारखे ग्लॅमर नसेल कदाचित म्हणुन ते फार चुकिचे वगैरे आहे किंवा हा व्यर्थ खटाटोप आहे असे मला वाटत नाही. नुसती श्रद्धा काय कामाची ? जेंव्हा त्या श्रद्धास्थानाविषयी काही चर्चा होते किंवा काहि वाद विवाद होतात तेंव्हा आपल्याला सत्यापर्यंत जाणे गरजेचे आहे असे मला वाटते. उद्या पाश्च्यात जगातील लोकांनी येउन ह्या श्लोकाचे अर्थ काढले की आपण अगदी कौतुकानी ते ऐकणार त्यावरील पुस्तके विकत घेउन वाचणार, त्या पेक्षा आपल्या माणसांकडून झालेले शंका निरसन मला जास्ती महत्वाचे वाटते ! अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे, ते ग्राह्य धरलेच जावे हा आग्रह नाही .
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
- Log in or register to post comments
स
संताजी धनाजी
गुरुवार, 12/25/2008 - 16:48
नवीन
याकदोम बरोबर. हेच म्हणतो :)
ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी पु ना ओकांचे "वर्ल्ड वेदीक हेरीटेज" हे पुस्तक वाचावे. त्या पुस्तकाला ग्रंथही म्हणु शकता. सध्याच्या ज्याला काही आपण इतिहास म्हणतो त्याला दणदणीत टोले दिले आहेत त्यांनी, अर्थात पुरावे देवुन.
मी तर त्यांचा पंखा झालो आहे.
- संताजी धनाजी
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/25/2008 - 13:43
नवीन
नसता खटाटोप कशाला? श्लोकाचा अर्थ काही असला तरी श्रध्देत फरक पडणार आहे का?
रामाचा आहार काय होता यापेक्षा रामाचा आचार-विचार जाणुन घ्यायची गरज जास्त आहे.
मला वाटतं, इथे दोन वेगवेगळ्या विचारांत गोंधळ आहे. आपला आजचा आहार काय असावा यासाठी रामाचा आहार बघण्याची गरज नाही. जे काही उपलब्ध आहे, जे आपल्याला पचतं, रुचतं, परवडतं आणि आपल्या वातावरणाशी सुसंगत आहे ते खावं, आणि या पलिकडे कोणत्याही आहारासाठी काहीही स्पष्टीकरण देण्याचं कारण नाही. उन्हाळा मी म्हणत असताना गुळाच्या पोळ्या खाण वाईट आणि पचनशक्ती कमी झालेली असताना चणा डाळ!
रामाचा आचार-विचार जरूर जाणून घ्यावा, पण उलट विचार करायचा असेल तर चांगलंच वागायचं असेल तर राम जाणून घ्यायची काय गरज? अनेक आदीवासी पाड्यांवर मी राम-रावण या नावांपुढे माहित नसलेले अतिशय सज्जन 'पुढारी' पाहिलेले आहेत.
इतिहास असो वा विज्ञान, भाषा असोत वा मानसशास्त्र, माहित करुन घ्यायची काय गरज हा प्रश्नच चुकीचा आहे. माहिती असण्यात काहीही गैर नाही, माहिती मिळवण्यासाठी लोकांना विचारणं, वाचन करणं, विचार करणं हे उपायही चुकीचे नाहीत. पण अनेकदा चांगल्या चर्चाही चुकीच्या मार्गाने जातात, पण म्हणून माहिती असण्याची गरजच काय हा विचार अतिशय घातक आहे.
(विचारांती शाकाहारी) अदिती
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/25/2008 - 14:21
नवीन
रामायणातुन आहार शोधण्या पलीकडेही रामायणात बरेच काही शोधण्यासारखे आहे. रामाने रावणाचा (अधर्माचा) नाश केला, हे जाणुन घेता आले तरी पुरे आहे.
आपण एकीकडे रामायणात बरेच काही शोधण्यासारखे आहे असे म्हणुन पुढील वाक्यातच राम रावण युद्धाला धर्मयुद्ध घोषित करुन त्याला केवळ धर्मात बंदिस्त करत आहात. हे चुकीचे असावे असे मला वाटते.
रामायण हा राम नावाच्या राजपुत्राच्या आयुष्याचा इतिहास आहे.
बाकी रामाचा रामा पासुन भगवान श्रीराम असा प्रवास होतांना अनेक गोष्टी त्यात घुसल्या. राम रावण युद्ध तसेच सीताहरण नंतर रामाचे आक्रमण हा तत्कालीन भारतीय राजकारणाचा हिस्सा आहे. धर्म अधर्म काही नाही. (हे माझे मत आहे)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
स
संताजी धनाजी
गुरुवार, 12/25/2008 - 16:54
नवीन
रामायण हा राम नावाच्या राजपुत्राच्या आयुष्याचा इतिहास आहे.
अतिशय बरोबर :)
राम हा एक योद्धा होता पण आपण त्याला देव बनवले. तो जर देव असला असता तर सीतेला मिळवायला त्याला इतके उपद्व्याप करायला लागले नसते.
हां, आता तो विष्णुचा अवतार होता की नाही हा भाग अलहिदा.
- संताजी धनाजी
- Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 12/25/2008 - 14:42
नवीन
यातून तार्किकदृष्ट्या
हा निष्कर्ष काढता येतोच की नाही याची कल्पना नाही, परंतु सीता हरणाच्या मागे लागल्यामुळेच तिचे हरण झाले असे मानण्यास मात्र निश्चित जागा आहे.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 12/25/2008 - 14:46
नवीन
सीताहरणा वरुन हे आठवले :-)
- Log in or register to post comments
व
विसुनाना
गुरुवार, 12/25/2008 - 09:56
नवीन
होतेच. श्रीराम क्षत्रिय होते. त्यांच्या मांसाहाराचे आताच्या काळातही विशेष वाटू नये.
आणि वेदकालीन ब्राह्मणही मांसाहारी होते.
या 'शाक-मांस आहार' आणि 'पेय-अपेय पान' विषयांवरील चर्चा आंतरजालावर पूर्वी अनेकदा झाली आहे.
कृपया शोध घ्यावा.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 12/25/2008 - 09:58
नवीन
आणि वेदकालीन ब्राह्मणही मांसाहारी होते.
सहमत आहे!
आपला,
(कपुराप्रेमी वेदकालीन ब्राह्मण!) तात्या :)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 12/25/2008 - 11:05
नवीन
म्या पन बामन हाय. मांसाहार करनारा, श्री रामाना मानणारा.
- Log in or register to post comments
न
निखिलराव
गुरुवार, 12/25/2008 - 12:00
नवीन
म्या पन क्षत्रिय हाय. मांसाहार करनारा, श्री रामांना मानणारा.
निखिल सुर्यवंशी
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 12/25/2008 - 13:07
नवीन
१४ वर्ष जंगलात राहुन फक्त शाकाहारी राहता येणे खुप कठिण आहे. तसेच ते क्षत्रिय असले मुळे मांसाहार त्याना चालत होता.फक्त कातड्यासाठी हरण मारणे शक्य नाही.त्यामुळे हरण त्यानी मांसासाठी देखिल मारले असण्याची शक्यता आहे.
(मिश्राहारी)वेताळ
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 12/25/2008 - 14:05
नवीन
मांसाहारी होते काय? तर हो नुसते मांसाहारी नव्हते तर ते आणि सीतामाई (अ)पेयपानही करून होते. रामायण काळातील ब्राह्मण मांसाहारी होतेच आणि क्षत्रिय तर होतेच होते. एवढेच नव्हे तर सीतेने गंगेला १०० घट दारू देईन असा नवसही बोलला होता. ;) (नेमके आठवत नाही पण अयोध्या कांडाचा शेवट किंवा अरण्यकांडाची सुरुवात येथे हे प्रकरण आहे. इच्छुकांनी तपासून पहावे.)
आता कोणाला पुढील प्रश्न पडला तर त्याचेही उत्तर देते.
भगवान श्रीकृष्ण मांसाहारी होते आणि दारू प्यायचे का? तर हो तेही हे सर्व करायचे.
कालच रात्री महाभारतातील खांडव-दाह पर्व वाचत होते. त्यातील काही भाग असा -
कृष्ण आणि अर्जुन क्रिडेसाठी यमुनातिरी गेले असता, सोबत सर्व राजस्त्रियांना घेऊन गेले. तिथे त्यांनी मनसोक्त क्रिडा केली. द्रौपदी आणि सुभद्रा पिउन इतक्या तर्र झाल्या होत्या की आपली उंची वस्त्रे आणि आभूषणे त्यांनी इतरांना वाटून टाकण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेतील काही स्त्रिया खेळत होत्या, गात होत्या, नाचत होत्या अगदी भांडाभांडीही सुरु झाली होती. कृष्ण आणि अर्जुन या सर्व क्रिडांची गंमत लुटत होते. पांडवांच्या वैभवाची साक्ष देता येईल असे वातावरण तेथे होते. यानंतर त्यांनी काही वेळ एकांतात घालवण्याचे ठरवले आणि ते उठून एका निर्जन स्थळी गेले. तेथे त्यांनी आपल्या भूतकाळाच्या आणि शौर्याच्या खूप गप्पा मारल्या.
अचानक एक तेजपुंज ब्राह्मण त्यांच्यासमोर उभा राहीला. त्याची झळाळती कांती आणि दाढी उगवत्या सूर्याची आठवण करून देत होती. त्याने या दोघांकडे त्याला तृप्त करण्याची अभिलाषा प्रकट केली. अर्जुन आणि श्रीकृष्णाने अधिक विचारता त्याने सांगितले की तो साक्षात अग्नी असून त्याची भूक प्रचंड आहे आणि ती एखाद्या प्राण्याने मिटण्यासारखी नसून संपूर्ण खांडववनच त्याची क्षुधाशांती करू शकेल.
हे शब्दशः भाषांतर नाही, एक थोडक्यातला अनुवाद आहे.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/25/2008 - 14:11
नवीन
प्रियाली ताई
वरती आधी लिहायचे ना... ही भयकथा नाही.
लोक समजायचे की ही प्रियाली ताईंची नवी भयकथा आहे..जुन्या पात्रांच्या नावाने. ;)
बाकी माहितीशी पुर्णपणे सहमत
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/25/2008 - 19:19
नवीन
वरती आधी लिहायचे ना... ही भयकथा नाही.
नाना, अहो प्रियालीने जे लिहिलंय ते म्हणजे रामायण महाभारतातल्या पात्रांवर ठार विश्वास असणार्यांसाठी भयकथाच आहे हो!!!:)
प्रियाली, आप लगे रहो....
:)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/25/2008 - 14:16
नवीन
असं प्रियालीताईचं नाव पाहून नेहेमीप्रमाणे म्हणणार होते. पण ही चर्चा काव्याबद्दल सुरू आहे असं लक्षात आलं!
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 12/25/2008 - 14:24
नवीन
मांसाहारी होते काय? तर हो नुसते मांसाहारी नव्हते तर ते आणि सीतामाई (अ)पेयपानही करून होते. रामायण काळातील ब्राह्मण मांसाहारी होतेच आणि क्षत्रिय तर होतेच होते. एवढेच नव्हे तर सीतेने गंगेला १०० घट दारू देईन असा नवसही बोलला होता. ;)
ह्याचा संदर्भ मंगळ रीटर्नड प.वि.वर्तकांच्या "वास्तव रामायणा"त आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणातील संदर्भ श्लोकपण दिले आहेत. आत्ता, हा चर्चा विषय पाहीला आणि त्याचीच आठवण झाली होती! पुस्तक शोधून हवा असल्यास संदर्भ देईन.
बाकी रामच कशाला, रामकृष्ण परमहंस/स्वामी विवेकानंद पण मासे खायचे (बंगालमधे मांसे हे स्वतःला शाकाहारी समजणारेपण खातात असे कधीतरी ऐकले आहे).
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 12/25/2008 - 14:34
नवीन
पण मूळ रामायणात मी संदर्भ शोधून खात्री करून घेतलेली आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 12/25/2008 - 14:51
नवीन
पण मूळ रामायणात मी संदर्भ शोधून खात्री करून घेतलेली आहे.
मी पण त्यांनी लिहीलेले या बाबतीत "अवास्तव रामायण" नाही याची खात्री करून घेतली होती म्हणूनच "त्यांनी वाल्मिकी रामायणातील संदर्भ श्लोकपण दिले आहेत." असे म्हणले. फक्त रामायणाचे खंड भारतातील घरी आहेत येथे नाहीत त्यामुळे तो श्लोक जालावर शोधण्याची तसदी न घेता मला करायचा असेल तर वास्तव रामायण हा एकच दुवा राहतो असे म्हणले होते. :-)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/25/2008 - 14:28
नवीन
सीतामाई (अ)पेयपानही करून होते.
आपल्या प्रतिसाबद्दल शंका नाही. पण सितामाई अपेयपान करत असतील का ?
सिता चरित्रावरुन कधी असा विचार वाचला नाही. तुर्तास प्रतिसाद राखून ठेवतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/25/2008 - 14:32
नवीन
सिता चरित्रावरुन कधी असा विचार वाचला नाही. तुर्तास प्रतिसाद राखून ठेवतो.
सीता चरित्र कोणी लिहिलेले वाचले?
मुळ वाल्मिकी रामायण वाचणे (ते ही संस्कृत मधले ;) ) हेच शंकांचे निरसन करण्यासाठी योग्य असावे. नाही का?
उगाच कोणी काही तरी स्वतःच्या धार्मिक धारणेने प्रेरित लिहिलेले वाचायचे आणि आपला ग्रह तसाच करुन घ्यायचा हे ठीक नाही.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/25/2008 - 14:38
नवीन
वाल्मिकी रामायणातील संस्कृत जाणकार यांचे काय मत आहे. ते तपासून पाहु !
कोणाचा धार्मिक प्रेरणा काय आहे, त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं ?
जे असेल ते अभ्यासायचे, नाही पटले तर, द्यायचे सोडून !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/25/2008 - 14:53
नवीन
वाल्मिकी रामायणातील संस्कृत जाणकार यांचे काय मत आहे. ते तपासून पाहु !
तपासनीस म्हणुन माझे नाव सुचवतो :)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 12/25/2008 - 14:35
नवीन
वाल्मिकी रामायण वाचलेले आहे. महाभारताचा अनुवाद वाचते आणि त्यावरच विश्वास ठेवते. :) इतर संदर्भांवर विश्वास ठेवण्याची गरज मला वाटत नाही.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/25/2008 - 14:37
नवीन
इतर संदर्भांवर विश्वास ठेवण्याची गरज मला वाटत नाही.
टाळ्या !!!!
योग्य पद्धत.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश
Fri, 12/26/2008 - 11:48
नवीन
जल्ला राम टाईट, सीतामाय टाईट
ऊंद्या शॅटरडे नाईट
एन्जॉय !!!
राम, सीता दोगावजनांचा आदर्श ठेवनारा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
- Log in or register to post comments
ग
गोगोल
Sat, 12/27/2008 - 00:00
नवीन
म्हणजे नक्की काय केल?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 12/27/2008 - 00:53
नवीन
जोवर क्रिडेला 'काम' शब्द जुळत नाही तोवर क्रिडा म्हणजे खेळ. :)
( क्रिडांगण म्हणजे खेळण्याची जागा, मैदान असे असते म्हणजे क्रिडा म्हणजे खेळ हा तर्क बरोबर असावा)
(अतार्किक)
पुण्याचे पेशवे
Since 1984
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 01/03/2009 - 03:55
नवीन
भगवान श्रीकृष्ण मांसाहारी होते आणि दारू प्यायचे का? तर हो तेही हे सर्व करायचे.
सहमत आहे.. आमचा किसन्या तर बर्याचदा टाईटच असे! :)
आपला,
तात्या.
- Log in or register to post comments
च
चिगो
Fri, 02/10/2012 - 10:21
नवीन
>>अर्जुन आणि श्रीकृष्णाने अधिक विचारता त्याने सांगितले की तो साक्षात अग्नी असून त्याची भूक प्रचंड आहे आणि ती एखाद्या प्राण्याने मिटण्यासारखी नसून संपूर्ण खांडववनच त्याची क्षुधाशांती करू शकेल.
माझ्या माहितीप्रमाणे ती स्टोरी अशी आहे : त्यांना एक गलेलठ्ठ ब्राम्हण भेटला. त्याने सांगितले की तो अग्नी असून यज्ञांत आहुती दिलेल्या तुपामुळे तो असा लठ्ठ आणि सुस्त झाला आहे. आता एखादी प्रचंड आगच त्याचा मेद जाळून त्याला चपळ बनवू शकेल.. त्यानंतर खांडव-वन दहन करण्यात आले..
मुळ धाग्याविषयी : राम क्षत्रिय असल्याने मांसभक्षण आणि सोमरसपान त्यांना अलाऊड होते.. काही इतिहासकारांच्या मते वेदीक काळात ब्राम्हण गोमांस-भक्षणही करत असत. (पाहुण्यासाठी "गोघ्न" म्हणजे गाय खाणारा हा शब्द होता.. संदर्भ : NCERT - Ancient India) पुढे, बौद्ध धर्म त्यातील अहींसेच्या प्रचारामुळे पॉप्युलर व्हायला लागला (खासकरुन शेतकरी समाजात) तेव्हा हिंदु धर्मातही ती सुधारणा करण्यात आली, हाही एक मतप्रवाह आहे..
- Log in or register to post comments
आ
आर्य
गुरुवार, 12/25/2008 - 14:10
नवीन
वा ! रामायणा वरुन रामायण !
रामायण-महाभारत काळातील समाज व्यवस्थे विषयीची माहिती -'आर्य संस्कृतीचा उत्कर्षापकर्ष 'या ग्रंथात महादेव शास्त्री दिवेकर, वाई (१८५१)यांनी सविस्तर दिला आहे. त्यात त्यात वनस्पती-आहार आणि मासांहाराचा स्पष्ट उल्लेख आहे. रामही मांसाहारी होता.
आ
आणखी काही रोचक माहिती - त्याकाळी चतुर्वर्ण समाजव्यवस्था अस्तिव्यात होती आणि ब्राम्हणही शेती, पौरोहीत्य आणि अन्य व्यवसाय करीत, सगळे तपस्वी नव्ह्ते, त्याकाळी बहुपत्नी हा भुषणावह व्यवहार असला तरी, बहुपती हाप्रकार केवळ चंद्रवंशीयांमद्धे होता (राम-सुर्यवंशी होता). वानर, राक्षस, मानव, यक्ष-किन्नर, नाग या सर्व समाज व्यवस्था ऐकाच वेळी अस्तीवात होत्या. वसिष्ठांनी राम वनात गेल्यास त्याच्या अर्धांगीस म्हणजे सितेस राज्याभीषेक करावा असा मार्ग सुचवला होता.
आपला
(रामभक्त)आर्य
- Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 12/25/2008 - 14:41
नवीन
... राम मांसभक्षक होते की नाही याने नेमका काय फरक पडतो ते कळले नाही. ते जे काही खायचे त्याच्या रेसिप्या शोधून तसे स्वतः बनवून खाण्यात रस असेल तर गोष्ट वेगळी.
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 12/25/2008 - 15:23
नवीन
राममहाशय जे खायचे ते फार चविष्ट होते की नाही याबद्दल मला शंका आहे. ;) काय आहे की त्यावेळी, मसाले, वाटण-घाटण, मांसाला मुरवणे इ. इ. प्रकार किती प्रचलीत होते त्याबद्दल फारसे वाचनात आलेले नाही.
रामायण काळात साखर नव्हती असा निष्कर्ष काही तज्ज्ञांनी काढला होता हे मागे उपक्रमावर चर्चिले आहेच. गरम मसाला, मालवणी मसाला, गोवानीज बॉटल मसाला, दह्यातील मुघलाई मसाले, टिक्का मसाला, तंदूरी मसाला वगैरे वगैरेही तेव्हा फार प्रचलीत नसावेत तेव्हा तत्कालीन रेसिप्या फार चविष्ट नसाव्यात असे मला वाटते. ;)
- Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 12/25/2008 - 22:18
नवीन
असेच काही नाही. रामभाऊंनी हरणाचा ष्टेक खाल्ला असल्यास त्यात वाटण-घाटण प्रकार निश्चितच उद्भवला नसावा आणि मसाले, मांसाला मुरवणे वगैरे प्रकार आलेच असल्यास अत्यंत माफक प्रमाणात कामी आले असावेत (किंवा बहुधा त्यांची फारशी गरज पडली नसावी), आणि तरीही प्रकार चविष्ट लागला असावा, असे मानायला जागा आहे.
किंवा हरणाला विस्तवावर रोटिसेरी पद्धतीने ('शोले'तला गब्बर 'अहमद'ला मारायच्या आदेशाचे रूपक म्हणून हातावर चढलेला मुंगळा मारतो त्या प्रसंगी आडवा पडून भाजताना बघत असतो त्याप्रमाणे) भाजताना त्यावर जंगलातल्या जडीबूटी वगैरे अगोदर फासून (आणि भाजताभाजता अधूनमधून चोळून) 'हर्ब-रोस्टेड' (उच्चारी 'अर्ब-रोस्टेड') हरण खाल्ले असावे की काय, कोणास ठाऊक. एकंदरीत प्रकार चविष्ट नसेलच असे सांगता येणार नाही. (मुळात मांसाची अंगभूत चव महत्त्वाची; मसाले काय किंवा जडीबुटी काय, त्या चवीला थोडी उभारी देण्यापुरतेच!)
काय सांगता! मग मध्यंतरी भारतात 'रामराज्य' परत आणण्याची जी एक जोरदार चळवळ चालू होती, ती यशस्वी झाली नाही ते चांगलेच झाले म्हणायचे! त्यापेक्षा 'मोगलाई' काय वाईट होती? ;)
असो.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 12/26/2008 - 13:12
नवीन
हरणाला विस्तवावर रोटिसेरी पद्धतीने ('शोले'तला गब्बर 'अहमद'ला मारायच्या आदेशाचे रूपक म्हणून हातावर चढलेला मुंगळा मारतो त्या प्रसंगी आडवा पडून भाजताना बघत असतो त्याप्रमाणे) भाजताना त्यावर जंगलातल्या जडीबूटी वगैरे अगोदर फासून (आणि भाजताभाजता अधूनमधून चोळून) 'हर्ब-रोस्टेड' (उच्चारी 'अर्ब-रोस्टेड') हरण खाल्ले असावे की काय, कोणास ठाऊक. एकंदरीत प्रकार चविष्ट नसेलच असे सांगता येणार नाही
हरीण नव्हे पण अशीच रोटिसेरी पद्धतीने भाजलेली मेंढी खाल्ली आहे (श्वार्मा). मेंढी जर इतकी चविष्ट लागत असेल तर हरीण नक्कीच असावे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 12/26/2008 - 14:15
नवीन
तांत्रिकदृष्ट्या, 'रोटिसेरी' म्हणून गणले जाण्यासाठी मांस सातत्याने फिरवले जाण्याची गरज आहे. ('शोले'तल्या 'त्या' प्रसंगी ते तसे सातत्याने फिरवले जात होते ही नाही ते निश्चित आठवत नाही.) पहिला प्रतिसाद देताना हा मुद्दा नजरेतून निसटला होता हे मान्य करतो.
अर्थात, अशा कामांकरताच वनवासात लक्ष्मणाला बरोबर नेण्यात आले असावे असे मानण्यास जागा आहे.
- Log in or register to post comments
ज
जयेश माधव
गुरुवार, 12/25/2008 - 15:05
नवीन
शाकाहार ...मा॑साहार...
अरे काय चालले आहे? उगाच कोणाच्या श्रदध्येशी खेळु नको रे बा॑बानो! ज्या॑ना आपण देव मानतो,त्या॑च्या अस्तीत्वाविषयी आपण श॑का घेणे योग्य आहे का?भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ? हाच प्रश्न जर कोणी मुसलमान व्यक्तीने विचारला असता तर आपणच त्याच्यावर तुटुन पड्लो नसतो का? आता चित्रकार एम.एफ. हुसेनचच॑ घ्या ना,त्या॑नी आपल्या देवता॑ची उघडी नागडी चित्रे काढ्ली म्हणुन आपणच त्याच्यावर ब॑दी घातली ना? मग आपणच हे काय चालविले आहे?आपण खुप शीकलो म्हणुन देव देवता॑च्याही पुढे जायचेय काय? आणि उगाच त्याविषयी श॑का कुश॑का काढत बसायच्या का?....
जयेश माधव
- Log in or register to post comments
न
निखिलराव
Fri, 12/26/2008 - 07:25
नवीन
काकांशी १००% सहमत........
हे "रामराज्य" होवो ही श्रींची इछा.......
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »