राजकारण

विवेकाच्या आकाशात आज भांडवलशाहीचे ग्रहण लागले

Primary tabs

आज मानवता लाजली
लोकशाही ने शरमेने मान खाली घातली
पुरोगामी विचारांचा आज पराभव झाला
एक सुजाण नागरिक म्हणून आज माझी मान शरमेने खाली गेली
लोकशाहीची क्रूर थट्टा
आज गुजरातचा पैसा जिंकला

भुमन्यु

म्हणजे काही कोटी लोक चू* आणि तुम्ही शहाणे.

वेडा बेडूक

स्वायत्त संस्थांचा गैरवापर, सर्कारि तिजोरी मधून पैशांचं वाटप, फोडाफोडीचं राजकारण, यामुळे महायुतीचा विजय झालाय... आज एक सुजाण महाराष्ट्रियन मिपाकर म्हणुन शरम वाटलि!

खटपट्या

अविश्वसनीय,
उद्धव ठाकरेंनी कोविड मध्ये एवढे काम केले,
गृहमंत्र्याचे जे काय झाले असेल ते असेल,
कमीत कमी शरद पवार साहेबांच्या वयाचा मान तरी राखायला हवा होता,

कंजूस

मतदारांना नोमानी आणि औरंगझेबच वाचवेल अशा विश्वासाला तडा गेला.

अत्यंत अभ्यासू अश्या आदरणीय देवेंद्रजी यांचं यश तुमच्या डोळ्यात सलतय. जागे व्हा. तोंडावर बियर मारा, तरीही नशा नाही उतरली तर गोमूत्र मारा, गोमूत्राचे दोन घोटही मारा. मोरारजींसारखे शिवांबू प्राशन करा.
जय मोदीजी
जय शहाजी
जय देवेंद्रजी.

जास्त मान खाली घालू नका स्पाॅण्डिलायटिस होईल.

कितीही कुणी खडे फोडले तरी काही फरक पडत नाही. सर्तोवांच्या नाकावर टिच्चून तो पुन्हा आलायं.
मतदार वयस्क झालाय आणी त्यामुळे लोकशाही सजली आहे.

पुरोगामी पुढील पाच वर्षा करता मंत्र. कदाचित पुढल्या निवडणूकीत ग्रहण सुटेल.

ते शिवांबू प्राशन केले के जिवंत होणारे प्रेत आहे. मोरारजी त्यांचा आदर्श आहे. :)

सुबोध खरे

ताजे प्रेत आणी जिवंत होणारे प्रेत यात मूलभूत फरक आहे.

पण जाऊ द्या, तुम्हाला कुठे समजावू

आप आपल्या वर्तुळात राहिल्याने अस होतं असेल का? मी आणि माझ्या आजूबाजूचे १-२ जसा विचार करतात तसेच पूर्ण जग करत असेल अशी गैरसमजूत असली की असे धक्के बसणार.
राहुल गांधींनी महाराष्ट्रात फक्त चारच सभा घेतल्या. त्यांनाच राज्यात काँग्रेस नको आहे तर बाकी लोकांना असावी कशी वाटेल.

जसे काही त्यानिव जास्त सभा घेतल्या असत्या तर इव्हिएम मेनुप्यूलेशन झालंच नसतं. खो खो. :)

टीपीके

बघा न, मूर्ख कुठचे. अहो आम्ही म्हणजे साक्षात लोकशाही. आम्ही निवडणुकीला उभे राहिलो नाही तरी निवडून आलो पाहिजे, खरं तर हा सगळा फालतूपणा आहे, आम्हीच तहहयात सत्तेवर असलो पाहिजे, तुमच्यासारखे मनुवादी असल्याने हा सगळा घोळ होतो. तुम्ही म्हणजे फक्त आमची गुलामीच केली पाहिजे.

(अबा - बरोबर लिहिले ना? ह्या मनुवाद्यांना असेच ठेचले पाहिजे मग त्यासाठी कितीही खोटे बोलावे लागले, मींधेपणा करावा लागला तरी बेहत्तर, बरोबर ना. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात)

गांधींना आधीच माहिती होत का की EVM मेनुप्यूलेशन होणार आहे ते? कशाला कष्ट घ्या म्हणून ते आले नसतील.

विवेकपटाईत

आपल्या देशात मागासलेले विचारांचे, जेहादी समर्थक स्वत:ला पुरोगामी म्हणवितात. बाकी या निवडणूकीत लोकांनी पैसा आणि जातीला महत्व दिले नाही. देश आणि धर्मासाठी 5 टक्के जास्त मतदान झाले. असेच 66 टक्के मतदान 2029 मध्ये झाले तर 400 जागा सहज पार होतील.
निवडणूकी नंतर तकाही पुरोगामी विदेशी हिंसेच्या मदतीने मोदींचे फसिस्ट सरकार पाडण्यासाठी तैयार आहेत.
बाकी या निवडणूकी नंतर नितीश कुमार दगाबाजी करतील ही संभावना ही समाप्त झाली आहे. बिहारच्या चारी जागा एनडीए ने जिंकल्या.उत्तरप्रदेशात सपाच्या जागा जिंकल्या.

2029 मध्ये झाले तर 400 जागा सहज पार होतील.
मग भारताला मनुराष्ट्र जाहीर करायला काहीच अडचण असणार नाही.

या निवडणूकी नंतर नितीश कुमार दगाबाजी करतील ही संभावना ही समाप्त झाली आहे.

समाजवादी विचारांच्या कोणत्याही नेत्याविषयी ही खात्री देता येणार नाही. समाजवादी लोक आतापर्यंत किती वेळा भांडले असतील आणि किती वेळा परत एकत्र आले असतील याची गणती ठेवणे कोणत्याही मर्त्य मानवाला शक्य नाही. समाजवादी विचारांचे लोक नेहमी भांडण्यासाठी एकत्र येतात आणि एकत्र येण्यासाठी भांडतात. त्यातल्या त्यात नितीशकुमार हे इतर समाजवादी नेत्यांपेक्षा बरे असे वाटत होते कारण १९९६ ते २०१३ अशी सलग १७ वर्षे भाजपबरोबर राहिले होते. कोणत्याही समाजवादी नेत्यासाठी १७ वर्षे सलग एकत्र राहणे हा मोठा विक्रमच असावा. पण नंतर ते दोनदा तळ्यात मळ्यात जाऊन आले हे पाहता त्यांचा मुळातील समाजवादी पिंड अजिबात बदललेला नाही असे वाटते. कोणत्याही समाजवादी नेत्यावर विसंबून राहणे ही तोंडावर आपटायची अगदी १००% गॅरंटी असते.

सध्याचे मोदी सरकार हे नितीशकुमार आणि देवेगौडा या दोन समाजवादी नेत्यांवर अवलंबून आहे. चंद्रबाबू नायडू हे मुळातले समाजवादी नसले तरी ते पण दोनदा तळ्यात-मळ्यात करून आले आहेत. त्यांचाही फार भरवसा नसावा. तसेही आंध्र विधानसभेत त्यांना स्वतःचे बहुमत आहे आणि तिथे त्यांना भाजपची गरज नाही. त्यांचे वय लक्षात घेता ही त्यांची मुख्यमंत्रीपदाची शेवटची टर्म असेल ही शक्यता आहे. तेव्हा त्यांना काड्या घालायचा आणि न घालायचा दोन्ही बाजूंनी इन्सेन्टिव्ह आहे. त्यामुळे त्यांचीही खात्री देता येईलच असे नाही.

मोदी फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबरोबरच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतील ही शक्यता आहे. आपण आरामात जिंकत आहोत अशी भाजप समर्थकांची धारणा २०२४ मध्ये झाली तेव्हा कोण ४२-४५ डिग्री उन्हात मत द्यायला जाणार हा पण एक घटक २०२४ मध्ये मतदान कमी झाले आणि त्याचा फटका मोदींना बसला त्यामागे असावा. आता हिंदू कॉन्सॉलिडेशन होत आहे. त्याचा फायदा घेत २०२५ मध्ये दिल्ली आणि २०२६ मध्ये आसामची निवडणुक जिंकून मोदी आपले स्थान बळकट करून मग २०२७ मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये मध्यावधी निवडणुक घेतील ही शक्यता मला वाटते. त्यातून भर तळपत्या उन्हात मत द्यायला कोण जाणार हे एक कारण राहणार नाही.

म्हणजे मोदी पुढील वर्षी रिटायर होणार नाहीत? ७५ वय झाल्यामुळे भाजपमधील अनेक नेट रिटायर करण्यात आले होते, तो नियम मोदी पाळणार की नाही? की ते देखील dysare मनोहर पर्रीकर ठरणार??
पडलालसा जिंकेल की नीतीमत्ता?

तुम्ही मोदींचे समर्थन करत नाही ना? मग तुम्हाला काय करायचे आहे ते कधी निवृत्त होतात आणि कधी नाही याचे? आम्ही समर्थक बघून घेऊ ना. अडवाणी आणि इतरांना लावलेला ७५ वर्षांचा नियम मोदी स्वतःला लावत नसतील आणि ती गोष्ट ज्या समर्थकांना आवडली नाही ते याविषयी मोदींना जाब विचारतील.

मला तरी वाटते की ७५ वर्षे हे खरे कारण नव्हतेच. खरे कारण होते वाजपेयींच्या काळात जसा पक्ष आणि सरकार चालायचे तसेच मोदीकाळातही व्हायला हवे असा आग्रह धरतील अशी शक्यता असलेल्या जुन्या पिढीतील नेत्यांना दूर ठेवणे. ते नेते होते अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि यशवंत सिन्हा हे तिघे. त्यापैकी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी पक्षासाठी खूप खस्ता खाल्या होत्या हे कोणीच नाकारू शकणार नाही आणि त्याविषयी त्यांच्याविषयी आदरही आहे. मात्र एखादी खाष्ट सासू जशी म्हणते की मी माझ्या मुलाला पहिल्या दिवसापासून वाढविले आहे म्हणून यापुढेही मी म्हणेन तसेच व्हायला पाहिजे त्याप्रमाणे हे जुन्या पिढीतील लोक आम्ही पक्षाला पहिला दिवसापासून, अगदी जनसंघाच्या काळापासून मोठे केले आहे म्हणून यापुढेही आम्ही म्हणू तसेच व्हायला हवे तर ते चालणार्‍यातले नव्हते. काळ बदलला आहे तेव्हा नव्या नेत्यांकडे आपण होऊन नेतृत्व सोपावून आपण स्वतः वानप्रस्थाश्रमात जावे ही भारतीय संस्कृतीतील मूळ कल्पना अशा जुन्या पिढीतील नेत्यांना आणि खाष्ट सासवांनाही कळत नाही. तेव्हा त्यांना दूरही करायचे पण त्यांनी पक्षासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचा मानही ठेवायचा या दोन्ही गोष्टी साध्य करायला ७५ ची अट ठेवली गेली असे मला तरी वाटते- वैयक्तिक मत. खरं तर ८० ची अट ठेवली असती तरी चालले असते कारण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी दोघेही ८० च्या पुढे होते. पण यशवंत सिन्हा ७७ वर्षांचे होते. तसेही यशवंत सिन्हांनी पक्षासाठी अडवाणी आणि जोशींइतके केले नव्हते. ते मुळात पक्षात आले १९९३ मध्ये- जेव्हा भाजप चांगल्यापैकी प्रस्थापित झालेला पक्ष होता. तसेच निदान अडवाणींनी एकेकाळी पक्षासाठी भरभरून मते फिरवली होती त्याच्या एक टक्काही मते यशवंत सिन्हा कधी फिरवू शकले नसते. ते मास लीडर कधीच नव्हते. त्यामुळे त्यांची इतकी पर्वा करायची गरज नसावी. तरीही ते भारताच्या सर्वोत्तम अर्थमंत्र्यांपैकी एक होते- सर्वोत्तम अर्थमंत्री असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे त्यांचा विचार करून ७५ ही अट ठेवली असावी. नंतरच्य काळात राफेलच्या मुद्द्यावर रागा नुसती बडबड करत होता पण कोर्टात जाऊन आपले थोबाड फोडून घ्यायला गेले यशवंत सिन्हा (आणि अरूण शोरी) तसेच आय.एस.आय च्या माजी प्रमुखाबरोबर ए.एस.दुलातनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभात मनमोहन सिंग, फारूख अब्दुल्ला आणि हामीद अन्सारी बरोबर यशवंत सिन्हाही होते असले प्रकार त्यांनी केल्याने नंतरच्या काळात ते मनातून पूर्ण उतरले. तरीही २०१४ मधील परिस्थिती ध्यानात घेता त्यांनी अर्थमंत्री म्हणून जे काही काम केले त्याबद्दल त्यांचा उचित मान ठेवला आणि ७५ ची अट ठेवली असे वाटते.

त्यातही अडवाणींना आव्हान द्यायला पक्षात नरेंद्र मोदी पुढे आले आणि नेतृत्व त्यांनी स्वतःकडे खेचून आणले. त्यावेळेस अडवाणींच्या घरासमोरही भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने झाली होती. भाजप कार्यकर्त्यांची अडवाणींच्या घरासमोर निदर्शने कधीकाळी होतील असे कोणाला वाटले नसावे. मात्र काळ बदलला आहे ते त्यांनी ध्यानात घेतले नाही. समजा मोदींनाही आव्हान द्यायला असाच कोणी दुसरा डायनॅमिक नेता पुढे आला तर पक्षाची सूत्रे त्या नेत्याच्या हातात जातील. हे कालचक्र आहे. जुनी पिढी मागे पडते आणि नवी पिढी पुढे येते. सगळीकडे असेच होते. आणि जुन्या पिढीतील जे लोक सहजासहजी नव्या पिढीच्या हाती मदार सोपावत नाहीत ते बाजूला पडतात. मोदींनीही असाच असमंजसपणा दाखविला तर ते पण तसेच बाजूला पडतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका. समर्थक काय करायचे ते बघून घेतील.

तुम्ही काहीही म्हणा हो. माझ्यासारखे समर्थकही तुमच्यासारख्यांचे बोलणे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे स्वतः मोदी असली बडबड करणार्‍या लोकांकडे ढुंकूनही बघतील याची शक्यता शून्य. तेव्हा बोला काय बोलायचे ते.

सुबोध खरे

तुम्ही काहीही म्हणा हो. माझ्यासारखे समर्थकही तुमच्यासारख्यांचे बोलणे फारसे गांभीर्याने घेत नाहीत

भुजबळ बुवा

तुमची पातळी समजली ना?

तुमचे प्रतिसाद कोणीही गांभीर्याने घेत नाहीत

तेंव्हा उगाच "हातास कळफलक आला म्हणून बडवा" हे सोडून द्या!

तुमची पातळी समजली ना? ह्याची त्याची लायकी/ पातळी काढण्यापेक्षा आपण ज्या नेत्याची वाहवा करतो त्याची लायकी पाहा.

इतर पक्षात अशा मागच्या पिढीतील नेत्यांना कशी वर्तणूक दिली गेली हे पाहणे मनोरंजक ठरेल.

१. मनोहर जोशी: जोशी मास्तरांना २०१३ मधील दसरा मेळाव्यात अपमानीत करून व्यासपीठावरून जायला सांगितले गेले. त्यानंतर जोशी मास्तर चुकूनही कधी राजकारणात दिसले नाहीत.
२. जॉर्ज फर्नांडिसः त्यांनाही नितीशकुमारांनी मुख्यमंत्री झाल्यावर बाजूलाच केले. पण त्यानंतर लगेचच त्यांना अल्झायमरचा त्रास सुरू झाला आणि ते राजकारणापासून दूर गेले त्यामुळे त्यांना नितीशकुमारांनी दिलेल्या वर्तणुकीचा इतका गवगवा झाला नाही.
३. सीताराम केसरी: १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर सोनिया समर्थकांनी सीताराम केसरींना काँग्रेस मुख्यालयातील संडासात कोंडून ठेवले होते.
४. एन.टी.रामारावः हे आजारी असताना त्यांचे जावई चंद्रबाबू नायडूंनी त्यांच्याविरोधात बंड केले आणि स्वतः मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
५. कांशीराम: मायावतींनी कांशीरामांना जवळपास नजरकैदेत ठेवले होते असा आरोप कांशीरामांच्या कुटुंबियांनीच केला होता.
६. पी.व्ही. नरसिंहरावः यांच्याविषयी जितके लिहावे तितके कमीच आहे. त्यांना इतकी वाईट वर्तणूक दिली गेली की त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा मृतदेह काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवला गेला नव्हता. तसेच इतर सगळ्या माजी पंतप्रधानांवर अंत्यसंस्कार दिल्लीत केले गेले होते. पण पी.व्ही.नरसिंहरावांवर अंत्यसंस्कार मात्र त्यांच्या आंध्र प्रदेशात केले गेले.

तीच वेळ तामिळनाडूत जानकी रामचंद्रन यांच्यावर आली असती. पण आपली राजकारणात विशेष डाळ शिजत नाही हे लक्षात येताच सगळा पक्ष जयललितांच्या हाती सोपवून त्या राजकारणातून निवृत्त झाल्या. तशाही त्या मुळात राजकारणात नव्हत्याच. तरीही त्यांनी लुडबूड करायचा प्रयत्न केला असता तर जयललितांसारख्या एकाधिकारशाही वृत्तीच्या नेत्याने त्यांची अवस्था सीताराम केसरी किंवा नरसिंह रावांपेक्षाही वाईट केली असती.

त्या तुलनेत मोदींनी पक्षातील ज्येष्ठांना कितीतरी जास्त चांगली वागणूक दिली होती.

म्हणून अडवाणींनी संतापून सर्व पदांचा राजीनामा फेकून मारला होता. असो. अमित शहा आहेतच हुशार सारतील बाजूला.

इव्हिएमवर निवडणूक आयोगाने उत्तरदेणे अपेक्षित असताना भाजप नेते का देताहेत??