मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?

फेसबुकवर श्री ओमकार दाभाडकर यांनी भारताचे माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याविषयी खालील पोस्ट लिहिली आहे.

https://www.facebook.com/100000286362050/posts/pfbid0ao3MCQPzn7M4zFSXKU…

त्यावरुन गदारोळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होताहेत. आज बरेचजण मनमोहन सिंगांना आदरांजली वाहताहेत. तर यानिमित्ताने मनमोहन सिंगांचं भारतात झालेल्या आर्थिक सुधारणांमधे किती सहभाग होता? त्या खरच सुधारणा होत्या का? ते भारतासाठी हिरो होते की केवळ काँग्रेसचे गुलाम? नक्की काय? बर्‍याचजणांचा मनमोहनसिंग यांच्या कार्याचा अभ्यास कमी असू शकतो किंवा त्याचे अपुरे आकलनही असू शकते.
या निमित्याने इथल्या राजकारणाची चांगली जाण असणार्‍यांना विनंती की त्यांनी यावर प्रकाश टाकावा.

मनमोहनसिंग यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती नसल्याने अधिक काही लिहिले नाही. त्यामुळे निवेदन छोटे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व! _/\_

मनमोहनसिंगांचा १० वर्षाचा पंतप्रधानपदावरील काळ हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट कालखंड होता हे नक्की.

सहमत आहे.

हिंदूंना शिक्षण देण्याच्या हक्कात असंख्य अडथळे आणणारा शिक्षण हक्क कायदा पास करण्याचे पापही मनमोहन सिंगांचेच आहे.

या कायद्याबद्धल साहना यांनी मिपावर भरपूर लिहिले आहे.

>>>> मनमोहनसिंगांचा १० वर्षाचा पंतप्रधानपदावरील काळ हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट कालखंड होता हे नक्की.

=)) च्यायला हे वाचलंच नव्हतं. गोबररगुरुच्या तुलनेत स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच पंतप्रधानांचा कालखंड हा काळाकुट्ट आहे. अव्वल नंबर एक कालखंड आणि अव्वल एक पंतप्रधान म्हणजे आपले शेठ. =))

बोल भैरू महाराज की जय...!

-दिलीप बिरुटे

मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?

काँग्रेसचे गुलाम

वसेकचा पूर्वावतार सेवा कर. सेवा कर व उद्गम कर कपात या दोन्हींचे जनक मनमोहन सिंह. त्यांनीच १९९१-९६ या काळात हे दोन्ही कर आणले होते. सेवा कर प्रारंभी ६% होता. नंतर तो वाढवत २००८ मध्ये १२% केला. २००९ लोकसभा निवडणुकी पूर्वी अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी तो १०% केला व २ टप्प्यात पेट्रोलची किंमत १० रूपयांनी कमी केली. अर्थात मे २००९ मध्ये पुन्हा एकदा संपुआचे सरकार आल्यानंतर १५ दिवसात पेट्रोलची किंमत पूर्वपदावर नेली व काही काळाने सेवाकरही वाढवला.

Former Prime Minister Dr Manmohan Singh addressed/ interacted with the Press 117 times during his 10 year tenure between 2004-14.Press Conferences by Dr Manmohan Singh 2004-2014:On foreign trips- 72Annual Pressers - 10Domestic/state visits- 23Election/political/manifesto -… pic.twitter.com/F8ZjAiwRmn— Manish Tewari (@ManishTewari) January 3, 2024

पत्रकार परिषदेंची संख्या हा कर्तृत्वमापनाचा मानदंड असेल तर, ब्रह्मांडातील सर्वाधिक कर्तृत्ववान महापुरूष संजय राऊत आहे.

भारताचे माजी पंतप्रधान व माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली .

"मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्"
जो हिंदू आहे, रामभक्त आहे त्याने या वचनाचा आदर केला पाहिजे. गेलेला माणूस कसाही असेल तर त्याचे माप त्याच्या पदरात तो मेला त्याच दिवशी / लगोलग घालायला पुढे सरसावणे हे अधम मनोवृत्तीचे उदाहरण आहे.

मी भाजपा समर्थक असलो आणि चर्चांमधून मला बरीचशी भाजपाच्या बाजूने बोलणार्‍या सभासदांची मते पटत असली तरी ह्या बाबतीत त्यांच्याशी मिळता जुळता विचार ठेवणे अवघड आहे.

माणूस गेल्यावर लगेच त्याच्या पापपुण्याचा हिशेब करायला घेणे आणि बापावर स्मशानात अंतिम संस्कार करुन आल्यावर १० वा व्हायच्या आतच प्रॉपर्टीच्या वाटण्या करण्यासाठी भांडणार्‍या मुलांमधे मला तरी काही फरक दिसत नाही.

मनमोहनसिंग यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती नसल्याने अधिक काही लिहिले नाही. त्यामुळे निवेदन छोटे झाले आहे.

नाही. त्यांची अवगुंणांची लक्तरे लगोलग वेशीवर टांगण्यासाठी तुम्ही केवळ शीर्षक लिहिले असते आणि मजकूर लिहिला नसता तरी पुरेसे झाले असते.

असो.

>>गेलेला माणूस कसाही असेल तर त्याचे माप त्याच्या पदरात तो मेला त्याच दिवशी / लगोलग घालायला पुढे सरसावणे हे अधम मनोवृत्तीचे उदाहरण आहे.

तुमच्या मते माणूस गेल्यावर त्याचे माप त्याच्या पदरात घालायची योग्य टाईम्लाईन कोणती?

माणूस गेल्यावर ७० वर्षे झाली तरी त्याला शिव्या घालणे योग्य कि अयोग्य?

योग्य टाईम्लाईन कोणती?

टाईमलाईन मला माहित नाही पण माणुस मेला त्याच दिवशी / लगोलग घालायला पुढे सरसावणे हे अधम मनोवृत्तीचे उदाहरण आहे.

माणूस गेल्यावर ७० वर्षे झाली तरी त्याला शिव्या घालणे योग्य कि अयोग्य?

अयोग्य !

पण , टाळी एका हाताने वाजत नाही.

ज्या माणसाने, हिंदू हिताची भूमिका घेतली नसेल , तर त्या माणसाच्या मृत्यु बद्दल शोक व्यक्त करावा, हे मला तरी पटत नाही.

तीच गोष्ट, औरंग्या बाबतीत आणि तीच गोष्ट टिपू बाबतीत. वक्फ बोर्डाच्या हातात अपरिमित कायदेशीर सत्ता दिल्याने, तीच गोष्ट पी.व्ही. नरसिंह राव, यांच्या बाबतीत.

तीच गोष्ट, परमपूज्य गांधी यांच्या बाबतीत आणि तीच गोष्ट नेहरूंच्या बाबतीत....

द्रौपदीने देखील, दुर्योधन आणि दू:शासन , ह्यांना त्यांच्या मृत्यु नंतर माफ केले न्हवते. मग, ज्यांनी हिंदु हिताची भूमिका घेतली नाही, त्यांच्या मृत्यु बद्दल शोक मी तरी व्यक्त करणार नाही... हीच, द्रौपदीने मला दिलेली शिकवण आहे...

साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा हे म्हणायला पंतप्रधान पदावरचा माणूस (कि काँग्रेसचे किल्लीवर चालणारे खेळणे) जराही कचरला नाही. त्यावेळी हे सौजन्याचे बोल कुठे होते? ते पंप्र असून , पाकिस्तानातून मुसलमानांकडून छळ सोसून भारतात यावं लागलं तरी ते हिंदूंना वाईट वाटेल असं बोलायला कचरले नाहीत. मग सामान्य लोकांनी त्यांच्या दुष्कर्मांवर , लाचारीवर व्यक्त व्हायला विलंब का करावा?

मी भाजपा समर्थक असलो आणि चर्चांमधून मला बरीचशी भाजपाच्या बाजूने बोलणार्‍या सभासदांची मते पटत असली तरी ह्या बाबतीत त्यांच्याशी मिळता जुळता विचार ठेवणे अवघड आहे.

मते पटत असली तरी मिळता जुळता विचार ठेवणे अवघड आहे? हे काय लॉजिक झाले? समजले नाही.

माणूस गेल्यावर लगेच त्याच्या पापपुण्याचा हिशेब करायला घेणे आणि बापावर स्मशानात अंतिम संस्कार करुन आल्यावर १० वा व्हायच्या आतच प्रॉपर्टीच्या वाटण्या करण्यासाठी भांडणार्‍या मुलांमधे मला तरी काही फरक दिसत नाही.

दोन मुद्दे:

१. मनमोहनसिंग हे देशाचे पंतप्रधान होते, कोणी सामान्य व्यक्ती नव्हे. त्यामुळे दहावे व्हायच्या आत प्रॉपर्टीच्या वाटण्या हा सामान्य लोकांच्या कुटुंबियांपुरता मर्यादित विषय असतो तसा मनमोहनसिंगांची लीगसी हा विषय मर्यादित राहू शकत नाही.
२. मी आणि इतर अनेक सदस्यांनी मनमोहनसिंग हयात असतानाही इथे व्यक्त केली होती तीच मते मांडली होती. त्यांच्या कारकिर्दीचे (किंवा तुम्ही म्हणता तसे पापपुण्याचे) मूल्यमापन आधीच केले होते. इथे मांडले आहे त्यात नवे काहीही नाही. शब्द कदाचित जसेच्या तसे नसतील पण अर्थ तर तोच होता.हा धागा आल्यामुळे काही गोष्टी परत लिहिल्या. याचा अर्थ मनमोहनसिंगांचे निधन झाल्यावर लगेच पापपुण्याचा हिशेब करायला घेतला असे आहे का?मनमोहन हयात असतानाही तो केला होताच- आणि कोणत्याही पब्लिक फिगरविषयी तसे करायचा सगळ्यांना अधिकार आहेच.

"मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्"

हे रामाने बिभीषणाला कोणत्या स्थितीत म्हटले होते? रावणाचा युध्दात मृत्यू झाल्यावर बिभीषण आपल्या भावावर अंत्यसंस्कार करायला तयार होत नव्हता तेव्हा रामाने त्याला ते सांगितले होते. अर्थातच ते वैयक्तिक पातळीवर लागू होते. ते विधान एक्स्ट्रापोलेट करून सार्वजनिक पातळीवर लागू करायचे काय प्रयोजन आहे? ज्यावेळेस मनमोहनसिंगांनी काश्मीरी हिंदूंना ठार मारणार्‍या, आपल्याच हवाईदलाच्या अधिकार्‍यांना ठार मारणार्‍या यासिन मलिकला मोठ्या मानाने पंतप्रधान कार्यालयात बोलावून घेतले होते तेव्हा आमच्याच देशाचा पंतप्रधान आमच्या लोकांना, आमच्या सैनिकांना मारणार्‍या दहशतवाद्याचा सन्मान करत आहे हे बघून अगदी अभिमानाने मान उंचावलीच असेल नाही का? एप्रिल २०१८ मध्ये मनमोहन पंतप्रधान पदावर नव्हते. तरीही माजी पंतप्रधान म्हणूनही आपल्या देशाच्या हजारो नागरीकांना ठार मारणार्‍या आय.एस.आय प्रमुखाबरोबर ते स्टेज शेअर करत होते ते किती विलोभनीय दृश्य असेल ना?

दुसरी गोष्ट म्हणजे समजा त्या व्यक्तीविषयी मत चांगले नसेल तर गेलेल्या माणसाविषयी वाईट बोलायचे नाही म्हणून काही बोलले नाही हे एकवेळ समजू शकतो. पण उगीच मनात नसताना त्याचे बळेबळे कौतुक करायचे हे ढोंग कशाकरता? तुम्ही तसे करत आहात असे म्हणत नाहीये पण तसे करणारे लोक सोशल मिडियावर दिसतीलच. आणि मग काही दिवस/काही महिने/काही वर्षे उलटली की दुसर्‍या कोणत्या संदर्भात बोलायचे असेल तर एखादे उदाहरण देऊन किंवा अन्य काही लिहून/बोलून ती व्यक्ती कशी वाईट हेच परत लिहायचे/बोलायचे? हे सगळे ढोंग वाटत नाही का?

तिसरे म्हणजे कोणताही माणूस अमर नसतो. मोदीही त्याला अपवाद नाहीत.ते ही एक दिवस कधीनाकधी हे भूतल सोडून जाणारच आहेत. त्यांना उद्देशून मशरूम (मोदींच्या गोर्‍या रंगाचे रहस्य म्हणजे ते काही लाख रूपयांचे मशरूम खातात की तोंडाला लावतात असे जिग्नेश मेवाणी बरळला होता तो संदर्भ) गचकल्यावरही त्याच्याविषयी आम्ही काही चांगले थोडीच लिहिणार आहोत असे काही लिहिलेले मी पण वाचले आहे. मनमोहनसिंगांचे निधन झाल्यावर अशी भाषा कोणीतरी वापरली आहे का?जी काही मते पूर्वी होती आणि पूर्वी लिहिलेली आहेत ती परत या धाग्याच्या निमित्ताने परत कोणताही अपशब्द न वापरता लिहिली. त्यात आक्षेपार्ह काय? मनात नसताना उगीच बळेबळे गेलेला माणूस कित्तीकित्ती चांगला होता असे खोटे कौतुक करणे मला तरी आता जमत नाही. एकेकाळी तसे ढोंग जमायचे. मिपावरही ते केले आहे. पण आता नाही.

असो.

"मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्"

हे श्रीरामांनी बिभीषणास म्हटले होते. रावणाच्या मृत्यू नंतर यायचे क्रियाकर्म करावे कि नाही या संभ्रमात असताना बिभीषणास त्याचे सर्व क्रिया कर्म शास्त्रानुसार करताना हे म्हटले होते कि मृत्यू नंतर वैर संपवले पाहिजे.

पण असे असतानाही रावणाचे दहन गेली कित्येक शतके का होते याचा विचार आपण केला आहे का?

रावण हि एक वृत्ती आहे आणि तिचा निषेध करणे आवश्यक आहे. तसेच डॉ मनमोहन सिंह हि एक गुलामी वृत्ती आहे. गांधी घराण्याची गुलामगिरी करून त्यांनी अनेक मानमरातब मिळवले हि वास्तस्थिती आहे.या अब्जावधी रुपयाचा घोटाळा समोर होत असताना त्यांच्या सारखा अर्थतज्ञ डोळ्यावर कातडे ओढून गप्पा बसला होता. शर्म आलं शेख मध्ये बलुचिस्तानात भारताची गुप्तहेर संघटना कार्यरत आहे हे मान्य करून त्यांनी देशाला आणि गुप्तचर संघटनेला तोंडघशी पाडले होते. भारतात १९७३-७४ मध्ये आयकराचा दर ९७.५ % इतका आचरट पणाचा होता एतनव्ह हेच डॉ मनमोहन सिंह भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते.
१९९१ सालच्या सोने गहाण ठेवण्याचं नामुष्कीच्या अगोदर १९८२ ते १९८५ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि १९८७ पर्यंत हेच योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. १९९१ साली त्यांनी भारताला आर्थिक गर्तेतून बाहेर काढले हे ढोल पिटून सांगणारे लोक भारताला आर्थिक गर्तेत कुणी टाकले हे सोयिस्ककर रित्या विसरतात.

अशा अनेक गोष्टी आपल्याला डोळ्याआड करता येत नाहीत.

यामुळे डॉ मनमोहन सिंह हि वृत्ती आहि आणि तिचा त्रिवार निषेधच केला पाहिजे

उगाच मृत्यूनंतर त्यांचे गुणगान गाताना हि सद्गुण विकृती होणार नाही हे आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे

+१९९१

कसला मुद्देसूद प्रतिवाद केलेला आहे डॉक्टर ! परफेक्ट.

आता ह्या उपर अजून काही बोलायची गरजच नाही.

काही उजव्या विचाराच्या, राष्ट्रभक्तांना सुद्धा अचानक मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कढ दाटून आला आहे. अचानक मरणान्तानी वैराणी चा उमाळा फुटला आहे. अशा समस्त मंद, निरागस, भोळसटांसाठी हा लेखनप्रपंच ~

मरणान्तानी वैराणी वगैरे सर्वसामान्य माणसांमध्ये ठीक असतं. पण राष्ट्राचा विचार करताना हा नियम बाजूलाच ठेवावा लागतो.
आपण कशाच्या आधारावर ठरवतोय की हा मनुष्य देशभक्त होता आणि ह्याने देशाची सेवा केली? ह्या माणसाने आयुष्यभर फक्त गांधी-नेहरु घराण्याची सेवा केली.

ह्या माणसाने शर्म अल् शेख या ठिकाणी भारताची मान शरमेनं खाली जाईल असं कृत्य केलं. भारत बलुचिस्तान मध्ये ऑपरेशन्स करत आहे हे अधिकृतरित्या बोलून मुर्खपणा केला आणि पंतप्रधानपदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते तिला हरताळ फासला.

ह्याच माणसाच्या काळात उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी इराणमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय गुप्तहेरांची यादी इराणला दिली. इराणने ताबडतोब कारवाई करुन त्या गुप्तहेरांचा सफाया केला. रातोरात इराणसारख्या देशातील आपले डीप ॲसेट्स खतम. उपराष्ट्रपतींचं हे कृत्य म्हणजे खरंतर देशद्रोहाचा मामला असून त्यांच्यावर महाभियोग चालवायला हवा होता. त्यांना पदमुक्त करुन कैदेत टाकायला हवं होतं. पण यापैकी पंतप्रधान मनमोहन सिंगने काहीच केलं नाही.

ह्या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा असलं भयंकर विधान ह्या माणसानं केलं होतं.

ह्याच्याच काळात देशाची अर्थराजधानी मुंबईवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याचे मास्टरमाइंड पाकिस्तानात होते असं जरी आपण म्हणत असलो तरी भारतीय संरक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणतात की ह्यात तत्कालीन सिंग सरकार आणि प्रशासन ह्यातली बडी धेंडं देखील ह्या हल्ल्यात इन्व्हॉल्व्ह होती. २६/११ चा हल्ला होऊ देणं आणि तो झाल्यावर तो ज्या पद्धतीनं हाताळला त्यातून ह्या माणसाचं ढिसाळ नेतृत्व आणि शून्य कर्तृत्व लख्खपणे दिसतं.

सिंग सरकार हे अनेक आर्थिक घोटाळ्यांनी बरबटलेलं सरकार होतं. पंतप्रधानांचा कसलाच धाक, वचक न राहिल्यामुळे त्यांच्या वरीष्ठ नेतृत्वापासून खालपर्यंत जो तो मनमानी कारभार करत होता.

ह्याची पोरगी डीपस्टेट सोरोसच्या संघटनेत काम करते ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. देशाची सेवा ह्या माणसानं आणि त्याच्या परिवारानं कधीच केलेली नाही. सोनेरी वर्खाखाली सडलेलं अन्न असावं तशी ही गोष्ट आहे.

देशसेवेच्या आणि सभ्यपणाच्या मुखवट्याआड लपलेला राष्ट्रहिताला नख लावणारा भेसूर चेहरा हीच मनमोहन सिंग यांची खरी ओळख आहे, हे त्यांचं निधन झालं म्हणून विसरुन जाता कामा नये. राष्ट्रहिताचा विचार करताना कुणी खरोखर राष्ट्रसेवा केली आणि कोण बांडगुळासारखे राष्ट्रहितरस शोषत राहिलं ह्याच भान सतत ठेवायलाच हवं.

तुम्ही त्यांना अर्थतज्ज्ञ म्हणा, उच्चपदस्थ म्हणा, उच्चशिक्षित म्हणा, हुशार म्हणा, वाट्टेल ते म्हणा, पण त्याने देशसेवा केली हे मात्र दहा हजार टक्के अमान्य...

काहीही म्हणा,

पण खणत्या राजा पेक्षा तरी मौनमोहन सिंग जास्त हुशार होते हे मान्य करायला कोणाचीही हरकत नसावी. कारण कसे का असेना, त्यांची "बस चुकली नाही".

बाकी नव्वद चे दशकातील आर्थिक सुधारणांचे श्रेय आजही तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या पारड्यात न टाकता सिंग ह्यांच्या पारड्यात टाकले जाते, हे इतकेच पुरेसे आहे रोमन एम्पायर ची मानसिकता आणि मोडस ऑपरेंडी दाखवायला.

इत्यलम.

ह्या बद्दल दुमत नाही.

गांधी घराण्याचे लांगुनचालन करून , योग्य वेळी, पंतप्रधान पदी विराजमान झाले.

खरगे काय किंवा मनमोहन सिंग काय किंवा ग्यानी झैलसिंग काय, ह्यांचे बोलवते धनी म्हणजे, गांधी घराण्यातील व्यक्ती. मग ती इंदिरा गांधी असो किंवा सोनिया गांधी...

हे इतकेच पुरेसे आहे रोमन एम्पायर ची मानसिकता आणि मोडस ऑपरेंडी दाखवायला.

हे रोमन एम्पायर एकदम खतरनाक आहे.

नरसिंहरावांचे निधन झाल्यावर त्यांचा मृतदेह काँग्रेस मुख्यालयात सामान्य लोकांना/कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी आणला नव्हता. इतर सर्व माजी पंतप्रधानांवर अंत्यसंस्कार दिल्लीत झाले होते पण नरसिंहरावांवर मात्र अंत्यसंस्कार आंध्र प्रदेशात झाले होते. त्यांच्या पार्थिवावर धड अंत्यसंस्कारही झाले नाहीत आणि त्यांचे पार्थिव पूर्ण जळलेही नव्हते आणि भटके कुत्रे त्यांच्या अर्धवट जळालेल्या पार्थिवाचे तुकडे ओढत होते असेही विनय सीतापती म्हणून एका लेखकाने नरसिंहरावांचे चरीत्र लिहिले आहे त्यात म्हटले आहे. https://www.business-standard.com/article/beyond-business/narasimha-rao… खरेखोटे माहित नाही. नरसिंहरावांचा उल्लेखही कधी काँग्रेस करत नाही. त्यांचे काँग्रेसच्या कोणत्याही पोस्टरवरही चित्र कधी नसते. या सगळ्याचे कारण नरसिंहराव राजमातेच्या हो ला हो करून आपले पोतेरे होऊ द्यायला तयार नव्हते आणि स्वतंत्र बाणा जपायचा प्रयत्न करत होते.

प्रणव मुखर्जी इतकी वर्षे विविध काँग्रेस सरकारांमध्ये मंत्री होते. राजमातेनेच त्यांना राष्ट्रपतीही केले. पण २०१९ मध्ये मोदी सरकारने त्यांना भारतरत्न दिल्यावर ते प्रथम कुटुंबाच्या नजरेतून उतरले.मुळच्या काँग्रेसच्याच नेत्याला भारतरत्न द्यायच्या समारंभाला एकही कॉंग्रेसचा नेता हजर नव्हता. प्रणव मुखर्जींचे निधन झाल्यावर काँग्रेस कार्यकारिणीने शोकप्रस्तावही संमत केला नव्हता. त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जींना सांगण्यात आले की माजी राष्ट्रपतींच्या निधनानंतर असा शोकप्रस्ताव मंजूर करायची पध्दत नाही. मात्र २००५ मध्ये के.आर.नारायणन या दुसर्‍या मुळच्या कॉंग्रेसच्या असलेल्या माजी राष्ट्रपतींचे निधन झाल्यावर काँग्रेस कार्यकारिणीने तसा शोकप्रस्ताव मंजूर केला होता आणि तो प्रस्ताव स्वतः प्रणव मुखर्जींनीच मांडला होता असे शर्मिष्ठा मुखर्जींनी म्हटल्याचे आजच पेपरात वाचले. आणि मनमोहनसिंगांचे स्मारक दिल्लीत उभारावे या मागणीला शर्मिष्ठा मुखर्जींनी विरोधच केला आहे. https://www.hindustantimes.com/india-news/utter-rubbish-pranab-mukherje… काँग्रेसला आता मनमोहनसिंगांचे स्मारक हवे असेल तर मग नरसिंहरावांचे स्मारक त्यांनी त्यांचेच सरकार असताना का बांधले नाही? गांधी परीवाराची हुजरेगिरी आणि हो ला हो केले की मग अशी मेहरबानी होते. पण जरा स्वतंत्र बाणा दाखविला की मात्र गत नरसिंहराव आणि प्रणव मुखर्जींसारखी होते.

इंदिरा गांधी, यांच्या काळातील आहे.(https://en.wikipedia.org/wiki/D._Devaraj_Urs)

पण एक मात्र आहे...

काँग्रेस सोडून दिल्या नंतर, फक्त माननीय शरद पवार, हेच तेव्हढे राजकारणात टिकले.. इतरांचा सुपडा साफ झाला. अगदी अरस यांचा देखील.

श्रीमती इंदिरागांधी यांच्या कारकिर्दीत १९७३-७४ मध्ये भारतात सर्वात जास्त म्हणजे ९७.५ % आयकराचा दर होता.

हा आचरटपणाचा कळस असणारा दर असताना भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते?

अर्थात डॉ मनमोहन सिंह.

In 1972, Singh was chief economic adviser in the Ministry of Finance, and in 1976 he was secretary in the Finance Ministry.[23] In 1980–1982 he was at the Planning Commission, and in 1982, he was appointed governor of the Reserve Bank of India under then finance minister Pranab Mukherjee and held the post until 1985.[23] He went on to become the deputy chairman of the Planning Commission (India) from 1985 to 1987.[13]

अशा गोष्टी त्यांचा उदो उदो करताना काळजीपूर्वक वगळल्या गेल्या आहेत.

उदा १९९१ साली भारत आर्थिक गर्तेत गेला होता त्याला बाहेर काढणारे श्री नरसिम्ह राव होते पण देशा ला अशा खड्ड्यात टाकण्याचे श्रेय कुणाचे?

ते कुठेच कोणी लिहीत नाही. अर्थात ते श्री राजीव गांधी यांचे होते आणि त्याबद्दल त्यांना भारत रत्न हि देण्यात आले.

हि गोष्ट हि काळजीपूर्वक वगळली जाते.

गांधी घराण्याची गुलामगिरी काँग्रेसींच्या रक्तात इतकी मुरली आहे कि त्यांना वाईट काहीच दिसत नाही.

उदा १९९१ साली भारत आर्थिक गर्तेत गेला होता त्याला बाहेर काढणारे श्री नरसिम्ह राव होते पण देशा ला अशा खड्ड्यात टाकण्याचे श्रेय कुणाचे?

ते कुठेच कोणी लिहीत नाही. अर्थात ते श्री राजीव गांधी यांचे होते

आपल्याला आय.एम.एफ कडे १९८१-८२ मध्ये कर्ज घ्यायला धाव घ्यायला लागली होती आणि १९९१-९२ मध्ये सुध्दा. याचाच अर्थ १९८० च्या दशकातील सरकारांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नव्हती. पण १९९० मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर कबजा केल्यानंतर तेलाचे भाव भडकले म्हणून १९९१ चे संकट आले असे समर्थन करायची संधी मात्र मिळाली. जशी १९७३ मधील योम किप्पूर युध्दामुळे तेलाचे भाव भडकले म्हणून त्यामागे रिचर्ड निक्सन (आणि लिंडन जॉन्सनही) यांनी घातलेला घोळ लपवता आला तसेच काहीसे.

१९७३-७४ मध्ये भारतात सर्वात जास्त म्हणजे ९७.५ % आयकराचा दर होता.

हा आचरटपणाचा कळस असणारा दर असताना भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते?

अर्थात डॉ मनमोहन सिंह.

असा प्रचंड दर ठेवणे हे अचरटपणाचा कळस होता हे नक्कीच. पण त्यावेळेस असा अचरटपणा करायची जगभरातच फॅशन होती असे दिसते. खालील आलेखात अमेरिकेत १९१२-१३ मध्ये पहिल्यांदा आयकर आल्यापासून सर्वाधिक स्लॅबचे आयकराचे दर किती होते हे पाहता येईल.
tax
By IGTaylor - Own work, CC0, Link

अमेरिकेतही १९६४ पर्यंत सर्वाधिक स्लॅब ९०% इतकी होती. ती ७०% पर्यंत खाली आणायचे जॉन केनेडींनी १९६३ मध्येच ठरविले होते. तो निर्णय अंमलात आला केनेडींचा खून झाल्यानंतर लिंडन जॉन्सन अध्यक्ष झाल्यावर. त्यामुळे त्याला केनेडी टॅक्स कट असेच म्हणतात. पुढे १९८१ मध्ये रॉनाल्ड रेगननी तो दर ५०% आणि १९८५ मध्ये ३०% इतका खाली आणला- सप्लाय साईड किंवा व्हूडू इकॉनॉमिक्स म्हणून अमेरिकेतील मध्यमवर्ग संपविला असाही आरोप केला जातो. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे १९६० ते १९८० या काळात अमेरिकेतही असे सर्वाधिक स्लॅबचे दर अवास्तवपणे खूप जास्त होते. त्यामुळे निदान या बाबतीत तरी मनमोहनसिंगांना दोष देणार नाही. कदाचित ती त्या काळची फॅशन होती.

हजारों जवाबो से अच्छी है मेरी खामोशी
न जाने कितने सवालों की आबरू रखी है

अलविदा सर...._/\_

-दिलीप बिरुटे

अगदी बरोबर! लख्ख प्रकाश दिसत असला तरी सर्वत्र काळोखच आहे असे ठासून वारंवार सांगणाऱ्याला पळ काढावाच लागतो.

हजारों जवाबो से अच्छी है मेरी खामोशी
न जाने कितने सवालों की आबरू रखी है

१० महा घोटाळे पाहून डोळ्यावर कातडे ओढून बसलेल्या भारताच्या दिवंगत पंतप्रधानांनी त्यांना घोटाळ्याबद्दल बोलायला भाग पाडल्यावरही हेच उद्गार संसदेत काढले होते.

बिरुटे सर हे लिहितात यात आश्चर्य ते कोणतं .

गुलामीची सवय जात नाही हेच खरं'

अग्रलेख, मार्दवी मार्तंड आणि बडबड बहरातील मौनी

डॉ.मनमोहन सिंगाबद्दलचे दोन्ही अग्रलेख आवडले. आज मटात मृदुभाषी.. कणखर लेखही भारी आहे.

-दिलीप बिरुटे