Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा

म
मेथांबा
Sun, 01/25/2009 - 04:03
🗣 124 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
45396 वाचन

💬 प्रतिसाद (124)
म
मेथांबा Mon, 01/26/2009 - 07:31 नवीन
कॉ. अहिल्या रांगणेकरांचे आणि प्रभाकर संझगिरी यांचे नाव घ्यायला मी विसरलोच होतो. अहिल्याताईंच्या नावाची आठवण करून दिल्याबद्दल प्रदीपरावांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sun, 04/19/2009 - 07:55 नवीन
अहल्याताईन्च्या स्म्रुतीला विनम्र अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेथांबा
म
मेथांबा Mon, 01/26/2009 - 08:39 नवीन
हीन दर्ज्याच्या प्रतिसादाला उत्तर देवुन मी स्वताला खाली नेउ इच्छित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
न
नीलकांत Mon, 01/26/2009 - 08:00 नवीन
समाजवादी आणि कम्युनिष्ट यातील फरक काय हो? मी उडत उडत ऐकले आहे की कम्युनिष्ठांना सुभाषबाबू आतापर्यंत देशभक्त आहेत हे मान्यच नव्हतं. मी असं ऐकलं आहे की भारतावर चीन ने आक्रमण केलं हे सुध्दा यांना मान्यच नव्हतं. धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ हिंदू धर्माला शिव्या देणं अशी काहिशी यांची समजूत आहे. पश्चिम बंगाल बद्दल कम्युनिष्ठांच्या अनेक भयकारी चमत्काराच्या कथा ऐकून आहे मी असंही ऐकलं आहे की कम्युनिझम हा असा विचार आहे की ज्यांना तो मान्य नसेल त्यांना संपवण्याचा एकमेव मार्ग कॉमरेडांना माहीती आहे. शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना? ऍटॉक्रसी किंवा हुकूमशहा बाबत तुमचं काही विशेष तत्वज्ञान आहे का? वरील सगळं कितपत खरं आहे हो? कारण मला काही माहिती नाही. मी एक विनंती करतो की मला माहिती नसलेल्या या विषयावर तुम्ही एखादा लेख लिहावा. म्हणजे माझ्या सारख्या लोकशाहीत परमभाग्य मानणार्‍या लोकांना माहिती पडेल की कम्युनिझम कडे झुकाव असून सुध्दा नेहरुंनी भारतात लोकशाही रूजावी यासाठी प्रयत्न का केले? (अज्ञ) नीलकांत
  • Log in or register to post comments
न
नीधप Mon, 01/26/2009 - 08:19 नवीन
+१ सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडतील. तिही खरी!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
म
मेथांबा Mon, 01/26/2009 - 08:46 नवीन
मी उडत उडत ऐकले आहे की कम्युनिष्ठांना सुभाषबाबू आतापर्यंत देशभक्त आहेत हे मान्यच नव्हतं. ऐकण्यापेक्षा अभ्यास करा आणि मग बोला. http://mumbaimatters.bombayaddict.com/2006/04/phoenix-mills-because-story-must-be.html हे वाचा सुभाषबाबु आणि डांगे यांच्याविषयी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
न
नीलकांत Mon, 01/26/2009 - 09:46 नवीन
अहो साहेब ह्या अश्या अभ्यास करण्यासाठीचे अनेक दूवे मी तुम्हाला देऊ शकतो. मग येथे चर्चा करण्याचे प्रयोजन काय? असो. आमच्या प्रश्नांना उत्तरे नसतील (द्यायची) तर राहू द्या. पण उगाच आमच्या महाराष्ट्राला शिव्या देण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्र हा आज भारतातील सर्वात प्रगत राज्य आहे, विशेषत: गेल्या दिडशे वर्षांच्या समाजप्रबोधनाच्या परंपरेने महाराष्ट्र बराच पुरोगामी झालेला आहे. पुर्णविकास अशी अवस्थाच अस्तीत्वात नसते. तुमच्या दास कॅपीटल मध्ये असं काही असेल तर मला माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काही दोष असतील अशी आम्हाला अपेक्षा आहेच. येत्या काळात जशी प्रगती करू तसेच हे काही प्रश्न दूर होतील आणि काही नव्याने निर्माण होतील. जसा पुर्णविकास अशी अवस्था नसते असं माझं मत आहे तसंच या जगात काहीच ब्लॅक ऍन्ड व्हाईट (कृष्ण-धवल) नसते असंही आहे. त्यामुळे संपुर्ण जग हे दोन भागात वाटून त्याशिवाय जगात कसलंच मत नाही असं सुध्दा मला मान्य होत नाही. लोकशाहीत तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पुर्ण अधीकार आहे. भारतातील आसाम मध्ये विद्यार्थ्यांनी 'आसू' संघटना स्थापन केली आंदोलन केले. त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद भारतीय होता. त्या प्रतिसादात आसूचे म्हणने ऐकून घेण्यात आले. हा प्रकार पुढे कॉग्रेसला भारी पडला. आसामात 'असम गण परिषद' निवडून आली. सत्ता बदल झाला. मात्र कुठेच विद्यार्थ्यांवर रणगाडे घातले नाहीत. आता अश्या अनेक मुद्यांवर मी तुम्हाला अनेक अभ्यासासाठीचे दूवे देऊ शकतो. मात्र त्यात अर्थ नाही. हा न संपणारा वाद आहे. त्या ऐवजी मी एक सल्ला देतो. बघा पटतंय का ! जर शक्य झाल्यास समाजवादी , साम्यवादी, मार्क्स, लेनीन, माऑ, मानवेंद्रनाथ रॉय, साम्यवादी राजवट, त्यांचा चढता आलेख, पुढे ढासळलेली अर्थव्यवस्था, पुर्व आणि पश्चिम जर्मणीचा किस्सा, फिडेल क्रेष्ट्रो आणि चे गव्हेराचे आंदोलन, क्युबा, आताचा व्हेनेझुएला, नव्वदीच्या काळातील रशीया ( त्यावेळी तो युएसएसाआर होता) आताचा रशीया. या सर्वांसोबत भारताचे १९९० पर्यंतचे धोरण, सार्वजनीक क्षेत्रातील सरकारची गुंतवणूक, त्याचा नफा - तोटा , निर्गुंतवणूक आणि त्याला कम्युनिष्ठांचा विरोध, आदी अनेक विषयांवर कम्युनिष्ठांची बाजू मांडणारं लेखन मराठीत नाहीच. या आणि यापेक्षा अधीक तुम्हाला माहिती असलेल्या विषयांवर लेख येऊ द्या. म्हणजे तुमच्या मते आम्हा अभ्यास नसलेल्या लोकांचा काहीतरी अभ्यास होईल. उगाच आमचा एक दोष दाखवून त्यापेक्षा 'त्यांचे' दोष कमी असे भासवायचे आणि लोकांना लाल सलाम ठोकायचे हे काही बरं नाही. संविधानावर आधारीत भारतीय लोकशाही हाच भारताचा प्राण आहे असं आमचं मत आहे. नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेथांबा
द
दशानन Mon, 01/26/2009 - 09:49 नवीन
आता अश्या अनेक मुद्यांवर मी तुम्हाला अनेक अभ्यासासाठीचे दूवे देऊ शकतो. मात्र त्यात अर्थ नाही. हा न संपणारा वाद आहे. त्या ऐवजी मी एक सल्ला देतो. बघा पटतंय का ! जर शक्य झाल्यास समाजवादी , साम्यवादी, मार्क्स, लेनीन, माऑ, मानवेंद्रनाथ रॉय, साम्यवादी राजवट, त्यांचा चढता आलेख, पुढे ढासळलेली अर्थव्यवस्था, पुर्व आणि पश्चिम जर्मणीचा किस्सा, फिडेल क्रेष्ट्रो आणि चे गव्हेराचे आंदोलन, क्युबा, आताचा व्हेनेझुएला, नव्वदीच्या काळातील रशीया ( त्यावेळी तो युएसएसाआर होता) आताचा रशीया. या सर्वांसोबत भारताचे १९९० पर्यंतचे धोरण, सार्वजनीक क्षेत्रातील सरकारची गुंतवणूक, त्याचा नफा - तोटा , निर्गुंतवणूक आणि त्याला कम्युनिष्ठांचा विरोध, आदी अनेक विषयांवर कम्युनिष्ठांची बाजू मांडणारं लेखन मराठीत नाहीच. टाळ्या... टाळ्या ! ह्याला म्हणातात मराठीत उत्तर .. कुठ हायस भाउ ! येऊ द्या लेखन ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
र
रामदास Mon, 01/26/2009 - 10:35 नवीन
समाजवाद काय किंवा साम्यवाद काय त्यांचा राजकीय अर्थ काय, यावर योग्य अशी (पूर्वग्रहदुषीत नसलेली) माहीती वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
म
मेथांबा Mon, 02/02/2009 - 08:40 नवीन
strong>शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना? कारण बहुतेक समुह हत्या या एका माणसाच्या लहरीपणामुळं झालेल्या आहेत. उदा. इदी अमीन, मुगाबे, हिटलर इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
च
चोरीराम कोतवाल Wed, 02/04/2009 - 10:57 नवीन
मी असंही ऐकलं आहे की कम्युनिझम हा असा विचार आहे की ज्यांना तो मान्य नसेल त्यांना संपवण्याचा एकमेव मार्ग कॉमरेडांना माहीती आहे. शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना? ऍटॉक्रसी किंवा हुकूमशहा बाबत तुमचं काही विशेष तत्वज्ञान आहे का? लोकशाहीचा तुम्हाला आलेला कळवळा समजू शकतो पण इथे गेले १ वर्षभर आणीबाणी आहे आणि नुकताच एका सदस्याचा ह्या संकेतस्थळावर अकाली मृत्यु झाला / इथल्या खरोखरच्या कम्युनिष्ठांनी त्याला संपवला हा समुह हत्येचाच एक भाग मानायचा का? त्या विषयी तुम्ही का गुळणी धरलेली आहे? का त्याचेही काही विशेष तत्वज्ञान आहे? का लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
क
कपिल काळे Mon, 01/26/2009 - 09:18 नवीन
मेथांब्या इथे एक विकी नावाचा लालभाइ आहे. बाकी सगळे बूर्झ्वा आहेत. उगाच तुझा वेळ वाया नको घालवूस. महाराष्ट्रात तर नकोच . त्यापेक्षा तिकडे विकसीत बंगालात किंवा केरळात जा. तिथे तुमचे तत्वज्ञान मेथांब्यासारखे मुरलेले आहे. तिथे तुला कसं माहेरी गेल्यासारखं वाटेल. नाहीतर पावासाठी रांग लाव रशियात जाउन. किंवा पगाराच्याएवजी टायर मिळाल्यावर आपल्याला काय वाटले असे प्रश्न रशियन कामगारांना विचार. किंवा चीन मध्ये जाउन ऑलिंपिक्स साठी किती घरं जबरदस्तीने पाडली त्याची आकडेवारी जमव. किंवा जिम्नास्टीक, जलतरण, डाइव्हिंग मध्ये पदके मिळवून देणारया बालिकांची आजची परिस्थिती ह्यावर संशेधन केलंस तरी चालेल. करण्यासारखं खूप आहे बघ तुझ्यासारख्या कम्यूनिस्टांना. माझ्यासारख्या भांडवलदारी विचारसरणीच्या लोकसमूहात वेळ नको रे फुकट घालवू. तुझी गरज आहे कम्यूनिझमच्या पुनरुत्थानास!!
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 01/26/2009 - 09:31 नवीन
सारखा केरळ चा दाखला का देता... त्यांचि लोकसंख्या किति? तो एक लहान सा प्रदेश आहे..त्याच अर्थ बजेट मुंबई महानगर्पालिकेच्या बजेट हुन लहान आहे.....त्याच्या कम्यनिस्ट पार्टीचा व डांग्यांच्या कम्युनिस्ट पारटिचा संबंध नाहि.. केरळ मधे उद्योग धंदे नाहित..सारे लोक दुबई ,महाराष्ट्रात कामाला आहेत...समाज जिवन ठिक नाहित..सक्तिने धर्मांतर होत आहे....
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 01/26/2009 - 09:34 नवीन
मी पण हेच बोंबललो वरती पण ते उत्तर द्यायचे सोडून... दाखले देत बसले आहेत... इकडून तिकडून कॉपी पेस्ट केलेले ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
म
मेथांबा Mon, 02/02/2009 - 08:48 नवीन
सारखा केरळ चा दाखला का देता... पण केरळचा दाखला द्यावयाची वेळ माझ्यावर कोणी आणली? महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाविषयी मी बोलत असताना रशिया, चीन, क्युबा, बंगाल यांचा विषय कोणी आणला? ज्यांना डांगे व इतर परम आदरणीय कम्युनिस्ट व समाजवादी नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचि संधी मिळत नाहीये तेच जाणुनबुजुन विषयाला फाटे फोडत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
प
प्रदीप Wed, 02/04/2009 - 18:10 नवीन
महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाविषयी मी बोलत असताना रशिया, चीन, क्युबा, बंगाल यांचा विषय कोणी आणला? ज्यांना डांगे व इतर परम आदरणीय कम्युनिस्ट व समाजवादी नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचि संधी मिळत नाहीये तेच जाणुनबुजुन विषयाला फाटे फोडत आहेत.
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या आपल्या पक्षाबद्दल आपण नुसते महाराष्ट्रापुरते बोलू शकणार नाही. आजमितीस फक्त म. न. से. बद्दल तसे करता यावे? तसेच आंतराष्ट्रीय घटनांची बरीवाईट दखल आपले पक्षही जाहीरपणे घेत असतातच, त्यात वाईट काही नाही. चीनचा संदर्भ मी आणला, त्याला प्रमुख कारण हे की आपल्या पक्षाचे चीन हे रोल मॉडेल असावे असे मला वाटते (कुणाच्यातरी खरडीत आपणच माओंचे वाक्य उर्धृत केले आहेतच).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेथांबा
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/26/2009 - 09:40 नवीन
हलीच एका गांधीवाद्याने शेवपुरी ह्या स्थळाला थोर मराठी संकेतस्थळांच्या थोर परंपरेत स्थान दिले, नव्हे, मिसळपावासारख्या थोर स्थळाच्या मालिकेत बसवले, त्यामुळे आम्हाला गांधीवादाबद्दल घृणा निर्माण झाली. आणि आम्ही गांधींचे परम शत्रू शहीद भगत सिंगांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा असे लक्षात आले, की श. भ. सिं. हे कम्युनिष्ट होते. त्यामुळे आम्ही चिन्यांशी सहमत आहोत (पुढच्या महिन्यात शांघायला जाणार आहो)), आणि कम्युनिष्ट विचारसरणीच भारताला वाचवणार आहे, हे नक्की. -- सर्किट
  • Log in or register to post comments
म
मेथांबा Mon, 02/02/2009 - 08:55 नवीन
आणि कम्युनिष्ट विचारसरणीच भारताला वाचवणार आहे, हे नक्की. अभ्यासपुर्ण शब्दांना आणि सुसंगत विचारसरणीला भाई मेथांबा यांचा लाल सलाम. शेवपुरी मलाही आवडते. तो गरीबांचा पिझ्झा आहे. मात्र त्याचं संकेतस्थळ आहे माहीत नव्हतं. लिंक द्याल का? तिथे शेवपुरीचे फोटो असतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 01/26/2009 - 09:46 नवीन
रामदास स्वामी हे औरंगजेब चे गुप्त हेर होते हे लाल भाईंचे आवडते मत आहे..
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/26/2009 - 09:50 नवीन
कारण लालभाई हे "ब्रा. विरोधी" आहेत. त्यमुळेच ते आमचे आवडते आहेत. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
म
मेथांबा Mon, 02/02/2009 - 08:59 नवीन
रामदास स्वामी हे औरंगजेब चे गुप्त हेर होते हे लाल भाईंचे आवडते मत आहे.. प्रसिध्ध इतिहासकार अविनाश कुलकर्णी यांनी शोधुन काढले का? का या मनगढंत बाता आहेत? माझ्या लेखाचा आणि या विधानाचा संबंध समजावुन सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
द
दशानन Mon, 01/26/2009 - 09:55 नवीन
काय बी बना ! ह्यांना पण सलाम केला पाहीजे राव ! सारखं सारखं तोंडावर पडतात पण पुन्हा तोंड वर करुन येता ही मंडळी ! सलाम तुमच्या कार्याला ! सलाम ! सलाम ! सलाम ! --->> एक फुटकळ टिव्ही चॅनल कडून ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 01/26/2009 - 10:10 नवीन
>>सलाम तुमच्या कार्याला ! सलाम ! सलाम ! सलाम ! साधा सलाम की लाल सलाम ??/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 01/26/2009 - 10:05 नवीन
बंदुकिच्या गोळितुन सत्तेचा उगम असे विध्वंसक तत्वज्ञान असलेला चिन पुरस्क्रुत माऒ चा लाल विषाणु आता भारतात वेगाने पसरत आहे.नेपाळवर कबजा करुन राजेशाहि संपवुन एकमेव हिंदु राष्ट्र संपवुन हा विषाणु भारतात पसरत चालला आहे..
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 01/26/2009 - 10:10 नवीन
अहो राहू दे राहू दे ! तुम्ही आता हिंदु खतरे में ... असा जल्लोश नका करु ... राहु दे ! रिल्याक्स ! व्यक्तीगत नका होऊ ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
स
सखाराम_गटणे™ Mon, 01/26/2009 - 10:13 नवीन
>>तुम्ही आता हिंदु खतरे में ... असा जल्लोश नका करु ... राहु दे ! तुम्हाला आक्रोश म्हणायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Mon, 01/26/2009 - 10:14 नवीन
नाय ! जल्लोशच म्हणायचं होतं ! मुद्दा सापडाला की लोकं जल्लोशच करतात ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
क
कालिन्दि मुधोळ्कर Mon, 01/26/2009 - 17:30 नवीन
लाल सलाम, कम्युनिस्ट पक्ष इतरांपेक्षा चांगले आहेत यात वाद नाही. महाराष्ट्रात संघवाले आणि शिवसेनेचि गुंडगीरी यात लोकांच्या विचारशक्ती अडकली आहे. हा आपलाच करंटेपणा आहे. हे लोक आत्ताच्या अमेरिकेबद्दल बोलणार नाहित--तो गोता काय कामगारांनी केला?; केरळ बाबत चिडीचूप. क्यूबा? वेनेझुएला?
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 01/26/2009 - 18:42 नवीन
जरा स्पष्ट बोला की राव, वाईच पुढे बोलता येईल. :) नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 01/26/2009 - 20:27 नवीन
खरे आहे . या पेक्षा ही विचारशक्ती कमुनिष्ठांशी निष्ठा दाखवण्यात खर्ची घालावी .. लाल सलाम ठोकावे. अमेरिकेच्या प्रश्नावर कमुनिष्ठपणा हाच कसा उपाय आहे हे सांगावे. महाराष्ट्राने इतके दिवस कमुनिष्ठ न होऊन स्वतःचे किती नुकसान केले यावर व्याख्याने द्यावीत. म्हणजे पानात टाकायला लागल्यावर आमचे नाना म्हणायचे 'मेल्या! पानात टाकून रे अन्न वाया घालवतोस. त्या पेक्षा खाऊन वाया घालव' पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
र
रामोजी Mon, 01/26/2009 - 21:03 नवीन
केरळ चे काय सांगता, तिकडे हमालांची लाल युनिअन आहे. माझ्या कडे एकच पेटी होती. मला हमालाची गरज नव्हति. तरीही हमाल माझा बरोबर चालत होते. ट्याक्सी जवळ गेल्यावर जबर्दस्तीने पैसे मागू लागले. शेवटी आरडा ओरडा करून मी त्यांना हाकलले. केरळ मधे जाउन पहा उद्योग धंधे किती डब घाई ला आले आहेत. शिवसेने ची गुंडगिरी दिसते, बंगाल मधली जाळपोळ, सक्तीचे बंद हे काय राष्ट्र्कार्य आहे. कम्युनिझम ही अफू ची गोळी आहे हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
प
प्रदीप Tue, 01/27/2009 - 05:59 नवीन
कालिंदीबाई, आताच्या अमेरिकेबद्दल मेथांबा ह्यांनी वर काही विख्यात लोकांची वचने दिली आहेत. 'पावासाठीही रांगा लावाव्या लागतील' असे ते म्हणतात. ह्यावर मी त्यांना चीनसंबंधी दोन प्रश्नांवर टिप्पणी करण्यास विनंति केली होती. (ह्यापैकी एक मुद्दा अमेरिकेच्या पडझडीचा चीनवरील परिणाम ह्याच्याशी संबंधित आहे). त्यावर त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आजकालच्या जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे एकच काहीही वेगळे काढून त्याविषयी बोलता येणे अशक्य आहे. एका बलाढ्य देशाचे (भांडवलशाही) 'कोसळणे' (मेथांबांना अभिप्रेत आहे, मला तसे होईल असे व्यक्तिशः वाटत नाही) तर त्याचा परिणाम, भारतीय कम्युनिस्टांना आदर्शस्थानी असलेल्या चीनवर होणारच-- नव्हे तसा तो होतही आहे. त्याचे काय, असा माझा प्रश्न आहे. केरळाची नक्की किती प्रगति आहे, ह्याविषयी मी त्या सरकारच्या संस्थलावर गेलो, तेथे माहिती धड मि़ळेच ना (ह्याविषयी इथे पहा). नुसतेच केरळ खूप प्रगत आहे, असे म्हणण्यापेक्षा आकडेवारी द्यावी, ही काही फार अपेक्षा नाही? वेनेन्झुएलाचे काय? तेल आहे, आरडाओरडा करताहेत. ह्यापलिकडे त्याविषयी काय बोलणार? भारतीय कम्युनिस्टांची चीनविषयीही मते जाणून घेणे आवडेल. मुखत्वे ते चीनी नेतृत्व मानतात. तेव्हा राज्यशकट चालवण्याची जी कार्यपद्धति तेथील राज्यकर्ते अवलंबतात, ती भारतिय कम्युनिस्टांना कितपत मान्य आहे ह्याविषयी जरूर चर्चा व्हावी. येथे भारतिय कम्युनिस्टांचे स्वातंत्रयुद्धातील 'योगदान', त्यांच्या विचीध सामाजिक व राजकिय विषयावरील भूमिका, त्यांची बलस्थाने, त्यांच्या चुका (त्यांना मान्य असलेल्या व नसलेल्या) ह्या सर्वांवर आनंदाने चर्चा करूया. अर्थातच ह्या विषयावर लोकांच्या भावना तीव्र असल्याने मधे मधे नुसतीच आगपाखड होईल, तिच्ज्याकडे दुर्लक्ष करायचे. तर आता, मेथांबा अथवा इतर कुणीही माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मी वाट बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
भ
भास्कर केन्डे Mon, 01/26/2009 - 22:35 नवीन
काय पण गंमत आहे बॉ इथे! चर्चेला एक विषय ठेवायचा, प्रतिसाद आले की त्यांना धुडकावून लावायचे. आरोप करु नको, महाराष्ट्राबद्दलच बोल असे सुनवायचे. स्वतः मात्र सतत केरळाचे उदाहरण द्यायचे. अशा चिमुकल्या राज्याचे जिथे परदेशातून येणारी मदत थांबली तर अर्ध्या घरांत चुली पेटणार नाहीत, जिथे छोट्या-छोट्या गावांतल्या चर्चेसला परदेशी इव्हँजिलिकल संस्थांकडून दरचर्षी करोडोंची रसद मिळते (ती कशी वापरली जाते तो एक वेगळा विषय होऊ शकतो), जिथे कम्युनिस्ट राज्यकर्त्यांच्या गुंडांची संघटीत गुन्हेगारी थक्क करणारी आहे, जिथे विरोधकांचे भर दिवसा गळे चिरले जातात व पोलिसात केसही दाखल करुन घ्यायची मारामार आहे व जिथे स्वतःचे (परदेशातून व पर्यटनातून येणारे वगळून) उत्पन्न आमच्या बीड जिल्ह्यायेवढे सुद्धा आहे का नाही याची खात्री नाही....!!! जियो कॉम्रेड बंधू जियो!! बरं तुम्ही आदर्श पूर्वाश्रमीचा रशिया-चीनमधून घेता मात्र तुलना त्यांच्या सोबत नको. मी शिवसैनिक नाही. पण शिवसैनिक वेळोवेळी जिवाची ढाल करुन जनतेची मदत करतात हे मी जवळून पाहिले आहे. मग ते पूर असोत वा दहशतवादी हल्ले. अशी आजच्या काळातली तुम्ही (कॉम्रेडांनी) जीवावर उदार होऊन जनतेसाठी काही केल्याची उदाहरणे तुम्ही देऊ शकाल काय? उलट नक्षलवाद म्हणजे कॉम्रेड अशी एक साखळीच आज तयार झालेली आहे. कॉ. डांगेंसारखे धुतल्या तांदळासातखे स्वच्छ नेते कधी काळी भारतीय डाव्या विचारसारणीत होते. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण तो आता इतिहास आहे. ते नेते अशा वेळी उदयास आले जेव्हा भांडवलशाही-कम्यूनिझम यांच्यात कोण चूक कोण बरोबर या कसोटीचा निकाल लागला नव्हता. त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला पटले त्या विचारसारणीला वाहून देऊन त्यांनी समाजसेवा केली. पण त्या कसोटीचा निकाल लागल्यावर, रशियातून कम्यूनिस्टांचा निप्पात झाल्यावर व चीनने कम्यूनिस्टांच्या मूळ विचारसारणीला छेद दिल्यावरही जर तुम्ही स्वतःचीच लाल म्हणत असाल तर एका शिवसैनिकाने तुम्हाला वर दिला तसा प्रतिसाद न अल्यास आश्चर्य वाटेल. बरे तुम्ही स्वतःची लाल म्हणत असाल तर आम्हाला त्याचे सोयर सुतक नाही. पण म्हणून ज्यांच्या समाजकार्याच्या पासंगालाही तुमच्या संस्था पुरत नाहीत त्यांच्या नावाने बोटे मोडून तुम्ही स्वतःचे हसे का करुन घेता? महापूर, भुकंप, वादळे, सुनामी, वा आणखी काहीही आपत्ती असो संघावाले जीवाची पर्वा न करता व कसलाही बोलबाला न करता तात्काळ सेवाकार्यात लागलेले असतात. मी त्या त्या ठिकाणी कधीही लालभाईंना पाहिल्याचे स्मरत नाही. चक्रीवादळा नंतर रेल्वेस्थानकावर येऊन पडलेली मदत इच्छित स्थळी पोचवण्यासाठी ममता बॅनर्जी सारख्या संघद्वेष्ट्या मुख्यमंत्र्याला सरकारी यंत्रणा कमी पडू लागली तेव्हा तुमच्या कॉम्रेडांच्या गडात मदत घ्यायची वेळ आल्यावर आठवण झाली ती संघावाल्यांचीच. तेच पुढे त्सुनामी नंतर झाले... प्रचंड हाणी पोचलेल्या दुर्गम खेड्यांत जिथे न्यूज चॅनलवाले जाऊ शकले नाहीत तिथे परदेशी मिशनरी वा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते फिरकतही नव्हते... तिथे पोचून पिडितांचे आश्रू पुसले कोणी? संघावाल्यांनीच. असो. तूर्तास येवढेच... पण मुद्दा हा की आपण एक-दोन इतिहासजमा स्वच्छ कॉम्रेडांचे नावे घेऊन लाल सलाम ठोकल्याने काही होणार नाही. त्यासाठी त्यागी वृत्ती बाळगून व वर्तमानाचे भान ठेऊन समाजकार्याला वाहून घ्यावे लागते. केरळाच्या बाहेर डोके काढून स्वतःला सिद्धा करून दाखवा अन मग बोला. आपला, (लोकशाहीवर अगाध श्रद्धा असलेला भारतीय) भास्कर
  • Log in or register to post comments
म
मेथांबा Tue, 02/03/2009 - 20:00 नवीन
शिवसैनिक वेळोवेळी जिवाची ढाल करुन जनतेची मदत करतात हे मी जवळून पाहिले आहे. मग ते पूर असोत वा दहशतवादी हल्ले. अशी आजच्या काळातली तुम्ही (कॉम्रेडांनी) जीवावर उदार होऊन जनतेसाठी काही केल्याची उदाहरणे तुम्ही देऊ शकाल काय? अफाट हिंसाचार करायचा आणि त्यावर पांघरुण घालण्यासाठी २-३ लोकोपयोगी कामे करुन दाखवायची. श्रीकृष्ण आयोगाने ठेवलेला ठपका इतक्यात विसरलात का राव? का मतलबी विसराळुपणा आहे तुमच्याकडे. शिवसेनेच्या नेत्यानी लोकांना करोडो रुपयांचा चुना लावला. आमच्या एका तरी नेत्याबद्दल कोणीतरी भ्रष्टाचाराचा आरोप करु शकतो का? आणि हे जे जिवावर उदार झालेत ते सेनेचे नेते नव्हेत तर सर्वसामान्य कार्यकरते. कुठे होते तेव्हा उध्दव ठाकरे? बिळातुन बाहेर आलेले त्याना तर कोणी पाहिले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
व
विकास Mon, 01/26/2009 - 19:58 नवीन
माझी कम्युनिझम बद्दलची "आत्मियता" ;) येथील इतर प्रतिसाद वाचल्यास समजेल म्हणून आकाशवाणी परत करण्याचे टाळले आणि टाळत आहे. तरी देखील, "महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा " मधे आपण म्हणत असलेल्या सर्वांबद्दल मला खर्‍या अर्थी आदर आहे आणि राहील. अर्थात त्यातील, "कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. गंगाधर बुरांडे " बद्द्ल काही माहीती नाही. रणदिव्यांचे केवळ नाव ऐकले आहे. अधिक माहीती आवडेल. वेगळा लेख अवश्य लिहा. ना.ग. गोरे आणि जॉर्ज फर्नांडीसना विसरलात अथवा आवडत नसले तरी त्यांचे योगदान कमी करू नये असे वाटते. कोकण रेल्वे तयार करण्यासाठी स्वतंत्र कोकण रेल्वे कमिशन काढून जॉर्जसाहेबांनी ते काम पुढे करायला मोठी मदत केल्याचे आठवते. तेच मधु दंडवत्यांबद्दल (जरी त्यांनी "मुस्लीम मेल्यानंतरही मातीत जात असल्याने, देशाच्या मातीशी जास्त इमान राखतात" असले बाष्कळ विधान केले असले तरी...). यातील बर्‍याच नेतृत्वाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी लढा दिल्याचे विसरणे म्हणजे कृतघ्नताच ठरेल. (अर्थात त्यात इत्यरही होते हे विसरता येत नाही. मात्र त्या काळात जगातल्या कामगारांना एकत्र करण्याच्या भानगडीत न पडता, मराठी माणसासाठी सर्वप्रकारच्या मराठी माणसांबरोबर एक होण्याची सक्रीय इच्छाशक्ती त्यांनी दाखवली) मात्र या लेखासंदर्भात एक प्रश्न पडतो, की जर इतके सगळे आदर्श वगैरे नेते होते तर मार कुठं खाल्ला? त्यांना सत्ता का स्थापता आली नाही? लोक त्यांच्या पाठीमागे का राहीले नाहीत? माझ्या लेखी समाजवादी नेत्यांनी काँग्रेसला रामराम करून जेंव्हा प्रजासमाजवादी पक्ष काढला तेंव्हाच त्यांनी स्वत:ला कमकुवत केले आणि काँग्रेसमधील अनिष्ठ नेत्यांना सत्तेत ठेवायला अप्रत्यक्ष मदत केली. (अर्थात त्यांचा तसा उद्देश नव्हता हे नक्की!) कम्यनिस्टांबद्द्ल काय बोलायचे? शब्द अपुरे पडतात... फक्त इतकेच म्हणेन त्या तत्वज्ञानाचा काही उपयोग नाही. जेंव्हा चीन युद्धात देशापेक्षा परदेशी तत्व मोठे समजत देशाच्या शत्रूला जास्तव जवळचे मानले तेंव्हाच त्याच्या मर्यादा समजल्या.... असो,
  • Log in or register to post comments
क
केदार Mon, 01/26/2009 - 20:36 नवीन
लाल लोक ही सध्याच्या इस्लामी टेररिस्ट पेक्षा जास्त टेरर आहेत. त्यांनी किती लोकांना मारले हे इथे पाहा. http://www.satp.org/satporgtp/countries/india/database/fatalitiesnaxal.htm निष्कंलंक वैगरे कमी लोक होती. जी सर्वच पक्षात असतात त्यामुळे वरिल उदा चूकीची वाटतात. अहिंसे सारखच हे तत्वज्ञान ही फसवे आहे. असे नसते तर रशिया लोकशाहीकडे वळले नसते. १९६२ च्या चिनी युध्दात हे लोक सैन्य पाठवल्यावर गळा काढून रडत होते. ह्या लोकांचे मालक दुसर्‍या देशात आहेत. शिवसैनीक निदान मान्य करतात ही रिमोट कंट्रोल बाळासाहेंबाकडे आहे म्हणून पण हे लोक म्हणजे. छ्या. देशद्रोह्यासारखे वागले त्या काळात. आंदोलन काय अन मोर्चे काय. अरेरे. कदाचित म्हणूनच आम जनता ह्यांचा सोबत नसते. लाल सेनेला लाल नाव का पडले ह्याचा शोध घेता मी अश्या निष्कर्षाप्रत आलो आहे की ह्या लोकांना रक्ताचा अभिषेक फार आवडतो. रक्ताचा रंग आल म्हणून हे लाल. वर आकडेवारी पाहा.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Mon, 01/26/2009 - 21:18 नवीन
भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ!
  • Log in or register to post comments
क
केदार Mon, 01/26/2009 - 21:22 नवीन
कारण त्यांच्या कम्युनिझम मध्ये लोकांच्या हत्या समाविष्ट नाहीत. ते आधी देशप्रेमी व नंतर कम्युनिस्ट होते. तूम्ही आपल्या देशातील सद्य कम्युनिस्टांचा इतिहास समजुन घ्या मग तूम्हाला हा प्रश्नच पडनार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
कोलबेर Mon, 01/26/2009 - 21:30 नवीन
मग विरोध त्यांच्या हत्यांना असायला पाहिजे ना...कम्युनिझमला नाही..इथे वेगळेच दिसत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार
क
केदार Mon, 01/26/2009 - 21:51 नवीन
नाही विरोध बदलेल्या कम्युनिझमला आहे. मूळ कार्ल मार्क्स तुम्ही वाचा त्यात हत्येवर भर नाही. दास कॅपीटलने मी ही भारावून गेलो पण ती आयडीयल स्तिथी येत नाही असे नसते तर खुद्द रशियात लेनीन चा पुतळा पडला नसता वा आज रशिया लोकशाहीकडे वळले नसते. त्याचा हवा तसा अर्थ ह्या लोकांनी लावून घेतला आहे व ही लोक हूकूमशहा झाले आहेत ही वस्तुस्तिथी आहे. कम्युनिस्ट असनारे इतर देश बघा, सगळीकडे हुकमशाही आहे. भारतीय कम्युनिस्ट ( ह्यालाही एक पार्टी नाही, मार्क्स, लेनीन ब्ल्बा ब्ला अश्या स्वतःच्या इगोत ह्या लोकांनी कम्युनिझमच्या पण पार्ट्या काढल्या आहेत) वा चिनी कम्युनिझम वा इव्हन रशिया ह्यांचा बेस हा सशस्त्र क्रांतीवरच आहे. . ते होणारच दुसरा पर्याय नाही. मग लोकशाही योग्य की हुकूमशाही हा वाद परत सुरु करायला हरकत नाही. कम्युनिझम व्यवस्था ही लोकशाही व्यवस्थे विरुध्द आहे. केरळ वा बंगाल इथला कम्यूनिझम खरा नाही कारण तो भारतीय संविधानाशी सहमत (म्हणजे लोकशाही पध्दतीने निवडनुका घेणारा ) आहे. त्या कम्युनिझमच्या नावाखाली दक्षिन महाराष्ट्रात वाट्टेल ते अत्याचार होताना मी स्वतः पाहीलेत. (किनवट तालुका, नांदेड जिल्हा) ह्या तालूक्या शेजारीच अदिलाबाद हा आंध्राचा तालूकाही आहे. तेथे नक्षलवादी गरिब जनतेवर किती अत्याचार करतात हे देखील पाहीले आहे. झार ह्या मनोवृत्तीला नाहीसे करन्यासाठी कम्युनिझम़ (कदाचीत) योग्य होता वा एक पर्याय होता, पण नंतर कम्युनिस्टच झार होतात कारण माणासाचा मूळ स्वभाव हा पॉवर वेडा असने हा आहे. मग ही पॉवर एकदा का क्रांतीमुळे आली की मग संपले. ती लोक इतरांवर अत्याचार करणार. हा मूळ गाभा म्हणून माझा विरोध. अहो फार लांब कशाला जाता, इथे मिपा वर मी काही दिवस येतोय, त्यात तात्याने बरेचदा आणिबाणी लावून काही लेख काढून टाकले तर इथली लोक दुसरीकडे जाऊन मिपावर लोकशाही नाही असा गोंधळ घालताना वाचला आहे. मग मला सांगा साध्या लेखनावर बंदी घातली तर आपण लोकशाही नाही म्हणतो ( ते ही जालावरील एका छोट्या समुदाय असनार्‍या साइटीवर) मग आपल्या देशावर हुकमशाही कम्यूनिस्टांनी केलेले राज्य आवडेल का? म्हणून विरोध. (तात्या हलेक घ्या, उदा म्हणून वापर केला इतकेच, आनी ते चपखल बसत होते म्हणून.) असा एकतरी देश दाखवा जिथे कम्युनिझम मस्त नांदतोय. एकही नाही. चिन देखील आता प्युर कम्युनिस्ट राहीला नाही तर तो मिक्सड आहे. त्या चौकात जाहीर हत्याकांड करनारा चिन (प्युअर कम्युनिस्ट) आणी आज अमेरिकेच्या अध्यक्षांना त्यांचा कडे बोलावनारा चिन हे वेगळे आहेत. (लोकशाही जपनारा व वाढविनारा) केदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
कोलबेर Mon, 01/26/2009 - 22:45 नवीन
तुमची लोकशाहीची कळकळ समजते. पण नुकतेच सुभाषबाबूंवर लिहिलेल्या लेखात हा उल्लेख बघितला आणि इथे मोठमोठे प्रतिसाद देणार्‍यांनी तिकडे का बरे काहीच मत नोंदवले नाही ह्याचे आश्चर्य वाटले इतकेच.
त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार
व
विकास Mon, 01/26/2009 - 22:46 नवीन
भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ! भगतसिंग आणि सुभाषबाबूच कशाला वरचा माझा प्रतिसाद पाहीला तर त्यातील सर्वांचा आदर करायला कमीपणा वाटला नाही... तरी देखील याचा अर्थ म्हणून कम्युनिझम बरोबर आहे असे म्हणणे, म्हणजे जरा अतीच झाले. वर केदारने दिलेला दुवा पहा आणि नक्षलवाद्यांचे स्मारक बांधण्यात सार्थकता मानणारे अधुनिक कम्युनिस्ट पहा (जे अमेरिकेत राहतात/राहायचे!). उद्या गांधींना मानायचे याचा अर्थ मुळासकट गांधीवाद मानायचा असा अर्थ घेतला तर काय होईल? - भारताला सैन्यपण ठेवता येणार नाही आणि तुम्हाआम्हाला कोळंबीपण (मांसाहार) खाता येणार नाही :-) चालणार आहे का? मग असे म्हणायचे का, गांधींच्यापुढे नतमस्तक होतात आणि मग चिकनवर तुटून पडतात? असे कसे बॉ? ;) आणि कोणी सांगावे? जर भगतसिंग / सुभाषबाबू हयात असते आणि कम्युनिस्टांचा आचरटपणा करू लागले असते तर त्यांनापण विरोधच झाला असता. पण त्यांची महती बघता, ते कम्युनिस्टम्हणून नंतर राहून स्वत:चे आणि देशाचे इमान चीन आणि रशियाला विकायला गेले असते असे वाटत नाही...अर्थात या जर-तरच्या गोष्टी झाल्या.... दुर्गापूजा करणार्‍या कलकत्ताच्या कम्युनिस्टांना विचारून बघा, भगतसिंगसारखे नास्तिकतेसंदर्भात अतिशय स्पष्ट विचार स्वतःचे मरण दोन दिवसांवर ठेपलेले असताना तरी ते करू शकतील का ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सखाराम_गटणे™ Tue, 01/27/2009 - 04:52 नवीन
भगतसिंग आणि सुभाषबाबूंसमोर एकमुखाने नतमस्तक होणारे मिपाकर, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांचा विषय निघाल्यावर असे होलसेल मध्ये का तुटून पडतात कळत नाही बॉ! राजे,, एकमुखाने तुटून पडतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
र
रामोजी Mon, 01/26/2009 - 22:01 नवीन
कम्युनिझम आणि मुस्काट्दाबी (न जमल्यास हत्या ) एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महाराष्ट्रात कम्युनिझम असता तर ईथे मुक्त चर्चा होउ शकली असती काय? क्युबा, च्यायना मधील आंतर जाला वर ची बंधने पहा ना...
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Tue, 01/27/2009 - 03:00 नवीन
यांचे नाव यादीतून निसटले आहे. फार मोठा (जायंट या अर्थाने) माणूस! कम्युनिस्ट विचारसरणी चांगली किंवा वाईट यावर स्वतंत्र वाद करता येइल. ( मेथांबास्टाईल ;) किंवा नीलकांतस्टाईल :) ) पण यांतील काही (सर्वांविषयी माहिती नाही म्हणून) मंडळी दिग्गज होती आणि चारित्र्य सांभाळून होती हे खरेच. आपल्या पिढीला तितकीशी माहिती नाही पण स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात तसेच आणीबाणीच्या काळापर्यंत महाराष्ट्रातील ह्या मंडळींचा थोडाफार चांगला प्रभाव असलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
न
नीधप Tue, 01/27/2009 - 05:28 नवीन
या सगळ्याच लोकांच्या कर्तुत्वाबद्दल नव्याने ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल. पण हे चांगले होते म्हणून समाजवाद ग्रेट असं तुणतुणं वाजवणं हा मूर्खपणा.. (एकलव्य वाजवतोय असं म्हणायचं नाही. इथे इतर आहेत वाजवणारे त्यांच्याबद्दल आहे हे.) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
ए
एकलव्य Wed, 01/28/2009 - 11:28 नवीन
वाजविणारा मेथांबा असला की समाजवादाची कशी वाट लागते ते ही चर्चा पाहिली की कळेलच! चीअर्स!! I think the best way to discredit your opponent is to find out the craziest person on your enemy's side of the spectrum and give him credence. That crazy person and his theories will bury your opponent much more easily. - एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप Tue, 01/27/2009 - 05:28 नवीन
या सगळ्याच लोकांच्या कर्तुत्वाबद्दल नव्याने ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल. पण हे चांगले होते म्हणून समाजवाद ग्रेट असं तुणतुणं वाजवणं हा मूर्खपणा.. (एकलव्य वाजवतोय असं म्हणायचं नाही. इथे इतर आहेत वाजवणारे त्यांच्याबद्दल आहे हे.) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
म
मेथांबा Mon, 02/02/2009 - 09:09 नवीन
स्मरण करुन दिल्याबदद्ल धन्यवाद. खरोखरच हि यादी इतकी मोठि आहे की ५-१० नावे राहुन गेली असतीलच. http://www.vandemataram.com/biographies/patriots/patwardhan.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
न
नितिन थत्ते Tue, 01/27/2009 - 03:46 नवीन
गेल्या १५-२० वर्षांत रशिया कम्युनिझम कडून लोकशाहीकडे (भांडवलशाहीकडे) वळला आहे. त्या काळात रशियाची प्रगती झाली आहे की अधोगती झाली आहे? याबाबत मिपाकरांपैकी कोणाकडे काही माहिती असेल तर ती सांगावी. किंवा दुवे द्यावेत. प्रगती म्हणजे जीवनमान, दारिद्र्यरेषा व त्याखालील जनतेची संख्या, जीडीपी, महागाई दर, धान्योत्पादन, औद्योगिक उत्पादन, आरोग्य सेवा वगैरे. कम्युनिझम संपतानाची खरी परिस्थिती काय होती हे पोलादी पडद्यामागे लपलेले होते हे गृहीत धरून त्यानंतर ३ वर्षे ते आतापर्यंत अशी प्रगती मोजायला हरकत नाही. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा