महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट राजकारणाची थोर परंपरा
💬 प्रतिसाद
(124)
क
केदार
Tue, 01/27/2009 - 05:08
नवीन
साठी ही लिंक बघा. https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/rs.html#Econ
त्यातले इकॉनॉमी सेक्शन बघा.
गेले ५ वर्षे ब्रिक बी आर आय सी ही टर्म तूम्ही ऐकली असेल. त्यातला आर म्हणजे रशिया.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 01/27/2009 - 05:25
नवीन
तुलनात्मक माहिती गेल्या १०- १२ वर्षांतील मिळाली तर हवी आहे.
खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 05:31
नवीन
हा हा !
हे तुमचं बरं हाय.. त्यामायला आम्ही काय विचारलं तर तुम्ही उत्तर देत नाही.... कोणी उत्तर दिलेले तर तुम्ही संतुष्ट होत नाही... !
अजब तुझे सरकार !
* प्लिज हे खराटा... नाव बदला हो... तुम्ही वयाने मोठे दिसता उगाच तुमचा अपमान केल्या सारखं वाटतं तुमचं नाव घेतल्यावर ;)
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 01/27/2009 - 05:53
नवीन
जे उत्तर दिले होते त्यात फक्त २००८ चीच माहिती होती. म्हणून पुन्हा विचारले.
खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)
- Log in or register to post comments
क
केदार
Tue, 01/27/2009 - 06:10
नवीन
रशीया हा कम्युनिस्ट देश होता, तिथे पारदर्शकता न्हवती. गेल्या काही वर्षात स्तिथी बदलली तरी तूम्ही जे कम्पॅरिझन मागत आहात ते नेटवर उपलब्ध नाही बहुदा. तरिही शोधकार्य चालू आहे. त्या लिंक मध्ये असे लिहीले आहे की गेल्या १० वर्षाच्या ग्रोथ रेट ७ टक्के आहे. एक इकॉनॉमी अभ्यासक म्हणून सांगतो हा रेट खरच खूप जास्त आहे, ते ही सलग १० वर्षे.
लक्षात आलेली गोष्ट -त्यांचा डेटाही ते जनतेला सांगत नाहीत ते कसले कम्युनिस्ट? पेक्षा आपली जातीत- आरक्षणात व सर्व गोष्टीत होरपळलेली लोकशाही बरी, निदान नेटावर आकडे तरी लगेच मिळतात. आकडे लिहील्यावर कोणाचा खुन होत नाही.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 01/27/2009 - 06:07
नवीन
मेथांब्याने चर्चा सुरू केली होती समाजवादी व कम्युनिस्ट नेत्यांचे चारित्र्य आणि त्यांनी केलेले राजकारण. आपण काथ्या कुटतोय कम्युनिझम चांगला की वाईट याचा.
खराटा
(येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 06:10
नवीन
कम्युनिस्टपणा कळाल्या शिवाय त्याच्या नेताचे चारित्र्य व त्यांनी केलेले राजकारण ह्यावर चर्चा होऊ शकत नाही असा माझा समज आहे... व तो समज बरोबर होता हे तुम्हाला दोन पानं भरुन आलेल्या प्रतिसादातून दिसलेच असेल..
अरे कोणी आहे का.... ह्याचा भाग दोन चालू करा राव.. टाका कोणी तरी क्रमशः
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Tue, 01/27/2009 - 06:21
नवीन
ही सर्व माणसे शुद्ध राजकिय व सामजिक चारित्र्याची होती, हे अगदी खरे. त्याबद्दल कुणालाही प्रतिवाद करता येण्यासारखा नाही. पण असेच रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांविषयीही म्हणता येईल. तेथेही अशीच निस्पृह सेवाभाव असणारी माणसे. हेच काही गांधीवाद्यांबद्दलही म्हणता येईल.
स्वच्छ चारित्र्य हे जरी लाख मोलाचे असले, तरी ही माणसे ज्या पक्षांसाठी कार्यरत आहेत, त्यांची सामाजिक व राजकिय ध्येयधोरणे काय आहेत, हेही तितकेच महत्वाचे आहे.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 01/27/2009 - 06:53
नवीन
माणूस स्वच्छ चारित्र्याचा असला म्हणून त्याची धोरणे मान्य करावीत असे नाही. लोकशाहीत धोरण महत्त्वाचे म्हणून पक्ष महत्वाचा.
म्हणून आमचे मेथांब्याला उत्तर
माणूस चांगला आहे हो पण तो ज्या धोरणाचे प्रतिनिधित्व करतो ते धोरण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही त्यांना मत देणार नाही.
दुसरे म्हणजे कोणी कितिही चांगला असला तरी त्याला निवडून यायलाच हवे. तो चांगला आहे म्हणून त्याला तसाच आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही नाही मान्य करणार.
कारण कोण आमचा प्रतिनिधी व्हावा हे आम्ही निवडणुकीने न ठरवता मीडियाने किंवा इतर कोणी (गिव्हन म्हणून) ठरवणे म्हणजेच हुकूमशाही.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
- Log in or register to post comments
म
मेथांबा
Tue, 02/03/2009 - 20:09
नवीन
नुकत्याच गेटवे इथे झालेल्या प्रदर्शनात लोकांनी भ्रष्ट राजकारण्यांवर सडकुन टीका केली व माणुस पाहुन मत द्या असे म्हटलं ते कशासाठी असेल?
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 02/04/2009 - 17:57
नवीन
कॉ. मेथांबा साहेब,
समजा आपल्या भागातून रा. स्व. संघाचे एक कार्यकर्ते निवडणूकीस उभे राहिले. आपली राजकिय मते त्यांच्या अगदी विरूद्ध आहेत, (तरी हे मान्य व्हावे की तिथेही अनेक निस्पृह, तळमळीने जनकार्य करणारे कार्यकर्ते आहेत)*. तेव्हा मग आपण त्यांना निव्वळ ह्याच कारणांसाठी मत द्याल का? 'माणूस पाहून मते द्या' असे जे म्हणतात ते उद्वेगाने म्हणतात. पण मते देतांना नुसत्याच सामाजिक चारित्र्याचा निकष लावणे हे काही राजकिय परिपक्वतेचे लक्षण नाही, हे आपल्याला मान्य व्हावे.
[*स्वच्छ सामाजिक चारित्र्याचे कार्यकर्ते कम्युनिस्ट, (पूर्वीच्या) समाजवादी व रास्वसंघात बहुतांश आहेत, हा काही योगायोग नाही. ह्या सर्वच संघटनात माणसे तावून सुलाखून घेतली जातात, व तशीच ती कार्य करत रहातात. बाजारबुणग्यांना तिथे थारा नाही].
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Tue, 01/27/2009 - 06:26
नवीन
समाजवादी आणि कम्युनिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या राजकारणाची चर्चा करायची मात्र त्यात कम्युनिझम कुठे येता कामा नये? हे कसब नाही बुवा आपल्यात. :)
याचा अर्थ काय? हेच ना की मेथांबांना महाराष्ट्रात प. बंगाल किंवा त्यांच्या दृष्टीने (महाराष्ट्रापेक्षाही ) प्रगत केरळ सारखी कम्युनिष्ट राजवट अपेक्षीत आहे. अश्या वेळी कम्युनिझम वर चर्चा अपेक्षीतच आहे ना भौ !
एवढ्यावरही जर कम्युनिझम सोडुन ही चर्चा होत असेल तर मग मला माझ्या मेसची आठवण दाटून येते. तुरीच्या वरणात डाळीचे कण येऊ नये यासाठी आमच्या मेसवर कसोशिने प्रयत्न चालतात. ;)
ह्या चर्चेत सुध्दा एकंदरीत ओघ असाच दिसतो आहे की आम्ही हवं ते बोलू , जाहिर चर्चा करू मात्र आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. विचारायचे असतील तर विचारा आम्ही उत्तरे देणार नाही. आम्ही आधी ठरलेलं तेवढंच बोलू.
खरं तर आमचं कसं सगळं शिस्तीत ठरलेलं आहे. आधी लाल सलाम म्हणायचा, नंतर आमच्या गेलेल्या नेत्यांची नावे घ्यायची. सगळ्या महाराष्ट्राला त्यांच्या आदरभाव आहे.
असं करतांना हळूच यशवंतरावांपासून ते पवारांपर्यंतच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या कर्तुत्वाला आव्हाण द्यायचे , यावर कुणी उसळला की त्याला संघाचा किंवा महाराष्ट्रात शिवसेनेचा म्हणून शिव्या द्यायच्या. आमचं कसं सगळं प्रखर आहेना ! कॉम्रेड..... लाल सलाम !
माझ्या सुरूवातीच्या काही बाळबोध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी वेळ आहे कुणाला?
नीलकांत
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 01/28/2009 - 08:11
नवीन
नीलकांत,
तुझ्या कुठल्याच प्रश्नांना मेथांबा ह्यांजकडून तरी उत्तरे मिळणार नाहीत व मिळालीच ती कशी संतापजनक असतील त्याचा नमुना वर तू बघितला असशीलच.
नुसतीच पोकळ घोषणाबाजी, आक्रस्ताळेपणा, हे काय दर्शवते? आपण जे (बहुधा) स्वेछेने अंगिकारले आहे, त्याविषयी कन्विक्शन (मराठी प्रतिशब्द?) नाही. निव्वळ पी. डी*. काहीतरी सांगते म्हणून ते खरे मानायचे व इतरांना सांगत सुटायचे. आणी ह्याची करोलरी (मराठी प्रतिशब्द?) अशी की पी. डी. ज्याबाबतीत मूग गिळून बसते, त्याबद्दल प्रश्न जर आलेच तर स्वतःचीच बनवाबनवी करून घ्यायची (नुसते फालतू घोषणात स्वतः ला मग्न करून घ्यायचे!)
*पी. डी.: पीपल्स डेमॉक्रसी: मा. क. प. चे मुखपत्र
- Log in or register to post comments
ढ
ढ
Tue, 01/27/2009 - 07:53
नवीन
जर आत्याबाईंना मिशा असत्या तर.....
काका म्हटले असते.
- Log in or register to post comments
म
महेंद्र
Tue, 01/27/2009 - 09:37
नवीन
अगदी सुरुवातीच्या सुमारास, १९२५ साली भा,क,प, ची स्थापना ही रशियातील कम्युनिस्ट पक्षाची शाखा म्हणुनच झाली होती.
१९२० च्या सुमारास गांधी विरुध्द लेनीन हे पुस्तक लिहुन डांगे ह्याने गांधींना कःपदार्थ लेखण्याचा बौद्धीक दिवाळखोरपणा दाखवला होता.
गांधींचे नेत्रुत्व बलशाली होऊ नये म्हणुन झालेला हा पहिलाच प्रयत्न!जे ह्या प्रयत्नाला बळि पडले ते कम्युनिस्ट पक्षात गेले होते.ईंग्रजांच्या गुलामगिरीतुन भारत मोकळा झाला की त्याला रशीयातील कम्युनिस्ट पक्षाचा वेठबिगार म्हणुन ह्या पक्षाला कार्य करावे लागले.
१९२८ सालच्या सहाव्या अंतर राष्ट्रीय साम्यवादी अधीवेशनात , भारतातल्या स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करण्यात यावा असा आदेश देण्यात आला होता.रणदिवेला ही रशीयाची भुमिका पुर्ण पणे मान्य होती. त्या आदेशानुसार साम्यवाद्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या पाठीत खंजीर खुपसला.
१९३५ सालच्या आंतरराष्ट्रिय परिषदेत रशियाचे धोरण बदलले., त्या परिशदेने भारतिय स्वातंत्र्य लढ्यास पाठींबा द्यावा असे सुचवले.त्या आदेशानुसार डांगेनी कॉंग्रेस मधे प्रवेश केला.त्यांनीच १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनीकांना पकडुन ब्रीटीशांच्या हवाली करुन त्या लढ्याला नेस्तनाबुत करण्याचा प्रयत्न केला होता.
१९६२ साली झालेल्या चीन हल्ल्याला पाठींबा द्यायचा की नेषेध करायचा ह्या मुद्यावरुन कम्युनिस्ट पक्षत डांगे आणि रणदिवे गटात प्रचंड मतभेद झाले. आणि १९६४ साली एकसंघ असलेला कम्युनिस्ट पक्ष फुटला. डांगेच्या अधिपत्या खाली मूळ ”सीपीआय कार्यरत राहिला तर रणदिवे गटाने स्वतःला सीपीआय (माक्सीस्ट ) म्हणवणे सुरु केले.
या नव्या पक्षाने चीनी सैन्याचे मुक्तीदाता म्हणुन स्वागत केले ..तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बरेच दिवस तुरुंगात देखिल ठेवले होते.
हर्किशनसींग सुरजीत , नंबुद्रीपाद , ज्योती बसु हे सर्व प्रकाश कामत ज्या पक्षाचे समर्थन करीत आहेत त्याचे संस्थापक मेंबर्स होते.
डांगे ह्यांच्या पक्षातच नंतर फाटाफुट झाली आणि त्यांना पक्षातुन निकासित करण्यात आले.. त्यानंतर प्रकाश करंत ह्यांच्याकडे नेत्रुत्व आले .. पुढे काय झाले सगळे जाणताच!!!!
केवळ दोन कोपर्यात शिल्लक असलेल्या ह्या पक्षाशी हात मिळवणि करुन त्याला सामर्थ्य संपन्न करण्याचे महत्कार्य कॉंग्रेस ने केले आहे आणि आता त्याचिच फळे भोगताहेत...
डॉ. सन येत्सेन आणि चँग के शेक यांच्या नेत्त्रुत्वाखालील चीन मधिल राष्ट्रिय राष्ट्रीय स्वातंत्रयाचा लढा रशियाच्या आदेशा नुसार माओ त्से तुंग्ने संपुर्णपणे आपल्या नियंत्रणात आणुन त्या देशातिल साम्य्वादी हुकुमशाही १९४९ साली स्थापन केली.
त्याचप्रमाणे व्हिएतनाम मधे हो ची मिन्ह याने रशियाच्या आदेशाखाली तेथिल राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा साम्यवादी पक्षाच्या नियंत्रणाखाली आणून प्रथम फ्रांस आणि नंतर जापान व अमेरिकेचा पराभव करित साम्यवादी हुकुमशाही १९७६ साली स्थापन केली.
ईंडोनेशियात मात्र रशियाचे प्रयत्न सफल झाले नाहित.
भारतात डांगे ह्याने माओ त्से तुंग आणि हो चि मिन्ह प्रमाणे राष्ट्रिय स्वातंत्र लढयाचे नेत्रुत्व करुन तो रशियाच्या साम्राज्यशाही च्या नियंत्रणाखाली आणावा अशी योजना ह्होती . परंतु भारतिय साम्यवादि पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे आणि दुसर्या महायुद्धा मुळे चेंज झालेल्या आंतरराष्ट्रिय परिस्थिती ही योजना पुर्ण हौउ शकली नाही.hyach sobat , महात्मा गांधी ( ह्यांनी केलेल हेच एक मोठ्ठं कामं) आणि सरदार पटेल ह्यांच्या सतर्कते मुळे रशियाचा डाव पुर्ण मांडण्या पुर्वीच मोडला गेला.
तरिही निराश न होता, भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा त्याला आपल्या प्रभावाखाली आणण्याचे प्रयत्न डांगे ह्याच्या थ्रु सुरुच ठेवले होते. आपली बुद्धि गहाण ठेवलेल्या आणि भारत स्वतंत्र झाला आहे हे लक्षात न घेता १९५०साली ह्या डांगे ने रशियाला जाउन स्टॅलिन कडुन भारतात राजनिती कशि करावी ह्याचे मार्गदर्शन घेतले...
मला फक्त ह्याचंच वाईट वाटतं की ईतक्या देशद्रोही कारवाया केलेला पक्ष आज कॉंग्रेसला जवळचा वाटतो पण भा ज प केवळ हिंदुंना सपोर्ट करतो म्हणुन जवळ नको आहे......... व्हॉट अ शेम...
आजही बर्याच लोकांना कम्युनिस्ट पक्ष हा केवळ द्वेशावर राजकारण करतो हेच कळत नाही ह्याचं वाईट वाटतं.
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 09:42
नवीन
१९६४ साली एकसंघ असलेला कम्युनिस्ट पक्ष फुटला. डांगेच्या अधिपत्या खाली मूळ ”सीपीआय कार्यरत राहिला तर रणदिवे गटाने स्वतःला सीपीआय (माक्सीस्ट ) म्हणवणे सुरु केले.
या नव्या पक्षाने चीनी सैन्याचे मुक्तीदाता म्हणुन स्वागत केले ..तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बरेच दिवस तुरुंगात देखिल ठेवले होते.
L)
काय तरी चुकते आहे असे तुम्हाला वाटत नाही :?
नेहरु ~X( १९६२ जय जवान जय किसान ! शास्त्रीजी हवे होते ना त्या काळी !
X( काय तरी टंकायचे म्हणून टाका लागला आहे काय तुम्ही ?
इतिहासामध्ये काल कालावधीला किती महत्व असते ते आमच्या सारख्या इतिहासात नापास झालेल्यांना विचारा !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Tue, 01/27/2009 - 10:07
नवीन
माहिती रोचक आहे. जैनांनी दर्शविल्याप्रमाणे मा. क. प. पूर्वीच्या एकसंध कम्युनिस्ट पक्षातून १९६२ ते १९६३ ह्या दरम्यान फुटला असावा असे वाटते. पण ह्या तपशिलाने तसा काही फार फरक पडत नाही.
डांगे हे एक (तत्कालिन कम्युनिस्ट नेत्यांप्रमाणेच) समर्थ नेते होते, त्या सर्वांनीच आपापल्या निष्ठेपायी बर्याच खस्ता खालेल्ल्या आहेत, तेव्हा त्यांचा, तसेच रणदिवे ह्यांचा उल्लेख एकेरी व्हावा हे खटकले.
विएटनाममध्ये जपानी नव्हते, ते तर चीनमध्ये होते. तेव्हा १९३० पासून १९४९ पर्यंत माओ , चिआंग कै ह्सेक व जपानी आक्रमक ह्या दोन्ही आघाड्यांवर लढले.
चीन व व्हिएटनाम येथील जनताही अनुक्रमे माओ चेदाँग व हो चि मिन्ह ह्यांच्या पाठीशी होती. जनतेचा ह्या दोन्ही लढ्यास भरघोस पाठिंबा नसता तर ह्या दोन्ही राजवटी सत्तेवर आल्या नसत्या. ह्या दोन्ही लढ्यांच्या मागे त्या त्या नेत्यांचा अतुलनीय पराक्रम व असीम नेतृत्व होते, त्यांना अनुल्लेखून चालणार नाही. तेव्हा ते जे काही तेथे झाले ते निव्वळ रशियन षडयंत्राचा भाग म्हणून झाले असे म्हणणे चुकिचे आहे.
भारतीय कम्युनिस्ट नेतृत्वाची घोडचूक (जी ते आजतागायत करत आले आहेत) ही की देशभावनेला त्यांनी अजिबात किंमत दिली नाही. माओने ही चूक केली नाही. आणि आजही चिनी जनता राष्ट्रकर्तव्य सर्वोच्च मानते.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 01/28/2009 - 06:13
नवीन
>>>भारतीय कम्युनिस्ट नेतृत्वाची घोडचूक (जी ते आजतागायत करत आले आहेत) ही की देशभावनेला त्यांनी अजिबात किंमत दिली नाही. माओने ही चूक केली नाही. आणि आजही चिनी जनता राष्ट्रकर्तव्य सर्वोच्च मानते.
एकदम बरोब्बर!
बाकी महेंद्र यांनी दिलेल्या रोचक इतिहासातील (एकेरी संबोधने आणी सनावळीची चूक सोडल्यास) अजून एक व्यक्ती राहीली असे वाटते ज्याचे नाते समाजवाद्यांशी आहे - मानवेंद्रनाथ रॉय. ज्येष्ठ समाजवादी (आणि यशवंतरावांसारखे कॉग्रेसी) नेते, ज्येष्ठ पत्रकार हे स्वतःला रॉयीस्ट म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. या रॉय यांचा इतिहास वाचल्यावर ह्यांचे का कौतूक केले जाते हा एक मोठा प्रश्न पडला होता...असो.
- Log in or register to post comments
म
महेंद्र
Tue, 01/27/2009 - 10:09
नवीन
वर्ष चुकलं.. १९६२ वाचणे.. teMvha neheru hote..
- Log in or register to post comments
स
स्वामीयोगेश
गुरुवार, 01/29/2009 - 12:00
नवीन
श्री जोर्ज फर्नाण्डिस यान्चे कडुन आजकालच्या राजकारणी लोकानि खुपच शिकण्यासारखे आहेत. स्वच्छ चारित्र म्हणजे काय ते याना बघुनच कळते. श्री प्रमोद महाजन सन्रक्षण मन्त्रि असताना एका कार्यक्रमात साथी जोर्ज हि तेथे आले, प्रमोदजी ना पेप्सी दिलि गेलि पण श्री जोर्ज फर्नाण्डिस यानी विनम्र पणे चहाचि मागणी केली व तोच घेतलाहि.
जोर्ज फर्नाण्डिस यान्चे राजकिय गुरु श्री राम मनोहर लोहिया हे हि तितकेच थोर सद ग्रुहस्थ. त्यानि आयुष्यभर लग्न न करिता देशाचिच सेवा केलि. त्यन्चे सोबत एक खानसामा सदैव असायचा. सकाळि त्याने चहा त्याना दिला कि त्यान्चा पहिला प्रश्न असायचा : "तुमने पि चाय?" उत्तर होकारार्थी आल्यासच ते चहा पित असत.
- Log in or register to post comments
श
शंकरराव
गुरुवार, 01/29/2009 - 14:21
नवीन
बकरी (*त्ता म्हणने नको म्हणून) चले शेर कि चाल..
कम्युनिष्टांनी चहाची मगणी करावी म्हणजे फार उच्च असे काय केले हो ?
"तुमने पि चाय?" म्हणनारे ही लाखोंनी पडले आहे ह्या देशात, संस्क्रुतीच आहे ती आपली
अहो त्याच फर्नाण्डिसां मागे शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचा ससेमिरा मागे लागला आहे.
आता चाहाचे काय देण ते सांगा ?
- Log in or register to post comments
स
स्वामीयोगेश
Fri, 01/30/2009 - 11:57
नवीन
तुम्हि तरि तुमच्या बायकोला विचारता काय? चहा घेतला कि नाहि?
फर्नाण्डिसां मागे शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचा ससेमिरा मागे लागला होता तो इन्टरनेट जनित पीत पत्रकारितेचा किळसवाणा हिडिस बिभत्स कळस होता जो वेळिच निपटला गेला होता. विसरलात कि काय हो?
तुम्हि शन्करराव चव्हाण तर नाहित ना? कारण त्यना काहि पत्रकार शन्खोबा असे म्हणत होते म्हणुन विचारले.
- Log in or register to post comments
श
शंकरराव
Tue, 02/03/2009 - 20:22
नवीन
मी फक्त 'शंकरराव' आहे. :-)
आता काहि पत्रकार फर्नांडीसला फाटक्या तोंडाचा असे ही म्हणत, तुम्ही म्हणनार का ?
मग फाटक्या तोंडाचा फर्र फर्र करित "चहा घेतला कि नाहि?'' कसे विचारेल ?
स्वामी योगेश... तुझे लग्न झाले आहे का ? नाही म्हणजे स्वामी ... योगेश.. नावानी ब्रम्हचारी वाट्तो.
परत "चहा घेतला कि नाहि?''
असे विचारणारे लाख्खो च्या संखेने आहेत आपल्या संस्क्रुतीत ... नवल ते काय ?
मला सांग "चहा घेतला कि नाहि?'' ही त्यांची कोड ल्यांगवेज तर नव्हती ना ?? ;-)
मी .. नुस्ता चाहाच काय पण नाश्ता, जेवन .. आणखी बरेच काही घेतलेका सर्वांना विचारत असतो.. असो, तर तुझ्या बायलोलाही विचारेन चहा घेतला का ? ह. घे ;-)
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 02/04/2009 - 19:19
नवीन
.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3