Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेखनचोर्य (कृपया ह्यावर नवीन कॉमेंट्स नकोत -कोतवालांनी क्षमा मागितली आहे)

क
केदार
Fri, 01/30/2009 - 17:05
🗣 56 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10267 वाचन

💬 प्रतिसाद (56)
स
संदीप चित्रे Fri, 01/30/2009 - 17:22 नवीन
जेव्हा मायबोलीवर प्रसिद्ध झाला होता तेव्हाच मी तो वाचला होता. इतिहासाबद्दल केदार अभ्यासपूर्ण लेख लिहितो. विशेष म्हणजे तो ऐतिहासिक कादंबरीतल्या उल्लेखांना इतिहास मानायची चूक करत नाही :) बाकी मी कोतवालांचा ब्लॉग पाहिला नाहीये पण 'लेखन चौर्य' या प्रकाराचाच जाहीर निषेध !! मागे एकदा 'मिल्या'चे 'रेशमियाच्या गाण्यांनी...' हे विडंबन दुसर्‍याच कुणीतरी आपल्या नावावर टाकले होते तेव्हा मी ते त्या व्यक्तीच्या आणि 'मिल्या'च्या निदर्शनास आणून दिले होते. ----------- आंतर जालावर लिहिणार्‍यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे की आपण जर काही चोरले असेल तर (चोरणे सोपे असले तरी) कुठे ना कुठे चोरी सापडतेच. त्या पेक्षा एकतर 'स्वतःचे' काहीतरी लिहावे किंवा दुसर्‍याचे आवडले तर ज्याचे श्रेय त्याला द्यावे :) -----------
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 01/30/2009 - 17:25 नवीन
सहमत आहे! अश्या सदस्यांचे आयडी उडवुन आयपी ब्लॉक करण्यात यावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
स
सखाराम_गटणे™ Fri, 01/30/2009 - 17:32 नवीन
सहमत आहे! अश्या सदस्यांचे आयडी उडवुन आयपी ब्लॉक करण्यात यावेत. पहीली वेळ असेल तर समज देण्यात यावी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
संदीप चित्रे Fri, 01/30/2009 - 17:27 नवीन
आत्ताच पाहिला.... केदारचा लेख, त्याच्या नावाने प्रसिद्ध न केल्याचा, पुन्हा एकदा निषेध !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
व
वासुनाना आले Sat, 01/31/2009 - 08:18 नवीन
http://shailu010.blogspot.com/ आता त्याचा ब्लोग पाहिला त्यानी त्यात निवेदन दिले आहे या चुका पुन्हा होनार नाहित म्हनुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
न
नीधप Sat, 01/31/2009 - 08:38 नवीन
विनोद!! चोरी एकदा नव्हे तर चार वेळा पकडली गेली तरी ह्या व्यक्तीने चोरी करणे सोडले नव्हते. आणि आता अचानक उपरती झाली? मानभावीपणाने असे करणार नाही म्हणतोय. चूक नव्हे हो गुन्हा आहे हा. लेखनचौर्य हा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासुनाना आले
ढ
ढ Sat, 01/31/2009 - 08:49 नवीन
आणि विसोबा खेचर म्हणतात त्याप्रमाणे खुलासा येथे हवा. त्या कोणशाश्या ब्लॉगवर नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 01/31/2009 - 08:51 नवीन
ही माफी इथे पण मागायला काय हरकत आहे? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासुनाना आले
न
नीधप Sat, 01/31/2009 - 08:59 नवीन
इथेच मागायला हवी माफी. आणि त्या ब्लॉगवर कुठे निवेदन दिसले नाही बरंका. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ढ
ढ Sat, 01/31/2009 - 09:09 नवीन
बिपिनजी, आत्ता कळलं बघा!!! जाऊद्या. नाव राखलं आम्ही म्हणा ना!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दशानन Sat, 01/31/2009 - 09:02 नवीन
पण तुम्ही कोण बॉ :? कोतवालाचे वकील का ? त्यांना येऊ द्या ... माफी मागू द्या ना येथे ? * हल्ला बोल ग्रुप च्या सदस्यांना विनंती ! सर्वांनी कमीत कमी १० खरडी ( शुभेच्छा द्या) कोतवाल साहेबांना लिहाच ते दिसले की ऑनलाइन व जो पाच व्यनी पाठवेल तो तर गुरुच ;) सोडणे नाही हल्ला बोल !!!!!!!!! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासुनाना आले
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 01/31/2009 - 10:24 नवीन
खर म्हन्जे तो जो लेख होत तो मला ओर्कुत वर भेटला होता राजे मल त्या लेखाचे खरे लेखक महित नव्हते ह्याची लिन्क मी देइन आणी प्रताप राव गुजराचा सुधा लेख ओर्कुत वर आहे साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासुनाना आले
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 01/31/2009 - 10:06 नवीन
http://shailu010.blogspot.com नम्र निवेदन हां ब्लॉग महाराजाविश्यी माहिती देण्या करीता सुरु केला आहे यात जसे लेख असतील त्या लेखकांची नावे देण्यात येतील जर इथून मागे काही चुका जाल्या असतील त्या पुन्हा होणार नाहित याची नोंद घ्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
द
दशानन Sat, 01/31/2009 - 10:09 नवीन
माहीती देणे म्हणजे दुस-याचे लेखन आपल्या नावावर खपणे नाही ना ? मग ! तुम्ही ते लेखन नष्ट करा हेच म्हणणे ! शिवाजी महाराज खुप मोठा विषय आहे त्यांच्या वर किती ही लिहले गेले तर ते कमीच त्यामुळे.. लिहा ! पण स्वतःचे विचार लिहा.. ! कॉपी पेस्ट चांगलं असतं पण स्वतः लेखन ! बाकी मी काय सल्ला देऊ तुम्हाला ! तु हुशार तुम्हाला कळाले असेलच मिपावर कॉपी पेस्ट पॉलीसीचा कसा धुव्वा उडतो ते ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
न
नीधप Sat, 01/31/2009 - 12:01 नवीन
निव्वळ कोलांट्याउड्या. दिसलं बरं लेखन की ढाप आणि आपलं म्हणून छाप. ऑर्कुट वर नाहीतर अजून कुठेही सापडेल तुला. पण तुझं नाहीये हे तरी कळत होतं की नाही तुला? का तेही केदार ने सांगितल्यावर कळलं? तोवर ते लिखाण आपलंच समजत होतास की काय तू? आणि बाकीच्या लेखांचं काय? आजवर इतरही बर्‍याच ठिकाणी असं रंगेहाथ पकडलंय तुला.. त्यावर काय उत्तर आहे तुझं? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/30/2009 - 17:26 नवीन
लेखनचौर्याचा निषेध. मी बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेत नाही, पण कुणाचं काही वाक्य, परिच्छेद, विचार उचलला तर श्रेयही देते. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/30/2009 - 17:51 नवीन
लेखनचौर्याचा निषेध. कुणाचं काही वाक्य, परिच्छेद, विचार उचलला तर श्रेयही देते. आम्हीही संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना संदर्भ देण्याबद्दल सतत आग्रह धरतो. लेखनात आवश्यक तिथे पूर्वसुरींच्या मतांचे उल्लेख केलेच पाहिजेत, याचे आम्ही समर्थन करतो ! -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शंकरराव Fri, 01/30/2009 - 22:40 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कलंत्री Fri, 01/30/2009 - 17:29 नवीन
पूर्वी एखादा गुरु केल्यावर त्याचा गंडा ( माळ असे काहिसे असावे) घालावे लागे. अमूक अमूक गुरुचा मी गंडा घातला आहे असे अभिमानाने सांगितले जाई. कोणी कधी कोणाला फसविले तर गंडा घातला असाही शब्दप्रयोग होत असे. गंडा या शब्दाचा उलगडा आज झाला. आता आपण असे जे कोणी कृत्य करीत आहे ते माझे शिष्यच आहे असे सांगुन त्यांना गंडा घालावा.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 01/30/2009 - 17:52 नवीन
ह्या वर एव्हडा ओरडा करायच काय कारण??? इथे रोज वेब साइट हॅक करु चोरल्या जातात..सॉफवेर क्राक करुन विकले जातात...आणि लेख चोरला तर तु काय करु शकतोस? कोर्टात जाउ शकतोस फार फार तर... कोर्टात १० कोटी केसेस पेंडिंग आहेत न्यायाच्या प्रितिक्षेत....माझ्याहि कविता चोरल्या गेल्या... ओरडलो गळा बसला..शेवटी विक्स झिंझर खाल्ली तेंव्हा... आणि आपन जे विंडो सॉफ्ट्वेर लोड केले आहे ते तरी विकत घेतलेल आहे का? कि पायरेटेट आहे? बाकि हे करा ते करा ह्या नुसत्या गप्पा आहेत...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/30/2009 - 17:53 नवीन
म्हणून काय चोरीचे समर्थन करावे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/30/2009 - 17:56 नवीन
आपण मिपाचं धोरण वाचलं आहेत का? नसेल तर हे घ्या, वाचा: http://www.misalpav.com/node/1196 माझ्या संगणकावरचं विण्डोज विकत घेतलेलं आहे (विण्डोजशिवाय आला नाही ना संगणक); आणि मी नेहेमीच लिनक्स वापरते, आणि बाकीची फुकटात उपलब्ध असलेली सॉफ्टवअर्स! आता आपली परवानगी असेल तर पुन्हा एकदा निषेध व्यक्त करावा म्हणते! चालेल ना? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
क
केदार Fri, 01/30/2009 - 18:03 नवीन
साईट हॅक होणे आणि चोरी होणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अविनाशराव. मी आरडा ओरडा करत नाहीये. मी वर लिहीले आहे की मुळ लेखात माझे नाव दिले असते तर मला काही वाटले नसते. येथील वाचकांना निदान कळेल की कोणी घाशीराम राव कुठले लेख कुठे खपवतात. चोरी ती चोरीच. विंडो सॉफ्ट्वेर लोड केले आहे ते तरी विकत घेतलेल आहे का? >> स्वतः वरुन दुसर्‍याची पारख करायला आपण सर्व तांदूळ नाही आहोत. माझ्याकडे असनारे सर्व लॅपटॉप विकत घेतले आहेत, चोरलेले नाही. :) म्हणून विंडोज पण विकत घेतलेले आहे. प्रि लोड म्हणा हवं तर. बाकि हे करा ते करा ह्या नुसत्या गप्पा आहेत. >> गप्पा मारणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे कारण मला बोलता येते. :) तो मी गमावनार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ल
लिखाळ Fri, 01/30/2009 - 18:25 नवीन
लेखनचौर्‍याचा निषेध. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/30/2009 - 18:35 नवीन
लेखनचौर्याचा निषेध...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 01/30/2009 - 18:37 नवीन
मी समर्थन करीत नाहि..पण आपण निषेधा पलिकडे काहि करु शकतो का??..मी साहित्य चोरीचा निषेधच करतो
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 01/30/2009 - 18:41 नवीन
गप्पा मारणे हा माझाहि जन्मसिध्द हक्क आहे ...व मी गप्पा मारणारच..आपल्या नावाचा उल्लेख करायलच हवा होता..सहमत..भावना पोहोच्ल्या..........गप्पिश्ठ
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 01/30/2009 - 18:55 नवीन
च्यायला, हा घाशीराम कोतवाल कोणी संपादकांपैकी आहे का? त्याची चोरी सापडल्यावर लगेच सगळा धागाच अप्रकाशित करुन त्यावर पांघरुण घालण्यात आले म्हणून एक शंका डोकावली!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 01/30/2009 - 19:03 नवीन
=)) =)) धन्य आहात आपण गुरुदेव ...! _/\_ बाकी आम्हीसुद्धा लेखनचौर्याचा व त्याचे "समर्थन" करण्याचा निषेध करतो. आता एकदाच त्या "प्रवॄत्तीला" धडा शिकवला की पुन्हा असे प्रकार होणार नाहीत अशी आशा वाटते. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
च
चतुरंग Fri, 01/30/2009 - 19:08 नवीन
निदान मी तरी नक्कीच नाही! ;) मूळ धागा संपादित करताना अप्रकाशित ठेवा असा टॅब सिलेक्ट केला गेला त्यामुळे लेखन दिसेनासे झाले होते! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ट
टारझन Fri, 01/30/2009 - 19:00 नवीन
ह्म्म्म.. .आमचा प्रतिसाद .. आणि त्यावरील केदार साहेबांचं सौम्य उत्तर .. आम्ही वाचलं बरं का संपादक मोहोदय .. असो .. तुमच्या णिर्णयाचा माण ठिवतो .. पण ह्या धाग्याचा मोटीव्ह मला काही पटलेला णाही ... मायबोलीवरची बोंबाबोंब इकडे णको इतकेच म्हणतो ... आता घाशीराम इकडे आहेत हा कोणाचा दोष आहे ? - वाकड्यात शिरणारा) टारझन
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 01/30/2009 - 19:34 नवीन
मायबोलीचं नाव आलं म्हणून इतका त्रास का होतोय? घाशीराम कोतवाल हा आयडी चोर आहे हे तर खरं आहे ना? मग मूळ लिखाण कुठे प्रसिद्ध झालं ते सांगितलं तर इतकी का चिडचिड? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
य
यशोधरा Fri, 01/30/2009 - 19:38 नवीन
अगदी सहमत अज्जुका! लेख मायबोलीवर किंवा कुठे प्रकाशित झालाय हा मुद्दा नसून लेखाची चोरी झाली वा केली गेली हा मुद्दा आहे! मूळ मुद्दा बाजूलाच रहतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
भ
भडकमकर मास्तर Fri, 01/30/2009 - 20:06 नवीन
तळवे झिजलेली" चप्पल कोणी तरी चोरून नेली करेक्ट.. त्या तळवे झिजलेल्या चपलेचा चोर तुला इथे दिसला तर तू सांगायलाच पाहिजेस ना की हा चप्पलचोर इथे घुसला आहे... लोक आपापल्या चपला सांभाळतील, निदान चपलांवर लक्ष ठेवतील, चोरावर लक्ष ठेवतील... .... त्यात असं म्हणून कसं चालेल की साइमंदिराचा उल्लेख इथे नको म्हणून्...चप्पल कुठे चोरली त्यासाठीच हा उल्लेख आहे ना... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
संदीप चित्रे Fri, 01/30/2009 - 20:09 नवीन
नी आणि मास्तर दोघांशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/30/2009 - 20:34 नवीन
नी आणि मास्तरांशी सहमत!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
च
चतुरंग Fri, 01/30/2009 - 19:09 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/30/2009 - 19:18 नवीन
हे आत्ताच वाचले. लेखनाच्या चोरीचा निषेध करावा तितका थोडाच आहे! केदारचे अभ्यासपूर्ण लेखन बर्‍याचदा वाचले आहे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 01/30/2009 - 19:21 नवीन
चोरीचा निषेध ! ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 01/30/2009 - 19:23 नवीन
मी समर्थन करीत नाहि..पण आपण निषेधा पलिकडे काहि करु शकतो का??..मी साहित्य चोरीचा निषेधच करतो
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Fri, 01/30/2009 - 19:30 नवीन
मायबोलीवरचा लेख मूळ लेखकास श्रेय न देता येथे किंवा आणखी कोठे छापला गेला तर तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न दोन्हीकडे केला तरी काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/30/2009 - 20:32 नवीन
लेखनचौर्याचा त्रिवार निषेध. वरती बर्‍याच जणांनी लिहिले आहेच की मागेही या सदस्याचे काही धागे अशाच प्रकारचे होते म्हणून उडवले गेले होते. पण हा सदस्य परत परत असे का करत आहे? मुद्दाम की 'भेजे मे बात नही घुसरेली'!!! लेखनचौर्याचा अजून एक साळसूद प्रकार म्हणजे, इन्स्पायर्ड लिखाण. अनु मलिक, भप्पी लाहिरी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून इन्स्पायर्ड गाण्यासारख्या इन्स्पायर्ड कथा लिहितात लोक. इथे मिपावर पण काही जण असे करताना दिसतात नेहमी. मी नाव नाही घेत कारण माझ्याकडे पुरावे वगैरे नाहित पण या सदस्याच्या कथांना बरेच वेळा "ही कथा आधी कुठेतरी वाचली आहे" असे प्रतिसाद येतात. हा काय प्रकार आहे? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 01/30/2009 - 21:59 नवीन
एखादा अभ्यासपूर्ण लेख कुठल्याशा आय्डीच्या नावाने प्रसिद्ध करण्याने काय मिळत असावे? (म्हणजे कोणी लेखकाने चोरलेल्या कथेबद्दल मानधन मिळवले, तर तो हीन प्रकार पैशांमुळे केला, नावलौकिकासाठी केला, असे काही समजून येते.) इथे तर काहीच हेतू समजत नाही. निषेध तर आहेच.
  • Log in or register to post comments
र
रामची आई Fri, 01/30/2009 - 22:54 नवीन
http://purandarchawaghsardar.blogspot.com/ इथे सगळ्या पाककृती चोरलेल्या आहेत. माझ्या मनोगत आंणि मायबोलीवर प्रसिध्द झालेल्या पाककृती आहेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/31/2009 - 04:04 नवीन
लेखनचौर्याचा जाहीर निषेध..! कोतवालांनी असं करायला नको होतं. त्यांचा जाहीर खुलासा/माफी येथे अपेक्षित. तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Sat, 01/31/2009 - 19:50 नवीन
माफी?? हे बघा खरडीतुन ह्या चोरट्य़ाने काय म्हंटले आहे. ब्लॉग फेमस करायची युक्ती म्हणे ही! टारझनच्या खरडवहीतील कोतवालाची खरड आर आर्कूट वर व्हत मला काय ठाव उद्या लिन्क देतो सम्द्यासनी आनि आपला ब्लॉग पन पापुलर झाअला ना राव हानु दे आपण तर जातोय आता मिसळ सोदुन अघळ पघळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सुनील Sat, 01/31/2009 - 04:08 नवीन
कोतवालाचे चौर्य हा ऑक्सिमोरॉन म्हणावा काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/31/2009 - 04:36 नवीन
खरं तर लोकायत वर व मागे येथे मिपावर देखील कोतवाल ह्यांना समजावून दिले गेले होते ते आठवले, चालू दे ! चालू दे ! आम्ही निषेध नाही करणार पण त्यांनी असे करायला नको होते हे नक्कीच... ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
ब
बोका Sat, 01/31/2009 - 06:19 नवीन
कोतवालांची ही जुनी सवय दिसते. यापूर्वीही .. लोकसत्तातील माधव शिरवळकर यांचा हा लेख लोकायत वर इथे आणि स्वतः च्या (शैलेश पिंगळे ?? ) ब्लॉग वर इथे छापला होता. लोकायतवर मी कोतवालांना हे दाखवल्यावर त्यांनी इतर दोन लेख उडवले होते.
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Sat, 01/31/2009 - 06:23 नवीन
शैलेश पिंगळे हे नाव देखिल चोरलेले दिसते फोकलिच्याने. ह्या नावाचा माझा एक मित्र आहे आणि तो कोतवाल नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा