Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेदांमध्ये गणपतीचे स्थान

य
यशोधरा
Tue, 05/12/2009 - 08:47
💬 64 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3572 वाचन

💬 प्रतिसाद (64)
अ
अवलिया Tue, 05/12/2009 - 09:01 नवीन
गणेशाच्या उत्पत्ती संबंधी ज्या अनेक धारणा आहेत त्यातील एका धारणेची ओळख करुन दिल्याबद्दल अभिनंदन. आज अंगारकी... वा! सुरेख लेख !! गणपती बाप्पा मोरया !! --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/12/2009 - 10:16 नवीन
गणेशाच्या उत्पत्ती संबंधी ज्या अनेक धारणा आहेत त्यातील एका धारणेची ओळख करुन दिल्याबद्दल अभिनंदन. आज अंगारकी... वा! सुरेख लेख !! बाय द वे, गणेशपुराणात गणपती हा मूळचा गणेश नसुन गुणेश आहे असा एक उल्लेख आहे म्हणतात. अर्थात सत्व, रज, व तम या त्रिगुणाचांचा तो अधिपती आहे, असे म्हटल्या जाते. (चुभुदेघे) -दिलीप बिरुटे (धार्मिक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सागर Tue, 05/12/2009 - 09:04 नवीन
सुंदर माहिती यशोधराजी आज अंगारकी चतुर्थी निमित्त आराध्य दैवत गणेशाची छान व कमी लोकांना असलेली माहिती दिलीत. श्रीगणेशाचे महत्त्वच एवढे आहे की अथर्ववेद ह्या वेदांत श्रीगणेशाची अनेक सूक्ते पहावयास मिळतात धन्यवाद (गणेशभक्त) सागर अवांतरः ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरु करायचे असते त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून व्रताची सुरुवात करावी...
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 05/12/2009 - 09:09 नवीन
लेख अभ्यासपूर्ण एक शंका : ऋग्वेदात ब्रह्मणस्पती म्हणून ज्याचा उल्लेख आहे तो गणपतीच हे कसे समजावे? (अज्ञानी) खराटा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 05/12/2009 - 09:13 नवीन
जिज्ञासुंनी माझी व यशोधराताईंची खव वाचावी. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
शेखर Tue, 05/12/2009 - 09:35 नवीन
खालील लिंक तपासावी. कदाचित शंकेचे उत्तर मिळेल. http://theemerald.wordpress.com/2009/04/21/origin-of-ganesha-2/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ए
ए.चंद्रशेखर Fri, 12/10/2010 - 06:39 नवीन
ऋग्वेदात गणपतीचा उल्लेख आहे हा शोध नवीन आहे. प्रस्तुत लेखिकेने या आपल्या शोधाचे काहीच संदर्भ दिले नसल्याने काय आधारावर हा निष्कर्ष काढला ते समजण्यास वाव नाही. ऋग्वेदामध्ये गणपतीला बृहस्पती, वाचस्पती आणि ब्रह्मणस्पती हे लेखिका कोणत्या संदर्भावरून व आधारावरून म्हणते ते समजले नाही. ऋग्वेदात मंत्र नसून ऋचा आहेत. गणपती या देवाचा उल्लेख कोणत्या मंडलातील कोणत्या ऋचेत आहे हे समजले तर पुढे काही बोलता ये ईल. ऋग्वेद हा ग्रंथ भारतीय उपखंडाच्या बाहेर रचला गेला असे साधारणपणे मानले जाते. या ग्रंथात इंद्र, वरूण वगैरे मुख्य देवतांचा उल्लेख आहे. प्रचलित हिंदू देवांचा उल्लेख या ग्रंथात असल्याचे मला तरी अजून माहिती नाही. प्रस्तुत लेखाच्या लेखिकेने ही माहिती दिल्यास माझ्या ज्ञानात भर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया Fri, 12/10/2010 - 13:09 नवीन
ऋग्वेद हा ग्रंथ भारतीय उपखंडाच्या बाहेर रचला गेला असे साधारणपणे मानले जाते. ऋग्वेद रचनास्थानासंबंधी जी अनेक विविध मते आहेत त्यामधले हे एक मत आहे. इतर काही मते भिन्न दृष्टीकोन प्रतिपादीत करतात, त्यांचा पाठपुरावा करणारे तितकाच सबळ पुरावा त्यासाठी देतात. त्यामुळे वरचे वाक्य दिशाभुल करणारे असुन असे एक मत आहे असे म्हणणे जास्त योग्य. बाकी चालू द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
ए
ए.चंद्रशेखर Fri, 12/10/2010 - 16:49 नवीन
लोकमान्य टिळकांनी या बाबतीत बरेच संशोधन करून ओरायन हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथातील विचारांप्रमाणे ऋग्वेदातील सर्वात जुन्या ऋचा इ.स.पूर्व ४००० या कालखंडात रचल्या गेल्या असाव्यात. अगदी लहान संख्येने असलेल्या आर्य टोळ्या चांगली कुरणे सापडतील या आशेने भारतीय द्वीपकल्पात इ.स.पूर्व १३०० च्या नंतर आल्या असे आता मानले जाते. यापेक्षा भिन्न दृष्टीकोन काही मंडळींचा असू शकतो. परंतु सर्वसाधारणपणे हे कालखंड योग्य असावेत असे मी वाचलेल्या संदर्भांच्यात मला तरी आढळून आले आहे. याच्यापेक्षा निराळे कालखंड कोणते दिले जातात व त्यासाठी काय सबळ पुरावा दिला जातो हे माहीत करून घेण्यास आवडेल. श्री. अवलिया यांनी हे संदर्भ द्यावे अशी त्यांना विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 12/11/2010 - 08:12 नवीन
अगदी लहान संख्येने असलेल्या आर्य टोळ्या चांगली कुरणे सापडतील या आशेने भारतीय द्वीपकल्पात इ.स.पूर्व १३०० च्या नंतर आल्या असे आता मानले जाते. परत तेच. मानले जाते कशावरुन? तुम्ही मानत असाल तर असो. ते केवळ एक मत आहे जे सर्वमान्य नाही. उगाच खोडसाळपणा करु नये ही विनंती. लोकमान्यांच्या संशोधनावर मॅक्स मुल्लरच्या आर्य आक्रमण सिद्धांताचा पगडा होता. तो सिद्धांत आणि एकंदर इपूर्व १३०० वगैरे आता अनेक जण पुराव्याने नाशाबित करतात. वेळ मिळेल तसे यावर टंकेन. तुर्तास एकंदर मुद्दाम चालु असलेला खोडसाळपणा पहाता माझ्याकडुन या धाग्यावर विराम. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
ए
ए.चंद्रशेखर Sat, 12/11/2010 - 08:58 नवीन
सिंधु नदीच्या खोर्‍यात जी मानवी संस्कृती उदयाला आली त्या संस्कृतीचा कालखंड, इ.स.पूर्व ६००० ते ३५०० मेहेरगढ, या विभागात व इ.स.पूर्व ३५०० ते १३०० मोहेन्जो दारो व हराप्पा या विभागात, हा आहे हे कार्बन डेटिंगच्या सहाय्याने पूर्णपणे सिद्ध झालेले आहे. या दोन्ही विभागात अतिशय विस्तृत प्रमाणात उत्खनन केले गेलेले आहे. या सर्व उत्खननात आर्य संस्कृतीची प्रमुख दोन चिन्हे, घोडा व यज्ञ-वेदी याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्या काळी भाजलेल्या मातीच्या टाईल्स या चलन म्हणून वापरात होत्या. या टाइल्सवर घोडा सोडून इतर चतुष्पाद प्राण्यांची चित्रे सापडतात. या सर्व निरिक्षणांवरून असा निष्कर्ष काढणे शक्य होते की आर्य संस्कृती भारतीय द्वीपकल्पात इ.स.पूर्व १३०० नंतरच आली. यात माझे मत तुमचे मत असे काही नाही. ज्या गोष्टी शास्त्रीय दृष्टीने सिद्ध होऊ शकतात त्या मानाव्या असे मला वाटते. यात खोडसाळपणा वगैरेचा काहीही भाग आहे असे मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 12/11/2010 - 09:00 नवीन
चालू द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर
N
Nile Sat, 12/11/2010 - 09:00 नवीन
ते केवळ एक मत आहे जे सर्वमान्य नाही.
त्यांच्या मतामध्ये काय चुक आहे ती सांगा, उगाच खोडसाळपणा वगैरे शब्दांमागे लपुन पळुन जाउ नका. तुम्हाला काय बरोबर वाटेल ते लिहा, त्यावर इतर मत व्यक्त करतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विसोबा खेचर Tue, 05/12/2009 - 09:13 नवीन
असा हा पूर्वीपासून जनमानसात रुजलेला गणपती. आदौ पूज्यो विनायकः - ह्या उक्तीनुसार सर्व शुभकार्यांरंभी अग्रपूजेचा मान मिळालेलं हे दैवत आजही तितकच लोकप्रिय आहे. नो डाऊट! आपल्या मिपाचा जलमदेखील भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीचाच. आजवर त्याच्याच कृपेने मिपा उभं आहे, बहरतं आहे, नावारुपाला येत आहे. आजवर अनेकांनी मिपाला खूप तर्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु गणपतीने बाप्पाच्या किरपेमुळे मिपा सगळ्यातून तावून-सुलाखून निघालं आणि यापुढेही मिपावर गणेशबाप्पाची अशीच किरपा राहील याचा मला विश्वास आहे! असा हा ओंकारस्वरुपी, सार्‍या सृष्टीचा उत्पत्तीकर्ता आणि पालनकर्ता तुम्हां आम्हां सर्वांचं सतत रक्षण करो! यशोधराबेन, सह्ही लेख. जियो....! लालबागच्या राजाचा विजय असो...! आपला, (कट्टर गणेशभक्त!) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनंता Tue, 05/12/2009 - 09:17 नवीन
इतके सुंदर विवेचन केल्याबद्दल मिपा-विदूषीला अनेकानेक धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 05/12/2009 - 09:25 नवीन
यशोताई, खूपच अभ्यासपूर्ण आणि सुंदर लेख. आज काय अंगारकी आहे ना... अगदी समयोचित लेख. (बाप्पाला मित्र समजणारा) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/12/2009 - 09:26 नवीन
खरच खुप सुंदर लेख. गणपती बाप्पा मोरया. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
फ
फारएन्ड Tue, 05/12/2009 - 09:32 नवीन
बरोबर चतुर्थीच्याच दिवशी सुंदर लेख. यशोधरा, श्रावणातील 'चित्रा'त बुध आणि बृहस्पती चे चित्र असते तो गणपती च का?
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 05/12/2009 - 09:49 नवीन
सुंदर लेख. बाप्पाबद्दल बरिच नविन माहिती मिळाली. धन्यवाद यशोधराताई... गणपती बाप्पा मोरया.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 05/12/2009 - 09:58 नवीन
अंगारकीनिमित्त औचित्यपूर्ण लेख ! अतिशय माहितीपूर्ण
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 05/12/2009 - 10:54 नवीन
धन्यवाद यशोधरा ताई. खुप प्रसन्न वाटलं. अंगारीकेच्या दिवशी तुमच्या लेखामार्फत गणेशाची चांगली माहीती मिळाली आणि काही स्तोत्रेही वाचली गेली. तुम्हाला पुण्य लाभो.
  • Log in or register to post comments
स
समिधा Tue, 05/12/2009 - 20:12 नवीन
असेच म्हणते. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
श
श्रावण मोडक Tue, 05/12/2009 - 10:57 नवीन
गणपती आणि वेद? नाही पटत. काही गडबड निश्चित आहे. गणपती हा गणांचा अधिनायक ही कल्पना मान्य केली, तर गणपती अलीकडच्याच काळातील ठरतो (अवलियांनी इतरत्र तसे म्हटले आहेच). कारण त्यासाठी गणसमाज अस्तित्त्वात असला पाहिजे. याचाच अर्थ हे दैवत वेदकालीन असू शकत नाही. अपौरूषेय तर नाहीच नाही. अर्थात, मी यातील ज्ञानी नाही. चांगला विषय उपस्थित केला आहे. मागे एकदा नामदेव ढसाळ यांनी गणपतीचे असेच एक विश्लेषण केले होते, ते आठवले. ते साहित्य जालावर मात्र उपलब्ध नाही. 'सामना'मध्ये तो लेख आला होता. बऱ्याच पूर्वीचा आहे.२००२ किंवा २००३ मधील.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 05/12/2009 - 16:59 नवीन
खर तर पुर्वी गणेश पुजन घरी करणे लोक टाळत असत.कारण गणेश म्हणजे गणाचा ईश ,नेता. हे गण म्हणजे भगवान शंकराचे अनुयायी,हे एक तर भुत,पिशाच्च हे होत. शुभ कार्यात ह्या गणाचा त्रास होऊ नये, कोणतेही संकट येवु नये म्हणुन शुभ कार्याच्या आरंभी संकटमोचन,संकटहर्ता म्हणुन गणेशाची पुजा केली जाते. ही एक कडक व कोपिष्ट देवता म्हणुन पुराणात प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकानी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात करुन सर्वसामान्य लोकांमध्ये गणेशास प्रसिद्ध केले. माहिती मिळाल्यास इथे त्याची लिंक देईन. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
य
यशोधरा Tue, 05/12/2009 - 17:02 नवीन
जरुर द्या. मीही लिहिन मी जे वाचल आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
म
मेघना भुस्कुटे Tue, 05/12/2009 - 17:18 नवीन
मीपण मोडक साहेबांशी सहमत. मीही गणपतीबद्दल असंच वाचलं आहे. किंबहुना गणपतीची पूजा करायची ती याच भावनेनं, की बाबा रे, तुझा वाटा घे. पण नंतर विघ्नं आणू नकोस. नंतर नंतर हे दैवत लोकप्रिय होत गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नितिन थत्ते Tue, 05/12/2009 - 18:25 नवीन
+१ सहमत. मीही असेच वाचले होते. विघ्नहर्ता असे नाव नसून विघ्नकर्ता असे नाव पूर्वी होते असे वाचले आहे. पेशव्यांची सत्ता आल्यावर त्यांचे कुलदैवत असल्याने त्यांनी त्याचे प्रस्थ वाढवले. सत्ताधार्‍यांचे अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीतून घरोघरी गणपतीपूजन सुरू झाले. (टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तो मोहरमच्या ताबुतांची हिंदूंमधील लोकप्रियता पाहून) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
श
श्रावण मोडक Tue, 05/12/2009 - 17:37 नवीन
ही लौकीकार्थाने भुते, पिशाच्चे नव्हेत. ही त्या गणांची नावे आहेत. गणपती हा हस्ती किंवा तत्सम गुणलक्षणे असलेल्या गणाचा नायक. बाकी त्याची पूजा का वगैरे विषय वेगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ह
हरकाम्या Tue, 05/12/2009 - 22:00 नवीन
आप्ल्या मताशी एकदम सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ध
धनंजय Tue, 05/12/2009 - 19:52 नवीन
ब्रह्मणस्पतिसूक्त हे गजाननाबद्दल वाटत नाही. (गजानन = गज+आनन = गज+मुख) > तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् ll ही ओळ मी ऐकलेली आहे. हे थोडेफार गायत्री मंत्राचे विडंबन (किंवा 'सु'डंबन) वाटते. या मंत्रातील शब्दांचा अन्वय काय लगतो कोणाला माहिती आहे का? मुख्य म्हणजे नेमके काय "धीमहि"? आणि "वक्रतुंडाय"="वक्रतुंडासाठी"चा अन्वय कुथल्या क्रियेपाशी लागतो आहे? गायत्री मंत्रात "तत् सवितुर् देवस्य वरेण्यम् भर्गो [भर्गस्] धीमहि ।" इथे काय (भर्गस् - मराठीत 'तेज') जाणून मिळवायचे आहे, ते द्वितीयेत स्पष्ट आहे. पण या दन्तीमंत्रात "धीमहि" चे कर्म कुठे [मला सध्या कोणी सांगेपर्यंत] दिसतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विकास Tue, 05/12/2009 - 21:56 नवीन
"तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् ll" हे मी कधी ऐकले नाही. मात्र, "एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् ll" असे ऐकलेले आहे. जालावर शोधताना खालील अर्थ मिळाला: Praise be to the bearer of a single tusk which is twisted and crooked trunk. May we be inspired by the knowledge and meditation. This verse is also one of many interesting dialogs. It has the nature of a "puzzle". One group says "ekadantaaya vidmahe" - we know someone called "ekadanta" (do you know what we mean?), the other group responds "vakratuNDaaya dhiimahi" we think of him as "vakratuNDa". Now they both agree that they are talking of the same God, so together they say "tanno dantii prachodayaat" - may he, dantii, invigorate us! बाकी पेशवे आणि टिळक यांनी जरी (त्या मानाने) अधुनिक काळात गणपतीस महाराष्ट्रात लोकप्रिय दैवत केले असे तात्पुरते समजले, तरी अथर्वशिर्ष हे प्राचीन आहे ज्यात गणपतीचे वर्णन चांगले आहे. खंडणी वसूल करणार्‍या व्यक्तीला घाबरून केलेले वर्णन वाटत नाही. तसेच भारतात आणि इतरत्र अनेक देशांत प्राचीन गणेश मुर्ती मिळाल्यात तेंव्हा गणपती त्या अर्थाने नव्याने शोधलेले दैवत वाटत नाही. तसेच वर खराटांनी म्हणल्याप्रमाणे, टिळकांनी केवळ ताबुताची लोकप्रियता हिंदूंमधून दूर करायला गणेशोत्सव चालू केला हे देखील पटले नाही. ऐकलेले तर नक्कीच नाही. तसे असते तर शिवजयंती पण का चालू केली हा प्रश्न पडतो. त्यात धार्मिकता कमी आणि लोकजागृती जास्त होती. जे काही नेहमी ऐकलेले आणि वाचलेले आहे, त्या प्रमाणे त्यांचा उद्देश सरकार हस्तक्षेप करणार नाही अशा कारणांवरून माणसे गोळा करून स्वातंत्र्यासाठीचे लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्याचा होता. त्यात तमाम मराठी माणसाला आवडणारे दैवत म्हणजे गणपती तर आवडणारे नेतृत्व हे शिवाजी हे माहीत असल्याने त्यांनी या दोहोंच्या नावाने सार्वजनीक उत्सव चालू केले आणि स्वातंत्र्यचळवळीस फायदा करून दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Tue, 05/12/2009 - 22:19 नवीन
"तत्पुरुषाय" काय किंवा "एकदन्ताय" काय - संस्कृत व्याकरण कुठलेच जमत नाही. इंग्रजी अनुवाद गमतीदार आहे. कल्पक आहे, खेळकर आहे. पण संस्कृताशी संबंधित नाही! "एकदंताकरिता", "वक्रतुंडाकरिता" (कुठली क्रिया होत आहे?) चतुर्थी विभक्ती ही काही थोड्याच क्रियापदांबरोबर दिसते. इथे त्यांच्यापैकी कुठलेच दिसत नाही. मग या चतुर्थीचा संबंध कुठल्या क्रियेशी लावायचा? (काय आहे जे) जाणूया? (काय आहे जे) उमजूया? इथे जाणूया, उमजूया, क्रियांचा संबंध लावायला द्वितीयेतले शब्द अपेक्षित आहेत, पण दन्ती-कडव्यात ते कुठेच दिसत नाहीत. मराठीत "-ला" प्रत्यय चतुर्थी आणि द्वितीयेत दोन्ही अर्थांनी वापरतात. "एकदंताला जाणूया, वक्रतुंडाला उमजूया," अशा मराठी [किंवा तत्सम हिंदी] वाक्याचे संस्कृत अंध-भाषांतर झाल्यासारखे वाटते आहे. (म्हणजे जिथे द्वितीया हवी तिथे चतुर्थी वापरली.) अर्थात् कोणाला या वाक्याचा संस्कृत-योग्य अन्वय कळत आसला तर मला जाणायला आवडेलच - पण तो अन्वयार्थ काहीतरी वेगळाच असला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ए
एक Tue, 05/12/2009 - 23:40 नवीन
क्रियापदांचा कर्माला द्वितीया विभक्ती न वापरता चतुर्थी वापरतात. उदा. अहं रामाय नमस्करोमि | (८ वी ते १०वी च्या अभ्यासात जेव्हढं आठवलं त्यावरून. १००% बरोबर असेल असा दावा नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Wed, 05/13/2009 - 05:21 नवीन
ही क्रियापदे पुढीलप्रमाणे : १. क्रियार्थक्रिया (उदाहरण : अमके करण्यासाठी तमके करतो.) पैकी एक क्रियापद वाक्यात अदृश्य/अध्याहृत असले, तर त्या अदृश्य क्रियापदाच्या कर्माला चतुर्थी होते - : पुष्पेभ्यो (पुष्पानि आहर्तुं) व्रजति - (फुलांसाठी = फुले मिळवण्यासाठी झटतो. २. तुमर्थ : (थोडेफार वरच्यासारखे, पण काही वैशिष्ट्ये आहेत) "-तुम्" लावायच्या क्रियेचे भाववाचक नाम वापरले गेले, तर त्याला चतुर्थी होते. उदाहरण : त्यक्तुम् व्रजति = त्यागाय व्रजति (टाकायचा/टाकण्यासाठी झटतो) ३. नमः, स्वति, स्वाहा, स्वधा, अलं, वषट् यांच्याबरोबर चतुर्थी वापरतात. उदाहरण : सूर्याय नमः । ४. "मन्" (मानणे) मनुष्याला तुच्छतेने काही उपमावर्णन द्यायचे असेल, तर त्या वर्णनाला द्वितीया किंवा चतुर्थी होते. "न तं तृणं/तृणाय मन्ये" = मी त्याला तृणही मानत नाही. (पा.सू. २.३.१४, २.३.१५, २.३.१६, २.३.१७ ; आणखी कुठले नियम नाहीत) वरील दन्ती-मंत्रात यापैकी कुठलीसुद्धा स्थिती नाही. - - - तुमच्या ८वीच्या पुस्तकात "अहं रामाय नमस्करोमि" असे उदाहरण होते हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. या ठिकाणी द्वितीया अपेक्षित आहे (मुनित्रयं नमस्कृत्य... सिद्धांतकौमुदीचा प्रास्ताविक श्लोक.) पण कदाचित "नमः" वेगळा काढून चतुर्थी केली असेल. असा "नमस्करोमि तेभ्यः" चतुर्थी प्रयोग क्वचित वाल्मिकिरामायणात सापडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/13/2009 - 02:34 नवीन
तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् l ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही | तन्नो रुद्रः प्रचोदयात् | असे ऐकले आहे. कदाचित २ मंत्रांमधे घोळ झाल्यासारखा वाटतो आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
य
यशोधरा Wed, 05/13/2009 - 18:54 नवीन
>>कदाचित २ मंत्रांमधे घोळ झाल्यासारखा वाटतो आहे. हो, थोडासा घोळ आहे, तो असा - ॐ तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् l - हा मंत्र कृष्णयजुर्वेद - तैत्तेरीयारण्यकात - नारायण उपनिषदात आहे आणि ॐ तत्कराटाय विद्महे हस्तिमुखाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् l - हा मंत्र कृष्णयजुर्वेद - मैत्रायणीसंहितेत. इतर मंत्र असे - ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् l - गणपत्यथर्वशीर्षोपनिषद् . ॐ लंबोदराय विद्महे महोदराय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् l - अग्निपुराण. ॐ महोल्काय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् l - अग्निपुराण. पेशव्या, तू म्हणतोस तो, ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही | तन्नो रुद्रः प्रचोदयात् | - हाही महानारायण उपनिषदातील मंत्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नितिन थत्ते Wed, 05/13/2009 - 04:38 नवीन
गणेशोत्सव सुरू झाल्यावर दुसर्‍या (की तिसर्‍या? नक्की आठवत नाही) वर्षी गणेशोत्सवाचा वृत्तांत केसरीमध्ये लिहिला होता त्यात 'आता तरी आमचे हिंदू बंधू ताबुताच्या मिरवणुकीत नाचायला जाणार नाहीत' (शब्द वेगळे असू शकतील) असे टिळकांनी लिहिले होते. (माझ्याकडे आत्ता दुवा वगैरे नाही. मिळाला तर देईन) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 05/13/2009 - 05:10 नवीन
पण तेवढ्यावरून टिळकांनी गणेशोत्सवाची कल्पना उचलली असे म्हणणे जरा अतिरंजित (फारफेच्ड?) आणि पूर्वग्रहदूषित (बायस्ड?) वाटते आहे. वरील वाक्य जर का टिळकांनी लिहिले असेल तर त्यावरून फारतर एवढेच म्हणता येईल की त्यांनी गणेशोत्सवाची आणि ताबुताची थोडीफार तुलना केली आहे. या व्यतिरिक्त अजून काही पुरावा आहे का? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Wed, 05/13/2009 - 07:28 नवीन
:( खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ल
लिखाळ Wed, 05/13/2009 - 17:56 नवीन
नमस्कार, ताबूत आणि गणेशोत्सव यंबद्दल टिळकांनी काय म्हटले आहे यावर चर्चा वाचून लिहित आहे. मागल्या वर्षी लोकसत्तात केसरीमधला अग्रलेख छापून आला होता. टिळकांनी गणेशोत्सव चालू झाल्यावर दुसर्‍याच वर्षी तो लिहिला होता. त्यात गणेशोत्सवाचे आणि मिरवणूकिचे वर्णन आहेच शिवाय त्या अनुशंगाने लोक काय काय बोलले ते सुद्धा लिहिले आहे. त्यात 'ताबूतांना समांतर असा उत्सव चालू केला' असा काही लोकांनी आरोप केला आहे असे टिळक म्हणतात आणि या आरोप कर्त्यांवर जहाल टिप्पणी करतात. अग्रलेखातून या संदर्भातले एक लहान वाक्य - '' ...... गणपतीची स्वारी ही ताबूतांची नक्कल आहे, काहितरी करमणूक करुन घेण्यासाठी हे थोथांड काढले आहे असे नाना प्रकारचे तर्क युरोपिअन वगैए लोकांच्या डोक्यातून निघत आहेत......ज्यांचे मस्तक एकदा म्त्सराने, भिइतिने व क्रोधवशतेने शांतीशून्य झाले आहे त्यांच्या पुढे.....'' लोकसत्तातला दुवा मी माझ्या या धाग्यावर यापूर्वी मिपावर दिला आहे. कृपया अग्रलेख जरूर वाचावा. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 05/13/2009 - 18:02 नवीन
टिळक महाराज की जय!!!!!!!!!! मला वाटते आता तरी असा आरोप कोणी करू नये. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
च
चतुरंग Wed, 05/13/2009 - 18:32 नवीन
त्यांनी अगदी परखड शब्दात ह्या टीकाकारांचा समाचार घेतला आहे. गैरलागू टीका इतक्या वर्षांनंतरही कशी पाठ सोडत नाही हे पाहून आचंबित व्हायला झाले! योग्य आणि समयोचित दुव्याबद्दल धन्यवाद लिखाळ! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
विकास Wed, 05/13/2009 - 18:50 नवीन
या दुव्याबद्दल लिखाळरावांचा आभारी! याहून जास्त या मुद्यावर लिहायचे काही कारण नाही इतके यातील विधान सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
नितिन थत्ते Wed, 05/13/2009 - 20:30 नवीन
लोकसत्तात छापून आलेला अग्रलेख मी वाचलाच होता. पण मी जो म्हणतोय तो हा अग्रलेख नसावा. शोधून सापडला तर दुवा देईन तोपर्यंत माझे विधान मागे घेतो. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/12/2009 - 11:31 नवीन
विषयाशी संबंधीत प्रतिसाद नसल्यास संवादासाठी व्य. नी. ,खरडफळा, खरडवहीचा वापर करावा ! या पुढे असे आढळून आल्यास प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येतील. कृपया सहकार्य करावे ! धन्यवाद ! प्रा.डॉ. बिरुटेगुर्जी गणेश मित्र मंडळ आवंतर :- खातय आज डबल बॅरलची गोळी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य विषयाशी असंबद्ध प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत. - संपादक
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 05/12/2009 - 16:40 नवीन
खूप चांगली माहिती दिली यशोताई. आजची अंगारकी सार्थकी लागली. गणपती पावला! गणेशाची स्तोत्रं आणि त्यांचं विश्लेषण आवडलं. धन्यवाद. =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** http://www.agnisakha.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/12/2009 - 17:43 नवीन
त्वमेव सर्वं खल्विंदं ब्रह्मासी । तूच एकमेव खरा ब्रह्म आहेस.. ब्रह्म म्हणजे जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि नाशाचे कारण.. हे तूच (गणेशा)आहेस. असे अथर्वशिर्षात सांगितले आहे. अभ्यासपूर्ण लेख आवडला. ओम गं गणपतये नमः!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टिउ Tue, 05/12/2009 - 17:48 नवीन
ह्म्म...हे वाचलंत का?
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 05/12/2009 - 18:00 नवीन
यशोधरा, आज चीनमध्ये चतुर्थी करताना गणरायांचे स्तवन वाचायला मिळाले हा उत्तम योग म्हटला पाहिअजे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
च
चैतन्यकुलकर्णी Tue, 05/12/2009 - 23:00 नवीन
बर्‍याच जणांनी ब्रम्हणस्पती म्हणजेच गजानन आहे का असा प्रश्न विचारला आहे. श्रीगणेशपुराण व श्रीमुद्गलपुराण यांमध्ये याबाबतीत बरेच विवेचन आहे. आपण जो गजानन, गणेश (दोघेही शिवपुत्र) समजतो, ते खरेतर गुणेश/ब्रम्हणस्पतीच्या २४ अवतारांपैकी आहेत. त्यात सर्वसामान्य माहिती असलेले ४ अवतार आहेत. गजानन हा महोत्कट, मयुरेश (हा शिवपुत्र असून त्यास गणेश, गौरीनंदन (गौरीच्या तपश्चर्येमुळे प्राप्त झालेला) इ. अनेक नावे आहेत. मोरगाव हे क्रीडास्थळ) या अवतारांनंतरचा द्वापारयुगात झालेला अवतार आहे. सिंदुरासुराचा वध केला म्हणून सिंदुर प्रिय आहे. महाराष्ट्रातील साडेतीन गाणेशपिठांमध्ये मोरगाव (श्री मयुरेश), सिदुरहा: गजानन (राजूर), श्रीपद्मालय (एरंडोल) व श्री विज्ञान गणेश यांचा समावेश आहे. मुद्गलपुराणात वैदिक काळातील गणेशाविषयीचं ज्ञान, नंतरच्या काळातील पडलेली भर व मुद्गलांनी अधिकारवाणीने केलेले भाष्य विस्तृत स्वरूपात उपलब्ध आहे. माझ्या मते प्रत्येकवेळी ग्रंथांमध्ये नव्याने पडलेली भर ही प्रामुख्याने योग शास्त्राचा झालेला विकास व त्यामुळे नव्याने समजलेली रहस्ये यांमुळे पडली असावी. वेद काळात प्रामुख्याने संकल्पना मांडल्या जात होत्या. उपनिषद काळात त्याला काही प्रमाणात आध्यात्मिक अनुभवांची जोड मिळाली. पुराण व त्यानंतरच्या काळात ज्ञान प्राप्तीसाठी राजयोगावर भर दिल्यामुळे अनेक नवीन माहिती समोर आली व ती पुराण व इतर ग्रंथांमधून पुढे आली असावी. ज्ञानेश्वरांनी देखील राजयोगाचा वापर ज्ञानप्राप्तीसाठी करून घेतला आहे. सद्य समाजात गणेश म्हणजे शिव-पार्वतीचा पुत्र व विघ्न हरण करणारा एवढाच घेतला जातो. प्रत्यक्षात श्रीगणेशसहस्त्रनामामध्ये (गणेशपुराणांतर्गत - स्वतः श्री गणेशाने श्री शंकरांना त्रिपुरासुर युद्धामध्ये विघ्न हरण होण्यासाठी सांगितलेले) गणेशास विकर्ता (षड रिपुंचा प्रवर्तक) व षडवैरीवर्गविध्वंसी (षड रिपुंचा नाश करणारा असे) असे म्हटले आहे. गाणेश उपासनेतील बहुतेक सर्व (इतर देवतांच्या मुख्य ग्रंथामध्येदेखील) साहित्यात गणेश म्हणजेच ब्रम्ह असा अर्थ सांगितलेला आहे. फक्त श्रीगणेशसहस्त्रनामातच बरेच विचित्र वाटणारी नावे आहेत. गणेशाचे गण हे विघ्न करणारेच आहेत व बर्‍याच राक्षसांना ते शरण आल्यामुळे त्याने सोडून दिले आहे व जे उपासना करत नाहीत (फक्त गणेशोपासना नव्हे, इतर कोणत्याही प्रमुख देवतेची, ऐहिक नव्हे) त्यांच्या कार्यात विघ्न उपस्थित करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे जर त्याचे (तो सर्वांमध्ये आद्य व जेष्ठ असल्यामुळे) कार्यारंभी स्मरण. पुजन केले नाही तर त्याचे गण/तो विघ्न उत्पन्न करतात. अगदी शंकरांनाही याचा फटका बसलेला आहे. त्यांच्यापुढे आपण कोण? तेव्हा प्रामाणिकपणे किमान स्मरण करणे सोपे नाही का? (सविस्तर माहितीसाठी गणेशपुराण (मराठीतील अर्थापेक्षा मुळ रूपातच वाचणे अधिक योग्य आहे), मुद्ग्लपुराण व इतर गणेशविषयक साहित्य अभ्यासणे योग्य आहे. माझी अनेक मते गणेशपुराण मुळातून व अल्प रूपात मुद्गलपुराण वाचल्यानंतर गळून पडली आहेत . ) शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा