वेदांमध्ये गणपतीचे स्थान
💬 प्रतिसाद
(64)
व
विसुनाना
Wed, 05/13/2009 - 07:53
नवीन
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ |
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा||
आजच्या काळातील मंगलमूर्ती गणेश रूपाला / गजाननाला/ गणपतीला माझा नमस्कार असो.
'गणपती' ही इंद्र, वरुण, अग्नी, उषा, सूर्य या वैदिक , ब्रम्हा, विष्णू, महेश या पौराणिक देवतांपेक्षा अर्वाचिन असून तो मुळात विघ्नकर्त्या रुद्र,भूत, पिशाच्च, राक्षस आदि गणांचा प्रमुख होता हे नि:संशय. (वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिराच्या शेजारच्या एका गुंफेत (क्र. ३६? गणेश एका हाडांच्या सापळ्याच्या शिल्पाशेजारी विराजमान झाला आहे. त्याच्या रांगेत रुद्रादि गण आहेत.) काही काळापूर्वी गणेश पंथ नामक अघोरी तांत्रिक क्रिया करणारा पंथही हिंदू धर्मात अस्तित्वात होता असे संशोधनातून दिसते.
वैदिक ब्रह्मणस्पतिबरोबरचा त्याचा संयोग कोण्या सुपिक डोक्यातून झाला आहे. याला देवतांचे 'उन्नयन' असा शब्द आहे. हीच प्रक्रिया अनेक देवतांबाबत झालेली असून बरेच हिंदू 'देव' ग्रामदेवतांचे उन्नयन होऊन मुख्य हिंदू दैवत परंपरेत त्यांना स्थान मिळालेले आहे. (उदा. आदिमाया/शक्तीमातेची विविध रूपे, खंडोबा इ. पहा: रा.चिं. ढेरे यांचे देवताविज्ञानावरची अनेक पुस्तके.)
असे असले तरीही -
आज जनसामान्यात रुजलेले गणेशाचे सुखकर्ता, दु:खहर्ता, मंगलमूर्ती मोरया हे गोमटे रूप मनाला भावते.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 05/13/2009 - 19:31
नवीन
>>काही काळापूर्वी गणेश पंथ नामक अघोरी तांत्रिक क्रिया करणारा पंथही हिंदू धर्मात अस्तित्वात होता असे संशोधनातून दिसते.
विसूनाना, माझ्या माहितीनुसार, गाणपत्य संप्रदायात सहा पंथ असल्याची नोंद आनंदगिरिंच्या शांकर दिग्विजय या काव्यात सापडते. हे सहा पंथ आणि यांच्या उपास्य दैवताची नावे अशी,
१. महा - दैवत महागणपती
२. हरिद्रा - दैवत हरिद्रागणपती
३. उच्छिष्ट - दैवत उच्छिष्टगणपती
४. नवनीत - दैवत हेरंबगणपती
५. सुवर्ण - दैवत सुवर्णगणपती
६. संतान - दैवत संतानगणपती
गाणपत्य गणपतीस परब्रह्म मानून इतर दैवतांना त्या परब्रह्माचा अंश मात्र मानतात, आणि हा संप्रदाय वामाचाराचा अवलंब करतो, अशीही नोंद या काव्य ग्रंथात आढळते. श्री शंकराचार्यांच्या अद्वैतमताच्या प्रभावाखाली हा पंथ आल्याने आणि वामाचारी पूजा पद्धतीबद्दल लोकमानसांत असलेल्या समज - गैरसमजांमुळे ह्या पंथाची वाढ होऊ शकली नाही, असे काही संशोधकांचे मत आहे. गाणपत्यांना वैदिक ब्राह्मणवर्गात मानाचे स्थान नव्हते व वैदिक धार्मिक विधींमध्ये इतर ब्राह्मणांसोबत त्यांना बसू देऊ नये अशीही प्रवृत्ती होती. आद्य श्री शंकराचार्यांनी प्रचलित केलेल्या पंचायतन पूजेनंतर हे आपापसातील मतभेद कमी झाले, असे मत संशोधक मांडतात. गाणपत्य संप्रदायाचा उदय पाचव्या शतकानंतर आणि नवव्या शतकाअगोदर झाला, असे मत संशोधकांनी नोंदवले आहे. ह्या संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ म्हणजे गणेश पुराण.
श्रीमत्कृष्णानंद आगमवीश (१६ व्या शतकातील बंगालमधले कवी) यांनी आपल्या 'तंत्रसार' या ग्रंथामध्ये संकलित केलेल्या गणेश स्तोत्रात, गणपतीस ब्रह्मतत्व, आद्यदेव मानले आहे. या ग्रंथात, विभिन्न गाणपत्य संप्रदायांविषयी आणि महागणेश, हेरंबगणेश, हरिद्रागणेश आणि उच्छिष्टगणेश यांच्या उपासना पद्धती, मंत्र, ध्यान व पूजा पद्धती यांचे वर्णन सापडते.
उच्छिष्टगणपती - तंत्रसारातल्या वर्णनानुसार, हा गणपती रक्तवर्णी, चतुर्भुज, तीन डोळ्यांचा असून, त्याचं मस्तक जटामंडित असून, मस्तकावर चंद्र विराजमान आहे. रक्तवर्णी वस्त्रे परिधान केलेली असून, रक्तवर्णी कमळाच्या आसनावर तो बसला आहे, चेहर्यावर प्रसन्न हास्य आहे. उजव्या बाजूचा वरचा हात वरमुद्रा दाखवत असून, खालच्या हातात दात पकडलेला आहे. डाव्या बाजूचा वरील हातात पाश तर खालच्या हातात अंकुश आहे. नाना प्रकारचे अलंकार त्याने धारण केले आहेत.
उपासनेचा मंत्र दशा़क्षरी आहे. तो असा - ॐ हस्ति पिशाचिनी खे स्वाहा: |
तंत्रसारात म्हटल्याप्रमाणे या गणपतीचे पूजा विधान साधकाने उष्ट्या मुखाने आणि अशुचि अवस्थेत करावे. साग्रसंगीत पूजा करण्याची आवश्यकता नसून, मानसिक जप केला तरी चालते. गर्ग मुनींच्या सांगण्यानुसार, साधकाने निर्जन अश्या ठिकाणी, वनात बसून, रक्तचंदनाने माखलेला तांबूल खाताना या गणपतीची साधना करावी, तर भृगू मुनींच्या मतानुसार आराधना करताना फळे खाता खाता जप करावा. अजून एका मतानुसार मोदक खाताना जप करावा.
उच्छिष्टगणपतीचे उपासक कपाळावर तांबडा टिळा लावतात.
तुम्ही म्हणता तो पंथ हा का?
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 05/13/2009 - 08:16
नवीन
लेख आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया आवडल्या,
स्वाती
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Wed, 05/13/2009 - 10:04
नवीन
गणपतीचा उल्लेख वेदात असणे शक्य नाही... अथर्व वेदात एक वेळ शक्य आहे, कारण तो खूप नन्तर निर्माण झालेला आहे.. मूळ रुग्वेदातील देवता या उषा, सूर्य, अग्नी, वरुण अशा अमूर्त आहेत.... त्यान्ची पूजा होत नसे, तर त्याना यज्ञ करुन प्रसन्न केले जाइ. हा वैदिक धर्म होता..
मुळ भारतामध्ये शैव धर्म होता. तो शिव, विष्णु, गणपती, शक्ती अशा प्रतिमान्ची पुजा करी... आर्यानी वैदिक धर्म पसरवताना त्यात अनेक देवता.न्ची सर्मिसळ झालेली आहे... ही मिसळ ताकदीच्या जोरावर करून शैव धर्माला 'बाटवले' गेले की 'धार्मिक तेढ निर्माण होऊ नये' या ' उदात्त' हेतूने कुणी तरी हे केले, हे मात्र मला तरी अद्याप कळलेले नाही... पण वैदिक काय आणि शैव काय, हे दोन्ही धर्म एक्मेकानी 'बाटवलेले' आहेत, हे मात्र नक्की.. वैदिकानी यज्ञ सोडले व ते प्रतिमा पुजेच्या मागे लागले.... शैवानी वेदातील 'रुद्र' म्हणजेच शिव हे स्वीकारले. पुराणा.न्मध्ये तर हे सगळेच मिसळले.... जाणकारानी आणि प्रकाश टाकावा......
म्रुत्यु नन्तर दहन आणि पुरणे असे दोन प्रकार या एकाच ( ?) धर्मात आज आढळतात... याचे कारण हेच असावे.... जगाच्या पाठीवर बहुधा असे आढळणारा हिन्दु हा एक्मेव धर्म असावा.....
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 05/13/2009 - 17:33
नवीन
तायो मस्त लेख.
गणपती बाप्पा मोरया...:)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 05/13/2009 - 19:15
नवीन
लेख वाचून आपापले विचार मांडणार्यांचे, वाचकांचे, सार्यांचे आभार.
गणपती ही वैदिक देवता आहे किंवा नाही ह्याबद्दल अजून काही वाचनात आलेले, तेही वेळ असेल तसे मांडायला आवडेल.
कलोअ.
:)
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 05/14/2009 - 13:11
नवीन
छान लेख व उपयोगी चर्चा !
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 12/10/2010 - 05:18
नवीन
आत्ता जालावर या मंत्रा विषयी ॐ तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि l तन्नो दन्ती प्रचोदयात् lवाचन करण्याचा प्रयत्न करत असताना हा धागा दिसला.
यशो तायला वेळ मिळाल्यास अजुन बाप्पावर माहिती लिहता आली तर लिही, असं सांगावेसे वाटले. :)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 12/10/2010 - 11:08
नवीन
असेच म्हणतो. सुंदर लिहिलंय. गणपती ही वैदिक देवता आहे अथवा नाही यावर विस्तृत विवेचन वाचायला आवडेल.
- Log in or register to post comments
K
kamalakant samant
Sat, 12/11/2010 - 06:52
नवीन
गणेश हे दैवत वेदपूर्व, की वेदोत्तर की अलिकडचे यावर बरीच चर्चा होत आहे.
मला असे वाटते-
मूळ चैतन्य एकच.त्याचे आविष्कार अनेक.मूळ ओ॑कार म्हणजेच गणेश.
गणेशतत्व पूर्विपासूनच होते.पण त्याची पहिली अनुभूती श॑कर पार्वतीला झाली म्हणून ते जनक ठरले.
दूसरे उदाहरण द्यायचे झाले तर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धा॑ताचे देता येइल.झाडावरुन फळे आधीही पडत होती,
त्यामागील तत्व प्रथम न्यूटनला समजले.म्हणून त्या सिद्धा॑ताचा जनक ठरला.
तसेच गणेशतत्व हे पूर्वीही होते.
खुद्द भगवान श॑कर म्हणतात-विना नायकेन मया जातः पुत्रः=म्हणजे माझ्या पुढाकाराशिवाय मला पुत्रप्राप्ति झाली,
म्हणून तो विनायक.
याहून दुसरे काय उदाहरण देणार ?
श्री गणेशाच्या रुपाबद्दलही काही चर्चा झाली आहे.
त्याचे रुप रुपकात्मक का घेउ नये ?
मोठे डोके-प्रगाढ बुद्धी,लहान डोळे-सूक्ष्म निरिक्षण्,मोठे कान्-जास्त श्रवण,तो॑डासमोर सो॑ड्-साहजिकच
बोलणे कमी इत्यादि.
तो १४ विद्या,६४ कला॑चा स्वामी आहे.आम्ही तो लौकिक व पारलौकिक अभ्यासाने शोधणे गरजेचे आहे.
नुसत्या मराठी अक्षरा॑चा विचार केला तरी लक्षात येइल की ज्या अक्षरा॑ना काना आहे पर॑तु तो जोडलेला नाही
अशी तीनच अक्षरे आहेत्.ती म्हणजे ग,ण व श.
स॑गीतातील ग म्हणजे गोडवा.तोच गणेश.या प्रकारे सर्व कला वा विद्या॑मध्ये तो शोधता येइल.अभ्यास मात्र पाहिजे.
श्री गजाननाबद्दल कितीही लिहिले तरी स॑पणार नाहीं. नेति नेति हेच खरे.
स्वत: त्यात पडाव आणि समजून उमजून घ्यावे .
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 12/11/2010 - 06:55
नवीन
हे शिनमात म्हंत्यात का नाटकात?
- Log in or register to post comments
K
kamalakant samant
Sat, 12/11/2010 - 08:56
नवीन
वामन पुराण
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 12/11/2010 - 09:34
नवीन
गणेश हे शंकर आणि विष्णू यांचे कुलदैवत आहे असा संदर्भ मुद्गल पुराणात असलेल्या शकंरादीकॄत स्तोत्रात सापडतो...
सर्वेंषां पूज्यदेहाय गणेशाय नमो नमः ||४||
स्वानन्दवासिने तुभ्यं शिवस्य कुलदैवत |
आणि
विष्णवादीनां विशेषण कुलदेवताय ते नमः ||५||
योगकाराय सर्वेंषां योगशान्ति प्रदाय च ।
संदर्भ :--- http://sanskritdocuments.org/doc_1_index.html // gaNesha stotra // gajAnanastotra sha.nkarAdikR^ita
- Log in or register to post comments
र
रविंद्र प्रधान
Sat, 12/11/2010 - 11:25
नवीन
काही ठिकाणी स्त्रीरुपी गणेशाच्या मुर्ती आढळतात. त्यांना विघ्नेश्वरी असे संबोधले जाते. यांच्या बद्दल कोणी अधिक माहिती देईल का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2