दवबिन्दु,
एन आर आय भारतीयांना मतदानाचा हक्क नसतो...
मतदान करण्यासाठी ज्या मुख्य अटी आहेत त्यात प्रमुख अट ही आहे की
"मतदार भारताचा नागरीक असावा"
ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे त्यांनी मात्र नक्की आले पाहिजे. भारत भेट आणि मतदान यांचा समन्वय साधून विदेशात राहणार्या भारतीयांनी भारतयात्रा केली तर एका दगडात दोन पक्षी मारता येतील.
सागर
मला नक्की माहीती नाही
पण आमच्या ऑफिसात एक एन आर आय मॅडम आहेत.
त्या कोणत्या कॅटेगरीत येतात माहित नाही. पण त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये.
कोणाकडे खात्रीशीर माहीती असेन तर बरे होईन
(अ)ज्ञानात भर पडेन :)
सागर
नाय बा यन्ना रास्कला...
आम्च्या मॅडमचा जन्म भारतातलाच हाय
पण त्या अनिवासी भारतीय असल्यामुळे मतदानास पात्र नाहियेत.
बहुतेक त्यांच्याकडे दुसर्या देशाचे नागरिकत्व असल्यामुळे असेन
सागर
अवांतरः तुम्ही धोनी फॅन वाटते ;)
एन आर आय च्या व्याख्येविषयी खूप गैरसमज आहेत.
एन आर आय हा भारतीय नागरीक असेल किंवा नसेलही.
जर त्याच्या कडे परदेशी पासपोर्ट असेल तरी देखील जर भारतीय मुळ असल्यास तो एन आर आय असतो. मग अर्थातच त्याला मतदानाचा अधीकार नाही.
भारतीय मूळ म्हणजे तो स्वतः किंवा त्याचे आई वडील यापैकी एक, किंवा आजी आजोबा यंपैकी एक पुर्वी भारतीय होते.
पण जर त्याच्या कडे फक्त भारतीय पासपोर्टच आहे, आणि जर तो परदेशात रहात असेल, तर माझ्या माहीती प्रमाणे त्याला मतदानाचा अधीकार असतो. अर्थात भारतात येणे न जमल्यामुळे त्याला त्या अधीकाराचा उपयोग करता येत नाही.
अशा भारतीय नागरीकांना भारत सरकारने इन्टरनेट मतदानाची सोय उपलब्ध करून द्यायला हवी.
पोस्टल बॅलट जर सरकार ने सुरु केले
तर त्यांनाही माहित आहे की निवडणुकीत कोणाची वाट लागेल ते.
त्यामुळेच ऑनलाईन वोटींग अथवा पोस्टल बॅलट ची सोय आपले सरकार करत नाही
दुर्दैव आपल्या देशाचे... दुसरे काय?
आणि अनिवासी भारतीयांचे किती प्रकार आहेत ते आपल्या इतर अनिवासी भारतीय मित्रांपैकीच कोणीतरी सांगू शकेन :)
महत्वाचे दोन प्रकार आहेत.
१. Non-resident Indian (NRI) : भारतात जन्मलेले, पण देशाबाहेर रहाणारे भारतीय नागरीक.
२. Person of Indian Origin (PIO) : भारतीय वंशाचे लोक. (यांच्याकडे नागरिकत्व नसते, पण त्यांना भारतात येण्यासाठी विसा, वर्क परमिट यांची गरज पडत नाही) या प्रकारात पाकिस्तानी, बांग्लादेशी, श्रीलंकन नागरिक यांचा अपवाद आहेत.
मतदार यादीत नाव असेल तर NRIसुद्धा त्याच्या मतदारसंघात जाऊन मतदान करु शकतात.
अवांतर : सागर,तुझ्या ऑफिसातल्या मॅडम PIO असाव्यात किंवा त्यांनी मतदारयादित नावनोंदणी केलेली नसावी. :)
-संदीप.
काय'द्याच बोला.
अशा भारतीय नागरीकांना भारत सरकारने इन्टरनेट मतदानाची सोय उपलब्ध करून द्यायला हवी.
नेटावर मतदान करनारा तोच मानुस आसल आशी ग्यारंटी काय? इथ फोटो पाहातात, नाव पाहातात मगच बोटाला शायी लावतात.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
पन तुम्चा फ्रेंड्/अनकल/मावसबहिन अजून ईन्डियन पास्पोर्ट होल्ड करतात का? फायनान्शियली वेलऑफ आहेत ना?
मग पाच वर्सानी वोट करायला कायच प्रोब्लेम दिसत नाही जर त्याना वोटींग ईम्पॉर्टंट वाटत असलं तर
- चंबा
वन्स इन फाइव्ह इयरच कुठे असतात इलेक्शन्स? इलेक्शन्सतर त्याहिपेक्षा मोअर फ्रिक्वेण्टली होल्ड करतात ना!
आय मीन, पार्लियामेंटची वन्स इन फाईव्ह इयर होतात, शिवाय असेंब्लिची वन्स इन फाइव्ह इयर होतात, शिवाय तुमच्या स्टेटमधे विधानपरिषद (अरेरे, याला इंग्लीश शब्द आहे का, असला तर आठवला नाही) असेल तर वन्स इन सिक्स इयर्स डिग्री होल्डर्ससाठी व्होटींग होतं; मोअरओव्हर, लोकल गर्व्हनिंग बॉडीची इलेक्शन्सपण होतात ना वन्स इन फाईव्ह इयर्स! म्हणजे डिग्री होल्डर एनारायसाठीअबाऊट थर्टी इयर्समधे ट्वेंटी थ्री इलेक्शन्स होतात, जर स्टेबल गव्हर्नमेंट मिळालं तर!
टू ऍड टू धिस, कृषि उत्पन्न बाजार समिती आहे, ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, शेतसारा भरला जातो, त्यांना मोस्ट प्रॉबेबली तिथेही व्होटींग करता येईल, जिल्हा परिषद (झेड. पी. हो) आहे, स्वतःचं हाऊस हाऊसिंग सोसायटीत असेल तर तिथेसुद्धा जनरली सेक्रेटरी, चेअरमन या पोस्ट्ससाठी इलेक्शन्स होतातच की!!
असो. इथे निवासी लोकांना नाव मुंबैत असेल आणि नोकरी बंगळूरूत असेल तर मतदानासाठी मुंबैत जावं लागतं, ते सुद्धा सुट्ट्या काढून, जे शक्य होतंच/असतंच असं नाही. आपल्या बिरूटे सरांना निवडणूकीच्या कामामुळेच मतदान करता आलं नाही तर उगाच लंडन का फलटणवरून काय फरक पडणार आहे चिमटीभर लोकांनी मत न दिल्यामुळे??
अवांतर शंका: सीमेवरील जवान आणि सैनिकी अधिकारी यांच्या मतदानासाठी काही सोय आहे का?
आदिती ताईंशी पूर्णपणे सहमत आहे.
तसंही भारतात होते तेव्हा ३ वेळा निवडणुकीच्या कार्ड साठी अर्ज केला पण मिळालं नाहीच.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
>>>अवांतर शंका: सीमेवरील जवान आणि सैनिकी अधिकारी यांच्या मतदानासाठी काही सोय आहे का?
विचार करा निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार्या आपल्या बिरुटेसरांना मतदान करता आले नाही तर सैनिकांचे काय घेऊन बसलात? माझ्या माहीतीप्रमाणे त्यांना करता येत नाही. आपल्याकडे "गैरहजेरीत" मतदान करण्याची व्यवस्था नाही. (कोणी "हजर" नसले तर, त्यांच्या नावाने "गैर" मतदान करायची सोय कदाचीत असेलही!).
>>अवांतर शंका: सीमेवरील जवान आणि सैनिकी अधिकारी यांच्या मतदानासाठी काही सोय आहे का?
होय, तशी सोय असते. त्यांचे नातेवाईक (कागदपत्रांची पूर्तता करुन ) त्यांचे मतदान करु शकतात. त्याला प्रोक्सी मतदान असे म्हणतात.
>>निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार्या आपल्या बिरुटेसरांना मतदान करता आले नाही तर सैनिकांचे काय घेऊन बसलात?
कागपत्रांची पूर्तता (आळस) न केल्यामुळे मतदान करता आले नाही. ती माझी चूक !
-दिलीप बिरुटे
चूक दुरुस्ती तसेच माहीती दिल्याबद्दल धन्यवाद!
>>>कागपत्रांची पूर्तता (आळस) न केल्यामुळे मतदान करता आले नाही. ती माझी चूक !
आता विचार करा जर एका मताने जर भाजप/सेना/बसपा वगैरेंचा उमेदवार निवडून आला तर? ;)
कागपत्रांची पूर्तता (आळस) न केल्यामुळे मतदान करता आले नाही. ती माझी चूक !
सर, तुम्हाला प्रिसायडींग ऑफिसर (मराठी शब्द?) म्हणून काम करण्यासाठी काही कागदपत्रं, अर्ज भरावे लागलेच असतील? त्याचबरोबर, त्याच कागदांच्या भेंडोळ्यात आणखी चार कागद नाही का 'येऊ' शकत?? माणसं सरकारी कामासाठीसुद्धा आपल्या निवासस्थानापासून लांब असणार तर त्यांच्या मतदानाची सोय सरकारनेच, कमीत कमी त्रासात नको का करून द्यायला?
परदेश, परदेशी(?) म्हणून ओरडणं सोपं आहे. युकेमधे आपल्या घरी फॉर्म येतात. त्यात फक्त आपलं नाव टाकायचं, पाकिट बंद करायचं (पोस्टेज द्यायला लागत नाही) की आपल्या घरी निवडणूकीचं कार्ड येतं. मी, दुय्यम नागरीक काय, फक्त व्हीजावर तिकडे असताना, तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत मतदान करण्यास पात्र होते; एकही जादा पुरावा न दाखवता!!
हीच गोष्ट आपल्या लोकांसाठी आपण नाही करू शकत?
सर, तुम्हाला प्रिसायडींग ऑफिसर (मराठी शब्द?) म्हणून काम करण्यासाठी काही कागदपत्रं, अर्ज भरावे लागलेच असतील? त्याचबरोबर, त्याच कागदांच्या भेंडोळ्यात आणखी चार कागद नाही का 'येऊ' शकत??
त्याच कागदाच्या भेंडोळ्यात तीन कागदं होती. त्यांनीच जर ती जागेवर भरुन घेतली असती आणि त्यावर कार्यवाही करुन त्यांनी जाग्यावर मतदान करण्याबाबत पत्र दिले असते तर मतदान करता आले असते ! ( पण प्रत्येक कर्मचारी आपले काम हलके करायला पाहतात आणि मग सर्वच लांबत जाते)
>>प्रिसायडींग ऑफिसर (मराठी शब्द?)
केंद्राध्यक्ष
-दिलीप बिरुटे
त्यांनीच जर ती जागेवर भरुन घेतली असती आणि त्यावर कार्यवाही करुन त्यांनी जाग्यावर मतदान करण्याबाबत पत्र दिले असते तर मतदान करता आले असते ! ( पण प्रत्येक कर्मचारी आपले काम हलके करायला पाहतात आणि मग सर्वच लांबत जाते)
यू सेड इट! मला उत्तर मिळालं!
अवांतरः आपण ज्या ब्रिटीशांकडून ही सगळी सिस्टम उचलली, त्याच ब्रिटीशांच्या देशात पत्राद्वारे मतदान करता येतं. मतदानाच्या काही महिने/आठवडे आधी आपण पत्राद्वारे मतदान करणार असल्याचं कळवायचं; पुढे समग्र पत्रव्यवहार होऊन परदेशी असणार्या ब्रिटीश नागरीकांना मतदान करता येतं. घर, गाव/शहर बदललं की पुन्हा घरी येणारं एक पोस्टकार्ड भरून पाठवायचं; आधीच्या मतदारसंघातून आपलं नाव वजा होऊन नवीन पत्त्यावर आपलं नाव लगेच चढतं. दरवर्षी, निवडणूका असो अगर नसोत, हे पोस्टकार्ड घरी येतंच.
अतिअवांतरः शक्य होतं म्हणून पदरची एक सुट्टी घेऊन मी मतदानाला गेले. मतदानाच्या दिवशी सुट्टी होती तरी घरी बसून काम करत होते.
ह्या ओरिजिनल आर्टिकलकडे पाहिल्यावर ... इट इज अ बिट ऑफ वंडर समवन इज स्टिल, म्हणजे काय म्हणतात ते, ऑन द लूकआऊट फोर मराठी इ॑क्विवॅलंट्स!! वॉट अ शेम...
एक. एन. आर. आय. (यू नो, विथ राईट्स टू व्होट इन इंडिया ऍस वेल ऍस इन हिस कंट्री ऑफ डोमिसाईल)
मिस्टर प्रदीप, सॉरी हां, खरं तर मी स्क्रॅप टाकूनच सरांना क्वेश्चन करणार होते, बट आयनी असं थिंक केलं की इफ हियर क्वेस्चन आस्क केला तर ऑलनाच हा वर्ड क्नो होईल!
जाऊ दे आता मी फारच आऊट ऑफ कंटेक्स्ट (+आचरट) बोलत्ये इथे!!
खरंतर सकाळीच तुझ्या प्रतिसादाला दाद देणार होतो अदिती पण काहीतरी कामामुळे राहून गेले..
>> इथे निवासी लोकांना नाव मुंबैत असेल आणि नोकरी बंगळूरूत असेल तर मतदानासाठी मुंबैत जावं लागतं, ते सुद्धा सुट्ट्या काढून, जे शक्य होतंच/असतंच असं नाही.
धन्स !
'अभानि बॅशिंग' ही एक आवड होत चाललीय की काय असं वाटतं बरेचदा :)
तुला गुसखोरीबदल माफि दिलि पन कायतरी समजल आस लिहि कि जरा. विन्ग्रजीची न आपली जल्मापास्न दुश्मनि हाय. पु.ल. बोल्तात तस नारायनाचा विन्ग्रजापेक्शा विन्ग्रजी वर राग ज्यादा होता.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
छे बुवा!
तुमच्या इंडियात गरमी आणि धूळ किती असते. वोट करायला इंडियात यायचं म्हणजे काहीतरीच. शिवाय इंडियात पाण्याचा किती प्रॉब्लेम? आणि ते वोट करायला उन्हात लाईन लावायची म्हणजे फारच अपेक्षा तुमची बॉ.
खराटा
(देशी भारतीय)
त्याचा पेक्शा तिकड र्हाहुन इंटरनेटावर भारताच्या विशयी बोलन, इथल्या निवडनुकीविशयी उस्सुकता दाखवन, भारताच्या गरीबांन्च्या विशयी खोटा खोटा कळवला दाखवन सोप नाय काय. परत जेवा केवा आपल्या सोयीने भारतात यायाच तेवा भारताला नाव ठ्येवायला आपन मोकले.
हाटिलात र्हायच, बिस्लरी प्यायाच, गाडीतन हिंडायच आनी ज्या देशामधे आपल्याला शेकंड शिटीजन म्हनुन दर्जा आहे त्या देशाच गुनगान गायच. भले शाब्बास.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
कऽऽडक!!!!
काय बोल्लात राव :)
यन्ना रास्कला.....टैगरा!! मैंडिट्ट :D
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
निवासी भारतीयांच्या जीवनात तरी असा कितीकसा फरक पडतो.
विज , पाणी , आरोग्य , शिक्षण या मुलभुत सुविधांबाबत बोंब आहे ती आहेच ना , कोणतेही सरकार निवडुन आले तरी?
मग ते कशाला आपला वेळ आणि पैसा खर्च करतील?
मग इंटरनेटावर परदेशात र्हाहुन भारताविशयी बोलनच सोडा ना. पन ते पन नाही.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
भारत म्हणजे केवळ राजकारणी,लोकसभा,निवडणूक नाही.भारत त्यापेक्षा खूप मोठा आहे.
पोट म्हंजे पुर शरिर नाय पन पोटात जर काय पन टाकलच नाय तर शरिर कस काय चालनार. कश्ट करायचे त पोट भरलेल हवं.
चान्गला भारत हवा त आपल मतदान आपन करायच. आपन आरामात परदेशात बसायच आनि भारतात चान्गल शिश्टीम नाय म्हनुन बोलायच हे पन बरोबर नाय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
NRI (Non Resident Indian) : सलग १८० पेक्षा जास्त दिवसांपेक्षा जास्त काळ परदेशात राहणारा भारतीय नागरिक -- भारताचा पासपोर्टधारक -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क असतो -- उ.दा. अमेरिकेतील एच १, एच ४, बी १, स्टुडंट विजा, एल १ (किंवा अशा प्रकारचा) विजाधारक किंवा ग्रीन कार्डधारक
POI (Person of Indian Origin) : परदेशी नागरिक ज्याचे आई / वडील / आजी / आजोबा यांपैकी एक जण भारतीय आहे -- परदेशाचा पासपोर्टधारक (आणि भारतीय नागरिकत्व नाही) -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क नसतो -- उ.दा. अमेरिकेत जन्मलेले भारतीय नागरिकांचे मूल (टीप : प्रत्येक देश अमेरिकेप्रमाणे citizenship by birth देत नाही)
OCI (Overseas Citizen of India): परदेशात राहणारा NRI किंवा POI -- परदेशाचा पासपोर्टधारक -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसतो -- उ.दा. एखादी व्यक्ती जिने परदेशाचे नागरिकत्व घेतले आहे (आणि भारतीय नागरिकत्व सोडले आहे) किंवा एखादी व्यक्ती जी परदेशात जन्मली आहे
Disclaimer -- ही माहिती त्रोटक आहे आणि या माहितीच्या आधारावर कुठलेही विजा प्रोसेसिंगवगैरे करू नये ! तज्ज्ञ वकीलांशी संपर्क साधावा !!
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
सविस्तर व्याख्या आधीच लिहून माझा वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद! ;)
बाकी चर्चेतील मूळ मुद्यावरः
नक्की किती अनिभा आहेत आणि किती आता भारतीय वंशाचे (पहीली/दुसरी/पुढची पिढी) आहेत हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. यातील प्रत्येकाने जरी भारतात येऊन मतदान केले तरी भारतात राहून मतदान न करणार्या मध्यमवर्गाची जी काही टक्केवारी असेल त्याच्या कितीतरी पटीने कमी संख्या ही संपूर्ण अनिभाची भरेल. मग त्यांची विविध मतदारसंघात विभागणी केल्यास त्याचा एकूण मतदानसंख्येत आणि म्हणून निर्णयात फरक पडणार नाही.
तरी देखील असे मतदान अनिभांनी केले तर त्याचा एक अप्रत्यक्ष फायदा, तिथे राहून आळस करणार्यांवर होऊ शकतो. मी अगदी जवळून (आमच्या घरातून) मुद्दाम तिथे जाऊन नाही, पण तिथे असताना निवडणूका असल्यातर मतदान नक्की केले आहे (मग त्यावेळेस त्या गावात राहून मतदान नक्की करायचे).
बाकी मुद्दाम तेथे मतदानास न जाण्याची अनेक कारणे असू शकतातः
बर्याचदा अनिभांना त्यांच्या वेळा या कामकाजावरून, मुलांच्या शाळांवरून (येथे जूनच्या शेवटी सुट्टी चालू होते) तसेच आर्थिक गणिते बांधून ठरवाव्या लागतात. त्यात जर काही अजून ग्रीन कार्ड मिळण्याच्या प्रतिक्षेत असले तर अजूनच कायदेशीर प्रश्न असतात (हे अमेरिके संदर्भात, इतरत्र असेच मुद्दे असू शकतात). शिवाय प्रत्येकाकडे ओळखपत्रे असतीलच का हा अजून एक प्रश्न आहे.
बाकी अनिभा मग काय करू शकतात हा एक वेगळा चर्चा विषय आहे. त्यामुळे येथे अवांतर करत नाही...
प्रश्ण अनिभा कीती त्याचा अज्जिबात नाय तर शिकुन सवरुन परदेशात जायच, लोकान्मधे बडेजाव मिरावयचा (कोनी कोनी येनाराय हुन्डा बी टीच्चुन घ्येतात) पन साध नागरीक म्हनुन एक पन डुटी करायची नाय हा आहे. मंग तुमी कसले सुशिक्शित. तुमाला साक्शर म्हनाव का.
नागरीक म्हणून मतदान इतकेच कर्तव्य नसते, जरी ते एक महत्वाचे कर्तव्य नक्कीच आहे. घटनेने जशी सप्तस्वातंत्र्ये दिली तशाच अनेक जबाबदार्यापण दिल्या आहेत. त्यासंदर्भात मी माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणले आहेचः
बाकी अनिभा मग काय करू शकतात हा एक वेगळा चर्चा विषय आहे. त्यामुळे येथे अवांतर करत नाही...
तेंव्हा हवी असल्यास अनिभाच कशाला येथील प्रत्येकजण नक्की देशासाठी/समाजासाठी नक्की काय करतो यावर वेगळी चर्चा सुरू करा. आपण सर्वच त्यात भाग घेऊ.
बाकी शिकून-सवरून कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बडेजाव वगैरे मी तरी मारतो असे माझे विरोधकपण म्हणणार नाहीत. तुम्हाला तसे भेटले असले तर तो तुमचा अनुभव... मला असे अनेक भारतातील भारतीय भेटलेत की जे आम्हीच कसे शहाणे असा बडेजाव मारतात. विशेष करून अमेरिकेने मार खायचा अवकाश - ते गाढव ठरले रे ठरले की लगेच आम्ही घोडं म्हणून स्वतःला अपग्रेड करतो. अशा वेळेस मी आणि माझ्यासारखे इतर दुर्ल़क्ष करून सोडून देतात... अर्थात जे खरे स्वाभिमानी आणि आत्मविश्वास असलेले असतात त्यांना असल्या गोष्टींचे काहीच पडलेले नसते. मग ते कुठे का असेनात :-)
अगदी बरोबर!
विकास यांच्याशी सहमत.
विकास यांना भेटण्याचा योग आला तेंव्हा त्यांनी बडेजाव वगैरे मारला असे अजिबात वाटले नाही.
(मी त्यांची विरोधक नाही.)
(कोनी कोनी येनाराय हुन्डा बी टीच्चुन घ्येतात)
जे कोणी हुंडा घेतात त्यांना तुमच्या प्रतिक्रियेशी अजिबात घेणे देणे नसते.
माझ्या बघण्यात आजूबाजूला (दाक्षिणात्य सोडले तर...) एक पै हुंडा न देता मुलींची लग्नं झालेली आहेत. त्यात मीही आलेच.
अनेकांची लग्नं ठरणे आणि होणे यात आठेक दिवसच असल्याने जसं जमेल तसं (घराजवळच्या छोट्या हॉलमध्ये वगैरे..)लग्न झालेले अनेक सापडतील.
रेवती
आपन आरामात परदेशात बसायच आनि भारतात चान्गल शिश्टीम नाय म्हनुन बोलायच हे पन बरोबर नाय
मी तर भारतात रहाणारेच भारताविरुध्ध जास्त बोंबलताना पाहिले. बरेच अनिवासी(जास्त करुन मराठी/दाक्षिणात्य) भारताबद्दल बाहेरपण चांगले बोलतात असा माझा अनुभव आहे.
हाटिलात र्हायच, बिस्लरी प्यायाच, गाडीतन हिंडायच आनी ज्या देशामधे आपल्याला शेकंड शिटीजन म्हनुन दर्जा आहे त्या देशाच गुनगान गायच
हे तर ईकडे पण झाले आहेच की.उडप्याच्या हॉटेलात गेलात तरी वेटर पहिल बिसलेरी पिणार की साध पाणी हे विचारतोच.आणि राजकारणी,नोकरशहा,बिल्डर ह्या लोकाना आपण रोज शिव्या घालतोच की !!
भारतात रहा नाहीतर बाहेर रहा,तुम्ही प्रश्न सोडवताय की नाही हे महत्वाचे. बाहेर रहाणार्यानी गप्प रहायचे आणि भारतात रहाणार्यानी वाटेल ते बोलायचे हे मला योग्य नाही वाटत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
बाह्येर चान्गल बोलतात पन पेप्रामधी "माझे इंग्लडातील अनूभव", झालच तर पुस्तकामधे "अमेरिकन सन्स्क्रुति" अस काही बाही लिहुन भारताला नाव ठ्येवतात त्याच काय.
उडप्याच्या हॉटेलात गेलात तरी वेटर पहिल बिसलेरी पिणार की साध पाणी हे विचारतोच.
ह्ये बाटली पान्याच भुत भारतात कोनी आनल ? आमी तर आजुन बी हाटीलातल, ठेस्नावरल पानी पितो. आनी एका बुक्कीत नारल फोडतो. आमाला कोन्त पन पानी चालत. तुमच्या कीरकोल तब्येतीकड पाहुन वेटरबुवा विचारत आसल बाटलीवाल पानी आनु का.
बाहेर रहाणार्यानी गप्प रहायचे आणि भारतात रहाणार्यानी वाटेल ते बोलायचे हे मला योग्य नाही वाटत.
गप राहा कोन बोलतय पन नुस्ती फुकाची बडबड नको तिकीटी काडुन भारतात या मतदान करा आनि मग हव्व तेवड बोला.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
- NRI (Non Resident Indian) : सलग १८० पेक्षा जास्त दिवसांपेक्षा जास्त काळ परदेशात राहणारा भारतीय नागरिक -- भारताचा पासपोर्टधारक -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क असतो -- उ.दा. अमेरिकेतील एच १, एच ४, बी १, स्टुडंट विजा, एल १ (किंवा अशा प्रकारचा) विजाधारक किंवा ग्रीन कार्डधारक
- POI (Person of Indian Origin) : परदेशी नागरिक ज्याचे आई / वडील / आजी / आजोबा यांपैकी एक जण भारतीय आहे -- परदेशाचा पासपोर्टधारक (आणि भारतीय नागरिकत्व नाही) -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क नसतो -- उ.दा. अमेरिकेत जन्मलेले भारतीय नागरिकांचे मूल (टीप : प्रत्येक देश अमेरिकेप्रमाणे citizenship by birth देत नाही)
- OCI (Overseas Citizen of India): परदेशात राहणारा NRI किंवा POI -- परदेशाचा पासपोर्टधारक -- भारताच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसतो -- उ.दा. एखादी व्यक्ती जिने परदेशाचे नागरिकत्व घेतले आहे (आणि भारतीय नागरिकत्व सोडले आहे) किंवा एखादी व्यक्ती जी परदेशात जन्मली आहे
Disclaimer -- ही माहिती त्रोटक आहे आणि या माहितीच्या आधारावर कुठलेही विजा प्रोसेसिंगवगैरे करू नये ! तज्ज्ञ वकीलांशी संपर्क साधावा !! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com