Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)

स
समीरसूर
Mon, 06/01/2009 - 08:47
💬 102 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
54795 वाचन

💬 प्रतिसाद (102)
प
पर्नल नेने मराठे Mon, 06/01/2009 - 09:06 नवीन
मराठी माणूस का नेहमीच बापडा आणि बिचारा असतो? मराठी माणूस का नेहमीच भेदरलेला, चाचरत लाचारपणे अशुद्ध हिंदी बोलणारा असतो? हल्लि बद्ल्तेय चित्र रे!!! मी (ब्राह्मण) व माझी मैत्रिण (मराठा) एका फिलिपिनाशी बस मधे भान्ड्त होतो. इकडे फारसा चान्स मिळ्त नाही भान्डायला सो हात धुवुन घेत होतो. आणी भान्द्णात अस्ल्या तल्लिन झ्हालो कि मग मराठीत भान्डु लागलो. बसमधे ३-४ लोकानी टाळ्व्या वाजव्ल्या मग कळ्ले कि ते मराठीच होते. साग्नाय्चा मुद्दा अस्सा कि आम्हि अजिबात घाबरत नाही, भेदरत, चाचरत नाही. <):) चुचु
  • Log in or register to post comments
स
सुमीत Mon, 06/01/2009 - 09:21 नवीन
फक्त राजकारण आहे, जातीच्या नावावर स्वतः लोणी खाण्या साठी. ह्या लोकांना जसे शिवाजी महाराज कळत नाहीत तसे काँग्रेस वाल्यांना गांधी आणी दलित नेत्यांना आंबेडकर. पुतळे उभारा, दंगली करा पण त्यांची शिकवणी कडे मात्र कानाडोळा करा.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Mon, 06/01/2009 - 10:06 नवीन
फक्त राजकारण आहे, जातीच्या नावावर स्वतः लोणी खाण्या साठी.
ह्या मेटे लोकाना पवारांचा आशीर्वाद आहेच.द्वेष निर्माण करुन मराठा वोट बँक निर्माण करायचा हा डाव आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत
M
mamuvinod Mon, 06/01/2009 - 10:20 नवीन
मा. समिरसुरजी, एक उत्तम व अभ्यासु लेख. सगळ्या लोकाचे एकच मत येणार - हे फक्त जातीचे राजकारण थोरले महाराजाचा विजय असो
  • Log in or register to post comments
श
शार्दुल Mon, 06/01/2009 - 10:25 नवीन
हे फक्त जातीचे राजकारण,,,,,,,,, नेहा
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन Mon, 06/01/2009 - 11:43 नवीन
http://epaper.pudhari.com/epaperimages/3152009/3152009-md-pun-5/15734391.JPG कुणी कोणत्या जातीत जन्माला याव हे आपल्या हातात निश्चितच नाही. पण ज्या पद्धतीने बाबासाहेब पुरण्दरे यान्नी हिन्दु मुस्लिम द्वेश निर्माण होइल, स्वराज्य स्थापणेच्या प्रेरणे मागे ब्राह्मणच होते असा खोटा इतिहास सादर केला त्याला तुम्ही विरोध कर्णार की नाही ?? कि केवळ बाबासाहेब तुमच्या ज्ञातीचे आहेत म्हणुन मुक(/वरिल लेख) समर्थन करणार आहात काय ? १००% सत्य लिहिणार्या कुणाही ज्ञातीच्या व्यक्तीला या समितीवर नेमावे, त्याला कुणाचाही विरोध होणार नाही. केवळ काल्पनिक कथा रचुन शिव चरित्राचा विचका करनार्या व्यक्तिला काय म्हणुन तिथे नेमायचे? दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 06/01/2009 - 12:59 नवीन
शासनाने दादोजी कोंडदेव पुरस्कार मागे घेतला ही वस्तुस्थिती आहे. त्यावर बाबासाहेबांनी काही उत्तर दिलेले नाही हे अनाकलनीय आहे. पण त्याला जर "सांस्कृतिक दहशतवाद" म्हणत असतील (संदर्भ - पुढारीमधील बातमी), तर ब्रिगेडच्या वागण्याला काय म्हणायचं - तालिबानी दहशतवाद? शिवधर्म आणि ब्रिगेड एकच ना? मग तिथली धारणा, विचारसरणी आणि तालिबान यात काय फरक आहे? कुणाही ज्ञातीच्या व्यक्तीला या समितीवर नेमावे,त्याला कुणाचाही विरोध होणार नाही. दुसर्‍या एखाद्या ब्राम्हण व्यक्तीने तुमचे म्हणणे मान्य केले की दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास यांचा राज्याच्या घडामोडींमध्ये काही सहभाग नव्हता / ही काल्पनिक पात्रे आहेत (असाही आरोप केला आहे ना काही ठिकाणी?) ... तर त्यांना तुम्ही घ्याल का समितीवर? आणि ब्रिगेडने किंवा मराठा सेवा संघ / समन्वय समितीने घेण्यासाठी महाराष्ट्र / शिवाजी महाराज ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे का की माझ्या घराचे रचनाकार मीच ठरवणार? मला काही इतिहासाचे ज्ञान नाही. म्हणजे शालेय पुस्तके (जी पुरंदरे प्रभृती मंडळींनी लिहिलेली - खोटी) आणि ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया एवढेच स्त्रोत आहेत. मी काही तुमच्या प्रमाणे बखरी किंवा इतरी ऐतिहासिक दस्तावेज वाचलेले नाहीत. (बाबासाहेबांनी खोटा इतिहास लिहिला, काल्पनिक कथांनी शिवचरित्राचा 'विचका' केला असे अधिकाराने सांगणार्‍या व्यक्तीने मराठा इतिहासाचा सखोल अभ्यास केला असावा असे गृहीत धरायला हरकत नाही). ग्रँट डफ या अत्यंत नामवंत इंग्रज इतिहासकाराबद्दल आपलं काय मत आहे ते कळावे म्हणजे पुढे चर्चा करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
म
मनीषा Mon, 06/01/2009 - 15:18 नवीन
पण ज्या पद्धतीने बाबासाहेब पुरण्दरे यान्नी हिन्दु मुस्लिम द्वेश निर्माण होइल, स्वराज्य स्थापणेच्या प्रेरणे मागे ब्राह्मणच होते असा खोटा इतिहास सादर केला त्याला तुम्ही विरोध कर्णार की नाही ?? हा शोध तुम्ही कुठुन लावला ? काही संदर्भ /पुरावा देउ शकाल का? बाबासाहेब पुरंदर्‍यांनी जो इतिहास लिहिला आहे तो त्यांनी सप्रमाण लिहिला आहे . अनेक माहित असलेल्या कथा पण ज्यांना पुरावे देता येणार नाही त्या त्यांनी त्यांच्या शिवचरित्रात सांगीतलेल्या नाहीत. कुठेही उगीच वायफळांचा मळा पिकवला नाहीये . त्यांनी शिवाजीची डोळस भक्ती केली आहे. त्यांनी स्वतः अनेक वेळा सांगीतले आहे की ते शिवाजीला देव मानत नाहीत पण अनेक संशोधनांनंतरही त्यांच्या चारित्र्यात कुठेही खोट अढळत नाही. ज्यांना कुणाला काही माहित असेल त्यांनी पुराव्यानिशी सांगावे मग ते मान्य करतील ... पण आज पर्यंत असे कोणीही केले नाही. बाबासाहेबांनी कधीच कुठल्याही धर्माच्या/जातीच्या बाजूने अथवा विरुद्ध विधाने केलेली नाहीत त्यामुळे असे विधान करणे चुकीचे आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
अ
अमोल केळकर Mon, 06/01/2009 - 12:30 नवीन
समीर, खूप छान आणि मनापासून लिहिले आहेस -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Mon, 06/01/2009 - 12:33 नवीन
हा प्रतिसाद सात वेळा टाकण्यात आला आहे. हे मुद्दाम केले आहे की काही तांत्रिक चूक आहे हे कळत नाही. असो. त्याने मजकुरातही काही फरक पडत नाही आणि सत्यातही! १. स्वराज्य स्थापनेच्या मागे ब्राह्मणच होते फक्त यावरच बाबासाहेबांनी आयुष्यात लक्ष केंद्रित केले होते असे मला वाटत नाही. शिवाजी महाराज हाच त्यांचा ध्यास आणि श्वास होता हे सर्वज्ञात आहे. आणि या संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी काय तीनशे-साडे तीनशे वर्षे मागे प्रवास करून सत्य शोधून काढले आहे काय? २. या मुद्यावर शांतपणे तोडगा काढता येऊ शकतो. हाणामारीची भाषा एका ज्येष्ठ अभ्यासकाविरुद्ध करणे याला गुंडगिरी म्हणतात आणि ही शिवरायांची संस्कृती खचितच नाही. या संघटनांचा उपयोग अधिक विधायक कार्यातही होऊ शकतो याबद्दल मत काय? सतत हाणामारी आणि विध्वंसक कारवायांमध्येच या संघटना आणि त्यांचे हे विघ्नसंतोषी नेते गुंतलेले असतात हे खरे नाही काय? ३. १००% सत्य लिहिणारी व्यक्ती सत्य कुठून शोधून आणणार? टाईम मशिनद्वारे त्याला शिवशाहीत पाठवून सत्य जाणून घेण्याची काही योजना आहे का 'संभाजी ब्रिगेड' किंवा 'मराठा सेवा संघा'कडे? की फक्त मराठा व्यक्ती त्या पदावर बसवली की ती १००% सत्यच (म्हणजे शक्य तेवढ्या ब्राह्मणांना शिव्या देईल, समर्थ रामदासांना शिव्या घालेल, संत ज्ञानेश्वरांना शिव्या घालेल असेच ना?) सांगेल असा दृढ विश्वास आहे या समस्त विद्वान मंडळींना? ४. फक्त ब्राह्मणांचे खच्चीकरण करायचे, त्यांना शिव्या द्यायच्या, त्यांच्यातल्या चांगल्या लोकांचा, इतिहासात होऊन गेलेल्या थोर पुरुषांचा (सावरकर, गोखले, समर्थ रामदास इत्यादी) देखील अतिशय खालच्या पातळीवर उतरून अपमान करायचा ही शिवरायांना रुचेल अशी संस्कृती आहे असे मत आहे काय खेडेकर, मेटे आणि गायकवाड या प्रभृतींचे? उलट ब्राह्मण असा अपमान झाला तरी आपल्या संस्कारांमुळे शांत राहतात आणि आपल्या संस्कृती नुसार रस्त्यावर उतरून हिडीसपणा करत नाहीत आणि तेच योग्य नव्हे काय? ब्राह्मणांना कधी असे शिवाजी महाराज, संत तुकाराम किंवा डॉ. आंबेडकर किंवा म. फुले यांच्याविरुद्ध निष्कारण तोंडाची वाफ दवडतांना पाहिले आहे काय? हे शहाणपण या विद्वान नेत्यांना आणि मुर्खासारखे त्यांचे अनुकरण करणार्‍यांना कसे येत नाही? ५. मी वर नमूद केल्याप्रमाणे समस्त मराठी जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्रधर्म पुढे नेण्यात या नेत्यांना कमीपणा वाटतो काय? ६. परप्रांतीयांच्या आक्रमणाच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार आहे काय? इतरही महत्वाचे प्रश्न मराठी जनतेसमोर असतांना ही जातीयतेची विषारी फळे चाखून कुणाचे भले होणार आहे? का नाही कधीच या संघटना कुठले रक्तदान शिबीर आयोजित करत, का नाही कधी विदर्भात जाऊन शेतकर्‍यांना मदत करत, का नाही पूरासारख्या आपत्तीच्या काळात जीव ओतून काम करत, का नाही कधी अनाथ मुलांना खाऊ आणि खेळणी वाटत? असली कामे करणे कमीपणाचे वाटते का त्यांना? की त्यातून पराक्रम दिसून येत नाही? की उगीच कुणालाही धोपटायचे यात शौर्य वाटते त्यांना? काहीतरी खुस्पट काढून ब्राह्मणांना त्रास द्यायचा आणि होणारे काम बिघडवून टाकायचे याखेरीज या संघटनांना आणि त्यांच्या प्रसिद्धीला हपापलेल्या नेत्यांना दुसरे काहीही येत नाही. पण असला नाठाळपणा पुढे केधीच कामात येत नाही हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. देव त्यांना मदत करो! --समीर
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/01/2009 - 12:42 नवीन
अगदी शंबरावर शंबर टक्के सहमत. बाकी, ह्या मराठी 'मुजाहिद्दीन' विचारांच्या कोत्या मनोवृत्तीच्या संस्कृतीहीन कळपाची पत्रास ती काय बाळगायची? ह्यांना काही भरीव, 'क्रिएटिव्ह' करणं जमत तर नाहीच...पण कोणी काही केलं की त्यात विचका करायला मात्र पुढं. नुसती राखी सावंतगिरी! असं कोणी विचारत नाही ना, मग तसं तमाशा करु, 'बद ही सही, नाम तो हुआ' अशी गत ह्यांची. ह्यांना काय कळावेत बाबासाहेब पुरंदर्‍यांचे कष्ट? काय कळाव्यात त्यांनी संशोधनासाठी खाल्लेल्या खस्ता? कोणीतरी काहीतरी लिहिलेल्या चार पत्रावळ्या वाचायच्या आणि त्यावर उफराटी बिनबुडाची मतं हेतुपुरस्सर बनवुन बोळ्याभाभड्यांच्या माथी मारायची. बाकी, राडे तमाशे करायला उपाशी-रिकामा तरुण आहेच हाताशी. जाऊ द्या! काय बोलायचं? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
इ
इनोबा म्हणे Mon, 06/01/2009 - 12:49 नवीन
धमालराव आणि समीर यांच्याशी अगदी सहमत. बाकी 'संभाजी ब्रिगेड' किंवा त्यांच्या भाऊबंदांबद्दल आम्ही काय बोलावे? ज्या शंभूछत्रपतींनी हिंदू धर्मासाठी बलीदान केले त्यांच्याच नावाने चालणारी ही संघटना हिंदू धर्मच खोटा आहे म्हणते. यावरुनच यांची काय ती अक्कल कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मैत्र Mon, 06/01/2009 - 12:55 नवीन
ज्या शंभूछत्रपतींनी हिंदू धर्मासाठी बलीदान केले त्यांच्याच नावाने चालणारी ही संघटना हिंदू धर्मच खोटा आहे म्हणते. यावरुनच यांची काय ती अक्कल कळते. जबरदस्त मुद्दा !! केवळ अशक्य विचारधारणा आहे या ब्रिगेड वाल्यांची! संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं, तुळापूरला उत्सव करायचा ... आणि म्हणायचं हा धर्मच खोटा!! म्हणजे जिजाऊंची शिवनेरीच्या शिवाईची श्रद्धा खोटी, का राजांची रोहिडेश्वराची शपथ खोटी, का प्रतापगडाची महाराष्ट्राची भवानीदेवी खोटी का अखिल मराठ्यांची जेजुरी खोटी, का संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती खोटी ? इतकं विलक्षण वागतात आणि विधाने करतात आणि आम्ही मराठी / मराठा आहोत म्हणतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
आ
आम्हाघरीधन Mon, 06/01/2009 - 13:03 नवीन
धर्मवीर नव्हेच .......... एकीकडे धर्मवीर म्हणायचे अन दुसरीकडे 'दारुबाज, बाईल्वेडा'. शम्भुराजेन्चे बलिदान हे स्वराज्या साठी होते, जनतेच्या राज्या साठी होते , धर्मासाठी नाही. त्याना धर्मवीर म्हणुन त्याना केवळ एका धर्मापुरता मर्यादीत करताना मनाला वेदना होतात. ते सर्व धर्मीय जनतेचे राजा होते हे सत्य मानाल कि नाही. प्रत्यक्ष औरन्ग्यापुत्र त्यान्च्या शरणी आला होता ते त्यान्च्या निधर्मी वागणुकी मुळेच हे ही विसरलात काय? दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 06/01/2009 - 13:21 नवीन
महाराजांचे नाव जिथे जिथे आहे तिथून हे विशेषण काढून टाकाल? आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा तुळापूरला कार्यक्रम झाला तेव्हा त्यांना धर्मवीर असं संबोधलं नव्हतं? धर्मवीर म्हणजे धर्माचे रक्षण करणारा लढवय्या... याचा अर्थ दुसर्‍या धर्मांवर हल्ला करणारा कट्टर नव्हे. हेही खरे की शंभूराजे लढले स्वराज्यासाठी.. पण धर्मासाठी बलिदान दिले हाही इतिहास खोटा आहे का? इतर धर्मातल्या अनुयायांशी समभावाने वागणे असेल तर तो मनुष्य धर्मवीर असू शकत नाही का? प्रत्यक्ष औरन्ग्यापुत्र त्यान्च्या शरणी आला होता -- हे निधर्मी वागणूकीमुळे का महाराजांनी औरंगजेबाला शह देण्यासाठी केलेली ती एक जबरदस्त खेळी होती. आणि राजांच्या व मराठी राज्याच्या शक्ती मुळे त्याला असे वाटले की औरंगजेबाशी लढू शकेल असा एकच राजा आहे आणि त्यांचे सहाय्य घेण्यासाठी तो आला. यात धर्म कुठे आला? त्याना धर्मवीर म्हणुन त्याना केवळ एका धर्मापुरता मर्यादीत करताना मनाला वेदना होतात - मग याच युगपुरुषांना ज्या धर्मात त्यांनी आयुष्य घालवलं आणि ज्यासाठी लढले त्यातल्या जाती पोटजातीमध्ये मर्यादित करताना त्याहून जास्त वेदना व्हायला हव्यात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
म
मनीषा Mon, 06/01/2009 - 15:25 नवीन
धर्मवीर का म्हणता येणार नाही ? औरंगझेबाने त्यांना सांगितले होते कि धर्म बदलला तर प्राण तर वाचतीलच , आणि मोठी जहगिरी / सरदारी मिळेल . पण ते मान्य न करता त्यांनी अतिशय क्रुरपणे दिला गेलेला मृत्यु स्विकारला ... आणि ते स्वतः महाराष्ट्र धर्मासाठीच तर लढत होते ना? (संभाजी आणि शिवाजी महराजांची राजवट ही धार्मिक सहिष्णूता जोपासणारी होती .... )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
आ
आम्हाघरीधन Mon, 06/01/2009 - 13:06 नवीन
उलट ब्राह्मण असा अपमान झाला तरी आपल्या संस्कारांमुळे शांत राहतात आणि आपल्या संस्कृती नुसार रस्त्यावर उतरून हिडीसपणा करत नाहीत आणि तेच योग्य नव्हे काय? किती सत्य वदता आहात? ०% . अशी किती तरी उदाहरणे देता येतील. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/01/2009 - 13:28 नवीन
>>अशी किती तरी उदाहरणे देता येतील. द्या! पण सप्रमाण सिध्द करुन दाखवा म्हणजे झालं. नाहीतर नुसत्या फुसकुल्या सोडायच्या आणि अंगावर बेतलं की पळून जायचं असलं करु नका म्हणजे मिळवली. द्याच उदाहरणं. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
छ
छोटा डॉन Mon, 06/01/2009 - 13:39 नवीन
चालायचेच धमाल राव ... तुम्ही उत्तरांची अपेक्षा ठेवलीत याचेच आम्हाला आश्चर्य वाटले, सोडुन सोडा हो, हे काय उत्तर देणार ??? काहितरी बिनबुडाची भडखाऊ आणि उपयोगशुन्य जातीयवादी विधाने करायची, ४ त्याहुन बिनबुडाच्या पुस्तकांचे दाखले द्यायचे, ब्राम्हणांच्या नावाने बोटे मोडायची आणि एवढे करुन "शिवाजी आणि संभाजी"सारख्या सुर्यप्रत महान व्यक्तींना लाज आणायची असले ह्यांचे धंदे ... जाऊ द्या, सोडुन सोडा ... राहु द्या ह्यांना त्यांच्याच कोषात. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
समीरसूर Tue, 06/02/2009 - 08:31 नवीन
किती उदाहरणे देऊ शकता तुम्ही? मागे एकदा पुरुषोत्तम खेडेकर यांनी समर्थ रामदासांना अद्वातद्वा शिव्या घातल्या होत्या. कारण काय तर ते ब्राह्मण होते म्हणून. तेव्हा कुठला ब्राह्मण रस्त्यावर उतरून 'संभाजी ब्रिगेड' सारखी मारामारी आणि गुंडगिरी करत हिंडला होता? आता देखील बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकावर कारण नसतांना चिखलफेक होत असतांना ब्राह्मण काही कुणाच्या घरात घुसून हाणामारी करत नाहीयेत. हा मक्ता 'संभाजी ब्रिगेड', 'मराठा सेवा संघ' आणि मेटेंच्या 'शिवसंग्राम' असल्या गुंडप्रवृत्तीच्या संघटनांचा आहे. मागे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत शिरून त्यांनी जो तमाशा केला होता त्यासाठी तर त्यांना रासुका लावायला पाहिजे. ब्राह्मण कधीच समुदाय निर्माण करून असले संस्कृतीहीन वर्तन करत नाहीत हे त्रिवार सत्य आहे. मी सांगीतले त्याप्रमाणे त्याला बरीच कारणे आहेत. माझ्या लेखात ती कारणे मी नमूद केली आहेत. माझे कित्येक मराठा मित्र देखील हा जो खेडेकर महाशयांनी धर्म बदलणे, इतिहास बदलणे असला खुळचटपणा चालवलेला आहे त्याला कडाडून विरोध करतात. भविष्याची चाहूल घेऊन एक चांगले जीवन जगायचे की असला दहशतवाद पोसून सामान्यांचे जगणे अवघड करायचे हे देखील खेडेकर, मेटे, गायकवाड आणि चोंदे यांना कळत नसेल तर त्यांना तो धडा तरूण, धडाडीच्या मराठा युवकांनी शिकविण्याची गरज आहे. लालू प्रसाद बिहारमध्ये विकास न करता गुंडशाहीच्या जोरावर आणि जातीयतेच्या बळावर निवडणुका जि़कण्याची गुर्मीची भाषा करत होते. तिथल्या लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. तसे या खेडेकर वगैरेंच्या बाबतीत होणे गरजेचे आहे. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असा पवित्रा घेऊन विनायक मेटे मराठ्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा तो मिळाला की मग राजकारणात घुसून वाट्टेल तशी लूट करायला ते मोकळे; मग कुठले शिवाजी आणि कसली शिवशाही!! असा त्यांचा आणि या सगळ्या स्वार्थी नेत्यांचा डाव आहे. --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
न
नितिन थत्ते Mon, 06/01/2009 - 13:09 नवीन
महाराजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' असे पहिल्यांदा कुणी म्हटले? महाराज स्वतःला तसे म्हणवून घेत होते काय? ब्राह्मणांचा प्रतिपाळ हे महाराजांच्या मनातील कर्तव्य होते काय? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 06/01/2009 - 13:46 नवीन
त्याचे कसे आहे खराटासाहेब की त्या काळात गाय ही हिंदु धर्माची धार्मिक मानबिंदु समजली जायची, गायीवर संकट मह्णजे समस्त हिंदुधर्मावर हल्ला असे असायचे, म्हणुन तर मुस्लिम आक्रमकांनी देवळे फोडल्यावर त्याच्या समोर गाय मारुन हिंदु धर्मावर आक्रमण केले. असो. आता विषय राहिला "ब्राम्हणांचा" , तर त्या काळात म्हणजे सुमारे ४००-५०० वर्षे मागे ब्राम्हण हे फक्त आणि फक्त धार्मिक कार्य करत होते, धर्माची सर्व कमान ह्यांच्याकडुन संभाळली जायची. धर्मरक्षक, धर्माची व्याख्या करणारे, मार्गदर्शन करणारे असे ते ब्राम्हण होते. अर्थात सर्वच नाही पण पैठण, काशी, आळंदीचे वगैरे नक्की होते ... आता स्वधर्मरक्षा करायची म्हणजे वरील बाबींचे संरक्षण आले. आता ह्यालाच "गोब्राम्हणप्रतिपालक" म्हटले तर दुखते कुठे ? का केवळ विरोधासाठी विरोध करणार आहात ? असो, चालु द्यात, आम्हाला आता राग वगैरे येत नाही पण कीव वाटते. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढची सुशिक्षीत पिढी नक्की देईल. त्यांनी ह्या सर्व जात्यंधाना "तुम्ही आम्हाला लाज आणलीत" असे नाही सुनावले तर विचारा आम्हाला. तोवर चालु द्यात .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 06/01/2009 - 14:31 नवीन
(मी दुसर्‍या धाग्यावर स्मारक बांधण्याची काय गरज आहे असे विचारले आहे) स्मारक बांधायचेच असेल तर कोणीही त्या समितीत असायला काहीच हरकत नाही. पुरंदरे देखील असूद्यात. मी नुसतेच प्रश्न विचारले आहेत. त्यातला महत्वाचा प्रश्न महाराज स्वतःला गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवत होते का? हा आहे उत्तर माहीत असेल त्यांनी द्यावे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Mon, 06/01/2009 - 14:42 नवीन
आपल्या वरील प्रतिसादावरुन आपल्याला "पहिल्यांदा कोण म्हणले" ह्याच मुद्द्यात स्वारस्य आहे असे दिसते आहे. म्हणण्यामागचा व "उपाधी"मागचा अर्थ आपण चक्क "दुय्यम" मानता असे माझे प्रथमदर्शनी मत झाले आहे. मला अर्थ आणि उपयोग जाणण्यात जास्त इंटरेस्ट असल्याने मी प्रतिसाद तसा लिहला. बाकी कोणी म्हणले हा मुद्दा माझ्यालेखी क्षुल्लक असल्याने मी त्याचा विचार केला नाही, शोध घेतला नाही, त्याची गरज वाटत नाही. आपल्याला ह्याचे जरुर उत्तर मिळेल अशी शिवचरणी प्रार्थना ... बाकी, मुळ प्रतिसादातले "प्रेषक खराटा ( सोम, 06/01/2009 - 16:39) . महाराजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' असे पहिल्यांदा कुणी म्हटले?" हे वाक्य आणि माझ्या प्रतिसादानंतर "महाराज स्वतःला गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवत होते का? " असे विचारणे ह्यातील विसंगती समजली नाही. असो, ते जास्त महत्वाचे नाही. आता त्या काळी बहुतांश लेखन करणारे, बखरी लिहणारे, इतिहास लिहुन ठेवणारे हे देशातले म्हणताल तर बहुतांश ब्राम्हण ( मराठी, बंगाली, दक्षिणी, उत्तरेतले वगैरे ... ) अथवा इंग्रज् फ्रेंच डच आदी असे होते. आता ह्या मुद्द्याचा वापर " ब्राम्हणानीच गोब्राम्हणप्रतिपालक पदवी बळेबळे बहाल केली" असा चुकीचा अर्थ लावण्यास होऊ शकतो. असो, त्यालाही आमच्या लेखी जास्त महत्व नाही ... अवांतर : का हो, जसा "ऍट्रासिटी कायदा" आहे तसे इतर जातींविषयी भडकावु आणि बिनबुडाची विधाने तसेच आरोप करण्याला विरोध करण्यासाठी कोणता कायदा आहे का ? ------ (सुस्पष्ट )छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 06/01/2009 - 14:55 नवीन
दुरुस्ती. पहिल्यांदा कोणी म्हटले असे विचारल्यावर त्याचे उत्तर त्याकाळातील लेखकांनी असे आले तरच महाराज तसे म्हणवत होते का? या प्रश्नाला अर्थ उरतो. आणि जर हा उल्लेख अलिकडचा असेल तरच मोटिव्हचा आरोप करता येईल. असा आरोप बिनबुडाचा आहे का? हे पाहण्यासाठीच प्रश्न विचारले आहेत. >>का हो, जसा "ऍट्रासिटी कायदा" आहे तसे इतर जातींविषयी भडकावु आणि बिनबुडाची विधाने तसेच आरोप करण्याला विरोध करण्यासाठी कोणता कायदा आहे का ? माहीती नाही. पण असला तर तो माझ्यावर लागू शकणार नाही. मी (माझ्याखेरीज) इतर जातीविषयी भडकाऊ विधाने कधीही करीत नाही. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Mon, 06/01/2009 - 15:32 नवीन
>>असा आरोप बिनबुडाचा आहे का? हे पाहण्यासाठीच प्रश्न विचारले आहेत. ओके, हेतु समजला. जाणाकार ह्याचे उत्तर देतीलच. वर स्पष्ट केल्याप्रमाणे आम्हाला ह्या मुद्द्यात जास्त इंटरेस्ट नसल्याने आम्ही चौकशी केली नाही, आम्हाला तुर्तास माहित नाही. कोणाला पक्की माहिती असल्यास सांगावे ... >>पण असला तर तो माझ्यावर लागू शकणार नाही. मी (माझ्याखेरीज) इतर जातीविषयी भडकाऊ विधाने कधीही करीत नाही. तुमच्याबद्दल नाही हो खराटाशेठ, मी जनरल विचारतो आहे, तुम्ही आरोप केले असे मा केव्हा म्हटले ? मी आपली जनरल चौकशी करत आहे, गैरसमज नसावा ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आम्हाघरीधन Mon, 06/01/2009 - 13:19 नवीन
महाराजान्नी निर्माण केलेले राज्य हे सर्व धर्मीय सर्व जातीय जनतेचे राज्य होते हे सप्रमाण सत्य असतान्ना ते अचानक 'ब्राह्मणप्रतिपालक' कसे काय झाले!!!!! छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे. जर हे सत्य सान्गने कुणाला द्वेश वाटत असेल तर आहोत आम्ही द्वेशी असेच म्हणावे लागेल. अफझल खानाचा वध वर्णिताना क्रिष्ना भास्कर कुलकर्नी झाकावा, गागाभट्टाची खोटी कथा घुसवुन राज्याभिषेकाला विरोध ब्राह्मण ज्ञातीने केला हे झाकावे. असे पराक्रम पुरन्दरे यानी केले नाहीत असे छातीठोक पणे कुनीही सान्गावे. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 06/01/2009 - 13:25 नवीन
उगाच आपले कैच्याकै...पुरंदरे अश्या सो कॉल्ड खोट्या कथा का लिहितील वा घुसवतील? त्यांचा (किंवा कोणाचाहि) त्यात काय फायदा? उगाच आपले काहिहि बोलायचे हि ब्रिगेडी टोळक्याची अन टाळक्यांची सवयच आहे म्हणा ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
न
निखिल देशपांडे Mon, 06/01/2009 - 13:27 नवीन
मला एक कळत नाही तुम्ही म्हणता तसा पुरंदरेनी सर्व इतिहासाचे ब्राम्हणीकरण केले असेल तर मग त्यावर आताच का वाद??? बाबासाहेब मागचे ८६ वर्ष फक्त शिवचरित्रावरच काम करतात मग आधी त्यांना विरोध नव्हता???जाणता राजाला तर सर्व मराठा नेत्यांनी अतिथी म्हणुन हजेरी लावलिच असेल मग आताच हा मुद्दा का??? दर वेळे प्रमाणे विधानसभा निवडणुकिच्या तोंडावर महाराजांचे नाव घेउन काही तरी वाद घालायचा आणी मत विभाजन करायचे. ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
म
मैत्र Mon, 06/01/2009 - 13:37 नवीन
ब्राम्हण काही राज्यकर्ते वतनदार नव्हते. ज्या ज्या वतनदारांनी, सरदारांनी महाराजांना विरोध केला त्यांचे काय? का राजे फक्त आदिलशहा आणि मुघलांविरुद्ध लढले. स्वकीयांचा विरोध हा इतिहास खोटा आहे का? शहाजीराजांना अटक करण्यात अफझलखानाला साथ देणारे मराठे नव्हते काय? निंबाळकर, मुधोळकर घोरपडे, शिर्के, जावळीचे मोरे, मामा मोहिते, महाराजांचे सावत्र भाऊ, हे सगळे काय ब्राम्हण होते काय? मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे -- प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वरांशी ब्राम्हण समाज कसा वागला होता हेही सर्वश्रुत आहे. ब्राम्हण समाजात हेकट आणि शास्त्राधारावर मोठेपणा करणारे अनेक नग होते. हो पण थोरल्या महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी धर्मशास्त्राचा मोडता घालणारे काही बिनडोक ब्राम्हण वगळता कोणी विरोध केला ते सांगाल का? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राम्हण होता हे तर पुरंदरे यांनी पण लिहिलं आहे. आणि महाराजांनी त्यामुळे अभय देऊनही त्याने तलवार चालवली व नंतर त्याला मारले गेले हे तर पुरंदरे यांनी लिहिलं आहे. कुठे झाकलं आहे? का नाव बदललं आहे? पण याच प्रसंगात महाराजांचे वृद्ध वकील गोपीनाथपंत उर्फ पंताजी बोकील हे कुठल्या जातीचे होते? ते का झाकलं जात आहे? वकीली / चिटणीशी हा पेशा होता बलुतेदारांसारखा. ते सर्व तर ब्राम्हणच होते ना. इतकी वर्ष त्यांनी महाराजांची इमाने इतबारे चाकरी केलीच ना? ज्यांच्यामुळे महाराजांचे आयुष्य आणि स्वराज्य टिकले ते बाजीप्रभू देशपांडे कुठल्या जातीचे होते? का हाही इतिहास खोटा आहे? महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातल्या ब्राम्हणांचे काय? त्यांचा पुढचा इतिहास माहीत आहे आणि सत्य आहे पण त्यांनी शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी केलेले काम कमी होते का? किंवा त्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला काय विरोध केला? आग्र्याहून सुटका झाल्यावर औरंग्याने पकडून ज्यांचे हाल केले आणि तरीही त्यांनी एक शब्दही काढला नाही ते दोन ब्राम्हणच होते ना? ज्यांच्या संगतीने महाराज राजगडापर्यंत आले ते संन्याशी काय होते? मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला -- हे तर इतिहासात नसावं ... यांच्याशी लढण्यात महाराजांचं आयुष्य गेलं. हेन्री ऑक्झिंडेन आला ते स्वराज्याच्या शक्तीमुळे, समर्थन होते म्हणून नाही. याच इंग्रजांनी करार मोडून सिद्दी जौहरला तोफा पुरवल्या होत्या ज्यामुळे महाराजांचे प्राण किंवा स्वराज्य तरी धोक्यात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/01/2009 - 13:50 नवीन
मैत्रा, समीरसूर, धमु, छोटा डॉन, ऋषिकेश इत्यादी मित्रांनो
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
पुरावे नसताना किंवा न देता आरोप करणे, कायद्याच्या राज्यात हिंसेच्या, हात तोडण्याच्या धमक्या ८६ वर्षाच्या माणसाला देणे (भले तो माणूस अभ्यासक असेल वा रंक) याला मनाचा भाव म्हणायचं का याचं उत्तर द्या आधी!! शिवाजी महाराज हिंदूंचे राजे नव्हते तर मग मुसलमान आक्रमकांविरुद्ध तलवार का उचलली त्यांनी? आणि छत्रसाल बुंदेल्यांना मदत का केली? एका विचारांचा पुरस्कार म्हणजे दुसर्‍या विचारांचा आणि विचारकांचा खातमा असा होतो का? शिवरायांच्या पदरी इब्राहिमखान गारदी होताच, पण तो 'आपला' होता, आणि औरंगजेब, निजामशहा हे परकीय आक्रमक होते. तसेच टोपीकर इंग्रज आणि जंजीर्‍याचा सिद्दीसुद्धा! आजही आपल्याला शिवाजीमहाराजांना शिकवलं कोणी यावरून वाद घालायची गरज आहे का जातीपाती मोडून काढण्याची? शिवाजीमहाराजनामक सूर्याला 'तो कोणाचा' असे प्रश्न विचारून लाज आणायची वेळ आहे का आपण त्यांचे आदर्श उचलून, जातीभेद विसरून, धर्मभेद सोडून देऊन आपले आणि परके ओळखण्याची वेळ आहे? मराठ्यांच्या या (सो कॉल्ड, कारण सगळे मराठे यांना थोडीच मानतात!) मूठभर नेत्यांना स्वतःचं अस्तित्त्व जाणवून देण्याची राजकीय गरज असेल, पण आपण का या परप्रकाशित लोकांना मोठं बनवत आहोत? खंडोजी खोपड्याला शिक्षा झाली हा इतिहास आठवायचा का कोणी गद्दार सुटला हा इतिहास??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Mon, 06/01/2009 - 14:11 नवीन
सर्व ब्राम्हण जणू महाराजांचे विरोधकच होते असा बुद्धिभेद करणार्‍या आणि ८६ वर्षाच्या आदरणीय व्यक्तीला हात तोडण्याच्या धमक्या देणार्‍या लोकांना विरोध केलाच पाहिजे. जर त्यांच्याशी तात्विकच विरोध आहे यांचा तर तत्त्वानुसार शिवचरित्रासाठी आणि महाराष्ट्र धर्म जागृत ठेवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल आदर हवा आणि दोन इतिहासकारांनी आपले मुद्दे घेऊन भांडावं... पण इतके तत्त्वनिष्ठ आहेत का हे लोक? इतकी सरळ वृत्ती आहे का? सरळ सरळ हिंदु धर्म विरोधी आहेत... ब्रिगेडने खरंच जाहीर करावे की महाराष्ट्रातल्या सर्व दैवतांच्या अस्तित्वाला यांचा विरोध आहे. बरं होईल. असलं नसलं समर्थन ताबडतोब खतम! 'मारावे अनुल्लेखे' हे अशा वृत्तीला पुरेसे होत नाही. हे जेव्हा सिद्ध होते की ही वृत्तीच खराब आहे मग लोकांचा बुद्धिभेद होत नाही. सिंहगडावर तानाजी मालुसरेंचा पुतळा पाहून आत्ताच्या पिढीतल्या कोणाही सामान्य ब्राम्हणाची छाती अभिमानाने आणि विलक्षण आदराने भरून येते. मग घोडखिंड पाहून बाजीप्रभूंच्याबद्दल या ब्रिगेडवाल्यांना तसा आदर का वाटत नाही? असे मुद्दे काढून जे ब्राम्हणांवर आगपाखड करत आहेत आणि खुद्द महाराजांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला व ज्यांनी महाराजांना हाल सोसून, मरण पत्करून साथ दिली अशा लोकांना नजरे आड करत आहेत त्यांच्या हे लक्षात का येत नाहीये की ते चक्क खुद्द शिवाजी महाराजांवर, त्यांच्या कर्तृत्वावर अविश्वास दाखवत आहेत?? याहून मोठा गुन्हा तो काय? त्यामुळेच यांचे म्हणणे खोडून काढणे ब्राम्हणाचे तर सोडा प्रत्येक मराठी माणसाचे ज्याला महाराजांबद्दल आणि स्वराज्याच्या इतिहासाबद्दल आदर आहे त्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
छ
छोटा डॉन Mon, 06/01/2009 - 13:58 नवीन
मैत्रभौ, एकदम खणखणीत प्रतिसाद ... अहो पण कुणाला सांगत आहात ? तुम्हाला अशी अपेक्षा आहे का ही लोक आपल्या म्हणण्यावर जरासुद्धा विचार करतील ? तसे असते तर असे वाद झालेच असते का ? सोडुन सोडा हो, जाऊ द्यात ...
छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे. जर हे सत्य सान्गने कुणाला द्वेश वाटत असेल तर आहोत आम्ही द्वेशी असेच म्हणावे लागेल.
=)) =)) =)) =)) अतिशय उच्च विनोद आहे हा ...!!! आमच्या तर डोळ्यासमोर चित्रसुद्धा आले लगेच. महाराजांचा राज्याभिषेकावेळी इंग्रज हे तोरण वगैरे बांधत असुन गडाची सजावट वगैरे करत आहेत, झालेच तर शोभेची दारु वगैरेचा मक्ता इंग्रजांकडेच आहे, त्यांचे नेटनेटक्या कपड्यातले एक घोडदळ गडाला पहारा देत आहे. मुस्लिमांचे काय सांगावे, महाराज मुस्लिमांविरुद्द नव्हतेच त्यामुळे हा मुद्दा बाद आहे. महाराजांचा विरोध हा मुस्लिम दिल्लीश्वर राज्यकर्त्यांना होता. असो, तर मुस्लिमही काम करत होते असे मानु आणि तसे होतेच. मात्र ... मात्र ब्राम्हण हे गडाखाली निदर्शने करत होते, जमल्यास आक्रमक होऊन गडावर चालुन यायचा त्यांचा विचार होता पण देशप्रेमी इंग्रजांमुळे ते जमले नाही , तरी काही टवाळ ब्राम्हण तरुणांनी खालुनच आपल्या घोषणा चालु ठेवल्या. शेवटी त्यांना राखेचे तोबरे देण्यात येऊन विरोध मोडुन काढण्यात आला.... वा वा, काय कल्पनाविलास आहे ... उच्च विनोद आहे बरं, धो धो हसलो ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
न
नितिन थत्ते Mon, 06/01/2009 - 14:57 नवीन
>>महाराजान्नी निर्माण केलेले राज्य हे सर्व धर्मीय सर्व जातीय जनतेचे राज्य होते हे सप्रमाण सत्य असतान्ना ते अचानक 'ब्राह्मणप्रतिपालक' कसे काय झाले!!!!! अचानक म्हणजे कधी झाले? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
म
मनीषा Mon, 06/01/2009 - 15:37 नवीन
गो ब्राम्हण प्रतिपालक म्हणजे धर्माचा रक्षणकर्ता ... गाय, ब्राम्हण ही हिंदू धर्माची प्रतिक आहेत.. आणि मराठा , दलित इ. सर्व हिंदूच आहे... पण धर्मरक्षक म्हणजे फक्त हिंदूचा राजा आणि इतर सर्व धर्मांचा द्वेष्टा असा नाही ... धर्मरक्षक याचा अर्थ त्यांच्या राजवटी मधे सर्व धर्मांना रक्षण होते .. असा आहे . महाराजांनी कुठल्याही मुसलमानाला हिंदू केले नाही .. त्यांनी कुठलीही मशीद तोडली नाही. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात ब्राम्हण, मुसलमान, मराठा असे सर्व लोक होते. त्यांनी नेहमी गुणवत्ता आणि निष्टेला महत्व दिले ... जातीपतीचे राजकारण/ समाजकारण केलेले नाही. (हे सर्व बाबासाहेंबानीच त्यांच्या शिवचरित्रात लिहिले आहे... आणि तरी त्यांच्यावर इतके आरोप केले जात आहेत )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
न
नितिन थत्ते Mon, 06/01/2009 - 15:49 नवीन
हे सगळे मान्यच आहे. तरीही गाय हे हिंदूधर्माचे प्रतीक हे ठीक पण ब्राह्मण हे हिंदूधर्माचे प्रतीक कसे? महाराज गोब्राह्मणप्रतिपालक 'अचानक' म्हणजे कधी झाले? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/01/2009 - 18:57 नवीन
छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे. जर हे सत्य सान्गने कुणाला द्वेश वाटत असेल तर आहोत आम्ही द्वेशी असेच म्हणावे लागेल एक काम करा धुळ्याला शंकर कृष्ण देव यांचे समर्थ ग्रंथालयात जा तिथे संभाजीराजे आणि समर्थ रामदास यांच्यात जो काही थोडा पत्रव्यवहार झाला (कारण शिवाजीमहाराजांच्या निर्वाणानंतर फार थोडा काळच रामदास हयात होते.) त्याचे अस्सल कागदपत्र मिळतील. हवे तर कागदपत्रे मिळवून वाचा, हवेतर त्याचे कार्बन डेटींग करा आणि त्याचा खरेपणा शोधा. त्यावर संभाजीराजांची मुद्रा आणि सही आहे. त्यात संभाजीराजे असे म्हणतात 'आबासाहेबांप्रमाणे आम्हासही गोब्राम्हणप्रतिपालक बिरुद मिरवावेसे वाटते. असे वाटते घाला घालावा व काशी विश्वेश्वरादी क्षेत्रे मुक्त करावी' आणि ती पत्रे वाचल्यावर सांगा जे वरती तुम्हास वाटते ते खरे आहे का खोटे. आणि तरीही जे वरती तुम्ही लिहीले हे तुम्हास सत्य आहे असे वाटत असेल तर तुम्ही द्वेशीच नाही तर मूर्खही आहात. कृष्णाजी भास्कराचा उल्लेख तुम्हाला शिवचरित्रात मिळाला नाही. अरेरे, नीट वाचाहो पुस्तक. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
म
मैत्र Tue, 06/02/2009 - 06:02 नवीन
अफझल खानाचा वध वर्णिताना क्रिष्ना भास्कर कुलकर्नी झाकावा ब. मो. पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकात कृष्णाजी भास्कर वकीलाने राजांवर वार केला हे लिहिलं आहे. मग कोणी आणि कुठे झाकलं? बरं हे तुम्हाला माहीत नाही असं कारण नाही. श्रीमंत कोकाटे लिखित - राजांचे खरे शत्रु कोण या पुस्तकात पान ७ वर त्यांनी चक्क हा संदर्भ दिला आहे! म्हणजे पुरंदरे यांनी एका घातकी वकीलाबद्दल सरळ लिहिले तर ते खरे - इतके की त्यांना विरोध करताना उलट त्यांचाच संदर्भ देता येतो आणि त्यांनी लिहिलेले बाकीचे खोटे? याच पुस्तकात सेतुमाधवराव पगडी आणि कोणी एक बेंद्रे यांच्या शिवचरित्र अभ्यासाचे संदर्भ आहेत - हे दोन्ही ब्राम्हण होते का? नावावरुन वाटते. त्यांच्या इतिहास संशोधनाचा संदर्भ घेतला तर चालतो का? पुन्हा एकदा तोच मुद्दा की इतिहासात विविध प्रसंगी काही लोक जे ब्राम्हण होते ते काही अयोग्य / स्वराज्याविरुद्ध किंवा फक्त आपल्या स्वार्थापुरते वागले म्हणून गेल्या सातशे वर्षातले सर्व ब्राम्हण हे नालायक आणि घातकी आहेत. मूळात भारतभर असलेला हिंदू धर्मच साफ चुकीचा आणि त्याज्य आहे म्हणणे इतके टोकाचे आहे की याला समान उपमा देणेही शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
च
चिन्या१९८५ Tue, 06/02/2009 - 12:07 नवीन
छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे त्याचबरोबर अनेक मराठा सरदारांनी विरोध केला हे तु का झाकतोस??शिर्के,घाटगे,मोरे,निंबाळकर,मोहिते,दळवी,सावंत या आणि इतर मराठा सरदारांनी शिवराज्याभिषेकास विरोध केला कारण त्यांच्यामते शिवाजी महाराज आणि ते एकाच लेव्हलचे होते.स्वतः इतिहास झाकायची कामे करायची आणि दुसर्‍यांवर आरोप करायचे. अफझल खानाचा वध वर्णिताना क्रिष्ना भास्कर कुलकर्नी झाकावा पुरंदर्‍यांनी लिहिलेल्या आनि सांगितलेल्या शिवचरीत्रात कृष्णाजी भास्कराचा स्पष्ट उल्लेख आहे आणि त्याला महाराजांनी सांगुनही तो थांबला नाही म्हणुन महाराजांनी त्याच्यावर प्रतिहल्ला केला हेही आहे.उगाच पुरंदर्‍यांचे शिवचरीत्र न वाचता काहीही पसरवु नकोस. गागाभट्टाची खोटी कथा घुसवुन राज्याभिषेकाला विरोध ब्राह्मण ज्ञातीने केला हे झाकावे शिवराज्याभिषेकाच्या वेळी २०००० ब्राह्मण गडावर उपस्थित होते.याचा अर्थ त्यांचा राज्याभिषेकास विरोध नव्हता.काही ब्राह्मणांनी विरोध केला म्हणुन सगळ्याच ब्राह्मणांनी विरोध केला असे म्हणायचे असेल तर काही मराठ्यांनी विरोध केला म्हणजे सगळेच मराठे राज्याभिषेकाच्या विरुध्द होते असे म्हणायचे का?? जयसिंघराव पवारांचे मत तरी तुम्हाला मान्य आहे का.आता हे वाचा की प्रा.पवार याबद्दल काय म्हणतात ते- जयसिंगराव पवारांची राज्याभिषेकाबद्दलची मते प्रा.जयसिंगराव पवार आपल्या 'छत्रपती शिवाजी महाराज' अरुंधती प्रकाशन्,कोल्हापुर या पुस्तकात शिवराज्याभिषेकावरही प्रकाश टाकतात.ब्रिगेडच म्हणन आहे की शिवाजी महाराजांनी स्वतःला 'राजे' हे पद लावुन घेण्यासाठी राज्याभिषेक केला.पण हे लोक विसरतात की शिवराज्याभिषेकापुर्वी ६ वर्षापुर्वीच औरंगजेबाने शिवरायांना 'राजा' हा किताब दिला होता. शिवरायांनी राज्याभिषेक का केला यावर प्रा.पवार आपल्या पुस्तकात प्रकाश टाकतात्.पृष्ठ १२७ वर 'शिवराजाभिषेक सोहळा' या भागामध्ये राज्याभिषेकावर सविस्तर विवेचन केलेले आहे.त्यात ते लिहितात राजाभिषेक हा एक असामान्य दिवस होता. हिंदु समाजाच्या इतिहासात आलेला हा असा वैभवशाली दिवस होता.या युगात सर्वत्र मुसलमान राजे.आम्हा हिंदुंना राजे होता आले नाहींअव्हे होता येणारच नाही अशा न्युनगंडाने पछाडलेल्या हिंदु समाजात महाराजांनी राजाभिषेक करुन नवचैतन्य निर्माण केले.आणि अशा हिंदु समाजास ब्रिगेड सोडत आहे,नव्हे हिंदुंमधील नवचैतन्यासच ब्रिगेड विरोध करत आहे. पुढे प्रा. पवार लिहितात गुप्तकालानंतरच्या काळात राजाभिषेक केल्याचे हिंदु समाजास माहीत नव्हते आणि देवगिरीच्या यादवांनंतर महाराष्ट्रात खरेखुरे राजपदही नाहीसे झाले होते.खुद्द महाराजांचे वडीलही 'राजे' पद लावत्.परंतु त्यांची सत्ता मुसलमान राजासारखी नव्हती.ते मुसलमान राजांचे चाकर होते.महाराजांना असे राजपद नको होते.त्यांना खरेखुरे राजपद्,स्वतंत्र राजेपण्,हवे होते.आदिलशहा,कुतुबशहा,मोघल्,पौर्तुगिज्,इंग्रज यांच्यासाठी महाराज म्हणजे जहागिराचा बंडखोर पुत्र,राज्यातील एक बंडखोर्,लुटारि मनुष्य होते.एव्हढेच नव्हे तर महाराष्ट्रातील मोरे,दळवी,सुर्वे,निंबाळकर इत्यादी मराठे महाराजांना आपल्याप्रमाणेच आदिलशहाचे चाकर समजत होते.त्यांच्या कागदपत्रात याबद्दल अनेक पुरावे उपलब्ध आहेत्.महाराजांना राजाभिषेकाने हे दाखवुन द्यायचे होते की,प्रस्थापित मुसलमानी राजवटींविरुध्द बंडखोरीची पायरी महाराजांनी ओलांडली असुन त्यांनी 'मराठी राज्याची' स्थापना केलेली आहे व ते आदिलशहा-मोघल यांच्यासारखे हिंदुंचे राज्यकर्ते (बादशहा) बनले आहेत.एव्हढेच नव्हे तर राजाभिषेक करुन महाराजांना मुसलमानी सत्ताधिशांना हा इशारा द्यायचा होता की आता हिंदुंचे राज्य निर्माण झालेले आहे, त्यांना त्यांचा अभिषिक्त राजा मिळाला आहे.आणि येथुन पुढे हिंदुंवर होणारा अन्याय व जुलुम सहन केला जाणार नाही.तसा तो झाला,तर अन्याय व जुलुम करणार्‍यास हिंदुंची सत्ता ,हिंदुंची बादशाही,हिंदुस्तानात प्रस्थापित झालेली आहे.ती स्वतंत्र्,सार्वभौम आहे.राजाभिषेक हे सार्वभौमत्वाचे लक्षण होते. त्यानंतर प्रा.पवार राजाभिषेकातील गागा भट्टाच्या प्रकरणाबद्दल लिहितात्.त्यात ते लिहितात कि अकबराच्या काळात कृष्ण नृसिंह शेष याने कलियुगात क्षत्रियच नाहीत असा सिध्दांत मांडला होता आणि त्याचा प्रभाव हिंदुस्तानातील हिंदु जनतेवर होता.महाराष्ट्रातील काही ब्राह्मण पंडितही त्यास अपवाद नव्हते.यामध्ये विश्लेशण करताना प्रा.पवार हे दाखवुन देतात की राजाभिषेकास फक्त काही ब्राह्मणांचा विरोध होता.पण ब्रिगेड मात्र 'सर्व ब्राह्मणांचा राज्याभिषेकास विरोध होता' असा साफ खोटारडा प्रचार करते आहे.प्रा.पवार हे ही लिहितात की दळवी,सुर्वे,निंबाळकर्,मोहिते या मराठे सरदारांचाही शिवराज्याभिषेकास विरोध होता.जर काही ब्राह्मण राज्याभिषेकाच्या विरोधात होते म्हणुन सर्वच ब्राह्मण विरोधात होते असे म्हटले जाते तर काही मराठ्यांवरुन सर्वांवरच तसा आरोप का केला जात नाही??इतरही ब्राह्मण राजाभिषेकास अनुकुल कसे होते हे प्रा.पवारांच्या पुढील लिखाणातुन स्पष्ट होते.त्यामध्ये शिवरायांच्या कुळाचा इतिहास तपासण्यासाठी पाठवलेल्या ब्राह्मणांचा उल्लेख प्रा.पवार करतात महाराजांनी आपल्या पदरी असलेले बाळाजी आवजी,केशवभट्ट पुरोहीत्,भालचंद्रभट इत्यादी पंडीतांचे शिष्टमंडळ उत्तरेतील जयपुर,अंबर्,काशी याठिकाणी पाठवले.या शिष्ठमंडळाने जयपुरचे राजघराण्यातुन सिसोदिया कुलाची शिवाजी महाराज याच वंशातील आहेत हे सांगणारी वंशावळ प्राप्त केली.पुढे हे मंडळ काशीला गेले ;तेथे हिंदु जगतामध्ये प्रसिध्द असलेल्या गागा भट्ट या महापंडीताला त्यांनी महाराजांच्या वतीने राजाभिषेकाचे आर्ध्वयत्व स्वीकारण्याची वनंती केली आणि ती त्यांनी मानली.विश्वेश्वर उर्फ गागा भट्ट यांचे मुळ घराणे महाराष्ट्रातील पैठण या गावचे होय्.या घराण्यात अनेक महापंडीत होउन गेले होते.खुद्द गागा भट्ट हा हिंदु जगतातील एक सर्वश्रेष्ठ पंडित समजला जात असे. हिंदु धर्मशास्त्र व तत्वज्ञानात त्याच्या तोडीचा कोणी पंडित हिंदुस्तानात नव्हता. हिंदु जगतामध्ये 'ब्रह्मदेव' व 'व्यास' अशा नावांनीच तो ओळखला जात जाई.अशा महापंडिताला महाराजांनी राजाभिषेकास पाचारण केले होते.गागा भट्ट आल्यानंतर आपल्या अलौकिक विद्वत्तेने व बुध्दिचातुर्याने त्याने ज्या मंडळींनी राजाभिषेकास विरोध केला होता त्यांच्या शंकांचे निरसन करुन समाधान केले आणि पुढील समारंभाच्या तयारीस तो लागला.ब्रिगेड व इतर ब्राह्मणद्वेशी असा खोटा प्रचार करत आहेत की महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी राज्याभिषेक करण्यास विरोध केल्याने गागा भट्टास आणले गेले.त्याला प्रा.पवारांनी वर उत्तर दिलेले आहे की गागा भट्ट हा सर्वश्रेष्ठ पंडित असल्याने त्याला राज्याभिषेकास आणले गेले व त्याला महाराष्ट्रात आणणार्‍या शिष्ठमंडळातही महाराष्ट्रातील ब्राह्मणच होते. त्यानंतरच्या परीच्छेदात प्रा.पवार लिहितात की महाराजांनी चिपळुणला जाउन परशुरामाचे दर्शन घेतले.ज्या परशुरामाचे महाराजांनी जाउन दर्शन घेतले त्याला ब्रिगेड शिव्यांची लाखोली वाहते.म्हणजे महाराज चुक होते असे ब्रिगेडचे म्हणने आहे का??तसे असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे.पृष्ठ १२९ वर राजाभिषेक सोहळ्याचे वर्णनही प्रा.पवार करतात्.ब्रिगेड ज्याचा विरोध करते त्या गणेशाचे पुजन करुन राजाभिषेकास सुरुवात झाली हे प्रा.पवार लिहितात्.पुढील पृष्ठावर ते लिहितात की छत्र धारण झाल्यानंतर गागा भट्ट व इतर ब्राह्मणांनी महाराजांना शुभाशिर्वाद दिला,पंतप्रधान मोरोपंतांनी महाराजांना मुजरा करुन ८००० होनांचा अभिशेक केला. जर हे सगळे ब्राह्मण राज्याभिषेकाच्या विरोधात होते तर त्यांनी असे कशाला केले असते?? महाराजांच्या राज्यात देश्,धर्म यांची कुठलीही भावना नव्हती असे ब्रिगेड म्हणते.त्यांनी प्रा.पवारांचे पृष्ठ १३२ वरील विवचन वाचावे. ते लिहितात चैतन्यहीन गोळ्यासारखा हिंदु समाज पडुन होता ,त्यात शिवाजी राजाच्या राजाभिषेकाने चैतन्य भरले,जिवंतपणा आणला. हिंदुंचे राजपद निर्माण केले.आपल्या समाजास उन्नत केले.इस्लामी सत्तेला यशस्वीपणे आव्हान देणारी हिंदुंची एक सामर्थ्यशाली सत्ता म्हणुन हिंदुस्तानातील सर्व जातीजमाती महाराजांच्या राज्याकडे आता पाहु लागल्या.राजाभिषेकाने अशा राज्याची राजशास्त्रीय आणि धर्मशास्त्रीय दृष्ट्या खरी स्थापना झाली.ब्रिगेड इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे शिवजयंती व शिवराज्याभिषेक दिन साजरा करुन शिवराज्याभिषेक शकास विरोध करतात. त्या शिवराज्याभिषेक शकाबद्दल प्रा.पवार लिहितात महाराजांनी या समारंभाचे ऐतिहासिक महत्व चिरकाल रहावे ,यासाठी राजाभिषेकापासुन राजाभिषेक शक सुरु केला.शक सुरु करणे म्हणजे सामान्य बाब नाही.शक सुरु करणे म्हणजे नवे युग सुरु करणे.अखिल हिंदु समाजात व हिंदवी राजकारणात या राजाभिषेकाने नवे युग सुरु झाले आहे,हेच महाराजांना या शकाच्या निर्मितीने घोषित करावयचे होते. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
र
राघव Wed, 06/03/2009 - 20:50 नवीन
अप्रतीम..!! चिन्याशेठ, अत्युच्च प्रतिसाद! तुमचा इतिहासाचा गाढा अभ्यास मागेही दिसलेला आहेच. शतशः धन्यवाद. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Sat, 06/06/2009 - 10:54 नवीन
धन्यवाद्.पण आम्हा घरी धन ने उत्तर तर दिलेलेच नाही. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
आ
आम्हाघरीधन Mon, 06/01/2009 - 13:40 नवीन
मराठ्याना फक्त आणि फक्त राजकारणी घोषीत केले नाहीत याबद्दल धन्यवाद. राजकारण आणि इतिहास यात गल्लत करता आहात............ मराठे बोलताना दिसले की राजकारण आहे असे नेहमीच का भासते तुम्हाला ?? की जाणिवपुर्वक तसे भासविता? आम्ही सर्व पक्षीय आहोत तसे सामाजिक सन्घटनेच्या आन्दोलना बाबत सर्व पक्षान्ना फाट्यावर मारणारेही आहोत. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/01/2009 - 14:12 नवीन
पुढारीमधल्या दुव्यांना लिकवून काय उपेग? विचार कसा सर्व बाजुंनी व्हायला हवा की नाही? चला, आम्हीच मदत करतो तुम्हाला: http://www.saamana.com/2009/June/01/AGRALEKH.HTM हे घ्या! आता हे वाचा नीट! नुसतं वाचु नका तर समजुन घ्या! मनन करा त्यावर आणि मग सांगा, काय ते :) चालेल? - (अजुनही आपल्या सप्रमाण सिध्द करता येण्याजोग्या "अशी किती तरी उदाहरणे " ह्यांच्या प्रतिक्षेत) धमालराव देशमुख-पाटील. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
प
परिकथेतील राजकुमार Mon, 06/01/2009 - 14:24 नवीन
एक मानसीक अत्यावस्थ संघटनेच्या तेव्हड्याच अत्यावस्थ समर्थकाची आणी काही 'प्रस्थापीत बामण प्रभुतींची' झुंज बघुन , मनात अपार करुणा दाटुन आली. खरेतर या विषयावर इतके लिहिले आणी बोलले गेले आहे की पुन्हा काहि लिहावे असे वाटतच न्हवते. मला एक कळत नाही, तुम्ही लोक संभाजी ब्रिगेडचा इतका राग राग का करता ? अहो ती एक मानसीक रुग्णांची संघटना आहे, तुम्ही तीच्या पेकाटात लाथा घालुन तीला अजुन आक्रमक करत आहात. त्यांना सांभाळुन घ्या, त्यांना आपले म्हणा. जीजाबाई या राजांच्या माता व शहाजीराजे हे त्यांचे वडील आहेत हे मान्य करुन ह्या लोकांनी आपल्यावर किती उपकार केलेत ह्याची तुम्हा लोकांस जाण नाही. आपल्या जोड्याची कातडी करुन ह्यांना घातली तरी ते उपकार फिटणार नाहीत. महाराजांचा घोडा त्यांना एका आदिलशाहीतील मुसलमानाने घोड्याच्या पायात ताईत वगैरे बांधुन आणी कुत्रा एका इंग्रजाने आगीत उड्या वगैरे मारायचे ट्रेनींग देउन भेट दिला होता. महाराजांचे खरे गुरु दादोजी कोंडदेव नसुन, श्रीमंत कोकाटे हे स्वतः होते आणी त्यांनीच रामदासांना हेरेगीरी करताना पकडले होते. हा खरा इतीहास तुम्ही कधी जाणुन घेणार आहात का नाही ? प (रा)जवाडे ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन Mon, 06/01/2009 - 15:10 नवीन
तु कितीही उपहास केलास तरी सत्य बदलत नाही. सत्य सान्गणारे जर मानसिक रुग्ण आहेत असे तुला वाटत असेल तर तुला मानसिक आजार झाला आहे असेच म्हणावे लागेल. तुला स्व ज्ञातीच्या लोकान्चा निष्कारण उदोउदो करण्याचा मानसिक आजार जडला आहे. हे मात्र १०००००००००% सत्य आहे. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 06/01/2009 - 15:13 नवीन
>>सत्य बदलत नाही. हेच तर सांगतोय तुला केव्हापासून... तु किती ही गळा काढलास तरी सत्य बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
आ
आम्हाघरीधन Mon, 06/01/2009 - 15:16 नवीन
अतिशय उच्च विनोद आहे हा ...!!! आमच्या तर डोळ्यासमोर चित्रसुद्धा आले लगेच. महाराजांचा राज्याभिषेकावेळी इंग्रज हे तोरण वगैरे बांधत असुन गडाची सजावट वगैरे करत आहेत, झालेच तर शोभेची दारु वगैरेचा मक्ता इंग्रजांकडेच आहे, त्यांचे नेटनेटक्या कपड्यातले एक घोडदळ गडाला पहारा देत आहे. मुस्लिमांचे काय सांगावे, महाराज मुस्लिमांविरुद्द नव्हतेच त्यामुळे हा मुद्दा बाद आहे. महाराजांचा विरोध हा मुस्लिम दिल्लीश्वर राज्यकर्त्यांना होता. असो, तर मुस्लिमही काम करत होते असे मानु आणि तसे होतेच. मात्र ... मात्र ब्राम्हण हे गडाखाली निदर्शने करत होते, जमल्यास आक्रमक होऊन गडावर चालुन यायचा त्यांचा विचार होता पण देशप्रेमी इंग्रजांमुळे ते जमले नाही , तरी काही टवाळ ब्राम्हण तरुणांनी खालुनच आपल्या घोषणा चालु ठेवल्या. शेवटी त्यांना राखेचे तोबरे देण्यात येऊन विरोध मोडुन काढण्यात आला.... वा वा, काय कल्पनाविलास आहे ... उच्च विनोद आहे बरं, धो धो हसलो ... इन्ग्रज दिमतीला जरूर नसतील, मुस्लिम महाराजान्च्या सैन्यात होते हे तुला माहीत नसेल तर तुझे दुर्दैव.......... ब्राह्मण मन्डळी विरोधात होती हे सत्य तु कसे नाकारु शकतोस. उपहास केला म्हणजे सत्य लपेल अशी तुझी भावना असेल तर तुझ्या भावना मी समजु शकतो. भावनेला जरा आवर घाल डान पन्ता........ दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/01/2009 - 15:19 नवीन
सांगा ना, सामनातला तो अग्रलेख वाचलात का? द्या ना उदाहरणं...सप्रमाण सिध्द होतील अशी. :) द्या की राव. का माझ्या प्रतिसादांकडं दुर्लक्ष करताय? :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन
म
मिंटी Mon, 06/01/2009 - 15:30 नवीन
धम्या अरे जाऊ देत ना..... तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत त्यांच्याकडे म्हणुन तर दुर्ल्क्ष करत आहेत ना ते.... कश्याला उगाच अपेक्षा करतोस तु ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ऋ
ऋषिकेश Mon, 06/01/2009 - 15:34 नवीन
धमु, तुझ्याच काय कोणत्याच तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाहि आहेत. आहेत त्या फक्त वावड्या.. उठवून दोच-चार मतं इळाली तर बघताहेत बापडे.. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा