अगदी !!! लेख फारंच आनंद देउन गेला :) रामदास सर , जर्राशी फ्रिक्वेंसी वाढवा राव !! :) अलगद ओघावतं लेखन .. लै भारी ...
स्वगत :- हल्लीच्या नासक्या दुधाच्या आणि वाया गेलेल्या पाकांच्या भिक्कारचोट धाग्यांत हा असला लेख म्हणजे वाळवंटात तेलाची विहीर सापडणे
- (नजरकैद) टा.रू.सावरकर
अगदी! पोटातल्या बोचक्यापासुन सुरुवात करणार होतो! :)
आमचा वाडा अन ते जुने सैपाकघर अजुन आहे, आमची आज्जी अजुनही ती भांडी वापरते. उन्हाळ्याच्या सुटीत आजीने धुतलेली ती भांडी अंगणात वाळत घालणे व वाळल्यावर पुन्हा आण नेउन देणे हे लगेच आठवलं. ह्या डब्यांकडे मात्र आमचं लक्ष असायचं ते फक्त त्यातल्या लाडवांमुळे किंवा नारळाच्या वड्यांमुळे! :)
श्या! आजचा दिवस अवघड जाणार! :(
असेच म्हणतो...
तुमचे लेख वाचताना वाटतं की तुम्ही आत्ता सहज गप्पा मारल्यासरखे समोर बसून बोलताय... तुटक तुटक पण एकसंध अर्थाचे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
दाराशी येणार्या कल्हईवाल्याशी मीही असाच उकिडवा बसून असे तासंतास! कॉटनवेस्टचा बोळा फिरवून एखादं भांडं चमकावायला द्यायचा तो मला, त्यावेळी जो काही आनंद व्हायचा तो शब्दातीत आहे.
अगदी माझ्या लहानपणचं सैपाकघर डोळ्यांसमोर उभं केलंत! वाक्यावाक्यात हेलावून टाकणं तर तुमचं नेहेमीचंच आहे.
कविलोक काहीहे म्हणोत, आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतं.
क्या बात है! केवळ रामदास!! जियो!!!
(सचिन खेळायला आला म्हटल्यावर शतकंच करायला हवं असं नसतं ४०-५० केल्या तरी त्या सचिनच्या असतात, तसंच आहे तुमचं, विषय काहीही असो रामदासांनी लिहिलं म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटणार हे नक्की!)
(पेढेघाटी)चतुरंग
त्यातल्या त्यात आमचा पितळी पानाचा डब्बा.गेले ते दिवस आता शिवण खुपच उसवल्या आहेत
.
खरय वेताळा, मी तेवढा पानाच डब्बा मात्र जपुन ठेवलाय. ओट्यावर गावकर्यांसोबत पानसुपारी साठी आजोबा हाच पानसुपारीचा डब्बा वापरायचे. श्राद्ध ,पक्ष, चंपाषष्ठी ,ऋषिपंचमी , श्रावणी सारख्या सणांच्या जेवणांनंतर आम्ही याच पानाच्या डब्ब्यातुन शेतातील आणलेली विड्याची पाने वापरुन विडा तयार करीत असु. बैठकीत गावकर्यांनी आपली चंची काढून पान तयार करणे हा कार्यक्रम पहाणे मला फार आवडायचे. ते पानाच्या शिरा काढणे, उलट्या बाजुला चुना लावणे , सुपारी अडकित्त्याने अगदी बारीक कातरणे व नंतर तोंडात काताचा तुकडा टाकणे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
अजुन एक पानाचा डब्बा होता अॅम्बेसिटर गाडीच्या रुपात. तो देखिल मस्त होता.आमच्यात कोण पान खात नव्हते. आमचे शेतावरचे वाटेकरी घरी यायचे ते चहा वगैरे घेऊन झाला की त्यातले पान खात बसत.मला सुपारी कातरुन देत असत. डब्याचा फोटो बद्दल प्रकाश काकाना धन्यवाद.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
जुना वाडा परत आठवला.परत ती भांडी,त्यातल्या त्यात आमचा पितळी पानाचा डब्बा.गेले ते दिवस आता शिवण खुपच उसवल्या आहेत. आता मोड विकायचे दिवस आहेत.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
रामदासजी, मस्त काळ उभा केला. जुन्या आठवणींना मोल नसते. आताच्या जमान्यात कल्हईवाला सापडणार नाही आणि आजच्या पिढीला तो आनंद पण मिळणार नाही.
आमच्या गावाचा कल्हईवाला काही भांडे पण दुरस्त करायचा. जसे- कढईला कान लाव, बंबाचा धुरांड्याला पाईप लाव, त्याची राखेची जाळीला रिबीट लाव आदी.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
आमच्या अंगणात कल्हईवाल्याने त्याची भट्टी लावली की मी ही त्याचं काम संपेपर्यंत तो भांड्यांचा चकचकाट पाहत बसायचे. त्या कल्हईवाल्याचं बोट धरुन किती वर्षं मागे नेलंत हो...
लेख फार फार आवडलाच हेवेसांनल
स्वाती
लेख नेहमी प्रमाणे सुंदर!
आपल्या सर्वांच्या मनात एक बालपण असतं, ते आठवण करून देणारा लेख.
परंतु, रामदासजी, लेख पूर्णत्वास नेण्याचे तेवढे पहा!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
बेस्ट! मी कल्हईवाला प्रत्यक्ष न बघूनही प्रसंग पुरेपूर डोळ्यासमोर उभा राहिला!
अख्खा लेखच अव्वल आहे पण हे खासच...
>>ठोक्याचं पातेलं, जड बुडाचं पातेलं ,(आमच्या काही जावयांना हीच नावं सैपाकघराच्या बाजूनी दिलेली होती)
:)
काळ सुखाचा आठवला. अगदी आजोळच्या घरात नेऊन सोडलं या लेखानं, तेही हसतखेळत, सहज! पितळी आणि तांब्याची भांडी घासायचा भला मोठा साग्रसंगीत कार्यक्रमच असायचा, पण ती लख्ख भांडी फळीवर आपल्या जागी बसली, की सराफाची पेढी काय दिसावी, असं ते स्वैपाकघर दिसायचं! काका, खूप मनातलं लिहिलंत तुम्ही! लवकर पुढचा भाग लिहा.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
ग्रेट, केवळ ग्रेट. शेवटचा कल्हईवाला बघून साधारण २५-३० वर्षे झाली असतील. पण तो विशिष्ट वास आणि ती चांदी फिरवल्यावर येणारा तो लख्ख चंदेरी रंग अजून स्वच्छपणे मनात हजर आहे. ते सगळं बाहेर आणलंत. आणि साधी पातेली ती काय? पण पिढ्यानपिढ्यांचा प्रवास घडवलात.
पासष्ट ते सत्त्यात्तर डब्यात खणखणाट .
साहेब, केवढं छोटं वाक्य!!! पण वाचलं तेव्हा सर्रकन काटा आला अंगावर. जाता जाता तुम्ही त्या १२ वर्षांचा काळ ५ शब्दांमधेच पण अगदी व्यवस्थित दाखवलात. आणि ते अगदी अचानक आलं वाक्य, ध्यानीमनी नसताना. हीच तुमची खासियत.
बाकी ते वीजेचं वगैरे वर्णन आणि उपमा इ. तर थोरच.
अवांतर: च्यायला!!! आलं यांचं अजून एक 'अपूर्ण'. यांची ही असलं जीवघेणं वगैरे लिहून नुसतं अपूर्ण टाकून लोंबत ठेवायची खोड कशी मोडायची बरं? पुढं लिहितच नाहीत. बसा लेको वाट बघत.
बिपिन कार्यकर्ते
रामदासबाबांच्या लेखांना काय प्रतिक्रिया द्यावी ही खरोखर समस्या झाली आहे, अप्रतिम हा शब्दच थिटा पडावा असे लेखन आहे.
एकदम साधे सरळ, वळचणीच्या गळक्या पत्रातुन सरळ आत घुसणार्या पाण्याच्या धारेसारखे , सुखदच म्हाणवे ना ?
शब्दात प्रतिक्रिया जमणे अवघड आहे.
तरी बिका, रंगाशेठ, मुसुशेठ, प्रा डॉ. वगैरे मंडळी काही तरी ४ ओळीत परिपुर्ण प्रतिक्रिया लिहतात हेच बरे.
आपण आपले पटकन त्याला "+१, सहमत आहे" म्हणुन रिकामे व्हायचे ...
आत्ता तेच म्हणतो ...
अजुन येऊद्यात काका ...
अवांतर : अहो त्या "गोडबोलेंच्या प्रेमकहाणीला" सुद्धा एकदा कल्हई होऊन जाऊ द्या, फारच जुनीपुराणे वाटायला लागली कहाणी ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
अप्रतिम. खरोखर मेंदुच्या एका कोपर्यात ह्या सगळ्या आठवणी होत्या व तुम्ही कल्हई करुन सर्व कश्या लख्ख केल्यात. लहानपण फिरवुन आणलतं.
"अनपेक्षीत लाभ" असं काही आजच्या दिनभविष्यात लिहले असेल का बघीतले पाहीजे.
ह्या एका लेखात इतकं काही भरभरुन दिलं आहेत की नेहमीप्रमाणे तुमचा (अपूर्ण ) हा तसाच राहीला तरी चालेल.
खरोखर मेंदुच्या एका कोपर्यात ह्या सगळ्या आठवणी होत्या व तुम्ही कल्हई करुन सर्व कश्या लख्ख केल्यात. लहानपण फिरवुन आणलतं
अगदी असेच म्हणतो ! लहान होऊन कल्हईवाल्याच्यासमोर उभा असल्याचा स्वतःलाच भास झाला.
केवळ सुंदर लेखन सर !
तिच्या अंगाखांद्यावर चार बोचकी असायची .
पाचवं बोचकं पोटात असायचं.
इथे पैकीच्या पैकी मार्क दिले !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>कल्हई वाली ला ? की रामदास सरांना ?
रामदास सरांच्या निरिक्षणाला..... !
आणि तसेही कल्हईवालीच्या पाचव्या बोचक्याचं नवल तेव्हा कोणालाच नसावं :)
-दिलीप बिरुटे
केवळ अप्रतिम शब्दचित्र !! भावनेलाच हात घातलात रामदासजी !!
काही ओळी तर लाजवाब.. त्यातल्याच काही..
*मी नंतर बराच वेळ गरम मातीचा वास घेत बसून रहायचो.कथीलाचा तुकडा मुठीत दिल का तुकडा असल्यासारखा सांभाळून ठेवायचो.माझ्या धातुकोषाची सुरवात झाली ती अशी.
कविलोक काहीहे म्हणोत, आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर *विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतंपितळ्याच्या
संसारात जी लॉयल्टी आणि रॉयल्टी होती ती या नव्या धातूत नव्हती.युटीलीटी हा नवा ट्रेंड आला.
*पितळेची सगळीच पातेली गेली असं नाही .जी काही उरली होती ती अडगळीत गेली होती.पावसाळ्यात घर दहा ठिकाणी गळायला लागलं की गळतीचं पाणी साठवायला ही जुनी भांडी हाताशी यायची.
आणखी एक अप्रतिम लेख! अनुसेरीची आठवण अजूनही विसरलो नाही तर एकदम डोक्याला कल्हई? अहो काय रेंज का काय म्हणायची ही! रामदास फॅन क्लब किंवा फॅन फाउंडेशन स्थापन करावे नव्हे केलेच पाहिजे अश्या मतास आम्हीं आलो आहोत!
रामदासस्वामी लेख वाचला आणि मीही भूतकाळात गेलो. कल्हईवाल्यासंबंधी मीही लिहीणार होतो पण आता तुम्ही इतके चित्रमय वर्णन केलेय की मला लिहीण्यासारखे काही उरले नाही.
कल्हईवाला गेला की तिथल्या मातीत पडलेले चंदेरी मोती शोधायची आमच्यात स्पर्धा लागायची. असे कैक चंदेरी मोती माझ्याकडे साठवलेले होते...त्या काळात.
पितळेचे,तांब्याचे डबे,भांडी चिंच लावून आणि राखेने घासून लखलखीत करण्याचे काम मलाही खूप आवडायचे.
अवांतर : लेखाचे शीर्षक वाचून आधी गैरसमज झाला होता. प्रभूदेवांसारखे काही क्रिप्टीक तर नाही अशी कु'शंका' आली. ;)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
मी ही कल्हईवाल्याची मौज प्रत्या अनुभवलेली नाहि.. तरीही भावना मात्र पुरेपूर पोचल्या
खूपच मस्त!साध्या शब्दांतील परिणामकारक वाक्ये! मजा आली
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
असे अगदी अवचित लेख येतात रामदास काकांचे ... आणि नाव वाचलं की ते वाचल्याशिवाय ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाही. खरंच प्रभूमास्तर म्हणतात तसं गल्ली चुकली की हो...
वर्णनाला काय म्हणावं. बहुतेकांनी अनुभवलेली गोष्ट... पण इतके नेमके शब्द...
वर्णनाच्या तपशीलासाठी मला विलक्षण आवडणारे लेखक म्हणजे गोनीदा.. त्यांच्या जवळपास नेणारी शब्दकळा आहे ही.
आणि नेहमी प्रमाणे वर्णन वाचताना मधूनच षटकार वाचण्याची तर आता सवयच झाली आहे आम्हाला.
> आजही आषाढाच्या काळ्या कुट्ट ढगावर विज लखखली की मला आकाशाच्या गरम परातीवर कल्हईची रेघ ओढल्यासारखं वाटतं.
> आत्याकडला डबा.(हा अधून मधून भरून पाठवायचा असायचा)
>(चुलीजवळच्या राजकारणाचा एक भाग.)
> या डब्यांत पोट भरण्याची माया कमी नव्हती
> "पुणेरी माणसं म्हंजे देवलची भांडी "असं सारखं घोकायची.(आईचं माहेर पुण्याचं )
> पासष्ट ते सत्त्यात्तर डब्यात खणखणाट . अंधारलेल्या त्या सैपाक घरात जोपर्यंत बल्बचा प्रकाश होता तोपर्यंत त्या नेपथ्यात सगळं काही झाकलं जात होतं .
काय लिहावे... पहिल्यांदाच मिपावर अपूर्ण वाचून मनापासून आनंद झाला...
वाट पाहतो...
कल्हईवाला खूप लहानपणी पाहिला होता.. पण त्याचं नि त्याच्या बायकोचं वर्णन तर अगदी चपखल.. मुर्तिमंत उभा राहिला डोळ्यासमोर.. त्याच्यासोबत भांड्याना बूड लावणारा (हा अजुनही येतो), बहुरूपी, कडकलक्ष्मी अशा बर्याचलोकांची सय आली हा लेख वाचून..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी