खरेच खूप छान आहे हा अनुभव ...
आणि असा कडू चहा काय कोणताही चहा पिताना टपरी वरच्या "कटिंग" ची आठवण होणारच..
आपला अनुभव सर्वासोबत वाटल्याबद्दल धन्यवाद. जर कधी अशा टी सेरेमनी ला जाण्याचा योग आला तर्..........पाहू विचार करु आणि मगच निर्णय घेऊ
तुमच्या लेखाने 'कटिंगशी' संबंधीत बर्याच आठवणी जाग्या झाल्या. भटाचा तो 'कटिंग' चहा एकदम फर्मास. विषेशतः 'उत्सव' च्या वेळी रात्री जागवताना तर अमृतच!
साठ्ये बाहेरच्या चहावाल्या भटाने एकदा आमच्या एका तिथेच 'पडीक' असणार्या वर्गमित्राला 'तुला ग्रॅजुऐशन नंतर किती पगार मिळेल?' विचारल होतं. आणि आकडा ऐकून 'ग्रॅजुऐशन नंतर माझ्याकडे ये, पार्टनरशिप देईन. जास्त कमवशील!' असही सांगितल होतं :).
मुशाफिर.
दोन्ही भाग मस्त वाटले... :)
अवांतर टवाळकी :-- http://www.jokeemail.com/pictures/japanese.jpg
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
बापरे! चहा सेरेमनी भलताच. हे जपानी लोक सगळी कामं अशीच शिस्तीत-आसनं वगैरे घालुन-करतात की काय? (तरीच जपानी लोकांच्या 'सुबक' पणाबद्द्ल आम्ही एवढ ऐकुन आहोत. ;) )
हे सगळे फोटो पाहून एक गोष्ट आधी विचारावीशी वाटते?
प्रत्येक जपानी घर इतकं अतीव नीट नेटकं असतं का हो ? म्हणजे हरलोच मी ते फोटो पाहून्... अगदी मिठाई सुद्धा आपल्या लाडू किंवा दुधाच्या बंगाली टाईप मिठाया कशा जरा तरी रँड्म आकार.. एक रचना असली तरी... ह्या मिठाया म्हणजे चॉकलेटचे सुद्धा आकार वेडे वाकडे वाटाव्यात इतक्या सुबक!! जरा वेडेच आहेत हे लोक वाटतं!
आणि तुमच्या आजीबाई अगदी बाहुली सारख्या आहेत ... आजी कसल्या... :)
चव सोडून बाकी सगळंच चांगलं असतं... ;)
आणि मैत्र, हे घर नाहिये काही! हा पंचतारांकित हाटेलाचा हॉल आहे...
पण अव्यवस्थितपणाच्या बाबतीत मी नक्की हरवेन त्यांना! :>
हा भागही मस्त!
काकू आणि आज्जी किती तुकतुकीत आहेत.
त्यांच्या किमोनोंचे रंग एकदम फिकट पण अल्हाददायक!
मिठायांचे प्रकार आणि व्यवस्थितपणा बघून आईने केलेल्या नारळाच्या वड्या खाताना लहानपणी जो धसमुसळेपणा केला होता तो आठवला (आता मनातल्यामनात त्याबद्दल लाज वाटते).
(देवाला नैवेद्य चौकोनी वड्यांचा दाखवायचा असल्याने कडेच्या निराकार ;) वड्या तोंडात कोंबल्या होत्या.)
एकूणच सेरेमनी वाचायला आवडला.
रेवती
लेखही सुबक झाला आहे! आवडला हे सांगायला नको.
(आता हे वाचूनच चहाची भयंकर तल्लफ आली आहे. बाहेर पावसानेही रिपरिप लावली आहे. अशा वातावरणात एकट्याने आपला आपण चहा करून घ्यायचा हे एक मोठे दु:ख.).
एक तास वज्रासनात बसणे म्हणजे काय गम्मत ए? 'थर्डडिग्री' लावल्यासारखेच वाटले मला! :T
लिवलंय नेहेमीप्रमाणे मस्त.
मी मात्र मस्त खुर्चीत बसून चहा पितापिताच वाचला हा लेख! बाहेर पाऊस, संगणकावर हा लेख आणि हातात चहाचा कप व्वा!!
'काषाय्-शर्करा'योग असला तर तो हाच असावा, आणि नसला तर आजपासून म्हणायला लागूयात! ;)
(चहाबाज)चतुरंग
जपान मध्ये खाद्यपदार्थाना चव जरा कमीच असते.माझ्या बर्याच मित्राना जपान मध्ये खाण्यापिण्या बाबत खुप अडचणी आल्या.आज तुमच्या टी सेरेमनी वरुन ते लक्षात आले. काही शाकाहारी पदार्थात ते बिन्धास्त माशांचा व समुद्रप्राण्याचा वापर करतात असे एकले आहे ते खरे आहे का? माझ्या मित्राचा मुलगा लहानाचा मोठा तिथे झाला (आता ते परत भारतात आले आहेत) तो एकदा जपानिझ नुडल्स खात होता, त्याचा वास देखिल मला सहन झाला नाही. परंतु त्याने चवीने ते संपवले.त्या जाड नुडल्स उकळुन त्यात कच्चे अंडे टाकुन खातात.एकदंरीत खाण्यापिण्या बाबतीत भारतिय खुपच नशीबवान आहेत असे वाटते.
वेताळ
हे “इचि गो इचि ए” म्हणजे.
आपल्याला त्यातलं काही म्हणता काही सुधरत नाही, 'एक ते च्या पियाचं तर किती वो ते कुचकुचऽऽत्त बसायचं' असं काहीसं झालं माझं.
बाकी, अनुभव वर्णन छानच. आवडलं वाचायला..पण................
चहा कसा प्यावा ह्याबद्दलची माझी वैयक्तीक प्रांजळ मतं ही अशी:
चहा हा कधीही पुर्ण/फुल्ल वगैरे पिण्यात मजा नाही. तो कटींग कटींग करत चारदा प्या हवं तर लागोपाठ पण...कटींगच.
कटींग चहा हा त्या चिमुकल्या ग्लासातच हवा. कप वगैरे जहागिरदारी खास कॉफीसाठी राखीव!! (कॉफी कोणी ग्लासात दिली तर मी तो ग्लास, देणार्यावर भिरकावण्यापासून स्वतःला महत्प्रयासानं रोखतो :) )
चहाच्या चवीचे प्रमाण ही चहाची टपरी, बनवायची भांडी, चहावाला ह्यांच्या कळकटपणाशी चढत्या भाजणीत असते. :) (आठवा, फाईव्हस्टार हाटेलातला पुचाट चहा आणि कोपर्यावरच्या टपरीवरला खणखणीत कटींग :) )
चहा हे पेय माझ्या मते उभ्याने पिण्याचे पेय आहे :) (आठवा, क्क्क्क्क...कॉलेज के दिन ;) )
चहा पिताना गप्प गप्प गंभीर बसणारा माणूस हा एकतर मुकबधीर असतो किंवा डोक्यावर भयानक चढलेलं कर्ज कसं फेडायचं ह्याच्या चिंतेत असतो.
हे जपानी लोक असं गप्गुमान कसं काय चहा पिऊ शकतात राव? आमच्याकडं तर चहाच्या एकेका कटींगसोबत एकेक दोस्त होत जातो :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
>> आम्हाला ही टपरी म्हणजे कॉलेजचंच एक extension वाटायची.
अग आम्हाला तर कर्वे रोड आणि पलीकडचं गरवारे कॉलेज हे 'मयूरेश्वर' अमृततुल्यचं एक्स्टेन्शन वाटायचं :)
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी