बिपीन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन आणि कार्यकालासाठी शुभेच्छा ...!!!
होऊन जाऊद्यात ...
जय हो !
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
बिपीन कार्यकर्ते, संपादकाच्या संघात आपले स्वागत आहे.
>>१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!)
=))
तात्या, अहो, कोनी नै भेटले का ? शुद्धलेखन आणि व्याकरणावर देखरेख ठेवायला ! :)
(आम्ही कोणत्या तोंडाने त्या शुद्धलेखनावाल्यांना विरोध करणार आता)
-दिलीप बिरुटे
तुमच्या लक्षात आलेलं नाही असं दिसतंय!
अहो 'लोक उगाचच शुद्धलेखनाचा बाऊ करत नाहीत ना किंवा शुद्धलेखनाबद्दल उगाच चर्चा सुरु करीत नाहीत ना हे पाहणार्या विभागाचे प्रमुख', तसं दिसलं तर ते कोलून लावा, असं तात्यांना म्हणायचं असेल!! ;)
(अशुद्ध)चतुरंग
लोक उगाचच शुद्धलेखनाचा बाऊ करत नाहीत ना किंवा शुद्धलेखनाबद्दल उगाच चर्चा सुरु करीत नाहीत ना हे पाहणार्या विभागाचे प्रमुख', तसं दिसलं तर ते कोलून लावा, असं तात्यांना म्हणायचं असेल!!
हा हा हा :)
अगदी-अगदी, असाच काही उद्देश असेल तात्यांचा !!!
(किंवा डिलीट वगैरेच्या वाढत्या तक्रारीमुळे दुसरे खाते दिले असेल) ;)
-दिलीप बिरुटे
(वरिष्ठ संपादक +संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभागप्रमुख )
बिपिनजींचे! फौजदारीची जबाबदारी सांभाळताना जरुर वाटली तर पम्या नक्कीच आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. काय आहे, क्राईम रिपोर्टिंग करताना त्याने बर्याच ट्रिका शिकल्यात....
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
>>> मिपाचे हसतेखेळते, थट्टामस्करीचे, टोप्या-टपल्यांचे वातावरण तसेच कायम ठेऊन ते ही संपादक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतील असा आमचा विश्वास आहे.
- सहमत आहे, अभिनंदन :)
अरे वा! अभिनंदन! :)
मिपाचे असे संपादक हे जगजाहिर व अप्रोचेबल असल्याने मिपा आपलेसे वाटायला अजून एक कारण मिळते.
चला या शिस्टीमने बिकादाचा मा.बिपिनचंद्रजी कार्यकर्तेसाहेब केलाच शेवटी ;)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
>>चला या शिस्टीमने बिकादाचा मा.बिपिनचंद्रजी कार्यकर्तेसाहेब केलाच शेवटी
=))
क्या बात है ऋष्याभाई क्या बात है....
मा. बिपीनरावचंद्रजी कार्यकर्तेसाहेब आगे बढो,
हम तुम्हारे साथ है ...
------
(अभिनंदनाच्या फलकात अनुदान ढापणारा ग्रास रुट लेल्व्हलवरचा कार्यकर्ता )छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
हापिसात आहे. जरा वेळ बाहेर गेले होतो. परत आलो तर पब्लिकचे अभिनंदनाचे मेसेजेस आणि खरडी. काहीच कळेना. मग मिपाचे मुपृ रिफ्रेश केले तर हा धागा दिसला. आज एक तारीख आहे हे आठवत होते, पटकन महिना चेक केला. जुलै. चला, म्हणजे एप्रिल फूल तर नक्कीच नाही.
ही जबाबदारी गळ्यात घातल्याबद्दल तात्यासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ;) आणि धन्यवाद. :) सर्व सदस्यांनाही धन्यवाद. यापुढे सहकार्य करा हीच विनंती.
खरं तर संपादक म्हणजे काय हेही माहित नाहीये. कधी ही अपेक्षा पण केली नव्हती. त्यामुळे आता काय काय करायचे असते त्याची माहिती करून घ्यावी लागेल. माझ्या वतीने एवढेच सांगतो,
इथे वावरताना टिंगलटवाळी मधे कुठेही कमी पडणार असा प्रयत्न करेन. ;) निष्पक्षपातीपणे वागायचा पूर्ण प्रयत्न करेन. आपल्या पैकी कोणाला कधी कधी माझे एखादे मत अथवा कृत्य आवडणार नाही. पण त्यामागे माझ्या माणूस म्हणून असलेल्या मर्यादा असतील, कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक आकस / राग / लोभ असले कारण असणार नाही. काही सांगायचे असले तर स्पष्ट आणि थेट संपर्क साधावा. सहकार्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सांभाळून घ्या. :)
बिपिन कार्यकर्ते
विरोधक चहापानावर बहिष्कार घालतात. आपल्या कुणावर बहिष्काराची वेळ येणार नाही कारण बिपिनरावचंद्रजी कार्यकर्ते बहुधा 'चहा'पानाला बोलावणार नाहीत.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
बिकांचे त्रिवार अभिनंदन.
आजपासून बिपिनजी आमचे नेते.
आम्ही त्यांचे कार्यकर्ते :)
तात्या, हे काय...?
१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!)
या धाग्यापासूनच सरांना कामाला लावलेत तर!!
असो. हलकेच घ्यालच.
एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
आर्रार्रार्रा ... काय खरं नाही ... एक मावळा फितुर झाला ;)
असो , बढती मिळालेल्या मावळ्याचे (लोकालाजे) अभिणंदण !!
तात्या आगे बढो !! बिका आप भी आगे बढो !! (आता आमच्या मागे कोण?)
- टारझन
अध्यक्ष , मिपा राडा-कल्ला मित्र मंडळ
बिपीनरावांचे जाहीर सांत्वन!! :D
असंख्य टवाळ, पोटदुखे, विघ्नसंतोषी, जळू, कुरापतखोर, रिकामटेकड्या मिपाकरांच्या (छे! असे मिपाकर आहेत? अब्रह्मण्यम्!) खरडी नि व्यनि झेलण्यासाठी शुभेच्छा!! :H
बाय द वे तात्या,
१) प्रा डॉ दिलिप बिरुटे (वरिष्ठ संपादक, + संभाव्य शुद्धलेखन व व्याकरण विभाग प्रमूख!)
२) चतुरंग (संपादक + विशेष अतिरिक्त भार - काव्य व कलादालन, फौजदारी - रात्रीची गस्त)
३) मुक्तसुनीत (संपादक + विशेष अतिरिक्त भार - साहित्य, काव्य विभाग)
४) बिपिन कार्यकर्ते (संपादक + विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे)
६) नीलकांत (संपादक + तंत्रविभाग प्रमुख)
७) विकास (संपादक + विशेष अतिरिक्त भार - राजकीय व वैचारिक लेख/काथ्याकूट)
८) प्राजू (संपादक + विशेष अतिरिक्त भार -काव्य विभाग)
९) चित्रा (संपादक + विशेष अतिरिक्त भार - फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे)
१०) नंदन (संपादक + विशेष अतिरिक्त भार -साहित्य विभाग, पाककृती )
बहुतांश संपादकांपुढे कंसात `अतिरिक्त भार' असे लिहिले आहे. म्हणजे त्यांच्यावर अतिरिक्त भार आहे, की त्यांचा अतिरिक्त भार मिपावर झाला आहे?? ;)
>>>म्हणजे त्यांच्यावर अतिरिक्त भार आहे, की त्यांचा अतिरिक्त भार मिपावर झाला आहे?? <<<
=))
एकदम मस्त! कदाचीत तात्यांनी दोन्ही अर्थांनी म्हणले असेल फक्त ते इतक्या खुबीने म्हणले आहे की ज्याला/जीला जो हवा तो अर्थ त्याने/तिने घ्यावा. माझ्यापुरता मी पहीलाच अर्थ घेत आहे. ;)
बाकी "आदरणीय माननीय बिपिनजीरावजी कार्यकर्तेसाहेबांचे" अभिनंदन.
ज्यांच्या नावात "कार्यकर्ते" हा शब्द आहे, त्यांच्याकडून हे सार्वजनिक काम चांगलेच होईल याततिळमात्र शंका नाही :)
चतुरंग (संपादक + विशेष अतिरिक्त भार - काव्य व कलादालन, फौजदारी - रात्रीची गस्त)
हे म्हणजे 'विडंबकाहाती काव्यदालनाच्या किल्ल्या' असंच झालं की!!! B) :D
(जमादार)चतुरंग
ह्म्म ...शेवटी मध्यपूर्वेलामिपाच्या जागतिक नकाशात स्थान मिळालं तर! B)
(खुद के साथ बातां १ - बिपिन कार्यकर्ते (संपादक + विशेष अतिरिक्त भार - कंपूबाजी निवारण, फौजदारी -सभासदांतील आपापसातल्या मारामार्या, हेवेदावे) हे म्हणजे दांडगट पोरालाच मॉनीटर केल्यासारखं झालं म्हणायचं की काय?);)
(फौजदार)चतुरंग
हार्दीक अभिनंदन!!!
दांडगट पोरालाच मॉनीटर केल्यासारखं झालं म्हणायचं की काय? ;)
माझ्या मनात अगदी हेच आलं होतं..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी