वा! अनुभव वाचताना मजा आली. पुष्कळ नवी माहीती ही मिळाली.
अश्या वल्लीचे दर्शन तुम्ही तुमच्या खुमासदार लेखन शैलीने आम्हाला करुन देत आहात त्याबद्द्ल आभार. :)
प्रत्येक भागाबरोबर आता पुढे आजोबा काय करणार याची उत्कंठा वाढते आहे! खूपच कमाल वाटते आहे आजोबांची.
चतुरंग, या आजोबांची आम्हाला ओळख करुन दिल्याबद्दल तुमचे पुनःपुन्हा आभार!
अवांतरः- तुम्ही लिहिलेले हे भाग ते आजोबा वाचताहेत का?
--शाल्मली.
त्यांच्या मुलाने त्यांना मोठ्या टायपातले प्रिंटाऊट्स काढून दिलेत.
पहिला भाग आणी त्यानंतर आलेल्या तुम्हा सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी आजोबा लहान मुलासारखे आनंदून गेले होते, सद्गदित झाले होते. मला म्हणाले की माझ्या आठवणी कोणी वाचेल असे मला वाटले नव्हते.
(समाधानी)चतुरंग
पहिला भाग आणी त्यानंतर आलेल्या तुम्हा सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी आजोबा लहान मुलासारखे आनंदून गेले होते, सद्गदित झाले होते. मला म्हणाले की माझ्या आठवणी कोणी वाचेल असे मला वाटले नव्हते.
माझ्या मते हीच मिपाकरता मोलाची बाब आहे. त्यांचे आशीर्वाद मिपावर आणि मिपाकरांवर सदैव राहावेत हीच इच्छा!
दंडवत...
तात्या.
सावरकर आजोबांची गोष्ट वाचते आहे, शाल्मली म्हणते तसे ते वाचत आहेत का? जर त्यांची संगणकाशी मैत्री नसेल तर त्यांना प्रिंट आउट काढून देता येतील म्हणजे ते वाचू शकतील.
स्वाती
प्रख्यात व्हायोलिनवादक पं. व्ही. जी. जोग यांचे बंधू त्यावेळी तिथे होते (नामवंत संगीतकार कै. वसंत देसाईंकडे हे वायोलिनवादन करायचे), त्यांनी मला कौतुकाने अक्षरशः उचलून घेतले. दुसर्या दिवशी लोकसत्तेत मी काढलेल्या छायाचित्रावर मथळा होता,"आमचे छायाचित्रकार नंदकुमार सावरकर समेवर आले!"
वाहवा ! गुणी माणसाला समोरच्यातले गुण दिसतात हे खरेच !
आठवणी फार छान आहेत. पुढे वाचायला उत्सुक आहे.
आजी-आजोबांची कमाल आहे.
-- लिखाळ.
अतिशय नाट्यमय असे आयुष्य आणि त्याची तितक्याच समर्थ शब्दात केलेली गुंफण.
सावरकरांचे कथन आणि चतुरंगांचे शब्दांकन! दोन्हीही मस्त!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
आजोबांची ही लेख माला आंतरजालावर हिट्ट झाली नाही तरच नवल!!!
अजब आणि विलक्षण असं व्यक्तित्व आहे हे.
आजोबांनी खरंतर पुस्तकच काढावं.
चतुरंग, ही लेखमाला आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप आभार!! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहोत.
(बाय द वे, तुम्ही भारत वारीला गेला की, मालिका ब्रेक के बाद का??)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मालिका आवडण्यात माझं काहीच कौशल्य नाहीये आजोबांचे अनुभवच इतके विलक्षण आणि विचक्षण आहेत की आपल्याला काही करावंच लागत नाही.
(शक्यतोवर सुटीला जाण्याआधीच मालिका पूर्ण करण्याचा विचार आहे.)
चतुरंग(कपूर)
जबरदस्त अनुभव कथन आणि तितकच सुंदर शब्दांकन.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
चतुरंगजी , लिखाणासाठी, आपण हे सर्व तपशील कसे लक्षात ठेवलेत? रेकॉर्डीग केले की लिहून घेतले?
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी