अंनिस व धर्मश्रद्धा
💬 प्रतिसाद
(101)
व
विसोबा खेचर
Sun, 08/09/2009 - 11:49
नवीन
मग सार्वजनीक झाल्या तर बिघडलं कुठं? त्या निमित्ताने बर्याच लोकांना रोजगार मिळतो. उद्या हा रोजगार काय दाभोळकर देणार काय?
आपला,
(उत्सवप्रेमी) तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 08/09/2009 - 12:03
नवीन
नाही बिघडल, पण त्यामागचे राजकारण.
खर आहे. रोजगारा पुढे श्रद्धा/अंधश्रद्धा ही गौण आहे. लोकांच्या धार्मिकतेचे राजकारणी लोक भांडवल करतात. देवस्थानांची श्रीमंती ही लोकांच्या धार्मिक श्रद्धेवरच टिकुन आहे. त्यातुन वाईटा बरोबर काही चांगली कामेही होतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
प
पुष्कर जोशी
Fri, 08/23/2013 - 15:09
नवीन
ह्या विषयावर राजीव दीक्षित ...
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 08/09/2009 - 12:17
नवीन
अहो मग शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास या करता दाभोळकरांनीही मागावे की लोकांकडे पैसे! लोक देतील..! मी स्वत: १०१ रुपये द्यायला तयार आहे. सुरवातीला जी काही थोडीफार वर्गणी जमेल त्यातून शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास या संदर्भात दाभोळकरांनी काही ठोस नसली तरी निदान भक्कम सुरवात तरी केली आहे असे दाखवून द्यावे. ते पाहून लोक अजून मदत करतील आणि काही मोठं काम उभं राहील.
करावं की हे दाभोळकरांनी! नाही कुणी म्हटलंय??
परंतु 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!' हेच खरं!
हां, आता होतात उत्सव, लोक चार दिस मजा करतात, काही लोकांना रोजगार मिळतो, सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते!
तसेच काही अनिष्ट प्रकारही घडत असतात, ते घडले नाय पायजेल हेही कबूल. अहो पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे दाभोळकरांच्या लक्षात कसे येत नाही?
मला तर बॉ हे दाभोळकर बघावं तेव्हा सतत काहितरी तक्रार करताना, सतत चिडलेले, ग्रासलेले असेच दिसतात!
छ्या...! :)
स्वगत : बरं या प्रकाश घाटपांड्याचंही काही कळत नाही. हा मनुष्य अंधाश्रद्धावाला आहे की अंधश्रद्धा निर्मुलनवाला आहे, ज्योतिषाच्या बाजूने आहे की ज्योतिषाच्या विरोधात आहे, की नुसताच एखादा ज्वलंत धागा टाकून दोन्ही बाजूंचे प्रतिसाद मिटक्या मारत वाचत आनंद घेणारा आहे, तेच काय कळत नाय बा! लै डेजर मनुक्ष! :)
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sun, 08/09/2009 - 12:43
नवीन
मला तर बॉ हे दाभोळकर बघावं तेव्हा सतत काहितरी तक्रार करताना, सतत चिडलेले, ग्रासलेले असेच दिसतात!
दाभोळकरांना पोटाचा विकार असावा...

- Log in or register to post comments
न
नेटकिडा
Sun, 08/09/2009 - 18:25
नवीन
माझा इथे कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, पण मला सुद्धा अंनिस एका विशिष्ट धर्मातील अंधश्रद्धांविरोधी काम करताना दिसते. ईतर धर्मात अंधश्रद्धा नाहीत काय?
- Log in or register to post comments
व
विकि
Sun, 08/09/2009 - 20:30
नवीन
विशिष्ट म्हणजे हिंदू धर्मच ना. यासंबंधी दाभोळकर म्हणतात मी आधी माझा धर्म सुधरवणार मग दूसरीकडे वळणार.पण अंनिस चे काम खरोखरच वाखाणण्याजोग आहे हे ही तितकच खर.
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 08/09/2009 - 20:37
नवीन
यासंबंधी दाभोळकर म्हणतात मी आधी माझा धर्म सुधरवणार मग दूसरीकडे वळणार.
याचा अर्थ दाभोळकर धर्म मानतात आणि स्वतःला (गर्वसे का ते माहीत नाही पण) हिंदू आहोत असे म्हणतात तर! :-) आणि शिवाय माणसा माणसाकडे धर्माधारीत फरक करून बघतात तर... छान छान!
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 08/10/2009 - 05:13
नवीन
जेव्हा दाभोलकर साधना साप्ताहिकाचे संपादक झाले त्यावेळी साधनाचे संपादक अखेर 'ब्राह्मण' च का? अशी टीका झाली होती. म्हणजे तुम्ही जात, धर्म, पंथ वगैरे मानु नका पण तुम्ही हिंदु व ब्राह्मण हे आम्ही म्हणणारच. कारण तुमचे आईवडिल ब्राह्मण आहेत. [साधनाचे अंधश्रद्धा निर्मुलन केले तर खबरदार असा दम साधनाच्या जुन्या जाणत्या(?) वाचकांनी भरला होता. सुदैवाने(सुयोगायोगाने) साधना व अंधश्रद्धा निर्मुलन या बाबी वेगळ्या करुन दाभोलकर ही कसरत करीत आहेत.]
(त्यामुळेच)दुसरी गोष्ट अशी की इतर धर्मातल्या अंधश्रद्धांविषयी जेव्हा बोलल जात त्यावेळी बाकी लोक म्हणतात अगोदर तुमच्या घरातील(धर्मातील) घाण(अंधश्रद्धा) दुर करा मग इतरांच्या घरात(धर्मात) ढवळाढवळ करा. हिंमत असेल तर मुसलमानांच्यातील अंधश्रद्धा दुर करुन दाखवा बर असा बेरकी सवाल (आक्षेप) नेहमीच केला(घेतला) जातो.
धनंजय म्हणतात तस बदल म्हणजे शेवटी अधिका(उणे) असणार.
तर अशी ही गोची आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Mon, 08/10/2009 - 11:02
नवीन
असे का? कुठच्याही सज्ञान माणसाने (पुरुष/ स्त्री/ तृतियपंथी) स्वतःचा धर्म स्वतः ठरवावयाचा असतो. तो जर लोकांनी मानला नाही, तरी काय बिघडते?
. ह्यात काही 'बेरकी' आहे की नाही ते माहिती नाही. तूर्तास असे मानून चालू की हा अगदी बेरकी प्रश्न आहे. तो रास्त आहे का चूक हे महत्वाचे.
ह्यासंबंधी अगोदरच उपक्रमावर माझी व प्रकाशांची थोडी जाहीर व थोडी व्य. नि. तून चर्चा झालेली आहे. ही वर सांगितलेली कारणे आता निदान मलातरी नवीन आहेत, आणि ती पटण्यासारखी नाहीत. मी प्रकाशांना लिहीले होते की एखादा प्रकल्प राबवतांना तो परिणामकारक (effective) किती हा एक मुद्दा व तो किती कमीत कमी 'खर्चात' (इथे मला नुसता पैशाचा खर्च अभिप्रेत नाही, तर सर्वच रिसोर्सेस अभिप्रेत आहेत) (efficient) करत आहात हा दुसरा.
आता अनिस ह्यातील केवळ दुसरा मुद्दा बघत आहे. कुठलीही एकवाक्यता नसलेल्या हिंदू धर्मातील गटांना वेगवेगळे घेऊन झोडपणे हे कमी 'खर्चाचे' (quite efficient) आणि म्हणून तुललेने बरेच कमी जिकीरीचे आहे. ह्याउलट इतर एकसंध व नियनंत्रित धर्मांतील अंधश्रद्धा दूर करण्याचा केवळ प्रयत्न करणे हे पहाडावर डोके फुटून घेण्यासारखे महाकर्म. खरे तर कुटुंबनियोजनास धर्माच्या नावाखाली विरोध करणे हे सामाजिक वे देशाच्या स्वाथ्यासाठी अत्यंत घातक आहे. तेव्हा त्या दिशेने अंनिसने काही कार्य चालवावे? तसे त्यांनी केले तर ते कार्य कुठल्यातरी ज्योतिषी, कुठलेतरी संभावित महाराज ह्यांच्यावरील लढ्यांपेक्षा कितीतरी परिणामकारक (effective) होईल, हे मलातरी लख्ख दिसते. महाराज, साधू ह्यांच्यावरील लढे चालवू नयेत असे नाही. पण चळवळीची सर्वच शक्ति इथेच गुंतवली आहे, ते आक्षेपार्ह नक्कीच आहे.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 08/09/2009 - 20:40
नवीन
वाखाणण्यासारखं आहे ना? मग झालं तर!
तरीही मग बघावं तेव्हा हे दाभोळकर गळे का काढत असतात?
काम करत रहा, यश मिळेल...
साला जागृतीच्या नावाखाली समाजाची सतत उणीदुणी काढत रहायची म्हणजे काय?
समाज आहे हा असा आहे. तो बदलायची ताकद असेल तर बदला पण सतत दुर्मुखलेले राहून समाजाची उणीदुणी काढू नका!
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 08/09/2009 - 21:24
नवीन
तो बदलायची ताकद असेल तर बदला पण सतत दुर्मुखलेले राहून समाजाची उणीदुणी काढू नका!
अगदी चपखल शब्दात जे म्हणायचे ते म्हणले आहे! पुर्ण सहमत!
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Mon, 08/10/2009 - 04:20
नवीन
उणेदुणे काही न म्हणता "बदल हवा" असे कसे म्हणायचा बुवा? जे उणेदुणे वाटते, त्याच ठिकाणी बदल हवा म्हणता येतो.
काही उणेच नसेल तर बदल कसला? उणे आहे, असे वाटते, म्हणूनच बदल जरुरीचा आहे. बदल जरुरीचा आहे, असे कोणाला पटवण्यापूर्वी काही उणे आहे हे पटवणे प्राथमिक आहे.
फुले-आगरकर-आंबेडकर-रानडे- आणि होय हिंगण्याचे कर्वेसुद्धा समाजातील चालीरीतींविषयी उणेदुणे बोलत. धोंकेंपेक्षा रधों तर खूपच अधिक उणेदुणे बोलत. समाज बदलू इच्छिणारी व्यक्ती उणेदुणे बोलणार नाही ते कशी हेच माझ्या लक्षात येत नाही आहे.
समाज बदलणे फार कठिण आहे. त्यात अपयश येणारे फार असतात. (आयुष्य जाईस्तोवर अपयशाचे बोलके उदाहरण र.धों.कर्वे.) यश येईपर्यंत बोलू नये म्हटले तर ज्या थोड्या लोकांना यश मिळते तेही मिळणार नाही.
उणे असे काहीही न म्हणता समाज बदलल्याचे ऐतिहासिक (किंवा हल्लीचे) उदाहरण देऊन तात्या/विकास यांना आपले म्हणणे सुस्पष्ट करता येईल, असे वाटते.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 08/10/2009 - 05:32
नवीन
अहो पण त्यांनी कामही केलेलं आहे. दाभोळकरांनी काय असं ठोस काम केलं आजपर्यंत सांगा पाहू!
आणि कुठे वरील मंडळी, कुठे दाभोळकर!
छ्य्या...!
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 08/10/2009 - 05:45
नवीन
दाभोळकर यांचे ठोस कार्य प्रकाशकाका सांगतीलच. तरीही फुले-आगरकर-आंबेडकर-रानडे व दाभोळकर यांचे कार्य पहीले तपासुन पहायचा/ (अथवा एकाच मापात तोलायचा) अट्टहास समजला नाही.
अजुनही नरबळी, गुप्तधनाच्या लालसेने वाट्टेल ते विधी, चमत्कार करुन लुबाडणारे बाबा असताना, अंनिसची / दाभोळकर यांच्या कार्याची दखल न घेणे अनाकलनीय आहे.
फुले-आगरकर-आंबेडकर-रानडे यांनी देखील काही सुरवात केली तेव्हा तुम्ही म्हणाला तश्याच प्रतिक्रिया उमटल्या असणारच.
उणे असे काहीही न म्हणता समाज बदलल्याचे ऐतिहासिक (किंवा हल्लीचे) उदाहरण देऊन तात्या/विकास यांना आपले म्हणणे सुस्पष्ट करता येईल, असे वाटते.
उत्तराला बगल का?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/10/2009 - 05:59
नवीन
सहजराव, अनिस किंवा दाभोळकरांच्या कार्याची दखल कोणी घेतली असेल,नसेल घेतली ते क्षणभर विसरु, पण, अंधश्रद्धा, बुवाबाजी,चमत्कार भोंदूगिरी, तांत्रिक-मांत्रिक यांच्या जोखडापासून सामान्य माणसाला मूक्त करण्याचे काम अनिस आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत तेव्हा या चळवळीचे आपण नुसते स्वागत नव्हे तर अशा चळवळीत सहभागी होऊन त्यांना पाठबळ दिले पाहिजे असे मला वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 08/10/2009 - 06:16
नवीन
चांगल्या कामात पाठबळ दिले पाहीजे म्हणायचे होते सर!
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 08/10/2009 - 06:12
नवीन
सर्व प्रथम येथे अनिसला विरोध करणारे हे अंधश्रद्धेच्या बाजूचे आहेत असे मला वाटत नाही. मी नाही इतकी मी खात्री देऊ शकेन. श्रावणात शिमगा करणारे, अंधश्रद्धा कसली पाळणार? ;)
मी अनिसला शत्रू मानत नाही. पण त्यांची वाट चुकली आहे अथवा तसे नसेल तर ते समाजाची दिशाभूल करत आहेत असे समजतो. तेंव्हा मग अनिसला विरोध का व्हावा याचा विचार केला तर काय जाणवते - संवाद करण्यात काही तरी बिघडतं आहे...तुमच्या वरील प्रतिसादात, तुम्ही म्हणालात की, "आयुष्य जाईस्तोवर अपयशाचे बोलके उदाहरण र.धों.कर्वे.." आणि त्याच्याशी सहमत आहे. त्या संदर्भात अजून एक तितकेच दुर्दैवी नाव, (उल्लेख केला असला तरी) आहे ते आगरकरांचे, ज्यांच्या प्रतिमेच्या प्रेतयात्रा तत्कालीन विरोधकांनी, त्यांच्या जिवंतपणी काढल्या आणि मरेपर्यंत वाळीत टाकून मनस्ताप दिला.
मात्र असे का व्हावे? फुले, आंबेडकर, म. कर्वे, यांना इतके टोकाचे अनुभव का आले नाहीत? (रानड्यांबद्दल वेगळे खाली लिहीत आहे). कारण साधे आहे, यातील फुले-आंबेडकरांनी समाजावर कोरडे ओढले असले तरी, समाजात राहूनच (समाजाचा भाग म्हणून) काम केले. म कर्व्यांनी कोरडे ओढले का ते माहीत नाही, पण त्यांनी "आधी केले मग सांगितले" या उक्तीप्रमाणे, स्वतः विधवेशी विवाह केला. त्यांना विरोध केला तो केवळ धर्ममार्तंडांनी ज्यांनी टिळकांना पण पाद्र्याच्या हातचा चहा प्यायला म्हणून वाळीत टाकले अशांनी... पण ते (म. कर्वे) समाजाबद्दल कडवट बोलत वेळ घालवत बसले नाहीत. किंबहूना स्वतःचे ध्येय ठरवले आणि ते अत्यंत संयमाने मिळवण्याचा प्रयत्न केला.
पण आगरकर आणि रं.धो कर्व्यांनी काय केले? वाट्टेल तसे समाजावर कोरडे तरी ओढले अथवा ज्या गोष्टींसाठी समाजाची तयारीच झाली नव्हती अशा गोष्टीं समाजाने लगेच आत्मसात कराव्यात म्हणून कडवट हट्ट धरला. अशा पद्धतीने समाजसुधारणा करता येत नसते...काही अंशी असा प्रकार सावरकरांबरोबरही झाला.
टिळकांना प्रच्छन्न सुधारक म्हणायचे, पण वरकरणी जसे टिळक जसे सुधारणांच्या बाजूने नसायचे तसे त्यांच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वातंत्र्ययुद्धाच्या बाबतीतही भ्रामक कल्पना नव्हत्या. त्यामुळे ते कायम म्हणत राहीले की आज मी जे काही काम करतो आहे त्याने समाजाची नुसती मानसिकता तयार होत आहे. उद्या त्यातून पुढची पिढी स्वातंत्र्य मागायला उठेल आणि मिळवेल, जरी ते पहायला मी हयात नसलो तरी... त्या एका गोष्टी वरून (हळू हळू बदल घडवणे आणि समाजाला तयार करणे) त्यांचे त्यांच्या तरूणपणी वासुदेव बळवंत फडक्यांबरोबरचे संबंध दुरावले होते...
तात्पर्य समाज एकदम बदलता येत नाही, तो संयमाने बदलताना पण विरोध होतो, पण त्याच वेळेस कुठेतरी ऐकून घेयची तयारीपण होत असते. मात्र जेंव्हा तेच कडवट टिकेतून (याला नुसतीच उणीदुणी काढणे म्हणतात) होते तेंव्हा मात्र त्याचा परीणाम हा इप्सित ध्येयाच्या विरोधातच होतो...
(वाचनाच्या आठवणीतून) आता रानड्यांबद्दलः रानड्यांनी विधवा विवाह आणि एकंदरीत स्त्रीयांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. मात्र या रानड्यांची पत्नी जेंव्हा गेली, तेंव्हा वडीलांच्या हट्टामुळे असे म्हणत का होईना पण एका कुमारिकेशी "जरठबाला" मधे मोडेल असाच विवाह केला... जेंव्हा एका वक्त्या मुलाने, रानडे वादविवाद स्पर्धेत, "सुधारणा का होत नाहीत" ह्याचा उहापोह करताना, सुधारणावादीच इतरांना ब्रम्हज्ञान सांगत असताना, स्वतःच्या आयुष्यात मात्र सुधारणा करून घेत नाहीत, असे म्हणत रानड्यांचेच उदाहरण देऊ लागला, तेंव्हा ह्याच रानड्यांनी ताबडतोब उठून त्याला खाली बसवले...
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 08/10/2009 - 13:26
नवीन
उणे असे काहीही न म्हणता समाज बदलल्याचे ऐतिहासिक (किंवा हल्लीचे) उदाहरण देऊन तात्या/विकास यांना आपले म्हणणे सुस्पष्ट करता येईल, असे वाटते.
आत्ताच एक उदाहरण वाचनात आले, त्यामुळे ते नंतर जरी ऐतिहासिक ठरू शकले तरी ते आत्ता "हल्लीचे" मधे मोडेलः
Big 92.7 FM presents City's very own Green Ganesha
या बातमी प्रमाणे, हे रेडीओ स्टेशन (मला माहीत नाही कोण वगैरे ते) सात ठिकाणी आहे आणि ते सर्वत्र लोकांना आवाहन करून घरटी एक वृत्तपत्र मागत आहेत. त्यांची थोडक्यात कल्पना अशी आहे की या वेळेस पेपर्सच्या लगद्याचा उपयोग करून गणपतीची मुर्ती तयार करायची आणि शहरातील प्रमुख ठिकाणी (prominent location) तिची स्थापना करायची. गणेशोत्सवाच्या प्रत्येक दिवशी कोणी तरी लोकप्रिय व्यक्ती (celebrity) आणून तीच्याकडून आरती/पुजा वगैरे करायची आणि हे सर्व करत असताना पर्यावरण, प्रदुषण आणि एकंदरीत eco-friendliness चा संदेश पोचवायचा.
वास्तवीक हे सर्व करायच्या ऐवजी ते रेडीओ वरून जाहीर करू शकले असते, गणेशमुर्तींमुळे किती प्रदुषण होते, असल्या मुर्ती पर्यावरणाला कशा घातक आहेत. असा वापर बंद करा, वगैरे. पण ते काही न करता हा साधा उपाय योजला आहे. पुण्यात तसे सांगून झाले आहे, काही लोकांनी जरी त्यामुळे बदल केला असला तरी एकंदरीत काय त्याला विरोधच जास्त झाला आणि परीणामी अजूनच विरुद्ध कृती झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 08/09/2009 - 21:13
नवीन
विकिभौ, तुमच्या तीन वाक्यांच्या प्रतिसादात बरेच विरोधाभास भरलेले आहेत. असो. चालुद्या.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sun, 08/09/2009 - 17:02
नवीन
बुद्धीप्रामाण्यावादाची एक गोची आहे.
त्यांची एक गोची होते. माझ्या बुद्धीला जे पटते तेच सत्य असे मी मानतो. हे म्हणणे योग्य आहे. अनीस चे कार्यकर्ते हे कसोशीने पाळतात पण त्याच वेळेस ते हे विसरतात की त्यांच्या बुद्धीला न कळणारेही बरेच काही आहे त्या गोष्टी ते समजून घ्यायचा प्रयत्नाच करत नाहीत.
मला समजत नाही ते आस्तित्वातच नाही ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. त्या अंधश्रद्धेची जपणूक अनीसचे कार्यकर्ते मात्र कसोशीने करतात
शिवाय ते कार्यकर्ते प्रत्येक गोष्ट एकाच मोजपट्टीवर मोजायचा आग्रह धरतात.
उदा: पृथ्वीपासून उर्टचा ढग १५कोटी पेक्षाजास्त किमी वर आहे हे ते लगेच मान्य करतात / मोबाईलमुळे मानवी कानावर परिणाम होतो हेही मान्य करतात. पण मंत्रोच्चारामुळे मनःशान्ती मिळते हे मान्य करत नाहीत
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
- Log in or register to post comments
द
दादा कोंडके
Sun, 08/09/2009 - 19:04
नवीन
मला वाटतं बुद्धीप्रामाण्यवादाबरोबरच ढोंगीपणाविरुद्ध अंनिस चा लढा आहे. मंत्रोच्चाराचे महत्व पटवून एखादा पाखंडी लोकांना लुबाडत असेल किंवा भारीत पिचू :) कानात ठेवल्यामुळे मोबाईलमुळे परिणाम होणार नाही असं म्हणणारा एकच.
"I always win, except when I loose. But then I just don't count" :D
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 08/09/2009 - 20:51
नवीन
सहमत आहे..
बुद्धीप्रामाण्यवाद ही खूपच तोकडी संकल्पना आहे!
आपला,
(सौताला बुद्धीप्रामाण्यवादी अर्थात 'लै शाणा' न समजणारा) तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 08/10/2009 - 05:34
नवीन
मनःशांती मिळते ती मंत्रावरील दृढ श्रद्धे पोटी केलेल्या उच्चारणामुळे. अनेकदा मंत्रांचे उच्चारण हे केवळ 'गतानुगतिक' असते. मेकॅनिकल बाब म्हणा हव तर. सबब मनःशांती मिळते ती मंत्रातील शब्दांच्या अर्थामुळे नव्हे. कधी त्यातील गेयता, त्यावरील श्रद्धा यामुळे मिळालेले ते समाधान आहे. हा प्लासिबो इफेक्ट आहे. इफेक्ट आहे हे मान्यच. अश्रद्ध लोकांना हे समाधान नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 08/10/2009 - 05:33
नवीन
,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरप,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
हे सण आता हिन्दुनी बन्दच करायला हवेत .... बकरी ईद, रमजान, ख्रिस्मस, हॅपी न्यू इअर, मदर्स डे, फादर्स डे आणि दाभोळ्कर जयन्ती हे एवढे सण असताना वरचे जुनाट सण कशाला साजरे करायचे ?
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 08/10/2009 - 05:35
नवीन
हा हा हा! :)
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 08/10/2009 - 06:01
नवीन
सण साजरे करायला विरोध नाहीच. लोकांच्या श्रद्धा हे हत्यार करुन शोषणाचे राज/अर्थकारण हा मुद्धा आहे
अवांतर- या कलियुगात ल्वॉक यवढे धार्मिक कसे झाले ही भानगड काय कळानी ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 08/10/2009 - 06:11
नवीन
गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती
यांच्यामध्ये शोषण होते, तर शोषण करणार्याना विरोध करायचा... बॅक्टेरिया शरीरातील इतर पेशीना त्रास देत असेल, तर बॅक्टेरीयाना मारायचे... का शरीर त्याना आश्रय देते म्हणून शरीर सम्पवायचे ? डॉक्टर दाभोळकरना जरा बेसिक मेडिसिन परत एकदा शिकून घ्यायला सान्गा ... प्रॅक्टीस न करता बाकी उद्योग करत बसलेत त्यामुळे बेसिक विसरलेत ते !
(.. बेसिक न विसरलेला डॉक्टर...)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 08/10/2009 - 06:21
नवीन
छे छे अहो निस्त विंजेक्शन द्यायच. पन ते शरिरालाच टोचावे लागते ना. प्रबोधनाचा डोस/विंजेक्शन हे अप्रिय वाटते. अंधश्रद्धाळू लोकांची किव करता कामा नये हे तत्व त्यातुनच आले. कधी कधी कार्यकर्त्यांकडुन उत्साहाच्या भरात नकळत कीव केली जाते मग माणस दुखावतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 08/10/2009 - 06:20
नवीन
खालील बातमी वाचल्यावर पटते की अर्थकारण हा मुद्दा नक्कीच आहे. मात्र दाभोळकर त्या संदर्भात अर्थकारणाबद्दल बोलतील का अशी शंका आहे. (आधी एक गोष्ट माहीतीसाठी: हिंदू धर्मीय संस्थांमधे सरकारी नेमणुकीचा अधिकारी ट्रस्टमधे असतो आणि सगळे जाहीर करावे लागते. जाहीर करावे लागते हे चांगले आहे... मुस्लीमांमधे वक्फ बोर्ड असते, पण सरकारी अधिकारी नसतो. शिख, बुद्धांबद्दल कल्पना नाही, पण सरकारी अधिकारी नसतो असे वाटते. ख्रिश्चनांबद्दल? खाली वाचा. हा ऑर्गनायझर मधील लेख नाही, तर संघावर टिका करणार्या डेक्कन हेराल्ड मधील लेख आहे!):
Church funds equal Indian Navy’s annual budget
Panaji:
Christians are a mere 2.5 per cent of the country’s population. But, the Church in India suffers from a case of plenty, says Remy Denis, All India Catholic Union President.
Church authorities control funds equivalent to the Indian Navy’s annual budget. The Church is also the second largest employer after the government, he said.
Eduardo Faleiro, a former Union minister and Goa NRI Commissioner, is among the growing number of Catholics like Prof Denis, who support a law to govern Church properties and a far greater degree of transparency in the way the Church manages its earthly assets.
“The Church is not a symbol of power but service, and democratic laws must apply to it equally. All religions must be kept on the same footing,” Faleiro said at a conference called to debate the matter of bringing Church properties under state laws.
The laws that govern Church properties in Goa were enacted during the Portuguese regime. The same laws have long since been repealed in Portugal, Faleiro said.
Almost all other religions in India have laws enacted to administer their properties, K T Thomas, former Supreme Court judge, said. Hindu temples are governed by laws specifically enacted for each trust and their accounts are subject to judicial review. The Sikhs, one of the smallest religious groups in the country, have the Sikh Gurudwara Act. Muslim trust properties comes under the Wakf Act.
“I feel the opposition from the Christians is on account of a fear that a provision for judicial scrutiny is likely to expose the expenses and magnitude of wealth of the denomination,” Thomas said. The head of the Believers Church had recently acquired a huge plantation in Kerala for Rs 123 crore. This was apart from the vast assets already held by the denomination, he said. The Church in Kerala also runs its own media network.
Thomas said there was a misplaced apprehension that the Parliament, through legislation, would grab the properties of the churches. No such law could be passed by Parliament or State legislatures, he said. All religious denominations have the right to own and acquire properties, establish and maintain religious institutions. “But, in matters of administration of your properties you have to abide by the law,” he said.
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 08/10/2009 - 06:21
नवीन
अवांतर- या कलियुगात ल्वॉक यवढे धार्मिक कसे झाले ही भानगड काय कळानी ब्वॉ!
का म्हणजे.. ? लोक सन्ख्या वाढली... रस्ते, गाव त्याप्रमाणात वाढली नाहीत... मग आता रस्त्यावरती, देवळात त्यापटीने त्याचे प्रदर्शन वाढले... कलि युगात दोन नवीन धर्म निघालेत महाराजा ! तिथे लोक धार्मिक झालेत याचे आश्चर्य कशाला करत बसायचे ?
अनिस च्या भाकर्या भाजण्यापेक्शा डॉक्टर दाभोळ्कर सरकारी दवाखान्यात फॅमिली प्लॅनिन्गच्या सर्जरी करत बसले असते, तर कदाचित यावर थोडे तरी नियन्त्रण आणू शकले असते ! ....
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 08/10/2009 - 05:40
नवीन
................................दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनि................................................................................
मग त्यात काय चुकीचे आहे ? एक सिवाजी न होता तो सुन्नत सबकी होती... हे दाभोळ्कर विसरला काय ? अन्धश्रद्धेच्या नावाने दाभोळकर टोळी काढू शकतो..... धर्माच्या नावाने काढली तर बिघडले कुठे ?
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 08/10/2009 - 05:56
नवीन
>>>>>>>>>>>>>>> मनःशांती मिळते ती मंत्रावरील दृढ श्रद्धे पोटी केलेल्या उच्चारणामुळे. अनेकदा मंत्रांचे उच्चारण हे केवळ 'गतानुगतिक' असते. मेकॅनिकल बाब म्हणा हव तर. सबब मनःशांती मिळते ती मंत्रातील शब्दांच्या अर्थामुळे नव्हे. कधी त्यातील गेयता, त्यावरील श्रद्धा यामुळे मिळालेले ते समाधान आहे. हा प्लासिबो इफेक्ट आहे. इफेक्ट आहे हे मान्यच. अश्रद्ध लोकांना हे समाधान नाही>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
१. मनःशांती मिळते ती मंत्रावरील दृढ श्रद्धे पोटी केलेल्या उच्चारणामुळे... म्हणजे श्रद्धा अनिस ला मान्य आहे तर... मग धर्माला विरोध करायचे नाटक कशाला ?
२. सबब मनःशांती मिळते ती मंत्रातील शब्दांच्या अर्थामुळे नव्हे.................. दाभोळकराच्या नावाने दहा मिनिटे जप करून बघा... मनशान्ति मिळते काय ते सान्गा... मिळाली तर इतर धर्मियाना जाऊन सान्गा.. उद्यापासून बान्ग देताना दाभोळकराच्याच नावाने द्या.. अन्धश्रद्धा निर्मूलन गाडगे महाराज पण करत होते... पण ते देखील गोपाला गोपाला हा जप करत होतेच की...
३. अन्धष्रद्धा निर्मुलन कायदा हा धर्म मार्तन्डामुळे अडकला आहे, अशी बोम्ब अनिस मारत असते... प्रत्यक्षात हा कायदा अनिस मुळेच अडकला आहे... कारण श्रद्धा आणि अन्धश्रद्धाच मुळात अनिसला डिफाइन करता आलेली नाही.... नरबळी देणे , पशु बळी देणे इ इ इ अशी उदाहरणे म्हणजे व्याख्या ठरू शकत नाही.... दाभोळकरला या कायद्यात श्रद्धेची व्याख्याच ठरव्ता आलेली नाही... मग त्याच्या पली कडे जे आहे, ती अन्धश्रद्धा ही व्याख्या तरी तो काय कपाळ करणार ?
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 08/10/2009 - 09:19
नवीन
धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
आणि हा पैसा जर लोकानी सरकारला दिला तर सरकार त्यातून किती मदरसे आणि चर्च ना सहाय्य करणार ? धर्मावर खर्च झालेला पैसा हा जर तुम्हाला व्यर्थ वाटतो, तर सगळ्या धर्माचे असे एकत्रित टेबल अनिस च्या मासिकात दर वर्षी का जाहीर नाही करत ?
दुसर्या देशात असणारे तीर्थ स्थ्ळ बघण्यासाठी सरकार त्या धर्मियाना विमान खर्च देखील पुरवते.. दाभोळ्कराना तो दिसतो का ? मग आपल्या खर्चाने आम्ही उत्सव केले तर बिघडले कुठे ?
नरबळी देण्यासाठी कर्ज काढणारा एखादा माणूस आणि नियमितपणे आपले सण साजरे करणारे सामन्य जन हे सगळे एकाच अन्ध श्रधेचे बळी म्हणायचे का ? दोन ओळीचा कायदा करून सगळ्याना एकाच फटक्यात उडवायचे का ?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/10/2009 - 08:56
नवीन
छ्या, हा लेख 'अंनिस'बद्दल आहे का दाभोलकरांबद्दल! प्रकाशकाका, तुम्ही दाभोलकरांना हा लेख आणि आनुषंगिक चर्चा दाखवाच. अंनिस म्हणजे दाभोलकर ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी किती कष्ट दाभोलकरांच्या वारसाला करावे लागतील याची कल्पना येईल!! ;-)
बाकी कर्क आणि नील यांच्याशी सहमत.
अदिती
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 08/10/2009 - 09:53
नवीन
हे प्रतिसाद प्रातिनिधिक असतात. FAQ सारखे हे FSO (frequently sustained objections) असतात. यातुनच विचार पुढे जाणार आहे. हे नक्की दाभोलकरांना दाखवेन. समाजात अशी देखील माणसे आहेत कि प्रकाशात न येताही अंधश्रध्दा निर्मुलनाचा विचार विज्ञानाच्या प्रसारातुन सांगत असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 08/10/2009 - 10:17
नवीन
>>>अंधश्रध्दा निर्मुलनाचा विचार विज्ञानाच्या प्रसारातुन सांगत असतात.
म्हणजे विज्ञानाचा प्रसार हाच अंधश्रद्धा निर्मुलनाचा विचार का?
विज्ञानाचा आधार न घेता अंधश्रद्धा निर्मुलन होवुच शकत नाही का?
की विज्ञान हेच अंतिम सत्य आहे ही नव्या युगातील अंधश्रद्धा ?
आणि हीच विज्ञानाची शोकांतिका ?
नक्की काय ?
समजावुन सांगाल काय?
(अंधश्रद्धाळु, गावंढळ म्हणुनच धार्मिक ) अवलिया

- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 08/10/2009 - 10:25
नवीन
विज्ञान हे चिकित्सेला सतत खुले असते. निरिक्षण, अनुमान,प्रयोग आणि निष्कर्ष या प्रमुख टप्प्यात त्याची सतत प्रक्रिया असते. एखादा सिद्धांत हा जेव्हा काही निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला असमर्थ ठरतो त्यावेळी त्याची चिकित्सा होत असते, विज्ञान हे वस्तुनिष्ठ असते व्यक्तिनिष्ठ नसते. अपौरुषेय, अपरिवर्तनिय , बाबावाक्यं प्रमाणं , अशी भानगड विज्ञानात नसते. धर्म या शब्दाला व्याख्येत पकडायला गेलात कि शब्दोच्छल व पांडित्य चालू होते, वर्षानुवषे तेगुर्हाळ चालूच आहे. शेजारधर्म, पितृधर्म,मातृधर्म,राष्ट्र्धर्म ,आपदधर्म या अर्थाच्या धर्म या शब्दात वेगळी छटा आहे. हिंदु धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म इ. या धर्माच्या अर्थात रिलिजन या अर्थाची छटा आहे.गुणधर्म यातील छटा, अधर्म यातील छटा या वेगवेगळ्या आहे.धारये त् या शब्दाशी त्याची व्युत्पत्ती सांगितली जाते जगणे हा पण धर्मच आहे. पण व्यावहारिक पातळिवर रिलिजन या अर्थानेच तो वापरला जातो, धर्माची चिकित्सा करणे म्हणजे धर्माशी प्रतारणा करणे असे समीकरण रुजल्याने रुढी,परंपरेच्या माध्यमातून जोपासला गेलेल्या अंधानुकरणाची चिकित्सा कुणी केल्यास त्याला धर्मबुडव्या, पाखंडी अशी विषेशणे लावली जातात. जन्म ज्या धर्मात झाला तो धर्म त्याला आपोआप चिकटतो (धर्मांतर करण्याची सोय आहे पण ती नंतर) बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे गॅलिलिओ ला ती गोल आहे हे मांडल्याबद्दल झालेला छळ हा ज्ञात आहेच.(खर तर त्याच्याही अगोदर अनेकांनी ते मांडले होतेच, आपल्याकडे आर्यभट्ट्, भास्कराचार्य यांनी) प्रत्येक धर्मात विश्वाच्या व्युत्पत्ती बाबत वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्याला वैज्ञानिक उदयामुळे छेद जाउ लागले. पण त्याचे तंत्रज्ञानात रुपांतर झाल्याने माणसाच्या ऐहिक जीवनात निर्माण झालेली उपयुक्तता लक्षात आल्याने औद्योगिकरणाची क्रांती युरोपात झाली. विज्ञानाची घोडदौड ही आता धर्म कालबाह्य करणार हे लक्षात आल्याने विज्ञान व धर्म (अध्यात्म) हे एकमेकांचे शत्रू नसून परस्पर पूरक आहेत अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली. जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथे अध्यात्माचा प्रांत चालू होतो ही मांडणी आता कमी होत चालली आहे. विज्ञान हे अंतिम सत्य ही देखील अंधश्रद्धाच
(छापील)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 08/10/2009 - 10:31
नवीन
नेहमीप्रमाणे गोलमटोल उत्तर देवुन विषयाला गुंडाळले. असो.
चालु द्या.... :)
--अवलिया

- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/10/2009 - 10:45
नवीन
'सायन्स अँड रिलिजन' नावाचे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, ते जरूर वाचा.
अदिती
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 08/10/2009 - 19:14
नवीन
सायन्स अॅन्ड रिलिजन चा मराठी अनुवाद धर्म आणि विज्ञान या नावाने उपलब्ध आहे. या पुस्तकात ख्रिस्ती धर्मात असलेल्या चर्चने जोपासलेल्या श्रद्धा!यावर बराच उहापोह आहे. तरिही या पुस्तकातील उदाहरणे एकांगी वाटतात
"चार्वाक दर्शन" या आ ह साळुंख्याच्या पुस्तकात वैदीक धर्मियानी ज्ञानाचा/चिकित्सकतेचा कसा पद्धतशीर नायनाट केला त्याबद्दल उत्तम माहिती आहे
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 08/10/2009 - 19:45
नवीन
आ ह साळुंखे ? बर बर
चालु द्या अगदी निवांत :)
--अवलिया

- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 08/10/2009 - 10:26
नवीन
तुमची अनुदिनी पाहिली आणि मला चक्कर आली... अनिस पण आणि कुन्डली पण ..? तुम्हाला मल्टिपल पर्सोनॅलिटी डिसोर्डर आहे का ?
:)
ही तुमची अनुदिनी :
<<<<<<फलज्योतिष चिकित्सा मंडळ ही लग्न करु इच्छिणा-यांच्या ज्योतिष विषयक अडचणी समजून घेणारे, त्यावर व्यावहारिक तोडगे सांगणारी, संभ्रमावस्थेतील लोकांना तंत्रशुद्ध मार्ग दर्शन करणारी संस्था असल्याचे श्री प्रकाश घाटपांडे म्हणाले. विवाह समस्येने गतानुगतिक बनलेल्या समाजाच्या घटकांचे कोणत्याही पद्धतीने शोषण न होउ देता मार्गदर्शन करणे हेच या संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. >>>>>>>
अनिस ने अन्धश्रद्धा निर्मूलन कायद्याचा जो मसुदा तयार केलेला आहे, ( तोच, ज्याच्या मध्ये श्रद्धा आणि अन्ध श्रद्धा यांच्या व्याख्याच नाहीत !) त्यात ज्योतिष सांगणे/ ऐकणे/ पहाणे हेही अन्ध श्रद्देत घातले आहे, आपल्याला कल्पना आहे का ?
बाकी तुम्ही पॉलिटिक्स चान्गले खेळता हो! अनिस ची मदत घ्यायची आणि नाडी परीक्शा वाल्या ना अनिस कडून झोडपायचे .. स्वता मात्र कुन्डल्या बघायला मोकळे.... 'मोहरा' मधला नसिरुद्दीन चा रोल तुम्हाला द्यायला हवा होता ! :) ( दाभोळकर म्हणजे तुमचे सुनिल शेट्टी !!! )
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 08/10/2009 - 10:35
नवीन
हॅहॅहॅ . ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद वाचा अजुन चक्कर येईल.
(दुतोंडी)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 08/10/2009 - 10:43
नवीन
चक्कर आली... डोळ्यासमोर तारे ( आणि ग्रह देखील !) चमकले !!!
:)
माझ्या मित्राकडे एक सॉफ्ट वेअर आहे... त्यात माझे भविष्य मी पाहिले, त्याने सान्गितले आहे... हा माझा शेवटचा जन्म आहे आणि मग मला मोक्ष मिळणार आहे !... तेन्हा पासून मी आता भविस्ष्याची चिन्ता करायचे सोडून दिले आहे ! :)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 08/10/2009 - 20:01
नवीन
मग? मी काय बोल्लो होतो? साला हा घाटपांडे लै डेंजर मनुक्ष आहे! :)
हा हा हा! :)
आपला,
(रवीना प्रेमी) तात्या टंडन! :)
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

- Log in or register to post comments
अ
अभिज्ञ
Mon, 08/10/2009 - 09:08
नवीन
कुठलेही कार्य तडीस नेण्यासाठी "श्रध्दा" पाहिजे.
त्या शिवाय दाभोळकरांना वा अंनिस ला त्यांनी हाती घेतलेले कार्य पुर्ण करता येणार नाही हे मात्र खरे.
;)
काय म्हणता?
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
- Log in or register to post comments
प
पक्या
Mon, 08/10/2009 - 11:00
नवीन
>>गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. ...त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती.
इथे अनिसला / दाबोलकरांना धर्मभावनांचे जे विकृतीकरण आणि त्यात आलेले राजकारण दिसत आहे त्याला त्यांनी विरोध करावा. बाकी सण आपण का साजरे करतो? त्याचे एक कारण म्हणजे आपल्या रटाळ जीवनातून /रहाटगाड्यातून , रोजच्या कामधंद्यातुन सुटका होऊन मौजमजा करता यावी, कुटुंबासमवेत , मित्रांसमवेत छान वेळ घालवता यावा हे तर आहेच. ह्यात अंधश्रद्धा कसली आलीय?
आणि सण तर प्रत्येक धर्मात आहेतच आणि इतर धर्मात ही सणातील काही बाबी सार्वजनिक रित्या साजर्या होतात. उदा. सांताक्लौजची परेड, इस्टर एग हंट.
जर सण साजरे करताना त्यात काही अनिष्ट गोष्टी घडत असतील तर त्यांना पायबंद जरुर घाला / चांगले बदल सुचवा पण त्यासाठी धर्माच्या उत्सवी पणावर टिका नको.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 08/21/2013 - 06:13
नवीन
अंधश्रद्धा निर्मूलनाचे महाराष्ट्रातील प्रणेते डॉ नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली. या निमित्त दाभोलकरांचे विचार लोकांपर्यंत पोचावे हा धागा वर काढण्याचा हेतु.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 08/21/2013 - 06:30
नवीन
तुम्ही सुद्धा ?
दाभोळकर ...
हिंदी चॅनेलवाल्यांसारखा दाभोलकर काय !
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »