रव्या-खोबर्‍याची भाकरी - एक झटपट मधल्या वेळचे खाणे

साहित्य - रवा किसलेले खोबरे (प्रमाण रव्याच्या किमान अर्ध्याने) आले हिरवी मिरची मीठ पाणी तेल कृती - १) आले, हिरवी मिरची आणि खोबरे वाटून घ्या २) त्यात चवीपुरते मीठ घाला ३) त्यात थोडे (रवा बुडेल इतपत) पाणी घाला ४) रवा घालून सर्व मिश्रण एकजीव करा ५) त्याचे छोटे गोळे करून भाकरीसारखे थापा ६) तापलेल्या तव्यावर तेल टाकून, भाकर्‍या दोन्ही बाजूने खरपूस भाजा टीपा - १) आले आणि हिरवी मिरची यांचे प्रमाण आपापल्या चवीनुसार ठरवावे २) ह्या भाकरीस वेगळ्या तोंडीलावण्याची गरज नाही (आले-मिरची-मीठामुळे) ३) चिमूटभर साखर (वैकल्पिक) घालता येईल ४) रवा घातल्यानंतर ताबडतोब भाकर्‍या करायला घ्या. रवा फार काळ भिजत राहिला तर भाकर्‍या खरपूस होणार नाहीत. फोटो - Image removed.

झटपट पाकृ मस्त दिसते आहे, करून पहायला हवी. पाण्याऐवजी ताक वापरून अशीच एक झटपट डोशां/उत्तपांची कृती वाचल्याचं आठवतं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

जबर्‍या..!

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!