Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण सारे...

व
विकास
गुरुवार, 08/27/2009 - 21:36
🗣 77 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19929 वाचन

💬 प्रतिसाद (77)
न
नितिन थत्ते Sat, 08/29/2009 - 17:12 नवीन
माझ्या प्रतिसादातच मी 'वर दिलेल्या माहितीवर विसंबून' लिहिले आहे त्यामुळे ती व्याख्या टिळकांनी केली की अजून कुणी हे माहिती नाही. सध्या आपण सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेली व्याख्या असे म्हणू. कारण ती व्याख्या कोणी केली हे माझ्या प्रतिसादासाठी मुळीच महत्त्वाचे नाही. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sat, 08/29/2009 - 17:18 नवीन
माझ्या प्रतिसादातच मी 'वर दिलेल्या माहितीवर विसंबून' लिहिले आहे त्यामुळे ती व्याख्या टिळकांनी केली की अजून कुणी हे माहिती नाही. मग तुमच्या माहीतीत नक्कीच तृटी आहे. टि़ळकांचा आणि हिंदूत्वाचा संबंध नाही. तसेच त्यातील वेदप्रामाण्य वगैरे जे काही आपण मुद्दे लिहीले आहेत त्यांचा आणि सुप्रिमकोर्टाचा शाब्दीक संबंध दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 08/29/2009 - 18:29 नवीन
निमित्तमात्र यांनी लिहिलेल्या प्रतिसादावरून लिहिले होते. त्रुटी असेलही. नवी माहिती: त्रुटी नसावी कारण http://www.hindubooks.org/scj/ch18.htm या दुव्यावर रमेश प्रभू खटल्याचे निकालाचे टेक्स्ट आहे. (ते डॉक्टर्ड नसेल तर सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे टिळकांनी गीतारहस्यात ही व्याख्या केली आहे. (reverence to Vedas याचा वेदप्रामाण्य असा अर्थ मी केला आहे.) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
निमीत्त मात्र Sat, 08/29/2009 - 18:37 नवीन
नवी माहिती: त्रुटी नसावी कारण
धन्यवाद थत्ते! तुम्ही लिहिलेले तृटी 'असेलही' असे विधान विचारांचा समतोल दाखवते. मीही तसेच म्हणतो. तृटी 'आहेच' म्हणणारे मात्र तो समतोल दाखवत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
श्रावण मोडक Sat, 08/29/2009 - 19:03 नवीन
As Dr. Radhakrishnan has observed: "The Hindu civilization is so called, since its original founders or earliest followers occupied the territory drained by the Sindhu (the Indus) river system corresponding to the North-West Frontier Province and the Punjab. This is recorded in the Pig Veda, the oldest of the Vedas, the Hindu scriptures which give their name to this period of Indian history, The people on the Indian side of the Sindhu were called Hindu by the Persian and the later western invaders" (The Hindu View of Life by Dr. Radhakrishnan, p. 12). That is the genesis of the word Hindu. थत्ते यांनी दिलेल्या दुव्यावर गेलो तर तिथं हा पाचवा वेद सापडला. आता आली का पंचाईत? याचा दुवा मिळेल का कुठं? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
निमीत्त मात्र Sat, 08/29/2009 - 18:29 नवीन
टि़ळकांचा आणि हिंदूत्वाचा संबंध नाही.
हा तर विनोदच आहे. गितारहस्य लिहिलेल्या टिळकांचा आणि हिंदुत्वाचा संबध नाही? बाकी तूर्तास हिंदू धर्म म्हणजे काय त्या विषयी इथे सविस्तर वाचा: http://www.omnipelagos.com/entry?n=hinduism सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या हे त्यांचे हिंदू धर्मावरील वैयक्तिक मत आहे. ह्याच अर्थ ते जे म्हणतात तो हिंदू धर्म नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 08/29/2009 - 17:10 नवीन
एकूण लेखाचा रोख आम्ही असले गर्वसे कहो टाइपचे लेख लिहित राहणार पण तुम्ही मात्र टीका करणे सोडा असा आहे.
विकास यांची आजवरची जालिय वाटचाल पाहता हे वाक्य पटत नाही. किंवा उपरोक्त लेखात तसे कुठेच जाणवलेही नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sat, 08/29/2009 - 18:25 नवीन
>>विकास यांची आजवरची जालिय वाटचाल पाहता हे वाक्य पटत नाही असहमत. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
निमीत्त मात्र Sat, 08/29/2009 - 19:04 नवीन
विकास यांची आजवरची जालिय वाटचाल पाहता हे वाक्य पटत नाही.
वाटचाल पाहिली. तीव्र असहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
कालिन्दि मुधोळ्कर Sat, 08/29/2009 - 18:25 नवीन
>>एकूण लेखाचा रोख आम्ही असले गर्वसे कहो टाइपचे लेख लिहित राहणार पण तुम्ही मात्र टीका करणे सोडा असा आहे. १००% बरोबर बोललात. अगदी अचूक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
त
तेन्नालीराम Sat, 08/29/2009 - 19:02 नवीन
विकासराव, आपला लेख आवडला. हा दुवा मी वाचला होता पण तुमचे परीक्षण वाचेपर्यंत तितका अपील झाला नव्हता. आताच डोक्यात ट्यूब पेटली. धर्म या विषयावरचे माझे वाचन तुटपुंजेच आहे तरी कांहीं चुकीचे असल्यास क्षमस्व व कृपया जरूर दुरुस्त करावे. मी असे वाचले आहे कीं जे धर्म जेरुसलेममध्ये उगम पावले ते सर्व धर्म त्यांनी सांगितलेलाच "देव"च खरा आहे असे मानतात आणि बाकीचे देव हे देव नाहींत व त्यांना भजणे चुकीचे आहे अशी शिकवण देतात. ख्रिश्चन व मुस्लिम मित्रांशी बोलताना व वाचनावरून असे आहे असे वाटते पण ज्यू धर्मही तसंच सांगतो का याबद्दल खात्री नाही. (माझे कोणीही ज्यू मित्र नाहीत.) याबद्दल कुणी सांगेल कां? फक्त हिंदु धर्मच हे मान्य करतो कीं देव एक नसून अनेक (३३ कोटी) आहेत व शिवाय ब्रह्मदेव निर्मिणारा (creator), विष्णु सांभाळणारा (savior or who maintains) व शिव संपवणारा (destroyer) अशी कामाची रीतसर विभागणीही आहे. सगळेच देव आपल्याला चांगल्या रस्त्यावर नेतात असे हिंदु धर्म सांगतो. म्हणूनच आपला धर्म सहिष्णू समजला जातो. मग तो का लोकप्रिय नाही? मी तूलनात्मकपणे हमखासपणे सांगू शकत नाहीं पण इतर धर्मांपेक्षा हिंदुधर्मात rituals जास्त असतात का? त्यामुळे आपला धर्म हास्यास्पद होतो का? इतर धर्मातही उपजाती आहेत, पण हिंदु धर्माला वाईट नाव मिळायला चातुर्वर्णाचे खूप योगदान असावे असे वाटते. त्याचे एका बाजूने बरेच निर्मूलन झाले आहे पण आता विरुद्ध दिशेने चातुर्वर्णाचा प्रसार वाढतोय. जोवर दोन्ही दिशांचे चातुर्वण्य संपुष्टात येत नाहीं तोवर हिंदु धर्म लोकप्रिय होणे कठीण. स्त्री-पुरुषांना दिलेली समानता असे अनेक चांगले मुद्दे हिंदु धर्माला जास्त गुण मिळवून देऊ शकतात. हे चांगले मुद्दे सांभाळून व चातुर्वणासारख्या वाईट प्रथांचा नि:पात करून आपण आपला धर्म बळकट केला पाहिजे. चूक-भूल द्यावी-घ्यावी. ते. रा.
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sun, 08/30/2009 - 03:36 नवीन
मी भारतीय असण्यासाठी हिंदू असणे गरजेचे आहे का ? कुठल्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यावा हे न समजल्याने डायरेक्ट मुळ धाग्याला प्रतिसाद देतोय..खरं तर कौल टाकायची इच्छा झाली होती. :-) (धागा वाचून डोक्यात जाळ झालेला) शाहरुख
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 08/30/2009 - 04:36 नवीन
मी भारतीय असण्यासाठी हिंदू असणे गरजेचे आहे का ? अजिबात नाही. मी तसे कुठे म्हणले असे वाटत नाही. (धागा वाचून डोक्यात जाळ झालेला) शाहरुख काळजी घ्या, नाहीतर त्यामुळे नंतर डोक्यात राख जाईल :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
त
तेन्नालीराम Sun, 08/30/2009 - 04:46 नवीन
अजीबात नाहीं. असे आपण विचारताच कामा नये. भारतियाने भारताशी (आणि फक्त भारताशी) १०० टक्के एकनिष्ठ असले पाहिजे व भारताच्या हितापेक्षा दुसरे काहीही श्रेष्ठ नाही यावर त्याचा विश्वास असला पाहिजे. नोकरी, कुटुंब, ऐश्वर्य, धर्म, जात असल्या वैयक्तिक गोष्टी भारताच्या हिताआड येत असतील तर त्यांचा त्याग करण्याची तयारी असली की पुरे. ते. रा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
श
शाहरुख Sun, 08/30/2009 - 05:36 नवीन
आपण माझ्या प्रश्नातील 'मी' ला जर "मी" ( खरं तर २ दुहेरी अवतरण चिन्हं द्यायला पाहिजेत ;-) ) घेतले असेल तर माझा तो हेतू नव्हता...मी सर्व भारतीयांबद्दल प्रश्न विचारायला हवा होता. माझा रोख जे लोक इथे हिंदू हा धर्म मानत नाहीयत त्यांच्यावर होता.जर हिंदू हा धर्म नसेल आणि एका प्रदेशाची (भारत देशाची) जीवनपद्धती असेल तर तर सर्व त्या प्रदेशाचे सगळे लोक (भारतीय) हिंदूच असले पाहिजेत...आहे का तसे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेन्नालीराम
व
विकास Sun, 08/30/2009 - 05:41 नवीन
माझा रोख जे लोक इथे हिंदू हा धर्म मानत नाहीयत त्यांच्यावर होता.जर हिंदू हा धर्म नसेल आणि एका प्रदेशाची (भारत देशाची) जीवनपद्धती असेल तर तर सर्व त्या प्रदेशाचे सगळे लोक (भारतीय) हिंदूच असले पाहिजेत...आहे का तसे ?? माझे उत्तर या आणि अजून हवे असल्यास व्यक्तीगत संदर्भातही बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
य
यशोधरा Sun, 08/30/2009 - 06:58 नवीन
माझा रोख जे लोक इथे हिंदू हा धर्म मानत नाहीयत त्यांच्यावर होता.जर हिंदू हा धर्म नसेल आणि एका प्रदेशाची (भारत देशाची) जीवनपद्धती असेल तर तर सर्व त्या प्रदेशाचे सगळे लोक (भारतीय) हिंदूच असले पाहिजेत...आहे का तसे ??
शाहरुख, कळीचा मुद्दा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून तरी होय असेच आहे. हिंदू ही जीवन पद्धतीच आहे, केवळ चौकटबद्ध रिलिजन वा पंथ नव्हे. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या कोणत्याही पंथाचे अनुयायी असलात, तरीही तुम्ही भारतीय असाल तर, भारतवर्षाची जी जीवनपद्धती आहे, ती तुम्हाला मान्य असेल, त्यामागचे तत्वज्ञान आणि भूमिका तुम्हाला मान्य असेल व जर तुम्ही ती मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
न
निमीत्त मात्र Sun, 08/30/2009 - 13:07 नवीन
यशोधराजी, अहो गोंधळ झालय तुमचा.
एका प्रदेशाची (भारत देशाची) जीवनपद्धती असेल तर तर सर्व त्या प्रदेशाचे सगळे लोक (भारतीय) हिंदूच असले पाहिजेत...आहे का तसे ??
ह्याचे उत्तर होय असेल तर हिंदू = भारतीय हे समानार्थीच शब्द झाले की. तसे नाही आहे हे लक्षात घ्या. तसेच हिंदूंवर टीका केली तर ती समस्त भारतीयांवर टीका आहे, ख्रिश्चन, मुस्लिम सगळ्यांवर. मग हिंदूंवरच का टीका करता? ख्रिश्चन लोकांच्या अंधश्रद्धा दिसत नाही का असे विधान करणारे विकास सारखे लोक चुकिचे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
श्रावण मोडक Sun, 08/30/2009 - 13:44 नवीन
बहुदा यशोधरा यांचा गोंधळ नसावा. हिंदू या शब्दासंदर्भात त्यांनी आधी दिलेल्या संदर्भांकडे पाहिले तर गोंधळ नाही. त्यांच्यालेखी आजकालचा भारतीय म्हणजेच हिंदू असा व्यापक संदर्भ आहे, असा माझा त्या वाचनातून निष्कर्ष आहे. कारण त्यांनी हिंदू शब्दाची जी उत्क्रांती दिली आहे तीच मुळात जिओ-पॉलिटिकल आयडेंटिटीच्या अंगाने जाते. त्यामुळे त्या काळात त्या आयडेंटिटीमध्ये किमान बौद्ध, जैन हे तर अ-वैदिक असतीलच, इतरही असंख्य कालौघात समाविष्ट होत गेले असतील. पण त्यांची तशी स्वतंत्र नोंद झालेली नसेल. शिवाय या सगळ्यांच्या धर्म म्हणून डिफायनिंग फॅक्टर ठरणाऱ्या चालीरीती बऱ्याचशा एकमेकांशी मिसळलेल्या असल्याने ते सारेच एक असेही मानले गेले असण्याची शक्यता अधिक आहे. त्याहीपलीकडे या साऱ्यांमागील विचारांविषयी (म्हणजे बुद्धाचा वैदिकांपेक्षा वेगळा विचार, महावीराचा वेगळा विचार, चार्वाकाचा वेगळा विचार, उपनिषदे आणि वेद यातील भेद वगैरे) या 'हिंदू' म्हणून तेव्हा उल्लेख करणाऱ्यांनी काही अभ्यास करून ठेवला आहे का, हेही त्यांच्या एकूण 'हिंदू' या आकलनाविषयी काही प्रमाणे मानण्याआधी तपासून पहावे लागेल. आता यशोधरा यांनी दिलेल्या संदर्भांवरून त्यांच्या मताविषयी मी काढलेला निष्कर्ष चुकीचा असेल तर गोष्ट निराळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र Sun, 08/30/2009 - 14:16 नवीन
आणि मग मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू लोकांचे काय? तेही (कालौघात) हिंदू धर्मात समाविष्ट झालेले आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sun, 08/30/2009 - 17:08 नवीन
आणि मग मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू लोकांचे काय? तेही (कालौघात) हिंदू धर्मात समाविष्ट झालेले आहेत का? (जाड ठसा मी केला आहे) छ्या... मी कुठं तरी 'हिंदू धर्म' असं म्हटलं आहे का? यशोधरा यांनी मांडलेल्या मुद्यांचा* विचार करता, हिंदू ही संज्ञा जिओ-पॉलिटिकल आयडेंटिटी या अंगाने जाते असे माझे म्हणणे आहे. मी तिथं कुठंही धर्म हा विषय आणलेलाच नाही. धर्म ही जातकुळी हिंदू या शब्दाला जोडली नाहीत तर त्यात मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू वगैरेही समाविष्ट होतील, पण कालौघात. अर्थात, इथे कालौघात हा शब्द फसवा आहे. कारण काळाच्या ओघात हिंदू हा शब्दच मुळी वैदिक धर्मासाठी अप्रोप्रिएट झालेला दिसतोय. बाकी चर्चा चालू द्या. *यासाठीचा संदर्भ त्यांनी द्यायला हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
त
तेन्नालीराम Sun, 08/30/2009 - 07:42 नवीन
शाहरुखसाहेब, माझ्या मते जो माणूस भारताला "पहिला देव" (देवासारखा) मानतो तो भारतीय, मग तो घरी कुठल्याही देवाची पूजा वा प्रार्थना करो. भारतीयत्व ही सार्वजनिक किंवा राष्ट्रीय निवड असून धर्म ही वैयक्तिक निवड आहे. त्या दृष्टीने मी श्री. ए. पी.जे. अब्दुल कलाम याना सच्चा भारतीय मानतो. यावरून आपल्याला पुरेसा बोध झाला असेल व आपल्या डोक्यातला जाळ विझला असेल अशी आशा आहे. ते. रा.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 08/30/2009 - 09:25 नवीन
सुंदर, अतीशय सुंदर युक्तिवाद, तेन्नाली-जी.जीते रहो! मी पण अब्दुल कलाम यांना दैवतच मानतो व त्यांच्याबद्दल खूप अभिमानही आहे. केवढे उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रपती म्हणून निवडून द्यायला पाहिजे होते! ते राष्ट्रपती असतांना इथे जकार्ताला एंबसीत त्यांची व्याख्याने आपले राजदूत वाचून दाखवायचे. ती भाषणे कुठे व त्या आधीच्या किंवा नंतरच्या राष्ट्रपतींची भाषणे कुठे? एपीजे अगदी "इंद्राचा ऐरावत"च होते. व्वा भाई व्वा! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेन्नालीराम
J
JAGOMOHANPYARE Sun, 08/30/2009 - 09:09 नवीन
१. हिन्दु धर्म हा एक स्वतन्त्र धर्म नसून अनेक सम्प्रदाया.म्चे व धर्मांचे मिश्रण आहे. प्राचीन भारतात शिव पूजक असा शैव धर्म होता.. ( आपण याला आज सम्प्रदाय म्हणतो.) शन्कर व पार्वती हे मुख्य दैवत, लिन्ग पूजा, शोडष्पचार मूर्तीपुजा करणे, म्रूत्यू नन्तरचे जीवन, ८४ लक्ष योनी, त्यात फिरणारा आत्मा या सन्कल्पना याच धर्मातल्या. २. याच्या इतकाच जुना दुसरा प्रमुख धर्म म्हणजे 'वैदिक धर्म' . हा आर्यांचा धर्म... हा मुळचा भारतातला की उत्तर ध्रुवावरचा हा मुद्दा आता विचार करण्याचे आता कारण नाही... इन्द्र, वरूण, मित्र, सविता,प्रजापती, भग, पूषण, रुद्र, आश्विनी अशा काही यातल्या देवता... मुळात या देवता निराकार असल्याने त्यान्च्या मूर्ती, देवळे न्व्हती... यज्ञ रुपात उपासना होती, ८४ लक्ष योनी- फिरणारा आत्मा वगिरे सन्कप्लना मात्र या धर्मात नव्हत्या.. तीर्थक्षेत्र ही सन्कल्पना नव्हती.. मूळ धर्म ग्रन्थ तीन वेद... रुग, यजु, साम ३. याखेरीज ब्रम्हदेव, मूर्तीरुप विष्णू व लक्ष्मी, गणपती, दत्त... याना मानणारे असे अनेक छोटे छोटे सम्प्रदाय ( की धर्म?) होते. ४. वर्षानु वर्शे हे सम्प्रदाय- धर्म आपापसात भान्डत होते.... व्यासानी जेन्व्हा पुराणे लिहिली ( सन्कलीत केली) तेन्व्हा मुख्य उद्देश होता... सगळे मिळून एक्सन्ध एक धर्म करणे.... यात वैदिक देवाना सारख्या अशा देवतान्चा प्रामुख्याने विचार झाला... प्रजापती= ब्रह्मा, वैदिक विष्णू= मूर्तीरूप विष्णू, रुद्र= शिव ... अशा सन्कल्पनातून मूळ वैदिक देव बाजूलाच राहिले... वेद देखील बाजूला राहिले.... वेदातील काही रुचा या यान्चे स्तवन करताना वापरल्या जाऊ लागल्या आणि मूर्ती व देवळे मात्र मूर्ती पूजक धर्मातून उचलले गेले... हे सर्व पौरोहित्य करणारे ब्राह्मण मात्र मूळचे वैदिक... अशा प्रकारे धेडगुजरी पुराणोक्त हिन्दु धर्म तयार झाला.... अथर्ववेद हा साधारण याच काळात झाला.. त्यात दोन्ही धर्मान्चे मिश्रण स्पष्ट दिसते... त्यामुळे अथर्ववेदाला पूर्वी वैदिक धर्मात स्थान नव्हते.. तेन्व्हा चतुर्वेद नव्हते--- वेद त्रयी ही सन्कल्पना होती.. गणपती अथर्व शीर्शात हे पहायला मिळते... एकीकडे मूर्ती रूप गणेशाचे वर्णनही आहे. आणि त्याच वेळी तू ब्रह्म, इन्द्र, विष्णू, अग्नि, रुद्र, वायू, सूर्य, चन्द्र आहेस, असेही लिहिलेले आढळते.. ५. पण व्यासानी जरी दोन धर्म मिसळले असले, तरी त्यापूर्वीही अनेकानी दोनी धर्मान्चा आदर केलेला दिसून येतो... उदा : राम- अश्व्मेध यज्ञ- वैदिक परम्परा... रामेश्वर लिन्ग स्थापना- शैव परम्परा... ६. आज सावरकरानी केलेली हिन्दु धर्माची व्याख्या वापरली जाते... ७. त्यामुळे हिन्दु धर्माला एक ईश्वर, एक पुस्तक, एक प्रेशीत असा प्रकार नाही... याचा गैर फायदा घेऊन 'इतर धर्माचे लोक' हिन्दु धर्माला एक पुस्तक नाही, एक प्रेशीत नाही.. त्याची व्याख्या नाही अशा कुटाळक्या करत असतात... पण त्याचा विचार करण्याचे कारण नाही... धर्म ठरव्ण्यासाठी या सगळ्या गोष्टी एक एक च असाव्यात असा कुठेही नियम नाही...
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 08/30/2009 - 09:19 नवीन
प्यारे-जी, सुरेख! आपली विधाने बरोबर आहेत कीं नाहींत (accuracy of statements) हे माहीत नाहीं , पण एकंदरीत आपला युक्तिवाद/मुद्दा आवडला. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sun, 08/30/2009 - 10:34 नवीन
माझी विधाने माझ्या मते बरोबरच आहेत... अनेक पुस्तकांचा सन्दर्भ यात आहे.... १. हिन्दु धर्माचे शैव रहस्य .. लेखक सन्जय सोनावणी ( या पुस्तकातील वेद विरोधी -ब्राम्हण विरोधी सूर मात्र पटणारा नाही... इतर इतिहास समजून घ्यायला चान्गले पुस्तक.) २. सनातन प्रभात ची देवता विज्ञान आणि हिन्दु देवता यावरची पुस्तके वाचा.. त्यातील उल्लेख : देवता निर्मिती बाबत ४ काळ आहेत : १. वेद कालीन - देवता अमूर्त होत्या.. देव या निसर्गातील शक्ती असून त्या उदर निर्वाह चालवत असतात.. २. ब्राम्हणे आरण्यके- देवाना मानवी भावना मिळाल्या... उदा देव कोपतो.. देव आनन्दतो... ३. उपनिशदे- देवाना मूर्त शरीर मिळाले... ४. पुराणे- देव पूर्णपणे माणसाळले... त्यांची लग्ने झाली.. त्याना मुलेही झाली.. ( रेशन कार्ड चा पुरावा माझ्याकडे नाही , क्षमस्व !) म्हणजे त्यान्च्या मते अमूर्त ते मूर्त देव हा एकाच धर्माचा प्रवास आहे... पण काही लोकान्च्या मते अमूर्त देव मानणारे आणि मूर्त देव मानणारे हे दोन स्वतन्त्र धर्म होते.... मला देखील असेच वाटते.... ऋग्वेदात शन्कराचा किती तरी ठिकाणी शिस्न देव, लिन्ग देव असा निर्भत्सना पूर्वक उल्लेख आहे, तो यज्ञात येऊ नये अशी अग्नीला प्रार्थना आहे.. ... आणि रुद्राचा मात्र आदर पुर्वक उल्लेख आहे.. म्हणजे शिव व रुद्र वेगळे, हे नक्की... ( त्या काळात) शैव लोक हे यज्ञ विरोधी लोक होते... म्हणूनच शन्कराचे एक नाव स्मरारी आहे.. म्हणजे यज्ञाचा नाश करणारा... ( अर्थात हा नाश शन्कर नव्हे तर त्या धर्मातील लोक करत होते हे सान्गणे नको!) टिळकान्च्या आर्क्टिक होम ऑफ वेदाज मध्ये ही काही उल्लेख आहेत... पूर्वी प्रजापती, विष्णू, रुद्र हे त्रि देव होते आणि ते अनुक्रमे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा यान्चे प्रतिक होते... ( रुद्र = रडवणारा... त्राही माम करणारा) कालान्तराने ब्रम्हा, विष्णू, महेश आले... तेव्हा आज रुद्राच्या जागी शन्कर हा समानार्थी शब्द झाला.. ब्रम्हदेवाला मानणारा सम्प्रदाय देखील ५ तोन्डाचा ब्रम्हदेव मानत होता ... तेव्हा वेद तर ३ होते... म्हणजे 'तो' ब्रह्म्देव आणि वेद याण्ची सान्गड बसत नाही... आज मात्र आपण चार तोन्डे चार वेदान्चे प्रतिक मानतो... वेदात ब्रह्म आणि ब्रह्मदेव असे दोन्ही उल्लेख आहेत, पण ते विश्व या अर्थाने... चार मुखे आणि चार वेद यान्चा उल्लेख ( बहुधा ) नसावा... एका पुराणकथेत शन्कराने त्याचे पाचवे तोन्ड उडवले असा उल्लेख आहे... सध्या त्यामुळे चार मुखान्चा ब्रम्हदेव आपण मानतो... विष्णू हा ऋग्वेदात आदित्याचे मूर्त रूप मानला जातो.. ( दोघाना आजही नारायण हा कॉमन शब्द आहे ! ) तेज आणि तीन पावलात तीन लोक पादाक्रान्त करणारे,पालन पोषण करणारे ... हे त्यान्चे कॉमन फॅक्टर्स ! इन्द्र या पर्जन्य देवतेला सहाय्य करणारा असे त्याचे स्वरूप होते... वेदात विष्णूच्या नावाने फारशी सुक्ते नाहीत.. कारण इन्द्र हा पर्जन्य देवता आणि निसर्गातील अन्नसाखळीचा निर्माता म्हणून अधिक महत्वाचा आहे.. विष्णू एक उप देव होता.. सन्ध्ये मध्ये म्हणूनच विष्णूचे नाव उपेन्द्र म्हणून येते.. विष्णू लक्ष्मी हे व्यापार करणार्‍या लोकानी वाढवलेले दैवत... पुराणोत्तर काळात विष्णू हे दैवत अधिक लोकप्रिय झाले... वेदकालीन लोक मूर्ती पूजक नव्हते आणि अचानक आपला धर्म मूर्ती पूजक कसा झाला हा किडा माझ्या डोक्यात अडीच वर्षे वळवळत होता... त्यातून त्यादृष्टीने मी मुद्दाम सन्दर्भ गोळा केले... या बदलामुळे आपण वेद वान्गमयाला मात्र पारखे झालो, हा मात्र माझा पक्का समज झालेला आहे... मला तरी वेद आणि अमूर्त निसर्गदेवता अधिक भावल्या.. अर्थात ३३ कोटीपैकी आपण काय निवडावे हा चॉईस आपल्याला आहेच की ! थोडक्यात, अमूर्त देव ते मुर्ती रुप देव हा हिन्दुन्चा प्रवास आहे... हा धर्म एकच की मिश्रण हा तसा वादाचा मुद्दा आजही आहेच.. यजुर्वेद सान्गतो : न तस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद यशः ( ज्याचे नावच इतके मोठे आहे, त्याची प्रतिमा असू शकत नाही.. ) गम्मत म्हणजे काही लोक याच वाक्याचा अर्थ लावतात : नतस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद यशः ( ज्याचे नावच मोठे आहे, त्याची नत म्हणजे नम्र माणसाने प्रतिमा करावी !) आणि इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मानी मात्र याच काळात मूर्ती रूप देव ते अमूर्त देव असा प्रवास केलेला आढळतो... हजारो वर्षे मूर्ती न बसवणारे वैदिक हिन्दु मूर्त्या आणि देवळे उभारायला लागले.. आणि मूळच्या मूर्ती पूजक रोमन संस्कृतीत निर्माण झालेले मुस्लीम मात्र मुर्ती नसणार्‍या मशिदी उभारायला लागले, हे सगळे गूढ आणि चमत्कारीक आहे..
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 08/30/2009 - 11:23 नवीन
Accuracyबद्दलचा माझा कॉमेंट माझ्या अज्ञानामुळे होता, आपल्या नाहीं. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा