वरील लेख हा वैचारिक दिवाळखोरी दाखवतो असेच मी म्हणेन. लेख वाचायला सुरूवात केल्यावर सविस्तर उत्तर द्यावे असा विचार होता. मात्र जस जसा लेख वाचत गेलो तेव्हा ह्या सामान्य सदस्याचे ( सदस्य एकवचनी म्हणून एकेरी उल्लेख , लेखकाचा नाही.) असामान्य जावाईशोध आणि आधीच ठरवलेले मत काही घटनांचा संदर्भ देऊ चिकटवण्याची घाई पाहिली आणि ह्या लगबगीची चिड येण्या ऐवजी किव आली.
३०% मध्ये विलीन व्हायचे/अनिवासींवर वर अंकुश ठेवायचे/ अनिवासींचे चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे.
ह्या वाक्यावर तर ठार उडालोच. धम्या इस्टाईलने म्हणायचे झाल्यास फुटलो.... धन्य धन्य !
ज्यांना भोचकसंघ काय? संघाची रचना काय? आदींची प्राथमिक जरी माहिती असेल त्यांना सुध्दा वरील वाक्यातील विनोदाने हसू येईल. अशी वाक्ये हिंदीभाषी न्यूज चॅनेलमध्ये शोभून दिसतात हो ! कोट बदलला आणि आवाजाची पट्टी बदलली की त्या निवेदकांना जगातील कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार मिळतो. तुमचा तसा काही ग्रह झालाय का?
असो... लेखकाला आपलं मत मांडायला अधीक भरपुर वाव आहे. माझं मत एवढंच की पुर्वग्रहदूषीत मत मांडतांना उगाच संघाचा आणि परिवारातील संघटनांचा आणि सोबतच गेल्या २ वर्षांचा अभ्यास असल्याचा आव कशाला आणता?
मागे कुणीतरी म्हटल्या प्रमाणे झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठवणार?
- नानाशांत
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
मिसळपाव स्वयंभोचक संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. मिपाप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू खरडवह्यांमधून पाजले जाते. अविचारी विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच मिपाप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने मिपाच्या सिद्धहस्त लेखकांत भरती व्हावे. मि.स्व.संघ मैत्री-बित्री मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी मि.स्व.संघाचा प्रभाव एका विशीष्ठ टक्के लोकांवरच असतो. (कुठल्याही धाग्यातील बहुतांश प्रतिसादक पाहा). आजकाल इतर दालनांत जाऊन संख्या वाढवण्यासाठी या टक्क्यांच्या बाहेरच्या लोकांनाही प्रतिसाद दिले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा आपल्या टक्क्यातील लोकांनाच मिपावर वर काढणे हाच आहे.
प्रतिसादमात्र
माफ करा मात्र ही एका सामान्य सदस्याची मते नाहीतच. सामान्य सदस्य हे बिरूद येथे केवळ आपली तटस्थता जाणवावी म्हणून घेतलेलं आहे.
लेखाच्या सुरूवातीच्या परिच्छेदात जसे संदर्भ दिलेले आहेत त्यावरून संघाच्या समग्र वाटचालीचा अभ्यास (?) करून केलेले विधानं दिसतात.
भोचक संघसंबंधीत काही घटनांचा अभ्यास करून मग संघात कसा संभ्रम आहे आदींचे विश्लेशन करणार्या व्यक्तीला जेव्हा हे लक्षात येतं की हे फारच एककल्ली होतंय तेव्हा "ही सामान्य मानसाची मते आहेत" अशी झुल पांघरली की झालं. फारच सोईची वाक्ये आहेत ना?
भोचक संघाबाबत येथे आणि इतरत्र आधीच अनेक लोकांनी खुप उत्तम लिहून ठेवलं आहे. सामान्य मानसाने केवळ खरडी लिहून विचारल असतं तरी सर्व संभ्रम (?) दूर झाले असते.
त्याच विषयावर नव्याने चर्चा करायला हरकत नाही. पण काही तर नवीन मुद्दे हवेत ना?
- नानाशांत
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
वगैरे नाही. लिखाण एकांगी असु शकेल पण जे मुद्दे मला भेटलेल्या त्या सदस्याने मांडले त्याचे मुद्देसूद उत्तर मला देता आले नाही हे खरे.
निदान इथे त्यांची उत्तरे मिळतील म्हणून ते जसे च्या तसे लिहिले जो बोलला तो कदाचित पिसाळप्रेमी दलाचा कार्यकर्ताही असू शकेल
पराभाऊ
लेखातील वाक्ये वाचली की मनोरंजन होतं आणि शेवटी एवढ्या संख्येने सामान्य लोक भोचक संघाचं चांगलं व्हावं असं म्हणत आहेत तर संघाची काळजी करण्यासारखं काही नाही असं सुध्दा वाटतं.
खरं तर भोचक संघासाठी आयुष्य अर्पण करनार्या लोकांपेक्षा ज्यांना भोचक संघाच्या अवांतर क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे. आधीच्या उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय?
- (आनंदीत) नानाशांत
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
हेच म्हणतो.. लेख शिक्षकीय सहमतीच्या प्रतिक्षेत होता असे कळले... खाजगी वितरणाच्या प्रतित वाचयला मागितला होता, पण तोवर बोर्डावर आला.. भोचक संघात खरोखरची लोकशाही आहे हे खरे. असो.
प्रा. पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
संघ ही एक अतिरेकी संघटणा आहे
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
झोपलेल्यालाच उठवता येईल, झोपेचे सोंग घेणा-याला कसे काय उठवणार?
स्पष्टच बोलायचे तर हे वाचुन हसावे की रडावे तेच कळत नाहीय!
वरील लेख हा वैचारिक दिवाळखोरी दाखवतो असेच मी म्हणेन.
ज्यांना संघ काय? संघाची रचना काय? आदींची प्राथमिक जरी माहिती असेल त्यांना सुध्दा वरील लेखातील विनोदाने हसू येईल.
सर्वसामान्य सदस्य हे बिरूद येथे केवळ आपली तटस्थता जाणवावी म्हणून घेतलेलं आहे.
आधीच उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय?
"अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही"
आपल्या अंतर्मनात जावून संघाच्या सुरवातीपासूनच्या वाटचालीचा त्रयस्थपणे आढावा घ्या आणि संघाने देशाचे, देशवासियांचे काही नुकसान केले आहे कां, ते पहा आणि मग विचार मांडा.
लेख वाचून अंमळ हळवा झालो. आयटी प्रोफेशनल्स आणि अवांतर प्रतिसादकर्त्यांना पाकिस्तानात हाकलून देण्याच्या आंदोलनाबद्दल सोयीस्कर मौन बाळगलेले पाहून फॉक्स न्यूजची आठवण आली. येत्या दुर्गापूजेत आमचे एक परममित्र या विषयावर कमान उभारणार आहेत (तृतीय पारितोषिकप्राप्त). तोवर याबद्दल निषेध म्हणून तुम्हांला व्यनितून निषेधाचे खलिते आणि पोस्टातून कॉकटेलसाठी हाबानेरो मिरच्या धाडण्यात येत आहेत.
थोडक्यात नेहमीप्रमाणे काही विवक्षित लोकांनी, काही विवक्षित लोकांसाठी काही विवक्षित विषयांची टवाळकी करुन त्यांचे विवक्षित प्रकारे मनोरंजन व्हावे ह्याच विवक्षित हेतुसाठी साठी काढलेला धागा होता तर ....
असो, "लोकशाही"ची व्याख्याच ही आहे.
चालु द्यात ...
------
(येनकेन प्रकारे कंपूबाज) तोटा धाम
बरेच काही नवे वाचायला मिळाले.
लेख पुन्हा एकदा व्यवस्थित वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देतो.
तुर्तास ही पोच समजावी ..
विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ...
------
मोठा कोण
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
मनावर विकृत बुद्धिवादाची इस्त्री फिरल्याने असे होत असावे.
(परक्या देशातील- अरबस्तानातील लोकांची बाजू घेऊन माझा निषेध केल्याबद्दल निषेध) :)
(सपाट) नितिन थत्ते
संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच. :)
- धमाल मुलगा
(भक्ष्य)
च्यामायला तुम्ही संघामधे असलेल्या एका विशीष्ठ धर्माशी संबधीत लोकाच्यावर लिहले तर तुम्ही .. काय म्हणात तुमच्या भाषेत... सेकुलर... च्यामायला आम्ही नुस्तं भक्ष्य म्हणालो की दुर्लक्ष्य :?
लै भारी... !
जरा चष्मा काढा... नाही तर... दवाची मात्रा वाढवा मात्र साहेब :)
-II खाजे II
त्यासाठी तुम्हाला सोईच्या नाडी केंद्रात जावे लागेल
--नानाकांत ठोक
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
भोचक संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच.
-नाराज बटाटे
(ठुस्स)
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
स्वातंत्र्यानन्तर दोन वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे.
बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे.
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंभोचकानाच आता कळेनासे झाले आहे.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य सदस्यांना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंभोचक तयार होत नाहीत.
मिसळपाव स्वयंभोचक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे
ही वाक्ये वाचली की मनोरंजन होतं आणि शेवटी एवढ्या संख्येने सामान्य लोक संघाचं चांगलं व्हावं असं म्हणत आहेत तर संघाची काळजी करण्यासारखं काही नाही असं सुध्दा वाटतं.
खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे. आधीच्या उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय? :)
-(आनंदीत) धमालकांत
तुमची राजत्सु ही नवी सही आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. पण शुद्धलेखनात चूक झाली आहे का? 'रुजुत्सु' ऐवजी 'राजत्सु' लिहिलय का तुम्ही?
मिस्कीलपणा आवडला.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
लेख वाचला पण समजला नाही. बहुदा उपरोधिक असावा त्यामुळे कळला नसावा.
एका द्रुष्टीने बरेच झाले कारण वाचकांचे अभिप्राय (जे बर्यापैकी कळले) वाचल्यावर हा लेख इतरांनाही कळलाय की नाही कुणास ठवूक! पण हे फारच गहन प्रकरण आहे व त्यावर लोकांची फार टोकाची मते आहेत हे जाणवले.
असा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
भापू
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी