Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(मिसळपावीय स्वयंभोचक संघ )

प
परिकथेतील राजकुमार
Wed, 09/09/2009 - 14:59
🗣 79 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19566 वाचन

💬 प्रतिसाद (79)
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/12/2009 - 12:23 नवीन
आमच्या मते मिस्व संघ ही प्र वृत्ती आहे नी वृत्ती नव्हे! ती प्रत्येकात असतेच. प्रवृत्तीपादाच्या राज्यातही आहे आणि नीवृत्तीपादाच्या राज्यात ही आहे. काही लोक त्यावर काबू ठेवतात तर काही त्याचा कंपु बनवतात. काबूत ठेवा अथवा कंपुत ठेवा प्रत्येकाचे असे स्वतःचे फायदे वा कायदे आहेत. आणि खेकड्यालाच का म्हणुन प्रतिक मानायचे? हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला रेहमानी किडा अस्मानी ही नाही नी सुलतानी ही नाही. खेकडा हा कर्क आहे म्हणुन त्याला राशी चक्रात स्थान काय आणि रेहमानी किडा हा कृमी वर्गात मोडतो म्हणुन त्यास स्थान नाही. पंचांगातल्या अवकळा चक्रातही स्थान नाही. आम्ही त्यासाठी तेरावी रास पुन्हा नीर्माण करु. आमचे मते रेहमानी किड्याची वळवळ ही कर्काच्या कळवळी पेक्षा अधिक महत्वाची आहे कारण ती च्या प्रेरणेतुन नीर्माण होणारे साहित्य प्रकाशात येते. आणि चांदण्या काय? अरे नक्षत्र म्हणा नक्षत्र! ग्रहांच्या रत्नांना खडा म्हणल्यासारखे आहे. रत्नांना खडा म्हणणे म्हणजे खड्याचा सन्मान असला तरी रत्नाचा अवमान आहे. इंद्राच्या ऐरावताला कुणी हत्ती म्हणत का? जालिंदरबाबाच्या पुण्यपत्तनाने पावन झालेल्या या मिपाभुमीत मिस्व संघाने विणलेल्या कोशाला जळमट कोण म्हणतय? ही वीण खरतर बहुवाचकतेतुन आली आहे. अपभ्रंशाने ती भोचकतेतुन आली आहे असे म्हटले जाते .व्युत्पत्तीशास्त्रासारख्या नी र स विषयात रस घेउन आम्ही ते शोधुन काढले आहे. आम्हास त्याचे श्रेय नको आहे पण वस्तुस्थिती म्हणुन सांगणे भाग आहे. असो वरील नीबंधात आम्हाला परा कोटीची कळकळ जाणवते म्हनुनसनी हा पर्तिसाद प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/12/2009 - 12:53 नवीन
काका, हे काय आहे?? तुम्ही अकरावीत आहात का?? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/12/2009 - 13:01 नवीन
आम्ही हा णिबंध जालिंदरबाबाच्या चष्म्यातुन वाचला आहे. पण त्याला (चष्म्याला)'परा'कोटीचा नंबर आहे. त्यामुळे असे होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पारंबीचा भापू Sat, 09/12/2009 - 18:02 नवीन
११ वीबद्दलचा पॉइंट कुणाला लिहिला आहे? मला की प्रकाशसायबाला? आमच्याबद्दलच बोलायचे तर आम्ही जेमतेम चार बुकं शिकलोय. विंग्रजी वगैरे धा-पाच शब्दापुरता! पण हा लेख आरेसेसला उद्देशून असल तर दोन-तीन गोष्टी सांगाया पायजेल हायेत. १. ६५च्या युद्धात ऐन सरहद्दीवर आपल्या सैन्यामागोमाग संघवालेच रसद पोचवायला व इतर मदत करायला जिवाची तमा न बाळगता तैनात होते. बाकी कुणी माईचा लाल नाही गेला तकडे. २. आरेसेसला कितीही नावे ठेवा पण ती संघटना ११० टक्के देशभक्त आहे. ३. मोरवीचे धरण फुटल्यावर हजारो प्रेतांची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावायला सरकारी यंत्रणेआधी हे संघवालेच पोचले होते व अनेक प्रेतांना वेळेवर अग्नी वगैरे देण्यात गुंतले होते. ४. अशीच मदत ही संघटना आजही करते. ५. आजकाल स्वतःचीच निंदा करायची फॅशन झाली आहे त्याचा हा इफेक्ट आहे काय? सरकारही तसेच आन लोकही. अगदी शिकलेले लोक पण गोंधळत आहेत. मग आम्हा अडाण्यांना काय पुसायचे? ६. शेवटची गोष्ट. इतक्या राष्ट्रभक्त संघटनेबद्दल असे आडून आडून "मिपा संघभोचक संघ" असे आडवलनाने लिवायचे कारनच काय? सरल सरल लिहा की. संघात लाज वाटण्यासारखे काय हाय? अभिमानाने ताठ मानेन उभा आहे हा संघ. तर सरळ लिवा, मग चांगल लिव किंवा वंगाळ. पण असा आडवळणाने न कळणार्‍या भाषेत नका लिवू. आमच्यासारख्याना समजत नाय! भापू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रमोद देव Sun, 09/13/2009 - 05:10 नवीन
हा लेख म्हणजे विजुभाऊंच्या लेखाचे विडंबन आहे....मात्र ह्यात रास्वसंघाचा काडीचाही संबंध दिसत नाहीये. तेव्हा उगाच आरडाओरड करू नका. मिस्वसंघ ही इथलीच एक कंपूबाजांची संघटना आहे आणि त्यांची निशाणी होती खेकडा. त्या सर्व कंपुबाजांनी ती निशाणी आपल्या खवमध्ये चिकटवली होती... मात्र आता ती बहुतेकांनी काढून टाकलेय. :) Image removed. ही पाहा ती निशाणी. आता संबंधितांच्या मनातील शंकाकुशंका दूर होतील अशी अपेक्षा. खरडवह्यांच्या विषयात ’विद्या वाचस्पती’ झालेल्या पराने अतिशय नेमक्या शब्दात ह्या कंपूबाजांची(स्वत: त्यांचा सदस्य असल्यामुळे असेल कदाचित ;) ) सद्द्याची मन:स्थिती वर्णन केलेय त्याबद्दल ’परा’कोटीचे अभिनंदन. जियो पराशेठ! विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारंबीचा भापू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/13/2009 - 08:52 नवीन
मिस्वसंघ ही इथलीच एक कंपूबाजांची संघटना आहे आणि त्यांची निशाणी होती खेकडा.
माझ्या माहितीत इथे कोणीही कंपूबाज नाहीत. "शेखे"चा उल्लेख झालाच आहे तर सांगते, मीच ते चित्रं बनवलं होतं, पण मी 'कंपूबाजी' या शब्दातून जो तिरपा अर्थ प्रकट होतो तसलं आमच्यापैकी कोणीही काहीही करत नाही. आम्ही सगळे मिपावर काही काळानंतर मित्र झालो आणि एकमेकांचीच जाहीर टवाळी करत असतो हे तुम्ही फारतर म्हणू शकता. पण 'कंपूबाजी' म्हणजे नव्या लोकांची हुर्रे उडवणे, त्यांची सर्वांनी मिळून टवाळी करणे असले प्रकार आम्ही कोणीही करत नाही. जी काही मस्करी आहे ती आपसांतच असते. क्वचितच कोणा मित्र-मंडळाच्या बाहेरच्याला त्रास दिला जातो तेही मुलींना अनोळखी मुलांच्या खरडी वैग्रे आल्या तरच ... देवकाका, तुमच्यासारख्या जुन्या सदस्याने कंपूबाजी वगैरे लिहावे याचा प्रचंड खेद झाला. पण ठीक आहे, कदाचित तुमचं वाचन वैग्रे कमी पडत असेल. पण जाणूनबुजून हे लिहिलं असाल, तर तीव्र निषेध. बाकी रा.स्व.सं.बद्दल तुम्ही जे लिहीलं आहे, विडंबन इ. त्याच्याशी सहमत. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
द
दशानन Sun, 09/13/2009 - 10:48 नवीन
+१ अदितीच्या प्रत्येक शब्दाला सहमत. कंपुबाजी आम्ही करतो ते काही ग्रुप हल्ला करण्यासाठी नाही... नाही तर सगळेच नाही का वटणीवर आले असते ;) कंपुबाजी = जे सम विचारी आहेत ( तरुण ते आजोबा- पणजोबा) व ज्यांना एकमेकांशी मैत्री करायला आवडते त्यांचा ग्रुप. उगाच कुणाला आम्ही टार्गेट करावे म्हणून तयार केलेला ग्रुप नाही आहे हा... आमचा मस्तीचा / दंगा घालण्याचा एक देण्याचा तर एक (कधी कधी दोन) घेण्याचा... कंपुबाज अड्डा आहे जो व्यनीतून व खवतून प्रसार पावत आहे... नवनवीन शेंबडी पोरं / पोरी पण ह्या ग्रुप मध्ये... व नाना... बिपीन सारखे म्हातारे पण ह्याच आहेतच + माझ्या सारखे तरुण पण :ड तेव्हा तुम्ही ज्या शब्दात कंपुबाजी मांडली आहे त्या शंब्दाचा व त्यामागच्या भावनेचा निषेध निषेध !!!! जय हो ! कंपुबाजांनो एकत्र व्हा ! सगळ्यांना बाजूला टाकु नका... सर्वांना आपल्या मध्ये समावून घ्या.... येवढं बोलून मी माझं दोन शब्दांचे भाषण संपवतो... ! राम राम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 09/13/2009 - 09:08 नवीन
अदितीशी सहमत आहे. तुमची प्रतिक्रिया वाचून नवीन सदस्यांचा काही गैरसमज व्हायची शक्यता आहे (कारण कंपूबाजीचा सरळ अर्थ तिरपाच आहे आणि आम्ही तो अर्थ उपरोधाने घेतला होता.) म्हणून हे लिहित आहे. खरं तर खाजगी चॅट वर पण २-३ वेळा मी हे सांगितले होते की, सुरूवातीला कोणीच कोणाला ओळखत नसते, रोज गप्पा वगैरे होतात कधी भेटीही झाल्या आणि मगच मैत्री दृढ झाली. साहजिकच इथेही गप्पा आणि खेचाखेची सुरू झाली. या मधे कोणीही सामिल होऊ शकतात. आणि तसे झालेही आहेत, होत आहेत. नवीन सदस्य येतात, चेष्टा मस्करी करतात, दोन देतात दोन घेतात आणि 'फलाटावरचे डब्यात येतात.' इतकंच काय ज्यांनी आधी 'कंपू' हा शब्द पहिल्यांदा रूढ केला तेच आता कट्टर कंपूबाज झाले आहेत. तो खेकडा आणि ते ७०% याला काही संदर्भ आहेत आणि त्या संदर्भांचे विडंबन म्हणून ते आलं होतं. काही ठराविक लोकांनी दुसर्‍या लोकांना कधीच सामिल न करून घेता इतरांची टवाळकी केली असती तर त्याला रूढार्थाने कंपूबाजी म्हणता आले असते. अजून एक, पराने हे विडंबन लिहिले त्यात या तथाकथित खेकडा अथवा कंपूबाजीचा काहीच संदर्भ नव्हता. ते त्याच सारख्या एका दुसर्‍या लेखाचे निखळ विडंबन होते. तुम्ही जो खेकड्याशी आणि कंपूबाजीशी संबंध लावला आहे तो पटत नाहीये. असो. हा विषय चघळला कारण तुम्ही अगदी तो खेकडा वगैरे टाकून उत्साहाने स्पष्टीकरण दिलेत. अन्यथा, आमची कंपूबाजी चालूच आहे, नवीन मित्र मैत्रिणी भेटत आहेत, ओळखी होत आहेत. खर्‍या आयुष्यातले ताण तणाव या आभासी आयुष्यातल्या निखळ आणि खर्‍या मैत्रीने कमी होत आहे. सर्वांचे स्वागतच आहे. या!!! सर्वांचे स्वागतच आहे. :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Sun, 09/13/2009 - 09:29 नवीन
कंपूबाज नंतर ;) ही हसरी टाकायला विसरलो. त्यामुळे अदिती,बिकाशेठ आणि इतर मित्रमंडळींचा गैरसमज झाला...त्याबद्दल मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. बिकाशेठच्या खवत लिहिलेले त्याचेच वर्णन त्याच्याच भाषेत असे आहे..... माझ्याविषयी एक नंबर कंपूबाज. त्यावरून मी त्याला गंमत म्हणून नेहमी कंपूबाज म्हणून चिडवत असतो....पण त्याचा अर्थ माझ्या मनात असा कधीच नव्हता आणि नाही....की तो आणि त्याचे खास मित्रमंडळ हे कंपूबाजी करून इतरांना सतावत असते ....ह्याची कृपया नव्या-जुन्या अशा सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
श्रावण मोडक Sun, 09/13/2009 - 11:18 नवीन
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 09/13/2009 - 11:45 नवीन
आऽऽरम!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/13/2009 - 11:51 नवीन
मी गेय कविता लिहीणारच नाही ... हीहाहाहाहा :D अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रशांत उदय मनोहर Mon, 09/21/2009 - 19:13 नवीन
मदत करायला तयार आहे. ;) (दिवे घ्या हं देव काका) आपला, (तत्पर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
श्रावण मोडक Sun, 09/13/2009 - 12:26 नवीन
अग्रेसर... अग्रेसर १ - बिका अग्रेसर २ - टारझन अग्रेसर ३ - नंदन (अग्रेसर दक्ष, अग्रेसर सम्येक (?), अग्रेसर आsssरम) संघ संपद... लावा आता रांगा एकेका अग्रेसराच्या मागे - संख्या घ्यायला या रांगांमध्ये शेवटाला अनुक्रमे कमी उंची असणारे धमु, डान्या, परा यांनी यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विजुभाऊ Mon, 09/21/2009 - 08:27 नवीन
या लेखाचा मुळ संदर्भ हा इथे पहा http://misalpav.com/node/9296
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारंबीचा भापू
व
विकास Sat, 09/12/2009 - 14:10 नवीन
प्रकाशराव नक्की आपल्याला काय म्हणायचे आहे? का अदीती म्हणत असल्याप्रमाणे हा परीक्षेतील निबंध वाटला? सगळ्या गोष्टी कव्हर केल्यावर कशाला तरी मार्क मिळतील ही खात्री! ;) स्वगतः आता कळलं अवघड लिहीतो तेंव्हा इतरांना वाचताना काय होत असेल ते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टारझन Sat, 09/12/2009 - 12:51 नवीन
माझी प्रतिक्रिया उडाली ? आता स्मायलीपण उडणारेत का ? तसं असेल तर बाकी प्रतिक्रिया अजुन शाबुत ? असो ! चालूद्या -(प्रतिक्रिया डिलीटप्रेमी) टारोबा खोडरबर
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 09/12/2009 - 12:53 नवीन
क आणि ह आणी र!!! पराभाऊंना आणी इतर सर्व ष्टार (म्हणजे चांदणी नव्हे.... पण एका अर्थाने तशी चांदणीच) प्रतिसादकांना कोपरापासून दंडवत!!! - भट
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 09/12/2009 - 15:53 नवीन
हा लेख व त्यावरील प्रतिक्रिया पाहून 'जाने भी दो यारों' मधल्या धृतराष्ट्रासारखं "ये क्या हो रहा है" असे म्हणावेसे वाटते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/12/2009 - 16:03 नवीन
हा लेख व त्यावरील प्रतिक्रिया पाहून 'जाने भी दो यारों' मधल्या धृतराष्ट्रासारखं "ये क्या हो रहा है" असे म्हणावेसे वाटते.
तुमचं वाचून होतंय ... आमचं लिहीतानाच असं होत होतं! ;-) अरे, कोण्या संपादकाने माझ्या प्रतिसादातलं आख्खं वाक्यच उडवलेलं दिसतंय. असो. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
सुधीर काळे Sat, 09/12/2009 - 18:29 नवीन
आपण लिहिलेले मुद्दे तपासून पहातो. फारच इंटरेस्टिंग मुद्दे लिहिले आहेत आपण. मी लहानपणी संघाच्या शाखेला जात असे व तिथं देशभक्तीशिवाय दुसरं काही चर्चिलं जायचं नाही एवढं आठवतंय. आमचे मामासुद्धा संघवाले होते व त्याचा त्रासही त्यांनी खूप सहन केला ४८ साली! पण मूळ लेख नव्यांना तरी जरासा अनाकलनीय आहे. शेकडा खेकडा, ३० टक्केचाले, ७० टक्केवाले वगैरे काही शब्द आधी वापरले गेले असावेत, पण मलाही समजले नाहीत. असो. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
क
काळा डॉन Sat, 09/12/2009 - 20:28 नवीन
सुधीरकाका, समजेल हळू हळू सगळे! थोडा वावर वाढवा. :) (जाकार्ताहून) काळू दिवाळीअंकातील कथा टाईप करुन घेण्यासाठी माणूस हवा आहे, कृपया इच्छुकांनी व्य.नि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
क
काळा डॉन Sat, 09/12/2009 - 20:26 नवीन
च्यायला हा परा मला संघवाला वाटायचा. तोही चड्डीवाल्यांच्या टवाळकी मधे? लेकाचा संघीष्ठ किंवा स्युडोसंघीष्ठ तरी असेल असे वाटले होते. काळू दिवाळीअंकातील कथा टाईप करुन घेण्यासाठी माणूस हवा आहे, कृपया इच्छुकांनी व्य.नि करा.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sun, 09/13/2009 - 08:39 नवीन
स्वयंभोचक सन्घात स्त्रिया आहेत का? त्याना काय म्हणायचे? स्वयंभोचिका का ? :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/13/2009 - 09:17 नवीन
स्वयंभोचक सन्घात स्त्रिया आहेत का? त्याना काय म्हणायचे? स्वयंभोचिका का?
का हो का? तुम्हाला भलत्याच चौकशा दिसतात. स्त्रियांना आदराने आणि त्यांच्या नावानेच संबोधतात. बादवे, संघ-'व्यवस्थापका'ची जागा रिकामी आहे. आणि पदाचं नाव आहे स्वयंटोचक. विंट्रेश्ट असेल तर व्यनी करा ... मला नाही, स्वयंभोचक संघाच्या आय.डी.वर व्यनी टाका. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
J
JAGOMOHANPYARE Sun, 09/13/2009 - 09:33 नवीन
मला स्त्रिया बाबत आदर आहे हो . पण काही सन्घात स्त्रिया नसतात म्हणून ते सन्घ स्त्री द्वेष्टे असतात, असे भयन्कर निष्कर्ष काही लोक काढतात... असा स्त्री द्वेष्टेपणाचा आरोप या सन्घावर येऊ नये म्हणून चौकशी केली... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
त
तेन्नालीराम Sun, 09/13/2009 - 18:14 नवीन
भापूसाहेबांनी RSS बद्दल लिहिलेले मुद्दे पटले. विचार व्हायला हवा! ते. रा.
  • Log in or register to post comments
अ
अनुप्रिया Mon, 09/21/2009 - 10:30 नवीन
O:) O:) O:) O:) O:) O:) O:) O:) O:)
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Tue, 08/23/2011 - 21:15 नवीन
पंखे सगळे चालू उकाडा रॉक्स
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा