जी फॉर..
💬 प्रतिसाद
(60)
द
दशानन
Fri, 10/02/2009 - 16:01
नवीन
आज सकाळीच पाहिले होते.... !
मला वाटतं गांधीजींचा साधेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला असेल.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
- Log in or register to post comments
द
देवदत्त
Fri, 10/02/2009 - 16:16
नवीन
मला वाटतं गांधीजींचा साधेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला असेल.
मलाही तेच वाटते. ह्यात त्यांनी खादीच्या कापडावर बनलेला गूगलचा लोगो दाखवला आहे असे दिसते.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 10/02/2009 - 17:19
नवीन
तरीही Google च्या दोन 'ओ' अक्षरातून गांधींचा चष्मा आणि 'एल' अक्षरातून काठी दाखवता आली असती का असे वाटते.
चतुरंग
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Fri, 10/02/2009 - 17:59
नवीन
यातून साधेपणा कसा काय व्यक्त होतो ?? जाणकारांनी समजावून सांगावे..
मला लोगो आवडलाय..शिर्षकात सांगितल्याप्रमाणे "जी फॉर गांधी" असा लोगोचा अर्थ मी घेतला होता.
- Log in or register to post comments
द
देवदत्त
Fri, 10/02/2009 - 18:45
नवीन
मी एवढा जाणकार नाही परंतु मला वाटल्याप्रमाणे सांगतो.
इतर लोगो जसे रंगीबेरंगी होते तशा प्रकारे जास्त रंग किंवा चित्रकारीता नाही आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Fri, 10/02/2009 - 16:25
नवीन
सकाळी गुगल उघडल्याबरोबर हा लोगो दिसला.
लगेच तो फोटो सेव्ह करून ठेवलाय :)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 10/02/2009 - 16:29
नवीन
मलाही खूप मस्त वाटलं..!
एकदम प्रसन्न वाटलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™
Fri, 10/02/2009 - 16:44
नवीन
+१
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 10/02/2009 - 16:36
नवीन
काहीही वाटलेलं नाही !!!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 10/02/2009 - 16:49
नवीन
हेच म्हणतो. काहीच वाटले नाही.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Fri, 10/02/2009 - 17:07
नवीन
टार्या व पेशवे यांच्याशी सहमत
वाटायचय काय कर्म?
शेजारी शास्त्रींचा फोटो टाकला असता तर ठिक होते.
शास्त्रींचे प्रसन्न व्यक्तीमत्व निदान दिवसाची सुरुवात तरी चांगली करुन गेले असते.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 10/02/2009 - 19:42
नवीन
गांधी प्रेम... गांधी वाद.. हे सगळे खरोखर वादाचे मुद्दे आहेत. हा लोगो गुगल ने टाकून एका भारतीय नेत्याची दखल घेतली हेच यातून विकासदादाना सांगायचे आहे...त्याबद्दल इथे चर्चा करावी.
तेव्हा आपापले प्रेम्(गांधी प्रेम, नथुराम प्रेम, हिटलर प्रेम, आणखी कुठले असेल तर तेही..) यासाठी वेगळा धागा काढून तिथे चर्चा करावी, ही विनंती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 10/02/2009 - 21:00
नवीन
हा लोगो गुगल ने टाकून एका भारतीय नेत्याची दखल घेतली हेच यातून विकासदादाना सांगायचे आहे
बरोबर...
चूक असेल तर अवश्य सांगा, पण, वास्तवीक गुगल गेले काही वर्षे असे विविध व्यक्ती/सण यांच्यावरून लोगो तयार करत आहे. पण गांधीजी अथवा कुठल्याही भारतीयाचा म्हणून हा प्रथमच लोगो आला आहे. ही गांधीजींप्रमाणेच भारतीयांना पण दिलेली ओळख आहे. कोट्यावधी लोकांना आज हाच लोगो पहावा लागणार आहे...
आता वैयक्तीक मला गुगलला फाट्यावर मारायला आवडले असते पण जो पर्यंत आपण सर्वच (म्हणजे जग केवळ भारतीय नाही)दरोज जालावर शोधायला "गुरूजी" पेक्षा गुगल वापरत आहे तो पर्यंत तरी असा आनंद वाटण्यावर समाधान मानावे लागेल. :-)
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Fri, 10/02/2009 - 21:21
नवीन
भारतीय व्यक्तीचा कदाचित पहिला गुगल लोगो असु शकेल पण भारतीय दिवस, सण यांचे लोगो आधीही येऊन गेलेत.
बाकी गुरुजीला पण फाट्यावर मारू नका बरं का..स्थानिक माहिती त्यांच्याकडे जास्त चांगली असू शकते!! गुगलमधे ज्यांनी गुंतवणूक केली होती तेच गुरुजी मधेही गुंतवणूकदार आहेत.
मिपावर फक्त शास्त्रीजींनाच आदरांजली वाहिलेली बघून अंमळ मौज वाटली.हाहा..शास्त्रीजी आणि गांधीजी दोघांना आदरांजली वाहून माझे चार शब्द संपवतो :-)
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Fri, 10/02/2009 - 21:55
नवीन
सहमत्. २००३/४ मध्या गुगलने बेंगळुरुत केंद्र चालु केले.वाढ्ता इंटरनेट्चा प्रसार्,लोकसंख्या,अनेक भाषा,लिप्या यामुळे बर्याच सर्च इंजिन कंपन्यांनी भारत(आणि चीन) वर लक्ष केंद्रित न केले तर नवल्.गुरुजी पण चांगले सर्च इंजीन आहे.फुकट माहिती देण्याचा दावा करणार्या ह्या कंपन्या स्वतःचे सर्च इंजिन चालते कसे ह्या बाबतीत मात्र कमालीची गुप्तता पाळून असतात. वरील लोगो बनवण्यासाठी गुगलची मोठी टीमच आहे असे ऐकले आहे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 10/02/2009 - 21:27
नवीन
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 10/02/2009 - 21:32
नवीन
चांगली माहीती या निमित्ताने बाहेर आली! धन्यवाद!
बाकी गुरूजीं.कॉम भारतीयांचे आहे त्याला पण नाव मिळावे अशी शुभेच्छा करत होतो. फाट्यावर मारण्याची भाषा नाही!
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 10/02/2009 - 19:55
नवीन
हा लोगो पाहुन फार काही वाटले नाहे त्याचं कारण गुगल नेहमीच असे लोगो बनवते हे माहीत होतं. यात फक्त गुगल ची स्वतःला प्रसिद्ध करण्याची कल्पकता मनाला आकर्षुन जाते. पहा ना, तुम्ही धागा काढल्याने त्यांचा उद्देश सफल झालाच आहे. :)
गुगलने 'ओल्ड' लुक देण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. गुगलचे स्वतःचे असे ओल्डलुक होमपेजेस पुर्वी पाहीले आहेत.
जाता जाता: गूगल डूड्ल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 10/03/2009 - 04:54
नवीन
सहमत आहे..
आणि आमचे विकासराव अगदी अलगद सापडले गुगुलने विणलेल्या या जाळ्यात! :)
तात्या.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 10/02/2009 - 20:02
नवीन
मला लोगो आवडला. जग आपल्याला कशावरून ओळखते हे पाहून फार बरे वाटले.
ऋषिकेश
------------------

- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 10/02/2009 - 20:20
नवीन
छान छान!
आपला,
(सावरकरभक्त) तात्या.
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 10/02/2009 - 21:46
नवीन
या निमित्ताने काही निरिक्षणे.
मी नेहमी फिरत असणार्या बर्याच ऑनलाईन फोरम्सवर हा 'डुड्ल' चर्चेचा विषय ठरला आहे. (खाजगीत वा धाग्यावरती). तसेच, ऑर्कूट, फेसबुक वरही अनेकांनी हा फोटो टाकुन गुगलचा टीआरपी वाढवला आहे.
१४ नोव्हेंबरलाच्या बालदीना निमित्त त्यांनी भारतात डुडल डिसाईन स्पर्धा आयोजीत केली आहे. उत्सुकांकरता लिंकः http://www.google.co.in/intl/en/doodle4google/
गुगलची मार्केटींग कल्पकता अचाट आहे. (हा निष्कर्ष)
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
Fri, 10/02/2009 - 22:56
नवीन
मला वाटते गुगल.कॉम वर भारताची दखल घेतली ही आनंदाची गोष्ट आहे कारण मी आत्तापर्यन्त भारताबद्दल असे डुडल जास्तकरुन गुगल.को.इन वर बघितले होते गुगल.कॉम वर नाही..
चुभुदेघे..
स्वप्निल
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 10/03/2009 - 04:49
नवीन
माझ्या मते गुगुलला भारताची दखल झक मारत घ्यावी लागलेली दिसते!
गुगुलने भारतावर काही उपकार केलेले नाहीत. 'आमच्या नेत्याचा (गांधीचा का होईना!) लोगो बनवा होssss' असं त्यांना आम्ही सांगायला गेलो नव्हतो!
तात्या.
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
Sun, 10/04/2009 - 02:00
नवीन
केव्हाचीच घेतलेली आहे.. फक्त दाखवत नव्हते इतक्या उघडपणे..
उपकाराचा तर प्रश्नच नाही कारण हा प्रसिद्धीचा प्रकार आहे .. :)
स्वप्निल
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Fri, 10/02/2009 - 23:22
नवीन
आपला फाटा मजबूत करून ठेवणे..३-४ तास आहेत तयारीला ;-)
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 10/03/2009 - 01:03
नवीन
वरील फोटो फक्त google.co.in वरच होता; google.com वर नाही. त्यामूळे फक्त भारतातल्या IP addresses वरच हा फोटो असलेला लोगो
दिसला होता.
असेच इतर देशांचे लोगो पण त्या त्या देशातच दिसत होते. त्या त्या देशातील लोकांना कस्टमाईज प्रॉडक्ट, लोगो दाखवून खुष करणे ही तर अंतराष्ट्रीय कंपन्यांची कल्पकता आहे.
------------------------------------
पासानभेद बांकेबिहारी
(बडे बाबू,
तहसिल कार्यालय,
गुडगूडी, ता. रामनगर, जि. पस्चिम चंपारन, बिहार)
- Log in or register to post comments
ल
लंबूटांग
Sat, 10/03/2009 - 01:14
नवीन
हा लेख ज्यांनी लिहीला आहे ते स्वतःच अमेरिकेत आहेत :)
बरेचदा local festivals or events प्रमाणे लोगो दाखवले जातात परंतु गांधी जयंतीचा लोगो सगळी कडेच दिसत आहे... infact http://google.co.in/ वर आता नेहेमीचा लोगो आहे कारण भारतामधे ३ तारीख उजाडली आहे परंतु अमेरिकेत २ तारीखच असल्याने http://google.com/ वर अद्यापही गांधींचा लोगो आहे..
>>>त्या त्या देशातील लोकांना कस्टमाईज प्रॉडक्ट, लोगो दाखवून खुष करणे ही तर अंतराष्ट्रीय कंपन्यांची कल्पकता आहे.
कल्पकतेवर चर्चा करण्यासाठीच तर धागा सुरू केला आहे :)
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 10/03/2009 - 01:54
नवीन
हा लोगो गुगल ने टाकून एका भारतीय नेत्याची दखल घेतली हेच यातून विकासदादाना सांगायचे आहे
सहमत.
मिपावर फक्त शास्त्रीजींनाच आदरांजली वाहिलेली बघून अंमळ मौज वाटली.
आश्चर्य मात्र वाटले नाही. असो.
जग आपल्याला कशावरून ओळखते हे पाहून फार बरे वाटले.
सहमत.
गांधीजी आणि शास्त्रीजी यांना प्रणाम
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 10/03/2009 - 04:55
नवीन
गुगुलवर फक्त गांधींचेच चित्र पाहून अंमळ मौज वाटली! :)
तात्या.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sat, 10/03/2009 - 05:12
नवीन
काही बोलायाचे आहे पण इथे बोलणार नाही.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
- Log in or register to post comments
अ
अंगद
Sun, 10/04/2009 - 07:21
नवीन
>>काही बोलायाचे आहे पण इथे बोलणार नाही.
बोला की थत्ते साहेब तुम्हाला कोणी अडवलेय काय ?
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Mon, 10/05/2009 - 07:07
नवीन
धागा आलाच आहे वर तर मला इथे फक्त शास्त्रीजींचा फोटो बघून मौज का वाटली ते सांगतो.
मी या आधी मिपाच्या मुखपृष्ठावर राजकारण्यांचे जयंती-पुण्यतिथीला फोटो आणि आदरांजली वाहिलेली बघितलेली नाही. (वाहिली गेलीच नाहीय असा माझा दावा नाहीय) त्यामुळे फक्त शास्त्रीजींना आदरांजली वाहिलेली पाहून त्यांना आदरांजली वाहण्यापेक्षा गांधीजींना कसे दुर्लिक्षित करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न वाटला.
अर्थातच इथे मुखपृष्ठावर काय दाखवावे आणि काय नाही याबद्दल मी कोणतेही मत बाळगत नाही..फक्त मौज वाटल्याचे सांगितले. :-)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 10/05/2009 - 07:42
नवीन
येथे तात्याराव सावरकर, टिळक या थोर नेत्यांचे स्मरण ठेवले जाते.
शास्त्रींबद्दल आदर आहेच!
त्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही त्यांचेच फोटू असलेल्या नोटांची नित्यनियमाने पूजा करतो! :)
एकंदरीत गांधींची अहिंसा हा प्रकारच मौज वाटण्यासारखा आहे! :)
रस्त्यात गुंडाने माझ्या बहिणीचा उजव्या हाताचा ब्लाऊज फाडल्यावर भर रस्त्यातच त्याला न तुडवता प्रेमाने,
"अरे वा, छान! आता डाव्या हातचाही फाड!"
असं सांगण्याची अहिंसा अद्याप माझ्या अंगी नाही.
अश्या प्रसंगी 'गांधींनी त्या गुंडाला नक्की तुडवला असता', असं कोणत्याही गांधी-अभ्यासकाने खात्रीने सांगावं, मिपावर फक्त दोन ऑक्टोबरच नव्हे तर सर्व १२ महिने गांधींचा फोटो झळकेल!
तात्या.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 10/05/2009 - 19:28
नवीन
अहिंसा ही बलवानांचे शस्त्र आहे/भेकडांचे नाही असे गांधींचे मत आहे.
अहिंसेचे खरे स्वरूप या विषयी गांधींनी पुढीलप्रमाणे लिहिले आहे.
Even manslaughter may be necessary in certain cases. Suppose a man runs amuck and goes furiously about, sword in hand and killing anyone that comes his way and no one dares to capture him alive. Anyone who despatches this lunatic will earn the gratitude of the community and be regarded as benevolent man.
From the point of Ahimsa, it is plain duty of everyone to kill such man. The Yogi who can subdue the fury of this dangerous man may not kill him. But we are not here dealing dealing with beings who have almost reached perfection; we are considering the duty of the society, of the ordinary erring human beings.
He who refrains from killing a murderer who is about to kill his ward (when he cannot prevent him otherwise) earns no merit but commits a sin, he practices no ahimsa but himsa out of of a fatuous sense of ahimsa.
वरील विधान गांधींच्या My philosophy of Life या १९६१* मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातले आहे (पृ ४८-४९).
(गरज वाटल्यास पाने स्कॅन करून लावायचा प्रयत्न करीन)
*पुस्तक कदाचित आधी प्रकाशित झाले असेल. माझ्याकडे आत्ता असलेली प्रत १९६१ ची आहे. प्रत १९६१ ची असल्याने त्यात गांधींची नसलेली मते घुसडली असू शकतील. पण ते तसा आक्षेप घेणार्याने दाखवून द्यावे लागेल.
(१२ महिने मिपावर गांधींचा फोटो पाहण्यास उत्सुक)नितिन थत्ते
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 10/05/2009 - 20:02
नवीन
गांधींनी त्या गुंडाला भर रस्त्यात तुडवला असता किंवा नाही इतकंच सांगा...
हो किंवा नाही!
बाकी फापटपसारा उडवून लावला जाईल!
प्लीज आन्सर इन येस ऑर नो!
तात्या.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 10/05/2009 - 20:22
नवीन
मला जेवढे इंग्रजी कळते त्यानुसार वरचे इंग्रजी वाचून तरी
'तुडवला असता' असेच स्पष्टपणे वाटते.
(तुडवला नसता असे कुणाचे म्हणणे आहे?)
एवढे स्पष्ट विचार असूनही तुडवला असता की नसता असे विचारण्याची गरज का वाटली?
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
- Log in or register to post comments
च
चेतन
Tue, 10/06/2009 - 07:52
नवीन
'तुडवला असता' असेच स्पष्टपणे वाटते.
थत्ते साहेब नक्की वाटते का....?
I object to violence because, when it appears to do good,
the good is only temporary; the evil it does is permanent.
To compare their (revolutionaries') activities with those
of Guru Govind Singh or Washington or Garibaldi or Lenin
would be most misleading and dangerous.
But, by test of the theory of nonviolence,
I do not hesitate to say that it is highly likely that,
had I lived as their contemporary and in the respective countries,
I would have called every one of them a misguided patriot, even though a successful and brave warrior.
मला ही गांधीबद्दल आदर आहे पण म्हणुन सगळ्याच गोष्टी पटाव्यात अशा नाहीत.
चेतन
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 10/05/2009 - 19:41
नवीन
>>येथे तात्याराव सावरकर, टिळक या थोर नेत्यांचे स्मरण ठेवले जाते.
१४ एप्रिलला आंबेडकरांचा फोटो टाकला नाही म्हणून वाद झाला होता. पण नंतर तो फोटो लावला होता.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 10/05/2009 - 20:08
नवीन
हो, तेही थोर नेते आहेत. मी गडबडीत होतो म्हणून फोटो लावायला विलंब झाला इतकंच!
परंतु गांधींच्या फोटोबाबत ना वाद, ना विलंब. त्यांचा फोटो मिपावर कधीही लावला जाणार नाही हे नक्की! उलटपक्षी दर गांधीजयंती आणि मयंतीला मिपावर दारूचाच फोटो लावला जाईल!
अजून काही??
तात्या.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 10/05/2009 - 21:20
नवीन
१४ एप्रिलला आंबेडकरांचा फोटो टाकला नाही म्हणून वाद झाला होता. पण नंतर तो फोटो लावला होता.
हे अर्धसत्य आहे. एका वेळेस का फोटो आला नाही हे तात्यांनी वर सांगितले आहेच. पण इतर वेळेस (१४ एप्रिल आणि सहा डिसेंबर) तो होता, त्यावरून ही चर्चा देखील झाली होती. मात्र त्याबद्दल आपण बोलत नाही आहात.
गांधीजींनी समाज एक करण्याचा प्रयत्न केला तो देखील सत्याचा हट्ट करत. मात्र वरील प्रकारचे प्रतिसाद मांडत असताना ना धड सत्य बोलणे पाळले जात आहे आणि दुसरी कडे समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि वर गांधींच्या नावाने नक्राश्रू ढाळले जात आहेत.
- Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र
Tue, 10/06/2009 - 00:59
नवीन
थत्तेंनी अर्धसत्य सांगीतले तर मूळात तात्यांनी काय 'पावसत्य' सांगीतले होते का?
गेल्या १४ एप्रिलला फोटो लावायचे तात्यासाहेब विसरले नंतर वाद झाल्यावर लावून टाकला इतकेच दोघांचेही म्हणणे आहे (थत्ते आणि तात्या)
तात्यासाहेब जे विसरले त्यात थत्तेंनी भर घातली. थत्तेंच्या माहितीत तू भर घाल ना.
त्यावरुन हे कै च्या कैच तारे तोडणे कशाला?
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 10/06/2009 - 02:47
नवीन
थत्तेंच्या माहितीत तू भर घाल ना.
खालील वाक्य हे माहीतीत भर घालणारेच आहे:
बाकी आता आपल्याला या विषयी एकमेकांचे विचार समजल्याने परत येथे हे घोडे पुढे दामटले तर अतीअवांतर समजून मी लक्ष देणार नाही तसेच इतर संपादकांना योग्य वाटल्यास ते प्रतिसाद अप्रकाशित करण्याची विनंती करेन. अर्थात आपल्याला अजून चर्चा करायची असेलच तर माझ्या खरडवहीची पाने आपल्यासाठी उपलब्ध आहेत. :-)
गुगलने जे काही केले त्यातील गांधीजींचे चित्र, ते कसे वाटले, त्याबद्दल आनंद झाला, काही फरक नाही पडला, अजून चांगले चित्र काढता आले असते, एक भारतीय म्हणून याबद्दल आपल्याला काय चांगले/वाईट/टिकात्मक वाटते या बद्दलचा हा धागा आहे.
------------------------------
आणि हो, बरेच दिवस पहात आहे पण सांगायचे राहते, पण मी आपल्याशी आणि इतरांशीपण मराठीत लिहीताना, शिष्ठाचार पाळत बोलतो. कोणी मला विनंती केल्यास अथवा मी कोणाला विनंती केल्यास अथवा जवळून ओळखत असल्यासच लिहीताना संवाद म्हणून एकेरी भाषेत लिहीणे मराठीत योग्य वाटते.
मात्र, येथे आपल्याशी किमान माझ्या माहीतीनुसार प्रत्यक्ष ओळख-पाळख नसताना आणि मी एकेरी लिहीण्याची विनंती केली नसताना, अरे-तुरेची लेखी भाषा, ती पण ज्या पद्धतीने आपण वापरता, ती माझ्या लेखी अरेरावी आहे. तेंव्हा माझ्याशी बोलायचे असेल तर शिष्ठाचार पाळून बोला अशी नम्र विनंती करतो. नाहीतर अरेरावीच्या भाषेस मी व्यक्तीगत आणि संपादक अशा कुठल्याच भुमिकेतून आपल्याला अथवा तत्सम कोणी वागल्यास त्या व्यक्तीस उत्तर देण्यास बांधील नाही आहे.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र
Tue, 10/06/2009 - 04:18
नवीन
हो का? बरं बरं..
थत्तेंना उद्देशुन काहीच नाही ना त्यात? बरं बरं...
खरडवहीतून चर्चा करण्याची माझी इच्छा नाही. धन्यवाद!
तुम्हाला अरे तुरे करणारे इथे बरेच लोक दिसले त्या सर्वांना तुम्ही तसे म्हणण्याची विनंती केल्याने ते तुम्हाला अरे तुरे करतात हे माहित नव्हते. मिसळपाववर एकूणच असणारे मोकळे ढाकळे वातावरण आणि तुमची अपरिक्व मते वाचून तुम्ही पौगंडावस्थेत आहात असा माझा झालेला समज ह्यामुळे मी अरेतुरे करत होतो. त्यामूळे तुमच्या अहंकारास धक्का लागत असल्यास इथून पुढे करणार नाही.
त्याचवेळेस इथे श्रीकृष्ण काकांसारख्या वयोवृद्ध सभासदाला आपले तात्या 'ए म्हातार्या' अशी हाक मारताता त्या मलातरी निव्वळ मायेचा ओलावा आणि कानांना गोडवा जाणवतो . श्रीकृष्ण काकांना हे बोलणे कधीच अरेरावीचे वाटणार नाही असे आवर्जुन नमूद करावेसे वाटते.
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 10/06/2009 - 03:51
नवीन
फक्त 'निमित्त मात्र'च आहात कि हो तुम्ही! =))
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 10/06/2009 - 04:17
नवीन
आंबेडकरांचा फोटोही लावला होता हे सांगण्यासाठीच प्रतिसाद दिला होता.
(लेखनरजेला तात्पुरती मुरड :( )
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
Sun, 10/04/2009 - 07:16
नवीन
हेच म्हणतो.
"Great Power Comes With Great Responsibilities"
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
Mon, 10/05/2009 - 05:22
नवीन
गांधींचा फोटु लावता मग शास्त्रींचा का नको?
भारतीय नेत्याच्या जन्मदीवसाची दखल घेतली गेली, ह्यात आनंद... पण जेव्हा टिळक, शास्त्री, सावरकर, बोस, भगतसिंग, शिवाजी महाराज ह्यांचे लोगो जेव्हा बनवतिल तेव्हा भारत खर्या अर्थाने मोठा होईल.
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 10/05/2009 - 05:32
नवीन
अतिरेक होतो आहे असे नाही वाट्त ??
त्यांनी गांधींना ग्लोबल हिरो मानले म्हणजेच भारत मोठा झाला ?
त्यांनी भगतसिंगांना, टिळकांना आपल्या लोगो मध्ये स्थान दिले तरच भारत मोठा होणार ??
माझा भारत एवढा लहान नाही आहे की एक टुचीमुची कंपनीने त्याच्या सुपुत्रांना आपल्या लोगो मध्ये जागा दिली म्हणून माझा देश अचानक मोठा होईल... जेव्हा ते कंबरेला झाडाची साले लावून जंगलात फिरत होते तेव्हा येथे मोठ मोठाली नगर व शहर संस्कृती होती....
हां काही वांझोट्या कुपुत्रांमुळे ह्या धरतीच्या वैभवशाली रुप लयाला गेले म्हणून काही माझा देश लहान होतं नाही.
भाड में जाये गुगुल & उसके लोगो... फ्री मध्ये चांगली सेवा मिळत आहे म्हणून वापरतो... नाही तर आजकाल गुरुजी सर्च खुप चांगल्या पध्दतीने कार्य करत आहेच व मला माझ्या देशातील / भारतीय भाषेतील गोष्टींची जास्त गरज पडते व ती गरज सध्या तरी गुगुल पेक्षा किती तरी सरस पध्दतीने गुरुजी सर्च माझ्यासाठी करत आहे... आम्ही पडलो स्थानिक... हां आता ग्लोबल लोकांना गुगुल सेवाच चांगली वाटणार... ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 10/05/2009 - 06:21
नवीन
सहमत आहे.
गो-या माकडांचे फार कौतुक नको.
आजकाल अमेरिकेचे आणि अमेरिकन कंपन्यांची चाटायची फार लोकांना हौस आहे. असो.
आम्ही अमेरिकेला फाट्यावर मारतो.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »