Skip to main content

मन

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 26/09/2017 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मन विचाराचे घर मन कृतीचे आगर मन अथांग सागर मन मधुर साखर मन आभाळीचा रंग मन आत्मरंगी दंग मन देहाचा आरसा मन मायेचा वारसा मन चंचल चंचल मन कधी अविचल मन मोकाट मोकाट मन कधीचे मुकाट मन धावे सैरावैरा मन माळावरला वारा मन गरीब पामर मन कधी अनावर मन वेडेही भासते मन मनात हासते...

बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉड गेज

लेखक Anand More यांनी मंगळवार, 26/09/2017 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ ज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं? आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का?

घरा कडून घराकडे सायकल प्रवास एक स्वप्न पूर्ती (भाग पहिला)

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 26/09/2017 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
घराकडून घराकडे सायकल प्रवास.... एक स्वप्न पूर्ती! भाग १ सायकलिंगला सुरवात केल्यापासून आपल्या जन्मगावी एकदा तरी सायकलने जावे, ही सुप्त इच्छा मनात कायमच होती. गेल्या काही दिवसांतील सरावामुळे अंतर कापू शकेन या बद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. प्रश्न होता फक्त रस्त्यावरील सुरक्षेचा! पनवेल- गोवा महामार्गाचे सध्याचे स्वरूप थोडे उलगडून सांगितले की याविषयी अधिक खुलासा होईल. राष्ट्रीय महामार्ग असूनदेखील दुभाजकाशिवाय असलेला हा रस्ता मी स्वतः पाहिल्यानुसार गेली पंचवीस वर्षे आहे तसाच आहे. वाकण ते जवळपास इंदापूर या भागात चौपदरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत झाले आहे.