सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे
"सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे",
..ब्रिटीश वकील, जेम्स डगलस ने तोरण्याविषयी काढलेले उदगार
मागच्या वर्षी २१ वर्षांनी तोरण्यावर पुन्हा जाण्याची संधी मिळाली. २१ वर्षापुर्वी सपकाळ सर, आनंद पाळंदे काका, धावडे सर, घावरे सर, प्रमोद मांडे काका आदी जाणकार मंडळींसोबत वयाच्या १६ व्या वर्षी तोरण्यावर गेलो होतो. या ज्येष्ट लोकांसोबत आणखीही बरेच किल्ले , डोंगर द-या भटकण्याचे भाग्य मिळाले. यांनी नुसतेच किल्ले दाखवले नाहीत तर किल्ल्यांकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन सुध्दा दिला.
पाळंदे काकांचे पुस्तकातील एका वाक्याने मनात कायचे घर केले आहे.
फासले ऐसे भी होंगे...
आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली. कागदावरच्या मजकुराचा आकार, मार्जिन आणि मग एक एक अक्षर घेऊन त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व उलगडू लागले . एक दोन अनालिसिस झाल्यावर त्यांनी माझा कागद सगळ्यांसमोर पकडला ,मनात खूप उत्सुकता होती आज स्वतःबद्दल काय जाणून घ्यायला मिळणार ...
मान गए पंतवैद्य...
काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला.
उदय कॉर्लिग्झम्सचा भाग २
भाग 1( http://www.misalpav.com/node/40857)
आपल्या परिवाराला आपण धर्मामुळेच गमवावे लागले अशी भावना मायकलमदधे मुळ धरु लागली होती. त्या दिवशी आपण त्या धर्मस्थळी जायला नको होते हा विचार त्याला पोखरुन टाके.
मायकलची अशीच विचारांची तंद्र्ी लागली होती.
धर्मस्थळावरच का हल्ला झाला ? कारण त्यांना धर्मावर हल्ला करायचा होता .मुळात धर्मावर हल्ला होतो म्हणजे नक्की काय होत? तर धार्मिक प्रतिकांवर हल्ला होतो. जर ही धार्मिक प्रतिकेच नसतिल तर ? जर असा एक धर्म असेल की ज्याची नक्की परिभाषाच नसेल , धर्मस्थळ नसेल , धर्मग्रंथ नसेल.
गच्ची वरुन...
Epppie.... चिनी गुलाबाचे सीड्स मागवली होती अम्माजानकडुन. पावली नुकतीच. आता ५० बीयापासुन किती रोपं बनताय बघुयात. लगे हातो नर्सरीत चक्कर टाकुन आलो. तर तिथंही त्यानं चिगुची रोप लावलीयेत नुकतीच. अचानक मागणी वाढली म्हणे.
आमच्या गच्चीवरील बाग प्रेमी मंडळाची देखिल तुफान चर्चा सत्र होतायेत. फुलांचे नवनवे रंग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संवाद, संपर्क , समन्वय सुरु झालाय.
--चिनी गुलाबाचे कलम करून नवीन कलर बनवता येईल का ?
--भाबड्या अपेक्षा लागल्यात फुलांच्या रंगाच्या
--बरेचसे ड्युअल कलर बघितलेत मी नेट वर
--सगळ्याना द्यायला सोपे जाईल...
उपोषण
उपोषण
(कविता कालावधी 1996)
घुसमटणारी वेदना
धुमसणार छत
दाबायला जातो मी
होत ज्वालामुखीच तोंड
ज्वालानदी ही चिरडत वाहते
सर्व घर ती वाहुन नेते
बसतो मी मग उपोषणास
एकटा सदैव एकटा
तीन मंत्री घेऊन येतात
हातात ग्लास त्यात रस
तीन संत्रांचा असतो
पण वाटत नाही
मी तो नाकारतो
कारण त्याच्यावर माझा
विश्वासच नसतो
येतात तसे जातात
तीन मंत्री
धूळ चढते गर्दी हटते
राहते उजाड स्थळ
त्या ठिकाणी दिसते एक
निराश खिन्न वीराण शव
ते असते माझे
सतत पेटणार्याचे
राहते तसेच कारण मी
उपोषणाला बसलेला असतो
माणसं !
माणसं !
महाग झालेली पुस्तकं परवडत नाहीत हल्ली
पण स्वस्त झालेली माणसं वाचायला मिळतात !
अन सगळीकडे उपलब्ध पण असतात !
कधी कधी पटकन वाचून होतात माणसं
कधी समजतच नाहीत, कळतंच नाहीत माणसं !
छोटी माणसं , मोठी माणसं
जाड माणसं , बारीक माणसं !
खरी माणसं , खोटी माणसं ,
सगळ्या साईजची ,सगळ्या विषयांची माणसं !
काही अबोल, अव्यक्त, मनकवडी माणसं
काही बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं
आपणंच विशेषणे दिलेली माणसं
स्वतःला विशेषणे लावून घेतलेली माणसं !
काही आपली , काही परकी माणसं
दूर जाऊनही जवळ असलेली माणसं !
खोल खोल मनामधली, मनकवडी माणसं !
विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं !
नासाच्या जवळी
(चाल : आजीच्या जवळी घड्याळ कसले..)
कवितेचा कालावधी - सन 1996
नासाच्या जवळी यान कसले आहे चमत्कारिक
पुढे पुढे ते जाते अचूक कोणास कसे ठावुक
त्याची पीरपीर चालते कधीतरी त्रास फार टाकते
परंतु मोठ्या ग्रहाजवळ जाऊनी माहिती ते आणते
गॅलिलिओ नाव ठाऊक असे मला तयाचे
गरगर फिरत स्वताभोवती माहिती सारखे पाठवते
तीन दोन एकच्या तणावात उडते ते पृथ्वीवरून
सरसर उंच जाऊन विराजते चंद्रापासून
आज इकडे तसेच उद्या त्या तिकडे जायता
पाठवते झरझर ते चित्रांच्या गंमती सदा
होऊनी गेली वर्षे पाठवूनी त्यास पत्ता कधी न लागला
संपत आले काम तयाचे पुढे ते जाई आता एकला
पायोनियर व्हॉयेजर ती पुढे शांतपणे गेली
पाठवत राहिली नवनवी माहित
निरोपाची आठवण
फायनल इयर हा कॉलेजलाईफ मधला एक वेगळाच काळ असतो. सीनियर्सना फेयरवेल देऊन झाली कि, आपलाही शेवट जवळ आल्याची जाणीव होऊ लागते. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी पटापट जमा करण्याचा असा का काळ. सगळ्यांना मैत्रीचचं भरत येत असत. गेल्या तीन वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुबंधांची खास काळजी घेतली जाते. लांब गेलं तरी तुटू नये म्हणून त्यांना अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न नकळतपणे चालू असतो. वर्गात अभूतपूर्व एकी निर्माण होऊ लागते. सगळे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येऊन, एकच मोठ्ठा ग्रुप तयार होतो. कॉलेजच्या पार्किंगमध्ये रेंगाळण वाढत. दर चार दिवसाआड कुठेना कुठे जायचे प्लॅन्स ठरत असतात.
मिसळपाव