मौन धारण करू या!
- डॉ. सुधीर रा. देवरे
संत साक्षात परमेश्वर रामरहीम बाबांना साक्षात्काराने आधीच समजून चुकलं होतं की कोर्ट आपल्याला दोषी ठरवणार. आपल्या दैवी लिला कितीही परमार्थिक- अध्यात्मिक असल्या तरी तथाकथित मानवी कायद्यातील तरतुदींनुसार आपल्या लिलांकडे विकृत दृष्टीने पाहिलं जाईल आणि नको ती शिक्षा कोर्टाकडून आपल्याला ठोठावली जाईल, हे बाबा दिव्य दृष्टीने पाहू शकत होते. म्हणूनच अशा पामरांकडून होणारे हे पाप टाळण्यासाठी बाबांनी आधीच खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या कोट्यावधी शिष्यांपैकी फक्त दीड लाख भक्तांना सिरसाहून पंचकुलाकडे पदयात्रा करत रवाना केलं.
मिसळपाव