श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ३ : फोडणी पहावी टाकून, अर्थात 'संगीत गोईंग डच'
एक
"कैसा है?" मी मोठ्या उत्सुकतेने विचारलं.
मित्राच्या गोरटेल्या आसामी चेहर्यावर कसेनुसे भाव आले होते. त्याने मान डोलावली आणि ब्रेडचा तुकडा तोंडात कोंबून घटाघट पाणी प्यायलं.
अजून लैच मोठा टप्पा गाठायचाय याची जाणीव झाली.
---
दोन
सगळं स्थिरस्थावर असताना वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी परदेशात जाऊन उच्चशिक्षण घ्यावं अशी भलतीच कल्पना डोक्यात आली. घरच्यांना पटवणे, वेड्यावाकड्या वेळा असलेली नोकरी सांभाळून युनिव्हर्सिट्यांना अर्ज करणे, पैशाची चिंता वाहणे यात सहा महिने गेले.
मिसळपाव