किल्ले म्हणले कि बहुतेकदा ईतिहासाचा आणि एतिहासिक गोष्टींचा संदर्भ येतो. पण काही किल्ल्यांचा संदर्भ वर्तमानातल्याच वेगळ्याच गोष्टीशी येतो आणि आपल्याही थक्क करणारी माहिती सामोरी येते. असाच एक किल्ला म्हणजे चंदगडजवळचा कलानिधीगड. थोडेसे काव्यात्मक नाव असलेल्या ह्या किल्ल्याला साहित्यिक संदर्भ आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल.