Skip to main content

मेनोपॉज एक संक्रमण!

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 08/08/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
मेनोपॉज.... एक संक्रमण! स्त्री साधारण चाळीशीच्या पुढे सरकली की तिच्यात अनेक बदल व्हायला लागतात. मुलं स्वतःच शाळा/कॉलेज स्वतःच सांभाळायला लागलेली असतात. नवरा नोकरी/धंद्यात सेट झालेला असतो. ती स्वतः नोकरी करत असली तर ती देखील काम, पगार आणि होणारी धावपळ यात adjust झालेली असते. नोकरी नसली तर घर सांभाळत तिने स्वतःला थोडं बिझी केलेलं असतं. सासू-सासरे असले तरी आता एकमेकांचं काय पटत आणि काय नाही ते एकमेकांना बरोबर माहीत असतं. त्यामुळे एक सुखी-संसारी स्त्री तिच्या अंगा-प्रत्यांगातून आणि वागण्या-बोलण्यातून दिसायला लागलेली असते. पण मग या सुखात देखील तिला काहीतरी खुपायला लागतं.