Skip to main content

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान

लेखक थिटे मास्तर यांनी शुक्रवार, 21/07/2017 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान युवराजांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण युवराज उठतील, ट्रिपलसिट बाईक वर बसतिल निलाजरे ते फोटो काढुनि देशी थाई ते पळतिल जो कोण ह्यांना अडवील, जो कोण ह्यांना रडवील अडवणूक त्या करणार्‍यांची हे चिन्यांकडे करतिल फिर्याद संघर्ष यात्रेचि फौज निघे, हातात त्यांच्या लाडु पेढे अतिव गाति बारबालेचे अन चरस्याचे गुणगान पडुन राहु निपचित आता २०१९ ला खाउ लाथा नाहितर मांडु चिनि-पाकड्यांसोबत ठाण गुरूवर्य साने गुरुजिंचि माफि मागुन. ____/\___ रा.रा. युवराज ह्यांच्या चरणि हे आयुष्यातले पहिले काव्यकमल सादर.

पावसाळी भटकंती: ड्युक्स नोज, नागफणी ( Dukes Nose)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 21/07/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे-मुंबई या दरम्यान प्रवास करताना सह्याद्रीची रांग खंडाळा ते खोपोली या दरम्यान उतरावी लागते. या दरम्यानच वाहनांसाठी किंवा रेल्वेच्या दळण-वळणासाठी खंडाळ्याचा घाट किंवा जुना बोर घाट बांधलेला आहे. आपण या घाटातून वाहनाने प्रवास करीत असू किंवा रेल्वेने, खंडाळा ओलांडले कि घाटात डाव्या हाताला एक भेदक सुळका आकाश फाडीत गेलेला दिसतो.

रालायन्स जिओ,जिओफोन ..इतर कंपण्यांची नफेखोरी,उपाय काय??

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी शुक्रवार, 21/07/2017 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
रिलायन्सने काही महीन्यांपुर्वी जिओ सर्व्हीस सुरु केली.अत्यंत परवडणार्या किंमतीत त्यांनी ग्राहकांना इंटरनेट देऊ केले आहे.तीनशे रुपयात तीन महीने रोज १जीबी डेटा ते देत आहेत.आज मुकेश अंबाणी यांनी जिओफोनची घोषणा केली आहे.१५०० रुपये जे तीन वर्षात रिफंड होतील ,तेवढे भरायचे व ,४G स्मार्टफोन घ्यायचा.छान योजना आहे.मी वास्तविक कुणा कंपणीचा सपोर्टर नाही.पण रिलायन्सच्या योजनांमुळे Airtel,Vodaphone ,idea या कंपण्यांची नफेखोरी उघड झाली आहे. जिओ येण्याच्या आधी एअरटेल,आयडीया वगैरे मंथली १जीबी २जी पॅक साठी १९८ रुपये ग्राहकाला मोजायला लावत होते.जिओ आल्या नंतर हेच प्रोव्हाईडर आज तीनशे रुपयात ३० जीबी डेटा सर्रास

तू तेंव्हा तशी...!

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 21/07/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/40301 या इथून प्रेरणा घेऊन तुला मी फार मिस्स करतो .. खरे तर हे तुला मुद्दाम सांगायचे नाही हे मी ठरवलंय . तुलाच काय पण मला स्वतःलाही हे सांगायचं नाहिय्ये. एका वळणावर येवून आपण त्या नंतर कसे हरवलो हे मला कळालेच नाही. मुद्दाम नाही. पण.... ते झाले हे खरे. मी अ‍ॅक्सेप्ट करतो. चार वर्षे झाली. हे वाक्य मी रोज म्हणतो. रोज सकाळी उठवल्यावर "आज तुझी आठवण अज्जीबात काढायची नाही" हे पण ठरवतो. पण.... तुझ्याशिवाय जगायची सवय झाली आहे पण तुझा विचारांशिवाय जगायची सवय अजून लागली नाही.

लोकल मधले लोकल्स.

लेखक रघुनाथ.केरकर यांनी गुरुवार, 20/07/2017 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एक कुठलासा सोमवार होता, संध्याकाळचे ६.३० होउन गेले होते, मी पावसाचं कारण सांगुन ऑफ़ीस मधुन मोठ्या उत्साहात लवकर पळालो होतो. पण स्टेशन वर येताच पावसानी त्यावर पाणी फ़िरवलं होतं. घाटकोपर स्टेशन च्या १ नंबर फ़लाटावर प्रवांशाचे उधाण आले होते. पहील्या प्रयत्नात गाडी मिळेल ह्याची शक्यताच नव्हती. किमान ३ -४ गाड्या सोडाव्या लागणार होत्या. ते कमी झाले म्हणुन की काय वरुन वरुण राजा बरसत होता. का कुणास ठावुक पण असे वाटतं होत की सगळे डाउन वाले प्रवासी फ़क्त स्लो लाइन वरुनच प्रवास करु इच्छीत होते.

सफर ग्रीसची: भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय

लेखक निशाचर यांनी गुरुवार, 20/07/2017 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ - असिनीचे अवशेष आणि टोलो भाग ७ - आर्गोसचे अक्रोपोलिस भाग ८ - बुर्ट्झी आणि नाफ्प्लिओ प्रोमंनाड भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस लायकाबेटस टेकडीवरून उतरल्यावर थोडं खाऊन घेतलं आणि प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानासाठी सज्ज झालो.

‘लॉक बॉक्स’

लेखक सौन्दर्य यांनी गुरुवार, 20/07/2017 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
https://photos.google.com/photo/AF1QipMhwWT_cIKlJmXrv-zVdm08FWsdSYf-f4Zyp7QBhttps://photos.google.com/photo/AF1QipOZ1xFUEsTDlMPPpBVuwIuEdGTGpgn_vyUCxIYo ‘लॉक बॉक्स’ इथे अमेरिकेत एक नाविन्यपूर्ण गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे ‘लॉक बॉक्स’.

आपण स्वप्न का बघतो.

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 19/07/2017 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
फार पुरातन काळा पासून माणसं त्यांना पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आलेत. स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत, पूर्व सूचना मिळतात असे मानले जाते. माणसाना भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांचे रूप घेऊन येतात किंवा ईश्वर बऱ्याचदा आपल्या भक्तांशी संवाद साधायला स्वप्न एक माध्यम म्हणून वापरतो असेही मानले जाते. अनेक कवी, लेखक, नाटककार, चित्रकार आदींना त्यांच्या कलाकृती साकार करण्याची प्रेरणा स्वप्नातून मिळाल्याचे सांगितले आहे.

एका मास्तराचे मिपामालकास पत्र. ;)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 19/07/2017 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपामालक. सगळीच माणसं संस्थळावर नीट नसतात, आणि सगळीच तितकी सरळ. हे शिकेलच ना 'तो' मात्र त्याला एकदा सांगा. संस्थळावर प्रत्येक चांगल्या सदस्यांबरोबर एक 'गर्दीही' असते. आपला 'हिशेब टीशेब' ठेवणारेही असतात. आपल्या 'सोसायटीत' आजूबाजूला असतात तसे 'रंगेल' माणसंही असतात. संस्थळासाठी आयुष्य समर्पित करणारे सदस्य असतात, काही काड्या टाकणारेही असतात, तसे सदस्यांना जपणारे ....! मला माहीती आहे. संस्थळावर सगळ्याच गोष्टी नाही बोलता येत आणि सांगताही येत तुम्हाला.... तरीही, जमलं तर एकदा व्य.नि. मनीतून त्याच्याशी बोला आणि त्याला सांगा... सदस्य जपावा लागतो, सांभाळावा लागतो.

आमचे बालपण

लेखक ऋतु हिरवा यांनी बुधवार, 19/07/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांच्या परीक्षा होत आल्या आहेत. पालक आपापल्या मुलांना वेगवेगळ्या शिबिरात पाठवण्याच्या खटपटीत आहेत. जर बाहेर पडलं तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या शिबिरांच्या जाहिराती लागलेल्या दिसत आहेत. दिवसभर मुले घरात.. त्यामुळे आया...'आता बघायला नको..दोन महिने नुसता धुडगूस...'असे बोलत आहेत. शेजारीही मुलांच्या आवाजामुळे त्रस्त आहेत. अशावेळी मला माझे बालपण आठवते. आमच्या लहानपणी मे महिन्यात आमचा एकच कार्यक्रम असायचा..तो म्हणजे दापोली तालुक्यातील कोळथरे या आमच्या गावी जाणे. माझे काका व त्यांचे कुटुंबीय तेथे राहत असत. समुद्रकिनारी वसलेलं आमचं छोटंसं गाव.