ये कश्मीर है - दिवस आठवा - १६ मे
आजचा आमचा दिवस खरं म्हटलं तर एक राखीव दिवस होता. काश्मीर खो-यात परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते हे माहित असल्याने मी मुद्दामच आमच्या वेळापत्रकात हा एक जास्तीचा दिवस ठेवला होता. खास असे काहीच आज आम्हाला करायचे नव्हते. येथून ९० किमी दूर असलेले श्रीनगर गाठणे आणि तिथे जाताना लागणारे अवंतिपूरचे मंदिर पाहणे एवढेच आजचे आमचे किरकोळ लक्ष्य होते.
तेव्हा आम्ही उशीरापर्यंत लोळत पडण्याचा आनंद अनुभवला आणि सगळे आवरून हॉटेलात नाश्ता करून आरामात निघालो. पेहेलगामवरून श्रीनगरकडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाच्या बागा आहेत.
मिसळपाव