Skip to main content

एस. एस. रामदास, समुद्राच्या गर्तेतील ७० वर्ष.

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 09/07/2017 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
एस. एस. रामदास बोटीला या १७ जुलैला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा. तूनळीवर याच घटनेवर मी एक लहान बायोग्राफी बनवले त्याची लिंक खाली देत आहे. https://www.youtube.com/watch?v=rGC2r-RawQU हा लेख लिहिण्याचं प्रमुख कारण म्हणजे एस. एस. रामदास बोटीच्या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हडी फारशी माहिती नाही खास करून नव्या पिढीला. मीडिया सुद्धा थोड्या फार प्रमाणात याला कारणीभूत आहे. फालतू TRP घेणारे विडिओ तासंतास TV चॅनेलवर दाखवायला याना वेळ आहे, आजकाल मराठी चॅनेलसुद्धा हिंदी चॅनेलच्या पावलावर पाऊल ठेवायला लागले.

परीक्षा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 09/07/2017 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही ! परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ? मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ? एक पेपर झाला की मध्ये थोडा वेळ द्यायचा असतोय तुझ्या शाळेत मात्र मी सतत परीक्षेलाच कसा बसतोय पेपर संपव तुझे सगळे आता, सांग मी पास

आर्य हे दक्षिण भारतीय होते

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 09/07/2017 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
(आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला तर्क पूर्ण लेख) आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे. पुरातन इतिहासाचे लिखित प्रमाण कमीच आहे.

आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 09/07/2017 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
Disclaimer : खालील लेख मिपावरील 'डू आयडी' विषयी नाही. मी एकदा एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते. आणि अचानक एक गृहस्थ माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले. मला म्हणाले "नमस्कार! कसे आहात तुम्ही?" त्यांच्याकडे मी पाहिले पण माझ्या काही लक्ष्यात येईना की मी पूर्वी त्यांना कुठे भेटलोय ते! बरं त्यांना त्यांची ओळख विचारायला मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं.

विंडोसीट

लेखक फुंटी यांनी रविवार, 09/07/2017 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
विंडो सीट वरून आताही दिसतात अर्धवट हिरवेगार डोंगर दगडमातीसाठी लचके तोडलेले नागरीकरणाच्या सर्जरीला द्यावी लागते दगडमाती वसलेल्या शहराच्या सौंदर्यामागे असते कुर्बानी डोंगरांची विंडो सीट आजकाल नकोशी वाटते

झाली...पहाट झाली!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 09/07/2017 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली! फांदीवरुन कानी येतात सूर काही मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली! गेला चुकून ताफा येथून राजशाही इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!

मला आजवर कधीच रडू आलं नाही निपचित पडलेल्या कलेवरांच

लेखक गरजू पाटिल. यांनी रविवार, 09/07/2017 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
मलाआजवर कधीच रडू आलं नाही निपचित पडलेल्या कलेवरांच कि कधी चिड आली नाही त्या देहधारी नामधारी आत्म्यांची मला कधीच राग आला नाही त्या बंदुकाधाऱ्यांचा कि मला कधी भिती वाटली नाही हिंस्र झालेल्या श्वापदांची ना मला कधी घृणा वाटली त्या बलात्कारी अंगांची मी रडले मानवतेच्या र्‍हासामुळे, खुप रडले मला चिड आली माझ्या षंढ राहण्याची तुमच्या षंढ असण्याची मला राग आला त्या बंदुकधाऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या भावांचा, त्यांच्या मानसिकतेचा, त्यांच्या गळ्यात पट्टे होते त्यांना ओळखी होत्या मला भिती वाटली त्या पट्टे धरणाऱ्यांची मला घृणा वाटली त्या बलात्काऱ्यांच्या संस्कारांची, संस्कृतीची, मानसिकतेची त्यांच्या जातीची, धर्म

मराठी माणसा झोपलाच राहा

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी शनिवार, 08/07/2017 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसा झोपलाच राहा पॅसे मिळविण्या मात्र तत्पर राहा घरिदारी अन बाजारीही जातीपातीचे राजकारण करी नको तेथे अध्यात्म लावुनी विसरुनी जा तू दिव्य लक्ष्मी हरलास जरी जीवनी तू अध्यात्माचे धडे गिरवी तू वास्तवाचे भान सोडुनी नवा मार्ग शोधू नको तू मिळणाऱ्याचा द्वेष करी तू बाणा आपुला सोडू नको तू बदलू अथवा पेटू नको तू आस प्रगतीची ठेवू नको तू जुने सारे संत पकडुनी कीर्तन भंडारे करी तू मंदिरांपुढे रांग लावुनी वेळ आपुला व्यर्थ दवडी तू वाद घाल तू जयंत्यांवरी शासकीय तिथी दिनांकांवरी इतिहासाच्या मंथनातले शोध कधीही सहन न करी महापुरुषांचे कार्य विसरुनी जीवन त्यांचे उघड करी चविष्ट चर्चा अन संघटना निर्माण करी
काव्यरस

(ए, बैठ ना जरासा)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 08/07/2017 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा ए, बैठ ना जरासा, मीठी मीठी करेंगे बाते, अभी तू आता नई रे, पहेले इधरीच गुजारता राते, वो पक्या गया कल, मेरेको बहोत बेइज्जत करके, दिखा दो सालेको औकात, दो चार फटके मारके, समझताहै मुझको भी, बहोत देर हो गयी है, चलना भुर्जीपाव खायेंगे, बहोतही भुख लगी है, पैले बोतता था, रानी तूम रोज मेरे ख्वाब मे आती हो, लेकीन आजकल तो तुम, किसी और पास ही जाते हो, चौराहेपे खडे रहे रहे के, गुजर जाती है सारी सारी रात, आजकल सब दूर से जाते है, कोई लगाता नही मेरेको हाथ, मेरेको अभी बी याद है, तेरे सीने के वो घने काले बाल, एक बार सर रखना है मुझे उनमे
काव्यरस