खोटी नाणी
ही मैत्री, प्रीती, ही तर खोटी नाणी
बाजार भरविती गाऊन त्यांची गाणी
मित्रहो, या आहेत रॉय किणीकरांच्या एका कवितेतील दोन ओळी. यांनी माझ्या मनात कायमचे घर केलेले आहे. ते म्हणतात ते अगदी खरे आहे. मैत्री व प्रीती या दोन्ही प्रांतांमध्ये असंख्य खोटी नाणी कायम खुळखुळत असतात. माझ्या काही परिचितांना त्यांच्या आयुष्यात अशा खोट्या नाण्यांचे चांगलेच अनुभव आले. त्यांनी ते मला सांगितले. मला ते भावले.
मिसळपाव
आम्ही लवकरच सनावद ला पोहोचलो. तेथे बेडीया चा रस्ता विचारून बेडीयाच्या दिशेने गाडी निघाली. रस्ता नविनच
बनवला गेला होता. आम्ही दर ५कि.मी ला कुणाला ना कुणाला रस्ता विचारत होतो. माझा अंदाज होता की समाधी बहुतेक लोकांना माहीत नसेल. पण आम्ही ज्याला कोणाला विचारले त्याने प्रत्येकाने "पेशवा सरकार" बद्दल व्यवस्थीत माहिती पुरवली. बेडीया हुन आम्ही पीपलगोन रोड ला लागलो. २०चे ४० किमी झाले तरी समाधी येईना म्हणून चालक थोडा वैतागला होता. पण काही की.मी जाताच आम्हाला म.प्र. सरकारचा हा मोठा फलक दिसला.