II ना होतो नवा मी , ना होती ती जुनी II ( मिपा मित्रानो "जेनी" नाही बरं का ... जुनी )
ना होतो नवा मी
ना होती ती जुनी
गोष्ट चालूच होती
होती फक्त राजा न राणी II
सांगे आषाढ पाऊस
नको सोडून जाऊस
संगे थांब तू जरासा
वाटे हृदयास दिलासा II
किती दिल्या आणा भाका
चुके काळजाचा ठोका
वर्षे क्षणात लोटली
आता क्षण वाटे मोठा II
असा काय घात झाला
झाली दुसरीच राणी
राजा दूर दूर गेला
सोडून साऱ्या आठवणी
आता कुणासंगे बोलू
मन उदास उदास
आषाढ पावसाचा जोर
देई राजाचा रं भास
फुटकं नशिब त्ये माझं
संगे आठवणींचं ओझं
म्या चालली चालली
जिथं नेतील तिथं ढग II
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
(why is there nothing rather than something ???????)
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
कविता II आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला II
आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला
विषाद नव्हता मनी तो कसला
ना होती मनीषा अन विजिगीषा
पाषाण शोधण्यातच हया गेली
अनभिज्ञ ,घन अन नाजूक बंधन
अक्षय संचयात किल्मिषे दाटली
पृथ्थककरणात अन निरूपणात
कैक अमावास्यां पौर्णिमा लोटली
भ्रमिष्ट अस्थिपंजर
शोध कूर्म गतीने पाषाणाचा
अनिर्वचनीय बंधनात अविरत
सोबतीने शोध अस्तित्वाचा
अनावृत वैचित्र्य अनाहूत गाठे
यथास्थित स्थितिस्थापक
क्षणभंगुर वाटे
शिरकाण बलिदान ती ज्येष्ठ नाती
पाषाण शोधण्यात दिली मूठमाती
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
आवर्तन
पावसाची आवर्तनं चालू असताना प्रत्येक थेंबाला जमिनीवर एक कोंब फुटतो, आणि पाणी वेलीसारखं पसरत जातं. अचानक थबकायला होतं, आणि भीती वाटते की आपल्याला येणारी जगाची अनुभूतीच तर चुकीची नाही ना? मी आणि माझ्या नजरेने ठरवून घेतलेल्या रूपांमध्ये ज्याचं जगणं अल्पायुषी वाटतं, त्या त्या रुपांच्या मर्यादेतून बाहेर काढलं, तर त्या पाण्याला एकच गुणधर्म राहतो-वाहतेपण.
या अचानक झालेल्या जाणीवेने क्षणिक काय, नित्य काय, याच्या सगळ्या संकल्पना वाहत्या होऊन जातात. सरपटत जाणारं पाणी सापडेल तिथल्या भेगेत जुनाट वाड्याच्या भिंतींवरील वेलीप्रमाणेच चोरपावलांनी शिरतं, आणि त्या भेगेइतकंच शहारायला होतं.
कविता :: II बॉस हा नेहमी बॉस असतो II
बॉस हा नेहमी बॉस असतो
तुमचा काय न आमचा काय
एकदम झक्कास असतो
आपल्या खाली वात लावून
उजळतो कार्यालय सारे
अन लख्ख प्रकाश टाकतो
बॉस हा नेहमी बॉस असतो
तुमचा काय न आमचा काय
एकदम झक्कास असतो II
नको वाईट वाटून घेऊ
दुः ख समजतंय मला , मित्रा
तू देखील आमच्या सारखाच येतोस कामावर
बुडाखाली लावून पत्रा
टक टक आवाज होई पत्र्याचा
पत्रा निनादत राहे
गरीब मेहनती कामकरूस
तो ठोकुनी निरखुनि पाहे II
बॉस वरचा क्लास असावा
पाहताक्षणी तो उर भरावा
पंचेन्द्रीयांनी सलाम ठोकावा
जणू नकळत खाली भूकंप यावा II
बॉसने शस्त्र हाती घेता
होई पत्रासज्ज जनता
मारे लाथ अन धरुन तो ठोके
कुण
सहप्रवासी २
सहप्रवासी भाग 1
असाच एक रविवार.
दुपारचे २
सी.एस.टी ठाणे लोकल.
सरळ बाजुची खिड़की पकडुन बॅक लॉग भरण्यासाठी उलटी मोजणी.
जास्त म्हणजे ६० पर्यंत सुक्ष्मात विलिन होण्याची खात्री.
डुलकी लागतच होती आणि दरवाजावर कल्ला झाला.
३ कॉलेज कन्या डब्यात शिरल्या. अगदी गाडी सुटता सुटता.
डब्यात इन मीन २ प्रवासी.
समोरच्या बाकावर खिदळत समुह स्थानापन्न.
...
"ए तु जुली बघितलायस का ग"? कन्या १
माझ्या अंगावर शहारा आला.
डोळे अर्धवट उघडुन प्रश्नकर्ती कडे ओझर टाकला.
"हॉ" कन्या २
"व्हॉट्स द बिग डील? काय बावळट्पणा. करायच्च ते करायच वरुन आय लव यू म्हणुन पिळायच.
अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग ३
अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १
अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग २
नंतर आम्ही चिडिया टापू भागाकडे जात होतो. हा भाग पोर्ट ब्लेअर च्या दक्षिणेला आहे. नावावरुन कळलंच असेल याला चिडिया टापू का म्हणतात. घनदाट अरण्य, वेगवेगळे पक्षी, अंगावर नाचणारी फुलपाखरं ,वेगवेगळे किडे अशी एक टिपीकल एवरग्रीन फॉरेस्टमधली इको सिस्टम आहे ही.
नविन हायब्रिड सायकल
नविन हायब्रिड सायकल घ्यायचि आहे.
पर्याय सुचवा
जास्तित जास्त १५००० खर्च करु शकातो.
मोन्त्रा डाउन टाउन काशि आहे ?
मिसळपाव