ताम्हिणी घाटात एक रात्र
एक सौदीवाला , एक कुवेतवाला आणि एक ओमानवाला अशा तीन मित्रांची ओळख फेसबुकवर झाली २०१० मध्ये ... एक समान धागा म्हणजे तिघेही कोकणातले... सहासात वर्षात फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर धमाल मस्ती चाललेली ... पण तिघांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला तो या वर्षी फेब्रुवारीत ... त्याच वेळी ठरले की या पावसाळ्यात कुठेतरी जंगलात एक रात्र काढायची... आम्ही गेली ३/४ वर्षे चालवलेल्या "भुताटकी"पेज ला नवीन स्टोरीज साठी काहीतरी मटेरियल सुद्धा मिळेल ही अपेक्षा ;)
तर शेवटी होता होता ८-९ जुलै तारीख अन ताम्हिणी घाट फिक्स झाले . आम्ही दोघे रत्नागिरीकर पहाटेच्या रत्नागिरी दादर पॅसेंजर ने सकाळी १० ला कोलाड ला पोहोचलो .
मिसळपाव