Skip to main content

पिनाडी पिनाडी पिनाडी………

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 28/09/2024 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
पबजी हा खेळ जवळपास सर्वांनाच माहीत असावा. ज्याने खेळला नाहीये त्याने देखील ह्या खेळाबद्दल ऐकले असावे. हा खेळ ऑनलाईन मल्टिप्लेअर सर्व्हायवल गेम आहे, जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. तुम्ही आणि तुमची टीम एका मोठ्या बेटावर इतर ९६ खेळाडूंसोबत उतरता, आणि तुमचं ध्येय असतं, शेवटपर्यंत जिवंत राहणं. हे बेट एक युद्धभूमी असतं जिथे सर्वत्र शत्रू असतात, आणि जिथे तुम्हाला शस्त्रं, दारूगोळा, औषधं शोधून शत्रूंना हरवायचं असतं. हा खेळ अर्ध्या तासासाठी तुमचं जग बदलतो, एका आभासी युद्धमय जगात तुम्हास नेतो. जिथे फक्त तुमची टीम आणि शत्रू.

African Love Bird

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 26/09/2024 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
lm2 चित्रकार कसरत - ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा संत चोखामोळा यांच्या अभंगा प्रमाणे शिर्षक बघून काही मनचले...... पण तसे काही नाही.

भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम

लेखक srahul यांनी गुरुवार, 26/09/2024 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम" . धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला. भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल. मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती. सुरुवातीच्या काळात निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, वितरण, प्रदर्शन या साऱ्या जबाबदाऱ्या दादासाहेब फाळके (प्रत्यक्ष अथवा

पावसाळी भटकंती: आंबे-हातविज, दुर्ग देवराई

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 24/09/2024 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी पावसाळ्यात खूप फिरणं झालं, धुव्वाधार पावसात भंडारदरा, महाबळेश्वर, श्रावणातल्या जलधारांत नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर आणि आत्ता सरत्या पावसात आंबे-हातविज. अगदी १० दिवसांपूर्वीच ऐन गणेशोत्सवात आंबे- हातविजला जाणं झालं. खरं तर मूळ प्लॅन होता तो आहुपे घाटात जायचा, पण काही कारणास्तव मंचर ऐवजी पुढे नारायणगावनजीक मित्राच्या गावाला पिंपळवंडीला जावे लागले, तिकडून परत मंचरला जाण्याऐवजी जुन्नर जवळ, आणि जुन्नरवरुन आंबे - हातविज जवळ त्यामुळे तिथे आधी जाऊन मग तिथूनच आहुपेला जाण्याचे ठरवले. हा भाग अति परिचयाचा, नाणेघाटात इकडून अनेकदा गेल्यामुळे संपूर्ण रस्ता माहितीचा.

दिवा

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 23/09/2024 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राची धग क्षीण होत सरता घेरून ये गारवा रात्रीचा तम प्राशुनी घुमतसे वृक्षातळी पारवा तेजाचे ऋण फेडण्यास भटके तार्‍यांसवे काजवा जीर्णाचे अवशेष येथ कुठले उन्मेष जेथे नवा प्रज्ञेचे स्थल-काल अक्ष हटता भोवंडल्या नेणिवा अस्ताचे भय भास्करास कुठले जो चेतनांचा दिवा

अवयव दान

लेखक टीपीके यांनी शुक्रवार, 20/09/2024 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दोन आठवडे वडिलांच्या आजारपणामुळे ICU बाहेर वेळ काढणे चालू आहे. इथे माझ्यासारखे अनेक नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. इथे अनेक जण आपल्या आप्तांसाठी कोणी अवयव दाता मिळेल का याची वाट बघत, आशेवर बसलेले आहेत. या वेळात काहींचे आप्त दाता भेटल्याने बरे होउन घरी जाताना, तर काहींचा दात्यची वाट बघता बघता मृत्यू होताना, तर काहींसाठी वाट बघताना जे उपचार द्यावे लागतात त्या मधे पैशांचा प्रचंड चुराडा होताना बघतो आहे. काही लोकं पर राज्यतून येउन महिनोंमहीने दात्याची वाट बघत आहेत. माणूस जिवंतपणी सुद्धा आणि मेल्यावर पण अवयव दान करू शकतो.