Skip to main content

साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 19/09/2024 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.

सरडा चेला तर नेता गुरू

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 18/09/2024 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा जंगलात राहाणाऱ्या सरड्याने शहरात जाऊन लोकांना आपले रंग बदलण्याचे कौशल्य दाखवून वाहवा मिळविण्याच्या विचार केला. सरडा जवळच्या शहरात गेला. तिथे त्याला एका सरकारी बंगल्यात डोक्यावर काळी टोपी घातलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला दिसला. सरडा त्या माणसं जवळ गेला आणि म्हणाला मी जंगलात राहणारा सरडा आहे. मला रंग बदलण्याची कला अवगत आहे. मी ज्या झाडा फुलावर बसतो त्याच रंगात मिसळून जातो. सरडा म्हणाला मी तुम्हाला आपली कला दाखवतो. सरडा हिरव्या पानांवर बसला तो हिरवा झाला. सरडा लाल फुलावर बसला तो लाल झाला. अश्या रीतीने सरड्याने वेगवेगळे रंग बदलून त्या माणसाला दाखविले.

ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 18/09/2024 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! कालच अनंतचतुर्दशी झाली आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था झाली. आधी महिनाभर तयारी आणि मग दहा दिवस जागून कामे करून थकलेले कार्यकर्ते मंडपातच आडवे झाले किंवा श्रमपरिहाराला गेले. पण दिवस भर आणि मग रात्रभर रस्त्यावर वादन करणारी आणि वेगवेगळ्या मानाच्या/ बिनमानाच्या गणपतींसमोर वादन करून सलामी देणारी ढोलपथके कुठे गेली?त्यांचे ते एकसारखे दिसणारे सुंदर झब्बे लेंगे, टोप्या, मुलींच्या नथी, साड्या आणि मुख्य म्हणजे ते अजस्त्र ढोल , कडकडते ताशे ,ते वाजवताना बेधुंद होऊन नाचणारे वादक , नाचणारे झेंडे ते सर्व कुठे गेले?

( वर्दी )

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 18/09/2024 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली "ती",येत आहे याची अवचित वर्दी आली हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी उघडता नयन, तया कळाले , उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.
काव्यरस

त्वमेव सर्वमम देव देवः

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 17/09/2024 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
. काय बाप्पा, निघालास? आजवरच्या आयुष्यासारखेच हे दहा दिवसही कसे गेले कळालेच नाही. बाबा शंभू आणि आई गौरी तुझी वाट पाहत असतील. नंदी उंदीर मामाकडून पृथ्वीतलावरच्या गोष्टी ऐकण्यासाठी आतुरला असेल. तू येथे येतोस त्या पर्वाला आम्ही 'गणेशोत्सव' म्हणतो.

सातारा -कास पठार

लेखक Bhakti यांनी सोमवार, 16/09/2024 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
छ महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.

श्री गणेश लेखमाला २०२४ - फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार

लेखक चतुरानंद यांनी सोमवार, 16/09/2024 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार जगातील कुठल्याही समाजात काही गोष्टी सर्वसहमतीच्या असतात, तर काही गोष्टींबाबत दुमत असते. जगात जिथे जिथे मानवी समाज आहे, तेथे सत्ता, संपत्ती, स्त्री, जमीन आदी अनेक कारणांवर लोकांमध्ये वादविवाद असतात. या वादविवादात पूर्वी भांडणे आणि युद्धे होत आणि राजा तसेच राजघराणे बदलले जाई. औद्योगिक क्रांती आपल्याला मध्ययुगीन जगातून आधुनिक जगाकडे घेऊन आली. त्याबरोबर नवनवीन तंत्रज्ञान, विचारधारा, आयुष्याची नवनवीन मांडणी समोर येत गेली. नवीन तंत्रज्ञान घेऊन नवीन बाजारपेठा शोधत असणाऱ्या युरोपात जगाची बाजारपेठ ताब्यात घ्यायची स्पर्धा लागली.