मोस्ट एलिजिबल बॅचलर...2016
मोबाइलची बेल वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, ‘०२२’ आणि पहिले चार डिजिट… अरे हा तर ‘बॉंबे हाऊस’ मधून आलेला, म्हणजे टाटा मोटर्स मधील कुणा मित्राचा फोन असणार.
‘हॅलो…’
आता कुणा मित्राचा परिचित आवाज कानावर पडणार म्हणून आनंद झाला.
‘हॅलो, इझ जयंथ कार्निक देअर?’ – जयंत कर्णिक ची एवढी वाट लावली म्हणजे मित्रांपैकी कोणीच नाही.
मिसळपाव
ह्या वर्षी ३१ जानेवारीला असा काही योग जुळून आला की पार्ल्याला 'मॅजेस्टिक गप्पा' कार्यक्रमात डॉ. आशुतोष जावडेकर ह्यांची मुलाखत ऐकायला मी हजर होते. त्या वेळी त्यांनी 'लयपश्चिमा' ह्या कार्यक्रमाचा काही अंशही सादर केला व मनमोकळ्या गप्पादेखील मारल्या. सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. 'संगीताला सीमारेषा नसते आणि आपण ती आखूही नये' हे नवे काहीतरी मी शिकले होते.