डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स
डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स
नमस्कार मंडळी. मी डॉ. वाटमारे. गेली कित्येक वर्षं मी साबुदाण्याच्या गोळ्यांमध्ये काय मिक्स करतो ह्याचं रहस्य मलाच काय, पण स्वतःला फार मोठा रहस्यसंशोधक, सत्यान्वेषी समजणार्या माझ्या मित्राला - म्हणजेच ढेरपोट गोम्सलासुद्धा उलगडलेलं नाही. त्याचं आडनाव तसं गोमासे, परंतु तो स्वतःला शेरलॉक होम्सच्या व्यवसायातला समजतो, म्हणून त्याने गोमासेचं गोम्स असं करून घेतलं. माझ्या मते हा माणूस सत्यान्वेषी नाही, तर सत्यविध्वंसक आहे. या माणसाला एकच सत्य माहीत आहे - 'पैसा' आणि पैसा देणारा जे सांगेल तेच याचं सत्य. एवढे पैसा पैसा करूनही हा माणूस मात्र भिकारडाच आहे.
मिसळपाव